शुन्य रुपयांची नोट..

शुन्य रुपयांची नोट

कुठल्याही शासकीय कार्यालयात गेलात की इकडे तिकडे थोडे हात ओले करावे लागतातच काम करुन घ्यायला, आणि आपण पण ही गोष्ट समजूनच चालतो.  दूर कशाला , रेल्वे ने प्रवास करतांना तर जरी बर्थ उपलब्ध  असला तरी, टीसी काही जास्त पैसे घेतल्या शिवाय तुम्हाला देत नाही. नियमाप्रमाणे पैसे घेउन बर्थ दे म्हट्लं, तर सरळ नाही म्हणून चालायला लागतो- आता अशावेळी तुमच्या हातात काहीच नसल्याने सरळ तो म्हणेल तेवढे पैसे देऊन काम पुर्ण करुन घेणे इतकेच आपल्या हातात असते. करप्शन हे आपल्या रक्तातच भिनलं आहे.

आरटीओ मधे असलेल्या करप्शन बद्दल न बोललेलेच बरे. अधूनमधून एखाद्या अधिकाऱ्याला पकडून सस्पेंड केलं जातं, पण त्याच वेळेस इतर लोकंही करप्ट आहेतच, आणि जो कोणी पकडल्या गेला आहे, तो या सिस्टीमचा एक लहानसा प्यादा आहे, हे माहिती असूनही इतरांना कुरणावर चरायला मोकळं सोडून दिलं जातं. आपण सुध्दा  मानसिक दृष्ट्या इतके निर्ढावलेले आहोत की ह्या बातमीची किम्मत आपल्या मते अगदीच नगण्य असते.

एक एन जी ओ आहे फिफ्थ पिलर नावाची. तिने एक आयडीया काढली आहे. एक नोट आहे शुन्य रुपयांची. त्या एनजीओ चं म्हणणं असं आहे, की तुम्हाला कोणी लाच वगैरे मागितली की ही शुन्य रुपयांची नोट तुम्ही द्या त्या माणसाला. म्हणजे त्याला हे लक्षात येइल की तुम्ही लाच देण्याच्या विरोधात आहात , आणि तो नियमा प्रमाणे तुमचे काम करेल. अर्थात हे असं होणं कमीत कमी भारतामधे तरी शक्य नाही हे त्या एन जी ओ ला समजलेले दिसत नाही. तद्दन फालतू पब्लिसीटी स्टंट आहे त्या एन जी ओ चा असे मला वाटते.

याच वेब साईटवर ही पण माहिती दिलेली आहे, की तुम्हाला जर या एन जी ओ चा मेंबर व्हायचं असेल तर १०० रुपये द्यावे लागतील.आणि  जर तुम्ही भारता बाहेर रहात असाल, तर ५० डॉलर्स. आता या पैशाचं ते काय करतात?? त्याची माहिती कुठेच दिलेली नाही. सगळ्या जगातल्या देशांच्या शुन्य रुपयांच्या नोटा छापल्या आहेत त्यांनी.

करप्शन संपवणं जर इतकं सोपं असतं तर किती छान झालं असतं?  शून्य रुपयांच्या नोटा वाटा कोणी पैसे मागितले तर..  अशा बालिश कल्पनांवर हसावं की रडावं हेच समजत नाही… ट्वीटर वर जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांनी ही शून्य रुपयांच्या नोटेची लिंक ट्विट केलेली आहे- मला वाटतं, त्या एनजीओला जी प्रसिद्धी हवी होती ती मिळालेली आहे .बेस्ट वे टु ऍडव्हर्टाइझ असं म्हणता येइल या सगळ्या खेळाला.

आता काही वर्षापूर्वी तो मुन्नाभाई मधे कपडे काढून देण्याचा सीन दाखवला होता. असे सीन फक्त सिनेमातच शोभून दिसतात. डे टू डे आयुष्यात नाही. माझ्या मते हा फक्त एक पब्लिसिटी फार्स आहे. एखाद्या अधिकाऱ्याला   जर अशी  शून्य रुपयांची नोट- लाच म्हणून  दिली , तर तो  अधिकारी आयुष्य भर तुमचे काम करणार नाही हे नक्की. उलट तुम्हालाच अजुन पन्नास प्रकारचे कागदपत्र वगैरे मागेल.. भारतीय कायदे असे आहेत की त्या मधे  असे  नियम आहेत की काम न करण्यासाठी हजारो बहाणे देता येतात.

