इंडीया शाइनिंग

कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो.  भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था  कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना    जोपर्यंत अनपेक्षित पणे  एखादी साईट समोर एखादी अनपेक्षित पणे येत नाही,   तो पर्यंत  येत नाही.

कालच ,सर्फिंग करतांना   एक साईट दिसली. स्वतःचा बिझिनेस प्रमोट करण्यासाठी असलेली ही साईट बघून खूप कौतुक वाटलं. आणि अगदी तळागाळातल्या वर्गाला पण इंटरनेटचं महत्व समजतं हे बघून आश्चर्य वाटलं.  कुठली साईट?? सांगतो पुढे ..

आजच्या दिवसात इंटर्नेट जे अगदी तुमच्या खिशात जाउन बसलंय त्याची मुहुर्त मेढ   भारतामधे राजीव गांधी  यांनी रोवली. टेलिफोन्स चं जाळं सगळ्या भारतात पसरवल . टेलिफोन्स मधुन जितका प्रॉफिट मिळायचा , तो सगळा रिइन्व्हेस्ट करुन भारताच्या अगदी कानाकोपऱ्या पर्यंत टेलिफोन पसरवला. १५०० उंबऱ्याचं गांव जरी असलं तरी तिथे आज टेलिफोनची सोय आहेच. जागोजागी एस टी डी बुथ उभे राहिले. कुठल्याही गावाला फोन करायचा तर केवळ एसटीडी कोड प्रिफिक्स करुन नंबर फिरवला की झालं . ट्रंक कॉल्स इतिहास जमा झाले. अगदी थोड्याच दिवसात सेल फोन आले.. आणि इंटरनेट  पण अगदी कॉमन झालं आणि   तुमच्या खिशात मोबाइल सोबत  जाउन बसले ते पण समजलंच नाही.

तर काय सांगतोय, ह्या टेलिफोनच्या क्रांती मुळे इंटरनेटची  उपलब्धता खूप सोपी झालेली  आहे सध्या.  सर्फिंग करतांना मला ३न निरनिराळ्या साईट्स सापडल्या नेट वर त्याबद्दल अगदी थोडक्यात लिहितोय इथे.

रिक्षावाल्याची वेब साईट..

पहिली म्हणजे एक चेन्नईचा रिक्षावाला.. त्याने स्वतःची वेब साईट तयार केलेली आहे. अगदीच क्रुड असलेली वेब साईट आहे, पण एक रिक्षावाला पण आपल्या बिझिनेस साठी इतका कॉशस अन नेट सॅव्ही बघून गम्मत वाटली. स्वतःचा ब्लॉग बनवून जाहिरात करावी असं त्याला वाटणं यातच सगळं आलं. आणि भारत २१व्या शतकाच्या वेगाशी सिंक्रोनाइझ होतोय  याची खात्री पटली. वेब साईट खास करुन परदेशी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे.

हा रिक्शावाला म्हणतो, मी तुम्हाला दिवसभर टुकटुक मधे बसवुन चेन्नाईला फिरवुन आणिन. जेवायला, क्लबींग, हे तर आहेच,  जर तुम्हाला एका पेक्षा जास्त रिक्षा हव्या असतील तर त्या पण तो अरेंज करुन देउ शकतो. त्याने आपला इ मेल ऍड्रेस, फोन नंबर सगळं काही दिलेलं आहे.  त्याच्याच वेब साईटवर तो रिक्षावर जाहिरात करायची असेल तर कॉंटॅक्ट करा असंही लिहितोय.. बघा!!! आहे की नाही ग्रेट??

मुंबई डबावाल्यांची साईट

दुसरी वेब साईट ही मुंबईचे डबे वाले यांची. यांना आपलं मार्केटींग व्यवस्थित करता येतं वेब साईट पण अगदी व्यवस्थित डेव्हलप केलेली आहे. मला मजा वाट्ली, ते ’ अ डे विथ डबेवाला’ ही कन्सेप्ट चालु केली आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबर दिवस भर रहाता येइल. खास परदेशी टुरिस्ट लोकांसाठी ही योजना दिसते राबवलेली.

