मराठी अभिमान गीत..

कौशल इनामदार

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठी अस्मिता संस्था.. कसं भारदस्त नांव वाटतंय नां? त्या भारदस्त नावामागे एक तुमच्या आमच्या परिचयाचं नांव आहे… कौशल इनामदार! कौशल इनामदार यांनी सुरु केलेल्या या संस्थेच्या अंतर्गत मराठी अभिमान गीताच्या सिडीच्या उदघाटनाच्या सोहळ्याचा कार्यक्रम  उद्या संध्याकाळी ठाणे येथे होणार आहे, त्याबद्दल बऱ्याच ठिकाणी  ( मटा, लोकसत्तामधे) लिहिलं गेलंय,  हा कार्यक्रम दादोजी कोंडदेव येथे संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

हे सगळं करावं असं कां वाटलं? कौशल ने २००५ साली मुंबई फेस्टीवल साठी ६३ मुलं घेउन पाडगांवकरांची एक कविता  यशस्वी पणे सादर केली होती “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही. तेंव्हा इतर कोणीच मराठी मधे बोललं नाही, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे मराठी साठी- असं वाटलं,  कौशलच्या मनात  ह्या मराठी अभिमान गीताचं बिजारोपण झालं !

परवाच, कौशलने ट्विट केलं की त्यांच्या   नवीन मराठी अभिमान गिताच्या रिंग टोन्स  एका साईटवर आहेत, आणि त्या डाउनलोड करुन सेल फोन वर इन्स्टॉल करु शकता . ती लिंक इथे आहे. अवश्य डाउन लोड करा. खरं तर ते सांगायलाच म्हणून हे पोस्ट लिहिलंय इथे. इतर जे काही लिहितोय ते सगळं ओघाओघाने आलं  म्हणून.

मराठी अभिमान गीत.. याबद्दल आज पर्यंत लोकसत्ताने आणि मटा ने इतकं काही लिहिलंय की मला नवीन लिहायला काहीच शिल्लक नाही. कौशलने या गीतासाठी उध्दवने दिलेले अकरा लाख रुपये नाकारले आणि फक्त ५०० रुपये घेतले उध्दवकडुन तेंव्हा त्याची एक मोठी बातमी झाली व्हायला हवी होती-!!पण  बऱ्याचशा बातम्या डिस्काउंट केल्या जातात, तशीच ही पण  बातमी डिस्काउंट केली गेली,तरीही  माझ्या सारख्या सामान्य मराठी माणसाच्या मनाला स्पर्शून गेली- आणि कौशल मित्र आहे याचा अभिमान वाटला.

या गाण्याच्या रेकॉर्डींग साठी होणारा खर्च,  तुमच्या आमच्या सारख्या २००० सामान्य माणसांकडुन प्रत्येकी केवळ ५०० रुपये गोळा करुन हा प्रकल्प पुर्ण केलाय.कौशल इनामदार च्या बद्दल मला हेच नेमकं खूप आवडतं. इतका पैसा (अकरा लाख रुपये)  अगदी सहजपणे अव्हेलेबल असतांना  तो नाकारण्याचा मोठेपणा  ( कोणालाच न दुखवता)  फक्त कौशलच दाखवू शकतो. या मागचं कारण उद्भवला दुखवणं असं नव्हतं , तर हे जे गीत आहे ते मराठी अभिमान गीत बनवायचं होतं कौशलला, आणि त्या करता सगळ्या सामान्य माणसांचा सहभाग असणे आवश्यक आहे असे वाटत  होते.

जर उध्दवचे  पैसे घेतले असते, आपण बनवत असलेलं मराठी अभिमान गीत हे   शिवसेना गीत, किंवा राजचे   चे पैसे घेतले असते तर मनसे गीत म्हणून ओळखल्या जाईल, आणि मुळ उद्देश दुर राहिलं, अशी भिती वाटली असावी कदाचित कौशल ला ( मला वाटतं ते काही अंशी खरं पण आहे ). उध्दव ने अकरा लाख रुपये ऑफर करुन स्वतःचा मोठेपणा दाखऊन दिला इथे हे नाकारता येत नाही.

