सामाजिक बांधिलकीची जाणिव आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही कुठल्यातरी कारणाशी ( कॉज शी) स्वतःला जोडून घेत असता. कधी लहान मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहणाऱ्या , कधी पिडीत महिलांसाठी काम करणाऱ्या , किंवा कधी वृध्दांसाठी काम करणारे, कधी पर्यावरणाची काळजी करणाऱ्या एनजीओ ला तुम्ही नेहेमी पैसे वगैरे देत असता? थांबा…..!!!!
कारण एनजीओ चा आजकाल एक धंदा झालेला आहे.एनजीओ च्या नावाने पैसा गोळा करुन बऱ्याच एनजीओ नक्षलवादी संघटनांना फंड पुरवण्याचे काम करीत आहेत , एवढंच नाही तर काही अतिरेकी संघटनांना पण याच प्रकारे पैसा पुरवला जात आहे.
एखादी एनजीओ तयार करुन इंडस्ट्रीजला ब्लॅक मेल करणे, पब्लिक लिटीगेशन मधे केसेस दाखल करण्याची धमकी देउन पैसे उकळणे अशा अनेक तक्रारी आहेत काही एनजीओ विरुद्ध. मला तर वाटतं की केवळ याच साठी एनजीओज तयार केलेल्या आहेत काही व्हाईट कॉलर गुंडांनी.
हे लक्षात आलं म्हणून सरकारने बिहार, बंगाल, आंध्रा, उत्तरपुर्व भागामधे बऱ्याच एनजीओ वर बंदी घालण्यात आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर ८३३ व्हॉलेटरी एनजीओंना निरनिराळ्या कारणांसाठी काळ्या यादीत ( ब्लॅक लिस्ट) टाकण्यात आले आहे यामधे पैशाचा हिशोब नीट न ठेवणं या पासुन तर नक्षलवादी कारवायांना पैसा पुरवणे असे गंभीर आरोप आहेत.
मनी लॉंड्रींग हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आज तुम्ही बघाल, बऱ्याच गेम शो मधे ( टीव्ही वरच्या ) सिनेमात काम करणारे ऍक्टर्स दिसतात. तिथे ते हमखास काहीतरी पैसे जिंकतात, (पांचवी पास से तेज है??, दस का दम, केबीसी असे अनेक उदाहरणं देता येतील). तो गेम शो संपला आणि शेवटी जिंकलेले पैसे आपल्याच कुठल्यातरी एनजीओ ला दान करतात. कधी तुमच्या मनात संशय आलाय कां? की ह्या प्रत्येक सिनेमाच्या हिरो, हिरोइनला स्वतःची एनजीओ असावी असे का वाटते? एखाद्या अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या एखाद्या एनजीओ ला हे लोकं पैसे का देत नाहीत?
आधी मला पण फार कौतुक वाटायचं ह्या हिरो, हिरोइन्स च्या सामाजिक बांधिलकीची असलेली जाणिव बघुन. पण जेंव्हा अजुन थोडं वाचलं, तेंव्हा ह्या मागचं कारण लक्षात आलं. मनी लॉंड्रींग साठी एनजीओ चा वापर भारतामधे फार पुर्वी पासून चालत आलेला आहे. राजकीय नेते, इतर प्रतिष्ठित व्यक्ती आपला पैसा इथेच लावून ………..असो.. तर अशा अनेक घटना निदर्शनास आल्यावर सरकारने ही काळी यादी जाहीर केलेली आहे.
अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे नोव्हेंबर २००९ पर्यंत कुठल्याही एनजीओ ला आपल्याला मिळालेल्या पैशांचा स्त्रोत /खर्च सांगणे आवश्यक नव्हते – खरं वाटत नाही??? मला पण खरं वाटत नव्हतं. पण आता ( नोव्हेंबर २००९ नंतर -)सेक्शन २५, इंडीयन कंपनी ऍक्ट १९५६ च्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या संस्थांना या पुढे आपल्या पैशाचा स्त्रोत सांगावा लागेल. तसेच पैसे कुठे खर्च झाले ते पण सांगावं लागेल. तशी या कायद्याला दुरुस्ती परिपत्रक नोव्हेंबर २००९ मधे लागू करण्यात येणार होते, त्याचं पुढे काय झालं ते माहिती नाही.
