सती.. एक शापित प्रथा…

सती

आज सकाळी उठलो आणि मुख्य बातम्या बघाव्यात म्हणून   टिव्ही सुरु केला. सर्फिंग करतांना एका चॅनल वर आपोआपच रेंगाळलो. मंगल पांडे हा सिनेमा सुरु होता त्या चॅनलवर. एक सीन होता, एक प्रेत यात्रा जाते आहे, एका मुलगी लाल साडी मधे नखशिखान्त मेकप करुन एका तिरडीवर बसलेल्या अवस्थेत  नेली जात आहे. तिरडी ला चार लोकांनी खांदा दिलेला आहे. ती स्त्री ट्रान्स मधे असल्यासारखी नुसती बसलेली आहे. मागे बरेच लोकं हातामधे काठ्या घेउन सती माता की जय .. हा जय घोष करत जात आहेत.

इकडे नदीकिनारी आल्यावर तिथे एक चिता रचून ठेवलेली आहे. त्यावर त्या स्त्रीच्या नवऱ्याचं प्रेताशेजारी त्या स्त्रीला बसवतात. तिच्या मांडीवर त्या मेलेल्या नवऱ्याचं डोकं ठेवलेलं असतं.  जय घोष सुरु असतो.. सती माता की जय .. चा आणि त्या चितेला आग लावली जाते. जोर जोरात जय जय कार करणे सुरु असते.. त्या स्त्रीला जेंव्हा चटके बसतात ती तेंव्हा एकदम भानावर येते, आणि त्या चिते वरुन उतरायचा प्रयत्न करते. आजूबाजूचे लोकं तिचा जय घोष करित तिला हातातल्या काठ्यांनी मारुन पुन्हा चिते मधे ढकलतात.इकडे त्यांचा सती माता की जय चा घोष सुरु असतो… आणि हे सगळं होत असतांना बघुन मी चॅनल चेंज करतो.. पण मनावर  त्या सीनचा जो इम्पॅक्ट व्हायचा तो माझ्यावर झालाच. एकदम उदास वाटू लागलं.

थोड्या वेळाने सौ. म्हणाली की भाजी घेउन या.. सगळी भाजी संपली आहे – मी बाहेर निघालो आणि लिफ्ट पर्यंत पोहोचलो तर मागून आवाज ऐकू आला  येतांना राणी सती मार्गावरुन   फॉल पिको ला दिलेली साडी दिलेली साडी घेउन या.. राणी सती नाव ऐकल्यावर मस्तकामधे एकदम तिडीक ऊठली ,कदाचित सकाळी पाहिलेल्या सीनचा परिणाम असावा.  इथे पण मंदीर आहे राणी सतीचं, कधी गेलो नाही त्या मंदिरात, आणि आजपर्यंत कधी लक्षात पण आलं नाही त्या मंदिराबद्दल- पण आजचा सकाळी पाहिलेला सीन.. तो मला स्वस्थ बसू देत नव्हता.

मुंबईसारख्या शहरामधे पण सती ची पुजा करणाऱ्या बायका आहेत आजही, हे प्रकर्षानं जाणवलं, जेंव्हा तिथे साडी घ्यायला गेलो तेंव्हा मंदिरांमधून अगदी अप टू डेट कपडे घातलेल्या सुशिक्षित स्त्रीया दर्शन घेउन बाहेर येतांना दिसल्या, आणि लक्षात आलं- आजही अशा प्रथेचा उदो उदो करणाऱ्या स्त्रिया आहेत मुंबई सारख्या शहरात. जर मुंबई सारख्या शहरात ही परिस्थिती आहे, तर लहान गावांत कशी असेल?

सती प्रथे वर बंदी आणुनही आज १८१ वर्ष झाले आहेत. तरीही अर्जुनही कधी तरी एखाद्या कोपऱ्यात लहानशी बातमी असतेच पेपर मधे – एखाद्या स्त्रीने सती जाण्याचा प्रयत्न (??) केला म्हणून! आता तिने स्वतः सती जायचा प्रयत्न केला की इतर लोकांनी तिला सती जाण्यासाठी भाग पाडले? हे कधीच समजत नाही. ही बातमी नेहेमी   एखाद्या लहान गावातलीच असते.  एखाद्या स्त्री ने सती गेल्यावर तिचं मंदीर बांधण्याची प्रथा  म्हणजे त्या अघोरी  प्रथेचं उदात्तीकरण आहे.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खुप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जुन जातात दर्शनाला.

