खोटे फोटो सकाळमधे…

शेरिल की कतरिना??

काल दुपारी एक मेसेज आला सागर कडून- की शेरिल चा फोटो एका पेपरमधे  एका बातमी मधे  चक्क कतरीनाचा म्हणुन वापरलाय. मी तेंव्हा जामनगरला होतो , आणि दिवसभर कामात असल्याने मला काही तो फोटॊ पहाता आला नाही. रात्री एअरपोर्टवर फ्लाईट चांगली दोन तास लेट झाली, तेंव्हा लॅ्पटॉप सुरु केला आणि पेपर मधला तो फोटॊ पाहिला.

आपल्या सारख्या सामान्य माणसाचा पेपरमधे येणाऱ्या बातम्यांवर विश्वास बसतो -पेपरमधे येणाऱ्या बातम्या   नेहेमी खऱ्या असतात असा विश्वास असतो.   पण थांबा!!!!  या पुढे कुठलीही बातमी किंवा फोटॊ दिसला तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी  कमीत कमी शंभर वेळा तरी   विचार करा- विशेषतः बातमी सकाळमधली असेल तर!!

कांही शिष्ठ संमत नियम असतात, की   की एखाद्याचा फोटो जर तुम्हाला वापरायचा असेल तर त्याची परवानगी घेणे/ त्याला रॉयल्टी देणे हे बंधनकारक असते. एखाद्याच्या फोटो मधे आपल्या मनाप्रमाणे हवे तसे बदल करुन पब्लिश करणे हे कुठल्याच कायद्यामधे बसत नाही .

कतरिना कैफ ने ऑटॊ रिक्षाने प्रवास केला  असं कोणीतरी संपादकाला किंवा एखाद्या पत्रकाराला सांगितलं… त्याने काय करावे?? फोटो नाही?? अरे काय हरकत आहे- नाही तर नाही, फोटो शॉप आहे ना, सरळ एखादा नेट वरचा  फोटो उचलायचा आणि त्यावर जो हवा तो चेहेरा चिकटवला की झालं.कतरिना कैफ हीने ऑटो रिक्षाने प्रवास केला अशी बातमी द्यायची !! झालं! इथे आहे ती सकाळची बातमी.

अगदी असंच केलं  सकाळने.   कदा्चित त्यांना वाटलं असावं कोणाला समजणार आहे की तो फोटॊ  कतरिनाचा नाही म्ह्णून! पण त्यांचे नशीब खराब. माझ्याच  ब्लॉग वर  तर व्हाइट इंडीयन हाउस वाईफ १३२२ वेळा वाचलं गेलंय, आणि शेरील्च्या ब्लॉगवर तर नक्कीच भरपूर वेळा वाचलं गेलं असेलच, म्हणुनच सागरच्या लगेच लक्षात आलं की हा फोटो शेरिलचा आहे म्हणून, आणि त्याने मला सांगितलं या बद्दल..

मॉर्फिंग करुन फोटॊ वापरणे ज्या व्यक्तीचा फोटो आहे तिची परवानगी पण न घेणे हा एक   उद्दामपणा आहे. सकाळच्या साईटवर जाउन हा फोटॊ मुळ कुठला आहे याची माहिती टाकली तर कॉमेंट अप्रुव्ह केलेली नाही- म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की   आम्ही काय हवं ते करु, तुमच्याक्डून जे होईल ते करा- ्ठीक आहे.. त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल अर्थात  शेरिलकडुन कदाचित लिगल केस सुध्दा करु शकेल ती!!

इतक्या थर्ड ग्रेडची पत्रकारिता आजपर्यंत मी तरी कुठेच पाहिलेली नाही. सकाळचा या साठी जाहीर निषेध करायलाच हवा. मी स्वतः तिला ( शेरिल ला)  कुठे कुठे (http://presscouncil.nic.in/)  कम्प्लेंट द्यायची याची माहिती देतोय.. बघू या काय होतं पुढे ते. प्रेस काउन्सिल ला कम्प्लेंट केल्याशिवाय पेपरवाले  काही सरळ येत नाहीत.

या लेव्हलला सकाळ जाउन पोहोचेल असे कधीच वाटले नव्हते- ( आता तुम्ही म्हणाल पोहोचायची गरज आहे कां?? असो..) . फोटो मधे शेरिल चा चेहेरा मॉर्फिंग करुन कतरीना सारखा दिसावा असा केला गेला आहे पण ते अजिबात जमलेलं नाही. ऑटो रिक्षावरचा एक नंबर पण चेंज केलाय, केसांचा रंगही बदलाय.

