हिजडा….

हिजडा म्हंटलं की सिग्नलला तुमच्या कारच्या काचेवर टक टक करुन चिप मेकप केलेला, स्त्रीचे कपडे घातलेला हिरवटसर हनूवटीचा ( रापलेली दाढी खरडून खरडून चिकना चेहेरा केल्यामुळे झालेला चेहेरा)   तुम्ही पैसे देई पर्यंत टाळ्या वाजवत समोर लोकांचं लक्ष वेधून घेणारा- आणि पैसे देई पर्यंत जीव नकोसा करुन सोडणारा-नजरेपुढे येतोय का?

आता थोडे विचार बदलावे लागतील तुम्हाला.   जशी मिस इंडीया, मिस्टर इंडीया, मिसेस इंडीया वगैरे कॉम्पीटीशन्स असतात , तशीच आता एक…… मिस इंडीया सुपर क्विन कॉंपिटीशन!!!! आहे .   नियम फक्त एकच- या मधे जी मिस इंडीया सुपर क्विन होणार तीने  हिजडा असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की ही कॉम्पिटिशन हिजड्यांच्या साठीच आहे.

मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनौ वगैरे  दहा   ठिकाणी ऑडिशन्स झाल्या आहेत. प्रत्येक ठिकाणुन सुयोग्य असे ३० हिजडे निवडले गेले होते. त्यांचं गृमिंग, वगैरे करुन त्यांना  कसं वागायचं, कसं बोलायचं, याचं ट्रेनिंग देण्यात आलंय, नाहीतर कॅटवॉक च्या वेळेस  सवयी प्रमाणे स्टेज वर जाउन टाळ्या वाजवल्या तर ??? .

त्या ३० हिजड्यां पैकी   १२ निवडुन  त्यामधून एक  विजेता/ती हिजडा निवडला जायचा आहे. विजेत्याला मिळणार आहे दहा लाखाचं घसघशीत बक्षीस.!!

ह्या इव्हेंट्शी आपलं नांव जोडल्या गेलेलं कोणालाच  आवडणार नाही असं वाटतंय का तुम्हाला??  जर उत्तर हो असेल तर तुमच्या सारखे   संकुचित (?) बुर्झ्वा मनोवृत्तीचे तुम्हीच . अहो सेलेना जेटली, झिनत अमान आणि मुंबईच्या मेयर श्रध्दा  जाधव सारख्या सिलेब्रिटीज नी  या कॉम्पीटीशनचे जज होण्याचं कबुल केल्याचं पेपरला आलंय.याच सोबत सिमा बिस्वास नावाची एक नटी पण या इव्हेंट्शी जोडलेली आहे. आणि या कार्यक्रमाला चक्क प्रायोजक पण लाभलेला आहे. असो..

आज सकाळचा टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं. म्हणे कल्याणला एका हॉलिडे रिसॉर्ट मधे हिजड्यांची सौंदर्य स्पर्धा सुरु आहे. ह्या कॉंटेस्ट मधे  हिजडे ( देशभरातुन आलेले) भाग घेण्यासाठी आले आहेत.त्यांचा फोटो   जेंव्हा टाइम्स मधे  पाहिल्यावर आधी  खरंच वाटत नाही की हे हिजडे आहेत म्हणुन. तरी पण केवळ छापील बातमी आहे म्हणून विश्वास ठेवावाच लागतो. अतिशय सुंदर दिसणाऱ्या मुलींचे (?) फोटो आहे ते. या मधे पहिला नंबर येणाऱ्या ’मिस हिजडा’ ज्याला ’मिस इंडीया सुपर क्विन’ चा किताब  मिळणार आहे तिला वर दिल्या प्रमाणे  दहा लाखाचं पहिले  पारितोषक पण देण्यात येणार आहे. त्याच सोबत सेलेना जेटली ने स्वतःकडुन पन्नास हजाराचं बक्षीस द्यायचं कबुल केलंय.

या कार्यक्रमाची प्रायोजक १२ नुन एंटरटेनमेंट ही  लक्ष्मी चीच आहे , ती म्हणते की या किन्नरांनी क्लोझेट मधुन बाहेर यावं आणि त्यांना पण नॉर्मल जीवन जगण्याचा अनुभव घेता यावा म्हणुन ही कॉंपीटिशनचे आयोजन केलेल आहे. या मुळे कसा फायदा होईल क्लोझेट मधुन बाहेर येण्यासाठी ते तर माझ्या लक्षात येत नाही. पण एक एंटरटेनमेंट इव्हेंट म्हणून या कडे पाहिलं तर जास्त योग्य ठरेल. हया लक्ष्मीची एक एन जी ओ पण आहे… आहात कुठे तुम्ही??

