राहुल गांधींची मुंबई भेट

मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भूमिकेतून पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय.

राहुल मुंबई लोकल मधे

आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा  शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय.   ढाण्या वाघ   आरोळी देतो, पण त्या कडे एखाद्या सर्कसमधल्या पिंजऱ्यातल्या वाघाच्या ओरडण्यासारखे जसे लक्ष दिले जात नाही, तसे यांच्या दमबाजी कडे लोकं अजिबात लक्षच देत नाहीत असं काहीसं होतंय हल्ली. राहुल गांधी सारखा कच्चा बच्चा पण या कडे दुर्लक्ष करुन मुंबईला येतो आपली सभा आटोपून परत जातो आणि  आपल्या स्वतःच्या राजकीय स्थैर्याचा पुरावा देतो.

नुसत्या पोकळ घोषणांचा तर आता अगदी कंटाळा आलाय. मराठी माणुस मूलतः सोशीक, नम्र आणि एखाद्याला नेता मानले, की  स्वतःचा  विचार न करता  जो नेता म्हणेल तसंच वागणारा अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे- पण ती खरी आहे का?? मला तरी तसं वाटत नाही – इथे लोकं विचार करतात तुम्ही काय म्हणता त्यावर , फक्त दुर्दैव इतकंच की ते मतदान करायला जात नाहीत.!

राहुल आला, त्याने चक्क ट्रेन ने प्रवास केला अंधेरी ते घाटकोपर पर्यंत- जे धाडस आजपर्यंत कुठल्याही नेत्याने ( उध्दव , राज, बाळासाहेब तर आता वय झालंय म्हणा किंवा गेला बाजार कॉंग्रेसचे नेते – गोविंदा सोडून , पण तो गोविंदा नेता आहे का हो??) केले नाही ते त्याने करुन दाखवले. आता शिवसेनेला घाबरुन त्याने असं केलं असा जर उध्दवचा गैर समज असेल तर शिवसेनेने खुशाल तसे समजावे- पण त्याने दाखवून दिलं की  तो जे बोलला त्या नुसत्या पोकळ वल्गना नव्हेत .

ज्या प्रमाणे राजीव गांधींनी सुरक्षा व्यवस्था बाजुला ठेवून सामान्य लोकांच्या जवळ जाउन त्यांच्या मधे मिसळून वागणं सुरु केलं होतं, अगदी त्याच प्रमाणे, अतिशय पद्धतशीर पणे त्याने लोकल ट्रेनने प्रवास करुन लोकांना एक आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

उध्दवच म्हणणं की आमचे कार्यकर्ते असलेला रस्ता त्याने घाबरुन चुकवला आणि तो लोकलने गेला- असं समजून स्वतःची पाठ थोपटून घ्यायला बरं वाटत असेल तर उध्वस्त तसे अवश्य समजावे.( प्रत्येकालाच हस्तिदंती मनोऱ्यात रहाण्याचा अधिकार आहेच) .

बरं शिवसैनिक इतके का कमी झाले आहेत  की रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रेन मधे , दादर प्लॅटफॉर्म वर सगळे लोकं राहुल गांधी की जय चा नाराच लावत होते. एकही माणुस किंवा गृप असा दिसला नाही की ज्याने राहुल गांधी मुर्दाबाद म्हणून नारा लावला असेल. याचा अर्थ रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर एकही शिवसैनिक नव्हता असा घ्यायचा का? आणि जर असं असेल तर……….

आजचे पेपर वाचतांना खुप मजा वाटली. मटा मधे उद्धव म्हणतो ( आजकाल तर तो काहीही बोलतो.. कायम असा कन्फ्युज्ड स्टेट मधे असल्या सारखाच असतो म्हणा तो – जसे दोन दिवसा पूर्वीच राहुलला म्हणाला होता, की काश्मीरच्या लाल चौकात जाउन तिरंगा फडकवून दाखव वगैरे .आता माझ्या सारख्या सामान्य माणसाला हे काश्मीर कुठुन मधे अचानक उगवलं असं वाटू लागलं?? तेवढ्यातच पुन्हा एक बातमी वाचली- राहुल ला म्हणावं( कोणी म्हणावं???) की काश्मिरात पण कुणालाही जाउन रहाण्याचा अधिकार आहे असं म्हणून दाखव- ( कलम नं ३७० आहे हे विसरला की काय ?) असो. आम्हाला इतके निर्बुद्ध नका हो समजू, की तुम्ही काहीही बोलाल, आणि आम्ही त्यावर डॊळे मिटून विश्वास ठेउ..   इथे हे जसे तमाशामधे सवाल जवाब चालतात , त्या लेव्हलचे सवाल वाचलं की आम्हाला मळमळते हो हल्ली.. बस करा आता अशी फालतू निरर्थक कॉमेंट्स!!

मध्यंतरी रेडीओ मिर्ची नावाचा लेख लिहिला होता – त्या लेखावरची शेवटची कॉमेंट वाचा -सौरभ पंची ची….. त्या नंतर त्याच संदर्भात मी स्वतः आणि इतर काही लोकांनी   मनसे- शिवसेनेला पत्रं पाठवली होती.  एकाही पक्षाने या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक समजले नाही – अजुजूनही व्होडाफोन वाले मराठीत बोलत नाहीत, किंवा एफ एम वर एकही  जॉकी मराठीत बोलत नाही.

माझं असं मत झालेलं आहे की  निवडणुका जशा जवळ येऊ लागतात, तसा या राजकीय लोकांचा मराठी माणसावरच्या प्रेमाचा पुळका जास्तच वाढतो.  अतिशय  वाईट वाटतं की राजकीय  पक्षांना काहीतरी राजकिय लाभ असल्याशिवाय   मराठी प्रेम दाखवुन द्यायची इच्छा होत नाही.

मुंबई कुणाची?? हा अगदी बालिश प्रश्न आहे. हे असे प्रश्न उभे करुन लोकांमधे दूही माजवणं हेच राजकीय पक्षांचं काम आहे. इथे समजा असं म्हंटलं की मुंबई सगळ्यांची- तर काय फरक पडतो?? किंवा समजा असं म्हंट्लं की मुंबई मराठी माणसाची तरीही काय फरक पडतो?? नुसत्या फुकाच्याच बोलण्याने जर मुंबईची मालकी मिळत असेल तर ठीक आहे.. नाहीतर काहीही अर्थ नाही या असल्या घोषणा बाजीला.

राहुल गांधीची बिहारातली कॉमेंट पण एकदम पोरकट होती,  आणि आवश्यकता नसलेली होती. तेंव्हा तर एक राजकीय नेता असं वक्तव्य कसं काय करु शकतो म्हणून खूप राग आला होता.अजिबात राजकीय प्रगल्भता नसलेला एक नेता काहीतरी बोलतोय असं वाटलं होतं..  मला तर खात्री होती की इथे म्हणजे मुंबईला आल्यावर तो नक्कीच मुंबई पोलिसांची वाह वाह करेल, पण इथे आल्यावर पण त्याने त्याला त्याची आवश्यकता वाटली नाही याचं वाईट वाटलं. कमीत कमी इथे आल्यावर त्याने शहीद झालेल्या मुंबई पोलिसांच्या शौर्याचा उल्लेख करायला हवा होता.

