बंदी घातलेली पुस्तकं..

कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची  इच्छा वाढली होती. थोडी राजकीय , पण बरीचशी श्रृंगारिक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे .  लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्या बद्दल   खटले  चालवून   लेखकांना अटक पण करण्यात आली होती-  आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्सुकता  काही शांत बसू देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .

नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे उपलब्ध आहेत- .बंदी घातली गेलेली  पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लीलतेकडे झुकणारी, किंवा अश्लील म्हणता येतील अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासून तर १९ व्या शतका पर्यंत   आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघून खरं तर आश्चर्यच वाटतं.

एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशका  पूर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमीन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लील – चावट लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या  कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरी कडे एक श्रृंगारिक कादंबरी म्हणून बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायिकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी  अंगावर शहारुन यायचं   🙂  सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लील फोटो, लेख उपलब्ध आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??

काही महिन्यांपूर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाज स्वास्थ्य म्हणून जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लील साहित्य म्हणून त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भूत होते, की सीमा रेषेला कधी  किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमां साठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रीत्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणून  मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.

केवळ भारतामधे नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणी तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.

लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी   शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.

हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!!  अजिबात  खालच्या शरीराची हालचाल करता येत नसते त्याला.

कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल  भावना  या सारख्या उफाळून येतात- त्यांची पूर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची  ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे  उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल  भावनांची  दमन करण्याचा प्रयत्न आणि नंतर मग   पूर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे.  कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून.. पण , परिस्थिती मुळे  ती  केवळ शरीरसूखा साठी  नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर  लग्न बाह्य संबंध ठेवते.

जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातून अतिशय सुंदर रीतीने  तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे.  डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे  डीएच लॉरेन्सचं पुस्तक  असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रृंगारिक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की तीची कीव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जून वाचा..इथे लिंक दिलेली आहे डाउन लोड करायला.

स्त्री पुरुष संबंधाची उघडपणे  केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासून चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की  फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे का? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितीने त्या काळातल्या वातावरणामधून वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं.  ह्या पुस्तकामध्ये आदर्श वैवाहीक जीवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणून पाहिलं जातं.इथे वाचा ते पुस्तक.

हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरून बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते.. यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशीच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापण  म्हणजे ्खूपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक   जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणून हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडून त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .

सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्मचरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय  धीट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.

एका गावाकडल्या मुलीला शहरात आणून कुंटणखान्यात आणून ठेवलं जातं. तिथे ती दररोजच  स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपून जाते .एकदा भिती संपली की तिला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात.    अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसून त्याच्या  बरोबर पळून जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवून देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी  फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते!  असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अपेक्षित नव्हतं, कद्चित म्हणून एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टच सर्व मान्य नव्हती.  म्ह्णूनही असेल हे पुस्तक गाजलेलं.  इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणून मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचून सोडून दिलं.

दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक  नांव घेउन  एक माणुस  आपला निरनिराळ्या  १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी   लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिशय पॉप्युलर पुस्तका मधे- आणि  ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक   अश्लील पुस्तक म्हणावे लागेल.  खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचित तोचतोपणा असलेलं हे पुस्तक आहे..  अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता.  हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खूप वर्ष बंदी होती.   (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फूसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरच.

एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकात होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की  किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खून, वासना, बिभत्सता वागणूक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचूच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खून केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..

हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हीली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.

याच सुमारास  डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान  लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशित केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे.  या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणून तिला मान मिळाला.

त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही  होऊन गेलं होतं. काही बाबतीत मागासलेलं असणं  पण खूपच चांगलं असतं नाही??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

76 Responses to बंदी घातलेली पुस्तकं..

 1. gouri says:

  राजकीय कारणासाठी बंदी घातलेल्य पुस्तकांचाही एक मोठा गट होता … माईन काम्फ पासून ते अगदी ‘माझी जन्मठेप’ पर्यंत … आणि शिवाय ‘सॅटॅनिक व्हर्सेस’, ‘लज्जा’ अशी पुस्तकं सुद्धा. बंदीमुळे या पुस्तकांचा खपसुद्धा शृंगारिक पुस्तकांसारखाच वाढला 🙂

  • राजकिय कारणांसाठी बंदी घातलेल्या पुस्तकांवर एक वेगळा लेख लिहायचा आहे, म्ह्णणुन इथे लिहिलं नाही.
   अजुनही बरीच पुस्तकं आहेतच.. त्यावर नंतर कधी तरी.

