दिल है छोटासा- छोटीसी आशा…

त्यांचा काय दोष?? वय फक्त ३ ते १८ . जगण्याची प्रचंड लालसा. कोणाला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय, कोणाला पोलिस इन्स्पेक्टर बनून गुन्हेगारांना हातकड्या घालायच्या आहेत. कोणी म्हणतंय की मला तर पायलट व्हायचंय आणि विमान उंच उंच आकाशात उडवायचय. हे इथे का लिहतोय? प्रत्येकच मुलाचं स्वप्न असतं – असंच काहीतरी करायचं.
म्हणतात नां, मॅन प्रपोझेस , गॉड डिस्पोजेस!!  असंच काहीतरी होतं, आणि होता होता हातातोंडाशी आलेला घास खाली पडतो. एखाद्याला कॅन्सर, थॅलेस्मिया ( बहुतेक बरोबर लिहिलं असावं) किंवा तसाच एखादा जीवघेणा आजार होतो. तळ हातावरची आयुष्य रेषा एवढी तोकडी का? असं उगाच वाटायला लागतं.

ख्रिस्तोफर- पहिली मेक अ विश ची केस

ई.स. १९८० , अरिझोना- ७ वर्ष वयाचा एक लहान मुलगा- क्रिस्टोफर… ब्लड कॅन्सरने आजारी.अगदी थोड्याच दिवसांचा सोबती. सगळ्यांनाच कल्पना होती, की हा आता फारतर महिना – दोन महिने सोबत रहाणार. ऍरिझोनाच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी ने एक जगावेगळं पाउल उचललं. त्या मुलाच्या मापाचा कस्टममेड युनिफॉर्म तयार करण्यात आला,  हेल्मेट, बॅज वगैरे सगळं काही. त्याच सोबत एक हेलिकॉप्टर राईड सुध्दा. एक दिवस त्या मुलाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करु देण्यात आलं. त्या मुलाची आयुष्यातली सगळ्यात मोठी इच्छा पुर्ण केली गेली!!

त्या मुलाची इच्छा पुर्ण केल्यानंतर त्याच्या चेहेऱ्यावरच ह्सू, आनंद बघून एका सोशल गृपला इन्स्पायरेशन मिळालं, की आपण असा एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन सुरु करू शकतो, की जी अशा अगदी (टर्मिनली इल) मृत्युच्या छायेतल्या पेशंटसच्या इच्छा पुर्ण करेल. पण…प्रत्येकच गोष्टी मधे एक पण असतोच. जरी सगळे लोकं एकाच विचाराचे असले तरीही अशी ही मेक अ विश फाउंडेशनचे पहिले चॅप्टर  तीन वर्षा नंतर म्हणजे अमेरिकेत १९८३  मधे सुरु होऊ शकले.

कुठलाही मुलगा, किंवा मुलगी ज्यांना फिजिकल किंव इतर कुठलाही आजार आहे, आणि त्यांची वयाच्या १८ वर्षाच्या पेक्षा जास्त जगण्याची शक्यता नाही,  त्यांच्या इच्छा जाणून घेउन पुर्ण करण्याचे काम ही ऑर्गनायझेशन करेल असे ठरले.

मधुलिका लतादिदींना भेटतांना

त्या नंतर थोड्याच दिवसात या ऑर्गनायझेशन ने आज पर्यंत जगातल्या १लक्ष एकोणनव्वद हजार मुलांच्या इच्छा पुर्ण केल्या आहेत. या इच्छा कुठल्या प्रकारच्या होत्या?? तर मला लोकल ट्रेन चालवायची आहे, विमान उडवायचं आहे, एखाद्या मोठ्या आयडॉलला भेटायचंय, कोणाला लॅप टॉप हवाय, कोणाला न्वीन पडदे हवे आहेत रुमला, स्नो बोर्डिंग, सफारी , वगैरे विश तर आहेतच , पण सोबतच  अगदी लहान विश पासुन तर कुठलीही मोठी विश पुर्ण करण्याइतका पैसा आणि इच्छा शक्ती त्यांच्याकडे आहे.आज अशी परिस्थिती आहे की हे लोकं सध्या दर ४० मिनिटाला एक विश पुर्ण करताहेत – अशा मुलांची!!