यामधे सुरेश भट यांचं लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी ह्या गाण्याचे तर जवळपास २०० लोकांनी कोरस मधे गायन केलेले आहे. हा पण एक विश्वविक्रमच आहे. मायकेल जॅक्सनच्या गाण्यामधे पण इतके पार्श्वगायक एकदम गायलेले नाहीत.  बरं हे गाणं म्हणणारे शंभर वेलनोन  गायक तर आहेतच पण त्यांच्याच बरोबर    अगदी सर्वसामान्य २०० लोकं  पण आहेत. मराठी नसलेले पण मराठी वर प्रेम करणारे हरिहरन, शंकर महादेवन, हम्सिका अय्यर, महालक्ष्मी, वगैरे गायकांनी पण या समूहगीता मधे सहभागी झालेले आहेत- मराठीचा अभिमान असायला तुम्ही मराठी असलंच पाहिजे असे नाही 🙂 या समुहगायनासाठी कौशलचं नांव गिनिज बुकात जाणारच, आणि त्यासाठी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!!

या गाण्यामधे  सर्वसामान्य लोकांचा सहभाग असावा अशी कौशलची आधी पासूनच इच्छा  होती. त्यासाठी कौशलने आपल्या फेसबुक मधे अनाउन्स केलं, की मला गाणं  म्हणण्यासाठी काही लोकं हवे आहेत. प्रत्येक मित्राला एक पर्सनलाइझ्ड मेसेज पाठवला- तुम्ही येता का गाणं म्हणायला म्हणुन- आणि  कित्येक लोकांनी अगदी ताबडतोब होकार पाठवून आपण तयार आहोत असे कळवले. असे दोनशेच्या वर व्हॉलेंटिअर्स  तयार झाले. या सगळ्याना ठराविक वेळी एकत्र करण हे पण सोपं नव्हतं. या दोनशे मधला प्रत्येकच माणुस स्वतःच्या नोकरी व्यवसायात बिझी असणार, मग त्यातुन वेळ काढून   तो हे गाणं म्हणायला येणार, तेंव्हा हे सगळं जुळवून आणलं आणि -त्यांच्या आवाजात  हे गाणं रेकॉर्ड केलंय- फार मोठं काम आहे हे ( साधं रेल्वे स्टेशनला इंडीकेटर खाली दहा वाजता सगळ्यांनी भेटायचं ठरलं तरी पण नेमकं कोणीतरी लेट येतंच!). ( मला पण बोलावलं होतं, पण जाणं झालं नाही, नेमका टुर आला त्यावेळेस) या गीतात ११२ प्रस्थापित गायक, ३५० समूहगायक, ६५ वादक, ५० तंत्रज्ञ, ९ ध्वनिमुद्रणालये, तीन शहरे आणि २ हजार मराठी भाषा प्रेमींचा सहभाग आहे.

रेडीओ वर मराठी गाणी न लावणं, मराठीचा उपहास करणं, मुंबईच्या रेडिओ चॅनल वर एकही मराठी जॉकी नसणं या सगळ्या गोष्टींच्या मुळे मला वाटलं की मी एकटाच व्यथित होतो कां.. पण नाही- तसं नाही, कौशल सारखे लोकं आहेत व्यथित होणारे. मुंबईला महाराष्ट्राच्या राजधानीत   ठाकरे बंधूंना   या बद्दल आजपर्यंत बरेचदा इ मेल्स वगैरे पाठवून झालेले आहेत, पण दुर्दैवाने हा प्रश्न सध्या तरी  .

पण आता मात्र  एक आनंदाची बातमी  आहे, की कौशल लवकरच चोविस तास मराठी गाण्यांना वाहिलेलं एक रेडिओ स्टेशन सुरु करणार आहे, म्हणजे आमच्या सारख्यांची मजा.  पुर्वी एक लेख लिहिला होता रेडीओ मिर्ची म्हणून. त्यामधे माझी मुंबईला राहुन मराठी गाणी न ऐकता येण्या बद्दलची खंत व्यक्त केली होती.    जर मराठी गाण्यांसाठी वाहिलेली एखादी वाहिनी तयार झाली, तर ती नक्कीच सुपर डुपर हीट होईल यात काहीच संशय नाही. या नवीन  वाहिनी करता आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

78 Responses to मराठी अभिमान गीत..

 1. खरच हे एका पक्षाच गीत झाला असत जर त्यानी ते पैसे घेतले असते तर..एक चांगला दिलाचा मर्द मराठा. आणि २४ तास मराठी गाणी भले शब्बास ..वाट बघतोय 🙂
  शुभेच्छा कौशलला.

