गोवा कार्निव्हल.

कार्निव्हल म्हंट्लं की रंभा संभा डान्स करणाऱ्या रिओ द जिनेरिओ च्या सुंदऱ्या आठवतात .. खरं ना? अर्थात तसं असेल तर त्यात कोणालाच दोष देता येत नाही , कारण त्यांचे डान्सच (???मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात हसताय म्हणुन- ब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??)- इतके मस्त असतात की ते आठवण सहाजिकच आहे.

कार्निव्हल म्हणजे काय?? तर खा, प्या, मजा करा. कुठल्यातरी एका रोमन शब्दाचा हा अपभ्रंश आहे हा.कार्निव्हल चा   ख्रिश्चन लोकांचा सण, पण सगळे हिंदु लोकं पण यामधे तेवढ्याच उत्साहाने भाग घेतात.  १९६१ पर्यंत पोर्तुगिझ लोकांनी गोव्यावर राज्य केलं, आणि कळत नकळत  त्यांची  संस्कती ही गोव्याची संस्कृती झालेली आहे. कार्निव्हल हा   तर गोव्याची सांस्कृतिक  ओळख बनलाय.

दर वर्षी साधारणपणे फेब्रूवारी महिन्यात   कार्निव्हल सिलेब्रेट केला जातो. अगदी नक्की वेळ सांगायची तर गुड्फ्रायडेच्या ४३ दिवस आधी कार्निव्हल सुरु होतो.    गुडफ्रायडेच्या आधीचे  हे चाळीस दिवस रोमन कॅथलिक  ख्रिश्चन लोकं उपवास करतात.   चाळीस दिवस फिश, मिट न खाणे अगदी कटाक्षाने पाळतात हे लोकं . पुढे चाळिस दिवस मिट नाही- म्हणुन उपवासाच्या पुर्वीचे तिन   दिवस खाउन पिउन मस्ती करण्यासाठी म्हणुन हा कार्निव्हल ! मुस्लीम लोकं जसे उपवास संपले की इद मनवतात, तसंच हा कार्निव्हल म्हणजे  उपवासाच्या आधीचं सिलेब्रेशन.

गोव्या मधे इतक्या वेळेस आलोय, अगदी इस्टर च्या वेळेस पण गोवा पाहिलंय. तो इस्टरचा कॅंडल मार्च, आणि झेविअर्स चर्च च्या बाहेर उभं राहुन ( आत जाणं अलाउड नाही, जर तुम्ही कॅथलीक नसाल तर – आणि विथ ड्यु रिस्पेक्ट मी बाहेरच थांबलो होतो) मास ऐकलाय, पण हे कार्निव्हल एकदम कलरफुल फेस्टिव्हल असतो. इतक्या वेळा आलोय गोव्याला पण  असुनही कार्निव्हल च्या वेळेस गोव्यात रहाण्याचा योग आजपर्यंत कधीच आला नव्हता- या वर्षी पहिली वेळ कार्निव्हल पहाण्याची 🙂 .

फार पुर्वी एक किंग मोमो होऊन गेला. त्याच्या काळापासुन हा फेस्टीव्अल सुरु करण्यात आलाय ( कृपा करुन हा किंग मोमो कोण , कुठला असे प्रश्न डोक्यात  आणुन  त्रास करुन घेउ नका -उत्तर सापडणार नाही)  🙂 मी शोधलंय पण सापडलं नाही नेट वर म्हणुन सांगतोय!!. तर  एक दिवस राजाने अनाउन्स केलं की आता तिन दिवस काम वगैरे बंद -कारण आता उपवास सुरु होणार पुढे चाळीस दिवस तेंव्हा आता हे तिन दिवस  फक्त मजा करा…  आणि तेंव्हा पासुन हा कार्निव्हल सुरु झालाय.

सध्या एक कार्निव्हल कमीटी  आहे पणजीला. ती कमीटी एक मोमो राजा निवडते . निवडीची प्रोसिजर अगदी गुप्त राखण्यात येते.  कार्निव्हलची सुरुवात खास निवडुन दिलेला  किंग मोमो करतो. कार्निव्हल चा पहिला शोभारथ हा किंग मोमोचा असतो. त्यावर निवडुन दिलेला  किंग  ड्रेस, दागिने वगैरे घालुन  बसलेला असतो, आणि तो किंग मोमो ऑफिशिअली कार्निव्हल सुरु झाला आहे असं अनाउन्स करतो – हा कार्निव्हल  पणजी ला पहिल्या दिवशी , नंतर एक दिवस वास्को आणि एक दिवस मडगांवला  असतो.   ’किंग मोमो’ औट घटकेचा म्हणजेच तिन दिवसांचा राजा असतो गोव्याचा.