नवनित

एका  नवनीत नावाच्या मुलाला कॅसीओ हवा होता. आणि तो पण मिलिंद सोमण कडुन.. तसेच मधुलिका नावाच्या एका मुलीला लता दिदींना भेटायचं होतं, लतादीदींनी ताबडतोब होकार दिला. मधुलिकाची परिस्थिती इतकी वाईट होती, की दुसऱ्याच दिवशी लतादीदी ची अपॉईंटमेंट घेउन तिची भेट घालुन दिली गेली. तिच्या चेहेऱ्यावर  लता दिदी भेटल्यावरचं सफलतेचं हसू बघा.जेंव्हा लता दिदी भेटल्या, तेंव्हा तर मधुलीका  आधी अगदी रडायलाच लागली होती.

काजोलची भेट .. स्मृती दालमियास्मृती दालमिया. हिला काजोलला भेटायचं होतं. तब्येत इतकी वाईट की ती प्रवास करु शकत नव्हती, तेंव्हा काजोल स्वतः तिला दवाखान्यात जाउन भेटली.भेट जवळपास पंधरा मिनिटे चालली. नंतर अगदी थोड्याच दिवसात………..!!!!

पुनित.. वय वर्ष दहा. याची इच्छा होती झाकीर हुसेन कडून तबला शिकायची. पंडीतजींनी त्याला भेटून खास तबला शिकवला. ह्या घटनेमुळे ते इतके हेलाउन गेले की ते या संस्थेशी संलग्न झालेले आहेत.

पुनित पंडीत झकीर हुसेन कडुन तबला शिकतांना

’मेक अ विश’ या एनजीओ ने भारतामधे आजपर्यंत २८०० च्या वर इच्छा पुर्ण केल्या आहेत. बरेच सिलेब्रिटिज पण ह्या संस्थेशी जुळले आहेत. अजय देवगण हा पण त्या पैकीच एक. असं ऐकण्यात आलंय की जेंव्हा एका मुलाने माधुरी दिक्षितला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, ( तिचं करिअर तेंव्हा अगदी अत्युच्च पातळीवर होतं) तेंव्हा तिने भेटण्यास तयारी दर्शवली नव्हती. असो.

हे सगळं  म्हणजे वर दिलेल्या घटनां प्रमाणे घटना, आपण नेहेमी वाचतो. काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला एक बातमी होती. एका लहान मुलाला लोकल ट्रेन चालवायची इच्छा होती ती पुर्ण केली या लोकांनी. तेंव्हापासून कुतुहल होतं, की यांचं काम चालतं तरी कसं?? हे समजून घ्यायची.

या लोकांना समजतं कसं? की कोणाची काय विश आहे ते? कुठलाही मुलगा किंवा मुलगी ज्यांनी इतर कोणाकडुन आपली विश पुर्ण करुन घेतली नसेल अशाच लोकांना अप्लाय करता येतो.  या साठी मुलाचे आई वडिल, नातेवाईक, वेल विशर्स वगैरे या एनजीओ कडे अप्ला करु शकतात. या साठी डॉक्टरांचं मत पण विचारात घेतलं जातं. त्या मुलाला किंवा मुलीला लाइफ थ्रेटनिंग आजार झाला असेल तर त्या मुलाच्या विशचा विचार केला जातो.

मुलाची कुठली विश असु शकते?? अगदी सिंपल रुल आहे,

१) माझी इच्छा …. अमुक ठिकाणी जाण्याची आहे.

२) माझी इच्छा .. मला ही गोष्ट हवी आहे .

३)माझी इच्छा … अमुक माणसाला – (सिनेमा हिरो,नेता,खेळाडु वगैरे कोणीही) भेटायची आहे.

४)माझी इच्छा…  .. ( ट्रेन ड्रायव्हर, पायलट वगैरे काहीही … असु शकते हे ) हे व्हायची आहे..