एक सिनेमा होता शाहरुख खानचा , चक दे इंडीया. त्यामधे तो सीन आठवतो?? मला खुप आवडला होता-जेंव्हा सगळ्या खेळाडूंना तो आपली ओळख सांगा म्हणतो तो सीन??  तेंव्हा सगळ्या मुली आपापल्या स्टेटचं नांव घेउन त्या स्टेटची आहे  असं सांगतात पण फक्त एकच मुलगी म्हणते मी भारताची …… जो पर्यंत ही राष्ट्रीयत्वाची भावना येणार नाही, तो पर्यंत विकास अवघड आहे.

शाहरुख खानच्या बाबतीत पण शिवसेनेने असंच काहीतरी म्हंटलं होतं की आम्ही माय नेम इज खान इथे लागु देणार नाही वगैरे वगैरे….. पण झालं काय़?? शेवटी ही पण एक फुसकी दम बाजी ठरली.शाहरुख म्हणतो मी माफी कशाबद्दल मागू?? शिवसेनेला आता शाहरुख, अमिताभ सारखे पण सिरियसली घेत नाही हल्ली!!!

एक शंका आली मनामधे, सध्या विदर्भात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही होत आहेत. मला तरी एकही शेतकरी किंवा गरीब मराठी कामगार इथे रस्त्यावर फुटपाथ वर येउन राहिलेला दिसत नाही. उलट तो आपल्याच भागात राहुन आत्महत्या करतांना दिसून येतं.इथे येणारे आणि फुटपाथ वर रहाणारे केवळ युपी आणि बिहारचेच कां असतात? याचं कारण एकच , मराठी शेतकऱ्यांमधे असलेला स्वाभिमान.. नुसता नारायण सारखं (विदर्भातले शेतकरी दारु पिऊन आत्महत्या करताहेत म्हणणारा अती शहाणा (???) माणुस) पार्टीचं नांव स्वाभिमान ठेऊन तो येत नसतो.. तो अंगी असावा लागतो त्या शेतकर्यांसारखा हे नार्याला कधी कळणार?). म्हणून ते इथे मुंबईला येत नाहीत.

मुंबई मधे हे लोकं येउन रहातात, झोपड्या बांधतात- एक प्रश्न आहे, जर सरकारने ठरवलं की इथे मुंबई मधे झोपड्या वाढू द्यायच्या नाहीत तर त्यांना इथे रहाणं शक्य  होइल?? सगळेच राजकीय पक्ष ( शिवसेना, भाजप, कॉंग्रेस इन्क्लुडेड) इथे झालेल्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करण्यासाठी हिरारीने प्रयत्न करतांना दिसतात. वेळो वेळी आता ९७ पर्यंतच्या झोपड्या रेगुलराइज, मग २००० पर्यंतच्या अशा घोषणा ऐकत असतो आपण . त्यांच्या झोपड्या रेग्युलराइझ करुन , किंवा त्यांना आधी पर्यायी जागा फुकट देऊन त्यांना इथे प्रस्थापित करणारे आपले  निवडुन दिलेले (कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा )नेते गण…. काय म्हणावं तेच समजत नाही. ( त्या ऐवजी त्यांच्या झोपड्या   पाडून टाकुन त्यांना परत  कां पाठवत नाहीत?? किंवा पहिली झोपडी उभी रहाते तेंव्हाच ती हटवली का जात नाही?)

राजकिय नेत्यांनी प्रत्येक वार्डात अशा अनधिकृत लोकांसाठी रेशन कार्ड वगैरे काढून देण्यासाठी  मदत केंद्र उभी केली आहेत.जेंव्हा तुम्ही आम्ही निवडुन दिलेले नेतेच असं करतात तेंव्हा हे बिहारी – यु पी वाले मजुर इथे येतच रहाणार,  झोपडपट्टी बांधत रहाणार. सगळ्या मराठीच्या तारणहार लोकांना आता मराठी माणुस आठवेल तो पुढल्या  इलेक्शनलाच..  आणि …………. जाउ द्या हो. कोळसा उगाळावा तितका काळाच…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

69 Responses to राहुल गांधींची मुंबई भेट

 1. काका, आणि त्याच्या ट्रेन प्रवासासाठी पोलीस बंदोबस्त, गाडीची सुरक्षा आणि अशा एकूणच गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च झाले असणार. तसंच राज्याचा मुख्यमंत्री सगळे काम धंदे सोडून २ तास ताटकळत होता. त्या खर्चाचा तर हिशोबच लावता येणार नाही.
  काय आहे की सगळेच जन नतद्रष्ट आहेत. पण त्यांच्यात त्यातल्या त्यात कमी दळभद्री कोण हे बघायचं.. आणि माझ्या मते तरी ते शिवसेना, मनसे असं कोणीतरी आहे. (भाजप तर संपला आहे.) .. आणि दुसरं म्हणजे कॉंग्रेसवर किंवा कोणत्याही सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा.. नाहीतर ती हुकुमशाहीच.. राहुल बिहारात जे काही बडबडला त्यासाठी त्याचा निषेध करणं हे योग्यच होतं असं मला वाटतं.. ते कितपत यशस्वी झालं हा वेगळा मुद्दा आहे अर्थात.

  • निषेध तर करायलाच हवा होता. पण कसा?? ते जास्त महत्वाचे. या सगळ्या प्रकारामधे मराठी माणसाचीच सगळीकडे मानहानी झाली. असं पण झालं, की शिवसेना नुस्तया पोकळ धमक्या देते म्हणुन.

   शाहरुख खानची केस ही एक उदाहरण. त्याला दिलेली धमकी- तु पाकिस्तानात निघुन जा… अरे काय हे?? उगिच काहिही बरळायचं? तुम्ही नेते नां? मग नेत्यांसारखे वक्तव्य द्या नां.. अशा घोषणाबाजीमुळे नुकसान तुमचंच होतंय.. असं उध्दवाला सांगावंसं वाटतं…

   सगळ्या पक्षांना केवळ मतांमधेच इंट्रेस्ट आहे.. मराठी माणुस तर उरलेल्या वेळात मतं मिळवण्यासाठी तोंडी लावणं म्हणुन
   उपयोगाचा!!

   भाजपं कधीही चांगला मनसे किंवा शिवसेने पेक्षा.. ( हे माझं बदललेलं मत.. पुर्वी मी ्शिवसेनेचा सपोर्टर होतो राज मला कधीच भावला नाही)

   पंजाबात पण खलिस्तान हवा म्हणून किती वर्ष आंदोलन चाललं?? त्याच धर्तीवरचं हे मराठी माणुस आंदोलन वाटतं मला तरी. हिंदुत्ववादी शक्ती विघटीत करण्याचा एक पध्दतशिर डाव वाटतो मला. ते एकदा झालं की कॉंग्रेसची जीत नक्की!!!