 2. सचिन says:

  काका मी सकाळीच रिंगटोन डाऊनलोड करून सेट पण केली.

  बाकी मराठी रेडिओ स्टेशन च्या उपक्रमास लाख लाख शुभेच्या.

 3. vikram says:

  रिंग टोन्स डाउनलोड करुन झाल्या मस्त आहेत आणि
  त्यावर हे व्यक्तिमत्व जबरदस्त आहे
  सलाम

 4. Manmaujee says:

  प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अस काम केल आहे कौशल यांनी. “बोलेल तो करेल काय अन् गरजेल तो पडेल काय!!!” याचाच पुन्हा प्रत्यय आलाय. कौशल यांना खूप खूप शुभेच्छा!!!

  • Sagar says:

   मनमौजी च्या मताशी सहमत…

   • एखाद्या कॉजशी कमिटमेंट असली की असं असतं सागर!! तुमच्या सारख्या तरुणांनी यातुन कमिटमेंट कशी असते, हेच शिकायला हवं यातुन..

  • गेले दिड दोन वर्ष या गोष्टी साठी प्रयत्न सुरु आहे कौशलचा. अभिमानास्पद अचिव्हमेंट आहे त्याची.

  • गेले दिड दोन वर्ष या गोष्टी साठी प्रयत्न सुरु आहे कौशलचा. अभिमानास्पद अचिव्हमेंट आहे त्याची.

 5. Ashish says:

  Kaushal yana shubhecha….asha goshthi aikalya ki oor abhimanane bharun yeto…

  JAI MAHARASHTRA!

  • खरंय तुमचं.. कौशल , आणि सलिल कुलकर्णी सारखे निस्वार्थ काम करणारे लोक आहेत म्हणुनच चाललंय सगळं. जय महाराष्ट्र – जय हिंद!

 6. रिंगटोन घ्यावेत असे वाटले म्हणून दिलेल्या लिंकवर गेलो. तेथील पृथ्वीच्या गोलाला दिलेला मानवी चेहरा आणि वेधक डोळे बिल्कुल न आवडल्याने तसाच माघारी आलो… काहितरी चुकतेय त्या चित्रात… पहा विचार करून…

  • शिरिष
   ते जरा वेगळंच वाटतंय खरं. मी डाउनलोड केलेले आहेत . इ मेल ने पाठवतो. 🙂

  • Veerendra says:

   शिरीष जी
   ते एक सामान्य कॅटेगरी साठी वापरेलेले चित्र आहे. त्या मागे रिंगटोन चढवणाऱ्या माणसाचा हात नाहीय .. पण काय चूक आहे त्या चित्रात ?

 7. Pushpraj says:

  अशा प्रसंगी पक्षीय मतभेद विसरून सर्व राजकीय पुढार्यानी एकत्र यायला हवे………..मराठी साठी ह्या पेक्षा प्रामाणिक प्रयत्न काय असु शकतो…..

  • राजकिय पुढारी जो पर्यंत काही स्वार्थ नाही तो पर्यंत काहीच करणार नाहीत याची मला तरी खात्री झालेली आहे. हे सगळे मुद्दे त्यांना कळवले, की ते इलेक्शनच्या वेळेस एकदम उचलतील तो पर्यंत काहीही कारणार नाहीत. कौशल बद्दल तर प्रश्नच नाही.

 8. bhaanasa says:

  मायमराठीसाठी तळमळीने केलेले असे प्रयत्नच तिला सदैव जिवंत ठेवतील. कोशल इनामदार हे नाव माहित होतं पण त्यामागे इतका इतिहास मात्र तुझ्या पोस्टमुळेच कळला. बरे झाले पैसे असे गोळा केले ते. उगाच चांगल्या कामाला नको तो रंग चढून त्याचे पर्यवसन भलतेच झाले असते. आणि मूळ उद्देशच भरकटला असता. अरे वा! संपूर्ण मराठी रेडीओ चॆनल. मराठी अभिमान गीत इथे कसे ऐकता येईल ते शोधते लागलीच. पोस्टसाठी धन्यवाद. 🙂

 9. Are va! Thanyatach ahe udghatan , mi janyacha prayatna karen. Kaushal kharach great ahe.

 10. सुरेख.. कौशल इनामदार यांचं अभिनंदन.. मराठीच्या तळमळीबद्दल, उद्धवचे (कोणाचेही) ११ लाख नाकारून स्वत:च्या हिकमतीने ते मिळवल्याबद्दल आणि चोविस तास मराठी गाण्यांच्या रेडिओ स्टेशनबद्दल ही आणि मन:पूर्वक शुभेच्छा !!

