आठवं आश्चर्य.. स्टेप वेल..

अहमदाबाद ला एअरफोर्स च्या ऑफिस मधली मिटिंग आटोपून पुन्हा हॉटेलवर निघालो, तर सहजच  ड्रायव्हरला विचारलं की इथून अडलज किती दुर आहे, तर तो म्हणाला की बस ८-१० किमी होगा- म्हंटलं चलो, कारण अशी संधी म्हणजे दुसऱ्या मिटींगसाठी दीड तास होता, म्हंटलं या वेळाचा सदुपयोग करुन घ्यावा. या वेळेसची गुजराथ टुर खूप इव्हेंटफुल झाली. बिझिनेस विथ प्लेझर म्हणता येइल त्याला.अहमदाबादची दोन प्रेक्षणीय स्थळं पाहिलीत- जी आजपर्यंत अहमदाबादला अनेक वेळा येउन सुध्दा , गेल्या कित्येक वर्षात बघितली गेली नव्हती. एक म्हणजे इ.स. १५०१ मधे बांधलेली विहीर, आणि दुसरी म्हणजे त्याच सुमारास तयार करुन  सिद्धि सैय्यद ची मस्जिद वर बसवलेली  दगडाचे कोरीव काम करुन बनवलेली जाळी.

ही विहीर म्हणजे अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना म्हणावा लागेल. आज पर्यंत अहमदाबादच्या लोकल लोकांना विचाराल, की यहा साईट सिइंगके लिये क्या है? तर उत्तर ठरलेलं असतं- बापू का आश्रम, अक्षरधाम और शॉपिंग मॉल्स . आता हे बा्पू का आश्रम, दांडी ब्रिज वगैरे ठीक आहे पण शॉपिंग मॉल -साईट सिइंग साठी?? ईट्स टू मच!!!बापू चा आश्रम मी अजूनही बघितलेला नाही- पुढल्या वेळेस नक्की.  पण या वाव बद्दल कोणीच काही बोलत नाही. संपुर्ण पणे दुर्लक्षित झालेली आहे ही विहीर.

अडलजच्या ह्या विहिरीला गुजराथी मधे वाव असे म्हणतात.राणी रुदाबाई हिने इ.स. १५०१ साली ही पाच मजली विहीर बांधून काढली. डायरेक्ट वॉटर टेबलवरच खोदकाम केल्यामुळे विहिरीला नेहेमीच पाणी असतं. पाण्याची लेव्हल की पावसावर अवलंबून असते. जमिनी खाली पाच मजले कोरीव काम केलेली ही वाव म्हणजे अप्रतिम वास्तुशास्त्राचा एक नमुना आहे.इथे विहिरीच्या भिंतीवर जागो जागी देवतांच्या मुर्त्या आहेत. असं म्हणतात , की पूर्वीच्या काळी इथे लोकं सकाळी पाणी भरण्यासाठी यायचे, तेंव्हा या देवतांची पुजा करायचे.

या वाव मधे सुर्यप्रकाश हा पोहोचत नाही, त्यामुळे गुजराथच्या रखरखीत उन्हाळ्यातही इथलं तापमान हे बाहेरच्या तापमाना पेक्षा ७ ते ८ डिग्री ने कमी असते. नॅचरल एअर कंडीशनींग म्हणा हवं तर!! या विषयी जास्त लिहिण्यापेक्षा सरळ व्हिडीओ अपलोड करतो म्हणजे या वाव च्या अप्रतिम आर्किटेक्चरची कल्पना येईल वरुन पाहिल्यावर लक्षात येत नाही, पण खाली उतरलं की ही विहीर अष्टकोनी असल्याचे लक्षात येते.या व्हिडिओ व्यतिरिक्त काही फोटो पण काढले आहेत ते पण इथे पोस्ट करतोय.. हे पोस्ट नुसतं फोटो पोस्ट होणार असं दिसतंय.. असो..

