साउंड ऑफ म्युझिक …

मारीया!! नदीचं खळाळतं पाणी कसं वाहात असतं- कुठलाच धरबंद नसल्यासारखं? तसं व्यक्तिमत्त्व.कित्येक वर्ष मनामधे घर करुन बसलेली ही ज्युली कधी तरी रोजच्या जीवनात एकदम आठवते. काही तरी कारण असतं लहानसच- पण “आय सिम्प्ली रिमेम्बर माय फेवरेट थिंग्ज व्हेन आय फिल सॅड” म्हणणारी जुली आठवली, की आपणही अपसेट असतांना आपल्या फेवरेट गोष्टी आठवून पहाव्यात का?? असं वाटतं बरेचदा!

साउंड ऑफ म्युझिक बद्दल काय लिहावं? एक फेवरेट सिनेमा आहे हा माझा..हा सिनेमा १९६५ साली रिलिझ झाला, नुकतंच वर्ल्ड वॉर होऊन गेलं होतं. युरोपियन देश त्या वर्ल्डवॉरच्या जखमा कुरवाळत होते- आणि तेवढ्यात तीच पार्श्वभुमी असलेला हा सिनेमा  प्रसिद्ध  झाला- आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला .

हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच, कारण जसा शोले न पाहिलेला माणुस भेटणे दुरापास्त, तसाच साउंड ऑफ म्युझिक न पाहिलेला पण विरळाच.मी हा सिनेमा खूपच लहान असतांना पाहिला होता, फार तर दहा वर्ष वय असेल. सिनेमा तेंव्हा तर खूपच बोअर झाला होता, तसा थोडा फार जेंव्हा मुलांचं काम वगैरे आलं की बरा वाटायचा, पण इतर सिन मात्र खूप बोअर झाले होते, कदाचीत इंटरव्हल नंतरचा संथपणा मुळे असावं.आमच्या लहानपणी सिनेमा कुठला बघायचा ते मोठी माणसंच ठरवायची.

नंतर मोठं झाल्यावर हा सिनेमा एकदा मॅटीनीला लागला होता अल्का ला, तेंव्हा पुन्हा पाहिला, आणि खुप खुप आवडला. आणि त्या नंतर मग अनेकदा पाहिलाय. काही सिनेमे ठरावीक वयातच समजतात. लहान मुलांचा म्हणून लहानपणी दाखवलेला हा सिनेमा, खरंच मोठे पणीच जास्त आवडला. १९६५ साली ५ बाहुल्या मिळवून बेस्ट चित्रपटाचे अवॉर्ड मिळवणारा हा चित्रपट. माय फेअर लेडी पण नुकताच येउन गेला होता – त्याला पण बेस्ट चित्रपटाचे अवॉर्ड मिळाले होते एक वर्षापूर्वीचम्हणजे १९६४ मधे. संगीतमय चित्रपटांची नांदी झाली होती, लोकं आवडीने संगीतमय सिनेमे पहातात हे सिद्ध झालं होतं,

मारीया पडद्यावर दाखल झाली नाचत, गात, उड्या मारीत,त्या काळच्या स्त्रियांनी वागण्याच्या संकल्पनांना थेट कचरा कुंडीत टाकुन आली साउंड ऑफ म्युझिक मधे- आणि ह्या सिनेमाला पण पुन्हा बेस्ट चित्रपटाचं अवॉर्ड मिळालं.मारीया!! तिची पहिलीच एंट्री, तो व्हिंटेज स्टाइलचा फ्रॉक घालुन अजूनही लक्षात आहे. ऑस्ट्रियाचा सुंदर कॅन्व्हास असल्यावर मग छायाचित्रण करण्यासाठी फक्त कॅमेरा सुरु करणं या पलीकडे काहीच उरत नाही. पण अतिशय सुंदर रीतीने कॅमेराबद्ध केलेला हा सिनेमा आज माझ्या फेवरेट सिनेमांपैकी एक आहे. बर्फाने झाकलेले डोंगर, सुंदर निसर्ग, तलाव,हिरवळ आणि सुंदर दिसणारी जुली – इतकं सगळं असतांना जर सिनेमा चांगला झाला नसता तरच नवल.

