नौकरी मधे काय मिळवलं ?

प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून  नोकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटापाण्याचा म्हट्ल म्हणजे पैशासाठीच नोकरी करतो प्रत्येक जण. पैशा व्यतिरिक्त काही मिळू शकतं का नोकरीतुन??   मी गेली २७ वर्ष नोकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा अजुन बराच वेळ आहे रिटायरमेंटला. पण  तरीही हा प्रश्न सतावत  असतो. गेल्या सत्तावीस वर्षातील  नोकरी ने मला काय दिले?? पैसा?समृद्धी? नांव लौकिक?? ओळख??? काय दिलं मला या इतक्या वर्षांच्या  नोकरीने??? ह्या सगळ्या गोष्टी तर  नोकरी मधे अनुभव आणि अधिकार तर आपोआपच येतात.

वय वाढलं की राजू चा राजाभाऊ होणं किंवा बाळ चा बाळासाहेब होणं , माधव चा माधवराव होणं, हे जितकं साहजिक असतं , तितकंच हे नोकरी मधली प्रमोशन्स, इन्क्रिमेंट्स, आणि त्या प्रमाणात मान, हा वाढणं सहाजीक असतं असं मला वाटतं. म्हणूनच नोकरीने मला काय दिलं ह्या प्रश्नापेक्षा मी स्वतः नोकरी मधे काय मिळवलं?? हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो .

ह्या प्रश्नाचं उत्तर  शोधायचा प्रयत्न केला तर  अगणित प्रश्नांची मालिका मात्र डोळ्यासमोर उभी राहिली. मला खरंच काही सुचत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर! कदाचित समज कमी पडत असेल. आता नोकरी मधे पैशा शिवाय काय मिळतं?? जॉब सॅटीस्फॅक्शन?  छेः.. हे तर अगदी सामान्य उत्तर झालं..  काय बरं मिळवलं असावं मी???

सुरुवातीची तीन वर्ष प्रॉडक्शन डिपार्टमेंटला शॉप फ्लोअर वर काम केलं होतं.  नुकताच कॉलेजमधून बाहेर निघालो होतो, जगाची ओळख नव्हती. तेंव्हा शॉप फ्लोअरवर वडिलांच्या वयाच्या लोकांकडून कामं करुन घेतांना खुप विचित्र वाटायचं. बरं ते सगळे बेरकी लोकं अगदी पोहोचलेले होते – एखादं काम सांगितलं की ते का होऊ शकत नाही हे सांगण्याकडे जास्त कल असायचा.  आमच्या सारख्या नविन लोकांना अगदी कोळुन प्यायचे, पण तेवढ्यात  सिनिअर इंजिनिअर आला आणि त्याने पण तेच काम सांगितलं तर अगदी न कुरकुरता तेच काम पुर्ण करायचे.!! तेंव्हाच  पहिली गोष्ट शिकलो, ती ही की इथे नोकरी मधे वयापेक्षा पोस्ट महत्वाची. फक्त एखाद्याचे पांढरे केस असले म्हणून त्याला जास्त   रिस्पेक्ट  दिला तर तो डोक्यावर पण बसू शकतो.

कधीच कोणाला मी कामाच्या निमित्याने खूप फिरणं झालं. सुरुवातीच्या काळात तर पुर्वांचला पासून तर दक्षिण भारता पर्यंत सगळ्या भागात फिरावं लागायचं. तेंव्हा सगळा प्रवास हा रेल्वेनेच करावा लागायचा. फक्त मॅनेजर्स लोकांना विमान प्रवास करणे  हे कंपनीच्या नियमात बसत होते. सगळ्यात प्रवास कंटाळवाणा व्हायचा तो मुंबई ते कलकत्ता. प्रवासात शेजाऱ्यांशी गप्पा मारणे हे मला तरी कधीच जमले नाही. स्वभाव संशयी, आणि नुकतीच वडिलांच्या चुलत भावाला काही तरी गुंगीचं औषध खाउ घातल्याची घटना, आणि त्याचा त्यात झालेला मृत्यु मुळे असेल, पण आजही मी प्रवासात कधीच कुणाशी ओळख वाढवायचा प्रयत्न करित नाही.