  आणि हे एवढे प्रयत्न ही पोस्ट टाकून शेअर केल्याबद्दल तुमचेही आभार 🙂

  • अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.. आणि रेडीओ जर सुरु झाला तर ह्या सगळ्यांच्या थोबाडीत मारल्यासारखं होईल. मुंबईला मराठी चॅनल ही तर काळाची गरज आहे. नविन गाणि कशी पॉप्युलर होतील जर कुठे लागलीच नाहीत तर??

 11. विक्रमादित्य says:

  सामान्य माणसाचे असामान्य कर्तत्व ……..
  कौशलच्या प्रयत्नांना मनापासुन शुभेच्छा !!!

  • अगदी खरंय विक्रमादित्य.. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट सहज पुर्ण होऊ शकते.
   सामान्यांचं असामान्य कर्तुत्त्व!!

 12. Shantanu Deo says:

  Bravo kaushal.

  He paan face book war share kartoy.
  -Shantanu
  http://maplechipaane.blogspot.com

 13. Aparna says:

  आजची पोस्ट माझी पण याच विषयावरची आहे..:)
  तुमची माहिती खूपच जास्त छान आहे….मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा…

  • अपर्णा,
   खुप सुंदर लिहिलाय अनुभव. तुम्ही जसे लिहिले आहे तसेच विचार कोणाच्याही मनात येउ शकतात. पण या पुढे मात्र जर पुन्हा कौशलने पैसे गॊळा करायला नुसती साद जरी दिली तरी प्रत्येक मराठी माणुस अगदी सहज पणे खिशात हात घालेल ..

 14. हेमंत आठल्ये says:

  मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 15. लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
  जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
  धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
  एवढ्या जगात माय मानतो मराठी.

  – ‘मराठी दिन’ शुभेच्छा!

 16. सुप्रभात काका…मराठी दिवसाच्या शुभेच्छा.

 17. रिंगटोन्स अगदी मस्त आहेत.लेखही छान झाला आहे.हयात राजकारण शिरु दिल नाही ते बर झाल. कौशल खरच ग्रेट माणुस आहे…

  तुम्हाला मराठी दिवसाच्या शुभेच्छा..

  • ’मराठी माणुस’ आणि त्याचे तारणकर्ते आणि ते धरुन केललं राजकारण…. मला खूप कंटाळा आलाय. असो..
   तुम्हाला पण मराठी दिवसाच्या शुभेच्छा..

 18. महेश नाईक says:

  मराठी साठी कौशल जे करतो आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन व त्याचबरोबर ह्या लेखासाठी तुमचेही अभिनंदन आणि जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 19. pramodkakde says:

  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
  जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
  धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
  एवढ्या जगात माय मानतो मराठी

  याच शब्दांनी आपणास मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या .
  मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपन सगळे तत्पर राहू.!!!!!!!!!!!!!!!! हीच अपेक्षा
  <<<<<<>>>>>>

  • प्रमोद
   मराठीच्या प्रसारासाठी आपल्याकडुन जेवढं शक्य आहे तेवढं आपण करितच राहु.. शुभेच्छा..

 20. काका मला माहीतच नव्हतं ह्या बद्दल. चोविस तास मराठी गाण्यांच्या रेडिओ स्टेशनची कल्पना मस्तच. कौशल खरचं ग्रेट आहे.

 21. prashant says:

  Thanx for link! lagech ringtone ownload keli.

 22. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. उद्या वर्तमानपत्रामध्ये आणि दूरचित्रवाणीवर बातमी कळेलच. किमान ५ ते ७ हजार लोक या मराठी अभिमानगीत प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता – मंचावर १५० जण आणि उपस्थित प्रेक्षक असे सर्वजण एकत्र गात होते – “लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”
  खरोखर अविस्मरणीय “ऐतिहासिक” सोहळा !!!
  – राजन महाजन

  • राजन
   खुप बरं वाटलं. मला पण यायचं होतं पण घरी मुलीची परिक्षा आलेली आहे म्हणुन घरी रहावं लागलं. आपण कल्चरल कार्यक्रमाला जाणं थोडं अवघडल्यासार्खं होतं.
   टीव्ही वर बघितला कार्यक्रम.. 🙂
   ऐतीहासीक सोहळा पहाण्याचं तुम्हाला भाग्य लाभलं, अभिनंदन..

