उल्लेखनीय…

थोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर ... बरं वाटतं.

सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणे अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ५-६ किमी अंतरावर असेल तर सायकल ने सहज जाता येऊ शकते. असो..

मला वाट्त की हेच कारण असावं की आजकालची मुलं थोडी जास्त हेल्दी दिसतात- ओव्हर वेट म्हंटलं तर वाईट वाटेल म्हणून हेल्दी शब्द वापरलाय. थोड्या प्रमाणात याला पालक पण जबाबदार आहेत. आपल्या मुलांनी सायकल चालवली तर ते त्यांना कमीपणाचं वाटते, तसेच कॉलेजमधली इतर मुलं जर बाइक आणत असतील तर मग आपण सायकल कशी चालवायची? जर आपण सायकल नेली तर आपण ऑड मॅन आउट होऊ अशी भिती पण असते मुलांना.

सायकल साठी स्पेशल लेन

सायकल्स …अगदी कुल सायकल्स  चांगल्या ७-८ हजाराच्या अव्हेलेबल आहेत भारतामधे. अनिकेतच्या ब्लॉग वर बघा बरीच माहिती मिळेल. सायकलींग चे फायदे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. असंच वाचतांना एक लेख वाचण्यात आला , त्यात त्याने काही युरोपियन देशात आणि अमेरिकेतील काही राज्यात सायकल स्वारांसाठी वेगळॆ लेन सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती दिलेली होती. सायकल चालकांना मुख्य भिती असते ती कारची आणि जड वाहनांची .सेपरेट लेन मुळे  रस्त्यावरून अपघाताची भिती न बाळगता सायकल चालवता येऊ शकते. सायकल चालवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.

जेंव्हा एखाद्या सिग्नलला उभं रहाण्याची वेळ येते तेंव्हा थोडं त्रासदायकच होतं. वाकडं होऊन एका पायावर जोर देऊन उभं रहावं लागतं. याच कारणासाठी डेन्मार्क मधे खास सायकल स्वारांना थॊडी विश्रांती मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजुला स्टॅंड्स उभे केले आहेत. त्यावर पाय ठेऊन सायकल स्वार कम्फर्टेबली उभा राहू शकतो. त्याच सोबत धरुन उभं रहायला एक बार पण दिलेला आहे- एक लहानशी पाटी पण लक्ष वेधून घेते.. तुम्ही सायकल चालवल्या बद्दल तुमचे आभार.. खूप छान वाटलं वाचल्यावर म्हणून इथे शेअर करायला पोस्ट करतोय… जेंव्हा आपण पर्यावरणाची काळजी करतो  तेंव्हा केवळ विज, पाणी आणि प्लास्टीकचाच विचार न करता इतरही गोष्टींचा विचार करायला हवा 🙂 त्यातलीच एक म्हणजे पेट्रोल बचत…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

36 Responses to उल्लेखनीय…

 1. ही स्टॅन्डचई सुविधा छानच वाटतेय. आपल्याकडेही असं काहीतरी करायला हवं. नेमकं अशाच गोष्टींचं आपल्याकडे अनुकरण होत नाही. युरोप अमेरिकेत सायकलस्वार कसले स्टायलिश दिसतात. व्यायाम, वाहतुकीच्या खर्चात कपात, कमी प्रदुषण इतके गुण असणा-या सायकलस्वारीला कमी दर्जाचं मानण्याचं काहीच कारण नाही. नटरंगच्या अतुल कुलकर्णीनेसुद्धा वाढवलेलं वजन कमी करून स्लिम होण्यासाठी सायकल चालवली होती म्हणे. निदान या गोष्टीचं तरी अनुकरण व्हावं.

  • आपल्याकडे असं करणं कठीण नाही.फक्त मुंबईला शक्य होणार नाही. इथे तर लोकांना चालायला पण जागा नसते. सगळे फुटपाथ भाजीवाल्यांना आंदण दिलेले आहेत..सायकलिंग एक मस्त अनुभव आहे.

 2. gouri says:

  जर्मनीमध्ये खूप प्रोत्साहन आहे सायकल चालवण्याला. सायकलसाठी वेगळ्या लेन आहेत, खास रूट आहेत – कधी कधी सायकलने अंतर गाडीच्या निम्म्याएवढं कमी होतं! लोकल ट्रेन आणि लांबच्या गाड्यांमधून सायकली नेण्याची व्यवस्था असते. बहुसंख्य स्टेशनवर सायकली भाड्याने मिळतात. आमच्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता … तो बहुतेक शुक्रवारी ट्रेनमधून सायकल घेऊन ऑफिसला यायचा, आणि जाताना १२० किमी – typo नाही – एकशे वीस किलोमीटर सायकलवर जायचा दोन अडीच तासात!