माझं आजही असं मत आहे , की प्रवासातल्या ओळखीचा कधीच काही फायदा नसतो, लोकं विनाकारण एकमेकांना नांव पत्ता, फोन नंबर देतात-आयुष्यात  कधीही न भेटण्यासाठी!! प्रवास व्हायचा कंटाळवाणा, मग पुस्तकं वाचणं हाच एक उपाय असायचा. प्रवासात हेरॉल्ड रॉबिन्स,इर्विंग वॅलेसची सगळी पुस्तकं वाचायचो तेंव्हा मी. समोरच्या सोफ्यावर दोन उषा आडव्या लाउन एखादं बेस्ट सेलर वाचणे हा तर माझा अगदी लहानपणापासूनचा छंद होता.. इथे त्याला खत पाणी मिळालं!!

जेफरी आर्चर पण खुप वाचला. त्याचं ’नॉट अ पेनी मोअर – नॉट अ पेनी ले” अगदी लक्षात रहाण्या सारखं पुस्तक आहे.’.केन ऍंड एब” आणि त्याचा सिक्वेल ’प्रोडिगल डॉटर”पण कलकत्ता प्रवासातच वाचलं होतं. वाचनाची आवड होतीच, पण ती पुन्हा जास्त वाढली.. प्रवासामुळे!!प्रवासात वाचलेली काही पुस्तकं तर अजूनही आठवतात. स्फिंक्स, फाउंटन हेड ही दोन्ही पुस्तकं  अशीच आठवणीत राहिलेली. तेंव्हा जी वाचनाची आवड लागली , ती आजपर्यंत टिकुन आहे.

म्हणतात ना, “वाचाल तर वाचाल”. मला वाचायला काही पण चालतं- पण शक्य तो नवीन मधला जॉन ग्रिश्म,  आणि जुन्यातला  रॉबर्ट लुडलुम  (बोर्न सिरिजनी तर वेड लावलं होतं राव! काय लिहायचा हा माणुस, जेंव्हा वारला तेंव्हा खूप वाईट वाटलं. त्या पब्लिकेशन हाऊसने त्याच्या नावाने नंतर पण काही पुस्तकं प्रसिद्ध केलीत.. असो.. )  मला वाटतं की माझी वाचनाची आवड जोपासायला माझी फिरतीची नोकरीच कारणीभूत ठरली.

वाचनाची आवड वाढली.. आणि सोबतच , जितकं जास्त वाचत गेलो, तितकं जास्त एकलकोंडा होत गेलो.पुण्याला  असतांना गुरुवारी सुटी असायची, पण त्या दिवशी पण लायब्ररीतुन आणलेलं पुस्तक वाचत दिवस भर प्डून रहाणं मला बरेचदा आवडायचं. नंतर थोड्या दिवसांनी एका नवीन मुलाशी ओळख झाली . तो अगदी हार्ड कोअर ट्रेकर.. मग त्याच्यामुळे ट्रेक्स ला जाउन,  ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्यावर मात्र बरेच मित्र झाले, आणि मग गुरुवारी रुमवर बसून वाचत   रहाणे सुटले…

एकदा साईटला पोहोचलो की मग बरेचदा कस्टमरशी ओळख वगैरे झाल्यावर काही कस्टमर्स तर पर्सनल फ्रेंड्स बनले. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण मला गेली २३ वर्ष  आमचे एक जुने कस्टमर आहेत,  सिलिगुडी जवळच्या एका टी गार्डनचे मॅनेजर ,  श्री अग्रवाल म्हणुन- त्यांच्या साईटला मी २३ वर्षापुर्वी गेलो होतो  आणि तेंव्हा दोन तीन दिवस एकत्र राहिलो – त्या नंतर त्यांच्याशी एकदा पण भेट झाली नाही ,पण आजही ते   न चुकता नव वर्षाला ग्रिटींग पाठवतात आणि फोन करतात.. तसाच एक गोहातीचा मनोज.. असे अनेक लोकं खूपच अंतरंगातले मित्र झाले. इतकी वर्ष झाली पण अजूनही मी बऱ्याच लोकांशी  संपर्कात आहे.  भरपूर मित्र!!! मला वाटतं हेच मिळवलं मी पैशा व्यतिरिक्त माझ्या नौकरीमधे.

