ब्रिटानिया…

बेलार्ड पिअर

पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्सी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाऊ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म , जात कधीच आडवी येत नाही. पार्सी मित्राच्या  घरी गेलो.. तर केम छो डिक्रा?? म्हणून त्याची आई किंवा आजी विचारणारच, आणि   अरे टुम किदरको गया था? बहुत दिनसे नै दिखा.. म्हणत त्याची आई पेस्ट्रीचा पिस समोर करणारच.

पार्सी लोक इथे भारतामधे पर्शिया मधून आले, आणि इथलेच होऊन गेले.इथे आल्यावर सर्वार्थाने इथल्या भाषा,संस्कृती, समाजाला आपलंसं केलं.

मुख्यत्वे करुन बिझिनेस करणारी कम्युनिटी ही- आणि  तो पण अगदी सचोटीने. जमशेटजी टाटांपासुन तर रतन टाटांच्या पर्यंत किंवा आज जे एन गोदरेज पर्यंत कुठलाही बिझिनेस हाऊस घेतले तरी त्यांच्या सचोटीची ग्वाही दिली जाऊ शकते. हेच कारण आहे, की अजूनही तूप आणायचं , किंवा चांगला पेढा हवा असेल तर पार्सी डेअरी कडेच पाय वळतात ( काही लोकं म्हणतील की   पणशीकरांकडे दादरला.. पण .. .)मी तर  कुठल्याही हॉटेलमधे गेलो आणि  कुल्फी  ऑर्डर करायची म्हंट्लं की आधी वेटरला विचारतो की कुल्फी पार्सी डेअरीची आहे की नाही ते??

रतन टाटांनी सिंगुरचा प्लांट त्यांच्या काही इंजिनिअर्सला मारहाण केल्यावर होणाऱ्या नूकसानाचा विचार न करता एका क्षणात निर्णय घेउन बंद केला .मला तरी वाटत नाही की दुसरा कुठला इंडस्ट्रिऍलिस्ट आपल्या इम्प्लॉइज ला मारहाण केली म्हणून अशी स्टेप घेईल  . हेच कारण आहे की आजही टाटा, किंवा गोदरेज किंवा इतर कुठल्याही पार्सी बिझिनेसमनचं नांव रिस्पेक्टफुली घेतलं जातं. पहिला स्टिल प्लांट सुरु करुन टाटांनी जी देशाच्या प्रगतीचा पाया घातला त्याला कोणीही विसरु शकणार नाही.

मुंबई मधे टाऊन साईडला गेलं की बऱ्याच मोठ्या जुन्या इमारतींच्या वर पंख पसरलेला पक्षी  (फिनिक्स आहे का तो?)- म्हणजे पार्सी लोकांची खूण दिसतो. त्याला काय म्हणतात ते माहिती नाही.टाऊन साईडला मला सगळ्यात जास्त आवडणारा भाग म्हणजे बेलार्ड पिअर. अतिशय सुंदर हेरिटेज बिल्डींग असलेला भाग आहे हा.मला हा भाग  आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे- अगदी बरोबर ओळखलं- आहे इथे एक माझी फेवरेट खाण्याची जागा – ती म्हणजे  इथे असलेले ब्रिटानिया हॉटेल.

परवाचीच गोष्ट , शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडीया मधली मिटींग आटोपली, दुपारचा दीड वाजून गेला होता. सोबत शब्बिर भाई होते, त्यांना  म्हट्लं की लंच साठी ब्रिटानिया लाच जाउ या. तसा ब्रिटानिया हा चॉइस , कुठलाच नॉन व्हेज खवय्या   नाका्रू शकत नाही.कार पार्क केली आणि हॉटेल मधे गेलो तर नेहेमी प्रमाणेच तिथे भरपूर क्यु होता. यु विल हॅव टु वेट.. टेम मी योर नेम, काउंटरवरचा तो बावाजी म्हणाला. नांव सांगून बाहेर गप्पा मारत उभे राहिलो आम्ही.  चांगलं १५- २० मिनिटांच्या नंतर आमचा नंबर लागला.

