स्मशान..

jamnagar, smashan, jamnagar smashan,
जिवन चक्र दाखवणारे हे शिल्प -जामनगर स्मशानातले

जामनगरला काय प्रेक्षणीय स्थळ   बघायला  कुठे  जाऊ? असं एखाद्या जामनगरच्या प्रॉपर माणसाला विचारलं, आणि त्याने उत्तर दिलं की ’ जा मसणात’ तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, किंवा  आश्चर्य   पण वाटून घेऊ नका.

इथलं स्मशान हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बाहेरून आलेल्या लोकांना दाखवायची पद्धतच आहे  इथे. स्मशान पुर्ण बघायला फार तर अर्धा तास लागतो- अर्थात त्या पेक्षा जास्त वेळ काय करु शकतो आपण तिथे??. आम्ही जेंव्हा तिथे गेलो होतो, तेंव्हा एका शाळेची मुलं तिथे आलेली दिसली पिकनिकला.

अंत्ययात्रेची बस.

अगदी गावाच्या मध्यभागी असलेले हे स्मशान  एक युनिक जागा आहे. आजच्या बाजार भावाने करोडॊ रुपयांची प्रॉपर्टी आहे ही. खुप वर्षा पुर्वी एका दानशूर व्यापाऱ्याने दान दिलेल्या जमिनीवरच हे स्मशान सुरु करण्यात आलं आहे. या स्मशानाला   सुखधाम म्हणतात. इ.स. १८९२ साली हे बांधण्यात आलं होतं, पण  ह्या स्मशानाचा जिर्णोध्दार मात्र १९४७ पा्सून गोकुलदास नावाच्या एका इसमाने सुरु केला.

स्मशान म्हणजे अगदी वाईट जागा, जिथे काहीच सोय नाही अशीच असली पाहिजे हा अट्टाहास कां? एखाद्याला निरोप द्यायचा, तर मग तो चांगल्या तऱ्हेने का देउ नये?  हा कन्सेप्ट आहे या स्मशानाच्या सौंदर्यीकरणाचा! रखरखीत उन्हाळा असतो इथे जामनगरला.  लावलेली फुलाची झाडं, आणि उंच उंच पिंपळ, वड वगैरे झाडांमुळे वातावरण थोडं  बरं होतं. बगिचा लावला गेला, फुल झाडं  वगैरे, बसायला बेंच, किंवा झाडाच्या पायथ्याशी काही चबुतरे ( पार म्हणतात पिंपळाच्या खालच्या अशा चबुतऱ्याला)  उभारण्यात आले आहेत.

विश्रांती गृह

गुजराथी लोकांमधे स्मशानात ’दिवस’ करतात, ( सातवा, तेरावा, चौदावा वगैरे) त्या साठी आंघोळ वगैरे करावी लागते. कडाक्याच्या हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणं कठीण होतं, म्हणून    लोकांना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था  करण्यात आलेली आहे या स्मशानात. स्मशानात पोहोचवायला आलेले  वृद्ध लोकं थकतात, उन्हामुळे, तेंव्हा विश्रांती साठी एक मोठा हॉल बांधण्यात  आलेला आहे.

देवांचे पुतळे

जवळपास ७-८ एकराच्या या परिसरामध्ये  जागोजागी देवी देवतांचे १२५-१५० पुतळे उभारण्यात आले. याचा उद्देश काय असावा?? म्हणून थोडा विचार केला, तिथे असलेल्या एका माणसाला विचारलं, तर तो म्हणाला,

देवी देवतांचे पुतळे.

की जर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यु झाला, आणि त्याचं देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं राहिलं असेल ,   आणि काही कारणाने त्याचे मृत्युपूर्वी  देव दर्शन घेणे झाले नाही, तर कमीत कमी त्याचा शेवटल्या प्रवासामध्ये तरी त्याच्या देवाने त्याच्याकडे पहावे , किंवा देवाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असावा -म्ह्णून हे पुतळॆ उभारण्यात आलेले आहेत.  कदाचित,  त्यात काही अर्थ वाटणार नाही, तरी पण… एका मानवाने गेलेल्या मानवाला दिलेली आदरांजली आहे ही असं वाटतं मला..