 2. अगदी मनातलं लिहीलत. कॉंग्रेसबद्दल मला फारसं प्रेम नाही, पण ह्या वेळी राहुलने बाजी मारली खरी.

 3. काका, तुम्ही राहुल गांधीबाबत लिहिले तेवढे सोडून बाकीचे थोडेफार पटते.

  राहूल गांधीने बाजी मारली किंवा काही मोठे करून दाखवले असे मला नाही वाटत. ४ पैकी २ कार्यक्रम तर रद्दच केले. पूर्ण करायचे होते की ते ही. आणि लोकलमध्ये गेला ते ही आजूबाजूला १०० सुरक्षारक्षक आणि पोलीस ह्यांच्या गराडयातच ना?

  इतर पक्षांबद्दल मला आपुलकी आहे असे नाही, पण त्यापेक्षा कॉंग्रेसच्या निलाजऱ्या लोकांचा रागच जास्त येतो.

  • देवदत्त
   प्रतिक्रियेकरता आभार यावर थोडा विचार करावासा वाटला तुम्हा सगळ्यांना यातच सगळं मिळाल. इतक्या सुरक्षा रक्षकातच राजिव गांधी यांचा खुन झाला होता… तेंव्हा त्याने घेतलेली रिस्क पण कमी नाही…

  • पण त्याने खरंच उत्कृष्ट पध्दतीने सिच्युएशन हॅंडल केली असं मला वाटतं. शत्रुची स्ट्रेंथ समजुन घेतल्याशिवाय त्याला हरवता येत नाही..

 4. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे कशाला म्हणतात तर?

  • नरेंद्रजी
   धन्यवाद.. अहो एखादी गोष्ट उगिच मनाला लागुन जाते. तशीच ही राहुलची ट्रिप.. अतिशय मनःस्ताप देउन गेली..

 5. Meenal says:

  शिवसेना किंवा मनसेपैकी कुणालातरी उचकावण्यासाठीच काही कारण नसताना राहुलने अशी काहीतरी वक्तव्ये केली हे उघड आहे. आणि प्रतिपक्षाला कमजोर समजण्याची चूक शिवसेनेने केली हेही खरे आहे. त्यावर उध्दव ठाकरेची सावरासावर कमी पडते आहे. (यांपुढेतरी)नुसते आरोप प्रत्यारोप किंवा जहिर सभा यांपेक्षा ठोस कामं करुन चोख उत्तर द्यायला हवे आहे.
  राज्याचा मुख्यमंत्र्याला देखिल काही सांगण्याची तसदी गांधी मंडळींनी घेतली नाही तेव्हा त्यांनी देखिल आपले स्थान,गरज,कामाचे महत्व इ.इ.ओळखून राहिलेले बरे!

  • राहुलचा ती निर्लज्जा पणे केलेली डायलॉग बाजी अनावश्यक होती. त्याने बिहारी मतं मिळवण्यासाठी ते वक्तव्य केलं तिथे पण तो जिंकलाच.. लालुची काही मतं नक्कीच फोडली. काही दिवसापुर्वी एका अस्पृष्य महिलेकडे जेउन आला होता. त्याची व्युह रचना जोरात सुरु आहे बिहार वर कब्जा करायची.

   लालुला खाली दाखवायला, किंवा मायावतीला खाली दाखवायला त्याला आपली स्ट्रेंथ वाढवणे आवश्यक आहे. मग काय करायचं?? बेस्ट वे म्हणजे सरळ शिवसेने विरुध्द गरळ ओकायची..

   मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं , लोकल मधे पण शिवसैनिक असतिलच नां?? त्यांनी का नाही नारेबाजी केली?? उलट राहुल जिंदाबाद चे नारे ;लावले गेले असं आलं होतं पेपरला..

 6. Atul Deshmukh says:

  महेंद्र काका,
  अगदी प्रत्येक सुशिक्षीत आणि महाराष्ट्रावर,संस्कृतीवर प्रेम कर्नार्यंची व्यथा मांडली आहे…मी दिल्लीत असतो, माझ्या टीम मधील सगळी मंडळी ही उत्तर भारतीय आहेत पण सुसंस्कृत आहेत आणि सद्सक्विवेक्बुद्धि असणारी आहेत ..जेव्हा कधी महाराष्ट्रात आन्दोलन होते तेव्हा मी त्याना मराठी माणसाचा हा लढा उत्तर भारतीयशी नसून आपली संस्कृति, भाषेचे संरक्षण करण्यासाठी आहे हे पटवून देतो आणि त्यानाही ते पटते…कदाचित हिंदी प्रसर्मध्यामानी मराठीची बाजु जनुन्बुजुन नीटशी मांडली नाही…आणि मला तर असे वाटते की आपल्या ह्या परिस्थितीला मराठी माणुस,राजकारणी जास्त जबाबदार आहे..भैय्या लोकाना दोष देवून के फायदा..पाहिले आपणच आपला उत्कर्ष साधावा…
  परवा राहुल गांधीची मुंबई भेट एखाद्या अद्भुत घटनेप्रमने जेव्हा news channel वर दखाव्न्यत येत होती तेव्हा इकडे राज- बालासाहेब((इकडे बालासाहेबना बाल ठाकरे म्हणून संबोधतात)) शिवसेना,मनसे चे अक्षरश हसू होत होते..एरव्ही राज,बालासाहेब हे कसे योग्य आहेत हे मी पटवून देत असताना परवा मात्र गप्पा होतो…त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान हा अगदी जिव्हारी लागला…पण फ़क्त आपली माणसे आहेत म्हणून त्यांच्या कुठल्याही निर्णयाला डोळे झाकून समर्थन करने हेकाही पटत नाही.

  • अतुल
   अगदी नेमक्या शब्दात मांडल तुम्ही.. इथे जे मराठी माण्सांचं हसु झालं त्याचं वाईट वाटलं..

   नेमकी व्युह रचना आखुन जर काही केलं असतं, तर ते जास्त योग्य ठरलं असतं…..

 7. मराठी माणसातील फूट हेच कारण याच्या यशाच..अजुन काय बोलणार. चार पक्षाचे मराठी लोक आहेत सध्या मुंबईत आणि त्यात रोज गोंधळ वाढतच चाललाय..उद्या अजुन पक्ष येतील अजुन गट बनतील 😦 मला वाटला होता परवा मोठा राडा होईल मुंबईत (http://suhasonline.wordpress.com/2010/02/05/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/) पण या अनपेक्षित चेंज इन प्लान ने सगळ्यांचीच त्रेधातिरपीट उडवली…

  • सुहास
   ह्याला गनिमी कावा म्हणतात. आणि मराठ्यांचं हत्यार मराठ्यांच्याच विरुध्द वापरले त्याने…

 8. संजिव सिद्धुल says:

  काका लेख छान झालाय.
  आपण प्रश्न तर मांडलात, पण सामान्य मराठी माणसाने ह्या अशावेळी करावयाच्या उपायावरही थोडंफार लिहायला हवं होतं. कालच संघाच्या एका स्वयंसेवकाचा blog वाचला. link देतोय. अवश्य पहा. http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/02/blog-post.html

  आजच्या भाष्य मधे मा.गो.वैद्यांनी ही ह्या प्रश्नावर छान विचार मांडलेत. लेख पाठवला आहे. अवश्य पहा.