एका गोष्टीचं वाईट वाटतं , की आजही ह्या शिकल्या सवरल्या स्त्रिया   सती मंदिरात जाउन प्रार्थना करतात. एक तुळशी वृंदावन, त्यातुन बाहेर निघणारे दोन जोडलेले हात. त्यामधे अगदी कोपरापर्यंत बांगड्या, म्हणजे सती मंदीर जवळच आहे याची खात्री!!!!

राजा राममोहन रॉय , हे ब्रह्मो समाजाचे स्थापन कर्ते इ.स. १९२८ .पश्चिमी सभ्यते मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी यांनी आपल्या देशात रुजण्यासाठी खुप मोठे कार्य केले. ह्या माणसाने सोशल रिफॉर्म्स साठी केलेले कार्य   भारतीय स्त्रियांनी अजिबात विसरू नये- पण दुर्दैवाने आज त्यांचे नाव पण कुणालाच माहिती नाही- काळाच्या ओघात विस्मृती आड गेले आहे. केवळ राममोहन रॉय यांच्याच प्रयत्नाने १८२९ साली सती प्रथा ही लिगली चुक आहे म्हणून लॉर्ड विल्यम बेंटींग यांनी  सती प्रथेवर बंदी आणली.

स्पेशली उच्च वर्गातील स्त्रियांचे सती जाण्याचे प्रमाण खूप जास्त होते. ही प्रथा बंद करुन फायदा झाला तो उच्चवर्गीयांचाच . कारण विधवा विवाह हा सर्व सम्मत नव्हता. विधुर दुसरे लग्न करु शकत असे, पण विधवा मात्र कधीच पुनर्विवाह करु शकत नव्हती- सामाजिक रूढी आणि बंधनांमुळे स्त्री ही पुरुषाची मालमत्ता हा कन्सेप्ट होता, आणि कदाचित म्हणूनच पुरुषाच्या मृत्यु नंतर स्त्री ने पुन्हा आयुष्य जगू नये म्हणून तिला सतीचा दर्जा देऊन खून करणे ह्याला उदात्तीकरण प्राप्त झाले असावे.

स्त्रीच्या मनावर पण जर लहानपणापासून असं बिंबवलं की पुरुष नसेल तर तुझं आयुष्य निरर्थक, की मग ती सती जाण्यास तयार  होइलच! या शतकात सती गेलेल्या स्त्रियांची माहिती इथे सापडेल..

आजच्याही युगात स्त्री भृणाची हत्या जी केली जाते ती कदाचित याच मानसिकतेचा बळी आहे. पूर्वीच्या काळी स्त्री जन्म म्हणजे एक शापच समजला जायचा. सती प्रथे मुळे, हुंडा पद्धती मुळे किंवा बालविवाह आणि अकाली येणाऱ्या वैधव्यामुळे  असं झालं असावं कदाचित.पण त्या काळच्या मानसिकतेचा इंपॅक्ट अजूनही आपल्या समाजावर आहे आणि आजही वंशाला दिवा हवा असा अट़्टाहास असणारे बरेच लोकं आहेत.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खूप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जून जातात दर्शनाला.  आता तरी स्त्रियांनी स्वतःच जागं होऊन अशा रानटी प्रथा आणि त्यामुळे लादलेल्या देवत्वाला आणि मंदिरांना न जाणे हीच राजा राममोहन रॉय यांना श्रध्दांजली ठरेल.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

33 Responses to सती.. एक शापित प्रथा…

 1. खरं सांगायचं तर पुरूषप्रधान संस्कृतीमधे ब-याच रितींना तोडून मोडून पुरूषांना सोयिस्कर असे परिपाठ बनवले गेले आहेत. सती हे त्याचंच उदाहरण आहे. विधवा आणि त्यातून सुंदर स्त्री म्हणजे नुसतं ओझंच नाही तर जीवाला घोर. स्त्रीने नवरा गमावल्यानंतर तिचं नैतिक अध:पतन होऊ नये म्हणून कुणाच्या डोक्यातून ही अघोरी कल्पना निघाली कुणास ठाऊक? प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांच्या आईसाहेब, राजमाता जिजाबाईदेखील शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती जाण्यास निघाल्या होत्या.