कुठेतरी दूर मारीया उंडारत असते. कॉन्व्हेंटमधल्या सगळ्या नन्स ही आता कुठे गेली?? तेवढ्यात चर्चची घंटा वाजते आणि ही मारीया धावत पळत, ठेचकाळत आपल्या चर्चकडे धावत सुटते. प्रेक्षकांना पण मारीया कशी आहे आहे हे सांगायला म्हणून सगळ्या नन्स ते गाणं ( त्याला गाणं म्हणायचं?) म्हणतात. ती झाडावर चढते, तिचा ड्रेस फाटलेला असतो, ती नेहेमीच चर्चला उशिरा येते, जवळपास प्रत्येकच गोष्टीला उशिरा येते- फक्त जेवणाला सोडून… असं मजेशीर असलेलं ते गाणं व्हायब्रंट मारीयाचं कॅरेक्टर पुर्णपणे आपल्या नजरेसमोर उभं करतं, आणि हा सिनेमा आपल्याला आवडणार याची खात्री पटते. हे गाणं मराठीत लिहिणं म्हणजे त्या गाण्याची मजा घालवणं आहे – हेच काय पण ह्याच्या व्यतिरिक्त पण सगळीच गाणी अप्रतिम आहे..

आमच्या घरी याची एल पी आहे आणि घासून घासून अगदी पांढरी पडलेली :)चर्चची घंटा ऐकुन मारीया येते परत चर्च मधे. मदर तिला बोलावून विचारते कुठे गेली होतीस? तर ती म्हणते की नद्या, हिरव्या गार टेकड्या, डोंगर, मला दिसलं आणि मला त्याचाच एक भाग होऊन जावंसं वाटलं.. म्हणून मी बाहेर गेले होते! मदरच्या लक्षात येतं की ही मारीया म्हणजे ’नन’ व्हायचं मटेरिअल नाही!

तिला मदर  सांगते, कॅप्टन जॉर्ज नावाचा एक सात मुलांचा बाप असलेला विधूर माणुस आहे, आणि त्याची बायकॊ नसल्याने त्याला एका गव्हर्नेसची गरज आहे, तेंव्हा तु तिथे काम करायला जा.  नवीन काम सुरु करतांना, किंवा नोकरी जॉइन करतांना मला जमेल कां? असं प्रत्येकालाच वाटत असतं, मारीया पण त्याला अपवाद नाही. ती पण खूप घाबरलेली असते, व्हॉट माय फ्युचर विल बी? म्हणून.कॅप्टन आणि त्याची सात मुलं?? बापरे कसं होणार? काय करणार आपण? आणि ह्या सगळ्या विचारातच ती स्वतःलाच समजावते, की मला स्वतःवरच विश्वास आहे, आणि मी घाबरत नाही, आणि ताठ मानेने ,तिची ती हातामधे सुटकेस घेउन पाय आपटत चालत जाणारी- आय हॅव कॉम्फिड्न्स इन मी म्हणत चालत जाणारी प्रतिमा लक्षात रहाते नेहेमी साठीच. या सिनेमाचे एक वैशिष्ठ्य म्हणजे संपुर्ण सिनेमाची स्टॊरी ही गाण्यांच्या मधूनच हळुवार पणे उमलत जाते.

कॅप्टनच्या घरी पोहोचते मारीया.कॅप्टन म्हणजे पण अगदी अर्काट माणुस. शिट्टीच्या तालावर मुलांनी वागावं अशी अपेक्षा ठेवणारा, आणि मुलांशी कसं वागावं न समजणारा हा कॅप्टन. आपल्या ट्रुप प्रमाणे मुलांना वागवतो  . प्रत्येक काम शिटी च्या इशाऱयावर..

अवाढव्य बंगला, आणि आई वेगळी मुलं. मारीयाचा जीव कासावीस होतो त्या मुलांकडे आणि कॅप्टनचं मुलांशी वागणं बघून! ती ठरवते, ती इथे रहाणार आणि त्या मुलांना आपलंसं करुन घेणार- पण तिला ही मुलं कशी आहेत हे माहिती नसतं. आजपर्यंत बऱ्याच गव्हर्नेस होऊन गेलेल्या असतात- मुलांनी पळवून लावलेल्या असतात. ( याच सिनेमाचा एक हिंदी कॉपी आली होती जितेंद्र आणि जया बच्चनची).