 9. Abhijit N says:

  पूर्णत: असहमत आहे मी. राहुल ने बाजी बिजी काही मारलेली नाही. कडेकोट बंदोबस्तातून फिरणे आणि निवडक लोकांसमोर भाषण देणे यात काही अर्थ नाही. शिवसेनेला तो सापडला नाही म्हणजे काही शिवसेना हरली असं होत नाही. हिंदी माध्यमं आणि कॉंग्रेसचे पैसे घेउन बातम्या छापणारा मटा वाचून आपण आपली मतं ठरवू नयेत. शिवसेनेचा जोर कमी झाला हे मात्र खरं.

  उदधवची एक मुलाखत पाहिली राजदीप सरदेसाईंनी घेतलेली. उद्धवला उत्तरे देता येत नव्हती. ४० सेकंदात समर्थन करण्यासारख्या शिवसेनेच्या भूमिका नाहीत हे मान्य आहे. व शिवसेनेच्या चुकीच्या विरोधामुळे मराठीचे नाव खराब होते आहे हे ही खरे.

  हिंदी व इंग्रजी माध्यमे आता एवढी टोकाला गेली आहेत की त्यांना हे का होतंय याच्या मुळाशी जायची गरजच वाटत नाही. राजद्रोही राज ठाकरे ने “फिर उगला जहर” असं शीर्षक देवून त्याच्या भाषणातली एक ओळ छाटून सबंध दिवसभर भारताला दाखवायची मग गौरसमज नाही तर काय होणार? पण याचा अर्थ असा नाही की ते बरोबर आहेत व राज सर्वस्वी चूक. आयबीएन लोकमत या मराठी वाहिनीला तर राहुलचे गोडावे व कॉंग्रेसचा उघड प्रचार करताना आपण एक माध्यम आहोत व निष्पक्ष असणे महत्त्वाचे आहे याचा विसर पडलेला दिसतो.

  मराठीचा लढा शांततेने बुद्धिवादाने व लोकशाही मार्गांनी पुढे रेटला पाहिजे. अमृतमंथन चे सुनील कुलकर्णी हे एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचले नसतील तर सर्वांनी जरूर वाचा. http://amrutmanthan.wordpress.com/

  राज किंवा उद्धव दोघेही फार आक्रमक होतात व हिंदी माध्यमांना कोलीत मिळतं. आता या प्रकरणातून धडा घेऊन मुद्सद्दी राजकारण्याप्रमाणे आपली खेळी शिवसेनेने व मनसेने बदलली पाहिजे. व राजकारणातही आम्ही कमी नाही हे दाखवून दिलं पाहिजे.

  • अभिजीत
   धन्यवाद.. शेवटचं वाक्य अगदी शंभरटक्के पटलं..

   “राज किंवा उद्धव दोघेही फार आक्रमक होतात व हिंदी माध्यमांना कोलीत मिळतं. आता या प्रकरणातून धडा घेऊन मुद्सद्दी राजकारण्याप्रमाणे आपली खेळी शिवसेनेने व मनसेने बदलली पाहिजे. व राजकारणातही आम्ही कमी नाही हे दाखवून दिलं पाहिजे.”
   आणि सलिल कुलकर्णी .. छानच लिहितात. त्यांचा एक लेख मी आधी एका मासिकात वाचला होता.. तेंव्हाच त्यांचं लिखाण आवडलं..
   व्यवस्थित केलेला समारोप…. धन्यवाद..

 10. Sagar says:

  Kaka
  Kai Bolava aata Shivsenebaddal….Achanak kas kai evadhe maval zale tya Sharukh baddal dev jane?
  Pan Raj ha Pakka Rajkarani aahe he tyane Dakhvaun dile…Ek Shabd bollla nahi Rahulchyaa Mumbai doryabddalll
  Pan kahi Mhna Mala Raj Kadun apeksha aahet….
  An rahila tya

  • सागर
   इथे सगळ्यांनी मिळुन लढायची वेळ होती. पण झालं काय?? राज नुसता उध्दव कसा फेल होतो ते पहात बसला… इथेच सगळं बिनसलं..

 11. bhaanasa says:

  महेंद्र, सहमत आहे. नुसत्या पोकळ वल्गना करायच्या आणि स्वत:चेच हसू करून घ्यायचे याची सवयच झालीये. मराठी मराठी करत उगाच उठसुट कोणाला तरी पकडून – आम्ही यवं करू म्हणत पेपरच्या हेडलाईनमध्ये राहायचे. पण काम शून्य.खरेच यांना मराठीचे प्रेम आहे का? का संगनमताने मुंबईची पध्दतशीर वाट लावत आहेत….

  • जे झालं, त्यामुळे मला खुप वाईट वाटलं. त्याने कमित कमी शहिद पोलिसांना श्रध्दांजली तरी अर्पण करायला हवी होती.. पण… नाही!!!!असं काही झालं की नुसती चिडचीड होते..

 12. शिवसेनेबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाही असंच वाटतं. राहूल आला आणि गेलाही. शिवसेनेने काय केलं? उद्धवची विधानं तर अशी आहेत की शाळकरी पोरही त्याच्यापेक्षा जास्त विचार करून बोलेल, नाहीतर गप्प बसेल. एक मराठीचा मुद्दा सोडला, तर राज ठाकरेही काही विशेष करताना दिसत नाही. मुंबई कुणाची ह्या प्रश्नाचं उत्तर तर येणारा काळच ठरवेल.

  • राज ला आणी उध्दवला पत्र पाठवली आहेत मराठीच्या मुद्यावर. रेडिओ मिर्ची आणि इतर चॅनल्स , तसेच व्होडाफोन बद्द.. पण काहीच ऍक्शन नाही घेतलेली..

   याचं कारण काय असावं?????

   • आजच मनसे गटातून एक लेख आलाय. त्यात राजचा आय. डी. आहे. मी कधी पत्र पाठवलेलं नाही पण पाठवून बघेन. उत्तराची अपेक्षा अर्थातच नाही पण एका पत्राने फरक पडणार असेल तर तेही करून पाहीन.

    • शुभेच्छा!! काही झालं तर बरंच होईल. पण आम्ही इ मेल्स पाठवुन झाले आहेत त्यांच्या वेब साईट वर..सौरभ ने पण पिच्छा पुरवला होता. बघु काही होतं कां ते!.

