डीसी रॉक्स!!

दिलिप छाबरीया मॉडीफाइड कार

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट झाली , ते केवळ रतन टाटांच्या मुळे.

आता ऑटोमोबाइल म्हंटलं, आणि त्यामधे दिलिप छाबरीया चं नांव नाही.. हे कसं शक्य आहे? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या प्रकारे नॅनोशी जुळायला आवडतं- मग त्याला दिलिप तरी कसा अपवाद असेल??दिलिप छाबरीया म्हंट्लं की ऑटोमोबाइल इंथ्युझियास्ट लोकांना त्याच्या बद्दल काहीच सांगायची गरज नाही. परवाच वाचलं की डीसी आता नॅनॊ रिडिझाइन करणार आहे .

मोबाइल एटीएम

६२३ सीसी चं दोन सिलेंडर इंजिन, ४ स्पिड गेअर बॉक्स, टॉप स्पिड १०५ किमी/तास, चार सिटर कार ,असं डिझाइन असलेली आणि एक लाख किंमत असलेली नॅनो कार डीसी मॉडीफाय करुन तिला एक करोड रुपयांची करणार आहे ही बातमी जेंव्हा बातम्यांमधे दाखवली तेंव्हा एक इंजिनिअर म्हणुन मला खरंच तो आता काय या कारला एक करोडची करण्यासाठी काय करेल? हा प्रश्न पडला होता.

डीसी चा लोगो असलेल्या बऱ्याच कार्स मुंबईला दिसतात. तो लोगो म्हणजे अगदी मर्क प्रमाणेच प्रेस्टीजिअस समजला जातो . डीसी चा टच असलेली कार म्हणजे तिची किम्मत किती लाखांनी वाढेल ते सांगता येत नाही. बरेच लोकं तर अगदी नविन कार घेउन डीसी कडे मॉडीफाय करायला देतात. डिसी टच झाला, की ती कार कुठल्या मेक ची आहे हे पण ओळखता येणार नाही, इतके बदल करतो त्या मधे तो.जेंव्हा त्याने हे काम सुरु केले, तेंव्हा एक जिप्सी मॉडीफाय केली होती. ती जिप्सी आहे हे कोणिच ओळखु शकत नव्हते, आणि तेंव्हा पासुनच डीसी एकदम सगळ्यांच्या माहिती झाला.

पुर्वी  मॉडीफिकेशनचं फॅड अगदी डॊक्यात शिरलं होतं तरुणांच्या . जेंव्हा मी येझ्दी बाइक वापरायचो, तेंव्हा बाइकचं हॅंडल बदलणे, सिट अरेंजमेंट बदलणे,समोरचे मडगार्ड उचलुन लावणे.. (त्या साठी दिल्लीहुन एक दुकानदार ते स्पेशिअली आणुन द्यायचा)असे प्रकार आम्ही करित होतो. समोर विंड शिल्ड लावणं हे अगदी रेअर असायचं, त्यामुळे बाइकचा लुक एकदम बदलुन जायचा. येझ्दी च्या दोन्ही सायलेन्सर्स मधल्या त्या पुंगळ्या काढुन टाकल्या की बाइकचा एक वेगळाच आवाज यायचा. आणि ही बाइक पण एकदम डिपेंडेबल होती. पेट्रोल, केरोसिन मिक्स वापरुन पण चालायची ही बाइक- कधीच रस्त्यावर बंद पडली नाही पाच वर्षात.. नंतर बुलेट आल्यावर पण या बाइकची आठवण येते बरेचदा. बॅचलर लाइफ च्या बऱ्याच आठवणी जुळल्या आहेत तिच्याशी.

विषयांतर झालं– तर डीसी ची स्पेशॅलिटी आहे कुठलिही कार मॉडिफाय करण्यात. सगळे सिनेमा हिरॊ आपल्या व्हॅन्स डीसी कडुन डिझाइन करुन घेतात. त्या व्हॅन मधे टिव्ही फ्रिज पासुन तर बेड, सोफा वगैरे सगळं काही असतं.असंही म्हणतात, की स्कॉर्पिओ चं डिझाइन डीसीचं आहे. नक्की माहिती नाही. मध्यंतरी एक सिनेमा आला होता टारझन नावाच. ती टारझन नावाची कार डीसीनेच डिझाइन केली होती. आधीची एक जुनी ऍंम्बी अशा मॉडर्न स्टेट ऑफ द आर्ट कारमधे कन्व्हर्ट करण्याचे काम केवळ डीसीच करु शकतो.

