अनुत्तरीत प्रश्न….

श्री गुरुजी

आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता  लठ्ठ झालाय तो.. नुसता खातो आणि बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसून रहात नव्हतो आम्ही. पण जेंव्हा १९४८ मधे जेल मधे जावं लागलं, तेंव्हा पा्सून माझी तब्येत बिघडली. माझे वडील सांगत होते, आणि धाकटी मुलगी अगदी मन लाऊन ऐकत होती.

आता हे इतर सगळं म्हणजे खेळणं व्यायाम वगैरे ठीक आहे.. पण जेल मधे तुम्ही कशाला गेला होतात?? काय केलं होतं तुम्ही??  कित्ती कुल नां??? म्हणजे आजोबा तुम्ही प्रिझन सेल पण पाहिला?? तिथे चक्क राहिलात तुम्ही???  आता या जेल मधे जाण्यात काय कुल दिसलं तिला तीच जाणे..

खरं तर मुलींचा विश्वासच बसत नव्हता की आपल्या आजोबांनी जेल मधे जाण्यासारखं काही केलं असेल म्हणून. कारण आजोबा तर कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते.. आणि ही गोष्ट तर नक्की  माहिती होती.. आता हे जेलचं काय सांगताहेत??

हे असं नेहेमी होतं, वडील ( वय वर्ष ८३-८४) असं काहीतरी अर्धवट सांगतात मुलींना , आणि मग नंतर मला सगळं व्यवस्थित सांगावं लागतं . आता आजोबा जेल मधे का गेले होते?? ही घटनाच मुळी मुलींच्या मते  इतकी  ’कुल’ (?)  चित्त थरारक होती , की मुलींना  काय झालं होतं हे माहिती करुन घेतल्या शिवाय   रहावत नव्हतं. बरं  खरंच तेंव्हा काय झालं होतं… याची मला पण निटशी माहिती नव्हती, मग घरी असलेलं   पुस्तक   आधी वाचलं, आणि मग समजाऊन सांगितलं काय झालं होतं ते…आजोबांनी पण फक्त संघकार्यासाठी गेलो होतो एवढंच सांगितलं होतं मुलींना.. म्हणजे नेमकं काय??

इथे अगदी थोडक्यात माहिती देतो.. १९४६ सालची घटना. १६ ऑगस्ट रोजी मुस्लिम लिग ने जाहिर केलेला  डायरेक्ट ऍक्शन ( अजुन माहिती अन फोटॊ बघायला इथे क्लिक करा) कार्यक्रम, त्या  कार्यक्रमात झालेल्या बेसावध हिंदूंच्या कत्तली, अत्याचार, बलात्कार, आणि सोबतच पंजाब आणि सिंध, आणि बंगालात झालेले हिंदूंचे शिरकाण,तसेच त्यांना जबरदस्तीने निर्वासित करण्याचे झालेले प्रयत्न.. अशा अनेक घटना घडल्या होत्या. असे अनेक फोटो आहेत वर दिलेल्या लिंक वर की जे पाहिलं की संताप येतो- हे असं का व्हावं म्ह्णून??

सर्व सामान्य हिंदू पेटुन उठला होता. प्रत्येकालाच आपण काही तरी केलं पाहिजे  असं वाटत होतं, पण नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. तिकडे गांधीजींचं उपोषण सुरू होतं, मुस्लिमांवर थोडे हल्ले केल्याबरोबर. तेंव्हाच श्री गुरुजींनी स्वयंसेवकांना दंगल पिडीत अशा भागात जाउन निर्वासित ( हिंदू) बांधवांना मदत करण्याचे अवाहन केले. केवळ श्री गुरुजींच्या एका शब्दावर हजारो पुर्ण वेळ कार्यकर्ते आणि सोबतच इतरही कार्यकर्ते त्या भागात मदत कार्यासाठी निघाले.