 13. मुंबईतल्या शाहीदांना श्रधांजली नाही दिली हे बरे झाले. श्रधांजली देण्याची लायकी आहे का कुणाची तेवढी? आणखी खूप काही लिहावस वाटतय पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कोळसा उगाळावा तितका काळाच. कशाला उगाळा? देण्याची

 14. samir deshpande says:

  Mahendraji,

  Shivsenecha kiti addhapatan vhava? Nishedh mhanun Kale zende fadkavtat?Chakka Satyagraha varati utarale?Wagh Kharach Mhatara zala ahe…………

  • समीर
   शिवसेनेकडुन काही तरी ठोस प्रतिक्रिया अपेक्षीत होती- काय तर म्हणेज काळे झेंडे दाखवायचे..त्याने काय होणार?? निषेधच व्यक्त करायचा का फक्त?? असो..

 15. सौरभ पंची says:

  महेंद्रजी,
  राज आणि उद्धवला रेडिओ किंवा व्होडाफोनसाठी कितीही पत्र पाठवली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे आता कळुन चुकलंय. एक म्हणजे निवडणुका जवळ नाहीत मग नेते लोकांसाठी का काही केल्याचा अभिनय करतील? गरज सरो आणि वैद्य मरो.
  मध्यमवर्गीय डोक्याच्या बावळट उद्धवने शिवसेनेच्या वाघाचं मांजर करुन टाकलंय. काहीही बोलत असतो तो. maturity अजुनही नाही त्याच्याकडे. आणि राज म्हणजे कागदी वाघ. व्यक्तिमत्व प्रभावी पण आतुन फुसका बार. अहो मी तर म्हणतोय आपण कॊंग्रेसशी पत्रव्यवहार करुया या मुद्द्यांसाठी. किमान मराठी माणसासाठी आम्हीपण काहीतरी करतोय हे दाखवण्याच्या नादात आपलं काम झालं तर चांगलंच आहे.

  अभिजीत,
  मटा मधे नेहमीच राज ठाकरेचं कौतुक वाचत आलोय मी. त्याला तर मटा नायक पुरस्कार देखील मिळाला आहे. मटा हे कॊंग्रेस कडुन पैसे घेऊन बातम्या छापत असेल असं अजिबात वाटत नाही, त्यापेक्षा राहुल गांधी जिंकला हे खुल्या दिलाने मान्य करावं आपण. त्याच्या magnetic personality पुढे तो बिहारात काय बोलला हे विसरले लोक. त्याने राडा टाळण्यासाठी मस्त युक्त्या केल्या आणि त्याला उद्धव त्याचा विजय समजतोय.
  आणि हो, मी कॊंग्रेसचा कार्यकर्ता नाहीये, मला देखील शिवसेना भाजपाने सत्तेवर यावं हेच वाटतं. पण यांना सत्ता मिळाली होती तेव्हा अधासासारखं खाल्लंय या लोकांनी. कॊंग्रेस परवडली असं म्हणण्याची वेळ आली होती तेव्हा. मराठीप्रेमाची नाटकं करा पण आधी प्रगती तरी करा. भीक नको पण कुत्र आवर हे असे लोक आहेत. युतीच्या नालायकांमुळे नाईलाजाने कॊंग्रेसला मत द्यावं लागतं हे पण समजत नाही बावळट मांजराला. म्यांव म्यांव.

  • सौरभ
   ह्याच कॉमेंटची वाट पहात होतो. मला तर काही उत्त्तर आलं नाहि त्यांचं…
   कालच बाळासाहेबांना शरद पवार भॆटले आणि ऑस्ट्रेलिया संघाबरोबर खेळण्यात येणाऱ्या मॅच बद्दल मांड्वली झाली असावी. कारण सकाळी डरकाळ्याफोडुन आम्ही खेळू देणार नाही सांगणारे, सध्याकाळी सुर बदलुन बोलत होते.

   शाहरुख खानची मुंबईतली वापसी पण अगदी शांतपणे झाली. मी तुला मारल्या सारखंकरतो,तु रडल्या सारखं कर… असं जरी म्हंटलं , तरी शाहरुख ने रडल्यासारखे केले नाही, आणि तरीही त्याच्या विरुध्दचा स्टॅंड एकदम मवाळ करण्यात आला.. असो…
   चालायचंच.. जे काही होईल ते पहार रहाणंच आपल्या हातात आहे…

   एकाच गोष्टीचं वाईट वाटलं, की बाहेरचा ( राहुल) असलेल्यांच्या लढती मधे स्वकियांनी एक व्हायचं , तर राज ठाकरे इथे पण अलिप्त!!! त्याला काहीच वाटलं नाही का राहुलच्या कॉमेंटबद्दल??

   आपण नुसतंच उध्दवला निरर्थक बडबड करतो असं म्हणतोय, पण राज तर त्यापेक्षाही पुढे.. त्याने तर साधा आक्षेपही नोंदवला नाही राहुलच्या विधानावर… असो….

 16. प्रसाद says:

  kaka…vaaiet evhdhyacha watat…aaple CM je itar konta official functiona asel tra aaramat ushira yetat… ani rahul chya swagatala…. teen taas waat pahat hote…venuewar…!!! ani aaple Gruha rajya mantryani tar haddach keli…. Rahulchya chappla uchalat hote…ani tehi sarva media samor… aplya Maharashtra chya netyanchi (Jyana Aapanach Nivadun Dile.. Amchi representative mhanun) asli HUJUREGIRI Baghun Jiv Jalto… Kharach… Mat nemka dyaycha tar dyaycha konal… Sagle ekach maleche mani… Ekalahi.. Taath Pathicha kana nahi..??? He badlayla have….

  • सी एम अन गृह राज्यमंत्री यांच्याबद्दल तर एक वेगळा ब्लॉग लिहिता येइल. बघु या.. जर वाटलं तर लिहिन.. 🙂

 17. हेमंत आठल्ये says:

  तुम्ही नक्की बातम्यांच्या वाहिन्या जास्त पाहत आहे अस वाटत आहे. राहुल गांधी आणि त्याने केलेल्या पराक्रमातून काय साध्य झाले? राजकारण सोडा, आपण आपल्या प्रश्नावर बोलू. भाववाढ, किंवा संरक्षण यात काही बदल घडला? तो राहुल गांधी आला आणि गेला. येऊन काय झाल. तो जिथ जिथ गेला. तिथल्या जवळपासच्या महाविद्यालयातील मुलांना, राहणाऱ्या लोकांना त्रास झाल. बंदोबस्ताच्या नावाखाली रस्ते बंद. पुण्यात राष्ट्रपती बाई नेहमी येतात. आणि येऊन काही फायदा होत नाही, नुसता त्रास. ती जिथ जिथ येते, तिथले सगळे रस्ते बंद.