आत जाउन बसलो. टिपीकल इराणी लुक असलेलं हॉटेल. एज ओल्ड टिपीकल इराणी फर्निचर, हिरव्या चौकटीचा टेबल क्लॉथ!!आम्ही इथे क्रेडीट कार्ड घेत नाही ही पाटी मोठ्या दिमाखात झळकत होती  की वेडाउन दाखवत होती???

इथे पाण्याचा ग्लास आणून ठेवत नाही समोर. इथे आल्यावर इथला जिंजर सोडा प्यायलाच हवा. पण आज  मात्र पहिल्यांदा   जिंजर सोडा, आइस्क्रीम सोडा की रास्बेरी सोडा? काय मागवावं  ह्या मधे कन्फ्युजन झालं. थोडा  विचार करुन शेवटी आइस्क्रीम सोडा फायनल केलं.

ऑर्डर घ्यायला एक ८० -८५वर्ष वयाचे  बावाजी समोर उभे ( आता बावाजी म्हंटलं की एकेरी उल्लेखच केला जातो, पण त्यांचं वय इतकं होतं की एकेरी उल्लेख करायची इच्छाच होत नाही)  स्वच्छ गोरा रंग, बदामी रंगाची पॅंट, पांढरा शर्ट आणि काळा बेल्ट. हॉटेलचा मालक स्वतः ऑर्डर घ्यायला समोर उभा . मेनु कार्ड समोर ठेवलं.जास्त विचार करण्याची गरजच नव्हतीच- चिकन बेरी पुलाव आणि फिश पात्रा मागवला. म्हणाला, “फिश विल टेक टाइम..” म्हंटलं ओके. आइस्क्रिम सोड्याचे घोट घेत चिकन पुलावची वाट पहात बसलो .


चिकन बेरी पुलाव

सहज समोर लक्ष गेलं. एका चौघांच्या टेबलवर चार फिरंगी बसले होते. अगदी चवीने इंडीयन फुड एंजॉय करीत . त्यांचं बहुतेक झालं होतं. वेटरने बिल आणून ठेवलं आणि ह्या लोकांनी त्या वेटरला चक्क ३०० रुपये टिप ठेवली. म्हंटलं वेटरची दिवाळी आज!!!

तेवढ्यात आमची पण चिकन पुलावची प्लेट समोर आणून ठेवली गेली. पुलावा वार तळलेला ब्राउन रंगाचा कांदा आणि  ते लाल चुटूक रंगाची बेरी ची फळं लक्ष वेधून घेत होती. किसमिस पेक्षा पण एक चतुर्थांश आकाराचे हे फळ, चिकन पूलावला तळलेल्या कांद्या सोबत  एक अप्रतिम टेस्ट देते. (ही बेरी इराणहुन इम्पोर्ट केलेली असते बरं का.. म्हणुनच स्पेशालिटी आहे या हॉटेलची) समोरच्या प्लेटमधे पार्सी मसाल्यामधे घोळलेले चिकनचे तुकडे     बासमती तांदुळाने झाकल्या गेले होते. अजिबात रहावलं नाही आणि  चमचा खुपसला, थोडा भात बाजुला केला आणि त्या चिकनच्या   तुकड्याशी हाता तोंडाची लढाई सुरु केली- पहिला घास घेतल्याबरोबर , तोंडातून वाह!! उदगार निघाला  आणि मग पुर्ण प्लेट संपेपर्यंत आम्ही दोघंही  अजिबात एकमेकांशी बोललो नाही.

पुलाव संपत आला वेटरने त्याने बॉंबे डक ची प्लेट समोर आणून ठेवली. आता हा फिश इतका सॉफ्ट असतो की तोंडात घातल्या बरोबर विरघळतो. हा फिश बनवण्याची पार्सी पध्दत कशी असते ते माहिती नाही, पण अप्रतिम टेस्ट असते ह्या  फिश पात्राची.मला वाटतं बहुतेक बॉंबे डक वाफवलेला असावा , कुठल्यातरी पानात गुंडाळून..म्हणून पात्रा फिश!!