त्या दिवशी त्या मोमोचा थाट अगदी बघण्यासारखा असतो. आम्हाला पहायला मिळाला नाही, पण मागच्या वर्षीच्या किंग चा फोटॊ इथे पोस्ट करतोय.

दुपारी ३ वाजता गोव्याला येउन पोहोचलो- फ्लाईट दिड तास लेट!! पोहोचल्याबरोबर ताबडतोब  बॅग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो.जेट कनेक्ट ची फ्लाइट होती, त्यामुळे खाणं वगैरे काहीच नव्हतं फ्लाइट मधे. कोल्ड सॅंडविच चा मला मनापासुन तिटकारा आहे. अगदी काहीच खायला नसेल, आणि भुकेने जीव जायची वेळ आली तरच मी ते कोल्ड सॅंडविच खातो. गोव्याला पोहोचल्यावर आधी काहीतरी पोटात ढकलावं म्हणुन ड्रायव्हरला अनंताश्रम मधे गाडी घे म्हंटलं. एखादा दिवस खराब असतो तो असा..

हॉटेल बंद. हीच एक गोव्याची गोष्ट मला आवडत नाही. शेवटी ड्रायव्हरला म्हंटलं, की रस्त्याने जे कुठलं हॉटेल उघडं दिसेल तिथे थांबव. एक हॉटेल सापडलं उघडं. तिथे गेलो, तर फक्त   प्रॉन्स बिर्याणी आहे- बाकी सगळं संपलं.. असं म्हणाला तो. एक बिर्याणी आणी प्रॉन्स वेफर्स, सोबत एक ग्लास बिअर वर सेटल केलं. हे प्रॉन्स वेफर्स द बेस्ट प्रकार आहे गोव्यातला. बहुतेक सगळ्याच बार मधे मिळतो. व्यवस्थित जेवण नशिबातच नव्हतं.थोडं फार पॊटात ढकलुन तिथुन निघालो ते सरळ कामाला लागलो.

सगळी कामं आटोपली पणजीची, आणि मग तिथुन टॅक्सीने  कोलव्याला निघालो.  इतकी वर्ष येतोय गोव्याला, पण अजुनही मला कोलवा बिच आवडतो.  दर वेळेस इथलं एक हॉटेल ठरलय रहाण्यासाठी .समुद्र किनाऱ्यावर असल्याने, सकाळी उठुन पाण्यात पाय बुडवायला बरं वाटतं इथल्या समुद्रात!  आणि सकाळचा टाइमपास पण मस्त होतो :). इथल्या बिच वरची रेती पण खुपच नरम आणि स्वच्छ आहे.

मडगांवला पोहोचलो, तर पुढे ट्रॅफिक जॅम दिसला म्हणुन ड्रायव्हरला सांगुन कार बाजुला लावली – पहातो तर कार्निव्हलचा रंग अगदी टिपेला पोहोचला होता. लोकं बेधुंद होऊन नाचत होते. रस्ता जाम झालेला होता पण कोणाच्याही कपाळावर आठि दिसत नव्हत

वलेले होते. प्रत्येकाची थिम वेगळी होती. या कार्निव्हलचा फायदा करुन घ्यायला म्हणुन हिरो होंडा बाइकवाल्यांनी पण आपली बाईक एका फ्लोट वर डिस्प्ले केली होती. प्रत्येक फ्लोट वर मोठे मोठे स्पिकर्स आणि मोठ्या आवाजात म्युझिक सुरु होतं. मुलं, मुली, नाचत होते. एक वेगळी झिंग होती वातावरणात. आपणही नाचावंसं वाटत  होतं . असं होतंच बहुतेक- जेंव्हा असं म्युझिक असलं की नाचावसं वाटतंच.. मुलं मुली  कलरफुल कपडे  – मुद्दाम या ऑकेजन साठी बनवलेले  घालुन फिरत होते. एकाही मुलीचे किंव मुलाचे कपडे अंग उघडे टाकणारे नव्हते हे इथे नमुद करावसं वाटतं.

आम्ही चालत चालत पुढे निघालॊ. हे फ्लोट्स बघुन लक्षात यायचं की हे बनवण्यासाठी बरीच मेहेनत घेतली आहे , आणि खर्चही भरपुर केलाय. हे फ्लोट बनवणारे कारागीर म्हणजे लोकल लोकं. हे फ्लोट्स ओपन ट्रक्सवर सजवलेले असतात.   कार्निव्हल सोहळा  हा नेहेमी   पणजीलाच सुरु होतो.