येत्या रविवारी वेस्टर्न सबर्ब मधल्या एका फाइव्ह स्टार हॉटेल मधे ह्या कॉम्पीटिशनची फायनल होणार आहे- अजूनही या हॉटेलचे नांव गुप्त राखण्यात आलेलं आहे. अहो अमिताभ बच्चनच्या मिस वर्ल्ड शो ला  संस्कृतीच्या रक्षकांनी   जेंव्हा सोडलं  नाही, तेंव्हा यांच्या या कार्यक्रमाला काही सांस्कृतिक रक्षक बाधा आणतील अशी शंका असेल ऑर्गनायझर्सला. टीव्ही चॅनल्स तर अशा सनसनी खेज बातम्यांकडे डोळे लाऊनच बसलेले असतात. त्यांना थोडं आधी सांगितलं की इथे या वेळेस राडा होणार  आहे , तेंव्हा सगळेच कामं सोडुन ते तिथे बरोबर हजर रहाणार!!!

लक्ष्मी नारायण त्रिपाठी!!  कदाचित याला तुम्ही पाहिले असेल, टिव्हीवर सच का सामना मधे बिनधास्त उत्तर देत गेलेला हिजडा म्हणजेच हा /ही. थोडं कन्फ्युजन होतंय त्याला तो म्हणावं की ती ? .तिस वर्ष वयाची ही लक्ष्मी नारायण त्रिपाठी , एक हिजडा गुरु , हल्ली मुक्काम ठाणे . ही सौंदर्य स्पर्धा जी आहे तिच्या साठी स्पॉन्सर्स पासुन तर परीक्षक मिळवायचे काम लक्ष्मीच्याच  अविरत प्रयत्नाने हे शक्य झाले आहे .पुरुषाच्या शरीरामधे ट्रॅप झालेलं स्त्री चा आत्मा अशी व्याख्या करता येईल हिजडा या शब्दाची. त्याच्या जास्त टेक्निकल्याटीज मधे जात नाही, कारण सगळ्यांनाच काय ते माहिती आहे. हे नांव त्या बातमी मधे वाचल्यावर उत्सुक ते पोटी गुगल केलं, तर बरंच काही हाती लागलं.

काही दिवसापुर्वी न्युयॉर्कला झालेल्या एका एचाआयव्ही च्या अवेरनेस साठी झालेल्या युनायटेड नेशन्सच्या मिटींग मधे लक्ष्मी ने  भाग घेतला होता.युनायटेड नेशन्स्च्या सिव्हिल सोसायटीची ही लक्ष्मी संपुर्ण जगातून एकच हिजडा मेंबर आहे – आता याचं कौतुक करायचं ते तुम्हीच ठरवा. डॅनिश फिल्म फेस्टीवल मधे स्टिफन व्हाईट , आणि केट बॉर्न्स्टेन बरोबर हिने हजेरी लावली होती. मला वाट्त की सुशिक्षीत असलेला हिजडा ती एकटीच आहे. तिचा एक ब्लॉग पण आहे.   तसेच फेस बुक वर, माय स्पेस वर पण तिला तुम्ही शोधू शकता. १२ जुलै २००८ ला सलमान खान बरोबर ह्या लक्ष्मीने दस का दम मधे भाग घेतला होता.

याच विषयावर एक डॉक्युमेंट्री होती ती पण पाहु शकता इथे. एका प्रोफेशनल फोटो ग्राफरने काढलेले तिचे फोटो फ्लिकरवर आहेत.

भारतात ’ट्रान्स जेंडर्” ला थोडी वेगळी वागणूक दिली जाते. समाजात स्थान नाही हे तर आहेच, परंतु त्याच सोबत हिजड्यांना व्होटर्स आय कार्ड , बॅंक अकाउंट्स आणि इतर शासकीय  नोकऱ्यात स्थान नाही. सेक्स्युअल प्रिफरन्स  हा पर्सनलाइझ्ड असतो त्यामुळे जर एखाद्याला टीजी म्हणून जगायचं असेल तर त्याच्या बेसिक ह्युमन राईट्स ला कसे काय नाकारू शकतात कायदे? ह्या १८५७ च्या कायद्यांचे पुनर्लेखन झाले पाहिजे. हे असे कायदे आहेत म्हणून मला माहितीच नव्हतं.