  • हेमंत
   राहुल आल्याने काय साधलं हा विषयच नाही. हे मला पण मान्य आहे की त्याच्या येण्याने काहीच साध्य झाले नाही. किंबहुन राहुलच काय पण कुठलाही नेत आला तरीही काहीच फरक पडत नाही. म्हणुन राहुलमुळे फरक पडणे अपेक्षित नव्हते.
   त्याने जेंव्हा कॉमेंट केली की मुंबई फक्त बिहारी अन युपीच्या लोकांनी वाचवली, तेंव्हा उध्दव काहीतरी बोलला, पण राज तर चक्क मुग गिळुन गप्प बसला.. जेंव्हा उध्दवने रणशिंग फुंकलं, तेंव्हा मनसेचे कार्याधिकारी , हे कसे फेल होतात ते पहात बसले.. एकाही मनसेच्या नेत्याने किंवा साध्या सभासदाने राहुलच्या विरुध्द ब्र पण उच्चारला नाही//// असो..
   थोडक्यात.. राहुल गांधीच काय पण राज ठाकरे किंवा उध्दव ठाकरे जरी कुठेही गेले तरीही काहीच साध्य होत नाही. सगळी कडे त्याच प्रकारे रस्ते बंद, आणि मुलांना त्रास होतोच…

   मुद्दा पुर्ण वेगळा आहे माझ्या आजच्या ब्लॉगचा.

 18. Vidyadhar says:

  kaka,
  mala patata ki marathichya muddyamule hindutvavadi shaktinmadhye fut padli aahe..pan hya muddyamadhye sanghala padnyacha kaahi karanach navta. mutually exclusive events aahet rashtraprem aani bhashaprem. aani punha, Rahul jinkla asa mhanane dhadsache tharel…kaaran Enligh-Hindi Media kuthlihi goshta glamourize karu shaktat. haan, CM aani Gruharajyamantryanchya vaganyamule, Marathi Manoos matra harla…

  • हीच खरी कॉंग्रेसची रणनिती आहे. डीव्हाइड ऍंड रुल..
   राष्ट्रप्रेमापेक्षा इथे पहिला स्वतःचा स्वार्थ पाहिला जातोय.. ह्याचं वाईट वाटतं..

 19. dinesh says:

  Mahendraji,
  Tumacha aajacha blog ek tarfi zalyasarkha vattoy. Aapan (Sushikshit madhyamvargiya) kadhich shivsenela support karat nahi; nivdun hia det nahi; matra apeksha faqt karto. Marathi policencha apman zalyavar virodh faqt shivsenenech ka karayala hava? bakee paksha hya babtit kahich karat nahee v shivseneche aandolan fasale mhanun khush hotat.
  Shivsenene kamit kami virodh darshavala he kahee kami nahi. Aapla asach support rahila tar to virodh hi sampun jail v applyavar `Kunihi yave aanee tapli maruni jaave’ ashi gat yeil.
  Tevha he aandolan yashasvi zale nasale tari tyanni aandolane karavit jene karun marathi manasache astitva aahe yachi tari janeev rahil

  • प्रत्येकच वेळेस शिवसेनेला मत देत आलोय. जास्त काय लिहु??

   असे बालीश आंदोलनं करतिल तर ते फसतीलच याची खात्री मी आज देउ शकतो. नेतत्वाची प्रगल्भता आवश्यक आहे. नाही तर अशा नुसत्या बालिश धमक्यांना कोणीच भिक घालणार नाही…

   शिवसेनेने त्याच्या विरोधात बंद पुकारला असता तर??? आणि या मुद्यावर राजने पण साथ दिली असती तर??? पण …..

 20. ajay says:

  rahul chya kheli peksha mala kalchi pawarachi kheli jam avdali. eka dagadat don pakshi marale tyani. congress la rajakaraan mhanje kai te mahitey pan te khasa khelatat he phakta pawaranach mahitey 🙂

  -ajay

  • अजय
   कालची खेळी तर जबरदस्त होती. अर्थात ते अपेक्षीत होतंच. मला असं वाटतं की एकदा तरी हे असं मांडवली करणं थांबवलं पाहिजे शिवसेनेने.

   आता जेंव्हा उध्दव असं बोलतो, तेंव्हा हे पुर्ण माहिती असतं की थोड्या दिवसात मातोश्रीवर भेटायला गेल्यावर बंदी वगैरे मागे घेतली जाईल..

 21. सौरभ पंची says:

  दिनेश,
  शिवसेनेला ९५ साली सगळ्यांनीच मतं दिली होती,सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी पण. म्हणुन युतीने तेव्हा कॊंग्रेसचा मोठा पराभव केला होता. युतीच्या लोकांनी हाताने घालवलं आहे सगळं. अपेक्षा होती की हे संघाच्या विचारसरणीने बांधलेला तत्वनिष्ठ भाजप आणि बाळासाहेबांची कडवी शिवसेना हे combination महाराष्ट्राचा तारणहार ठरेल. पण या लोकांनी कॊंग्रेसपेक्षापण वाईट खाल्लं. आम्ही हे नाही म्हणत की भ्रष्टाचार करु नका. खुशाल करा पण आमच्या प्रगतीचं काही बघाल की नाही. युतीने लोकांचा विश्वासघात केलाय आणि सत्ता सांभाळायची त्यांची लायकी नाहीये म्हणुन लोकांना नाईलाजाने परत कॊंग्रेसकडे वळावं लागलं.
  बाकीचे पक्ष काय आणि शिवसेना काय,आम्हाला कोणाकडुनच कसलीही अपेक्षा नाहीये. यांनाच मराठी माणसाचा पुळका आलाय,नाटक तरी करावं लागेल नाहीतर मराठी माणुस चालला मनसे मधे.एकटा राज ठाकरे सुद्धा पुरेसा आहे मराठी माणसाचं अस्तित्व दाखवुन द्यायला. आणि शिवसेनेच्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनावर आमचं अस्तित्व टिकेल एवढी काही वाईट वेळ आली नाहीये. एक चांगलं झालं,यांच्या भांडणात मराठी माणसाचा स्वाभिमान जागा झालाय, तो पुरेसा आहे आपल्या अस्तित्वासाठी. बावळट उद्धवला सांगा कोणीतरी,तुझं नेतृत्व लोकांना मान्य नाहीये,घरी बस. शिवसेनेला बरे दिवस येतील.

 22. Pravin says:

  मला कॉंग्रेस मधला त्यातल्या त्यात आवडणारा माणूस म्हणजे राहुल. त्याने या वेळी बाजी मारली यात काही वादच नाहीय. त्याने लोकल चा केलेला प्रवास म्हणजे बर्‍याच जणांना पब्लिसिटी स्टंट वाटतो, पण माझ्यामते इतर कुठल्या नेत्याने पब्लिसिटी स्टंट साठी देखील असे काही केल्याचे ऐकिवात नाही. राहता राहिला शिवसेनेच्या दमाचा प्रश्न तर उद्धावच्या कारकिर्दीत तो दम फुसकाच ठरतोय. माय नेम ईज़ खान चा दम असो वा राहुल चा दौरा उधळण्याचा कार्यक्रम असो. नथिंग इज गोइंग हिज़ वे. आता तर ऑस्ट्रेयिलियन खेळाडून्बाबत जाहीर केलेले धोरण देखील बदलेले जाईल अशी चिन्हे दिसतायत. कसा विश्वास राहील शिवसेनेवर.