आता पर्यंत कसं होतं पैशाचं हस्तांतरण ते बघू या…. एनजीओला १ लाख रुपये द्या,
त्यावर ५० टक्के टॅक्स चा फायदा मिळवा कलम ८० जी च्या अंतर्गत.
किंवा १०० टक्के टॅक्स बेनिफिट मिळवा कलम ३५ ( एसी) ८० जी जी ए च्या अंतर्गत
अशा तर्हेने दान दिलेल्या पैशांवर टॅक्स बेनिफिट मिळवायचा. ५० ते ‘१०० टक्के टॅक्स वाचवायचा, आणि एनजीओ कडुन कॅश पैसे परत घ्यायचे. जर एक लाख दिले, तर त्यातले त्या एनजीने आधी पासून ठरवलेली काही रक्कम ठेवून घ्यायची, आणि उरलेली कॅश परत घ्यायची.. म्हणजे काळा पैसा पण तयार होतो. मजा आहे नां? शंभर टक्के टॅक्स चा फायदा, आणि सोबत काळा पैसा पण खर्चायला.
जर यात एनजीओ ला जो पैसा जातोय तो पण वाचवायचा असेल तर स्वतःचीच एक एनजीओ काढायची म्हणजे दान देणारे पण तुम्हीच आणि घेणारे पण तुम्हीच.
काय झालं? आश्चर्य वाटतंय?? मला पण वाटलं आश्चर्य हे वाचल्यावर. डोकं चक्राउन गेलं हे वाचल्यावर. अजूनही बऱ्याच खेळी आहेत या मधे. बऱ्याच साधू महंत लोकांच्या एनजीओ पण हे काम करतात.
इतकी वर्ष इमानेइतबारे इनकम टॅक्स न भरता, एखाद्या एनजीओला हाताशी धरुन टॅक्स वाचवता आला असता . 🙂 गमतीचा भाग सोडून द्या, पण किती सहजपणे काळे पैसे गोरे करता येतात , आणि सोबतंच काळे पैसे पण हातात रहातात ते बघा !
मी एकॉनॉमिस्ट नाही, पण मला जेवढं लक्षात आलं तेवढं लिहिलंय या खेळाबद्दल, तुम्हाला अजुन काही माहिती असेल तर जरुर कॉमेंट्स मधे लिहा. थोडं घाई घाईत लिहिलंय पोस्ट… चुक असेल तर अवश्य दुरुस्त करा कॉमेंट्स मधे. 🙂
काका
गेल्या नोहेंबर महिन्यात कॉलेज मध्ये एक ७ दिवसचा कॉन्फरंस झाली..indepth नावाची एक आहे एन्जिओ …बिल काका सुद्धा याला पैसे देतो…काम करते ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी….इंटर्नाश्नाल आहे संस्था…मी त्या कॉन्फरंस मध्ये स्वयंसेवक म्हणून होतो..अहो पूर्ण सात दिवस ५ स्टार होटेल मध्ये जेवण होत त्याचं….अन रोज ड्रिंक्स लागायच्या त्या लोकांना….
एक दिवस तर पब मध्ये सुद्धा पार्टी होती…..अहो तेवढा पैसा जर खरच जर वापरला असता न तर माझ्या गावात एक दवाखाना उभा राहिला असता अख्खा…..
माझा तर विश्वासच उडाला हे अनुभवल्यावर….
माझ तर अस मत आहे ह्यांना पैसे देण्यापेक्षा सरळ सरळ त्या गरिबाला पैसे द्यावे…
खर तर किती चांगला उद्देश होता या एन्जिओ मागचा….कि तुम्हला वेळ देता नसेल पण जर काही करायची इच्छा असेल तर पैसे द्यायचे….बर झाल हि पोस्ट टाकलीत….