काही दिवसांपूर्वी गोंदीया जवळच्या एका गावातून एक हिजडा नगराध्यक्ष म्हणून निवडुन आल्याची बातमी पण वाचण्यात आली होती. म्हणजे तुम्ही इलेक्षन ला उभं राहू शकता, पण मतदान करु शकत नाही- काय मुर्खपणा आहे हा?? हे जुने नियम आता बदलायलाच हवे असे वाटते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक, Uncategorized and tagged , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to हिजडा….

 1. नवीनच ऐकतोय हे.. 🙂

  • फक्त तामिळनाडु मधे डिफरंट सेक्स म्हणुन या लोकांना ओळख पत्र दिलेली आहेत आणि व्होटींगचा पण अधिकार आहे.
   महाराष्ट्रात ह्यांची केस नोव्हेंबर पासुन कोर्टात विचाराधिन आहे. कधी निर्णय येतो कोण जाणे.

 2. मिस सुपरक्वीन अश्या पेजंट मुळे सगळाच प्रकार उथळ वाटत असला तरी माणूस म्हणून प्रत्येकाला समान सन्मान मिळण्याच्या दृष्टीने हे एक चांगले पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • निरजा
   पहिल्यांदा ब्लॉग वर आलात..स्वागत..
   मिस सुपरक्विन ला पुरेशी प्रसिध्दी मिळाली तरी खुप झालं. पण जसे तामिळनाडू सरकारने त्या लोकांची आयडेंटीटी स्विकारली आहे, आणि त्यांना मानाने जगण्याचा अधिकार दिलाय तो आपल्या इथे पण देण्यात यायला काही हरकत नाही.
   पेजंट मुळॆ काही फायदा जरी झाला नाही, तरी भरपुर प्रसिध्दी मात्र मिळेल असे वाटते.

 3. Ashish says:

  अतिशय छान पोस्ट! एक नवा विषय वाटला. पण काही म्हणा, माहिती छान कलेक्ट केली आहे तुम्ही! आणखी जस तुम्ही म्हणताय तस जुन्या कायद्यात बदल करणे ही आज काळाची गरज झाली आहे!

 4. कल्याण जवळ म्हणजे टिटवाळ्याला ही स्पर्धा सुरू आहे ही टाइम्सची बातमी सकाळी वाचली होती… त्या बातमी पेक्षा झकास झालीय तुमची पोस्ट.

  • गजानन
   धन्यवाद. अहो मी सकाळी बातमी वाचली आणि मग गुगल केलं तर इतकी माहिती मिळाली त्या लक्षमी बद्दल. जशी जशी नविन माहिती उलगडत गेली, तसा मी अजुनच आश्चर्यचकित होत गेलो. शेवटी जेंव्हा माय स्पेस – फेस बुक वर पाहिलं, तेंव्हा तो तर परम बिंदु होता आश्चर्याचा.
   नंतर कळलं की या लक्ष्मी चं एक एनजीओ आहे.. तेंव्हा लक्षात आलं की एखादा एज्युकेटेड व्यक्ती किती बदल आणु शकतो एखाद्या समाजात ते.

 5. सकाळी म,टा, मध्ये ही बातमी वाचली होती, पण हसण्या पलिकडे यावर लक्ष दिले नाही, पण हा लेख वाचुन जास्त माहिती मिळाली.

  • आनंद
   त्या लोकांना पण समाजात स्थान, किंवा सरकारी नौकऱ्या मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

 6. Sagar says:

  kaka
  Welcome 2 Sajjanpur navacha ek cenema aahe…Tyat ek hijda नगराध्यक्ष zalyach dakhaval aahe…Baki ha Hijda Prakar kai aahe he mala ajun purn kalal nahi 😀

  • सागर
   शबनम आंटी म्हणुन एक एम एल ए पण निवडुन आला होता.
   आणि हिजडा म्हणजे काय ते माहिती करुन घेण्याची गरज पण नाही. जर खुपच इच्छा असेल तर गुगल कर..

 7. Manmaujee says:

  Nehamipramanech chhan post aahe. Khup vegala n mahitipurn lekh.

 8. Aparna says:

  या फ़ोटोतल्या लक्ष्मीला मी कधीतरी एका चॅनेलवर ऑनलाइन पाहिलं होतं…आता कार्यक्रमाचं नाव माहित नाही…
  मला पडलेल्या अनेक फ़ालतु प्रश्नांपैकीच एक म्हणजे जसं आपल्याकडे ही लोकं टाळ्या वाजवत फ़िरतात आणि त्यामुळे वेगळीच दिसतात तशी परदेशात दिसली नाहीत कुठे…मग काय हे फ़क्त आपल्याकडची पैदाईश आहे आणि इतर ठिकाणी हे नॉर्मल राहतात?? असो……..खरंच तद्द्नन भिकार प्रश्न आहे …
  पण पोस्ट सॉलिड झालीय…:)

  • अपर्णा
   तिची सच का सामना मधली लिंक दिलेली आहे ब्लॉग वर. कदाचित त्यातच किंवा सलमान खानच्या शो मधे पाहिलं असेल.