मुलाची खरी विश काय आहे?? हे कसं समजतं? अगदी सोपं आहे, या एनजीओ चे वॉलेंटीअर्स आहेत, ते त्या मुलाला बरेचदा भेटून गप्पा वगैरे मारतात आणि त्या मुलाच्या मनातली खरी खरी इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. एकदा ती इच्छा माहिती झाली , की मग ती पुर्ण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला जातो.

ऑन लाइन ऍप्लिकेशन करण्याची पण सोय आहे. जर तुमच्या माहितीतला कोणी असेल तर त्यांना ही माहिती देउ शकता, किंवा त्यांच्या ऐवजी तुम्ही पण हा फॉर्म भरु शकता..

दिल है छोटासा- छॊटीसी आशा, चांद तारोंकॊ छुनेकी आशा……आणि या   आशा पुर्ण करणाऱ्या ह्या   ऑर्गनायझेशन्स चं कौतुक  केल्याशिवाय रहावलं नाही म्हणून हे पोस्ट..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , . Bookmark the permalink.

54 Responses to दिल है छोटासा- छोटीसी आशा…

 1. खरच कौतुकास्पद आहे हया संस्थेच काम.
  धन्यवाद ही माहिती इथे सादर केल्याबद्दल.

  • यातल्या बऱ्याच मुलांच्या इच्छा वाचल्या, पण एका तिन वर्षाच्या मुलीची इच्छा वाचल्यावर मात्र डोळे ओलावले. वय वर्ष ३, फार तर दोन चार महिने आयुष्य शिल्लक. एका शाळेत तिला टिचर म्हणुन पाठवलं गेलं, केजीच्या( तिच्याच वयाच्या ) मुलांना शिकवायला.
   ती पण अगदी मस्त तयार होऊन गेली होती शाळेत. पर्स वगरे लटकवुन. शाळेतल्या मुलांना पण आपल्याच एवढी टीचर खुप आवडली .. अशा अनेक लहान सहान इच्छा पुर्ण केल्या आहेत त्यांनी, की ज्या कदाचित कधीच पुर्ण झाल्या नसत्या.

 2. Vidyadhar says:

  Agadi hrudaysparshi ahe he. Me aikun hoto hyabaddal. Aaj tumhi detailvar sangitlat. Dhanyawaad.

  • विद्याधर
   काही इच्छा बघा.. ही अजुन एक..
   एका मुलीला कॅन्सर झालेला होता. अंग फार दुखायचं केमोथेरेपी मुळे, तिची इच्छा काय असेल???
   तिला फक्त एक हॉट वॉटर टब हवा होता, अंग दुखलं की गरम पाण्याने शेकुन काढायला. घरची एकदम गरीब, म्हणजे ती टब ही गोष्ट खुप मोठी झाली नां.??

 3. फारच हृदयस्पर्शी उपक्रम आहे. आपल्याला ह्या इच्छा छोट्या वाटल्या तरी त्या मुलांसाठी त्या किती अनमोल आहेत नाही?

  • सिध्दार्थ
   अगदी खरं बोललास.. आपण त्यांच्या इच्छा सहज पुर्ण करु शकतो, मनात आणलं तर! त्या साठी कॅटलिस्ट म्हणजे ही एनजीओ. प्रत्येकच इच्छेसाठी पैसा पाहिजे असे नाही. फक्त इच्छा शक्ती हवी.

 4. Khup chhan. Hi sanstha ani tumacha lekha donhi.

  aani agadi perfect title.

  Salil Chaudhary

  • सलिल
   बरेच दिवस झालेत हा विषय मनामधे घोळत होता. आज मुहुर्त लागला यावर लिहायचा. काही महिन्यापुर्वी एक न्युज होती लोकल चालवायला दिली एका मुलाला म्हणुन., त्यावरुन स्फुर्ती मिळाली.

 5. कौतुक करावं तितके कमी या संस्थेचे..अतिशय छान उपक्रम…
  अमुल्य माहितीसाठी धन्यवाद!