स्मशानात प्रवेश केल्या बरोबर डाव्या हाताला एक चित्र मालिका सुरु होते. त्यामधे अगदी राम जन्मा पासून तर रामाच्या राज्याभिषेका पर्यंत सगळे प्रसंग कोरलेले आहेत.त्याचा व्हिडीओ घेतलाय, तो इथे आहे. सुरुवातीला हा सिक्वेनस आहे हे समजत नाही, पण नंतर लक्षात आल्यावर मात्र त्याचा व्हिडीओ घेतल्याशिवाय रहावलं नाही.

जवळच पारंपारिक पद्धतीने दहन करण्यासाठी लाकडं वगैरे आहेत. समोरच आयुष्य चक्र या नावाने खूप सुंदर शिल्प आहे .व एखाद्याचा मृत्यु झाला तर त्याचे जुन्या पारंपारिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या दहना बरोबरच इलेक्ट्रीक फर्नेस पण लावण्यात आलेली आहे.

भारतामधली पहिली शववाहिका  बस इथे जामनगरलाच ह्या स्मशानाच्या मालकीची आहे. या स्मशानात असलेल्या अनेक देवी देवतांचे पुतळे तर आहेतच पण त्याच सोबत असलेले  इतर राणी झांशी , महाराणा प्रताप सोबतच शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे त्याच्या खाली जे लिहिलंय ते वाचा…जास्त काही लिहिण्याची गरजच नाही त्या बद्दल इथे.

मृत्यु कडे पहाण्याचा हा एक वेगळा प्रकार वाटला मला, म्हणून हे पोस्ट!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to स्मशान..

 1. फारच छान माहिती! स्मशान ह्या विषयावर लेख होऊ शकतो ह्यावर विश्वास बसला नसता. शिवाजी महारान्जांच्या पुतळ्याखालील काव्य कवी भूषण रचित आहे.

  • कवी भूषण रचीत आहे हे माहिती नव्हतं. पण पाहिलं आणि आवडलं म्हणुन फोटो काढला. स्मशान ही जागा पिकनिक स्पॉट होउ शकते, तर मग त्यावर पोस्ट तर नक्कीच होऊ शकतं, असं वाटलं.. आणि हे पोस्ट् लिहिलं. तसंही शिवाजी महाराजांचा तो फोटो टाकायचा होताच.. ब्लॉग वर.

   • Sagar says:

    श्रीमान योगी या पुस्तकात उल्लेख आहे याचा…
    कवी भूषण यांच्या या ओळीवर प्रसन्न होऊन महाराजांनी नंतर त्यांना राजकवी केल होत…
    पण मला वाटत कि कवी भूषण नसून कवी कुलेश आहे…
    कोणाला माहित असल्यास कृपया खुलासा करावा कारण आता माझ्याकडे श्रीमान योगी नाहीये…

    • इतिहास तर माझा कच्चा आहे , रोहन ला विचारावं लागेल , शेवटी तोच ऍथोरीटी आहे या विषयावरची.

     • rohan says:

      कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली तिकमपूर नावाचे कानपूर जिल्ह्यात एक गाव आहे, तेथे झाला. चित्रकूट राजा ऋदयराम सोळंकी यांच्याकडे कविराज गेले असताना, राजाच्या गर्वीष्ठ दानदर्पास झुगारून त्यांनी स्वतःच्या कवितेचे व अस्मितेचे जतन आणि संरक्षण केले.

      शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने अविश्कारीत केलेले आहे. शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात.

      हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे.भूषण फारच वृद्ध होऊन वयाच्या १०२ व्या वर्षी वारले. शिवरायांनंतर ते छत्रसाल बुंदेला यांना जावून भेटले होते.

      देवल गिराविते, फिराविते निसान अली ।
      ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।
      गौर गणपती आप, औरनको देत ताप ।
      आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।
      पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।
      सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।
      कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
      गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥

      … कविराज भूषण

      भाषांतर :

      यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला तेव्हा राव – राणे (राजे महाराजे) भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. इतके ते निर्बल व निस्तेज झाले. थोडेसे पुजा विधान चुकले तर भक्तांनाच ताप देणार्या देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून लपून बसण्याची वेळ आली. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून ‘रब’ची चर्चा सुरू झाली. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते.

      काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहीली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिन्दुंची सुन्ता झाली असती.