कार्मेल कस्टर्ड

सर्व्हिस खूपच फास्ट आहे – अर्थात असायलाच हवी कारण बाहेर वेटींग खुप जास्त  होतं. जशी चिकन ची प्लेट संपत आली वेटर येउन विचारुन गेला.और कुछ?? आता ब्रिटानियामधे आल्यावर कार्मेल कस्टर्ड न खाता परत जाणं म्हणजे सिद्धिविनायकाच्या मंदीरात जाउन दर्शन न घेता परत येणं.

कार्मेल कस्टर्डची प्लेट समोर आणून ठेवल्याबरोबर तुटून पडलो , आणि दोनच मिनिटात संपवली. अजुन एक हवी.. असं वाटत होतं, पण वाढलेलं  वजन आठवलं की ऑर्डर देण्यासाठी उघडलेलं तोंड आपोआप बंद झालं. ( नको त्या गोष्टी का बरं आठवतात??)  बिल देऊन उठलो, आणि संथ पणे जेवणाची नशा एंजॉय करीत ऑफिस कडे निघालो.  टाउन साईडला आलात की  ह्या   हॉटेलला भेट देण्यासाठी थोडा वेळ जरुर ठेवा…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , . Bookmark the permalink.

44 Responses to ब्रिटानिया…

 1. Rohan says:

  अरे मी कधी गेलो नाही आहे तिकडे… चिकन बेरी पुलाव आणि बोंबील…. अहाहा!!!

  ज़रा २ दिवस थांबता नाही येत का रे तुला.. रविवारी टाकायची ना ही पोस्ट … 😀

  टाउन साइडला कितीतरी जागा ह्यावेळी लिस्टवर आहेत … हेहेहे … तू कधी ‘आर्मी काफे’ला गेला आहेस का? तिकडे खिमापाव सोलीड असतो.

 2. Vidyadhar says:

  Kaay kaka,
  Aamchyasarkhya vegeterianna non-vegeterian banavun sodal tumhi! Aata mala Soyabean pulaav banavava(ho banavavach lagel-milat naahi) lagel (dudhachi tahaan takavar dusra kaay)!

  • विद्याधर
   अरे मी पण तसा बाय बर्थ व्हेज.. पण आता कालांतराने कन्व्हर्ट झालोय. 🙂 पुढल्या वेळेस व्हेज वर पोस्ट!! 🙂

 3. आता पारसी लोकांबद्दल तुम्ही इतक्या जिव्हाळ्याने लिहिल्यावर माझ्यासारखीला प्रतिक्रिया दिल्याशिवाय कसं रहावेल? माझा नवराच पारसी आहे ना! पारसी संस्कृती गेली दोन वर्षं जवळून पहातेय. हे बाकी खरं की यांना धर्म, जात असं काही मैत्री करताना आडवं येत नाही. भारतात आल्यावर त्यांच्या राजाने दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच दूधात साखर मिसळावी तसे आपल्या देशात हे लोक मिसळून गेलेत. भांडण-तंटा, जाती-धर्माचे बखेडे यांच्यापासून दूर असलेली जगातील सर्वात अल्पसंख्यांक जमात आहे ही. पण ’आम्ही अल्पसंख्यांक आहोत’चा बाजा या लोकांनी कधी वाजवला नाही. या लोकांबद्दल दोन गैरसमज म्हणजे सगळे पारसी गोरेच असतात आणि सगळे पारसी श्रीमंतच असतात. पण एक नक्की! हे लोक खूप संवेदनशील असतात आणि थोडे विक्षिप्तही! तुम्ही जो पक्षी पाहिला आहे, त्याला फरवहर (Faravahar) असं म्हणतात. हे चिन्ह अग्यारी, पारसींच्या गाड्या, दाराची चौकट यावर सर्रास दिसून येते. अगदी गळ्यातही हे चिन्ह लॉकेटमधे वापरतात.