डबेवाल्यांच्या सिक्स सिग्मा सिस्टीम्स च्या थोबाडीत मारणारी सिस्टीम  मुळे त्यांना बोलावले जाते लेक्चर्स साठी. त्या वेब साईटवर पण अशा लेक्चर्स साठी कॉंटॅक्ट करा असं अवाहन करण्यात आलंय. त्यामधे मोठ मोठ्या कंपन्यांची नावं बघून आश्चर्य वाटून घेउ नका. माझ्या माहिती प्रमाणे ऑक्सफर्डला पण यांचं लेक्चर झालंय.

मुंबईच्या डबेवाल्यांना ग्लोबल रेकग्निशन आहे. कदाचित म्हणूनच  वेब साईट खूपच चांगली डेव्हलप केलेली आहे.

मेड सर्व्हिस पोर्टल

आणि तिसरी वेब साईट आहे डॉ, मंजु यांची . थोडक्यात त्याला मोलकरणींचं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज पण म्हणता येइल. यांच्यावर एक लेख लोकसत्ता मधे पण बरेच वर्षापूर्वी आला होता आणि त्याची माहिती पण वेब साईट वर दिलेली आहे. मोठ्या शहरात हाउस मेड वगैरे मिळणं कठीण झालंय.खात्रीची मेड मिळण्यासाठी एक साईट पहाण्यात आली. तिची लिंक देतोय इथे.मेड्स चं पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे केलेलं असलं की थोडं जास्त सेफ वाटतं.बाहेर गावाहुन मुंबईला आलेल्यांना तर मेड्स वगैरे विश्वासू मिळणं हा एक प्रॉब्लेमच वाटतो म्हणून त्यांना ही साईट उपयोगी ठरु शकते.

ह्या सगळ्या साईट्स तर ठीकच आहेत, पण मुंबईच्या मुच्छड पानवाल्याची वेब साईट जी आहे तिचा उल्लेख केल्याशिवाय तर हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. पान म्हणजे काय? पानाचे प्रकार किती? त्यात काय घालतात? असे अनेक प्रश्न परदेशी लोकांना पडतात, त्यांची उत्तरं दिलेली आहेत या साईटवर. अतिशय व्यवस्थित असलेली ही वेब साईट म्हणजे भारतातली पहिली पान वाल्याची साईट असल्याचा तोरा मीरवते.

या  सगळ्या वेब साईट्सच्या क्वॉलिटी बाबत मी काही फारसं बोलणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे,तुम्हाला आवडो वा ना आवडो,  इंटरनेट हळू हळू आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग होतंय..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व and tagged , , , , . Bookmark the permalink.

35 Responses to इंडीया शाइनिंग

 1. वाह..एकदम क्रियेटिव आणि हाइ टेक.

 2. वा. तुम्ही कुठल्या कुठल्या साईट्स शोधता हो.. सगळ्याच सही आहेत 🙂 .. मला त्या रिक्षावाल्याची साईट जाम आवडली. मस्त आहे एकदम. एकदम सिम्पल.

  • ती रिक्षावाल्याची साईट खरंच अल्टीमेट आहे. स्वतःला येत नाही, म्हणुन वेब मास्टरकडुन करुन घेतली आहे त्याने ती साईट.. आपण नविन शतकाच्या वेगाशी जुळवुन घेतोय हे नक्की!!