  माझ्या मते असल्या फालतू गोष्टीन्वर वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी लोकापयोगी कामे करावीत, शेवटी मराठी मराठी करून वा नको तिथे स्वाभिमान दाखवून घरातली चूल पेटणार नाहीय 😦

  • प्रविण
   आज टिव्ही वर दाखवलं की काही ठिकाणी काचा फोडल्या म्हणुन.माय नेम इज खानच्या थिएटरच्या.. बघु या काय होतं ते.
   लोकोपयोगी कामं केली तरंच लोकं त्यांच्या मागे जातिल, नाहीतर.. ….!!

 23. narendra says:

  उद्धवला जर राहुल चा मुंबईमधे सुखरुप येवुन जाण्याचा गनिमीकावा कळाला असता, तर शिवसेनेचे हे हाल झाले नसते….

 24. deepakraul2 says:

  राहुलचा पोरखेळ
  राहुल गांधी मुंबईमध्ये आला तर काय झाल त्याला येण्यास बंदी थोडीच आहे.भारताचा नागरिक आहे,त्याने याव त्याचा मर्जी नुसार.घ्याव्या सभा त्याचा तो हक्कच आहे.पण त्याला येउ नको कींवा काळे झेंडे दाखवु,अस सांगण,किंवा जाहीर करण हे धाडस आहे.कारण त्यावर राहुलने प्रतीक्रिया जाहीर नाही केली.
  आणि सेनेने आपल म्हणंण दिल्ली पर्यंत पोहोचवल,त्या करता आंन्दोलन करण्याची गरज आहे अस वाटत नाही.राहुलने जर म्हणंण खॊडून काडल असतं,आणि चांगले ५ दिवस राहुन जागो जागी सभा घेतल्या असत्या,तर कदाचीत सेनेचा पराभव मान्य करावा लागला असता. हा तर पोरखेळ झाल्या सारखा वाटल,
  आम्ही तुमच्या राज्यात येउ म्हणे,आणि आला तर मागल्या दारान पळालास का,समोर येण्य़ाच धाडस त्यान दाखवलच नाही. जिवाची रिस्क म्हणाल तर आम्ही मराथे भ्याड पणे मागुन हल्ला करतच नाही.तस झालच तर आम्हा सर्वांचा तो पराभव झाला असता.

  • काळे झेंडे दाखवणं वगैरे गांधीवादी प्रकार शिवसेने कडुन अपेक्षीत नव्हते.
   शिवसेना तो लोकलने गेला. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर एकही सैनीक नव्हता कां??
   मला पण राहुल आवडतो असे नाही, पण त्याने मराठ्य़ांचा गनिमी कावा वापरला..
   आणि ट्रिप पुर्ण केली.असो.. प्रतिक्रिये करता आभार.. आजच पाहिलं की शाहरुखविरुध्दचा स्टॅंड पक्का केलाय सेनेने.. आणि हेच अपेक्षीत आहे सेनेकडून.. 🙂

 25. SHARAD says:

  UDDHAV HA SHIVSENECHA CHEHARA KADHICH HOU SHAKAT NAHI. TYANE SARAL PHOTOGRAPHIT SWATLA GUNTWUN GHYAWE. TYACHYA AWAHANAWAR EKAHI MARATHI MANUS RASTYAWAR UTARNAR NAHI YACHI KHATRI SAGLECH DETIL. ENGINE CH FAIL AAHE TAR DABE KASE RULAWAR CHALTIL. KUTHALA SANDARBH KUTHE JODAWA HE TYALA AJUN KALALELE NAHI. BOLTANAHI AJUN BARYACH THIKANO ADAKHALATO. MULAT TYACHA GRUHAPATH PAKKA NAHI. YAULAT NEMKA RAJ AHE. JAWALJAWAL PRATYEK GOSHTILA TO PURAWE DAKHWATO. PARWA DOMBIVALICHYA SABHETHI TYANE CHENNAI CHYA MAJI MUKHYAMNATRACHYA KHALI ASALELA BOARDCHA PHOTO DAKHWILA. TITHE ‘TAMIL YES’, ‘ENGLISH YES’ AANI ‘HINDI NO’ ASE LIHILE HOTE. TITHE JAUN KUNI HINDI BHASHEWAR (SAID RASHTRABHASHA) ANYAY HOTOY ASE MHANEL KA? MARATHI MANASANE HYA PARPRANTIYANNA AAPLE MHANUN APLYAT SAMAWUN GHETALE JE SOUTH INDIA NE KDHICH KELE NAHI. TAMIL ANI KERALA MADHYE KITYEK WARSHE HINDI HI BHASHACH SHALET SHIKWILI JAT NAWHATI. ASO. THODE WISHAYANTAR ZALE. TAR YA UDDHAVCHYA NAKARTEPANAMULE RAHUL THODAFAR YASHASWI ZALA ASE MHANATA YEIL. BALASAHEB JAR AAJ KARYARAT ASATE TAR KAY RAHULCHI HIMMAT HOTI TRAIN MADHUN FIRNYACHI. MNS NE JAR SUPPORT KELA ASATA TAR RAHUL KADHICH YASHASWI ZALA NASTA. PAN SARWAMARATHI MANSANE MARATHICHYA MUDDYAWAR EKTRA YAWE ASE MHANNARYA RAJNE DEKHIL YA PRASHNACHE RAJKARANCH KELE HEHI TITKECH KHARE.

  • शरद
   काल दिवसभर कामात असल्याने उत्तराला उशिर होतोय . क्षमस्व!! विस्त्रुत प्रतिक्रिये करता आभार.

 26. archana says:

  shaharukkadun paise have aahet baaki naahi. ek khoka pohacala ki picture smoothly release hoil. juni shivsena sampalee aahe. purvee hee natake Rane,Bhujabal hyaa lokaanchyaa jivavar chaalaayachee. aata kuneech urale naahee.

 27. Sagar says:

  सगळ्यांना सगळ कळत तरी प्रश्न आहे तिथेच आहेत.
  मला वाटत आपले नेते अजून १५ वर्षे तरी मागेच चालतायत.
  अजून किती मराठी तरुणांचं आयुष्य हे वाया घालवणार आहेत काय माहित.
  परवा झेंडा पाहिला ..साधारणच होता.. पण कोणता झेंडा घेऊ हाती? ला शेवटी छान उत्तर दिल आहे…

  • सागर
   प्रतिक्रियेकरता आभार. मला पण तो सिनेमा बघायचाय.. आता सिडी आणुनच बघावा लागेल .

 28. SHARAD says:

  AHO KAKA, SHAMASW KASHABADDAL… PRATYEKALA APAPLI KAME ASATAT. TUMHI POCH DILI HECH KHUP ZALE. BARYACH THIKANI SADHE UTTARHI YET NAHI. PRATIKRIYECHI DAKHAL TARI GHETAT KA KON JANE. DHANYAWAD.