प्रोसेशन संपलं की स्टेज वर रात्री लोकल मुलं, नाटकं, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात, या मधे नाच, गाणी, नाटकं किंवा एक पा्त्री प्रयोग वगैरे सगळं काही असतं. मुलं मुली मुद्दाम डिझाइन केलेले कार्निव्हल चे कपडे घालुन असतात. थोडक्यात नुसतं खा, प्या, मजा करा असा माहौल असतो.सगळ्यात चांगल्या डिझाइन केलेल्या , आणि त्यावरच्या मुलांचे कपडे, नाच या सगळ्या गोष्टींना जज करुन पहिल्या तिन फ्लोट्स ला बक्षीस दिलं जातं.

मी पण व्हिडीओ घेतलाय, पण माझ्या पेक्षा पण एक चांगला व्हिडीओ मला नेट वर सापडला म्हणुन तो युज करतोय इथे.

मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. अगदी दहा बारा वर्षाच्या मुलामुलींपासुन तर चांगले वयात आलेले मुलं मुली या प्रोसेशन मधे नाचत होते. एक फ्लोट तर चक्क गांधीजींचा होता. त्यावर एक माणुस टकलु करुन पदयात्रेच्या पोझ मधे उभा होता, एवढंच नाही तर त्या फ्लोट बरोबरचे बरेच लोकं टकलू करुन फिरत होते.

रस्त्याने जातांना बरेच ठिकाणी प्रोसेशन थांबत होतं- पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे. मला एका गल्ली मधे कमीत कमी ६ प्रोसेशन आपली पाळी येण्याची वाट पहात थांबलेले दिसले. त्यामुळे त्यांचे फोटॊ चांगल्या रितिने काढता आले. इतक्या सगळ्या प्रोसेशनस मधे पण कुठेही ट्राफिकची वाट लागलेली नव्हती. थोडा फार जाम होणं तर सहाजिकच आहे, पण ट्राफिक मुव्हिंग होता.

मला हे कार्निव्हल फार वेळ पहात रहाणं  शक्य नव्हतं, कारण संध्याकाळी एका डिलरला भेटायला जायचं होतं. जवळपास तास -दिडतास कार्निव्हल एंजॉय करुन हॉटेलवर परत गेलो.

इथे कार्निव्हलची मजा म्हणजे दिवस भर आणि रात्रभर इथे हुंदडणे आणि प्रोसेशन बरोबर फिरणे यातच आहे. याच प्रोसेशन मधे काही मुलांनी मुलींचे कपडे घालुन केलेले डान्स वगैरे पण खरंच खुप छान जमले होते. भरपुर फोटो काढले , व्हिडिओ पण घेतलेत , आणि या प्रोसेशनचा एक भाग होऊन त्यांच्या बरोबर थोड्ं अंतर चालुन पण गेलो. अधुन मधुन एखादी पिल्लु बिअर हातात धरुन नाचणारा गोवनिज तुम्हाला गळ्यात हात घालुन नाचायला ओढायचा.

कार्निव्हल म्हणजे धमाल.. बस्स.. संध्याकाळी एका स्टेजवर  लोकल मुलं मुली नाटकं, नाच वगैरे कार्यक्रम करतात. उत्तररात्रीपर्यंत चालतो हा सोहळा. माझी इच्छा होती रात्रीचा कल्चरल कार्यक्रम पहायची, पण शक्य झालं नाही. असो. इतकंच पहायला मिळालं हे पण खुप झालं. जर शक्य असेल तर गोव्याला ह्याच पिरियड मधे व्हिजीट प्लान केली तर रात्री खुप छान करमणुक होऊ शकेल, आणि एक सुंदर अनुभव घेता येइल

( बरेच फोटो पण काढले आहेत, ते उद्या सकाळी पोस्ट करीन. फोटो ऑफिसच्या लॅप टॉप वर आहेत आणि आज चार्जर विसरुन आलोय ऑफिसमधे ….. )

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , , . Bookmark the permalink.

30 Responses to गोवा कार्निव्हल.

 1. अहो आवरा जरा,

  तुम्ही काय सलग आम्हां फोटोग्राफर्सना जळवणारे पोस्ट्स टाकताय? तिकडे फारच मजा असते कार्निवलला. आमच्या नशिबी कधी येणार कुनास ठाऊक. पोस्ट नेहमीप्रमाणे जबऱ्या आहे.

