आयत्या बिळावर नागोबा…

एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की तिचं श्रेय घेण्यासाठी बरीच मंडळी  पुढे येतात- .  कौशल इनामदार मराठी गीताच्या बाबत पण नेमकं हेच घडू पहातंय. काल मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात दादोजी कोंड्देव स्टेडियम वर  सुरेश भटांच्या कवितेचं.. ( लाभले भाग्य आम्हास..) च्या  सीडीचे उदघाटन सोहळा मोठा थाटामाटात पार पडला.

इतक्या सुंदर कार्यक्रमाची बातमी मटा मधे वाचली आणि खूप छान वाटलं.जीव टाकुन मेहेनत केली होती कौशलने या  कार्यक्रमासाठी.  पैसा पैसा करुन , प्रत्येक मराठी माणसाचा सहभाग घेउन पैसा जोडला होता या  सिडी च्या प्रकाशना साठी. जवळ पास दोन वर्षापासून तो तयारी करतोय या सिडी च्या बनवण्याची. त्याच बरोबर पान उलटलं आणि ’ती’ बातमी दिसली …… आणि एकदम संताप आला.

कालच्या सिडी लॉंचींग नंतर मिळालेल्या प्रसिद्धी मुळे , अगदी कोणालाही माहिती नसलेला एक कोणी तरी माणुस उठतो आणि नेमकं ह्याच दिवसाचं औचित्य साधून    प्रसिद्ध करतो की या म्हणजे मराठी अभिमान गीत या गाण्याचे अधिकार माझ्या कडे आहेत. आणि हे काम पण इतक्या पद्धतशीर पणे  करतो की बरोबर ज्या दिवशी या सिडीचं उदघाटन असतं, त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पेपर मधे या माणसाच्या बद्दलची बातमी- पान क्र. दोन वर आजच्या मटा मधे कृष्णा गायकवाड  – (कनकराज )नावाच्या एका इसमाने या कवितेवर आपला हक्क दाखवला आहे, आणि तीच बातमी प्रसिद्ध केली आहे मटाने.

मला एक कळत नाही, आजपर्यंत या इव्हेंटची इतक्या ठिकाणी प्रसिद्धी होत होती. कौशलच्या कामाच्या उदो उदो लोकसत्ता, मटा मधे आणि इतर पेपर मधे पण होत होता, तेंव्हा हा माणुस कुठे गेला होता?  तेंव्हाच त्याने आपल्या कडे या गाण्याचे अधिकार आहेत हे का सांगितलं नाही? नेमकं सिडी प्रसिध्द झाली आणि तेंव्हाच याला जाग कां आली?  की सिडी प्रसिध्द होण्याचीच वाट पहात होता हा  कनकराज? एकदा सिडी प्रसिध्द झाली की मग आपल्याकडे याचे अधिकार आहेत म्हणून सांगायचे …की मग  फुकटच प्रसिद्धी मिळते.

लुझर  असेच  असतात  आणि नेमकं असं च करतात . स्वतः काही एक करु शकत नाही, एखादी चांगली  गोष्ट  पुर्ण होई पर्यंत अजिबात काही बोलत नाहीत पण एकदा ती प्रसिद्ध झाली की मग त्यावर आपला अधिकार सांगतात. म्हणजे मग काही न करता प्रसिद्धी तर मिळतेच , आणि सोबतच कधी कधी  पैसा पण मिळतो.

कौशलने जरी या सिडी चे प्रकाशन केले असले, तरी ही सिडी कौशलची एकट्याची नाही. त्यामधे हजारो मराठी माणसांचा सहभाग आहे हे विसरुन चालणार नाही..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to आयत्या बिळावर नागोबा…

 1. पण ती तर सुरेश भटांची कविता आहे ना? काल कार्यक्रमाला त्यांच्या कन्या पण आल्या होत्या. असे कसे करतात ही माणसे, कमालच ज़ाली. पेपरवाले तरी या असल्या लोकाना एंटरटेन का करतात?

  • हो, त्यांची कन्या पण होती काल कार्यक्रमाला. सुरेश भटांनी त्याला अधिकार दिले आहेत असे म्हणणे आहे त्यांचे.

 2. हो वाचला हो..न्यूज़ पेपर्सची बद्दल काही बोलुच नये.. पेड न्यूज़ घेतात सगळे. उगाच बदनामीचा बनेल डाव आहे हा. कौशल सोबत आपण आहोत की. बघून घेऊ

 3. Sagar says:

  काका
  मुर्ख माणूस आहे हा….टिपिकल मराठी माणूस….कोणी पुढे जाणार कि स्वतः जायचं नाही पण दुसऱ्याचे पाय खेचायचे…अन मी कौशल यांच्या पाठीशी आहे….अन सोनालीशी सहमत कि पेपरवाले तरी या असल्या लोकाना एंटरटेन का करतात? अन जर खरच त्याने गाणी तयार केली होती तर इतके दिवस काय झोपा काढत होता का?आता काढ म्हणाव अल्बम …
  काही पण….चीप लोक…….