माझ्या कडे तर अश्या बऱ्याच एन्जिओ चे किस्से आहेत…जाऊद्या त्याचीच एक पोस्ट होइएल….
सागर
ही दुसरी बाजु दाखवायचा विचार होता. भारतामधे कित्येक हजार असतिल या एनजीओ. बिहारात तर अगदी पिक आलंय यांचं..बऱ्याच चांगल्या एनजीओ पण आहेत. अर्थात तुम्हाला त्यांना ओळखता आलं पाहिजे.
मी तुमच्या योजनेचे कौतुक करतो सरळपणे कोणालाही काहीही देऊ नए , कारण सरळ बसल्या बसल्या पैशे दिल्याने पैश्याची किंमत कळत नाही , त्यापेक्षा त्यांना कामधंद्यसाठी पैशे दया , त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ दया .NGO स्थापन याच साठी होतात पण काय करणार ,करभाराच दळभद्री
प्रितेश
इथे दिलेले पैसे सत्पात्री दान आहे की नाही, हे समजणं कठीण झालंय.
एनजीओ वर बरंच काही आहे नेट वर.. वेळ मिळेल तर अवश्य वाचा यांची मोड्स ऑपरेंडी बद्दल.
Dhanyawaad kaka,
Aikun barach hoto hya prakarabaddal. Tumhi post kelat. aslya NGOs hun mothai samaajseva kelit tumhi.
विद्याधर
मनी लॉंड्रिंग हा मेन धंदा आहे या लोकांचा. बऱ्याच एनजीओ फक्त इंडस्ट्रिअलिस्ट लोकांना त्रास देण्यासाठीच तयार केलेल्या आहेत. एखाद्याने कंपनी सुरु करतो म्हंतलं की मग हे एनजीओ त्यांना भेटुन पैसे मागतात, नाहीतर त्यांच्या विरुध्द कोर्टात पब्लिक लिटिगेशन दाखल करण्याची धमकी देतात. चक्क धंदा आहे हा….
सङळीकडे फसवा फसवी आणि लबाडी करणारे आहेतच, आपणच आता समर्थांनी सांगितल्याप्रमाणे ‘सावध’ आणि ‘साक्षेपी’ रहायला हवे.
बाकी स्वतःचीच एक एनजीओ काढायची कल्पना छान आहे 🙂
आपण सावध राहिलं पाहिजे. पैसा देण्यापुर्वी स्वतः त्या इन्स्टीट्य़ुटला भेट देउन खात्री करुन घ्या की त्यांचं काम व्यवस्थित सुरु आहे म्हणुन. नंतरच पैसे द्या..
ह्यात काळंबेरं आहे ते वाटलं होतच… पण पुर्ण माहिती नव्हती.. अताशा कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही तेच कळेनासे झाले आहे…
मराठीमंडळी नावाची एनजीओ काढुया.. 🙂
विश्वास ठेवण्यापुर्वी खात्री करुन घ्या.. एवढंच सांगायचं होतं या पोस्ट मधे !
मराठी मंडळी नावाची एनजीओ काढायची कल्पना छान आहे.. 🙂 चालेल!!
सागर शी सहमत. खरच अशा संस्थाना मदत करण्यापेक्षा आपल्या जवळच्या, माहितीतल्या एखाद्या गरजुला मदत केलेली कधीही चांगली.
सामाजिक बांधिलकीची जाणिव म्हणुन कुणालाही मदत करायला हरकत नाही.