१८ ऑक्टॊबर १९४७ श्री गुरुजींनी  रोजी महाराज हरीसिंग यांची भेट घेउन काश्मीर भारतामधे विलीन करणे  हे काश्मिरी जनतेच्या आणि भारताच्या कसे हिताचे आहे ह्यावर चर्चा केली.पण लवकरच पाकिस्तानी आक्रमणामुळे या समस्येतिल गुंता वाढून ही समस्या गंभीर बनली होती.कॉंग्रेसच्या कपाळी असलेला फाळणीच्या पापाचा टीळा अन काश्मीर प्रश्न हाताळण्यात झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पं. नेहरूंनी सगळा राग काढला तो संघावर!!

हिंदु समाज जागृत झाल्यामुळे संघशक्ती वाढू लागली आहे हे लक्षात येताच पं. नेहरूंनी जातीयवादी शक्तींना चिरडून टाकु अशा धमक्या देणे सुरु केले. अर्थात अशा धमक्यांचा संघावर किंवा संघ कार्यावर काहीच परिणाम   झाला नाही, आणि स्वयंसेवकांनी आपली कामं करणं सुरु ठेवलं. यावर कुठल्याही स्वयंसेवकाने किंवा श्री गुरुजींनी  पं. नेहरुंच्या विरुद्ध वक्तव्य करणे टाळले.

३० जानेवारी १९४८.. महात्मा गांधींची हत्या केली गेली.श्री गुरुजींनी पं. नेहरु, सरदार पटेल, आणि देवदास गांधी ( महात्माजींचे सुपुत्र) यांना तारा पाठवून घटनेचा निषेध केला, आणि नंतर भेट सुध्दा घेतली. तेंव्हा श्री गुरुजी मद्रासला होते.

दरम्यान या हत्येसाठी संघाला जबाबदार धरण्याच्या काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे स्वयंसेवकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. ब्राह्मणांची घरं लुटण्यात आली, आगी लावण्यात आल्या. हिंदूंमधेच जातीय  तेढ निर्माण करण्याच्या  राजकीय रुढींना पाया निर्माण करण्यात येत होता. आज आपण केवळ  मुलायम सिंग, लालु यदव,मायावती किंवा कांशीराम यांना जा्तीय राजकारण करतात म्हणून दोष देतो, पण याची मुहुर्तमेढ कॉंग्रेसच्याच राजवटीत रोवल्या गेली हे आपण विसरुन चालणार नाही.

ते हल्ला करण्याचे लोण महाराष्ट्रात पण पोहोचले आणि श्री गुरुजींच्या घरावर पण दोनदा हल्ला करण्यात आला.बरीचशी चीज वस्तु जी काय असेल ती लुटून नेण्यात आली होती.श्री गुरुजींनी  सगळ्या स्वयंसेवकांना शांत रहा आणि कुठलाही प्रतिकार करु नका असा संदेश दिला. १ फेब्रु.१९४८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि  काहीही कारण न देता जेल मधे टाकण्यात आले.

४ फेब्रु १९४८ रोजी संघावर बंदी घालण्यात आली . श्री गुरुजींनी जेल मधुनच ६ फेब्रु १९४९ ला एक वक्तव्य देउन  आपण संघाचे कार्य स्थगित केले आहे असे जाहीर केले- आणि त्याच वक्तव्यात संघावर करण्यात आलेल्या आरोपांचा पण स्पष्ट इन्कार केला.

श्री गुरुजींना जेंव्हा अटक करण्यात आली होती तेंव्हा दोन कलमं लावण्यात आली होती.. एक म्हणजे ३०२ – खुन  आणी ‘१२० म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे. पण नंतर बहुतेक सरकारच्या लक्षात आलं की केस खूपच कमजोर आहे म्हणून, एका आठवड्यात त्यांच्यावरचे हे दोन्ही आरोप मागे घेउन त्यांच्यावर सुरक्षा कायद्या खाली स्थानबध्दतेचा आदेश बजावण्यात आला. यावरूनच त्या वेळेसचा शासनाचा दुटप्पी पणा दिसून येतो.