   ती रहाणी जी इथे ऍडॉप्ट करतात त्याचं कारण, त्यांना भारता मधे पैसे मिळवण्यासाठी काहीच करता येत नाही. नौकरी करणे तर अशक्यच.. अशा स्थितीत वेगळी ऒळख जपण्यासाठी एक ब्रॅंडींग आहे एक प्रकारचं ते असं मला वाटत्तं.

 9. Vikramaditya says:

  Great initiatives………..after all they are also part of society.

  • विक्रमादित्य
   ’ते’ किंवा त्यांचं सेक्स्युअल ओरिएंटेशन वेगळं म्हणुन त्यांचा नॉर्मल जगण्याचा अधिकार हिराउन घेतलाय आपल्या समाजाने. एक सुशिक्षीत हिजडा झाल्या बरोबर किती फरक पडु शकतो बघा?

 10. bhaanasa says:

  महेंद्र,खूपच नवीन माहिती मिळाली. अपर्णाशी सहमत. मलाही नेहमी हा प्रश्न सतावतो आणि वाटते की त्यांचा नाईलाजच असावा. म्हणून मग काहिसे अग्रेसिव्ह व किळसवाणे वर्तन हिजडे करताना दिसतात. एका महत्वाच्या विषयावरील उत्तम पोस्ट.

  • त्यांना समाजात स्थान नाही. काहीच करु शकत नाहीत ते. परदेशातही क्रॉस ड्रेसिंगचं फॅड आहेच नां. फक्त ते लोकं स्प्लिट पर्सनलिटीचे असावेत. समाजात- नौकरी वगैरे करतांना नॉर्मल आणि नंतर पर्सनल लाइफ वेगळं. इथे तसं शक्य नाही.. त्यांना सरकारी तर सोडच पण प्रायव्हेट कंपनितही नौकरी दिली जात नाही- म्हणुनच हा असे बिहेविअर करतात लोकांनी पैसे द्यावे म्हणुन.

 11. आपल्या इथेही कसलाही फ़ॉर्म भरताना लिंग म्ह् णुन पुरुष किंवा स्त्री हे दोनच पर्याय असतात.मग हया लोकांनी काय करायचे, ह्याना कसलाच अधिकार नाही का असा प्रश्न मागे कधीतरी मला पडला होत. ही माणस नाहीत का.मग त्यांच्यासमोर तो एकच मार्ग राहतो जबरदस्ती भीक मागण्याचा…ही आपल्या धोरणांची हार आहे दुसर काही नाही..असो उत्तम माहिती दिलीत इथे.

 12. Maithili says:

  Baap rre……..
  Miss India Super Oueen Competition…..
  Navinach aikatyey….
  BTW, Kharay tumache ek sushikshit vyakti khoop changale badal ghadavun aanu shakato……

  • मैथिली
   मला असं वाटतं की त्यांना पण आपल्या प्रमाणेच जगण्याचा अधिकार आहे – जो आज घटनेने किंवा कायद्याने हिरावुन घेतलाय. बहुतेक काहीतरी होईल असे वाटते – कमित कमी इलेक्शन कार्ड /रेशन कार्ड तरी मिळेल त्यांना.
   पण गव्हर्नमेंट नौकरीत जागा मिळायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

 13. Mala tar ya lokanvishayi nehemich ek kutuhal ani bhiti vatat aali ahe. Miss super queen spardha – eikave te ek ek navalach. khupach hatake mahiti. Madhe ekada NGC var dakhavale hote ya lokanbaddal pan kahi khas navhate.

  • कुतुहल सगळ्यांनाच असतं , फक्त कोणी मान्य करित नाही. भिती वाटण्यासरखे ते मुद्दाम वागतात,तुम्ही लवकर पैसे द्यावेत म्हणुन.

 14. Priti says:

  The Laxmi that you are refering to is seen in many of Hindi films. Also last time a documentart was made on her by discovery chanel. This Laxmi has also featured on BBC and other prestigious channel for contribution to society…

  • हा लेख लिहिल्या नंतर तिचे बरेच इंटर्व्ह्यु सापडले नेट वर. बरंच काम केलंय तिने, आणि करते आहे. जर कोर्टाने मान्य केले तर कमित कमी व्होटींगचा अधिकार तरी नक्कीच मिळु शकतो.