प्रवास खूप झाला. आणि प्रवासाने शहाणपण येतं असं म्हणतात…  मला ते आलं नाही असं वाटतंय हल्ली.. कारण सौ. आणि मुली- बाबा तुम्हाला काहीच समजत नाही असं म्हणत असतात  . 🙂

नोकरी च्या निमित्याने जेंव्हा वॉरंटी पोर्टफोलिओ पण सर्व्हिसचा भाग म्हणुन सांभाळावा लागला, तेंव्हा ’ नाही ’ कसं म्हणायचं हे शिकलॊ. ज्या मशिन्स आम्ही विकतो त्यांची किंमत ५ लाख ते ५० लाख कितीही असू शकते. तेंव्हा एखादा पार्ट फेल झाला की वॉरंटी ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाच. बरेच कस्टमर्स मित्र पण झालेले असतात. तेंव्हा त्यांना ’फेल्युअर वॉरंटबल  नाही’ हे म्हणण्याचा स्पष्टवक्ता   पणा आवश्यक असतो. आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की, माझ्या अशा स्पष्टवक्तेपणामुळे कोणा्शीच  मैत्रीत फरक पडला नाही. नोकरी आणि मैत्री वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स मधे ठेवायला शिकलो ..

मध्यंतरी ची काही वर्ष मार्केटींग मधे काम केलं. तेंव्हाचा अनुभव पुर्णपणे वेगळा होता.लोकं भेटायला बोलवायचे अन तासन तास बसवुन ठेवायचे- अगदी अपॉइंटमेंट घेउन गेल्यावर सुध्दा.मी पण अगदी शांतपणे एखादं पुस्तकं काढून वाचत बसायचो. ह्या अशा वेटींग मुळे मी नेहेमी स्वतःला सेल्स इंजिनिअर नाही तर इंजिनिअर इन रिसेप्शन/ कॉरिडॉर असे म्हणायचो.या सगळ्या प्रकारामुळे सोशिकपणा मात्र नक्कीच अंगी वाढला  . मान – अपमानाच्या कल्पना बदलल्या . कोणी बोलावून भेटलं नाही तरी पण डिस्टर्ब होत  नाही मी ! एखाद्या पार्टी मधे एखाद्या मित्राने, किंवा कलीगने इग्नोअर केलं किंवा एखाद्या वेळेस बॉस ने समोर बसवून ठेऊन स्वतःचं काम करणं सुरु ठेवलं, तरी राग न येऊ  देता शांत रहाणं शिकलो मी… थोडक्यात काय तर  एखाद्या सुने प्रमाणे सोशिकपणा वाढलाय.

मूळ स्वभाव किती बदलू शकतो नोकरी मुळॆ?? माझा स्वभाव ऍरोगंट आहे हे तुम्ही आजपर्यंतच्या माझ्या पोस्ट वरुन ओळखलंच असेल- एखाद्याशी भांडण झालं  आणि  जर झी चुक नसेल तर कोणाही पुढे नमतं न घेण्याचा स्वभाव आहे माझा.मित्र म्हणतात, मी खूप ऑफेन्सिव्ह आहे. ( खरं आहे का ते मला माहिती नाही) .  पण.. आता उद्धट पणे प्रत्युत्तर देणं,रागीट आणि  एकलकोंडा असा  हा  माझा मुळ स्वभाव खुप सोशल झालाय – ह्याची जाणिव होते जेंव्हा विचार करतो की मी काय मिळवलं या नौकरी मधे  हा विचार केला तर!!!अर्थात अधूनमधून पुन्हा  पूर्वीचा मुळ स्वभाव डोकं वर काढतो, पण त्याला काही उपाय नाही.. खरं ना??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

41 Responses to नौकरी मधे काय मिळवलं ?

 1. तुमचे पोस्ट वाचताना माझे उमेदवारीचे दिवस आठवले. काही दिवस मी cold calling चा अनुभव घेतला होता. Reception मध्ये तास न तास बसणं, अधिकाऱ्यांनी भेटी न देणं सारं अनुभवलं. त्यामुळे मात्र एक गोष्ट शिकलो. मला जेव्हा भेटायला कोणी येणार असेल तर त्यांना ताटकळत ठेवायचे नाही कधी!