  • खुप छान सोय आहे ही.. आपल्या कडे सायकल चालवणं डाउन मार्केट समजलं जातं..जितके लोकं सायकलैंग करतात त्यांची पोटं सपाट असतात.सुंदर व्यायाम आहे..
   आणि १२० किमी.. म्हणजे ग्रेटच.. फक्त चांगली सायकल हवी..

 3. Sagar says:

  Mi 12vi paryant chalavali cycle..tyanantar nahi…. 🙂
  Chan suvidha aahet yar ya deshamadhe……
  Mi kuthe tari vachal hot ki eka deshat ek divas fakat cyacle chalavat …Even PM suddha tyadivshi cycle var office madhe aale hote…….Tya deshach nav nahi aathvat…. 😦

 4. हो, मी पण आता सायक घेणार आहे, बायको सारखी म्हणते वजन कमी करा म्हणुन.

  त्यामुळे आजकाल मला जातो तिथे सायकलीच दिसु लागले.
  आतातर तुमच्या ब्लागवरही सायकल!!!!!!!
  हे देवा, माझं काही खरं नाही, सायकल घ्याविच लागेल बहुतेक!!!!!!!!!!!!!!!

  • मधुकर
   घरोघरी मातीच्याच चुली.. अहो दुर्लक्ष करायचं.. मी बरेच दिवस फिरायला जायचो आता मध्यंतरी खुप टुर झाल्यामुळॆ बंद पडलंय..पुन्हा सुरु करायचंय!!

 5. मला सुद्धा सायकल आवडते, पण आपल्याकडचे रस्ते त्याला अनुकुल नाहीत.
  सिग्नल जवळचे स्टॅंड्स, कल्पना छान आहे…

  • जवळपास फिरायला आपण कार काढतो.. ते बंद करुन सायकलींग करावं. मी घेतोय विकत एक सायकल..

 6. Rohan says:

  मी १०वी पर्यंत सायकल चालवली. नंतर मात्र बंद झाली. ठाण्यात पासपोर्ट ऑफिस जवळ सायकल लेन सुरू झाली होती मात्र काही दिवसात तिच्यावर फेरीवाल्यान्नी कब्जा केला. जो पर्यंत आपण सायकल जास्त प्रमाणात वापरत नाही तोपर्यंत त्यासाठी वेगळे रस्ते नाही होऊ शकत… मुंबई मध्ये तर हे ज़रा जास्तच कठीन दिसतय..!!

  • मुंबईची लोकसंख्या हाच प्रॉब्लेम आहे.. जर लोकसंख्या कमी झाली तरच हे शक्य आहे.पण लहान गावात हे सहज शक्य आहे. तिथे असे प्रकार ट्राय करायला हवेत..

 7. तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ब्लॉग लिहीला आहे. कृपया भेट द्या आणि नक्की वाचा. You will enjoy it. – http://vikrantdeshmukh.blogspot.com

 8. Vidyadhar says:

  Hi paddhat purna Europe madhye aahe…Me italy madhye aahe..ithe suddha aahe, ani hech me Paris, Amsterdam, Austria yethe suddha pahila aahe….
  Aso, pan me ya veles Bharatat aalo hoto, tevha asa prakaar me Punyaat suddha pahila…arthat mala kalla naahi neet, pan cyclechich vegali lane vatli mala…khara aahe ka he!

 9. खरचं उल्लेखनीय आहे. पुण्यात साइकल साठी काही ठिकाणी राखीव मार्ग पाहिले पण त्याचा खरेखुरे साइकलस्वार किती वापर करतात हा प्रश्नच आहे. बाकी भारतात इतर कुठे साइकल चालवायला प्रोत्साहन दिल्याचे वाचनात नाही.

  जाता जाता: आत्ता पेट्रोल पुन्हा ३-४ रुपयांनी वाढते आहे तेंव्हा बुडाखाली साइकल येणे पर्यावरणाबरोबरच खिशाचे देखील रक्षण करील. 🙂

 10. इथे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलीफोर्निया आणि बऱ्याच इतर राज्यातही आहे अशी वेगळी लेन. अर्थात साईड स्टँड वगैरे नाही. ते सगळं जर्मनी, हॉलंड आणि एकूण युरोपातच खूप आहे. मूळ मुद्दा म्हणजे आपल्या देशात म्हणजे जिथे याची सगळ्यात जास्त गरज आहे तिथे असं काही नाहीच आहे..:-(

  • आपल्या कडे आधी इन्र्फास्ट्रक्चर तयार करावं लागेल , नंतरच शक्य होइल ते. इथे पायी चालणाऱ्यांना पण रस्ते नाहीत, फुटपाथ भाजीविक्रेत्यांनी घेउन टाकलाय- उरलेल्या रस्त्यावर ( मध्यभागी )कार्स, स्कूटर्स, मग सायकल्साठी जागाच कुठे उरते??