१३ ऑक्टॊबरला श्री गुरुजींची सुटका झाल्यानंतर त्यांनी सरदार पटेल यांची भेट घेतली असता, सरदार पटेल यांनी श्री गुरुजींना संघ विसर्जित करुन कॉंग्रेसमधे विलीन व्हावे अशी सूचना दिली. ही सूचना अर्थातच श्री गुरुजींना मान्य होणे शक्य नव्हते, श्री गुरुजींनी सांगितले की संघ हा राजकीय पक्ष नाही… आणि त्यामुळे  सरदार पटेलांची सूचना मान्य करता येणार नाही. सरदार पटेलांनी तेंव्हा  “श्री गुरुजींना त्यांना दिल्ली सोडून देण्यास सांगण्यात यावे” असे अधिकाऱ्यांना सांगून   मुंबईला निघून गेले. जेंव्हा पोलिस श्री गुरुजींवर आदेश बजावण्यास गेले तेंव्हा त्याच आदेशाच्या मागे ” हा आदेश नागरीक हक्काचे हनन करणारा असल्यामुळे मला मान्य नाही”, असे लिहुन दिले, आणि श्री गुरुजी दिल्लीतच राहिले.

३ ते१३ नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पं नेहरूंवर संघावरील बंदीसाठी एक तर पुरावा तरी द्या किंवा संघ बंदीचा आदेश तरी उठवा अशा आशयाची पत्रं लिहीलीत.  सोबत  आपली मागणी पुर्ण होई पर्यंत आपण दिल्लीलाच रहाणार हे पण लिहिलं .

६ फेब्रु १९४८ ला  आपण दिलेला  संघ विसर्जनाचा  , तो आपण मागे घेत आहोत, ( हे झालं ११ नोव्हेंबर १९४८ला) आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्वीच्याच उत्साहाने संघ कार्य सुरु करावे  हे श्री गुरुजींनी जाहीर केल्यावर मात्र , प्ं नेहरूंनी १८१८ सालच्या बंगाल प्रिझनर्स ऍक्ट खाली ( हा ऍक्ट काय आहे ??) श्री गुरुजींना अटक करुन त्यांना नागपुरला विमानाने पाठवून दिले.

मध्यंतरी म्हणजे संघ बंदीच्या काळात शाखा भरणे बंद झाले होते. म्हणून ९ डीसेंबर रोजी “संघ शाखा प्रारंभ” हा सत्याग्रह सुरु करण्यात आला. या सत्याग्रहामधे प्रत्येक भागात संघ शाखा पुन्हा सुरु करण्यात याव्या असा सत्याग्रह होता तो.

या सत्याग्रहावर बोलतांना पंडित नेहरु – संघांच्या पोरांचा हा दुराग्रह आम्ही सहज मोडून टाकु असे म्हणत पंडीत नेहेरुंनी लाखो सत्याग्रहींना अटक करुन जेल मधे टाकले .  त्या मधे आजोबा पण जेल मधे गेले …

संघ बंदीचा हुकुम हा शेवटी १० जुलै १९४९ रोजी मागे घेण्यात आला आणि त्यानंतर आजोबांची सुटका झाली.

इतकी कॉम्प्लीकेटेड गोष्ट मुलांना सोपी करुन कशी सांगायची?? आणि सांगितल्यावर पण इतके प्रश्न असतात की त्यांची उत्तर बघायला राष्ट्र ’ऋषी श्री गुरुजी’ चे दोन्ही भाग चाळावे लागतात, आणि शेवटी प्रश्न रहातो अनुत्तरीत.. तरी आपल्या कडून होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करायचा.. असो..

हा लेख संपुर्ण पणे राष्ट्र ऋषी श्री गुरुजी या पुस्तकावरून बेतलेला आहे..About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , . Bookmark the permalink.

20 Responses to अनुत्तरीत प्रश्न….

 1. Nikhil Sheth says:

  महेंद्र सर, या तारखा एकदा कृपया तपासून घेता का? काहीतरी गडबड वाटत आहे –
  ४ फेब्रु १९४८ रोजी संघावर बंदी घालण्यात आली
  ६ फेब्रु १९४८ ला काढलेला संघ बंदीचा आदेश आपण मागे घेत आहोत

  • निखिल
   धन्यवाद.. सध्या ऑफिसमधे आलोय काही कामासाठी .. घरी गेलो की मग चेक करुन दुरुस्त करतो.. 🙂

  • निखिल
   पुन्हा चेक केलं , ते वाक्य बरोबर नव्हतं, तारिख बरोबर आहे दिलेली. आता वाक्य दुरुस्त केलंय. चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आभार.