ही   बातमी वाचल्यामुळे आता पेपरमधल्या बातम्यांवर  त्यातल्या त्यात सकाळ वर कितपत विश्वास ठेवायचा- यावर पण आता एक मोठं प्रश्नचिन्हच आहे. पत्रकारीता ही पीतपत्रकारीता होते आहे याचं वाईट वाटतं.. असो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

43 Responses to खोटे फोटो सकाळमधे…

 1. Ajay says:

  mi hi tya batmi var sakal la reply takla, tyani majhi comment apprive keli nahi. yana dhada shikvalach pahie. sakala sarkha navajlel lok sudha asa kahi kartat he pahun dhakka basla…

 2. Nikhil Sheth says:

  महेंद्र सर, सकाळ कडून या अपेक्षा खरच नव्हत्या…पुण्यात तरी सर्वत्र ‘सकाळ-सकाळ’चा नारा असतो…लोकांना खरच धक्का बसेल…परवाच आपण माईन काम्फ बद्दल बोलत होतो त्यातच हिटलर चे वाक्य आहे त्याच्या उमेदवारीच्या काळातले – पेपर वाचणाऱ्या लोकांचे ३ वर्ग असतात. सगळ्यात मोठा वर्ग – जे छापील ते प्रमाण मानणारा, दुसरा – जे जे छापतात त्यामागे काही ना काही हेतू असतो त्यामुळे सगळे डीस्टोर्टेड ट्रुथ आहे असे मानणारा. आणि अल्पशा प्रमाणात असे लोक असतात ज्यांना ‘बातमी’ आणि ‘मत’ यातला फरक कळतो आणि ते मतामागची बातमी वाचतात. असो. तरीही मला शंका आहे की असल्या बातम्यांना कोणी सिरीयसली घेत असेल….

  • पुण्याचा सगळ्यात विश्वासु पेपर म्हणुन हा पेपर ओळखला जातो. पेपर वाचणारे जे तिन वर्ग आहेत, त्या मधे आज पर्यंत मी पाहिलया वर्गात होतो. जे छापलं जातं ते मानणारा. पण आता मात्र हे सगळं डीस्टॉर्टेड ट्रुथ आहे असं वाटतं..

   आता राहिला दुसरा मुद्दा.. अशा बातम्यांना सिरियसली कोण घेतो?? तर मला असं वाटतं की आज ही सिनेमावरची बातमी आहे , उद्या दुसरी पण बातमी अशीच असली तर??

 3. Pushpraj says:

  100% fake aahe he.me sudha kalach ha photo sakal madhe pahila aani amachya designer la vicharale aani tine sudha sangitale ki hi modified image aahe.hyaaa sakal walyanan nakkich dhada shikvala pahije…..

  • प्रकाश
   इथे हे असं करावंस कां वाटलं असावं पेपरला?? फक्त बातमी देणं हेच महत्वाचं असतं कां? या पेक्शा शेरिलवरच जास्त इंट्रेस्टींग आर्टीकल होऊ शकलं असतं..

 4. vikram says:

  मी सकाळ ला प्रतिक्रिया दिलीय या खोटेपणाबद्दल पाहू नोंदवून घेतात का ते
  सकाळ चा खोटेपणा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद काका

  • विक्रम
   धन्यवाद.. सांभाळुन उद्या टेररिस्ट म्हणुन तुमचा/माझा फोटो पण छापला जाईल कुठे तरी.. 🙂

 5. सकाळ्चा धिक्कार असो. माझ्यामते बर्‍याच लोकांनी आपला निषेध नोंदवला असावा आत्तापर्यंत पण तो दिसणार नाही याची फुल्ल गॅरेंटी 🙂 माझ्याकडे दिला असता फोटोशॉप करायला तर याच्यापेक्षा नक्कीच चांगला केला असता 🙂

  • अगदी मान्य . अतिशय सामान्य काम केलंय फोटो शॉप मधे .केवळ गाल थोडे शेप बदलला, आणि जास्त गोरी केली बस्स..

   त्यांनी जे केलंय तो एक सिरियस ऑफेन्स आहे.

 6. tejas says:

  sarvane ch sakal la pratikiya dya, mhanaje tyana samjel
  ashya situation saathi ekach format madhye pratikiya nondavalya tar jast bare padel.

  • तेजस
   प्रतिक्रिया पब्लिश केल्या जात नाहीत सकाळवर. हाच तर प्रॉब्लेम आहे, म्हणुन तर इथे हे पोस्ट लिहिलंय.. जर तिथेच कॉमेंट पब्लिश झाली असती तर हे पोस्ट लिहिलं पण नसतं..