विहीर बघून झाल्यावर  परत रुमवर येतांना ती बहुचर्चित सिध्दी सैय्यदची मस्जिद वर बसवलेली जाळी दिसली. आजपर्यंत अनेक वेळा याच रस्त्याने गेलो असेन पण कधीच थांबून पाहिली नव्हती ही जाळी. आता या वेळेस मात्र आवर्जून थांबलो बघायला.अहमदाबादची आठवण म्हणून चांदी मधे बनवलेली ह्या जाळीची प्रतिकृती विकत मिळते. असं म्हणतात, की ही जाळी तयार केल्यानंतर बादशहाने, त्या कारागिराचे हात कापून टाकले होते- त्याने पुन्हा अशी जाळी बनवू नये म्हणून, असं म्हणतात!! इथे आहे बघा फोटो त्या जाळीचे. इतके कोरीव काम बारकाइने केले आहे की पाहून नवलच वाटतं.

सिध्दी सैय्यद ची जाळी मशिदीचा मागचा भाग

अहमदाबादला काय पहाण्यासारखं आहे म्हणुन मला विचारलं तर मी नक्कीच स्वाती रेस्टॉरंटचं नांव घेईन. पण त्यावर नंतर कधी तरी गुजराथची खाद्ययात्रा लिहायला घेइन  तेंव्हा लिहीन.  हे पोस्ट थोडं मोठं होतंय याची जाणिव आहे, पण नुकताच अंजार येथे जाउन आलो. अंजार म्हणजे जे गांव ९९ टक्के २६ जानेवारीच्या भुकंपा मधे नेस्तनाबुत झालं होतं , ते गांधीधाम जवळच गांव.

तेंव्हाच्या भुकंपामुळे अगदी प्रत्येक घर पडलं होतं . पण आता जेंव्हा तिथे गेलो होतो तेंव्हा मात्र एक नविन शहर वसवलेलं दिसलं. आणि तीच गोष्ट गांधीधाम ची. इथे आता नवीन वसवलेल्या गांधीधाम मधे चांगले १० पदरी रस्ते – आणि ते पण गावात बघुन आश्चर्य वाटते. अंजार हे प्रसिध्द आहे तिथल्या तलवारी, भाले,   अडकित्ता आणि सुरी या वस्तूंसाठी. तिथल्या एका दुकानात गेलो होतो  आणि एक सुंदर तलवार सिलेक्ट केली होती घेण्यासाठी. दुकानदार म्हणाला, फ्लाईटमे बॅगेजके साथ भी अलौड नही है. अगर ट्रेन से जानेवाले हो , तो ही खरीदो..त्या दुकानात एअर गन्स पण मिळतात- तिनशे फुट ते ८०० फुट रेंज पर्यंत. मला फ्रेडरिक फोर्सिथचं पुस्तक डे ऑफ द जॅकल आठवलं. दुकानदार म्हणाला, की या गन्सचं बॅरल बदलुन यांना रेग्युलर .३३ मधे बदलता येउ शकतं – आणि अतिशय  सोपं काम आहे हे कन्व्हर्शन.  हे काम यु पी मधे केलं जातं असं तो म्हणाला..

इथे जेंव्हा सगळं का्ही गावच नेस्तनाबुत झालं  होतं, तेंव्हा इथे टेंट मधे रहावं लागायचं.त्याच सुमारास काही एन जीओ नी लोकांना रहायला म्हणून कंटेनर्स पण दिले होते , त्याच कंटेनर्स मधे आता दुकानं सुरु केलेली आहेत. जेंव्हा भुकंप झाला होता ,  तेंव्हा पण एकदा येणं झालं होतं इथे तेव्हाची आठवण झाली.. इथे काही फोटो पोस्ट करतोय.

अंजार मधिल तलवारी, बंदुकांचं दुकान

दुकानातिल तलवारी वगैरे..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

47 Responses to आठवं आश्चर्य.. स्टेप वेल..

 1. मस्त..जायला हवा 🙂

 2. सचिन says:

  काका एकदम मस्त.जाऊन यायला हव एकदा.