  • भारतामधे अजुन हवी तितकी फोफावली नाही ही संस्था याचं वाईट वाटतं. एके ठिकाणी वाचलं की यांना मिलियन्स मधे डोनेशन्स मिळतात. एखाद्या मुलाचे आई वडील, आपलं मुल गेलं की इथे यांच्या संस्थेला डोनेशन देतात.

   आपल्याकडे कोणी माहिती असेल असा आजारी मुलगा, मुलगी, त्यांची माहिती कळवु शकता त्या साईटवर..

 6. ह्या उपक्रमाबद्दल ऐकला होतं. मला वाटतं एकदा त्यांनी मुलांना helicopter ची सहल पण घडवली होती. हा उपक्रम अजून चालू आहे हे ऐकून बरंवाटलं.

  • आता तर अगदी फुल्ल फ्लेज्ड सुरु आहे हा उपक्रम. दर चाळीस मिनिटांना एका मुलाची इच्छा पुर्ण करतात ते लोकं. अतिशय क्रेडीटेबल आहे ही गोष्ट्.

   एका मुलीला विमान चालवायचं होतं, ते पण अरेंज केलं यांनी, भारतातल्या एका मुलाला डिस्ने लॅंड दाखवुन आणलं.. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या … सगळ्याच अगदी ह्रदयस्पर्शी.. हेलिकॉप्टर सहल, हवाई सहल, स्टार क्रुझ वगैरे बरंच काही केलंय..

 7. वा. खरंच महान संस्था आहे ही. मी यांच्याबद्दल ऐकलं होतं. पण तपशील तुमच्या पोस्टमुळेच कळला..

  • हेरंब,
   माझी पण इच्छा आहे त्यांच्यासोबत काम करायची. मेल टाकलाय व्हॉलेंटीअर म्हणुन तयारी आहे हे सांगायला.

 8. Thanks for sharing this. This is really touching.

  • प्रविण
   धन्यवाद..

  • ह्यांच्या बद्दल अजुनही मी वाचतो आहेच.. एका मुलाला भारतामधे एक पोपट हवा होता=- फक्त!! अशा अनेक लहान सहान इच्छा आहेत. मी स्वतः मुंबई चॅप्टरला व्हॉमेंटीअर म्हणुन नांव नोंदवतोय.

 9. raj jain says:

  अतिशय उत्तम माहीती.

  तुम्ही हा लेख मला आपल्या संकेतस्थळावर टाकण्याची परवानगी द्यावी अथवा आपण स्वतः हा लेख संकेतस्थलावर लिहावा अशी माझी एक वाचक म्हणून इच्छा आहे जेणे करुन हा लेख खुप लोकापर्यंत पोहचेल व असा चांगला उपक्रम लोकांच्या नजरेत राहील.

  धन्यवाद.

  http://www.mimarathi.net
  राज जैन

  • वाचतांना फारच वाईट वाटलं, एका भारतिय मुलीला फक्त एक बाहुली हवी होती.. बस्स..
   तुम्ही अवश्य हा लेख तुमच्या साईटवर टाकु शकता.
   धन्यवाद..

 10. raj jain says:

  sorry !

  अतिशय राहवले नाही म्हणून तुमच्या लेखाचा दुवा व थोडीशी माहीती मी येथे दिली

  http://www.mimarathi.net/node/728

 11. Onkar Danke says:

  माणुसकी हाच खरा धर्म या उक्ती प्रमाणे काम करणारे खूप कमी व्यक्ती आणि संस्था या समाजात आहेत. अशाच एका दुर्मिळ संस्थेची माहिती तुमच्या ब्लॉगमुळे कळाली. धन्यवाद.

  • ओंकार
   भारतामधे ही संस्था जास्त काम का करु शकली नाही? हेच समजत नाही. कदाचित लोकांमधे अवेअरनेस नसावा..

