बझ…

गुगलने नवीन सुरु केलेली ही बझ सेवा फुल टू टाइम पास आहे. सध्या वेळ घालवायला तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. ऑर्कुट मधला स्क्रॅप चा कन्सेप्ट, ट्विटर मधला गृप चॅटींगचा कन्सेप्ट (-ट्विटर मधे तुम्हाला एखाद्या मित्राने उत्तर दिलं  तर तो कुठल्या ट्वीट ला केलाय ते समजत नाही , ते इथे समजतं  ) थोडा मॉडीफाय करुन इथे वापरलाय, तुम्ही कोणालाही फॉलो करु शकता,तसेच ज्याला तुम्ही फॉलो करताय  त्याच्याजवळ तुम्हाला ब्लॉक करण्याची सुविधा पण आहे.

थोडक्यात तुम्ही ऑफिसमधे जर ऑर्कूट , फेस बुक, ट्विटर   वगैरे ब्लॉक केले असतील तर इथे  सोशलाइझ होऊ शकता. एका मित्रा बरोबरच्या गप्पा जे कोणी तुम्हाला फॉलो करताहेत ते सगळे पाहू शकतात आणि त्यात पार्टीसीपेट करु शकता.  थोडं विस्तृत करुन सांगतो..

उदाहरणार्थ , जसे समजा मी   कांचन कराइ यांना फॉलो करतोय. त्यांचे बझ फक्त  मला दिसतील माझ्या इन बॉक्स मधे. जो पर्यंत मी त्यावर कॉमेंट टाकत नाही, तो पर्यंत मला फॉलो करणारे मित्र मैत्रिणी ते बझ पाहु शकणार नाहीत, पण एकदा त्यावर मी काही कॉमेंट टाकली , की जे मित्र मला फॉलो करित आहेत ते सगळे लोकं हे बझ पाहु शकतिल आणि त्यात सहभागी होऊ शकतील. समजा माझ्या एखाद्या मित्राने त्यावर कॉमेंट टाकली ,तर ते बझ त्याला फॉलो करणारे सगळे मित्र पण पाहु शकतिल.

हा प्रकार तसा खुप छान आहे, पण त्याच सोबत तुमच्या प्रायव्हसी वर  गुगलने घातलेला घाला आहे अशिही बोंबाबोंब सुरु आहे .  नुकतीच होळी झाल्याने तो शब्द आठवला  🙂

कालचीच गोष्ट बघा, कांचनने एक सुंदर फोटो टाकला बझ वर.. आता फोटो वरुन सुरु झालेली चर्चा कुठे पोहोचली  ते बघा.. मी जेंव्हा दुपारी लंच टाइममधे हे ट्विट पाहिलं, तेंव्हा हसुन हसुन  पुरेवाट झाली होती, म्हणुन इथे एक सॅंपल कॉन्व्हर्सेशन म्हणून पोस्ट करतोय. प्रत्येकाच्या कॉमेंट्स एकाखाली एक पोस्ट करतोय सावकाश प्रत्येक कॉमेंट वाचा..