कॅप्टनचं वागणं पण अगदी सर्कशीतल्या जनावरांना जसं ट्रेन करतात तसं असतं. शिस्त शिस्त आणि शिस्त!! बस्स , यात कुठेच कॉम्प्रोमाइझ नाही. मारीयाला हे मान्य नसतं! तिचं उत्साहाने मुसमुसलेलं मन हे काही मुलांशी अशा तऱ्हेने वागणं सहन करु शकत नाही. कॅप्टनने प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवुन दिलेली असते, अभ्यास , परेड – हो परेड.. वगैरे ची. खेळणं, गाणी म्हणणं वगैरे अजिबात स्थान नसतं कॅप्टनने नेमून दिलेल्या टाइम टेबल मधे . मारीयाला लक्षात येतं की इथे सात नाही तर आठ मुलं आहेत , ज्यांच्याशी जुळवून घ्यायचंय आपल्याला, सात मुलं आणि  आठवा कॅप्टन !!

एकदा मुलं आणि मारीया घरात असतात. कॅप्टन बाहेर गेलेला. तेवढ्यात विजांचा कडकडाट, वादळ , पाउस सुरु होतो. सगळी मुलं सहाजीकच या वादळाला घाबरतात, तेंव्हा मारीया ती स्वतः भिती वाटल्यावर काय करते?? हे मुलांना सांगते.ती म्हणते, मी माझ्या सगळ्या फेवरेट गोष्टी आठवते आणि मग मला एकदम बरं वाटायला लागतं.

कॅप्टनला कुठे तरी कामासाठी जावं लागतं, आणि मारीया आणि मुलं फक्त घरी असतात. पडद्याच्य़ा कपड्यांचे सगळ्यांना सारखे कपडे शिवून देते मारिया आणि सगळ्यांना पिकनिकला नेते. पिकनिकला गेल्यावर झाडावर चढणं, पाण्यात बोटींग करणं वगैरे साध्या साध्या गोष्टीं मधला आनंद घ्यायला ती मुलांना शिकवते. आणि मुलांशी तिचं पटायला लागतं.मारीयाला आईवेगळ्या मुलांना खूप प्रेम देते. स्वतः अनाथ असल्यामुळे कदाचित तिला मुलांचं एकाकी पण लक्षात येतं. त्यांना सात सुरांची ओळख करुन देते -ती जेंव्हा मुलांना गाणं शिकवते, आणि म्हणते की तुम्ही काहीही गाऊ शकता. अगदी कुठलंही गद्य गायला जाउ शकतं, आणि मुलांना एकदम गाण्यामधे इंट्रेस्ट डेव्हलप होतो..

नंतर कॅप्टन घरी येतो.तेंव्हा त्याला सगळं बदललेलं दिसतं.मुलं आपली शिस्त वगैरे सगळं काही विसरुन गेलेले दिसतात. शिटीचा रिस्पॉन्स?? मारीयाल तो म्हणतो, तुला गव्हर्नेस म्हणून ठेवलं होतं मुलांना शिस्त लावायला, तर तु हे काय करुन ठेवलंस? ताबडतोब घर सोडून निघून जा.

कॅप्टनचं एल्सा वर प्रेम बसलंय. ती एक तिच्याशी लग्न करायचा त्याचा विचार असतो, ती घरी आलेली आहे कॅप्टन बरोबर,इकडे कॅप्टन मारीयाला घरातून हाकलतोय, आणि मुलं मारीयाने शिकवलेलं गाणं एल्सा ला म्हणून दाखवताहेत . कॅप्टन अवाक रहातो. आणि त्याला आपली चूक समजते आणि तो मारीयाला क्षमा मागून परत बोलावतो. हा प्रसंग अतिशय सुंदर दाखवलाय. आपल्याला पण मुलांची त्यांच्या  वडिलांशी  म्हणजे कॅप्टनशी जवळीक निर्माण व्हावी असं सारखं वाटत असतं.. ती इथे होते!! मारियाचा पहिला विजय अधोरेखित होतो.

अतिशय मेलोडियस गाणी आहेत यातली.. हे गाणं तर अप्रतीम. मुलं अतिशय खूष होतात, त्यांना आपलं जीवन आनंदाने कसं जगायचं हे समजतं. इथे सगळ्यात मोठी मुलगी टेलिग्राम आणून देणाऱ्या राल्फच्या प्रेमात पडते. अतिशय उत्कृष्ट रितीने चित्रित केलेलं हे गाणं आजही नजरेसमोर आहे माझ्या.आय ऍम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन… ह्रिदम अतिशय छान आहे.प्रेमात पडल्यावर हे गाणं तर गुणगुणल्या जाणारच!


राल्फ नंतर नाझी जॉइन करतो. ती पुन्हा एक वेगळीच बाजू या सिनेमाची.