सेवा भावी संस्था NON GOVERNMENT ORGANIZATION trust हा सरकारी पैसा जनतेच्या नावाखाली स्वत:आणि कुटुंबाच्या कल्याणा साठी वापरावयाचा हा जुना धंदा झाला आहे.यात सिनेमा कलाकारा बरोबर राजकारणी सुद्धा सहभागी आहेत. निवडणूक मध्ये मालमत्तेच्या शपथ पत्रात बऱ्याच राजकारण्या जवळ गाडी नाही असे लिहिले होते पण हे राजकारणी संडासला जाताना सुद्धा गाड्या वापरतात हे जनतेला सरकारला इन्कम tax विभागालाही माहित आहे. या गाड्या यांनीच स्थापन केलेल्या संस्था NGO संघटनांच्या नावावर आहेत. आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा हमारा असा हा प्रकार आहे. पण तुम्ही जर NGO होण्याचे ठरविले तर नोकरशाही तुमची फाईल कधीच पास करणार नाही हे कटू सत्य आहे.Thanthanpal
एनजीओ च्या बाबत वाचतांना बऱ्याच गोष्टी समोर आल्या.
ह्या लिंक्स बघा..
१)http://www.taxguru.in/finance/section-25-companies-charitable-trust-ngo-societies-under-the-purview-of-prevention-of-money-laundering-act-pmla-2002.html
२)http://www.karmayog.org/startanngo/
बऱ्याच गोष्टी समोर आल्या.मला तर फार जास्त काही वाचायला वेळ मिळाला नाही, पण जितकं वाचलं त्यावरुन हा एक चांगला पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे हे लक्षात आलंय.
एनजीओ सुरु करणे वगैरे अतिशय सोपे आहे. थोडे फार पेपर वर्क केले आणि काही लोकांचे हात ओले केले की झाले.
हे सगळं पाहिलं आणि लक्षात आलं की या मधे सगळ्याच पक्षांचे नेते आहेत गुंतलेले. त्यामुळे इतके लुप होल्स ठेवले आहेत कायद्यामधे..
कठुन पैसा आला, ते सांगायची गरज नाही,
कुठे खर्च केला ,ते पण सांगायची गरज नाही..
नुकताच यावर एक नविन नियम केलाय असं ऐकलं , पण तो इम्प्लिमेंट झाला की नाही ते समजलं नाही .
प्रतिक्रियेकरता आभार.
चांगला धंदा आहे. . .सहानभूती दाखवून पैसे कमवायचा. . .
सहानुभुती विकायचा धंदा..
bare zale tumhi ha blog lihila to… mala ya prakarabaddal kahich mahiti nawhati.
चक्क धंदा करुन ठेवलाय समाजसेवेचा. जितकं वाचाल, तितकं जास्त माहिती होते, आणि संताप येतो.अमेरिकेत पण ९/११ नंतर सगळ्या एनजीओ स्कॅनर खाली आणल्या आहेत . आपल्याला शुध्द कधी येणार कोणास ठाउक!
मी स्वतः एका एनजीओसाठी काम करतो. काही एनजीओ तशा असतीलही. पण काही एनजीओ खरोखर गरिबांना मदत करणार्या आहेत. फक्त दान करताना नीरक्षीरविवेक हवा.
सगळ्याच एनजीओ अशा आहेत असं म्हंटलेलं नाही मी. पण पैसा कमावण्यासाठी सिनेमाच्या हिरो , हिरोइन्स, पोलिटिकल लिडर्स च्या एनजीओ’ज बद्दल आणि ब्लॅक्मेलिंग साठी तयार झालेल्या एनजीओ बद्दल हे मत आहे. अहो, ९०० एनजीओ जर पकडल्या गेल्या असतिल, तर खरा आकडा नक्कीच खुप जास्त असेल.
काका असाच एक लेख वाचला होता काहि दिवसांपुर्वी, ह्यांचे “COZ” ऎकुन माझ्या डोळ्यासमोर तर “काजवे” चमकले……….पण सदर लेखातुन छान प्रकाश टाकला आहे !!!!!!!!
हा लेख म्हणजे मी वाचलेल्या चार पाच लेखांचं कडबोळं आहे. माझं काहीच नाही या लेखात. सगळा डाटा नेटवरचा आहे , मी फक्त जेवढं समजलं, तेवढं लिहिलंय इथे..