  • पंकज
   पुढल्या वर्षी प्लान करा. इतका कलरफुल इव्हेंट तर फोटोग्राफर्सनी मिस करुच नये.फक्त वाईड ऍंगल लेन्स सोबत ठेवलं तर फोटो खुप मस्त येतिल. 🙂

 2. Vidyadhar says:

  namaste kaka,
  changli maahiti dilit.
  kadachit hach to Momo urf Momus – mala wikipedia madhye sapadala tumhihi vachla asel kadachit.
  http://en.wikipedia.org/wiki/Momus

 3. हीच ती पोस्ट जिची वाट पहात होते. काय डोळे भरून वर्णन केलंय तुम्ही! फोटोही येऊ द्यात लवकर. तुम्ही घेतलेले व्हिडीओज आत्ताच पाहिले. छान आले आहेत. फ्लोटवर सामाजिक संदेशही दिले आहेत. हिरवा बेडूक आवडला. गांधीजीसुद्धा पाहिले. ती मुलं मुलींसारखी वेशभुषा करून का नाचत होती, हे समजलं नाही. एकदा सवड काढून कार्निव्हल पहायला तरी गोव्याला जायलाच हवं. पण तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या कार्निव्हलचा आनंद घेता आला.

  अवांतर: परवा प्रदर्शित होणा-या ’रिंगा रिंगा’ चित्रपटामधेही भरपूर गोवा आहे. खास करून ’बाय गो बाय गो, विलायती नाय गो’ गाण्यामधे छान कार्निव्हल दाखवला आहे. फटाक्यांना गोव्यात ’फुगेटीव्ह’ म्हणतात, असं काही दिवसांपूर्वीच कळलं.

  • या वेळेस अनएक्स्पेडली झाल तिथे जाणं. ठरवलेलं नव्हतं. मडगांवला दिड दोन तास घालवले संध्याकाळचे. पण सुटी काढुन जावं असा प्रोग्राम असतो. शक्य झाल्यास पणजीचाच कार्निव्हल बघावा..

   तिथल्या मित्राला प्रश्न विचारुन अगदी भंडावुन सोडलं होतं..तो पण वैतागला, म्हणे कशाला इतक्या चौकशा करतो आहेस? पण ब्लॉग वर लिहायचं म्हंटलं की डोळे अन कान नेहेमी उघडे ठेवावेच लागतात.. 🙂

   • अगदी बरोबर. मी सुद्धा जेव्हा पासून ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हापासून जास्तच चिकित्सक झाले. यामुळे सामान्य ज्ञानात बरीच भर पडते शिवाय भटकंतीचा आनंदही मिळतो.

 4. Sagar says:

  Kaka
  Mi oan vat pahat hoto ya postchi,,,Buzz vvar update yet vachale hote…Baki mastch aahe ha canival…Mahiti pan chan sangitlit tumhi….
  baki ithe “पोहोचल्याबरोबर ताबडतोब ऍग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो” ithe eggs chya ivaji bags as hav hot ka?

 5. Sagar says:

  Kaka
  Mi pan vat pahat hoto ya postchi,,,Buzz vvar update yet vachale hote…Baki mastch aahe ha canival…Mahiti pan chan sangitlit tumhi….
  baki ithe “पोहोचल्याबरोबर ताबडतोब ऍग्ज टॅक्सीमधेच ठेउन पणजीला कामासाठी निघालो” ithe eggs chya ivaji bags as hav hot ka?

 6. ब्राझिलच्या कार्निव्हल मधे डान्स कोण बघतो???? खरं नां??
  हे…हे..हे..
  मस्त वर्णन आहे, अगदी तिथे असल्यासारखं वाटलं…
  पुढील फेब्रुवारी मध्ये जायलाच हवं…

 7. Aparna says:

  nice info….I had no idea about king Momo….

  and BTW I thought you had a shell fish allergy….nasel tari ti prawn pachanar nahi….pan at least hya post madhe khadachita warnan nahiye….:)

  • ते लिहिणार होतोच.. पण टाळलं. बहुतेक नंतर लिहिन वेगळं पोस्ट!! अहमदाबादचं पण बाकी आहे लिहायचं.
   शेल फिश खरंच चालत नाही, अंगावर खुप लाल उठतं.. पण दुसरं कहिच नव्हतं, म्हणुन खावं लागलं. चिंबोरीची तर मला भयंकर वाईट ऍलर्जी आहे. असो.. चालायचंच..

   हे प्रॉन्स पापड एकदम मस्त- बरं कां!!!