कॅप्टनची प्रेयसी म्हणजे एल्सा ही मुलांशी जवळीक साधायचा खुप प्रयत्न करते, जवळीक ही नैसर्गिक रित्याच साधली जाउ शकते, ओढून ताणून नाही. त्यामुळे एल्सा आणि मुलांचं काही नीटसं पटत नाही.

इकडे कॅप्टनच्या घरामधे खूप वर्षानंतर एक पार्टी ठरवलेली असते. मारीया मुलांना डान्स शिकवत असते. तेवढ्यात कॅप्टन येतो आणि आणि मारीयाबरोबर नाच करतो.ते एल्सा पहाते तेंव्हाच एल्साच्या लक्षात या दोघांचंही एक्मेकांवर प्रेम आहे हे लक्षात येतं- आणि ती मारियाला अप्रत्यक्षपणे निघून जायला सांगते.मारीया पुन्हा आपल्या कॉन्व्हेंट मधे निघून जाते.

नाझी लोकांचा कंट्रोल वाढत होता. पोलंड वगैर करित आता ऑस्ट्रिया मधे पण नाझी लोकांचाच कंट्रोल रहाणार आहे अशा बातम्या जिकडेतिकडे अफवा उडत असतात. पार्टी संपतांना मारीयाने शिकवलेलं सो लॉंग हे गाणं मुलं म्हणतात, तेंव्हा कॅप्टनचा मित्र मॅक्स हे गाणं साल्झबर्गच्या संगीत महोत्सवात म्हणावं असं सुचवतो-कॅप्टन नाही म्हणून सांगतो. ( मॅक्स कॅप्टनच्या नकळत ती प्रवेश पत्रिका भरतो त्या महोत्सवाची कारण कॅप्टनला ते मान्य नसतं)

सो लॉंग फेअरवेल. हे ओरिजिनल मिळालं असतं तर बरं झालं असतं. ह्या गाण्याचं खूप महत्व आहे या सिनेमा मधे.

इकडे मारीया कॉन्व्हेंट मधे जाते तिथे मदर तिला समजावून परत पाठवतात. कॅप्टनला पण आपलं आणि एल्साचं रिलेशन लॉंग टर्म नाही याची जाणिव होते . त्याला समजतं की आपलं प्रेम मारीयावर आहे, आणि तिला लग्नाची मागणी घालतो. दोघांचंही लग्न होतं आणि दोघंही हनीमुनला जातात.

इकडे नाझी लोकांचा जोर वाढतच असतो. कॅप्टनच्या घरावरचा ऑस्ट्रियाचा झेंडा काढून टाकला जातो, आणि परत आल्याबरोबर त्याला नाझी मिल्ट्री मधे जॉइन व्हा अशी आज्ञा दिली जाते.

कॅप्टन देश सोडुन निघून जायचं ठरवतो. काहीही झालं तरी नाझी सेनेत काम करायचं नाही असा त्याचा निश्चय. जेंव्हा कॅप्टन पळून जात असतो तेंव्हा तो पकडला जातो, मुलांना घेउन आपण संगीत महोत्सवाला जात आहोत असे सांगुन तो वेळ मारुन नेतो. नाझी सैनिकांनी भरलेल्या हॉल  मधे एक देशभक्ती पुर्ण गीत आणि नंतर  सो लॉंग — गाणं सादर करुन एक एक करुन सगळे फॅमिली मेंबर्स स्टेज वरुन निघून जातात,  आणि सरळ कॉन्व्हेंटचा ( जिथे मारीया मोठी झाली त्या) आसरा घेतात.

शेवटी नन्स च्य मदतीने हे कुटुंब स्वित्झर्लंड च्या दिशेने प्रयाण करते. या सिनेमामधे जुली ऍंड्र्युज ने केलेल काम अतिशय अप्रतिम आहे. एकदा तरी अवश्य पहायलाच हवा हा सिनेमा.कथा पुढे पुढे थोडी गुंतागुंतीची वाटते तरी पण मी साधी सरळ करुन लिहिण्याचा प्रयत्न केलाय. सिनेमा अतिशय सुंदर आहे. अजूनही जर कोणी पाहिला नसेल तर अवश्य पहा!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged , , , , . Bookmark the permalink.