  स्त्रीला अपत्य असल्यास तीचं सती जाणं आवश्यक नसायचं तेव्हा केशवपन हा पर्याय सुचवला गेला होता की काय, हे माहित नाही पण मला कायम हे प्रशन छळतात की स्त्रीला जर सती जायचंच असेल, तर केशवपन कशासाठी आणि जर ती विधवा झाल्यावर केशवपन करायचंच असेल, तर सतीप्रथा का सुरू केली गेली असावी?

  येनकेन प्रकारे स्त्रीचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ नये यासाठी हे सर्व प्रयत्न होते असं वाटतं. आपण देशात सुधारणा झाली असं म्हणतोय पण आजही सती जातातच. मुलींचे बळी जातातच.

 2. कांचन
  प्रतिक्रियेकरता आभार.
  अजुनही बऱ्याच गोष्टी आहेत, भृण हत्या, हुंडा बळी इत्यादी.. स्त्रीचा विकास न होऊ देणे हा एकच कन्सेप्ट नसावा. कदाचित स्त्री कडे एक मालमत्ता- जिचा उपभोग “मालकाच्या” ( म्हणजे नवऱ्याच्या ) पश्चात कोणी घेउ नये म्हणुन मग सती!!!
  आणि हे सती पण फक्त उच्च वर्णियांमधेच होतं. सा्वित्री बाई फुले यांनी पण जे कार्य केलं त्याचा फायदा पण सगळ्यात जास्त उच्चवर्णीय स्त्रियांनाच झाला होता- अर्थात ही गोश्ट तशी सहजा सहजी कोणी मान्य करणार नाही. असो.. विषयांतर होतंय!!

 3. Seema Tillu says:

  हा शुद्ध अडाणीपणा आहे. कुठलीही स्त्री स्व्त:हून सती जायला तयार होणार नाही. खरे म्हणजे त्या स्त्रीला बाकीच्या बायकानी मागे आणले पाहिजे. आज २१व्या शतकात सुद्धा ही चाल सुरू आहे हेच आश्चर्य वाटते. त्या स्त्रीला सती जायचे नसतानाही तिला पुन्हा पुन्हा आगॊत ढकलण्याचे प्रयत्न केले जातात हे अतिशय क्रूरपणाचे आहे. यासाठी बायकानीच सतीविरूद्ध उठाव केला पाहिजे.प्र्त्येकाला मरेपर्य़न्त जगण्याचा हक्क आहे. सती जायला लावणे हा खूनच आहे आणि त्या साठी जबाबदार लोकाना शिक्षा व्हायला हवी.

  • रुपकंवर केस तर खरी वाटण्यापुढची आहे. . शिकली सवरली मुलगी पण सती जाऊ शकते??
   आत्ताच एक लिंक टाकली आहे ब्लॉग वर ती चेक करा.. खुप माहिती आहे अशा केसेस बद्दल..

 4. Sonali says:

  Khupach bhayanak pratha ahe hi. Aapalyala garam tavyala hat lagala tari kiti tras hoto. Mag jivantpani jalun ghenyaryanchya halanchi kalpanach karata yenar nahi.

  • सोनाली
   अजुनही राजस्थानात असे प्रकार अधुन मधुन घडतात. म्हणुनच मला ते बालिका बधु सिरियल पाहिलं की चिडचीड होते. माझा ब्लॉग सुरु झाला, याचं कारण पण तेच सिरियल. घरचे सगळे सिरियल बघायचे अन मी ब्लॉग लिहायचो. 🙂

 5. सती अजुनही जातात? बापरे, विदारक सत्य आहे…
  जिवंत जाळणे…किती हा क्रुरपणा…

  • आनंद
   आत्ताच वर लिंक टाकली आहे ती वाचा. अहो पेपरला तर बरेचदा अशा बातम्या कुठल्यातरी कोपऱ्यात असतात. रुपकंवर केस आठवते??