  ब्रिटानिया मी एकदा पाहिलं आहे. पण त्यावेळेस मुंबईही फारशी ओळखीची नव्हती. आता तुम्ही इतकं लिहिलंय की पुन्हा जायची इच्छा होतेय. ही खाण्यावर वाचलेली दुसरी पोस्ट. आत्ताच विक्रांतची पोस्ट वाचली. काय तुम्ही लोक! आम्हाला जळवून जळवून मारणार बहुधा!

  • धन्यवाद त्या चिन्हा बद्दल माहिती दिल्या बद्दल.. बरेच दिवसापासुन विचार करीत होतो. विक्षीप्त पणा असतो,मला वाटतं तो स्थायी भाव आहे स्वभावाचा.. 🙂
   पण एक सांगतो, ऍज अ फ्रेंड दे आर द बेस्ट!!

   • 🙂 चंद्र वाढतो कले कलेने, आणि माझा नवरा वाढतो किलॊ किलो ने…
    हे..हे..
    पोस्ट एकदम खमंग आहे.

    मला खरंच वाटायचे की सर्व पारसी गोरे आणि श्रीमंतच असतात… 🙂

   • खरं आहे. ते खूप चांगले मित्र होऊ शकतात. ब्रिटानिया रेस्तरॉं बंद होतंय, असं ऐकलं. खरं माहित नाही. ते सप्ताहांताला आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही बंद असते म्हणे. म्हणजे कामाच्या दिवसातला एक वार ब्रिटानियामधे जाण्यासाठी राखून ठेवावा लागेल.

 4. vikram says:

  काय काका
  असले खवय्ये पोस्ट टाकून कहो त्रास देत असता तेही जेवणाच्या वेळी
  बाकी पारशी लोकांबद्दल जे लिहिले आहे ते पटण्यासारखे आहे बर का

  @कांचन
  पक्षाच्या माहितीबद्दल धन्यवाद
  आकडा तुमच्या ‘त्यांच्या’ बद्दल एक पोस्ट टाका कि 😉
  आम्हाला अजून माहिती मिळेल पारशी संस्कृतीबद्दल

  जीवनमूल्य

  • विक्रांत
   माझे काही मित्र आहेत . अनुभव एकदम मस्त असतो. यांच्या घरी जायला कधीही बरं वाटतं.. 🙂

 5. Suhas says:

  चिकन बेरी पुलाव, कॅरामल कस्टर्ड आणि बोंबील वाह अजुन एक खादाडीवाली पोस्ट, नेहमीप्रमाणेच लज्जतदार..पारसी समाजाबद्दल म्हणाल तर नवीनच एकतोय आपल्याच पोस्ट मार्फत आणि कांचनताईनी सुद्धा खूप छान माहिती दिलीय.
  महेन्द्रजी अहो आइस्क्रिम सोडा काय प्रकार आहे?

  • Sagar says:

   Kaka kharach ha Icecream soda kai prakar aahe?

  • आइस्क्रिम सोडा म्हणजे फ्लेवर्ड सोडा. त्या सोड्याला आइस्क्रिमचा फ्लेवर असतो. टेस्ट एकदम मस्त!! फार कमी जागी मिळतो हल्ली.

 6. Rohini says:

  अतिशय सुंदर पोस्ट आणी हॉटेल पण. तिथली सल्ली चिकन आणी सल्ली मटन पण मस्त असते. पुढल्यावेळेस नक्की ट्राय करा.