 7. Vidyadhar says:

  Dhanyawaad kaka,
  Nehemipramanech mahitipurna lekh. Bara aahe ghari sakaal yet naahi.

 8. महेंद्र,
  एक म्हणजे ही चूक मान्य. ती दुरूस्त केली आहे. दैनिकाच्या रोजच्या पसाऱयात असं अनावधानानं घडतं. अर्थातच, ते लक्षात येताच दुरूस्तही केलं जातं. परत न घडण्यासाठी काही उपायही केले जातात. तेही आता केलेले आहेत. त्यामुळं परत हीच चूक होण्याची शक्यता अगदीच कमी.

  आता, पुष्पराज वगैरेंच्या भावना थोड्या तीव्र आहेत. धडा शिकवणं म्हणजे काय, हे नाही समजलं. एखाद्या कंपनीत जसे आर्टिस्ट असतात, फोटोग्राफर असतात, तसेच ते दैनिकातही असतात. एखाद्या कंपनीच्या एखाद्या प्रॉडक्टमध्ये एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम राहू शकतो. तसाच तो दैनिकातही राहतो. तो खुल्या मनानं स्विकारून दुरूस्त करणं आणि वाचकांशी बांधिल राहणं, हे सकाळ करतो. करत राहील.

  विद्याधर, सकाळ घरी येत नाही, हे काही फार चांगलं आहे, असं मला नाही वाटत. म्हणजे मी फक्त सकाळमध्ये किंवा ई सकाळचं काम पाहतोय, म्हणून नव्हे. पण, संस्कारक्षम माध्यमापासून आपण दूर राहणं, हे आपल्या हिताचं नसतं.

  असो. बाकीच्या प्रतिक्रिया आवडल्या.

  महेंद्र, हे सगळं मनापासून आवडलं. सकाळवरच्या प्रेमापोटी इतकं लिहिलंत. म्हणून आवडलं.

  धन्यवाद.

  • सम्राट
   प्रतिक्रियेकरता आभार.
   खरं सांगायचं तर काल जेंव्हा हा फोटो पाहिला तेंव्हाच प्रतिक्रिया टाकली होती सकाळवर. पण आज सकाळपर्यंत पब्लिश झाली नव्हती. तसेच बऱ्याच लोकांनी पण ही प्रतिक्रिया टाकली होती.. ती पब्लिश न झाल्यामुळे इथे ब्लॉग वर हे पोस्ट लिहावं लागलं.

   जर सकाळने खुल्यामनाने कॉमेंट्स स्विकारुन पब्लिश केल्या असत्या आणि दिलगिरी व्यक्त केली असती, तर हा विषय इतका चिघळलाच नसता.. असो..

   इथे येउन मुद्दाम प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार..

   • आणखीन एक मुद्दा राहिला लिहायचा. की उद्या जर एखाद्या टेररिस्टचा फोटो म्हणुन एखाद्या सामान्य माणसाचा फोटो छापला गेला तर काय गोंधळ उडेल नाही??
    थोडं जास्तंच कॉशस रहायला हवं पेपर्स पब्लिर्सनी.

   • महेंद्रजींच्या या मुद्द्याशी सहमत. सकाळमधे प्रतिक्रिया प्रसिद्ध केली जात नाही.

 9. काय हे..मला सकाळीच पोस्ट मेल आली होती शेरिलच्या पोस्ट ची….
  तेव्हाच कॉमेंट टाकली होती सकाळला पण अफसोस..पब्लिश नाही केली गेली. वाटला होता लगेच दिलगिरी व्यक्त करतील पण नाही…खरच याची प्रेस काउन्सिलला तक्रार करायला हवी…

  • मला पण तेच म्हणायचंय. चुका होतातच, पण झालेली चुक मान्य करुन दुरुस्त केली असती तर जास्त योग्य ठरलं असतं..

 10. छायाचित्रांच्या बाबतीत सकाळची फसगत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 9/11च्या हल्ल्यानंतर एका माणसाचे छायाचित्र छापले होते शेवटचे म्हणून. त्यावेळी सकाळने दिलगीरी व्यक्त केली होती. यावेळेस काय झाले काय ठाऊक?

  बातम्यांच्या बाबत म्हणाल तर विधानसभा निवडणुकानंतर बातम्या हा शब्द बाता-म्या असाच लिहावासा वाटतो.