 2. vinayak says:

  mi aahe sanghacha karykarta
  baki lekh cvhaan
  tarakhanbaddal mala tar kahich mahit nahi

  • तारखा बरोबर आहेत. वाक्य चुकले होते त्यामुळे गैरसमज होत होता. आता वाक्य बरोबर केलंय.

 3. Rohan says:

  बरीच माहिती नव्याने क ळ ली दादा.. श्री गुरुजींनी महाराज हरीसिंग यांची भेट घेउन काश्मिर भारतामधे विलिन करणे ह्यावर चर्चा केली होती हे ठावूक नव्हते… आणि अर्थातच आजच्या जातीय राजकारणाची मुहुर्तमेढ कॉंग्रेस मुळेच झाली आहे यात काही शंका नाही. मुलायम सिंग, लालु यादव, मायावती ही तर फ़क्त पिलावळ आहे.

  • अरे दोन मोठे ग्रंथ आहेत.. बरीच माहिती आहे. इथे जास्त सनावळ्या दिल्या नाहीत, कारण वाचतांना कंटाळा येतो.. ( अर्थात, तु त्याला अपवाद आहेस म्हणा)

   • Rohan says:

    होय रे … 🙂 तसा मी सुद्धा संघ कार्यकर्ता होतो आधी. नंतर मात्र शाखेत जाणे बंद झाले.

    • माझं पण शाखेत जाणं कधीच बंद झालंय…पण एकदा स्वयंसेवक झालो की नेहेमी करताच स्वयंसेवक रहातो..

 4. sonali says:

  Mothya lokana kiti tras sahan karava lagato samajasathi. shalet asatana mi pan samitit jat ase, ya lekhavarun barech divasani ” Namaste sadaa vatsale matru bhoome…..” prarthanechi athavan zali.

 5. bhaanasa says:

  दोन दिवस गडबड आहे. हा तुझा लेख जरा शांतपणे वाचायला हवा.:)

 6. मलाही गुरुजी आणि राजा हरिसिंग यांच्या भेटीबद्दल काहीच माहित नव्हतं. एकूणच खूप नवीन माहिती मिळाली. बाकी लहानपणी जायचो शाखेत. पण नंतर काहीच संबंध नाही 😦

 7. [i]मात्र , प्ं नेहरूंनी १८१८ सालच्या बंगाल प्रिझनर्स ऍक्ट खाली ( हा ऍक्ट काय आहे ??) श्री गुरुजींना अटक करुन त्यांना नागपुरला विमानाने पाठवुन दिले.[/i]

  बरं. मग गोळविलकरांची सुटका केव्हा करण्यात आली ?
  ———-
  संघावर बंदी घालण्याचा निर्णय सरदार पटेलांचा होता. सरदार पटेलांनी गोळवलकरांना पाठवलेल्या पत्रात ते काय म्हणतात पहा –

  “All their (RSS) leaders’ speeches were full of communal poison. As a final result, the poisonous atmosphere was created in which such a ghastly tragedy(Gandhi’s murder) became possible. RSS men expressed their joy and distributed sweets after Gandhi’s death.”
  (Excerpts from Sardar Patel’s letters to M S Golwalkar and S P Mookerjee. Outlook, April 27, 1998).

  —-

  नथुराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा “बौद्धिक कार्यवाह”(Intellectual Teacher) होता ना ? गांधींचा खुन झाला तेव्हा नथुराम संघात़च होता ना ?

  —-
  ६ डिसेंबर, १९४७ (गांधी खुनाच्या काहीच दिवस अगोदर) ला गोळवलकरांनी गोवर्धन मध्ये एक मीटींग घेतली होती.
  The police report on this meeting remarks that “the (RSS) workers are alleged to have discussed the ways and means of capturing the seats in the government…. It is also alleged that one of its (the RSS’s) programme(s) would be to assassinate the leading persons of the Congress…to terrorise the public and to get their hold over them”.