त्याचच श्रेय तर तुम्हाला दिलय….
धन्यवाद!खरं सांगतो, मी स्वतःचा किती टॅक्स वाचेल ते बघायला म्हणुन इनकम टॅक्स च्या साईटवर गेलो होतो, तिथे एक कलम पाहिलं, एनजीओ बद्दल, आणि मग पुढे डिग केलं, तर इतकी माहिती सापडली , की हे पोस्ट लिहावसं वाटलं..
अगदी अगदी उत्तम लेख.. मला कायमच या NGOs आणि ह्युमन राईट्स वाल्यांबद्दल प्रचंड चीड आहे. मागे एक आर्टीकल वाचलं होतं. त्यात नर्मदा आंदोलनात घुसलेल्या NGOs आणि त्यांचे छुपे धंदे यावर प्रकाश टाकला होता. तेव्हापासून मनातून उतरले ते लोक.
नर्मदा आंदोलनात तर यांनी खुप काही केलं, पैसे कमवायला. प्रोजेक्ट बंद पाडण्यापर्यंत मजल गेली होती. ह्युमन राईट्स.. छान विषय आहे, त्यावर पण लिहायचंय एकदा.
नक्की लिहा.. वाट बघतोय..
🙂 जरुर.. लवकरचं लिहायला हरकत नाही.
विषय पाहून अगदी लगेच क्लिक केलंय आणि खरंच खूप मोलाची माहिती मिळाली आहे…मला कल्पनाच नव्हती की NGO च्या नावाखाली इतके काळे धंदे कुणी करत असतील…आपल्याकडची एक एक रॅकेट शोधायला गेलं तर लोकं कमी पडतील शोधायला…
आजकाल सत्पात्री दान म्हणजे स्वतःच मुळापर्यंत जाऊन केलं तर होणार असं दिसतंय…
हे सगळं शोधायलाच पाहिजे कोणी तरी. बऱ्याच एनजीओ फक्त एकाच माण्साच्या डोनेशन वर चालतात.. हे कसं शक्य आहे??
भारी आहे हे टॅक्स वाचवण्यासाठी स्वत:ची ‘एनजीओ’ काढण्याच प्रकरण…पण मी काही संस्था बघितल्या आहेत ज्या खरच तळमळीने काम करतात लोकांसाठी पण आता या घटनांमुळे लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दॄष्टीकोनही बदलेल हि सर्वात दु:खाची बाब आहे….बाकी नेहमीप्रमाणेच छान माहिती…
अर्थात, चांगल्या संस्था पण आहेतच. पण त्याच सोबत ह्या सिनेमाच्या हिरो हिरोइन्स्च्या आणि ब्लॅकमेलर्सच्या पण एनजीओ आहेतच . केवळ कॉशन म्हणुन ही पोस्ट लिहिली इथे. मला पन पुर्वी एनजीओ फार चांगले वाटायचे -आता नाही!
कधी कधी ना काहिच समजत नाही, म्हणजे उडदामाजी काळेगोरे असायचेच पण हल्ली हा भष्टाचाराच्या भस्मासुराने कुठलाच प्रांत सोडलेला नाहिये……
खूप माहिती मिळतेय तुमच्या पोस्ट्स मधून , पण महेंद्रजी खूप सुन्न, विषण्ण होणे म्हणजे काय याची अनुभुती होते हे सगळे वाचले की…….
दान सत्पात्री व्हावे हे आपण पुर्वापार ऐकत आलोय, पण मग आता काहि दान केले तर त्याचा मागोवा घ्यावा लागणार, अश्याने जी लोक कोट्याधिश नाहियेत पण जे काही थोडेफार मिळते त्यातुनही काही वाटा समाजासाठी ठेवताहेत अश्यांची केव्हढी फसवणूक आहे ही!!!!