  • ते छायाचित्र मला पण मेल मधे आलं होतं. पर्फेक्ट फोटॊ शॉप चा नमुना होता ते चित्र. तो मुलगा फोटो काढतोय, आणि मागुन प्लेन येतंय असं काहीसं होतं ते… 🙂
   या वेळेस पण करतिलच.. चुक मान्य केल्याने कोणी लहान होत नसतो.. उलट दाबुन टाकायचा प्रयत्न केला तर इशु जास्त फ्लेअर अप होतो. असे मला वाटते.

 11. bhaanasa says:

  सकाळला वाटते की लोकं फक्त त्यांच्या पेपरमध्ये जे येईल तेच वाचतात बाकी अंधार. धन्य आहेत. महेंद्र, सकाळवाले अनेकदा प्रतिक्रिया छापत नाहीतच. सरळ सरळ चोरी आणि तीही अतिशय भोंगळपणे केलेली. बरे झाले तू लिहीलेस.

  • त्तिचा तो फोटो तर खुप लोकांनी पाहिला असेल. मला पण सागरने सांगितले म्हणुन कळले. मी सकाळ नियमीत वाचतो . पण हे सिनेमाचे पान वाचायचे टाळतो.

 12. सम्राट फडणीस यांची प्रतिक्रिया वाचली. ब्लॉगवर येऊन चूक मान्य करण्यापेक्षा पेपरमध्येच छापून सगळ्या जगासमोर ती मान्य करायला नको का? आणि मीही त्या बातमी खाली प्रतिक्रिया दिली होती. आणि अर्थात इतर सगळ्यांप्रमाणेच माझीही प्रतिक्रिया आलेली नाही. याबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं? आणि “वा वा” “छान छान” वाल्या इतर २ फुटकळ प्रतिक्रिया मात्र दिल्या आहेत. त्याचं काय?

  • हेरंब
   तिच्या ब्लॉग वर जाउन माफी मागायला हवी- तसेच पेपर मधे पण प्रसिध्द करायला हवी माफी.. तिने लिहिलेल्या बातमीचे ट्विट जवळपास १४ वेळा रिट्विट झालंय म्हणजे ही बातमी जवळपास २५ हजार लोकांनी तरी पाहिली असेलच. माझ्याच ब्लॉग वर काल ‘१२३१ लोकांनी हे आर्टीकल वाचलं. 🙂
   ती नक्कीच करणार तक्रार प्रेस काउन्सिल कडे ह्यात अजिबात संशय नाही.

   • विषयांतर : तुम्हाला हे प्रत्येक लेख किती वेळा वाचला गेलाय हे कसं कळतं? आय मिन असा काउंटर कुठे असतो का कुठे?

    • वर्डप्रेस मधे ती सोय आहे. कालचा ब्लॉग ची वाचक संख्या ही १३२१ आहे- ( आजपर्यंत सगळ्यात जास्त) . वर्डप्रेस मधे ब्लॉग स्टॅट्स वर क्लिक केले की वाचक संख्या समजते..

 13. Aparna says:

  ह्म्म्म्म्म्म…आता पुन्हा एकदा पटतंय सकाळ मुंबईत वाचला जात नाही ते बरंच आहे….मी तिथे असतानाही कधी सकाळ वाचत नव्हते ना कधी ऑन-लाईन..पण हे काम ते एखादं फ़ोटोशॉप इ. वापरुन खरीच कतरिना दाखवुन (तिच खोटी) बातमी बनवु शकले असते…हे हे…
  आता निदान शेरिलची जाहिर माफ़ी तरी मागतील आणि तिच्या ब्लॉगचीच (खरी) माहिती टाकतील ही अपेक्षा करायची का??

  • पुण्याला तर खुप पॉप्युलर आहे हा पेपर. मी पुण्याला काही वर्ष होतो तेंव्हा रोज वाचायचॊ.

   एखादा फोटो डिस्टॉर्ट करुन छापण हा खुप मोठा फसवणूक करण्याचा प्रकार आहे आणि सकाळसारख्या प्रतिष्ठीत पेपर कडुन तो अपेक्षीत नाही.

   माझ्या घरचे तिन लोकं पत्रकारीते मधे आहेत. काकांना विचारलं तर म्हणाले खुप सिरियस इशु आहे हा.. इतका लाइटली घेउन चालणार नाही पेपरला. काका पुर्वी इंडीयन एक्स्प्रेस मधे २० वर्ष फ्रंट लाइन पत्रकार म्हणुन काम करायचे ( विद्याधर गोखले अरुण शौरी असतांना ) असो..