      • रोहन
       खूप खूप धन्यवाद.. मस्त माहिती दिलीस. माझ्या डोक्यात कधीचा तो भुंगा पोखरत होता , की ही कविता कोणाची आहे ते म्हणून.

 2. ह्यावर पोस्ट येणार हे आधीच माहीत होते, कारण तो शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा फोटो तुम्ही ट्विटर वर दिला होता… लेख खुप माहितीपुर्ण…

  • आनंद
   बरेच दिवसांपासुन लिहायचं होतं, राहुन जायचं सारखं, काल जुने फोटो पहातांना पुन्हा आठवण झाली – 🙂

 3. trupti says:

  एका मानवाने गेलेल्या मानवाला दिलेली आदरांजली आहे ही …मलाही अगदी असच वाटत…लेख नेहमीप्रमाणेच वेगळा आणि माहितीपुर्ण झाला आहे

  • तृप्ती
   धन्यवाद.. अगदी मनात येत गेलं ते लिहित गेलो, मला पण नेमकं तसंच जाणवलं , तिथे होतो तेंव्हा.आपल्याकडे पण या वरुन स्फुर्ती घेउन कोणि सुरु केलं तर बरं होईल. अर्था मुंबईला शक्य नाही, पण एखाद्या लहान गावात मात्र सहज शक्य आहे

 4. खरच काका, तुमच्या लिखाणाला विषयाच बंधनच नाही. मस्त झालीय पोस्ट नेहमीप्रमाणे…अप्रतिम

  • विषयाला बंधन घातलं तर ब्लॉग वर लिहिणंच बंद होईल , काय वाट़्टेल ते आहे, म्हणुनच तर सुरु आहे लिखाण.. नाही तर कधीच हा ब्लॉग अंतर्धान पावला असता.

 5. Manmaujee says:

  छान अन् नेहमीप्रमाणे वेगळी पोस्ट आहे.

  • एक आहे, गुज्जू मंडळी अशा कामासाठी अगदी उदार मनाने मदत करतात. सगळं काम सोशल ग्रुप नेच केलंय.

 6. Vikramaditya says:

  What a artisic way to enjoy lat journey of life ?

  It happens only in India ………..

 7. तुम्हालाच कशा सापडतात हो अशा हटके गोष्टी?

  म्रुत्यु ही कहीतरी वाईट/गुढ गोष्ट आहे अशा समजामुळे कदचित त्या अनुषंगाने येणार्‍या सर्व जागा, गोष्टी दुर्लक्षित, उपेक्षित असतात. ही खरच चांगली सोय आहे.

  The Namasake पुस्तकात उल्लेख आलाय की बाहेरच्या देशात पण मुलांना Graveyard चे चित्र काढायला खर्‍या Graveyard मधे पिकनिक काढुन नेतात.

  • सोनाली
   ब्लॉग लिहायला लागल्यापासुन चौकस पणा थोडा जास्तच वाढलाय. कुठल्याही घटनेकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलुन गेलाय, म्हणुन साधारण गोष्टीतही असाधारण शोधायचा प्रयत्न केला जातो..

 8. खरंच.. एवढ्या दुर्लक्षित आणि अप्रिय भासणा-या विषयावर तुम्हीच पोस्ट लिहू शकता काका.. आणि ती ही इतकी सुरेख आणि माहितीपूर्ण.. !!

  • हेरंब
   एखादी गोष्ट मनाला स्पर्शउन गेली की तिच्यावर लिहिलं जातंच…
   शेवटी काय वाटेल ते लिहायचं, म्हणजे विषयाला बंधन नाहीच नां.. त्याचा फायदा घेतो, झालं. 🙂

 9. savadhan says:

  अतिषय सुंदर माहिती दिली आहे. स्मशान ! हा विषय लोकांना जरा गंभिर बनवतो.मृत्यू ची आठवण लोकांना अस्वस्थ करुन सोडते . खरं म्हणजे असं वाटायला नको आहे. पण तसं आहे खरं !काहीना मृत्यू सुंदर वाटतो.या लिन्क वर वाचा
  http://savadhan.wordpress.com/2010/02/21/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8A%E0%A4%B3/

  • लेख वाचला, अतिशय सुंदर लिहिलाय तुम्ही. खरं तर असं आपल्याला पण लिहिता यावं असं नेहेमी वाटत असतं.. 🙂

 10. Sagar says:

  खरच काय वाटेल ते !!!! हिजडा काय किंवा स्मशान काय….दिवसभरात काहीतरी वेगळ व चांगल वाचल्याच समाधान…..
  तुस्सी ग्रेअत हो.