 23. sahajach says:

  महेंद्रजी कौशलचे तर कौतुक करावे तितके थोडे, बरं हा खरं तर मोठा माणूस पण त्याच्या ब्लॉगवर मागे दिलेल्या प्रतिक्रियांना वैयक्तिकपणे उत्तरे देउन मनात आणि जागा मिळवून गेला….त्यात आता ही तुम्ही दिलेली माहिती!!! खरचं मनापासून वाटतं अशी काहि लोकं आहेत तोवर भाषेला मरण नाही, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुढच्यावेळेस जेव्हा तो साद देइल तेव्हा मराठी माणुस पटकन खिशात हात घालेल….

 24. Pingback: आयत्या बिळावर नागोबा… « काय वाटेल ते……..

 25. काका, कौशल इनामदार यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून, कित्येक हालापेष्टा सोसून मराठी भाषेला, संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही दिलेली भेट अभूतपूर्व आहे. आमच्यासारख्या तरूणांना यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

  शिवाय आमची तरूण होतकरू पिढी मराठीचा झेंडा असाच अजुन उंच उंच घेत जाईल, याचे मे पक्के आश्वासन देतो.

  कौशल इनामदार यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, यात मुळीच शंका नाही. त्यांनी २०० पार्श्वगायक जमवून पार पाडलेल्या रेकॉर्डिंगची थेट दृश्ये मी काल संध्याकाळी स्टार माझावर बघितली, अभिमानाने मन अगदी भरून आलं होतं माझं.. त्यांच्या या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणारच यातही शंका नाही.

  आणि मराठी भाषेला वाहिलेली एखादी आकाशवाणी वरील वाहिनी येणं, हे तर आपले भाग्यच.. कौशल इनामदारांच्या या प्रयत्नाला माझ्या अनेक शुभेच्छा, स्वागत आणि अभिनंदन! रेडिओ मिरची आणि इतर मराठी द्वेष्ट्या वाहिन्यांना ही एकटी वाहिनीच भली-मोठी चपराक बसवेल, फक्त त्यासाठी आपला सर्वांची एकी लागेल, तशी ती अगोदरपासूनच आहे, म्हणून तर आजही आपला महाराष्ट्र “संयुक्त”च आहे आणि राहीलही…

  तत्सम माहिती दिल्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक आभार काका…

  विशल्या!

  • विशल्या
   मराठी रेडीओ स्टेशन तर माझं पण स्वप्न आहे.. बघु या कधी पुर्ण होते ते..
   गिनिज बुकात नक्कीच नाव जाणार.. त्यात काहीच संशय नाही.

 26. mahesh kulkarni says:

  सुंदर ब्लोग आहे,वाचनीय ,व योग्य श्बदात आपण मांडला आहे. कुलकर्णी काका

 27. मराठी रेडिओ चॅनेलची खरच गरज आहे. प्रत्येक शहरात एक असा चॅनेल असावा.

  • आता सुरु होतंय एक चॅनल, आणि ते नक्कीच पॉप्युलर होईल याची खात्री आहे. प्रत्येक शहरात सुरु व्हायलाच हवं. लोकांना पण हवंय..

 28. mau says:

  खुप छान माहिती दिलीत…धन्यवाद…तुमचे लेखन खरचं खुप छान आहे..बरीच माहिती मिळ्ते..पुन्हा एकदा धन्यवाद..तुम्ही सांगितल्या प्रमाणे हे चॅनल सुरु झाले तर आम्हाला गुजरात मधे दिसेल का एव्हढ माहिती करुन घ्यायला हवी..Rest post is as usual good !!

  • धन्यवाद .चॅनल लवकरच सुरु होईलच. पण त्याच सोबत इतर चॅनल्सनी पण मराठी गाणी वाजवणे सुरु करावे असे वाटते. पुन्हा रेडिओ जॉकी ह्यांनी मराठीत बोलायला काय हरकत आहे हेच मला समजत नाही.
   हे रेडीओ चॅनल हे, त्यामुळे गुजरात मधे ऐकु येणार नाही. फार तर डहाणू पर्यंत ऐकता येइल.