  • रोहीणी
   तिथे चिकन बेरीपुलाव एका प्लेट मधेखुप असतो. त्यामुळे दुसरं काही ट्राय करायला चान्सच नाही. पण पुढल्या वेळेस बोंबील ऐवजी सल्ली मटन!! डीसायडेड!! 🙂

 7. पक्के खाबुनंदन आहात तुम्ही. या तुमच्या ब्रिटानिया मध्ये काही व्हेज खायला मिळते का? तर जावुन उपयोग माझ्यासारख्यांना

 8. तुमच्या खाडडी पोस्ट वाचणे म्हणजे स्वत: वर अत्याचार करून घेण्यासारखे आहे. आत्ता रत्नागिरीला जाईपर्यंत बोंबीलाच्या विरहात तळमळत राहावं लागणार. पण आजकाल ह्याकडे मी “चला आपल्याला निरनिराळ्या ठिकाणच्या खाण्याच्या जागा तरी कळतात. कधी कुठे (निदान मुंबईला) जाणं झालं तर खात्री लायक ठिकाणी हाणता येईल” अश्या सकारात्मक दृष्टीने पाहातो. 😉 असो…
  बाकी पारशी हॉटेल मध्ये काही खाणे झाले नाही. कधी मुंबई आलो तर एखाद्या नातेवाईकाचे घर फाट्यावर मारुन आवर्जून पारश्याची भेट घेतली पाहिजे.

  • बोंबील मिळत नाही कां बॅंगलोरला?? अरे… मुंबईला आला की एकदा तरी इथे अवश्य जावे. मस्त जॉइंट आहे हा.
   इतर बरेच इराणीआहेत पण ब्रिटानिया एकदम अफलातुन…. 🙂

 9. कंटाळलो होतो खादाडीच्या ब्लॉग्स वर जाऊन निषेध नोंदवून नोंदवून. पण तुमच्या पोस्ट मुळे हायसं वाटलं कारण त्यात व्हेजचा उल्लेख नाहीये आणि ब्रिटानिया कडे फक्त नॉन-व्हेजचं मिळतं. अर्थात आइस्क्रीम सोडा बद्दल निषेध आहेच 🙂

 10. Nilesh Joglekar says:

  Mahendraji,

  Surekh lekh. Bhatti ekdam jamli aahe. Ata Mumbai la aalo ki nakkich try karin.

  Cheers
  Nilesh Joglekar

  • निलेश
   धन्यवाद.. अजुनही बरेच चांगले जॉइंट्स आहेत, त्यावर पण पुढे मागे लिहिनच कधी तरी.. 🙂

 11. sahajach says:

  कंटाळलो होतो खादाडीच्या ब्लॉग्स वर जाऊन निषेध नोंदवून नोंदवून. पण तुमच्या पोस्ट मुळे हायसं वाटलं कारण त्यात व्हेजचा उल्लेख नाहीये आणि ब्रिटानिया कडे फक्त नॉन-व्हेजचं मिळतं. अर्थात आइस्क्रीम सोडा बद्दल निषेध आहेच 🙂
  हेरंब + १००…………….

 12. Kanchan Karai :खरं आहे. ते खूप चांगले मित्र होऊ शकतात. ब्रिटानिया रेस्तरॉं बंद होतंय, असं ऐकलं. खरं माहित नाही. ते सप्ताहांताला आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही बंद असते म्हणे. म्हणजे कामाच्या दिवसातला एक वार ब्रिटानियामधे जाण्यासाठी राखून ठेवावा लागेल.

  पारसींबद्दल बरेच गैरसमज आहेत. पारसी लोक आणि त्यांची संस्कृती यावर एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल. लिहीन केव्हातरी.

  • हो.. शनिवार रविवार बंद असतं ते. आणि जर तिथे जायचं तर दुपारी चारच्या आत जावं लागतं. हे लिहायचं विसरलोच मी..

   पुढल्या पिढीला या धंद्यात इंटरेस्ट नाही , म्हणुन बंद होणार असं ऐकतोय ब्रिटानिया..

   • अरेरे, असं होता कामा नये. जर असं होतं असेल तर लवकरात लवकर मुंबई गाठायला हवी. बोंबील सगळीकडेच मिळतात असे नाही.