 3. Sagar says:

  Panvalyachi website baddal iakl hot…Tya rikshavalychi website pan chan ahe…Mala khas aavadli ti Dabbevalycnchi…….Mast aahe……

  • पानवाल्याची साईट १९९८ पासुन आहे .. रिक्षावाला साईट एकदम बेस्ट!! दिल को छुने वाली…

 4. Rohan says:

  मस्त ना.. ती रिक्षा आवडली मला… आणि आपले डबेवाले तर काय बेस्ट एकदम… 🙂 आणि हो रे.. पानाबद्दल जाम विचारतात इकडे सुद्धा लोक मला. त्यांना ही लिंक देऊन टाकतो .. 😀

  • रोहन
   डबेवाल्यांची साईट खुपच प्रोफेशनल केलेली आहे. मस्त आहे एकदम.. पण पानवाला तर बरेच वर्षापासुन आहे. फारसं कोणी भेट देत असेल असंही वाटत नाही, पण साईट मेंटेन केलेली आहे हेच पुष्कळ झालं.
   रिक्षावाला.. अप्रतिम..अरे इतक्या तळागाळातल्या लोकांमधे जर इतका अवेअरनेस क्रियेट झालेला आहे, तो बघुन अगदी भरुन आलं मला. त्या रिक्षेवाल्याच्या पायात चक्क निळी पट्ट्यांची स्लिपर आहे बघ..

 5. sahajach says:

  मस्तच आहे…खरं तर तुमचे आभार मानायला हवेत …नवी नवी माहिती घेउन तेया दर लेखात!!!!!

  • तन्वी
   आभार कसले. हौसेला मोल नाही. मलाच खुप हौस आहे नां लिहायची म्हणुन इथे येउन छळतो तुम्हा सगळ्यांना..

 6. पुण्याच्या लक्ष्मी रोडची पण साईट आहे बरं का? आता लक्ष्मी रोड च्या धकाधकीत न सापडता तेथील दुकानातून खरेदीचा मस्त उपाय आहे. पण प्रत्यक्ष दुकानात जाऊन घासाघीस करणे नाही जमणार ह्या साईटवर!

  http://www.laxmiroad.in/

 7. मस्त माहिती आहे, रिक्शावाल्याची साईट खरंच छान आहे.

 8. मुछ्छडच्या साईटबद्दल फार वर्षांपूर्वीच माझ्या भावाने सांगितलं होतं. त्या वेळेस पानवाल्याची साईट म्हणजे नवलच होतं. त्याचं दुकान प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता मी रोखू शकले नव्हते. रिक्षावाल्याच्या साईटचा बहुधा युट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता. डब्बावाले आणि डॉ. मंजू यांच्या साईट्सबद्दल माहित नव्हतं. आता चेक करून पाहिन.

 9. माहीती तंत्रज्ञानाच्या या विश्वात प्रत्येकाला आपलं अस्तित्व दाखवण्याची इच्छा आहे, आपणही त्याचा एक भाग बनून आपल्या मर्यादा वाढवाव्यात हा त्यामागचा हेतू …

  राजीव गांधीनी ही मुहर्तमेढ रोवली पन तीचे व्रुद्धीकरन झाले ते प्रमोदजी महाजन यांच्या काळात, १९९८-०४ च्या काळात ते माहिती व प्रसारन मंत्री, तदनंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री होते, दळणवळण आणि टेली कम्युनिकेशन हि त्यांच्याकडे होते… त्यांनीच टेलोफोन मध्ये प्रायव्हेटायझेश्नला प्रोच्छाहन देवून राजीवजींच्या पोलीसींची अंमलबजावनी केली, त्यांमुळे याचं बरेच श्रेय त्यांनाही जाते.. ह्याचा उल्लेख राहून गेलेला दिसतो आहे..

  बाकी आपन शोधलेल्या साईट म्हंजे नेट किती तळापर्यंत पोहचले आहे ह्याचे द्योतक आहे..

  • सचिन
   प्रमोद महाजनांच्या काळात पण त्यांनी हे सगळं सुरु ठेवलं , त्यांना पण श्रेय जातंच..
   रिक्षावाला- पायात ५० रुपयांच्या स्लिपर घालणारा, साईटच्या डोमेन नेम साठी पैसे खर्च करतो.. हिच खुप मोठी गोष्ट वाटली मला..

 10. मस्त टाइमपास झाला माझा ट्रेन मधे. डब्बावाल्याच्या साईटवर तर मी पाउण तास होतो. मस्त माहिती आहे.
  मुच्छड पानवाला १९९८ पासुन आहे नेट वर..