 15. varsha says:

  महेंद्र,

  चार-पाच वर्षांपूर्वी सिंगापूरला गेले होते. तिथे प्रसिध्द असलेला नृत्याचा एक कार्यक्रम पाहिला. अत्यंत देखण्या, बांधेसूद अशा दहा बारा तरुणींचे ते नृत्य विलोभनीय होते. कार्यक्रम संपल्यावर आमच्या गाईडने सांगितलं की त्या नृत्यांगना म्हणजे तृतीयपंथी होते. आजही ते खरं वाटत नाही.
  इतक्या नितळ त्वचेच्या, अतिशय प्रमाणबध्द शरीर असलेल्या, मोहक आणि हंसऱ्या चेहऱ्याच्या त्या लोभस तरुणींना तृतीयपंथी कसं म्हणावं?
  पण ते खरं होतं.
  त्यांना मिळणारी प्रचंड लोकप्रियता कुठे आणि आपल्याकडच्या तृतीयपंथियांना मिळणारी हीन वागणूक कुठे.
  पुन्हा शेवटी प्रश्नांची ही मालिका तिथेच जाऊन पोहचते की, निसर्गाने केलेल्या असंतुलनाला जनप्रवाहात सन्मानाने मिसळण्यासाठी त्या देशातील समाजाने व सरकारने केलेले प्रयत्न आणि आपल्या देशात होत असलेली त्यांची उपेक्षा.
  शेवटी समाजाचा प्रत्येक घटक हा देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतो ते खरंच आहे.

  वर्षा

  • बॅंकॉकला पण अशाच प्रकारचा कल्चरल कार्यक्रम असतो त्या लोकांचा. त्यांना टोटली आउटकास्ट करुन टाकलंय. नौकरी नाही- सरकारी तर नाहीच.. पण प्रायव्हेट कंपनीत पण नाही..

   इतरही कन्स्ट्रेंट्स आहेतच. भारतामधे जर कोणी हे असे जिवन मान्य करत असेल, तर तो स्वतःचे सगळे अधिकार सोडण्याची तयारी ठेवुनच…

   एक स्वतंत्र भारताचा नागरीक म्हणुन मुळ अधिकार द्यायलाच हवेत त्यांना. ह्या विषयावरचे जे कायदे आहेत ते अगदी व्हिक्टोरिअन काळापासुन ब्रिटिशांनी लागु केलेले कायदे आहेत. त्यांची दुरुस्ती नक्कीच व्हायला हवी..

 16. लक्ष्मीला ब-याच वर्षांपासून ठाण्यात पहाते आहे. ती नृत्यात तर प्रविण आहेच पण तिचं वागणं बोलणं अत्यंत सुस्वभावी आहे. तिच्या जवळ जरी जाऊन उभं राहिलं तर एक प्रकारचा ऑरा जाणवत रहातो. मला नक्की माहित नाही पण तिच्यासारखा हिजडा पाहिला की आपोआप चर्चा ही होतेच, त्यावरून असं कळलं की तिच्या घरच्यांचा तिला बराच पाठींबा होता. दुर्दैवाने असं सगळ्याच हिजड्यांच्या बाबतीत घडत नाही. आपल्या देशात हिजड्यांकडे पहाण्याची वृत्तीही निराळीच आहे.

  • मला अजिबात काही कल्पना नव्हती या बद्दल. पण जेंव्हा गुगल केलं ,तेंव्हा तिच्याबद्दल बरंच काही समजलं.
   घरच्यांकडुन पाठिंबा मिळणं तसंही कठीण आहे. कारण समाजात हा प्रकार अजिबात मान्य नाही, आणि त्यामुळे सामाजीक बायकॉट ची पण शक्यता असते. एक मुलगा असा झाला, की इतर मुलांच्या लग्नासाठी पण त्रास होतोच..

   हिजड्यांना नौकरी करु देणे सुरु करावे, निम्म्याहुन अधिक प्रॉब्लेम्स संपतील असं मला वाटतं.

 17. रोहन says:

  आयला … सोलिड पोस्ट. असे पोस्ट तूच करू शकतोस… 🙂 तुझे पोस्ट खुप विचार करायला लावणारे असतात… 🙂

  ती लक्ष्मी आहे ना तिला मी स्वतः भेटलोय गडकरी रंगायतनला.

  • एक बातमी वाचली पेपरला, आणि मग शोध घेतला नेट वर. या पोस्टमधल सगळं नेटवरूनच घेतलंय ..

 18. babarao Ambhure says:

  आपल्या देशात पण त्याला मान मीळावा हच आपेक्षित

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s