  • सुरुवातीचे दिवस मोठे मस्त असतात. ्लग्नानंतरचा हनिमुन तसे हे ट्रेनिंगचे दिवस… मजा असायची.. 🙂 कोणाला ताटकळत ठेवण्याची सवय खरंच खुप वाईट. तसेच सबॉर्डीनेटला समोर बसवुन आपण आपली कामं करित रहाणं हे तर त्याहुनही वाईट.. 🙂 माझा अनुभव आहे हा..

 2. फारच सुंदर अनुभवांचं गाठोडे उघडुन ठेवलयं…
  सोशीकपणा मलापण शिकायचाय!

 3. स्पष्टवक्तेपणाला कुणी उद्धटपणा म्हणत असेल, तर ती तसं स्मजणा-या व्यक्तीची चूक आहे. असं म्हणतात की बेभरवशाच्या मित्रांपेक्षा भरवशाचा शत्रु परवडला. पुस्तकांशी मैत्री जमली हे चांगलंच झालं. आपल्या आयुष्यात आलेले बरे-वाईट अनुभव हेच आपले खरे सोबती असतात. वीस वर्षांत मीही ब-याच नाही पण नोक-या बदलल्या आहेत. त्या दिवसांत मिळालेले अनुभव बरंच शहाणपण शिकवून गेले. त्यावेळी मलाही असंच वाटायचं की आपण अतिसंवेदनशील आहोत की काय? पण पहिल्यांदा आलेल्या अनुभवातून पार होण्याच्या प्रक्रियेत हे सगळं ओघाओघाने येतंच. आता किना-यावर बसून त्या आठवणींची उजळणी करताना लक्षात येतं की जितकं गमावलं, त्यापेक्षाही खूप काही मिळवलं.

  • कांचन
   अगदी खरं खरं आणी मनापासुन लिहिलंय. माझा कुठलाही दुर्गुणं लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. एकच जाणवतं, की माझा रागीट अन हट्टी स्वभाव त्यात थोडा फरक पडलाय. माझं प्रिन्सिपल ऑफ लाइफ म्हणजे तुमच्या शत्रुला माफ करा, पण त्याचं नांव लक्षात ठेवा….. बस्स!!
   आणि बदला.. ही भावना खुप ठासुन भरलेली आहे माझ्यात.. 🙂 असो.. स्वभावाला औषध नाही म्हणातात.. पण जर कोणी प्रेमाने मागितली तर कासेची लंगोटी पण सोडून देइन असा स्वभाव आहे..

 4. नमस्कार साहेब,
  मी नेहमी तुमचे लेख वाचतो.
  फार सुंदर लिहलात.
  फक्त त्या स्वभाव बदलला, या वाक्याशी मी सहमत नाही.
  माणसाचा मुळ स्वभाव केंव्हाच बदलत नाही. पण अंगातील इतर गुणांचा (राग,प्रेम,वात्सल्य, करुणा, संयम, इ. इ.) वापर करण्याची frequency वाढविल्यास स्वभाव बदलल्या सारखं वाटतं. आणि या गोष्टीची frequency वाढविणे कालसापेक्ष आहे. कालाय तस्मेय नम: म्हणावं.

  बाकी नौकरी कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन फार स्तुत्य आहे. नाहीतर आम्ही नुसते रडत असतो नौकरीच्या नावाने.

  धन्यवाद.