  Millions of Indians saw Partition as a tragedy. But for M.S. Golwalkar, Partition was an opportunity, an event which, if properly taken advantage of, might increase his influence and reach manifold. On December 8, 1947, Golwalkar addressed a crowd of several thousand RSS volunteers at the Rohtak Road camp in Delhi. Also in attendance was a police inspector named Kartar Singh. His report of the sarsanghchalak’s speech deserves to be quoted in extenso. The policeman reported that Golwalkar told his followers that “the time for mere playing has gone. Our volunteers should enrol new volunteers in every house, and should instil in them the essence of Hinduism. Referring to the government, he said that law could not meet force…. The Sangh will not rest content until it had finished Pakistan. If anyone stood in our way we will have to finish them too, whether it was Nehru government or any other government…. Referring to Muslims, he said that no power on earth could keep them in Hindustan. They should have to quit this country….If they were made to stay here the responsibility would be the government’s and the Hindu community would not be responsible. Mahatma Gandhi could not mislead them any longer. We have the means whereby (our) opponents could be immediately silenced”.
  [Ref – India after gandhi, Ramchandra Guha,
  http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20050822&fname=EGuha+(F)&sid=1&pn=4%5D
  —–
  हे पण वाचा –

  Sometime in the run-up to the assassination of Mahatma Gandhi by Nathuram Godse, the UP police made a sensational discovery. A house used by RSS supremo Guruji Golwalkar had been raided and two locked trunks recovered. When B.B.L. Jaitley, the inspector general of police, opened the trunks, what he found shook him to the core. There before him lay a detailed district-by-district, qasbah-by-qasbah blueprint for the physical elimination of the province’s Muslims.

  Jaitley took the trunks to Rajeshwar Dayal, the seniormost civil servant in the home department at the time, who promptly conveyed the gravity of the discovery to G. B. Pant. The documents “revealed incontrovertible evidence of a dastardly conspiracy to create a communal holocaust…. The trunks were crammed with blueprints of great accuracy…prominently marking out the Muslim localities…. Timely raids conducted on the premises of the RSS had brought the massive conspiracy to light,” recalled Dayal in his autobiography, A Life of Our Times, published in 1998. He sought the immediate arrest of Golwalkar on conspiracy charges but the chief minister, to Dayal’s disgust, prevaricated long enough for Golwalkar to go underground. Soon thereafter, Dayal was drafted into the Indian Foreign Service and the matter of the steel trunks was given a quiet burial.
  [http://www.outlookindia.com/full.asp?fodname=20040823&fname=ZbCol+Siddharth&sid=1/]
  —–

  • दिपक
   मला पण वाचावं लागेल. लवकरच उत्तर लिहितो. आणि संघाबद्दल दोन एक्स्ट्रिम विचारसरणीचे लोक आहेत, एक तर फेवर करणरे किंवा विरुध्द.. आता आउटलुक दुसऱ्या विचारसरणीचा आहे.. 🙂
   असो..
   Bengal Prison act:http://www.mha.nic.in/pdfs/Prisons_act1894.pdf

 8. Shirish says:

  मी जलगाँव
  जिल्ह्यातील चालीसगांव
  येथील नागरिक आहे आमचे शहर
  भारताचे एक अविभाज्य अंग
  आहे . परन्तु येथे
  भारताच्या
  संविधानाप्रमाने कारभार
  चालातोच असे नाही येथे
  सुमारे ३५ वर्षां पासून
  एकाच घराची सत्ता आहे सर्व
  राजकीय पक्ष स्थानिक
  पातालिवर त्याच्याच
  ताब्यात असतात स्थानिक पतालिवर एक
  भूमिका व राज्य पतालिवर
  वेगळी भूमिका म्हणजे आमचा
  गाव गुंडा सर्व पक्ष
  प्रमुखान्ना भारी आहे असे
  दिसते ! त्याला गावात एकही
  विरोधक नाही असा
  लोकशाहीतला अनोखा राजा
  फक्त चालिसगावाताच आहे

 9. Aditya says:

  अरे आपल्याला किती कमी माहित आहे संघाबद्दल…
  आणि संघानी काश्मीर हा ‘प्रश्न’ होऊ नये यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल…
  या लेखामुळे माहिती मध्ये थोडी तरी भर नक्कीच पडेल…
  बाकी लेख नेहमी प्रमाणेच मस्त जमलाय…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s