 3. एक अप्रतिम स्थळ. माझ्या सारखा कपाळाकरंटा मीच. अहमदाबाद येथे माझी बहिण ३-४ वर्षे होती. केवळ एकदाच या दरम्यान मी ते ही फक्त दिड दिवस तेथे गेलो. भला मोठा प्रसस्त बंगल्यात ती रहात होती. मुख्यमंत्रांच्यां भावाचा तो बंगला ( बहिणीचा नवरा जेथे कामाला होता त्या कंपनीचा मालक, त्याने आपला बंगला ह्यांना रहायला दिलेला ). मुख्यमंत्री आणि माझी बहिण एकाच आवारात रहात. अगदी त्यांच्या बंगल्यालाच लागुन असलेला हा बंगला.

  पण नाही गेलो. मुंबईच्या येवढ्या जवळ असुन देखिल ,

  • हरेक्रिशनजी
   खुपच छान चान्स होता. अजुनही एखाद्या वेळेस मुद्दम जायला हरकत नाही. खुपच छान वाटतं ही वाव पहातांना. या व्यतिरिक्त मी काहीच बघु शकलो नाही. कामातुन वेळ उरला, तर कुठेतरी काही बघितलं जातं, अन्यथा नाही.
   धन्यवाद..

 4. bhagyashree joglekar kulkarni says:

  सही आहे.आम्ही आत्ताच मांडवगड(मध्यप्रदेश) ला जाउन आलो तिथेही अशीच तीन मजली बावडी आहे पण इतके कोरिवकाम नाही आहे आता ती पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे.कधी अहमदाबादला गेले तर नक्की बघेन.

  • भाग्यश्री
   मांडवगढला जाणं झालं नाही अजुनतरी. पण लवकरच जाइन. पुरातन विभागाकडे दिलं म्हणजे अजुन काही वर्ष तरी वाचेल ती विहिर..

 5. मस्त आहे “अडाळज नी वाव”. फोटोग्राफी विशलिस्ट मध्ये टाकली.

  • पंकज,
   अप्रतिम नमुना आहे कलाकारीचा. आता माझ्या एन ९५ ने घेतलेले फोटो आहेत हे. जर एस एल आर असता तर?? असं सारखं वाटत होतं.. 🙂

 6. salilchaudhary says:

  mala pan ek talwar vikat ghyavishi vaattey 🙂

  • सलिल
   इथे एक तलवार होती, बटन दाबल्यावर म्यानातुन बाहेर निघणारी – मला ती खुप आवडली होती. घेणार पण होतो.. विमानात आजकाल थोडं स्ट्रिक्ट झालंय म्हणुन दुकानदार नको नेउ म्हणाला, आणि तेवढ्यात बायकोचा रागावलेला चेहेरा पण नजरेसमोर आला, आणि म्हणुन ठेउन दिली.
   एअर गन पण छान होती.. 🙂

 7. Sagar says:

  Kaka
  Chan aahe he thikan as disatay……Pahayla aavdel…pan he tourist spot ka nahi?ka lok yabaddal nahi sangat?kahi vishesh karan?
  Baki Photot chan disatay tumhipan……

  • सागर
   लोकांन या बद्दल अजिबात फारसं अट्रॅक्शन नाही. कारण काय ते माहिती नाही. आम्ही पण गेलो होतो, तेंव्हा फारसे लोकं नव्हतेच तिथे..
   मी छान दिसतोय.. अरे काय चेष्टा करतोस की काय? 🙂
   अवश्य जाउन ये एकदा..

 8. Aparna says:

  काका विडिओमध्ये तुमचा आवाज आहे का?? छान माहिती पण घ्यायची ना background ला?? मस्तच आहे ठिकाण…त्या ‘पहेली’ चित्रपटात अशा विहीरींचा उल्लेख होता तेव्हापासुन इच्छा आहे. मला वाटतं राजस्थानात जास्त असाव्यात…माहित नाही नक्की पण योग आला तर नक्की पाहायला आवडेल..

  • हो,, मी आणि माझा मित्र होतो सोबत श्रीनिवास म्हणुन.फोटो त्याने काढले, व्हिडीओ मी घेतला.
   नंतर एक्स्चेंज केलंय. राजस्थानात खुप आहेत असं म्हणतात. मी फक्त राजस्थान बघितला नाही.. बाकी पुर्ण भारत पाहिलाय. आज गोव्याला जातोय. बहुतेक जमलं तर वास्कोचा कार्निह्वल अटेंड करीन. बघु जमलंतरच….