 11. Girish says:

  mbk,

  chyala me astana mala nehmi tya ujad ranmalat palvaycha tumhi loke.. kadhi sadhe smashan pan nahi dakhavle mala jamnagar la!!

  • गिरिश
   पुन्हा जॉइन करतोस का? पाठवतो तुला स्मशान पहायला…. 🙂 तुला दोन वर्ष चान्स दिला होता, पण तु सारखा अहमदाबादलाच पळुन यायचा जामनगरहुब्न

 12. अरुण says:

  Mahiti Chan aahe, aani Photo , vedio ghatlya mule ajun changala watte bhagayala.keep going. All the Best.

  • अरुण
   प्रतिक्रियेकरता आभार.. सगळं बघुन झालं आणि नंतर लक्षात आलं की ही सगळी चित्रं सिव्केन्स मधे आहेत, म्हणुन पुन्हा एकदा व्हिडीओ घ्यायला आत गेलो होतो. 🙂

 13. नमस्कार,
  या अशाच विषयावर साधारण महिन्याभरापूर्वी लोकसत्तामध्ये लेख आला होता. अकोला / अमरावती असे काही ठिकाण होते, नाव नक्की लक्षात नाही पण तिथेहि स्मशानात लोक फिरायला येतात, मुले अभ्यासाला येतात, परिसंवाद चालतात.

  गेले महिनाभर तुमचे blogs वाचत आहे. आधीचेही लेख वाचले. SUPER हा एकाच शब्द आहे तुमच्या लिखाणाबद्दल. मी हि किंचित लिहितो पण तुमच्यासारखे सातत्य, वैविध्य आणि खुमासदार नाही.

  लिहा, आम्ही आहोतच आसुसलेले…

  – राजन महाजन

  • राजन
   प्रतिक्रियेकरता आभार. अहो जसं सुचेल तसं लिहित असतो.. तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रियांनीच अजुन जास्त हुरुप येतो लिहायचा.. 🙂 तो लेख मी पण वाचला होता, मला वाटतं तो बहुतेक वाशिमच्या स्मशानाबद्दल होता. तिथे फक्त बगिचा केलाय स्मशानात .

 14. व्हिडीओ आधीच पाहून झाला होता म्हणून वाट पहात होते की पोस्ट क्धी येतेय. कीबोर्डमुळे सगळी कामं लांबणीवर पडली. असो.
  जीवनमरण चक्र सुंदरच आहे. ज्या प्रकारे बांधलेलं दिसतंय त्यावरून इथे आलेल्यांच्या मनावरचा ताण थोडा तरी कमी होत असेलच. पारसी लोकांच्या (पुन्हा पारसी आलेच) स्मशानभूमीमधेही असंच काही असतं. मृत्यू म्हणजे रडारड, विलाप इतकंच नसून एक शांत निरोपही होऊ शकतो इतकं या स्मशानाच्या रूपाकडे पाहून जाणवलं.

  • कांचन

   खुप शांत वाटत होतं तिथे. शाळेतली मुलं पिकनिक साठी येतात, म्हणजे त्यावरुन किती चांगलं वातावरण असेल याची जाणिव होते.

 15. मुलगी असल्याने स्मशानात जायचा योग(?) कधी आला नव्हता. तुमच्यामुळे एक वेगळाच स्मशान पाहायला मिळालं. धन्यवाद!

  • खरंय, आपल्या मधे स्त्रिया जात नाहीत स्मशानात. पुर्वी फक्त जी स्त्री सती जायची तिलाच जायची परवानगी होती स्मशानात.
   तो पुन्हा एक वेगळा वादाचाच विषय आहे ..असो..

 16. savadhan says:

  सब्दांकित, मुलगी असल्याने स्मशानात जायचा यो येत नाही अस्म आपण म्हणता पण माझे श्वसूर नुकतेच निव्रर्तले तर मी माझ्या पत्नीस मुद्दाम स्मशानात घेऊन गेलो होतो.विद्युत दाहिनी पर्यंत सगळ तिला पहयला लावलं. मन शांत ठवायला पण सांगितलं!