शेवटी जाहिरात म्हणजे काय?  “विंकिंग ऍट अ गर्ल इन डार्क”  🙂
तुम्हाला डॊळा मारल्याचं समाधान, तिला समजलं नाही, म्हणून तीला पण काही फरक पडत नाही.. विन विन सिच्युएशन दोघांसाठी पण!! बस्स….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

28 Responses to शुन्य रुपयांची नोट..

 1. काका, अगदी खरंय.. जर भ्रष्टाचार संपवणं एवढं सोपं असतं तर आतापर्यंत भारत जगातील एक महासत्ता होऊन जगावर राज्य करीत असलं असतं… कोण कुठले ते एन.जी.ओ. वाले, अशी पांचट कल्पना काढली.. शेवटी यालाच मार्केटिंग म्हणतात म्हणा.. मार्केटमध्ये पैशे जर कमवायचे असेल तर अश्याच खुळचट कल्पना कधी-कधी आपण विश्वासही ठेवू शकणार नाही, अशा गोष्टी घडवतात. एक उदाहरणच घ्या ना, मागील दशकापर्यंत कोणी विचार केला असेल का निव्वळ पाण्याची (अन त्यात काय असते/नसते हे मी तरी अजुन चेक केलेलं नाहिये….! 😉 ) एक छोटीशी बॉटलदेखील १० ते १५ रूपयांपर्यंत विकली जाऊ शकेल… पण आज बघा, माठातले पाणी पिण्यापेक्षा लोकं खिसा खाली करून ती बाटली विकत घेऊन (बिस्लरी) पाणी पितात… आपण कितीही विचार केला ना काका, तरी या व्यावसायिक लोकांचा मूळ हेतू अन जाहीरात करण्याची पद्धत पुर्णपणे आपल्या समजण्यापलिकडची असते.. बाय द वे, ट्विटरवर अश्या निरर्थक जाहीरातींना री-ट्विट करणं, जरा विचार करून करावं हे त्या-त्या ट्विपल्संना आवाहन…

  विशल्या!

  • शंभरच्या वर लोकांनी रिट्विट केली आहे ही बातमी.. एन जी ओ म्हंटलं की .. असु दे.. त्यावर एक वेगळं पोस्टंच लिहावं लागेल.. इतके राडे आहेत त्यांचे..

 2. भारत सगळ्यांना पुरून उरला आहे. भारतात चालली नाही म्हणून काय झालं, गांधीगिरीची ही आयडियाची कलप्ना बरी आहे. मला माहित नव्हती इतके दिवस. 🙂

  • अहो भारता मधे जर अशी शुन्य किमतीची नोट दिली तर आयुष्यभर काम होणार नाही. पण त्या साईटवर सक्सेस स्टॊरीज दिलेलया आहेत त्या वाचुन तर त्या एन जी ओ च्या खोटेपणामुळे अजुन हसु आलं..

 3. शून्य रुपयांची नोट देणं हा बालिशपणाच वाटतो. उगाच काय? नोट दाखवून हसं करून घ्यायचं. लाच घेणारे लाच घेण्यासाठी नवनवीन मार्ग शोधतच असतात. लाचलुचपत प्रतिबंध खात्यामधेसुद्धा लाच घेणारे अधिकारी आहेत. ते लाचलुचपत रोखण्यासाठी लाच घेतात.

  • अगदीच बालिशपणा आहे.. आणि म्हणतात, की तुम्ही ही नोट दिली की मग ज्याला तुम्ही लाच देता, त्याला लाज वाटेल.. कुठल्या जगात वावरतात हे लोकं??

 4. thanthanpal says:

  0 रुपयाची नोट हे एक प्रकारचे आजच्या भ्रष्ट्राचारचे विडंबन आहे यामुळे फार कांही होणार नाही पण प्रयत्न महत्वाचे लोक व्यवस्थे मुळे किती मजबूर झाले हे लक्षात येते कोठेतरी ठिणगी पडत आहे आग कधीना कधी लागेलच

  • हे फक्त भारता बद्दल असतं, तर समजु शकलो असतो, पण ही एन जी ओ वर्ल्ड वाईड सगळ्याच देशात काम करते.
   मला तर हा स्टंट वाटतो..

 5. thanthanpal says:

  पण प्रयत्न महत्वाचे

  • प्रयत्न हवा.. तर ऍंटी करप्शनला सांगावं…. त्यांचे पत्ते सहज उपलब्ध करुन द्यावेत..