 9. सुरेश पेठे says:

  अप्रतीम,
  फॊटोज, व्हिडीयो क्लीप आणि तुमची वर्णन शैली ह्यामुळे जणू प्रत्यक्षच अनुभवतोय असे वाटत होते.हा अनुभव तुमच्या ब्लॉग वरून नित्य मिळत असतॊच !

  मार्च च्या पहिल्या आठवड्यात मुंबईला येणे होतंय ! भेटीचा काही चान्स? एखादी छोटी बैठक ठरवता येत असेल तर पहा म्हणजे सगळे भेटुया

  • मार्च मधे पहिल्या आठवड्यात?? बापरे , इतक्या दुरचं प्लॅनिंग मला करता येणार नाही- कारण मला कधीही टुरवर जावं लागतं!! पण बहुतेक त्यापुर्वीच मी पुण्याला एकदा येउन जाइन. तेंव्हा तुम्हाला मेसेज पाठवतो.

   अर्थात, मुंबईला पण भेटुच!! 🙂 फक्त खात्रीने सांगता येणार नाही आत्ता पासुन.

 10. खरंच सुंदर दिसतायत हे फोटोज मोठे केल्यावर. मी सकाळी बघितलं तेव्हा छोट्या फोटोंमुळे त्यांचं सौंदर्य कळत नव्हतं..

  • हेरंब
   आज सकाळी भाग्यश्रीच्या ब्लॉग वरचे फोटो पाहिले आणि लक्षात आलं की मोठे फोटो चांगले दिसतात, म्हणुन पुन्हा सगळे पोस्ट केलेत.

 11. bhaanasa says:

  महेंद्र, अरे कसली सुंदर आहे ही वाव. पाणी कितपत असत? खरेच एकदा जायलाच हवे हे पाहायला. वास्तुशास्त्राचा अप्रतिमच नमुना आहे. क्लासच. अनेक धन्यवाद, तुझ्यामुळे हे ठिकाण कळले. पोस्ट नेहमीप्रमाणे मस्तच.

  • पाणि १२ महिने असतं. जास्त पाउस झाला तर अगदी पहिल्या मजल्या पर्यंत चढतं पाणी . आम्ही गेलो तेंव्हा आम्हाला पाच मजले पुर्ण पहाता आले.

 12. Rajeev says:

  कोणी खड्ड्यात जा असे म्हणला की असा खड्डा असावा..
  तीथे जायला काही हरकत नाही….

  • मग एकटंच कशाला जायचं म्हणतो मी, कोणी कंपनी असली तर जास्त बरं.. आणि सोबत एखादी ….. छेः किती वाईट विचार तुझे.. अरे एखादी आरसी वगैरे असेल तर असं म्हणायचंय मला..

   • Aparna says:

    ha ha ha….tumhi dogha ekdam fundooo aahat….donhi comment wachun solid hasaley mi….

    • अपर्णा,
     आम्ही दोघं अगदी लंगोट लाउन फिरायचो तेंव्हा पासुनचे ( भाउ वगैरे म्हणण्यापेक्षा) मित्र.. बरीच टवाळकी केली आहे बरोबर आम्ही दोघांनी. 🙂

 13. Rajeev says:

  next time visit saarkhej…..

 14. Amol says:

  mala tumacha email id milel ka?

  tumhala kahi photo pathavayache aahet

  “12 motechya vihiriche”

  Hi vihir sataryajaval aahe

 15. वा! छान माहिती मिळाली. आमचा अहमदाबाद पाहण्याचा विचार आहेच. तेव्हा ही बाव नक्कीच पाहणार. आणि स्वाती हॉटेल बद्दल पण ऐकलं आहे. आता त्या पोस्टची वाट पाहतो आहे.
  -निरंजन

  • स्वाती हे लॉ कॉलेजजवळचं फक्त स्नॅक्स साठी प्रसिध्द हॉटेल आहे. तसे, सासुमा, दादीमा, वगैरे बरेच थाली रेस््टॉरंट्स आहेत. पण हे हॉटेल वेगळंच आहे.
   बरेच फोटो आहेत , पण खादययात्रा यावर एक पोस्ट नुकतीच झाली, म्हणुन टाकली नाही आता.