  • ही आपली सामाजिक बेडी आहे , शतका नु शतकं याच बेड्या आपण सांभाळत आलोय. तुम्ही केलेली सुरुवात अतिशय उत्कृष्ट आहे.कधी ना कधी तरी या जुन्या बेड्य़ांमधुन आपण मोकळं व्हायलाच हवं.
   मध्यंतरी एका ओळखीच्या काकांचा मृत्यु झाला होता, तेंव्हा मंत्राग्नी त्यांच्या एकुलत्या एक मुलीने दिला होता.. त्याची आठवण झाली.

 17. bhaanasa says:

  ’सुखधाम’हे नाव किती सार्थ आहे. आयुष्याचे चक्राचे शिल्प फारच छान आहे. खरेच निरोप देताना चांगल्या पध्दतीने द्यायला हवा. रामायणाचे प्रसंगही स्थानोचित आहेत. तू व्हिडीओ व फोटो घेतल्यामुळे हे सगळे पाहायला मिळाले.:)स्मशानात दिवसांसाठी केलेली सोय फारच उपयुक्त आहे. खूप डिटेल लिहील्यामुळे बरीच माहिती मिळाली. धन्यवाद.

 18. Aparna says:

  लेख नेहमीप्रमाणेच वेगळा आणि माहितीपुर्ण झाला आहे….
  इथे एक पार्क आहे त्याची बाकं आणी एकंदरित असं काही arrangement आहे नं की त्या पार्कात गेलं तर स्मशानात असं वाटतं…अगदी गाडीतून दिसलं तरी आईने विचारलं स्मशान का गं?? आता इथे कुठे आली आपल्यासारखी स्मशानं म्हणा…काय लिहितेय मी..जाउदे…फ़ोटो पाठवीन कधीतरी तुम्हाला त्या बागेचा..पण बरं वाटतंय असं वेगळं स्मशान आहे हे वाचुन…

  • एखादी जागा अशी गुढ वगैरे पाहिली की नारायण धारप आठवतात मला तरी., एखाद्या पिंपळाखालुन जातांना, सळ्सळ येणारा आवाज वगैरे नेहेमीच कुतुहल निर्माण करतो.
   फोटो ची वाट पहातोय. पाठ्वा मेल मधे.

 19. मृत्युसंदर्भात छान संकल्पना आहे ही…

  • प्रत्येकच धर्मात मृत्युबद्दल काही कन्सेप्ट्स आहेत. ख्रिश्चन धर्मात मुद्दाम मेकप करुन, आणि नविन कपडे घालुन कॉफिन मधे झोपवतात मृत व्यक्तीला. त्यासाठी (डॆड बॉडी मेकप) काही खास एजन्सिज आहेत.

 20. रोहन says:

  वर कमेंट टाकली आहेच. पण ती त्या उल्लेखाच्या संबंधाने लिहिली आहे. खुप हटके पोस्ट आहे हे… मला खुपच आवडले. कधी गेलो त्या बाजुला तर वेळ काढून जाणार इकडे.

  कमीत कमी त्याचा शेवटल्या प्रवासामधे तरी त्याच्या/तिच्या देवाने/देवीने आणि शिवाय राणी लक्ष्मीबाई, महाराणाप्रताप आणि छत्रपति शिवाजी महाराजांनी त्याच्या/तिच्याकडे पहावे किंवा आशिर्वाद त्याच्या/ तिच्या पाठीशी असावा हिच इच्छा… 🙂

  • कधी द्वारकेला वगैरे जाशिल तर नक्कीच जा तिकडे. जामनगरचा एक तलाव पण आहे.. त्याबद्द्ल लिहायचं राहून गेलं.. आता लिहितो एकदा.

 21. Nilesh says:

  शिवाजी महारान्जांच्या पुतळ्याखालील काव्य kupc chan aahe
  aani kaka tumche likan sudha mindbloing aahe.
  raigadavar ekada lek lihava aashi mi vinati karto kaka

 22. चेतन फुलवरे says:

  दादा मला हा लेख खूप आवडला कारण असे पण एखादे ठिकाण असू शकते
  आणि विशेषता इथे म्हाराजनचा मूर्ती आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s