 29. मलादेखील काही कारणामुळे जाता आलं नाही. या अलौकीक उपक्रमात सहभागी होता न आल्याची खंत आहे. पण कौशलच्या या कामामुळे संगीतकाराच्या आत दडलेला माणूस दिसतो. तो सेलिब्रिटी असूनही तो बडेजावपणा करत नाही. आकाशात उंच भरारी मारण्याची महत्त्वाकांक्षा असूनही त्याचे मात्र जमिनीवरच असतात. कौशलने जर मराठी रेडिओ वाहिनी सुरू केली तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळणार हे नक्कीच. मराठीवरून राजकीय पक्ष एकमेकांशी कुत्र्यामांजरासारखे भांडत असताना कौशल मात्र शांतपणे त्याच्या मार्गाने मराठीच्या प्रसारासाठी आपलं काम करतच असतो, ते जास्त भावतं.

  • नेहेमी जमिनिवरच पाय असतात त्याचे. राजकिय पक्ष एकमेकांशी भांडत असतात कारण त्यातुनच त्यांना फायदा उपटायचा असतो. आता हे व्होडाफोनचं बघा, त्यानेच पुर्वी ही केस पुढे रेटली होती, पण तेंव्हा ठाकरे बंधु गप्प राहिले होते, कारण माहिती नाही..
   आता रेडिओ जॉकी साठी राज आणि उध्दवला इमेल पाठवणं सुरु करु या आपण सगळे जण.. म्हणजे एकाने जरी ऍक्शन घेतली आणि, कमीतकमी मराठी जॉकी जरी आले तरीही मराठी लोकांचा आणि भाषेचा वेडेवाकडे उच्चार करुन होणारा अपमान तरी थांबेल. राजने मोबाइल कंपन्यांना पत्र पाठवलंय, आता उद्धव इकडे काहीतरी करेल त्याला काउंटर करायला म्हणुन. दोघांनाही इमेल पाठवावे असे वाटते मला..

 30. सौरभ पंची says:

  महेंद्रजी,
  काय सुरेख गाणं आहे हो. काल युट्युब वर आलं आहे आणि तेव्हापासुन मी नुसता जप करतोय या गाण्याचा. अतिशय पवित्र गाणं आहे. मला माहितीच नव्हतं नाहीतर किमान पाचशे रुपये देऊन तरी या अभिमानाशी स्वत:ला जोडायला आवडलं असतं.
  कौशल इनामदारांच्या पुढच्या चळवळीशी बांधुन घ्यायला आवडेल. रेडिओ चॆनल काढण्यासाठी आपण सर्वांनी सर्व शक्तिनीशी मदत केली पाहिजे.आणि तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. ठाकरेंना सगळ्यांनी इमेल पाठवले पाहिजेत.
  -सौरभ पंची

  • सौरभ
   मी यावर एक वेगळं पोस्ट लिहावं म्हणतोय, त्यामधे मनसे आणि शिवसेनेचे पत्ते देउन सगळ्यांना इ मेल पाठवायला अवाहन करावे असे वाटते.. या वेळेस कदाचित उध्दव बाजी मारेल. कोणीही का करेना, मराठी गाणी ऐकता आली की झालं..

 31. वर लिहिलेल्या लेखाने आणि आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी मी खूप भारावून गेलोय. काय नेमकं बोलावं हे सुचत नाहीये! कुलकर्णीसाहेबांनी अतिशय प्रेमाने लिहिलंय – अजून इतका ग्रेट मी झालोय असं खरंच मला वाटत नाही. ग्रेट लोक आयुष्य वेचतात. मी फक्त दीडच वर्ष दिलं! पण ज्याच्या पत्रिकेत मित्रांचा योग असतो तो सगळं सहज जिंकत जातो! तसं काहीसं माझं झालंय! मी एकटा काहीच करू शकत नाही पण आपण एकत्र आलो तर आपल्याला काहीच अशक्य नाही हे एकच सत्य मी या काळात शिकलोय. रेडियो वाहिनीच्या प्रकल्पासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. ते मात्र हक्काने मागेन! बाकी सगळ्यासाठी खूप खूप आभार! मराठी अभिमानगीताचा आपण हर तऱ्हेने प्रसार करावा अशी माझी विनंती आहे. गाणं सर्वदूर पोहोचलं तर एक चैतन्य निर्माण करेल यात मला अजिबात शंका वाटत नाही! आपली माणसं म्हणून हा थोडासा हक्क आपल्यावर गाजवत आहे.