आता हा एक करोडरुपयांची करणार म्हणजे करणार तरी काय??डीसी ने आधी तर संपुर्ण कार स्ट्रिप डाउन केली आहे. आणि त्यामधे सगळंच बदलण्यात येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पॉलीकार्बोनेट ग्लेझींग, झिऑन आणि एलईडी लाइट क्लस्टर्स, १४०० सीसी मॉन्स्टर इंजीन, आणि या सगळ्या बरोबरच नविन सस्पेंशन. इतकं सगळं केल्यावर ही टू सिटर मॉन्स्टर कार रस्त्यावरुन किती स्पिड ने जाउ शकेल हे गुलदस्त्यातच आहे अजुन तरी.

इंटेरिअर्स पण  जनरेशन नेक्स्ट गिझिमोज असतील .तिथे एक पिसी स्क्रीन असेल, ज्यावर इंटर्नेट , नेव्हिगेशन, गेम्स, आणि कारचे सगळे कंट्रोल्स डिस्प्ले केले जातिल.इतकं सगळं केल्यावर पण माझ्या मते त्या कारची किंमत १ करोड होणार नाही. मग अजुन काय करणार?? एखाद्या शेख प्रमाणे सिल्व्हर, किंवा गोल्ड ची कार बनवणार कां? गॉड नोज. फक्त त्या वापरल्या जाणाऱ्या गॅझेटस ची किम्मत किती असेल ते सांगता येत नाही.

डीसी ने एरोप्लेनचं इंटेरिअर पण डिझाइन केलेलं आहे. त्याची साईट बघा तिथे बरीच माहिती आहे दिलेली..
रिसेंटली डीसी ला ऍस्टॉन मार्टीन डी ८ ही कार ( जी जेम्स बॉंड च्या नविन सिनेमात वापरली जाणार आहे ) ती डिझाइन करण्यासाठी बोलावले गेले आहे.. तसेच ब्रिटीश कार मॅन्युफॅक्चर नोबल साठी पण एक कार डीझाइन करित आहे. ही स्पोर्ट्स कार असेल.  या व्यतिरिक्त असंही वाचण्यात आलंय की एका इटालिअन कार मॅन्युफॅक्चरर ने पण डीसीला करारबध्द केलंय….

— दिलिप छाबरीया रॉक्स!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कार्पोरेट वर्ल्ड and tagged , , , . Bookmark the permalink.

18 Responses to डीसी रॉक्स!!

 1. DC रॉक्स !!! 🙂

  • त्याची क्रिएटीव्हीट मस्त आहे.. बरेच फोटो आहेत त्याने रीडिझाइन केलेल्या कार्स चे..

 2. rohan says:

  आज एकदम D.C.माझा एक विरारचा मित्र ऑटोमोबाईल इंजी. केल्यावर आता D.C. बरोबर स्पोर्ट्स बाईक डिझाइनवर काम करतोय… सांगत असतो एक-एक किस्से… बाकी DC Rocks … No dought … !!! त्याने ambassador रिडिझाइन केलेली पहिलीस का? नसेल तर तूला मेल पाठवला आहे तो बघ…

 3. bhaanasa says:

  DC रॊक्स :)मोबाईल एटीएम सहीच आहे.

  • त्याने मध्यंतरी संजय दत्त आणि सलमानसाठी व्हॅन डीझाइन केली होती. 🙂 तिचे फोटो आले होते नेट वर,. ते पण खुपच सही होते.

 4. अनिकेत वैद्य says:

  जेंव्हा मी येझ्दी बाइक वापरायचो.

  येझदी खरच मस्त गाडी आहे. पुण्यात १ येझदी बाईक असलेल्यांचा ग्रूप आहे. ते लोक कायम एक्मेकांना भेटतात. काही लोकांकडे तर अगदी १९४८, १९६५ च्या बाईक पण आहेत.

  अनिकेत वैद्य.