 14. Sagar says:

  Kaka
  Maz Nav postvar aalymaule ugich bar vatal mala.. 🙂

 15. कुलकर्णी साहेब, ही माहिती इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. मीही परवाच Buzz वर ह्याबद्दल वाचले होते. पण सकाळवर प्रतिक्रिया देणे जमले नाही.

  फडणीस साहेब बहुधा सकाळचे सहसंपादक आहेत. त्यांनी सकाळची चूक मान्य केली हे चांगले. पण त्याचा काही फरक पडला हे दिसत नाही. कारण त्यानंतर दोन दिवसांनीही ती बातमी सकाळवर तशीच आहे. काहीही स्पष्टीकरण न देता.
  आणि पुष्पराज ह्यांच्या प्रतिक्रियेला त्यांनी दिलेले उत्तर न पटण्यासारखे आहे. प्रॊडक्टमध्ये प्रॊब्लेम राहू शकतो मान्य. पण एखाद्या जबाबदार वृत्तपत्राने अशा चुकीच्या गोष्टी छापणे व ती उघडकीस आल्यानंतरही आणि एरवी कोणतीही बातमी ५ मिनिटांत त्यांच्या संकेतस्थळावर येत असताना, २ दिवस झाल्यानंतरही ह्या गोष्टीवर काहीच न करणे, ह्याचं स्पष्टीकरण ही त्यांनी द्यावे असे वाटते.

  • देवदत्त
   मी पण आजच पाहिली ही बातमी पुन्हा एकदा. अजुनही तो फोटो तसाच आहे सकाळवर. खरंच काय म्हणावं त्यांना हेच समजत नाही.

   प्रेस काउन्सिल हे एकच उत्तर होऊ शकत!! प्रेस काउन्सिलला लिहिलं की ते एखाद्या महिन्यात ऍक्शन घेतात. ,लोकं ब्लॉग वर लिहितात ते एक हॉबी म्हणुन.. कोणाला इतका वेळ आहे यावर खर्च करायला?? आणि म्हणुनच फावतं या लोकांचं.. असो.. प्रतिक्रियेकरता आभार..

 16. Pingback: Miss Malini » Blog Archive » Faking It! Marathi paper photoshops their Katrina-spotting.

 17. धक्कादायक, सकाळकडुन अशी अपेक्षा नव्हती…

 18. shraddha says:

  kharach kay murkha pan aahe ho …. tumhi he blog var taakun ekdam uttam kela aahe … ani sheril ni kharach motti case keli pahije …. katrina chi Jirel , sakal chya patrakarachi pan ani Sheril che naav hoil he nakki ….

  • अजुन एका पेपरवर हाच फोटो वापरलाय.तिच्या ब्लॉगची पॉप्युलरीटी मात्र खुप वाढेल हे नक्की. तिने प्रेस काउन्सिल कडे गेलं तर काही तरी होऊ शकतं. नाहीतर हे गेंड्याच्या कातडीचे पेपरवाले काही माघार घेणार नाहीत.

 19. farengi indophile says:

  The editor should properly, PERSONALLY apologize to the good woman whose face was photo-shopped onto the body of another. It’s a matter of honor and integrity, as she has taken offense to the photo. Apologizing on a Marathi blog just is not sufficient.

  • I respect and agree your views on the issye.
   She is my good friend, and i have suggested her to complain to press council. The news papers in India is afraid of only Press Council Of India, and no body else. Even after apologizing on this blog, the photo graph is still being used on the Paper. They are absolutely shameless third grade people working in Sakal News Paper!!!

 20. ngadre says:

  खूप महिन्यांनी कॉमेंट टाकतोय यावर. आता ती अप्रस्तुत आहे.

  पण इतक्या चर्चेत मिस झालेसे वाटणारे दोन मुद्दे:

  १) चूक मान्य करताना सकाळच्या प्रतिनिधी साहेबांनी जी भाषा वापरली आहे ती म्हणजे जणू नजरचुकीने किंवा टायपो एरर मान्य केल्यासारखी आहे. In contrast, ही एक well plaaned, deliberate, manupulative एक्शन आहे जी नक्कीच सकाळच्या नेहमीच्या कार्य पद्धती विषयी शंका उत्पन्न करेल.

  २) शॅरेल (मला वाटते शेरील नसून खरा उच्चार शॅरेल आहे) ला या बाबतीत पूर्ण सपोर्ट आहे. पण… कतरिना जरी “नटी” असली तरी तिचेही यात प्रतिमाहनन आहेच. तिचं डोकं चिकटवलंयच ना खोट्या फोटोत? तिला कोणीच सपोर्ट करत नाहीयेत जनरली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s