 4. sudhir says:

  म.टा. मधली बातमी अजुन पाहीली नाही पण ती खरी असणार, तसे असेल तर ते योग्य नाही.अशा माणसाचा सर्व मराठी लोकांनी निषेध केला पाहीजे

  • सुधिर
   निषेध तर करावाच लागेल, पण मटा ला पण एक दिवस थांबुन न्युज छापण्याचा सेन्स दाखवता का येउ नये? एखाद्या आनंदाच्या क्षणाचा विचका करणे आहे झालं..

 5. काका नाव कौशल श्रीवास्तव झालाय चुकुन 🙂

 6. Abhijit says:

  अतिषय घाणेरडी मानसिकता. मागच्या दीड वर्षांपासून कौशल त्यावर मेहनत घेत आहेत. हे सर्वांना ठाऊक आहे.

  मटावाले फडतूस आहेत. आयचा घो त्यांच्या

  • मला त्या माणसाचं आश्चर्य वाटतं इतकी वर्ष तो गप्प का बसला होता? सोनालीने वर लिहिलंय ना, की त्या कार्यक्रमाला सुरेश भटांची मुलगी पण होती हजर..
   नसत्या ठिकाणी फालतु न्युज देउन मुख्य कार्यक्रमाचा विचका करायची ही पध्धत मटाची बरोबर नाही.

 7. काका, अशा भामट्या लोकांचा उदो-उदो न केलेलाच बरा.. नकळत त्यांचीच प्रसिद्धी होते.. आपण सर्व लोक कौशल इनामदारांच्या आणि सुरेश भटांच्या सोबत आहोत, त्यामुळे अशा लुच्चा-लफंग्या लोकांचं (कनकराजसारख्या!), त्यांनी किती डोकं आपटलं तरीही चालणार नाही..

  विशल्या!

  • विशल्या
   कौशलच्या मागे प्रत्येक मराठी माणुस उभा राहिल त्यात संशयच नाही. अशा लुच्चा लोकांवर सामाजिक बहिषकार हेच योग्य ठरेल.

 8. Aparna says:

  म.टा.बाबत इतक्यात हेरंबच्या ब्लॉगवर पण प्रतिक्रिया दिली होती…आता मी म.टा.वाचणं (ऑनलाइन) बंदच करणार आहे….
  आणि मराठीसाठी कुणी काही करतंय तर निदान त्यासाठीतरी थोडं इमान ठेवा ना लेको….

  • अपर्णा
   अगदी सहमत आहे. हे असे कुजलेल्या मेंदुचे ;लोकं आहेत म्हणुनच तर खरा प्रॉब्लेम आहे.

 9. Supriya says:

  kahi manase kharokharch kiti vighnasantoshi asatat .
  Kharach nako vatat ashya manovruttiche lok.

 10. विक्रमादित्य says:

  पेड न्युजचा आणखीन एक नमुना आणि म.टा. हा त्यांचा प्रतिनीधि.
  “अशोकपर्वा” सारखाच आणखीन एक फालतुपणा !!
  संताप येतो असल काहि वाचुन……

  • मटा ला ही बातमी काही नेमकी कालच कळली असेल असं नाही. त्यांनी ती फक्त रोखुन धरली असावी , या दिवसासाठी. काय बोलणार यावर??

 11. Manmaujee says:

  प्रसिद्धीसाठी ही लोक अन् वृत्तपत्र कोणत्याही थराला जाउ शकतात. . . ह्या पावट्या लोकांना खर तर चांगला धडा शिकवला पाहिजे!!!

  • बासुंदीच्या वाटीत मिठाचा खडा घालण्याचं काम काही लोकं अगदी व्यवस्थित करु शकतात.. त्यातलाच हा एक. आता सुरु होतिल कोर्ट कचेऱ्या वगैरे. नुस्ता मनःस्ताप आहे कौशलला.

 12. काय हलकटपणा आहे हा. असल्या दळभद्री लोकांना (त्या माणसाला आणि ती बातमी छापणा-या पेपरलाही) ‘होळी’ साठी सर्वोत्तम उपयोग केला जाऊ शकतो.

  ‘त्या’ बातमीची लिंक चुकलीये का?