 11. bhaanasa says:

  इथे बरेच जण सायकल चालवताना दिसतात पण व्यायाम म्हणून. एकतर सहा महिने थंडीचे-त्यातले चार हमखास स्नो, त्यामुळे शक्य नसले तरी समरमध्ये खूपच जोर असतो. जुन्या गावी समरमध्ये काही ऒफिसला सायकलवर जात असत. आमच्या इथे वेगळी लेन नाहीये पण खूपच काळजी घेतली जाते.बाकी मुंबईत हे शक्य दिसतच नाही.:(आणि लोकांनी मनात आणलं तरी डिस्टन्समुळे शक्य नाही. मात्र बहुतेक सगळ्या स्टेशनवर सायकल स्टॆंड असतात आणि भरलेलेही असतात.:)

  • मुंबईला पण जवळपास मार्केटला वगैरे जायला म्हणुन वापरता येइल असा अंदाज आहे. मी घ्यायची म्हणतोय!!

   • Aparna says:

    maajhe baba ajun cycle waparatat that too our first BSA SLR….Borviali madhe waparatat mhanaje tumhala pan kandivli malad madhe waparata yeil….fakt te mhanatat ki sadharan je thode nivant road astat tithe cycle ani mag nantar auto kiwa payi depending on remaining distance…SO…that might be a good tip for someone who wants to bike in Mumbai…

 12. ना पार्किंगची कटकट, शरीराचा मस्त व्यायाम, प्रदूषणाला आळा, इंधनाची बचत (नाही तरी संपलच आहे म्हणा), सगळ्यानाच चालवता येणारी अशी ही साइकल. भविष्यात सगळ्यात जास्त मागणी साइकललाच होणार हे नक्की.

  • आताच सुरु झालेली आहे मागणी. अनिकेतचं बघुन प्रभास गुप्तेने पण घेतली सायकल.. आता मी पण घ्यायची म्हणतोय लवकरच!!

 13. प्रसाद says:

  Kaka…kahitari Velentine day sathi liha…na… kahi tari khaas…manatla….wachayla awadel…Jamwa na jara….waat pahtoy…!

 14. सायकल चालवायला मजा येते. लहानपणी शाळा, क्लास, ला जायला मैत्रिणींबरोबर सायकल भरपुर चालवली. अजुन सुद्धा आवडेल चालवायला. मी जपानला लोकांना पाहीलेय अगदी ब्लेझर घालुन टाय लावुन बिनधास्त सायकल ने जातात ऑफिसला. पण तिथे कोणी कोणाला हसत नाही.

  • मला आता आठवत पण नाही की सायकल शेवटली कधी चालवली होती ते. पण आता मात्र पुन्हा इच्छा होते आहे चालवायची. 🙂

 15. सौरभ says:

  महेंद्र, मस्त लेख!

  असे काही आशादायी वाचायला मिळाले की बरे वाटते. 🙂

  पुण्यात सायकल ट्रॅक आहेत. पण ते सर्वत्र नाहीत. कात्रज-स्वारगेट आणि स्वारगेट-हडपसर या बीआरटी मार्गावरच उपलब्ध आहेत. ते ही सलग नाहीत. मध्येच अतिक्रमण वगैरे असा प्रकार आहे.

  • सौरभ
   लहान शहरात सहज शक्य आहे.. अगदी आरामात करता येऊ शकतं. जर आपल्या इथे ओव्हर ब्रिज बांधले जाउ शकतात तर सायकल साठी रस्ते का नाही?? आपल्याकडे जे सरकारी विभाग आहेत ते सगळे खाबु आहेत. त्यामुळे अतिक्रमण हे तर अविभाज्य अंग आहे आपल्या रस्त्यांचे.. (दुर्दैवाने)

 16. Aparna says:

  ओरेगन राज्य, जिथे आम्ही राहतो ते अमेरिकेतलं most bike friendly state आहे.जवळ जवळ सगळीकडे बाइक लेन्स आणि बरीच लोक नेहमीच सायकल वापरतात. खरं तर इथे मुव्ह झाल्यावर मी ते लिहीणार होते आणि आळसामुळे राहूनच गेलं..:) या पोस्टमुळे आठवलं….आमच्याकडे पण सध्या एक बाइक आहे आणि नवरा बर्‍यापैकी वापरायचा. आता परत स्प्रिंग आला की जोमाने वापरेल….

 17. Vikramaditya says:

  I brought HERO DTB geared cycle, 1 month before & also do cycling daily of 12 km. You can’t believe but my weight reduced by 3.5 kgs within a month.If you want to prevent your growing belly you can also go for it.

  But is it possible in Mumbai????? I never been there but heard that its so crowd place.Hard to walk on road then when to do cycling?????

  • मुंबईला शक्यच नाही सायकल चालवणं . ऍक्सीडॆंट ची जास्त भिती असते इथे रस्त्यावर. जर तुमच्या वाहनाची स्पिड कमी असेल तर ऍक्सीडॆंट चे चान्सेस जास्त!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s