 6. खूपच भयानक अशी ही प्रथा अजूनही चालू आहे हे जाणून खूप वाईट वाटला. तुमच्या पोस्ट मधूनच कळला ह्या मंदिराबद्दल.. 😦
  सतिच मंदिर का बनवला ह्यानी? एवढ्या वाईट प्रथेला काय म्हणून पुजतात आजही लोक? खूपच निंदनीय प्रकार आहे हा.

 7. madhuri says:

  kadhi ya pratha sampteel dev jane. mue asnaryane sati jane tar agdi illogical ahe. jeva alt options asteel tya baisathi tevach hie pratha band hoeel. purvi paristhiti wegli hoti.

  ho ani Balika Vadhu mazi favorite serial ahe. dadisa character ekdam khankhaneet…ani mala watayche kay he dakhawtat pun te sagle agdi 100 per cent ajunhi chalu ahe…tevdhich ek serial va saregama me baghte. thode natki watte but its a TV show

  • माधुरी
   मला त्या सिरियलचा कन्सेप्टच पटलेला नाही. समाजात असं होतं, म्हणुन आहे त्या गोष्टीं दाखवणं मला पटत नाही. बालिका बधु ला पडद्यावर जरी पाहिलं तरी माझं मन अपसेट होतं..
   त्या बालिका बधु लागलं की मी बेडरुम मधे जाउन आपलं पोस्ट लिहुन टाकतो. तो अर्धा तास आणि नंतरचा अर्धा तास -माझा स्वतःचा असतो. कदाचित जर हे सिरियल सुरु झालं नसतं, तर मी ब्लॉग वर लिहिणं पण सुरु केलं नसतं…. 🙂

  • uttara sumant says:

   mala nahi watat hi pratha ajun astitwat ahe.maharashtrat tar nahich nahi.

 8. आपल्या “सो कॉल्ड” महान (!!!) हिंदू धर्माचं हे सर्वात काळंकुट्ट रूप. (आणि उरलेली कसर भरून काढायला जातीभेद, विषमता, उच्चनीचता हे आहेतच).. स्त्रीला उपभोग्य मानणाऱ्या, पुरुषाच्या पायाची दासी (??) मानणाऱ्या याच हिंदू धर्मात एके काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या महान विदुषी होऊन गेल्या यावर विश्वास बसत नाही.. !!

 9. bhaanasa says:

  स्त्रियांच्या मनावर पध्दतशीर बिंबवलेच जात असावे त्या काळात. राजपूत स्त्रिया ’ जोहार’ करतच. पण ते शत्रूच्या-मोगलांच्या हाती सापडून विटंबना होऊ नये म्हणून.’सती’ जाणे मात्र सो कॊल्ड उच्चवर्णीय समाजाचे अती काळेकुट्ट रूपच. जिवंतपणी सती यातनाही यांनाच जास्त भोगाव्या लागत होत्या. रोजचेच मरण. पुन्हा यातून गर्भधारणा झालीच तर आहेतच आडविहीरी-तेजाब-जाळणे…. मुंबईत सतीचे मंदीर आहे हे वाचून खरेच वाईट वाटले. आणि बायकाच बायकांच्या सगळ्यात मोठ्या शत्रू हे विधान आजही बदलत नाही याचे दु:ख होते. लहान मुलींचे-अगदी तान्या बाळीलाही जिथे बक्षले जात नाही तिथे सारेच फोल आहे……

  • सहमत आहे.. कधी तरी बदलायला हवं हे.. नाहितर आपण आपला वांझोटा संताप करुन घेण्या पलिकडे काहिच करु शकत नाही.