आपणही जे देतो , ते काही हजारातच असतं. लाखो रुपये दान करण्याची आपली ऐपत नाही. फक्त ते चांगल्या संस्थांना दिलं जावं अशी इच्छा आहे बाकी काही नाही.
खुप मोकळीक दिलेली आहे या एनजीओंना पैशाशी खेलायची. आता २६/११ नंतर तरी हे थांबायलाच हवं.
फार फार वर्षांपूर्वी अंतर्गत प्रेरणांमुळे मी एका ngo सोबत काम करायला धजावले होते. तिकडे असा अनुभव नव्हता पण समाजकार्य म्हणजे टिकल्या टिकल्यांची साडी नेसायची आणि कुणी काही म्हटलं की होऽहो असं तोंडभर हसून म्हणायचं असतं, असा माझा गैरसमज झाला होता. अर्थातच मी त्या एका भेटीनंतर पुन्हा तिकडे गेलेच नाही. ngo ची मुळं खूप आतपर्यंत गेली आहेत म्हणायची. त्यापेक्षा स्वत:च एखाद्या गरजूला मदत केलेली बरी.
मी पण आता मेल पाठवलाय मेक माय विश ला व्हॉलेंटिअर म्हणुन काम करायची इच्छा आहे म्हणुन. नेहेमी क्राय ला पैसे पाठवत असतो., क्रेडीट कार्ड वर पॉइंट्स जमा झाले की त्याच्या थ्रु क्राय , सेव्ह द चिल्ड्रन ला पैसे पाठवतो.
गरजु लोकांना मदत करणं कधीही योग्य, पण खऱ्या गरजुलाच केली जावी असे वाटते. मी पाहिलंय, मागे एकदा एका ड्रायव्हरच्या मुलाला हार्ट च्या ऑपरेशन साठी पाच हजार रुपये दिले होते, त्याने बऱ्याच समाजसेवी संस्थांना पण मदत मागितली. शेवटी एका संस्थेने पुर्ण खर्च उचलला ऑपरेशनचा, पण त्याने ऑफिस मधुन गोळाकेलेले (वर्गणी करुन ) १ लाख २० हजार रुपये परत केले नाहीत.
ऑपरेशनचा खर्च एनजीओ ने केल्यामुळे त्याने एक सेकंडहॅंड कार घेतली टॅक्सी म्हणुन चालवायला.. आता काय बोलायचं यावर??
मला जाम हौस होती एखाद्या संस्थेला मदत करावी, त्यासाठी काम करावे. पण अशा एकेक गोष्टी वाचुन/ ऐकुन उत्साह मावळुन जात आहे.
एखादं अनाथालय वगैरे बघुन तिकडे मदत करावी .
महेंद्रजी उत्तम व मनातले लिहिलय. आजचा सुधारक या नागपुर हुन प्रकाशित होणार्या मासिकाने एनजी ओ विशेषांक काढला होता. पारदर्शकता हा भाग कुणालाच कायम स्वरुपी परवडत नाही. देवाच्या नावाने जेवढा संस्थानात पैसा गोळा होतो तेवढा अजुन अन्य माध्यमातुन होत नाही. भविष्यात ही जागा एनजीओ घेईल असे आमचे भाकित आहेच. आपल्याशी संपर्क आवडेल. आम्ही पारदर्शि आहोत.
अवांतर- मिपावर हल्ली येत नाहि आपण
आम्हि मिपाकर http://www.misalpav.com/tracker/27/27
तसेच उपक्रमी http://mr.upakram.org/tracker/582
प्रकाशजी
धन्यवाद. अहो हल्ली थोडं जास्त काम वाढलंय त्यामुळे शक्य होत नाही. सोशल साईट्स तर मी बंद करुन जवळपास वर्ष होऊन गेलंय. इथे ब्लॉग वर आपल्याला काय म्हणायचंय ते म्हंटलं की झालं. दररोजचे दिड तास देतो ब्लॉगिंग साठी. ब्लॉग लिहिणे, उत्तरं पाठवणे वगैरे. इ मेल पाठवतोय ..