कांचन कराई – Buzz – सार्व‍जनिक – नि:शब्द केलेले
2 photos
10 लोकांना हे आवडले – Ravindra Koshti, आनंद काळे, Devdatta देवदत्त Ganar गाणार, Dipak Shinde, Anand Patre, प्रमोद देव, विकास पिसाळ (vikas pisal), माझी दुनिया , 2 अन्य, Abhishek Patil , Seema Joshi
कांचन कराई – कुणाच्याही मदतीशिवाय मी स्वत: बनविलेलं हे पहिलं शुभेच्छापत्र!मार्च 3
प्रमोद देव – मस्त! कांक अभिनंदन!मार्च 3
माझी दुनिया – मी म्ह्टलं मनसे आणि शिवसेने शिवाय कोणाच्या लक्षात तरी आहे की नाही आज तिथीने शिवजंयती असल्याची ! बाकी शुभेच्छा पत्र सहीच…पण तुझा लोगो टाक कीमार्च 3
प्रमोद देव – महाराजांची मज्जा आहे…दोनदोनवेळा बड्डे साजरा होतो. :)मार्च 3
कांचन कराई – कांक नको काका. मी कावळा असल्यासारखं वाटतं.मार्च 3
प्रमोद देव – हॅहॅहॅ….तुझ्याच नाव-आडनावाचं लघुरुप आहे ते….मग आता नाव बदल. ;)मार्च 3
प्रमोद देव – काका…हे देखिल कावळा ह्या अर्थी आहे….पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही…कारण चोच मारायची जन्मजात खोड आहे ना. :Dमार्च 3
आनंद काळे – मस्तच जमलयं… महाराजांचा असा फोटू नव्हता पाहिला…मार्च 3
कांचन कराई – नाव नाही बदलणार काका. नाव बदलून कसं चालेल? त्यापेक्षा संक्षिप्त रूपच बदला.मार्च 3
माझी दुनिया – एकदा बदलयं की नाव तीने……आता पुन्हा ?मार्च 3
कांचन कराई – तो फोटोच होता. त्याल थोडी ट्रिटमेंट दिल्यामुळे तो सावलीसारखा बनवता आला. शिकतेय हळूहळू. पतिराजांची कृपा.मार्च 3
कांचन कराई – मनसे आणि शिवसेनेने शिवजयंती साजरी केली आणि नाही केली तरी त्याला राजकीय रंग चढणारच. त्यापेक्षा आपण साध्यासुध्या भाषेत महाराजांचं स्मरण करू.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – कांचनजी, तुमची साईट बघितली. चांगली आहे.मार्च 3
कांचन कराई – धन्यवाद विकास.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – तुम्हाला गाणी इंटरनेट्वर ठेवायला जागा हवी असेत तर सांगा.
माझ्याकडे ६०० जीबी स्पेस आहे. मला पैसे नकोत.मार्च 3
माझी दुनिया – ६०० जीबी ? वा ! वा ! देवकाकांना विचारा…त्यांची ईस्निपसची जागा बळकावलीयमार्च 3
कांचन कराई – देवकाकांना नक्कीच याचा फायदा होईल.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – हो, माझ्याकडे खुप जागा आहे. पण मला वेळ नाही. सगळे बघायला.मार्च 3
प्रमोद देव – तू कुठून आणलीस इतकी जागा?मार्च 3
कांचन कराई – तू कुठून आणलीस इतकी जागा?मार्च 3
माझी दुनिया – ही एव्हढे ६०० जीबी मिळाली कुठून ?मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – विकत घेतली.मार्च 3
माझी दुनिया – :-)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – १० वर्षासाठीमार्च 3
कांचन कराई – तुला काय वेबसाईट वगैरे बनवायची आहे का?मार्च 3
माझी दुनिया – विकत ? धन्य हो महाप्रभू ! इथे सगळे फुकट काय आहे ते द्या म्हणतात.मार्च 3
प्रमोद देव – काय करायचा विचार होता म्हणून घेतलीस?मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – मी पुर्वी सर्वर अडमिनचे काम करायचो, म्हणुन घेतली होती.
माझे ३-४ डोमेन आहेत. पण साईट बनवायला वेळ नाही. म्हणुन पडुन आहे जागा.
कोणी वापरत असेल तर मला आंनदच आहे. पैसे दिले तर चांगले, नाही दिले तर ठिक.मार्च 3
माझी दुनिया – @काका, विचार करा, ईस्निप्स फक्त ५ जीबी देतयं…आणि ते कधीही तुमचा विदा गायब करतात. ही ६०० जीबी विकत घ्या…हवी तितकी गाणी आणि हवे तितके अंक काढा ;-)मार्च 3
Marathi Scrap – विकास पिसाळ माला गाने होस्टिंग साठी जगा पाहिजे आहे जमल्यास माला reply करा
माझी वेब साईट ची लिंक देत आहे बघा
http://www.marathiscraps.netमार्च 3
प्रमोद देव – पैसे कुणी देईल असे नाही वाटत आणि ती जागा फुकट वापरायला आज जरी तू दिलीस…आणि समजा उद्या तुझे आणि त्याचे संबंध बिघडले तर?..गेली त्याची सगळी मेहनत पाण्यात….त्याऐवजी जालावरच जाहैरात देऊन जागा विकून टाक किंवा कुणाला तरी दान करून टाक.मार्च 3
Marathi Scrap – मी पैसे देतोमार्च 3
प्रमोद देव – मी फुकट्या आहे….माझ्यानंतर कोण आहे सांभाळायला…म्हणून काही विकत घ्यायचे नाही आणि विकायचेही नाही हे आमचे ब्रीद आहे. तेव्हा जे काही उरेल ते फुकटचेच फुकट जाईल….त्यामुळे काकांच्या पिंडाला का शिवेल ह्याची खात्री.मार्च 3
प्रमोद देव – घे विकास..इथेच तुला ग्राहक भेटला. ले,ऐश करमार्च 3
प्रमोद देव – करून टाक सौदा.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>Marathi Scrap
तुमचा इ-मेल आय डी पाठवता का? येथे vikas.pisal@gmail.comमार्च 3
कांचन कराई – वा, वा! बझ्झचा उपयोग चांगल्या कामासाठी होण्याची सुरूवात झाली आहे तर!मार्च 3
प्रमोद देव – टाळ्यांचा कडकडाट!मार्च 3
प्रमोद देव – बझचा बझार झाला. :)मार्च 3
Marathi Scrap – कडकडाट :Dमार्च 3
कांचन कराई – बझ्झ बझार!
टाळ्यांचा कडकडाट!मार्च 3
प्रमोद देव – फीत कापायला मला बोलवा रे मुलांनो….फुकटात फीत कापीन. ;)मार्च 3
माझी दुनिया – मलाही पाठवा डिटेल्स majhiduniya@gmail.com पटलं तर पाहू. या जागेत वर्डप्रेसची प्रणाली अपलोड करून माझा ब्लॉग कार्यान्वयित करता येईल का ?मार्च 3
प्रमोद देव – अरे वा. आता बोली लावा.मार्च 3
प्रमोद देव – आता खर्‍या अर्थाने सुरु झाला..बझबझाट….बाजारहाट साठी महाजालीय नवा शब्द.मार्च 3
माझी दुनिया – आज काका जाम पेटलेत…आज गिळायला जायचं नाही की गिळूनच आलात ?मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – हे सगळे लगेच साईट्वर मी टाकु शकतो.