 13. Aparna says:

  माझा बॅलोर्ड पियरला बीपीसीएल क्लायन्ट होता तेव्हा ब्रिटानिया नेहमीच जायचो….आता पुन्हा एकदा जाऊनच स्मृती ताज्या कराव्या लागतील..सध्या तुमच्यासाठी ब्लॉगवर खेकडे ठेवलेत ते गोड मानुन घ्या….:)

  • चला.. एक तरी सापडला ब्रिटानियाला गेलेला..मला शेल फिश ची ऍलर्जी आहे.. त्यामुळे ….

   • Aparna says:

    आम्ही शेल नाही फ़क्त त्याच्या आतलं फ़िश खायला म्हणतोय…ही ही I know not even a PJ…..

 14. bhaanasa says:

  अरे इथे नचिकेत बरेचवेळा गेलाय. पण व्हेज काहीच मिळत नाही….गोडाशिबाय त्यामुळे मी कधीच गेले नाही. बाकी आईस्क्रीम सोडा शिवाय आईच्या पोटात असताना दुसरे काहीच मी खाल्ले-प्यालेले नाही. नऊ महिने फक्त तेच.त्यामुळेच की काय नंतर मी कधीही कुठलाही सोडा प्यायलाच नाही.:D दादर मध्ये जन्म गेला…,माझगांव मध्ये १७-१८ वर्षे काढलीत. बरेच पारशी आजूबाजूला.शांतताप्रिय आणि प्रेमळ लोक हे.सहसा मवाळच. दोस्तीला पक्के. पार्सी डेअरी झिंदाबाद.:)

  • व्हेज वाल्यांच्या काहीच कामाचे नाही ते हॉटेल. काही आवडत्या जागांपैकी ती एक जागा आहे..

 15. येथे शाकाहारी व्हे.बेरी पुलाव पण मिळतो. या बेरी त्यांच्या मुळच्या देशातल्या.

 16. पारशी डेरी आता संपली. त्यांची सुतारफेणी थंड दुधात बुडवुन खाणे एक अमृततुल्य अनुभव, त्यांची कुल्फी, तो बर्फीचा मासा.

  • हरेक्रिश्नजी
   धन्यवाद.. अहो मी आपोआप कॉमेंट अप्रुव्ह चं सेटींग केल्यामुले प्रतिक्रिया द्यायचं राहुन जातं बरेचदा.
   तिथे व्हेज बेरी पुलाव मिळतो हे माहिती नव्हतं. मी कधीच मेनु कार्ड पहात नाही तिथे गेलं की. सरळ ठरलेल्या डीश ऑर्डर करतो. 🙂 लवकरच एक अहमदाबादचं व्हेज खादाडीवरचं पोस्ट टाकतोय.. 🙂

 17. swapna says:

  aaj asa pahilyanda ghdlay ki me non veg baddal kahi itakya aavadini vachlay. me sudhha shakahari aahe. aani arthat aavdat nahi non veg baddal vachayla. pan tumacha blog vachun malahi jaychi ichha zali hya thikani. arthat vag pan milta he aikun far bar vatla..
  dhanyavad..

  • स्वप्ना
   अप्रतीम जागा आहे ती…अवश्य जायला हवे. पुर्वी केवळ ब्रिटीश लोकांसाठी सुरु केलेले हॉटेल आहे ते. अवश्य्भेट द्या..

 18. santosh Deshmukh says:

  काका, हे ठिकाण व्हिटी स्थानकापाशी आहे का? मी मुळचा सोलापूरचा कामानिमित्य मुंबईला येण जण असते, आहे शनिवारी जाऊन येईन असो मी पूर्वी तालासरीला जायचो तेथे एक पर्सी ई khasडेअरी नावाचे हॉटेल आहे विशेष म्हणजे शुद्ध शाकाहारी खूप चागले जेवण मिळते तिथे ,आपण तर ठाणेकर मी खुपदा ठाण्यात येतू पण नानवेज काही खास नाही तळ्याकाठचा कोल्हापूर पण सो सो ,,,,,,,,,, आम्हाला चावीच तिखट खायची आवड नी तेथे फक्त रंगच असतो वाटते

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s