 12. bhaanasa says:

  अतिशय कौतुकास्पद आणि मोलाचे कार्य. खरेच किती छोट्याछोट्या गरजा-इच्छा असतात पण पूर्ण होत नाहीत. कधी परिस्थितीमुळे तर कधी त्या इच्छांच्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे. अशा संस्थांमुळे व काही माणसांच्या संवेदनशील असण्याने या जात्या जीवांना आनंद मिळतो. महेंद्र,पोस्ट आणि टायटल दोन्ही भावले.

  • प्रत्येकाच्याच मनात एक संवेदन शिल कोपरा असतोच. तोयालाच हात घालायचा हा एक छोटासा प्रयत्न!!
   कमी कमी दहा पंधरा लोकांनी जरी काही मुलांची नांवं प्रपोज केली तरी खुप झालं.

 13. वाह..अतिशय चांगली माहिती दिलीत काका. लोकल ट्रेन बद्दल वाचला होता, पण माहीत नव्हता ही संस्था एवढी जुनी आणि त्यांच्या कार्यात तत्पर आहे. मी आजच एका मुलाच नाव पण एंरोल केलाय. खुप भावस्पर्शी आहेत अनुभव सगळयांचे. नाव पण किती मस्त आहे ह्या संस्थेचे.. मेक अ विश.

  God Bless them..

 14. Manmaujee says:

  ह्या उपक्रमाबद्दल मध्ये एकदा ऐकल होत. ह्या मुलांच्या इच्छा पण किती निरागस आहेत ना?? अगदी त्यांच्या सारख्याच. . . अशा संस्थाच कौतुक हे केलच पाहिजे. ह्या पोस्ट साठी धन्यवाद!!!!

  • एका मुलीची ती बाहुलीची इच्छा तर अगदी मनाला लागुन गेली. मृत्युमुखावरच्या मुलीसाठी आईवडील साधा बाहुलीचा खर्च पण करु शकत नाहीत अशी परिस्थीती आहे आजही आपल्या देशात.. वाईट वाटलं.

 15. फारच स्तुत्य उपक्रम आहे या NGO चा. ज्या मुलांच्या विश पुर्ण झाल्या ती मुले आणि त्यांचे पालक किती खुश झाले असतील. जिवनात असे काही तरी करायला हवे. खरे satisfaction मिळेल.

 16. Pushpraj says:

  kaka dhnyawad mahiti dilya baddal…kharach khup kautuk karavese vatate…hya lokanche…..

 17. Supriya says:

  Mahendraji khupach chan mahiti dili aahe tumhi.Kharokharach khup chan upakram aahe.

 18. Vikramaditya says:

  May be God lies in the mind of that Angel,who put forth this idea & still working on it……Great !!!!

  • विक्रमादित्य
   आमेन..!!! ॠग्वेदाम्धे याच अर्थाची एक ऋचा आहे.. वाचल्यासारखी वाटते.. 🙂

   • Vikramaditya says:

    I never read that…………….

    It was reply from “HEART”……..

    Jethe Jethe Devapari Manav Disati……..
    Tethe Tethe Kar Majhi Julati……

    (Kaka How to write Marathi? English is not correct language to express,isn’t it?) 😦

 19. Maithili says:

  Kharech sahi aahe hi sanstha……
  Khoop changale kaam karatayat he lok……
  Mala pahilyandach kalale hyachya baddal…. THANKS to you, tumachya mule hi gosht kalali mala…….

  • मैथिली
   पेपर येतच असतात न्युज मधे कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात.. इतकं महत्व दिलं जात नाही त्यांना. 😦

 20. खरंच वाचताना डोळ्यातून पाणी आलं. हॉट टब आणि पोपट या किती छोट्या छोट्या विश झाल्या पण त्या मुलांसाठी कदाचित त्या दुर्मिळ असू शकतात. अशी मुलं शोधून त्यांच्या या इच्छा पूर्ण करणा-या सेवाभावी संस्थेला मनापासून वंदन.