 2. Nikhil Sheth says:

  परफ्युमड गार्डन चा अनुवाद रिचर्ड बर्टन ने केलेला आहे…तो एक अतिशय कलंदर व्यक्ती होता…त्याच्याबद्दल जेवढे वाचू तेवढे चाटच पडत जातो आपण…खरं तर त्यावर एक सिरीज लिहित होतो मी. पण राहून गेले….बाकी आर्टिकल मस्त जमले आहे. माझ्या सर्कलमध्ये सगळ्यात गाजलेले म्हणजे पु ना ओकांचे ‘ताजमहाल नव्हे तेजोमहालय’…असो. मी ज्या गावात आहे त्याचे नाव आहे ‘वेस्ट लाफायत’. इथे एक पब्लिक लायब्ररी आहे. गाव जरी छोटे असले तरी लायब्ररी लाख दोन लाख पुस्तके असलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचे काही ना काही उपक्रम सारखे चालले असतात..काही प्रदर्शन, जुन्या पुस्तकांची विक्री वगैरे…मागच्या वेळी त्यांनी एक नवाच सेक्शन सुरु केला होता काही दिवसांसाठी. ‘बंदी घातलेली पुस्तके’ त्यात इरोटिक, राजकीय आणि काही गव्हर्नमेंट डोक्युमेंट्स पण जे बाहेर सहजासहजी बघायला मिळणार नाहीत…..९९% पुस्तकांबद्दल ऐकले पण नव्हते…पण चाळायला मजा आली होती…मात्र तुमचे जे मत आहे की गोष्टीवर बंदी अनाल्याते तोची जास्त वाच्यता होऊन ती जास्त प्रसिद्ध होते हे मात्र खरं आहे…जेम्स लेन चे पुस्तक असो किंवा साविताभाभी ची साईट असो. जर संसदेमध्ये त्याबद्दल चर्चा झाली नसती तर लोकांना त्याबद्दल कळले पण नसते…पण आता प्रत्येकाला ती साईट माहित आहे…हीच गोष्ट ‘जेम्स लेन’ ची किंवा ‘संतसूर्य तुकाराम’ची …

  • अगदी खरं… मी पण केवळ पुस्तकं बॅन झाली म्हणुन शोधुन काढली, नाहितर कदाचित बघितली पण नसती.
   इथे लिहितांना एक सगळ्यात महत्वाचं पुस्तक राहुन गेलं. ते म्हणजे जॉय ऑफ सेक्स.. ऍलेक्स कंफर्ट यांनी नवविवाहितांसाठी म्हणुन लिहिलेल्या ह्या पुस्तकाच्या सव्वा कोटी च्या वर प्रती विकल्या गेल्या आहेत. डॉ. ऍलेक्स हे स्वतः लैंगीक दोष निवारणाचे काम करणारे असल्याने, त्यांना लोकांना काय माहिती हवी आहे हे व्यवस्थ्ति माहिती होतं, कदाचित म्हणुनच हे पुस्तक इतकं पॉप्युलर झालं असावं..
   http://uploading.com/files/get/2be67a65/ इथे आहे ते पुस्तक..

 3. Nikhil Sheth says:

  शिवाय लज्जा, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, युरोप वा अमेरिकेमध्ये माईन काम्फ अशी पण बरीच मोठी यादी आहे…

  • ,माइन काम्फ मी पण वाचलंय. हिटलर कसा घडत गेला हे अतिशय सुंदर लिहिलंय त्याने स्वतः. पण इतका मोठा ठोकळा, नंतर वाचायला कंटाळा आला, आणि मी अर्ध्यातुनच सोडून दिलं.