 6. हो खरच भ्रष्टाचार जर असा संपला असता तर कोणाला काय हवा होता…त्यात हा अजुन एक प्रयत्‍न (?) मला तरी हा डाइजेस्ट झाला नाही पण ज़ीरो करन्सी हा सगळा न चालणारा स्टंट आहे. आपल्या भारतात जर कोणी असा प्रयत्‍न केला त्याच काम होईल अशी अपेक्षा तर माणसाने सोडुनच द्यावी 🙂

 7. Vidyadhar says:

  marathiblogs.net varun firat firat tumchya blogparyant alo. Chhan aahe tumcha blog. Ani hya notebaddal mhanal tar malasuddha ha taddan baalishpana vatato. Aso, chalaychach.

 8. खरंय, भारतात तरी हे शक्य नाही..विदेशात कल्पना नाही की हे सुद्धा सक्सेस होवु शकते….फार्स आहे…

 9. मला मागे forward मेल मधून माहिती कळली होती याच्याबद्दल. मला वाटतं TOI मध्ये पण एक लेख आला होता. आणि मलाही अगदी तुमच्यासारखंच हसू आलं होतं. तद्दन फिल्मी आणि बिनडोक..

 10. Sagar says:

  Chyaaaila….Kahi pan…..

 11. आपल्याकडचे भ्रष्टाचारी लोकं म्हणजे पोचलेले आहेत. त्यांना शून्य रुपयाची नोट दिली तर त्याची सुरळी करून देणार्‍याच्यात सरकवतील.

 12. akhiljoshi says:

  आपल्या भ्रष्टाचारी लोक या शून्य रुपयाच्या नोटा स्वतः छापून कुणालातारीदुसार्ल्याच फसवतील…
  भ्रष्टाचार हा आपण झिरो लेवल ला आणण्यासाठी आपल्यापासून प्रयत्न केले पाहिजेत…
  blog bagha vel milala tar….!

  • अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. एक म्हण आहे , जो पर्यंत तुम्हाला पैसे खाण्याचा चान्स मिळत नाही, तो पर्यं्तच तुम्ही इमानदार असता.. किरण बेदींसारखे अपवाद आहेच म्हणा..

 13. bhaanasa says:

  भारतातच कशाला इतर कोठेही हे शक्य नाही. भ्रष्टाचार हा सगळीकडेच आहे रे. फक्त थोडा फरक. आपल्याकडे अगदी मुलभूत गरजांमध्येही-किंबहुना तिथेच जास्त आहे. मात्र या नोटेने ज्याला लाच द्यायची मुळीच इच्छा नाही त्यांना किमान प्रोटेस्ट केल्याचा वांझोटा आनंद मिळेल. आणि कदाचित एखादा हा प्रोटेस्ट पाहून चुपचाप काम करूनही देईल. अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? बाकी हे छापणारे लोकच दुस~यांना फसवतील हेच जास्त खरे वाटतेय.

  • एखाद्या वेळेस लाच न दिली तरीही काम होऊ शकेल.. पण अशी नोट दिली तर तो कधीच काम करणार नाही. आणि ही नोट छापणारेच मिळणाऱ्या पैशांचं काय करतात?? हा एक प्रश्न तर अगदी आधी पासुनच छळत होता.

 14. Madhukar says:

  मला हि संकल्पना अगदी मजेदार वाटली.
  तसं भ्रष्टाचार संपविण्याचा एवढा अट्टाहास का म्हणुन करता ? आपल्यालाच खुप घाई असते पैसे देऊन कामं करवुन घ्यायची. घेणा-या एवढेच देणारी दोषी आहेत.
  आज मला कुठल्याही सरकारी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामं करता येत नाही आणी माझी कामं लवकर व्हाव्हि म्हणुन मी पैसे देतो. मी पण दोषी आहे.
  पण “माझं काम लवकर व्हाव”, या स्वभावावर औषध नसावं. म्हणून हा भ्रष्टाचार.

  • मधुकर
   आपणही तितकेच दोषी आहोत. आपल्या कडे असलेली खुप जास्त लोकसंख्या पण एक कारण आहे. इतके जास्त लोकं आणि रिसोअर्सेस तितकेच कमी.. म्हणुनही जास्त करप्शन असते.एकाने पैसे देत नाही म्हंटलं की दुसरे पन्नास लोकं तयार असतात पैसे द्यायला..

 15. तो says:

  शून्य रुपयाची नोट देण्यापेक्ष्या नकली नोट द्यावी, म्हणजे त्याला पण ‘जाच’ मिळाल्याचे समाधान, तुम्हाला पैसे न गेल्याचे, आणि काम झाल्याचे 🙂
  joke apart, पण कराच काहीकारून हे थांबायला हवे.
  – तो

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s