 11. bhaanasa says:

  महेंद्र, ह्या मुच्छडकडे किती वेळा पान खाल्ले असेल. ही साईटही जुनीच आहे. डबेवाले तर राव एकदम जोरात आहेत. सहीच ना. बाकी रिक्षावाल्याची साईट पाहुन खरेच कौतुक वाटले. मोलकरणींची साईट उपयुक्त आहे. लोकांना फायदा होत असणारच.

 12. सही आहे. इंटरनेटचा भारतातील असा वाढता वापर नक्कीच आशादायक आहे.

 13. क्या बात है, मस्त माहीती दिलात.
  तो रिक्षावाला!!!!!!!!!!, मान गये बॉस!!!!!!!!!!!!!

 14. ravindra says:

  आपल इंडिया आता फार हाय टेक झाल आहे. ह्याच सर्व श्रेय स्व.राजीव गांधींनाच जात. त्यांनीच कम्प्युटर क्रांती घडवून आणली. मी ९२ पासून बघत आहे. सध्या खात खात करणाऱ्या टेलेक्स पासून. ९८ मध्ये मुंबईत फोर्ट मध्ये पहिले सायबर केफे उघडले होते ताशी दर होता रु.९०/-. इंटरनेट मधील खरी क्रांती आली ती फायबर ऑप्टिक केबलचे जाले पसरल्यावर. पण माझ्या मते ह्या क्षेत्रात एव्हढी क्रांती घडण्याची गरज नव्हती. तळागाळातील लोकांना काय आवश्यकता आहे हो ह्या सर्वांची. आज महागैमुळे लोकांना खायला मिळणे कठीण होऊन बसले आहे मात्र एका सेकंदाला एक पैसा या दराने फोन करता येतो. एव्हढी स्वस्ताई नको होती. असो हे माझे मतआहे.

  • रविंद्र
   दुरसंचार किंवा दुर भाषा यंत्रणेत जास्त डेव्हलपमेंट होणं आवश्यक होतंच माझ्या मते. नाहितर माहिती आणि तंत्रज्ञानाचा जो विस्फोट झाला, त्या ’रेस’ मधे भारत मागे पडला असता. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फक्त सुरुवातीला इन्स्टॉलेशनचाच जास्त खर्च असतो, नंतर रनिंग कॉस्ट ही निग्लिजिबल असते. म्हणुनच हे एक पैसा सेकंद दराने फोन करता येतो. जर हे इन्फ्रा स्ट्र. डेव्हलप झालं नसतं तर कदाचित आज वेगळं चित्र दिसलं असतं . बऱ्याच अनडेव्हलप्ड कंट्रिज मधे भारताच नाव घेतलं गेलं असतं.. (डेव्हलपींग नेशन च्या यादीत न घेता)

   • Rohan says:

    मला वाटता राजीव गांधी यांच्या पेक्षा सँम पित्रोडा यांना श्रेय जास्त जायला हवे ह्या क्रांतीचे … तुझा मुद्दा आवडला मला.. पायात ५० रुपयांच्या स्लिपर घालणारा, साईटच्या डोमेन नेम साठी पैसे खर्च करतो.. हिच खुप मोठी गोष्ट आहे.

    • ्ती वेबसाईट पाहिली अन तेच आधी लक्षात आलं.. त्या रिक्षावालयाला पाहिल्यावर…. पायातल्या स्लिपर्स…!!सॅम पित्रोडा यांचच ब्रेन चाइल्ड होतं म्हणे फक्त राजिवने पुर्ण साथ दिली त्याला..

 15. jeevan says:

  how to write marathi in this site. please help me….

  • मी स्वतः http://baraha.com या साईटवरुन सॉफ्ट्वेअर डाउनलोड करुन वापरतो.हे सॉफ्ट वेअर ऑफ लाइन पण वापरता येते.अगदी सोपं आहे डाउन लोड करुन घ्या एकदा बस्स!

 16. Mukul D says:

  http://www.domesticmaid.in
  Empowering domestic class workers for an opportunity to work and establish themselves.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s