 4. Sachin says:

  List ajun pan khup mothi hou shakate. Expample: Satanic Verses. Do you know that once upon a time even alice in wonderland was banned in China’s Hunan province for some reasons. Da Vinci Code was banned in many places. Similarly a very good book by the name of Lolita was banned in Europe (even in England) for the alleged sexuality. Madam Bovery by flauber (jya novel varun shahrukh cha Maya Memsab banla hota) was also banned in France.
  Mala ekda nagpurla bardi bhagamadhe lady C’s lover chi juni copy bhetali hoti. Vikanara sangat hota ki he pustak banned aahe ani tyamule tyachi kimmat pan jast hoti. That copy is still with me.
  List is endless if you go deep. India madhe tar aapan survatichya kalamadhe blindly khup kahi ban kele hote.
  BTW koni sangu shakel ka ki “Polyester-PrinceThe-Real-Story-of-Dhirubhai-Ambani” he pustak india madhe ka ban zale aahe.

  • सचिन
   मॅडम बोव्हरी बद्दल ऐकलं होतं. आता वाचुन काढतो. हे पॉलिएस्टर प्रिन्स द रिअल स्टॊरी बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण आता डाउन लोड केलंय .. वाचुन बघतो. धन्यवाद..
   कोणाला डाउन लोड करायचं असेल तर इथे आहे ते पुस्तक.http://tinyurl.com/yhcasot

 5. Vidyadhar says:

  Barechda beebhatsa pustaka sanketik rupane samajvyavasthevarahi prahaar kartat…pan barechda samajvyavasthevar prahaar karnyacha navakhali beebhatsa lihun lokpriyata milavali jaate.
  Aso, ashleelatechya babat Acharya Atrencha ek kissa me aikla hota..Tyanna konitari “Tumhi ashleel lihita” mhanun mhatla tar te mhanale “me nusti lungi bandhun majhya gharachya balcony madhye ubha aahe…aani tumhi khalchya majlyavarun majhya ughdya angakade pahun ashleel ashleel mhanun bombaltay…majhya patalivar alaat ki tumhala khara kaay te kalel.”

  • 🙂 सुंदर विनोद आहे. पण त्याच सोबत दुर्दैवाने ती परिस्थिती आजही आहे.

  • gluyug says:

   TRANSLATED ABOVE in marathi font thru baraha.8
   बरेच बीभत्स पुस्तक सन्केतिक रुपाने समाज व्यवस्थेवरहि प्रहार करतात पण बरेचदा समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचे नावाखाली बिभीत्स लिहून लोकप्रियता मिळवली जाते.
   आसो, अश्लीलतेच्य बबत आचर्य आत्रेंचा एक किस्सा मे ऐकला होता..त्यांना कोणीतरी तुम्ही अश्लिल लिहीता म्हणून म्हंटले, तर ते म्हणाले की नुस्ती लुंगी बांधून माझ्या घराच्या बालक्नी मधे उभा आहे, आणि तुम्ही खालच्या मजल्यावरू माझ्या उघड्या अंगाकडे अश्लिल अश्लिल म्हणून बोम्बलल्ताय.. मझ्या पातळीवर आलात की ्तुम्हाला खरे काय ते समजेल.

 6. हो बंदी मागे राजकारणी हेतू हा असतोच…जेम्स लेनचा आत्मचरित्र, लज्जा वगेरे खूप उदाहरण आहेत…तुम्ही दिलेल्या बुक्सच्या लिंक आवडल्या, वाचून काढतो 🙂

 7. पुस्तक लिहिताना लेखकाचा जो हेतू असतो, त्याच हेतूने वाचकही ते पुस्तक वाचतील असं नाही. जे लेखन वास्तव मांडणारं असतं, ते आक्षेपार्हदेखील होऊ शकतं म्हणूनच पुस्तकावर बंदी येत असावी. लेडी चॅटर्लीज… आहे माझ्याकडे पण अजून वाचलेलं नाही. इतर पुस्तक वाचून पाहीन. लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद!

  • ते पुस्तक मला तरी खुप आवडलं होतं. अवश्य वाचुन बघा.. छान आहे ते. या सोबतच १९७६ च्या सुमारास नॅन्सी फ्रायडे चं माय सिक्रेट गार्डन ( फॉर्बीडन फ्लॉवर्स) पण आलं होतं. फॅंटॅसायझींग फक्त पुरुषच करतात कां? नाही .. या समजाला छेद देणारं हे पुस्तक माझ्या ऐन तारुण्यात आलं होतं, आणि मी ते पुर्ण वाचुन काढलं होतं. आपल्या कडे त्यावर बंदी नव्हती, एक चांगला चेंज म्हणुन वाचलं ते पुस्तक. इथे आहे अव्हेलेबल डाउनलोड साठी….http://tinyurl.com/ykdj5p6

   अहो हेरॉल्ड रॉबिन्स वाचणारी आमची पिढी. कधीतरी लपुन छपुन एम ऍंड बी पण वाचायचो (कन्फेशन सिरिजचं पोस्ट होतंय हे. 🙂 )

   • मी आधी कधीच इंग्रजी पुतकं वाचली नव्हती. पहिलं पुस्तक वाचलं ते हू मुव्हड माय चीझ. त्यानंतर एक दोन वाचलीत. आता नियमित वाचीन म्हणते.