 16. mau says:

  खुपच छान आहे हि विहिर..अहमदाबाद च्या भयंकर उकाड्यात ही हे ठिकाण अगदी थंड असते.बापुजींचा आश्रम नक्कि पहा..अक्षरधाम चे मंदीर आणि एक्सिबिशन सहि आहे..किती वेळा पहा मस्त वाटते…आमच्या कदे जो पाहुणा येतो त्याला घेउन एक फ़ेरी आमची सुद्धा होते..अमरनाथ मंदिराचे ,वैष्णवदेवी चे मिनीअचर इथे उभारले आहे…पण कसे असते ना..जिथे पिकते तिथे विकत नाही…[:(] Rest ..post is as usual wonderful !!

  • गेले १५ वर्ष झाले अहमदाबादला नेहेमी येणं असतं, पण कामाच्या घाईत काहीच पहाणं होत नाही. एकदा अक्षरधाम पहाता आलं, तिथे पण एक एअरफोर्सचं ऑफिस आहे त्यांना भेटायला गेलो होतो तेंव्हा.
   वैष्णवदेवीचं मिनिएचर पाहिलंय, तसंच एक मुंबईला पण आहे.ही विहिर बाकी एकदम मस्त आहे, खुप छान वाटलं. बापुंचा आश्रम बघायचाय, पुढल्या वेळेस नक्की जाईन,! दांडी ब्रिज च्या जवळच्या मोठया ब्रिज वरुन बरेचदा प्रवास केलाय, पण थांबून त्या ब्रिज जवळ जाणं झालं नाही.

 17. वैभव, वैभव म्हणतात ते हेच! ही विहीर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा आणि कोरीव कामाचाअप्रतिम नमुना आहे.

  सिध्दी सैय्यदच्या मस्जिद वर बसवलेल्या जाळीवरची बारीक कलाकुसर फोटोमधेही लक्षात येते. (ह्या बादशहा लोकांना कारागिरांचे हात छाटून टाकणं, तेवढं बरं सुचायचं.)

  कंटेनर्स मधे दुकानं! छान उपयोग आहे. शस्त्र फ्लाईटने नेता येत नाही पण ट्रेनमधून घेऊन जाता येतं? वा!

  • अतिशय सुंदर आहे जाळी. अहमदाबादच्ं सोव्हिनिअर म्हणुन जसा आग्र्याचा ताज महाल देतात, तशीच इथे तशी चांदीची जाळी फ्रेम करुन देतात. . खुपच मस्त आहे.
   ट्रेनमधुन आणलं, आणि इथे पकडलं तर झालं!!! कारण, सहा इंचा पेक्षा मोठं शस्त्र बाळगणं हे कायद्याने गुन्हा आहे.

 18. Manmaujee says:

  निव्वळ अप्रतिम!!! एकदा तरी भेट द्यायला हवी.

 19. खरचं अप्रतिम कोरीव काम आहे.

  • १५ व्या शतकातली कारागिरी अजुनही चांगल्या स्थिती मधे आहे . खुप मस्त फिलिंग येतं तिथे गेलं की. 🙂

 20. vishal gunjate says:

  i want to know the phone or cell number of that sword shop owner.

 21. tejali says:

  wow kaka…basically photos takallyabaddal dhanyawaaad! ..me 2 da baghitaliye hi wihir…pan teva mhazyakade chaal cam nawata…so photos kadhana nahi aale..aaj punha athawani taajyaa zaalya:)..ata kharach eke diwashi fakt photos kadhayala tari jyala pahije as watayala laglay…:)

 22. Gurunath says:

  talvari chan aahet kalakusarichyaa

 23. Pingback: रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज | काय वाटेल ते……..

 24. ni3more says:

  kaka masta jaun yayala pahije hya thikani

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s