  आपला,

  कौशल.

  • कौशल
   आधी मला हे साहेब वगैरे म्हणणं बंद करा. मला अगदी ऑफिस मधे बसल्यासारखं वाटतं. इथे दिड वर्ष दिलं, पण त्याच बरोबर इतर कोणीही दिड दिवस पण दिलेला नाही या किंवा अशा तत्सम कामासाठी, म्हणुन दिड वर्ष हे खुप झालं. आणि ही पण एक सुरुवात आहे, शेवट नाही. या पुढे एक खात्री तर असेलच की नविन कुठलंही प्रोजेक्ट सुरु केलंत तरी प्रत्येक मराठी माणुस पुढच्या प्रोजेक्टसाठी अगदी मनमोकळे पणाने खिशात हात घालेल याची खात्री आहे. हे माझेच नाही तर सगळ्या मराठी माणसांचे मत आहे .
   या प्रोजेक्टच्या सक्सेसफुल पुर्णते नंतर आता एखादं नविन प्रोजेक्ट सुरु करायला हरकत नाही.. त्या साठी मनःपुर्वक शुभेच्छा..
   आपण सगळे एकत्र आलो तर काहीही करु शकतो हे अगदी शंभर टक्के खरं….
   मराठी अभिमान गीत रिंग टोन म्हणुन लावले आहे, आणि ऑफिसमधे पण सगळ्या मराठी लोकांच्या फोन वर टाकले आहे.

   रेडिओ हा प्रोजेक्ट तर नक्कीच शंभर टक्के यशस्वी होईल यात काहीच शंका नाही. मी आजपर्यंत बऱ्याच लोकांबरोबर बोललो, एक गोष्ट लक्षात आली की सगळे मराठी लोकं आसुसलेले असतात मराठी गाणी ऐकायला, केवळ कुठे लागत नाही म्हणुन जे काही असेल ते ऐकावं लागतं..
   प्रतिक्रियेकरता मनःपुर्वक आभार..

 32. Veerendra says:

  वा .. खुद्द कौशल जी ची प्रतिक्रिया !!

  अभिनंदन काका !!

  🙂

 33. rohan says:

  बरं झाले पैसे नाकारले. कशाला हवी कोणा एकाची मक्तेदारी. मिलिंदने (www.rajashivaji.com) सुद्धा असे पैसे अनेकांकडून नाकारलेले आहेत. पैसे सामान्य जनतेकडून उभे रहावे या मताचा मी सुद्धा आहे.

  त्या दिवशी ठाण्यात असूनसुद्धा जाता नाही आले मला… 😦 कौशल तुझ्या नवीन रेडिओ स्टेशनची वाट बघतोय… 🙂 मराठी RJ हवेत का रे!!! 😀

 34. मराठी अभिमानगीत Youtubeवरील दुवा –

 35. Mangesh says:

  kharach khup abhman ahe amhi maharashtrat jamalyacha , marathi aai chya poti yayala punyaich lagte.
  shat shat dhanyawad he gane nahi tar pran ahe marathi, maharashtra cha.

  • मंगेश
   अतिशय सुंदर कविता आहे ती. माझ्या पण आवडीची. त्या कवितेला चाल लावुन लोकांच्या ओठावर रुळवण्याचं मोठं काम केलंय कौशलने. सिडी घेतली की नाही विकत?

 36. हा अतिशय छान कार्यक्रम आहे .आजपर्यंत मराठी गाण्यांना डाऊन मार्केट म्हणून हिणवीत होते . त्यांना हि चांगली चपराक आहे.

  कौशल इनामदार यांचे अभिनंदन .प्रत्येक मराठी बांधवानी जर असे contribution दिले तर मराठी ला पुन्हा वैभव प्राप्त होईल.आणि मराठी radio चेनल हवेच .सगळ वातावरण बदलून जाईल अशी खात्री आहे.

 37. एखादे चेनल मराठी आहे का ..?असेल तर कळवावे .किवा येणार असेल तर कधी येईल हे कळवावे ,.मी वाट पाहत आहे.मुंबईत राहून मला मराठी गाणी ऐकू येत नाही .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s