  • मधुकर
   सगळ्यात आधी तुम्ही हे साहेब वगैरे म्हणणं थांबवा हो.. अगदी हापिसात बसल्या सारखं वाट्तं. तुम्ही नुसतं महेंद्र म्हंटलं तर जास्त आवडेल..
   स्वभाव बदलला म्हणण्यापेक्षा भावनांवर कंट्रोल करता यायला लागलं.. असं म्हणायला हवं होतं. माझा स्वभाव खरंच थोडा आक्रमक होता.. अगदी लहान पणा पासुनच. घरी नेहेमी भांडणं यायची. असो.. वयोपरत्वे बरंच बदललंय.. आता सगळं शांत शांत झालंय.

 5. gouri says:

  गेले काही दिवस मीही हाच विचार करते आहे … नोकरीमधून नेमकं काय मिळवलं? व्यावहारिक शहाणपण, प्रोफेशनलिझम, थोडाफार पैसा, आणि बरेच गंमतीशीर अनुभव 🙂 नेकरी केली नसती तर मी (आज आहे त्याहूनही अधिक) स्वप्नांच्या जगात राहणारी झाले असते!

  • गौरी
   इतकं सोपं उत्तर नाही या प्रश्नाचं.. पुन्हा विचार करा.. खरंच आधी तर काहीच समजत नाही.. काय मिळवलं अन काय गमावलं ते.. 🙂

   • gouri says:

    इथे लिहिलंय ते पहिल्या मिनिटाला मनात येणारं उत्तर.

    आज करियरमध्ये मी एका निर्णायक टप्प्यावर आहे … खूप गोष्टी आता ठरवायलाच हव्यात अश्या. गेले १० दिवस याचाच शोध चालू आहे … त्यामुळे मी सविस्तर प्रतिक्रिया लिहायची म्हटली, तर मूळ पोस्टपेक्षा मोठी होईल 🙂 … पण अजून हे सगळं मलाच नीट समजतंय … त्यामुळे इतक्यात शब्दात मांडता येणं शक्य नाही.

    • लवकरच एका पोस्टची वाट बघतोय. खरं तर वर्षाचा इ मेल आला होता, की तुमचा अनुभव लिहा, म्हणुन हे पोस्ट लिहिलं.. खरंच फारच कठिण होतं लिहिणं..आधी तर काहीच समजलं नाही काय मिळवलं ते??

     असं वाटायचं की आपण फक्त आपलं तारुण्य गमावलं बस्स!! पण नंतर हळु हळू एक एक पदर उलगडत गेला.. आणि एकदम साक्षात्कार झाला काय मिळवलंय याचा.. 🙂
     शुभेच्छा.. काय निर्णय घ्याल त्या साठी.. 🙂
     करियरच्या बाबतिल मी तसा फारच अल्प संतुष्टी आहे. इतकी वर्ष झाली तरीःहि अजुनही नौकरी बदललेली नाही. ऑफर्स तर बऱ्याच होत्या/आहेत पण नाही बदलली अजुनही.
     परदेशी पण चान्स होते .. टाळले. आपल्या प्रायोरिटीज आपणच ठरवायच्या असतात.. पुन्हा एकदा शुभेच्छा… आणी येउ दे एक मोठं पोस्ट यावर!!!

 6. santosh kundgir says:

  sir aapala lekh vachal sir thank sir

 7. madhuri says:

  एवढे मित्र मिळाले. फिरायला मिळाले, अजून काय पाहिजे?

  • माधुरी
   कदाचित खोटं वाटेल. खजुराहोला गेल्यावर पण तिथली मंदिरं न पहाता परत येतो मी. आग्ऱ्याला जरी गेलो तरी ताजमहाल पाहिलंच याची काही खात्री नसते. साईट सिईंग वगैरे बायको मुलांसोबतच बरं वाटतं. एकटं असलं की काम संपवुन सरळ परत रुमवर येउन जेउन झोपा.. असंच बरं वाट्तं…
   मित्रं म्हणाल.. तर ते खरंच आहे . बरेच मित्र मिळाले.. अगदी आवर्जुन संबंध ठेवणारे.. 🙂

 8. Sagar says:

  Kaka
  Khar sangu mala as vatat barych post nantar ha lekh khupch chan zalay…Khup mhanatun lihliy tumhi…Aapan Dairy lihito tashi…Khup aavadla lekh…An kharach malahi savay aahe Satat aapan kai milaval ya aayshushyat yacha vichar karaychii,,,,

  Khar sangato…Ha lekh khupch chan zalay itar post peksha….