  • अनिकेत
   येझ्दी मस्त होती. वेळ प्रसंगी अगदी केरोसिन घालुन पण चालवली आहे ती गाडी. फक्त केरोसिन घातलं की धक्का स्टार्ट करावी लागायची. बायको सोबत (लग्न होण्या पुर्वी ) खुप फिरलोय येझ्दी वर.. मागचं रेस्ट काढुन टाकलं होतं. नंतर लग्न पक्कं झाल्यावर तीने गाडी बदलायला लावली..

 5. डी.सी. ची स्पेशालीटी म्हणजे तो जे काही करतो, ते ग्रेटच असतं. सर्वमान्य होतं. तो नॅनो एक का चार करोडची पण करून दाखवेल नि लोक ती विकत घेतील सुद्धा!

  • हा माणुस म्हणजे काय करेल ते सांगता येत नाही. नॅनॊचं इंजिन, गिअरबॉक्स, सस्पेंशन आणि इतर सगळं आउटर बदललं, म्हणजे उरलं काय?? फक्त चॅसीस.. तेवढंच जुनं..
   लोकं घेतील हे नक्की. त्याचं म्हणणं आहे कोणी घेतली नाही तरी पण हरकत नाही. एक पिस बनवणारच आहे म्हणतो तो..
   हाय एंड मर्क पण ५० लाखात मिळते.. आता नॅनो १ करोड म्हणजे….. !!!

 6. नो डाउट हा माणूस भन्नाट आहे.

  • कदाचित नॅनॊला पाण्यावर चालणारी कार पण बनवेल. अजुन तरी बऱ्याच गोष्टी क्लिअर नाही केलेल्या..

 7. सौरभ says:

  डीसी हा माणूस भन्नाट असू शकेल. पण दरवेळेस डीसी रॉक्स बरोबर कधी कधी डीसी सक्स पण म्हणणारे आहेत. काही काही डिझाईन्स इतकी भडक, घाणेरडी असतात त्यामुळे असेल कदाचित.

  भारतातल्या ऑटोमोबाईल सेक्टरला वाहिलेल्या teambhp.com या संकेतस्थळावर खूप जणांना तो बिलकूल आवडत नाही. तो गाड्यांची पार वाट लावून टाकतो.

  • सौरभ
   त्याचा आपला एक स्वतःचा क्लायंट क्लास आहे. आता जेम्स बॉंडच्या सिनेमाची कार डिझाइन करायला त्याला बोलावलंय आणि इटालियन कार कंपनी पण त्याची सर्व्हीस घ्यायचं म्हणते आहे, तेंव्हा त्यात काही तरी सबस्टन्स असावा..

 8. swapna says:

  tumhi mechanical engineer aahat?? me pan.. va kai mast vatla.. aani ho.. DC la kahi tod nahi..

  • मला पण आवडतो तो. माझ्या कडे तरूणपणी ( म्हणजे आता म्हातारा झालो असे नाही) एक येज्दी होती. त्या बाइकला मॉडीफाय केले होते.
   माझी मोठी मुलगी आयटी मधे इंजिनिअरींग करते आहे. थर्ड सेम सुरु आहे. 🙂 बरं वाटलं कॉमेंट वाचून.

 9. Gurunath says:

  आपण तर एकच म्हणतो….. कार सक्स बाईक रॉक्स….

  बाईक वर फ़ार इंडीपेंडंट वाट्ते…..

  तश्या आधी पासुन मला कार्स पण आवडतात… नवी शेवरोले क्रुझ बघा!!

  च्यायला, डीझेल ईंजिन आहे वाटत सुद्धा नाही…

  महींद्रा कमांडर जीप पाहुन आपण डीझल ईंजिंन्स बद्दल प्रेज्युडाईज्ड होतो…

  बट, टर्बो चार्ज्ड डीझेल इंजेक्शन ( टी.डी.आय) , सी.आर.डी.ई टेक्नॉलोजीज पण भन्नाट आहेत…

  डी.सी…. बाईक्स मॉडीफ़ाय करतो का?…. रेडी असेंब्ली कीट आहेत का त्याच्याकडे? कुठे मिळतील?

  डोके भारी लावतो फ़र पण…. ट्रॅक्स गाडी सुद्धा हमर सारखी करून देईल ह्यो पठ्य़ा…..

  • वयोमानाप्रमाणे आवडी बदलतात.. मला पण माझी बुलेट आवडायची खूप. पण हल्ली वापरत नाही. कंटाळा येतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s