 10. आमच्या उज्जैन ला पण एक “सती गेट” म्हणून ज़ागा आहे, पूर्वी काळी येथे पण एक सतीमाता (?) मन्दिर होतं… पण आता नाहीसे झाले… असो…

  जैसे-जैसे शिक्षा का प्रसार हो रहा है राजस्थान में भी यह प्रथा मृतप्राय होती जा रही है… लेकिन बाल विवाह अभी जोरों पर है उधर…

 11. savadhan says:

  भयानक प्रथा होती म्हणुन तर राजाराम मोहन राय यांनी ती बंद करण्यासाठी कष्ट घेतले.
  आज रोजी धर्माच्या नावाखाली नरबळी,लहान मुलांचे बळी दिले जात आहेत. हे सारे निर्घृण च आहे.हा सगळा अंध श्रध्देचा भाग आहे असे वाटते.
  पुर्वी १७ व्या शतकापर्यंत प्रजेच्या सुखासाठी स्वतः राजा स्वतःच्या मुलाला बळी देत असे किंवा समारंभपूर्वक आपल्याच हाताने शिरच्छेद करून स्वतः च स्वताला बळी देत असे.
  मानवी संस्कृतीच्या इतिहासात नरबळी या विधिला अत्यंत महत्वपूर्ण असे स्थान आहे.याला नरमेध अस म्ह्टलं जात असे.असो.

  • ही बळीची गोष्ट मला तरी माहिती नव्हती. नविनच माहिती मिळाली.
   राजा राममोहन रॉय यांचं काम निग्लेक्ट केल इतिहासकारांनी याचं वाईट वाटतं.. नरबळी बद्दल मी पण वाचलंय. पण लवकरच बंद झाला तो प्रकार..

 12. हेमंत आठल्ये says:

  एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. पतीच्या मृत्युच्या नंतर सती जाव की नाही हा निर्णय त्या मुलीवर असायचा. तुम्हाला अहिल्याबाई होळकर माहिती असतील. त्यादेखील त्यांच्या पतीच्या मृत्युनंतर सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. पण तेथील लोकांनी त्याचं मन वळवल. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती असेलच. राग मानू नका. प्रथा येतात आणि जातातही. कदाचित आपण अनुकरण असल्या प्रथा पुढे जाऊन वाईट प्रथा म्हटल्या जातील. प्रत्येक काळात असच होत असत.

  • हेमंत
   निर्णय लादला जायचा.. असं मला तरी वाटतं. कुठलिही स्त्री स्वतः सती जाण्यासाठी तयार होणार नाही. आणि झाली तरी .. लाखात एक.. राझी अहिल्या बाई सारखी.. येरा गबाळ्याचं काम नव्हे ते.. सती जबरदस्तीने दिल्या जायची आणि जर मरतांना त्यांनी चिते बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना काठ्यांनी मारुन पुन्हा चिते मधे ढकलायचे ही क्रुर प्रथा होती…
   आता कुठल्याही काळात ह्या प्रथेला चांगली म्हणता येणे शक्यच नाही. आणि जर चांगली होती तर इतर वर्गातल्या स्त्रियांनी कां अंगिकारली नाही ही?? हा पण एक प्रश्न आहेच!!

 13. savadhan says:

  महेंद्र महोदय याविषयी एक छो्ट लेख् लिहायचा विचार करतोय मी.अहो आपले पुर्वज समाजासाठी किती झुरत असत हे समजून घेणे अत्य़ंत ऊद बोधक असेच आहे. समाजासाठी जे करायचे ते सर्वस्वावर तिलांजली देऊनच.आता समाजाची सेवा करण्याच्या नावाखाली त्याला लुटणा-यांची च संख्या वाढत चालली आहे.असो.

 14. savadhan says:

  महेंद्र महोदय, सतीची चाल आणि नरमेध ! याविषयी माझी आजची अनुदिनी कृपया वाचा.
  प्रोत्साहन दिलेत म्हणून लिहिले .दह्न्यवाद !!

 15. sudhakar n. nisargan says:

  sati jane mhanje atmahatyc ti
  ani sati janyasathi bhag padnare khuni te

 16. he prathe sampteel dev jane khupach bhayanak pratha ahe he .jivantapani jalun ghenyaryanchya halanchi kalpanach karata yenar nahi.

 17. atharna says:

  Sati mhanaje akadam havada prakar ahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s