26 Responses to साउंड ऑफ म्युझिक …

 1. आय ऍम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन…छान वाटला गाण..सॉरी मी पहिल्यांदाच वाचतोय ह्या साउंड ऑफ म्युझिक बद्दल..आपण पोस्ट टाकलीत म्हणजे नक्कीच बघायला हवा..बघतो आहे का ऑनलाइन डाउनलोडला…
  छान सुरूवात करून दिलीत दिवसाची..थॅंक्स 🙂

  • सुहास
   सगळीच गाणी खुपच सुंदर आहेत. सिनेमा पण खुप छान आहे. बघा, मला वाटतं सिडी मिळेल.. ऑन लाइन पण सापडु शकेल.

 2. bhaanasa says:

  माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक व अर्थात नंबर वर असणारा. अप्रतिम सिनेमा आणि त्याचे तू केलेले रसग्रहणही तितकेच रसाळ झाले आहे. गेले दोन दिवस येथे कुठल्या न कुठल्या चॆनलवर सारखा दाखवला जातोय. त्यामुळे मी कालच रात्री पाहिलाय. अगदी ताजा ताजा( कितव्यांदा कोण जाणे ). सुदैवाने अनेक चांगल्या सिनेमांची वाट लावण्यात पटाईत आपल्या बॊलीवुडने चक्क ’ परिचय ’ मात्र चांगला बनवला होता.:)

  • मी पण टिव्हीवरच पाहिला 🙂 माझा फेवरेट आहे अगदी.. अर हो, त्या सिनेमाचं नांव विसरलो होतो मी परिचय.. तो पण पाहिला होता मी. सध्या गोव्याला आहे, कार्निव्हल मधे एका मुला- मुलीला आय एम सिक्स्टीन करतांना पाहिलं, म्हणुन एकदम लिहावंसं वाटलं. आजही म्हणजे ४५ वर्षानंतर तरुण मुलांना हे गाणं ऐकावंसं वाटणं यातच सगळं गमक आहे यशाचं
   यातली सगळी गाणी जुली ऍंड्र्युज ने स्वतः गायलेली आहेत. 🙂

  • एक कन्फेशन
   हा सिनेमा मला पहिल्यांदा पाहिला तेंव्हा अजिबात समजला नव्हत्ता. हे ऑस्ट्रिया, नाझी, सगळं सरमिसळ झालं होतं डोक्यात. दुसऱ्यांदापुन्हा पाहिला तेंव्हा निट समजला. 🙂

 3. bhaanasa says:

  काही सिनेमे काळातीत आणि वयातीत आहेत त्यातलाच हा एक. अरे हो कार्निवल सुरू असेल आत्ता… आम्ही तीन-चार वेळा गेलो होतो त्याचवेळी गोव्याला. एक वेगळेच वातावरण असते. यातली सगळी गाणी तिने स्वत: गायलीत हेही एक वेगळेपणच आहे सिनेमाचे. आज प्रिटी वुमनही पाहिला…. कितव्यांदा… हा हा….:)

  • कार्निव्हल सुरु आहे नां. काल मडगांवला होतं. रस्ते बंद केले होते, त्यामुळे आम्ही दिड दोन तास कार्निव्हल मधे फिरलो. मजा आली. आपण आधी का नाही आलो कार्निव्हलला असं वाटत होतं.. व्हायब्रंट आहे गोवा सध्या..

   प्रिटीवुमन!!( सुस्कारा.. मोठ्ठा) हं……..!!!

 4. Rajeev says:

  अरे.. तू मला सुखद आठवणींच्या काळात नेलेस…
  ईथे ये.. तुला “साउंड ओफ़ म्यूझीक” आणी त्यावर बेतलेला
  नीतांत सुंदर “परीचय” सीनेमा स्कोप वर दाखवतो…..

  rajeev

  • सिनेमास्कोप वर म्हणजे काय? तु्झ्या प्रोजेक्टरवरच नां?? नक्कीच.. पुढल्या वेळेस नक्की येईन तुझ्याकडे साउंड ऑफ म्युझिक पहायला. फक्त ओरिजिनल सिडीची सोय करुन ठेव.

   • माझं नेक्स्ट टारगेट अगदी हेच आहे, एक प्रोजेक्टर आणि डार्क काळ्या/लाल कलरची स्पेशल रुम….कधी साकार होईल माहीत नाही…
    हा चित्रपट या सप्ताहांतात पहातोच….