 29. SHARAD says:

  SHIVSENELA KAMJOR AANI SHAHRUKHLA HERO BANWUN MEDIA WALYANNI MUMBAI MAHARASHTRAPSUN TODANYACHI BHASHA SURU KELIY.

  ARINDAM CHAUDHARI NAMAK EKA FUTKAL ESAMACHA LEKH WACHUN PAHA. PATEL TUMHALA. THE SUNDAY INDIAN HYA TYACHYA SAPTAHIKATUN TYANE TASHI JORDAR MAGNIHI KELI AHE. SITE CHE NAW AHE http://www.thesundayindian.com. TYAWARIL ‘HATS OFF TO SHAHRUKH, NOW ITS TIME TO MAKE MUMBAI A UNION TERRITORY’ HA LEKH JAROOR WACHA.

 30. शरद
  धन्यवाद. खरंच खुप छान लिंक आहे ती. मजा आली वाचायला. असे “विनोदी लेख’ वाचायला आवडतात मला. मस्त आहे लिंक .इतरही लेख वाचुन काढतो.

  खरं तर अशा लेखांना काहीच अर्थ नसतो. उगिच काही तरी लिहायचं म्हणुन लिहिलेलं असतं.विनोदी लिखाण म्हणुन या कडे बघावं.. झालं.

 31. narendra says:

  जास्त माहिती घेतल्याव्रर असे कळते की, लेख अपुर्ण माहीतीवर लिहीला गेला आहे.
  १००० पेक्षा अधिक शिवसैनिकांना सरकारने आधिच अटक केनी होती…..

  शिवसैनिकांना दोष देने चुकिचे आहे……

  ( माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही…. )

  • नरेंद्र
   शिवसैनिक तर बांधलेले आहेत उध्दवच्या मर्जीशी.- म्हणुन त्यांना दोष देत नाही मी

   दोष उध्दवला देतोय चुकीच्या मुद्यावर लढल्याबद्दल….
   मुंबई मधे पुर्वि केवळ एक हजार नाही तर कित्येक हजार सैनिक असायचे, जे स्वतःहुन बाहेर पडायचे.ती स्ट्रेंथ संपली आहे असे वाटते.

 32. narendra says:

  हे फक्त त्यांचच काम का? जमल तर वाचा आणी पटल तर बघा..नहितर सोडुन द्या…

  आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद…

  http://abhinavvichar.blogspot.com/2010/02/blog-post_13.html

 33. नरेंद्र
  तुमचा लेख वाचला. भाषा थोडी व्यवस्थित ठेवली तरीही लोकांना मुद्दा समजतो -असं मला वाटतं..

  व्यक्ती तितक्या प्रकृती , प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असते, तेंव्हा तुमचे विचार तुम्ही मांडणं जास्त योग्य ठरतं, पण त्याच वेळेस इतरांचे विचार काय आहेत त्यावर लिहिण्याची गरज नसते..

  असो.. तुमच्या मताबद्दल आदरच आहे..
  प्रतिक्रियेकरता आभार.

 34. deepakraul2 says:

  माला या सर्व प्रकारात एक गोष्ट कळली नाही. की या कांग्रेसच्य राजपुत्राला घाबरायच कारण काय होत ? याला कुणीही जीवे मरनाय्ची धमकी दीलेली नव्हती. फक्त काले जिंदे (flags) दाखवणार होती. स्वातंत्र भारतात घटनेनि हा अधिकार सर्व नागरीकाना दिला आहे. या साठी पोलिसी दंडुका वापरायची काय गरज काय ?…….. स्वातंत्र पूवी हेच कांग्रेसवाले ब्रिटिशना काले जिंदे (flags) दाखवंतच होते. या प्रकाराला बहादुरी बोलणार काय ?….. महाराष्ट्रात एवढी वाइट परीसतीती नाही.. हीच हिमत कश्मीरला जावून दाखवली पाहिजे होती

  • दिपक
   आज प्रत्येकच नेत्याला झेड कव्हर हवं असतं. इव्हन अगदी लोकल नेत्यांना पण. .

   काळे झेंडे दाखवणे हे एक प्रतिकात्मक निषेध आहे, त्या करता काही दंडुका वापरायची गरज नव्हती या गोष्टीशी मी स्वतः पण सहमत आहे.

   पण त्याच बरोबर एखादा टेररिस्ट त्या डेमॉन्स्ट्रेशन करणाऱ्यांमधे घुसुन, त्याचा जीव घेउ शकतो हे पण तेवढंच खरं आहे.राजीव गांधी चा पण असाच मृत्यु झाला होता..

   टेररिस्ट अटॅक्स हे ठरवुन किंवा धमक्या देउन होत नसतात, हे आपण विसरु शकत नाही.

 35. राजन says:

  राहुल ( रोमपुत्र ) ने काहीही नविन असे केल नाही. याचा आजांन तेच केल बापान आणि हा पण तसलाच निघाला. माला तर वाटते की महाराष्ट्र देव्ष याचा रक्तात आहे. वाटल होत की राहुल वेगळ! विचार करणारा वाटला होता. पण जाती सारखी माती….. बिहार प्रकारात माती ख़ाली…
  राहिली गोष्ट मुंबई लोकक वारीची. मी स्व:ता तिथे होतो. टीवी रियल्टी शो सारख ठरवून नाटक केल……

  • राजन
   पोलिटिकल खेळी आहे ही. जसे राज आणि उध्दव मराठी माणुस कार्ड खेळतात तसंच आहे हे..

   असो..प्रतिक्रियेकरता आभार.

 36. Vikramaditya says:

  Kaka, I think It was “Organized mess” by political parties……whats your opinion?

  No one politician wants to start with grass root level, everybody wants to reach at sky high.

  Why everybody forget PAST, HISTORY of themselves?

  I know a person who used to travel with M-80 & leaved in leased home. He come closed with one politician, after some years he became MLA & now having 3 Safaris, 1 BMW M3, few other imported vehicles, fleet of 32 tippers (Dumpers), 7 Excavators, 4 tractors & uncountable wealth !!!!

  Its a normal message in common peoples that if you want to be Rich Person go in Politics !!!!!!!!

  Really disgusting picture of “SHINING INDIA” 😦

  • ऑर्गनाइझ्ड मेस.. काय चपखल शब्द वापरलाय..पॉलिटीक्स हॅज बिकम अ डर्टी गेम.. त्यात जो उतरतो, तो अंग खराब होऊनच बाहेर येतो.
   दर इलेक्षन ला जायदाद डीक्लिअर केली जाते. तेंव्हा हे प्रश्न का उभे रहात नाहीत? इनकम टॅक्स डिपार्टमेंट का ऍक्शन घेत नाही- की इतकी प्रॉपर्टी कशी वाढली या लोकांची?
   प्रत्येक पॉलिटीकल लिडर गौडा सारखाच आहे , असे माझे तरी मत आहे, कदाचित एखादा दोन असतील एक्सेप्शन..पण मेजॉरिटी सगळी “तशीच”.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s