  • हेरंब
   हो लिंक चुकली होती, दुरुस्त केली.
   होळी साठी वापरायचा तर विकत घ्यावा लागेल. मी तर ऑन लाइन वाचतो तो पेपर नेहेमी.. 🙂 व्हर्च्युअल होळी करु या.. 🙂

 13. SHARAD says:

  HI ASALI MANASE NIRLAJJA YA PRAKARAT MODTAT. CHANGLYA MANSANNA TRAS DYAYACHA FAKT. BHETEL TITHE TYALA THOKUN KADHALE PAHIJE LOKANNI… ANI WARUN THOKNARYALA INAM SUDDHA DILE PAHIJE…

 14. SHARAD says:

  MAHENDRAJI…
  AANKHI EK… TUMCHE LEKH WACHAYLA KHUP MAJA YETE. CHHAN LIHITA TUMHI. KHARE WATNAR NAHI TUMHALA PAN ATA NET CHALU KELYEKELYA ‘KAY WATEL TE’ CHI SITE PAHILYANDA OPEN KARTO. JAWALJAWAL SARWACH LEKH WACHUN KADHLET TUMACHE AGADI RAJKIY, SAMAJIK ANI MEDICAL SCIENCE CHE SUDDHA. PUDHIL LIKHANASATHI HARDIK SHUBHECHCHA!!!

  • शरद
   धन्यवाद.. अहो मनात येइल ते खरडत असतो इथे. उत्साह टिकुन रहावा अशी इच्छा आहे..हरेक्रिश्नजी, श्रीकृष्ण सावंत साहेब.. ह्यांचा आदर्श आहे . गेले कित्येक वर्ष ब्लॉग वर लिहिताहेत ते..

 15. Pushpraj says:

  काका,
  ठाण्यातील कार्यक्रम बघितल्यानंतर खरोखर खूप आनंद झाला…मी आवर्जून हा कार्यक्रम बघण्यासाठी गेलो होतो…आणि कौशलच्या जिद्दीला खरोखर सलाम…..बाकी म.टा. मधील बातमीबदद्ल बोलाल तर माझ्या मते आपण अशा बातम्यांची सवय करून घ्यायला हवी कारण ही वृत्तपत्रे नियंत्रनाबाहेर गेली आहेत…….नशीब ही बातमी दुसर्या पानावर दिली होती…….ह्यांची काही खात्री नाही पहिल्या पानावर copy write ची बातमी द्यायला हे लोक मागे पुढे बघणार नाहीत……

  • पुष्पराज
   नशिबवान आहात , मी स्वतः बऱ्याच लोकांना पाठवलं पण मला जाता आलं नाही. असो..
   मटा अगदी ’सकाळी’ लहानमुलाला बसवायच्या लायकीचा झालाय हल्ली असे वाटते मला.
   येल्लो जर्नालिझम यालाच म्हणतात नाही???

 16. हल्ली कोणतं वृत्तपत्र काय छापेल, त्याचा भरवसा राहिलेला नाही. हे असे फुकटे गल्लोगल्ली असतातच. पण वृत्तपत्रांनीच भान ठेवायला हवं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

  • वृत्तपत्रांना काही तरी सनसनीखेज हवं असतं. एक पुस्तक आहे इर्विंग वॅलेसचं ऑलमायटी वाचलं आहे कां? नसेल तर जरुर वाचा. बातम्या तयार करुन छापणं हा विषय आहे त्या पुस्तकाचा..
   चिप पब्लिसिटी साठी काही पण करतील ते.

 17. bhaanasa says:

  महेंद्र, खरेच कमालच झाली म्हणायची. किती विघ्नसंतोषीपणा आणि तोही जाहिरपणे. आणि मटाला तर काही धरबंदच राहीलेला नाही. वाटेल ते छापत असतात…. ( काय शब्द गाळलाय बरं का…. 🙂 ] शिवाय भटांची कविता आहे हेही मटामधल्या एकाही माणसाला कळू नये. कोशलला बिचा~यला निष्कारण मनस्ताप…..

  • इतकं होऊनसुध्दा कौशल शांत आहे, त्याने काहीच कॉमेंट दिली नाही..!!
   एखाद्याचं चांगलं होत असलं की त्यामधे बातमी शोधायची हेच काम असतं या पेपरवाल्यांचं.

 18. काका, ह्या पोस्टचा बॅनर बघितला मी कांदिवलीला एका पेंटरकडे तो पेंट करत होता. मी बस मध्ये होतो म्हणून उतरता आला नाही बघायला. लक्ष ठेवा.. कोण आयत्या बिळावर नागोबा…होतय ते. मला काही कळला की नक्की सांगेन.

  • पोस्टचा बॅनर?? जरुर सांग..

   • हो म्हणजे दोन-तीन वाक्यच रंगवून झाली होती…शोधतो. लाल कलरचा ब्राइट हेड्डिंग आणि काळ्या रंगात मटाचा निषेध असा लिहाला होता. Search is On 🙂

 19. rohan says:

  अशी बांडगुळ छाटली पाहिजेत… साले हरामखोर आहेत लेकाचे. गरज पडली तर सर्व एकत्र कौशलला मदत करू. आहोत की आपण इतके सर्वजण.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s