 8. Ashish says:

  Chan Mahiti dilit Dhanywad

 9. vikram says:

  खरच एखाद्या पुस्तकावर बंदी घातल्यावर त्याबाबतची माणसाची उत्कंठता खूप वाढते आणि ते वाचण्याची इच्छा दाटून येते
  याच कारणाने मी ‘लज्जा’ वाचले होते
  असो छान लिहाल आहे

  • विक्रम
   आमार .. जाउ दे माझं कुंवारपण म्हणुन एक पुस्तक आहे तिचं ते पण वाचुन काढा. काय लिहिलंय तिने.. काय वाटेल ते शब्द वापरले आहेत. तिच्या मामानेच तिला एकदा आडोशाला नेउन .. आणि तो प्रसंग जॊ तिने लिहिलाय, वाचतांना खरंच काटा येतो अंगावर!! माणसावरचा/ माणुसकीवरचा विश्वासच उडुन जातो..

 10. लिंकांबद्दल धन्यवाद! सगळे डाउन्लोड करतो आणि वाचुन काढतो.

  • आनंद
   अवश्य! प्रत्येक पुस्तकामागे एक इतिहास आहे. लेखकाचे झगडणे आहे.. अवश्य वाचायला हवे. फक्त ते मी लिंक न दिलेले “. १२० डेज ऑफ सोडोम. ” डाउन लोड करुन वाचु नका. अतिशय वाईट पुस्तक आहे ते. मी फक्त पहिली पन्नास पानंच वाचलित… हॉरिबल..

  • आनंद
   अवश्य! प्रत्येक पुस्तकामागे एक इतिहास आहे. लेखकाचे झगडणे आहे.. अवश्य वाचायला हवे. फक्त ते मी लिंक न दिलेले “. १२० डेज ऑफ सोडोम. ” डाउन लोड करुन वाचु नका. अतिशय वाईट पुस्तक आहे ते. मी फक्त पहिली पन्नास पानंच वाचलित… हॉरिबल.. म्हणुनच मुद्दाम लिंक दिली नव्हती.

 11. bhaanasa says:

  महेंद्र, रो.घो.कर्वेंवरचा तो चित्रपट मी पाहिला होता. मला तर अजिबात काहीही आक्षेपार्ह वाटलेच नाही. उलट त्या काळातही इतके महत्वाचे व अंत्यत गरजेचे कार्य दोघे पतीपत्नी अतिशय तळमळीने करत होते.पण तेच त्यावेळच्या धर्मकांड-थोतांड वाल्यांना खटकत होते. ’ लज्जा ’ही वाचलेय.बाकी बरीचशी तू दिलेली पुस्तके वाचलेली नाहीत. आता हळूहळू पाहीन. बाकी एखादी गोष्ट करू नका म्हटले की वारंवार ती कराविशी वाटणारच…:)

  • आणि मी तर कायमच नियम न जुमानणारा.. म्हणुन कुठलिही गोष्ट नाही म्हंट्लं की ती करायची इच्छा होतेच..
   तो चित्रपट खुपच सुंदर होता. घरातल्य़ा पैशांनी संततीनियमनाची साधनं आणुन वाटली, आणि जागरुकता निर्माण केली त्यांनी.