    • लवकर लावा.. प्रोजेक्टर.. राजिवने त्याच्या ऑफिस मधे लावलाय. ( च्यायला, कामं करतो की सिनेमे पहातो ऑफिसमधे बसुन त्यालाच ठाउक- आर्किटेक्टला कामंच काय असतात म्हणा ? नुसता फुकटचा पैसा खोऱ्याने ओढायला मिळतो.. हा हा हा 🙂 )

 5. छान लिहिलय… आता साउंड ऑफ म्युझिक बघायला हवा… 🙂

 6. Sagar says:

  MI nahi pahila ajun…Tumchya Likhanavarun PIC changla vatat aahe….Pahato aata milalyvar….

 7. खूप ऐकलंय. कधीपासून बघायचाय हा सिनेमा. इव्हन माझ्या लॅपटॉपवर पण आहे. पण बघायचा राहून जातोय. नक्की बघतो आता. बाकी परीक्षण खुपच छान लिहिलं आहे हे सांगणे न लगे.

  • खुप जुना सिनेमा आहे, त्यामूळे थोडे प्रिंट वगैरे बरोबर नसेल तरीही मस्ट सी .. आहे हा सिनेमा.. माझा द गुड बॅड आणि अग्ली नंतरचा आवडता सिनेमा आहे हा.

 8. मी पण नाही पाहिला अजुन हा सिनेमा….खरतर ईंग्लीश चित्रपट खुप उशिरा पाहण सुरु केल मी…असो आता हे सगळ वाचुन बघावासा वाटतो आहे सिनेमा…

  • देवेंद्र
   कांही जुने चित्रपट फारच सुंदर आहेत. जसे मेकॅनाज गोल्ड, फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर, गन्स ऑफ नॅवरोन, गुड, बॅड ऍंड अग्ली , फाइव्ह मेन आर्मी -वगैरे. हे सगळे आमच्या लहानपणी पाहिलेले सदाबहाअर सिनेमे. आजही पहायला कंटाळा येत नाही. माझ्या लॅप टॉप वर गुड-बॅड ऍंड अग्ली आणि पोलिस ऍकॅडमी सगळे ७ भात आहेत- कधीही बोअर होत नाही पहायला.
   क्लिंट इस्ट वुड आणि लिऑन क्लिफ आमचं दैवत होतं….
   नसतील पाहिले तर अवश्य पहा.

 9. मी नाही पहीलाय हा सिनेमा. पण स्टोरी छान आहे. मारीयाचे “आय सिम्प्ली रिमेम्बर माय फेवरेट थिंग्ज व्हेन आय फिल सॅड” काय सॉलीड वाक्य आहे. जया – जितेन्द्र च्या ‘परीचय’ ची स्टोरी अगदी अशीच आहे.

 10. सागर गोखले says:

  सिनेमाची गोष्ट मी 17 वर्षांचा असताना माझ्या बाबांनी सांगितली होती. 1990 च्या सुमाराला. त्यानंतर सिनेमा बघायचा योग आला 1995 साली. व्हीडिओ कॅसेट भाड्याने आणून मित्राकडे पाहिला. त्याआधीच गाण्यांची कॅसेट घरी होती. नंतर आता मी माझ्या मुलालाही ती गाणी एकवतो आणि त्यालाही ती आवडतात..दीझ आर अ फ्यू ऑफ माय व्हेवरेट थिंग्ज हे मला आवडलं..माझ्या मुलालाही आवडलं. ऑल टाईम क्लासिकची पुन्हा सैर घडवून आणल्याबद्दल थॅंक्स. तुम्ही काय पॅशननं तो सिनेमा पाहिला असे आय कॅन इमॅजिन..

  • सागर
   खुप खुप .. म्हणजे अगदी मनापासुन आवडलेला हा एक सिनेमा. माझ्या मुलींना पण ही गाणी आवडतात. अतिशय सुंदर सिनेमा आहे हा.गाणी तर अप्रतीम आहेत – सगळीच गाणी.
   मी परवा कार्निव्हल मधे गोव्याला फिरत असतांना स्सांस्कृतिक कार्यक्रमात ह्या गाण्यावर एका मुलाने डान्स केला होता, तेंव्हा एकदम जाणवलं, की ही गाणी म्हणजे लता ची जुनी गाणी असतात त्या तोडीची आहेत, आणि मग हे पोस्ट लिहिलं..

 11. काही आवडत्या चित्रपटांपैकी एक. एकदम खळाळत्या निर्मळ झ-यासारखा.

 12. समीक्षा खुपच छान. हे वाचून असा सिनेमा चुकवू नये.

  • सिडी मिळेल तर बघा… मस्त टाइमपास आहे. फ्रेश चित्रपट आहे एकदम.. वरची गाणी बघा, ताबडतोब लक्षात येइल..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s