  • हो नां. काय होतं, की मध्यमवर्गीय पालक मुलांच्या आजारपणाचा खर्च उचलुन इतक्या वाईट परिस्थितीला पोहोचतात, की मग मुलांची लहानशी इच्छा, जसे बाहुली (१००-१५० रुपयाची) , किंवा कॅसीओ ( ७०० रुपयांना पण मिळतो) अशा वस्तुंसाठी पण खर्च करण्याची ऐपत रहात नाही..
   खुप वाईट वाटलं, मी पण त्यांना व्हॉलेंटिअर म्हणुन काम करण्याची तयारी असल्याचं कळवलंय.

 21. Aparna says:

  खरंच किती छोट्या छोट्या इच्छा आहेत ना?? मी कितीतरी वर्ष ऐकुन आहे मेक अ विश बद्द्ल…काम करायची पण इच्छा आहे…बघुया कसं जमतंय ते…

  • इतक्या लहान लहान इच्छा असतात.. पण………………!!!
   ह्या पण मधेच सगळे प्रॉब्लेम्स आहेत दडलेले..

 22. sahajach says:

  महेंद्रजी तुमच्या ब्लॉगवरच्या कितीतरी पोस्ट्स वाचायच्या राहून गेल्या आहेत….गेल्या पंधरवड्यात नेटवर नव्हतेच फारशी,…..
  असो पोस्ट तर नेहेमीप्रमाणे माहितीपुर्ण आणि नव्या विषयाची माहिती देणारी. ह्या संस्थेबद्दल वाचून होते पण ईतकी सविस्तर माहिती नव्हती…..असे काहि वाचले, ऐकले की वाटते जग अजुनही खूप सुंदर आहे आणि आपण नक्कीच त्यात भर घालू शकतो, तेव्हा पुढे व्हावे आणि आपणही या कार्यात भाग घ्यावा…..

  • अहो मी पण हल्ली फार कमी असतो नेट वर. सकाळचा थोडा वेळ , आणि रात्रीचा एक् दिड तास.. बस्स..
   कामं वाढल्याने मी पण फारच कमी वेळ असतो नेट वर.. चालायचंच. ब्लॉग ही हॉबी म्हणुनच ठिक आहे त्याचं व्यसन होऊ नये. 🙂

 23. रोहन says:

  भारतात हे कितपत रुळले आहे ??? अश्या विश पूर्ण करायला आपली काही मदत आपण देऊ शकतो तर??? त्यासाठी काही संपर्क आहे का?

  • भारतामधे पण त्यांचं एक चॅप्टर आहेच. त्यांना मी मेल पाठवला होता की मला मदत करायला आवडेल , पण काही उत्तर आले नाही!

 24. Mugdha Shirvalkar says:

  Hello Kaka,

  Gele barech diwas mi tumche blogs wachtey. Atishay sundar, sahaj, & relate karu shakto ase tumche posts astat. Mala pan maza blog suru karaycha aahey, tumchyakadun inspiration gheun 🙂

  Keep writing!

  Rgds
  Mugdha

  • मुग्धा,
   अवश्य सुरु कर. जर वर्ड प्रेस वर सुरु केला तर मी काही मदत करु शकेन. आणि जर ब्लॉगर वर सुरु केला, तर कांचन चा ब्लॉगवाले या ब्लॉग वर ( याचा आयकॉन माझ्या ब्लॉग वर आहेच.)टिप्स मिळतील.
   कुठल्या भाषेत सुरु करणार?मराठी की इंग्लिश?

 25. amol says:

  kharach mahendraji tumhi chalavlela upkram far chan ahe…!aaj search krta krta tumcha blog vachala..man bharun ale vachun..pan khare ahe wish purna zali ki tya jivanat arth asat..
  mi m.s.w.krit ahe ani mi ashych sansthechya shodhat asto je samjasathi kahi kartat..mala avadel tumchysobat kam karayla.avashya reply dya.i wait

 26. khupach chan…..
  kaka kutun anata tumhi sagali mahiti?

  • चेतन,
   कुठे तरी काही वाचण्यात आलं असतं. यावर एका पेपरमधे लहानशी बातमी आली होती. त्यात म्हटले होते की माधुरी दिक्षित ने एका अशा मुलाला भेटण्याचे नाकारले, आणि मग सगळा शोध घेतला या प्रकाराचा..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s