   • Nikhil Sheth says:

    एका इतिहासाकारांशी एकदा बोलत होतो…त्यांनी सांगितले की प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या काळाचा बंदी असतो. आणि त्यातूनही कोणी जर पल्याडचे पाहू शकला तर त्याला द्रष्टा म्हणतात…ही कॉमेंट इथे बरोब्बर लागू पडते नाही का? दोष लोकांचाही नाही कारण त्यांना त्याकाळच्या समजेच्या बाहेर जाऊन विचार करणे शक्य नव्हते. ज्याने केला त्याला त्याच्या कारकीर्दीमध्ये त्रास सहन करणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात जेव्हाकेव्हा त्याच्या कामाचे अप्रिसिएशन करण्यापर्यंत समाजाची पोच जाईल तो त्याच्या भाग्याचा दिवस. जसे की महात्मा फुल्यांचे स्त्री-शिक्षणाचे कार्य. तसेच कर्व्यांचेही…

 12. ‘ध्यासपर्व’ नाव त्या चित्रपटाचं.. अप्रतिम चित्रपट. अमोल पालेकरचा.. आणि लज्जाही वाचलंय मी .. पण बाकीची कुठलीच वाचली काय ऐकलीही नाहीयेत. आता वाचतो डाऊनलोड करून एकेक.

  • Shaikh says:

   ध्यास पर्व मला पण बघायचा होता. राहुन गेला. आता सिडी मिळते का ते बघतो.

 13. abhijit says:

  he pustake tar vachun kadhatoch.
  ajun kahi astil tar te hi sanga mala. malkhare_555@yahoo.com
  mala nakki sanga ani site hi sanga.please.
  thank you.

  • अभिजित
   मला जितकी माहिती होती तितकी जवळपास सगळीच कव्हर केली आहेत वरच्या लेखामधे. पहिल्यांदा ब्लॉग वर कॉमेंट टाकलीत.. धन्यवाद..
   अजुनही काही पुस्तकं लक्षात आली तर नक्कीच इथे एक नविन पोस्ट असेल त्यावर..

 14. Abhijit says:

  MAHENDRA KULKARNIJI,

  MAST MAST MAST LEKH…. MARATHI PUSTAKE ONLINE WACHANYASATHI KAHI SITE CHI NAWE DILET TAR FAR CHANGLE HOIL. APALYA PRATUTTARACHI WAT PAHAT AHE. AABHAR.

 15. य३ says:

  अरे देवा हे http://tinyurl.com/y96x3as कोणत्या भाषेत आहे?

  • चुकीची लिंक आहे ती. बहुतेक जर्मन आहे. तुम्ही नेट वर गुगल कराल तर इंग्रजीपण सापडेल.

 16. raju says:

  site pahun thodi exitment ali ani sarv kame zali

 17. ARUN says:

  120 days of sodom he pustak mala vachayach aahe hi web side baddl mala aajach kalal aahe

 18. sonali mohite says:

  mi lazza ya vishyavar avdhi pustke vacli ahet ki mala hi halki phulki vatatat. mala mnovaidnaanik vhacay mhanun mi asli pustke vact rahte. tumhi lihile he chan hot .

 19. तुम्ही हा लेख लिहून पुस्तक प्रेमीसाठी खूप मोठे काम केले आहे….तुमच्या बऱ्याच चांगल्या वा उपयुक्त लेखामध्ये याचाही नंबर लागेल…(मला लोकप्रिय नाही म्हणायचे.)

 20. SD says:

  Mala Aarya Chanakya sandarbhat marathi pustaka havi aahet. konal link’s maahiti aahet ka?

 21. Mrunal says:

  Kaka,
  Hi sagali pustk marathi made nahith ka? asel tar pl. mala site sanga.

 22. Nilesh says:

  mala marathi pustkanhya link havya aahet.

  aani tumi dilelya link kup chan aahet pan mala please marathi translate havya aahet miltil ka ?

  i like your blog

  • मराठी पुस्तकं नेट वर उपलब्ध नाहीत. मला वाटतं की यातली काहीच पुस्तकं ट्रान्सलेट झालेली नाहीत मराठीमध्ये . त्यामुळे इंग्रजीपुस्तकांवरच काम चालवून घ्यावे लागेल.

 23. ashok kulkarni says:

  aamchya velechi khari ashlil kadambari, ji ban zali navati, Irwing Wallace chi “Fan Club”. Vachun paha.

  • Ashokl
   Fan club.. page not 273 to 370.. , when they all commit a rape (including Rat) ………………..!!( WHy I remember those pages because i have read them repeatedly 🙂 ) Thanks… You only remided me of good old days 🙂

 24. Gurunath says:

  नाझी भस्मासुराचा उदयास्त मधे वि.ग.कानिटकरांनी हिटलर छानच अभ्यासलाय….