 9. एकदम मस्त लेख. छान वाटला मागोवा.. बाकी प्रवासात ओळखी बिळखी न करता वाचन करत बसणे आणि जॉन ग्रिशम ची पुस्तकं या आवडी निवडी जुळतात आपल्या 🙂

 10. sayali says:

  Hi,
  Nice post!!
  Tumhi 27 warsha nantar hi itke positive points shodhu shaktay..ani mi..4-5 warshat ch paar kantalley..Salary shivay kahi ch +ve disat nahi 😦

  • सायली
   मी पण जे लिहिलं, ते लिहायला बराच विचार करावा लागला. इतक्या सहजासह्जी +ve गोष्टी दिसत नाहीत.. थोडा विचार करा. काही तरी नक्कीच असेल +ve.

 11. bhaanasa says:

  नोकरी….महेंद्र, अगदी आतून आलेले भाव मांडलेस.आवडले. १७ वर्षे मायदेशात आणि इथे पाच वर्षे नोकरी केली.बरेच अनुभव गाठीशी बांधलेत. चांगले जास्त अर्थात वाईटही आहेतच. पण तुलना करूच नये.जे जे येईल ते ते तसे स्विकारून त्यातून काय चांगले घेता येईल ते पाहण्याचा मनापासून प्रयत्न केला. प्रत्येकवेळी नाही जमले.त्रास झाला. संतापही आला.शिकायला मिळाले, अनेक मित्र-मैत्रिणी जोडल्या. आजही टिकून आहेत.अगदी खंतच करायची झाली तर शोमू बाळ असताना पाळणाघरात सोडून जावे लागे हीच.लोकलच्या एका वेगळ्याच लाईफची भागीदारीण झाले. वाचनाची आवड होतीच तीही लोकलमध्ये मिळणा~या वेळाने चांगलीच वाढली. सगळी वर्षे स्टेटला कॆरम टूर्नामेंटस करीता महाराष्ट्राकडून रिप्रेझेंट केले.कल्चरल प्रोग्रॆम्स केले. बरेच काही दिले की नोकरीने.:)

  • भाग्यश्री
   खरंच पॉझिटीव्ह साईडने विचार केला तर खरंच खुप मिळवलं असं वाटतं.. तु कॅरम पण खेळायचीस?? ग्रेट!!!
   नाहीतर आयुष्य वाया घालवलं असं वाटतं..
   माझ्या प्रवासाने मला ब्लॉगींग मधे पुर्ण इन्व्हॉल्व्ह करुन घेतलं. ही रिसेंट डेव्हलपमेंट!!!

 12. मी दोन वेळा वाचली ही post, सागर ने म्हणल्याप्रमाणे खरच खुप मस्त झाल्ये. तुम्ही म्हणता तसे खुप वाचन करत गेलो तर थोडं एकलकोंडे बनायला होते, माझे होते तसे. सहा सात वर्षाच्या नोकरीत किती प्रकारची माणसं, अनुभव, अपमान सहन करणं शिकले, तुमची तर २७ वर्षे.

  तुम्ही स्वतःला विचारलेले प्रश्न मी मला विचारुन बघितले, सब confusion ही confusion है

 13. खूपच छान लिहिलंय! टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात. नोकरीतही असेच घाव सोसून थोरलेपण येतं. मला नोकरीत तुमच्या एवढा अनुभव नाही पण तुमच्या अनुभवांनी मन भरून आलं. कुठेतरी आपणही त्यातून गेलोय असा जाणवलं.

  • नौकरी मधे तर जवळपास सगळ्यांनाच असे अनुभव येतात. फक्त पोर्टफोलिओ मुळे थोडाफार फरक पडतो. शेवटी मानवी स्वभाव सारखाच नां..