 8. एक्सपेक्टेड पोस्ट 🙂
  नेहमीप्रमाणेच मस्त..वीडियोस उत्तम आहेत, लवकर फोटोस अपलोड करून लिंक शेअर करा..

 9. Manmaujee says:

  मस्तच. . . मज़ा आहे की!!!

 10. trupti says:

  kaka,
  post khup aavadali….majhya aatta paryantchya sagalya trips madhali goa trip avismaraniy hoti. aamhi sudha Colva residency madhech rahilo hoto..(seafacing)..
  Colva beach khup swaccha aahe aani jast gardicha nahi….
  pan tumhi kelelya varnavarun ekada carnival madhe janyachi utsukata jastach vadhaliy…..

  • गोव्याला कामानिमित्य बरेचदा जाणं होतं..पण कधीच बोअर होत नाही तिथे. रेसिडन्सी आणि सिल्व्हर सॅंड पण चांगलं आहे. कार्निव्हल फक्त तिन दिवस असतो,ते तिन दिवस लक्षात ठेउन टुर प्लान करा. पणजी चा कार्निव्हल, ओपनिंग सिरोमनी खुप सुंदर असतो.. चुकवु नये असं काही.

 11. Cool Stuff 🙂 BTW my wife asked to try out bhosale’s khaanaval if Anantaashram is closed.. It is almost next to Anataashram.

  • प्रविण
   नेमका रविवार होता आणि दुपारची तिन साडेतिन ची वेळ. सगळी हॉटेल्स बंद झालेली होती. तसं महाराजाशेजारचं एक हॉटेल नाव विसरलो सुरु होतं, पण ते स्ट्रिक्टली व्हेज.. 😦 म्हणुन उमा पेट्रोल पंप जवळच्या एका हॉटेलमधे गेलो होतो. भोसले ची खानावळ माहिती नव्हती. पुढल्या वेळेस नक्की. 🙂

 12. सही आहे. हे उपवास लागायच्या आधी हाणून घ्यायचे म्हणजे आपण श्रावणाआधी गटारी करतो तसलाच प्रकार. आणि हो आज “प्रॉन्स वेफर्स” विशलिस्टमध्ये add झाले बरं का?

 13. वा छान. मी गोव्यातच असुन या वेळेस कार्नीवल बघु शकलो नाहि.गेल साल एका अपघातामुळे अंथरुणात आहे.पण तुमच्या मुळे तो आनंद मीळाला. धन्यवाद

  • हेमंत
   प्रतिक्रियेकरिता आभार..
   वर्ष भर अंथरुणात? बापरे खुप मोठा अपघात झाला असावा.. लवकर बरे व्हा हीच शुभेच्छा..

 14. छान योग जुळुन आला तुमच्यासाठी…मस्त धमाल वर्णन कार्निव्हलच…

 15. bhaanasa says:

  आत्तापर्यंत चार वेळा कार्निवल पाहिले आहे.:) एकदम भन्नाट प्रकार. मी मडगावला २ वर्षे राहिले असल्याने ही सगळी धमाल अनुभवली असली तरी त्यावेळी चौथीत होते. त्यामुळे बालपणातली मजा अजूनच वेगळी. मग लग्न झाल्यावर दोन वेळा गेलो होतो कार्निवलच्या वेळीच, पण पणजीत. सहीच. गेल्या दहा वर्षात मात्र योग आलेला नाही, आता तुझे इतके रसभरीत वर्णन वाचून पुढच्या वेळी योग जमवायला हवा. आमच्याही काही आठवणी जरा ताज्या होतील…:) प्रोसेशन संपल्यानंतरचे डान्स आणि धमाल मस्त असते. सगळे अगदी खुळावलेले असतात. नंतर श्रमपरिहारही जोरात चालतो. एकदा नचिकेतच्या मित्राने अचानक खिशातून रिवॉल्वर काढून दाखवून आमची बोलती बंद केली होती.पुढे दोन-तीन दिवस मी त्याला पाहिले की चक्क तिथून निघून जात होते.बाकी जरूर एकदातरी पाहावेच असेच असते कार्निवल. व्हिडिओज एकदम मस्त आहेत. फोटो???

  • तुझं लहानपण तर गोव्यालाच गेलंय, मग तर नक्की पुर्वी पाहिला असेल कार्निव्हल. रात्रीचा प्रोग्राम मला पहाता आला नाही, एक बिझिनेस डिनर होतं प्लान्ड म्हणुन. पुढल्या वर्षी नक्कीच जाईन तिथे सुटी काढून..:)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s