  त्यांच्या म्हणण्या नुसार जर… लॉइड जॉर्ज ,चेंबर्लेन, क्लेमेनो…. ह्या प्रथम विश्वयुद्धातल्या महारथींनी
  युद्ध झाल्यानंतर….. व माइन कांफ लिहिल्या गेल्या नंतर…. हे पुस्तक वाचले असते तर दुसरे युद्ध झालेच नसते….

  पण….. हे सगळॆ, भूमध्य समुद्र, पॅलेस्टाईन चे तुकडे वगैरे मधेच जास्त गुंतले

  • बरोबर आहे. मी पण माइन काफ वाचलं होतं. शाळेत असतांना… 🙂
   हिटलर कसा तयार झाला ते फार सुरेख लिहिलं आहे त्यात.

 25. Shankar Dhongade says:

  Sir,I like to read books.Can u tell me where can I completed my hobby?

 26. pradeep says:

  आमार .. जाउ दे माझं कुंवारपण hey tumcya blog var vacale aani mala hey pustak vacayce aahe plz. link asel tar mala send kara

 27. ankur says:

  आमार .. माझं कुंवारपण hey tumcya blog var vacale aani mala hey pustak vacayce aahe plz. link asel tar mala send kara…..hindi madhli link asel tari chalel

  • अंकुर
   उत्तर देण्यास उशिर होत आहे, त्याबद्दल क्षमस्व. मी गेले काही दिवस कामानिमित्य टुर वर असल्याने उत्तर देणे झाले नाही. त्या पुस्तकाची लिंक माझ्याकडे नाही.

 28. अशोक पाटील says:

  फार आनंद झाला मूळ लेख आणि त्यावरील तितक्याच भरघोस प्रतिक्रिया वाचून. लेखन स्वातंत्र्याचे महत्व या लिखाणातून छानपैकी प्रतीत होत आहे.

  अश्लिल आणि बिभत्स यातीला सीमारेषा ओळखण्याचे स्वातंत्र्य खरे तर (प्रगल्भ म्हणू या हवे तर) वाचकाकडे असतेच. हकनाक बंदी घालून त्या पुस्तकांचा एकप्रकारे आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास टीआरपी वाढला जातोच. इंग्लंडने १९६० मध्ये “लेडी चॅटर्लीज लव्हर” वरील बंदी उठविली त्याबाबतने बीबीसीने बातमी देताच पिकॅडिली चौकातील पुस्तकांची दुकाने गर्दीने ओसंडून वाहू लागली होती. पेंग्विनने कित्येक दशकात केला नसेल इतका व्यवसाय त्या एका आठवड्यात केला होता. मेट्रो प्रवासात तर प्रत्येक पॅसेन्जरकडे त्या कादंबरीची प्रत असायची.

  अमेरिकेतही लेखन स्वातंत्र्य ही जन्मजात हक्काची देणगी आहे असे तेथील रायटर्स गिल्ड मानते. कोणत्याही पुस्तकावरील बंदीचे तिथे समर्थन होत नाही. “लेडी चॅटर्लीज लव्हर” वरील बंदी नजरेसमोर धरूनच आयर्विंग वॅलेसने लिहिलेली ‘सेव्हन मिनिट्स’ ने विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले होते. फार वेगवान कथानक असलेल्या या प्रदीर्घ कादंबरीत लेखन स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याचे आढळते.

  अशोक पाटील

  • अशोकजी
   ब्लॉग वर स्वागत.. सेव्हन मिनिट्स हे पण एक चांगलं पुस्तक आहे. मी वाचलंय ते पण.
   प्रतिक्रियेसाठी आभार..

 29. क्या बात है…. अतीव सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

  धन्यवाद आणि शुभेच्छा

  धोंडोपंत

 30. vijay says:

  इथे दिलेल्या पुस्तकांचे मराठी किंवा हिंदी अनुवाद मिळाले तर खूप बरं होईल

 31. शैलेश says:

  फारच छान
  मला काकोडकरांच्या शामा कादंबरीची लिंक किवा सोफ्ट कॉपी भेटेल का .

 32. satyavan thakar says:

  Sir password Magt ahe
  Tysathi Kay karayche

 33. ऋषभ टांककर says:

  Mine kamph ani Nazi bhasmasuracha udayast doghanchi link having aahe bhetel ka

Leave a Reply to abhijit Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s