 14. Girish says:

  MBK, sahaj asa vichar majya manat ala ani me naukri sodun dhanda suru kela. now i think in opposite direction: Employee kadun kay milvayche!!! Hehehehehe…thats how the world goes around..

  • तु आता फेन्सच्या विरुध्द बाजुला गेला आहेस.. तेंव्हा तुझे विचार नक्कीच वेगळे असतिल ? एम्प्लॉई कडुन काय मिळावायचं?? उत्तर सोपं आहे.. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स.. म्हणजे काम!!!

 15. Rohan says:

  अंमळ उशीर झाला इकडे प्रतिक्रया द्यायला.. ज़रा बिझी होतो २-३ दिवस… मुंबईला येतोय ना रे रविवारी…

  दादा.. नोकरीमुळे काय-काय मिळाले यात एक गोष्ट सुटली तुझ्याहातून. ती पण एकदम महत्वाची रे. भारतभर फिरताना विविध भागात इतकी खादाडी करता आली ते…??? होय ना!!!

  • आयला.. विसरलोच की मी… खरच रे ..खाण्या- ’पीण्याची’ भरपुर चंगळ झाली. वेगवेगळ्या भागातले पदार्थ खाउन पहाता आले.

 16. Pravin says:

  नोकरी करण्याच्या जागी आपण तरुण आणि पोक्त वयातील बराचसा वेळ घालवतो, अगदी घरच्यांबरोबर घालवत नाही इतका. त्यामुळे नोकरीतल्या अनुभवांचा आयुष्यावर आणि स्वभावावर परिणाम होणे साहाजिकच आहे. बर्‍याच लोकांना झालेला परिणाम समजत देखील नाही पण तुम्हाला तो समजला आणि मुख्य म्हणजे तो तुम्ही चांगला शब्दबद्ध देखील केलात याबद्दल तुमचे अभिनंदन :). पाहू अजून दहा एक वर्षांनी मी देखील अशाच सिंहावलोकानाचा प्रयत्न करेन 🙂

  • प्रविण
   दहा वर्ष कशाला, आताच सिंहावलोकन केलं तरी काही तरी लक्षात येइल.. काय मिळवलं- आणी काय गमावलं ते!

 17. shraddha says:

  post khup chaan aahe … ekdam barobar aahe ..mi ata paryant 4 nokarya 4 desha madhe kelya ahet … ani hya 5-6 varshat khup kahi anubhavale aahe … ani ajunahi pudhe anubhavayche aahe … abhi to shuruvaat hai … so let’s gear up …
  my grand dad is 89 years old and he is still working ..shud be having his second retirement …so he is my IDOL ..

  • आजोबांचं वाचुन छान वाटलं..ग्रेट!! माझे वडिल पण ८४ चे आहेत अजुनही सोशल वर्क करतात. त्यांच्या कडे पाहिलं की आपल्या सुटलेल्या पोटाची जाणीव जास्त होते. 🙂 काम करुन स्वतःला फिट ठेवण्यासाठी ाआयुश्यभर त्यांनी नेहेमी सायकल वापरली. शासकिय कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते, पण स्कुटर ( तेंव्हाची पध्दत होती ती ) पण घेतली नव्हती विकत.
   स्वतःला फिजिकली फिट ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचे. तब्येत चांगली असली, की सगळं व्यवस्थित असतं.

 18. SANTOSH VASANT KHANVILKAR says:

  It was good to read a variety of articles and poetry in marathi. Keep it up.

 19. SANTOSH VASANT KHANVILKAR says:

  It was good to read a variety of articles in marathi. Keep it up.best of luck

 20. SANTOSH VASANT KHANVILKAR says:

  tum che artical vachun mala khup kahi shiknya sarekhe milale. ke nokari mule aaplya aushate navin anubhav miltate.It was good to read a variety of articles and poetry in marathi. Keep it up.

 21. sanu says:

  Aplyasati nokri ki nokri sati apan hech kalte nahi, karen apan aplya pramane vichar karto pan satye hech aste ki aplya bajuch vartule he practical aste

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s