Blogs ,b2evolution ,Nucleus,,WordPress,,Classifieds,Noahs Classifieds,Content Management,Drupal,Geeklog joomla 1.5 ,Joomla ,Mambo ,PHP-Nuke ,phpWCMS ,phpWebSite Siteframe ,TYPO3 ,Xoops Zikula,customer Relationship ,Crafty Syntax Live Help ,Help Center Live ,osTicket,PerlDesk,PHP Support Tickets,Support Logic Helpdesk,Support Services Manager ,Discussion Boards ,phpBB,SMF ,E-Commerce ,CubeCart ,OS Commerce ,Zen Cart

F.A.Q. FAQMasterFlex ,Hosting Billing
AccountLab Plus ,phpCOIN,Image Galleries ,4Images Gallery ,Coppermine Photo Gallery ,Gallery
,Mailing Lists.PHPlist,Polls and Surveys,Advanced Poll ,LimeSurvey,phpESP,Project Management,dotProject,PHProjekt,Site Builders,Soholaunch Pro Edition,Templates Express ,Wiki
TikiWiki CMS/Groupware,PhpWiki ,Other Scripts,Dew-NewPHPLinks,Moodle ,Open-Realty,OpenX
PHPauction ,phpFormGenerator,WebCalendarमार्च 3

प्रमोद देव – माझं झालं गिळून. टुक टुक :)मार्च 3
कांचन कराई – हे सर्व पर्याय आहेत का? म्हण्जे जसं गुगलचं डॉक, ब्लॉग, इमेजेस असे पर्याय असतात तसं. सोप्या भाषेत सांग गड्या.मार्च 3
माझी दुनिया – पण तरिही डोमेन नेम विकत घ्यावेच लागेल ना ?मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – नाही, ते टीके फ़ुकट मिळते.मार्च 3
Marathi Scrap – vikas me intrested aahe prize saangमार्च 3
कांचन कराई – mogaraafulalaa@gmail.com काही डिटेल्स मलाही पाठव ना.मार्च 3
माझी दुनिया – @काका, तरिच जोर चढलाय जास्त. तो जोर जरा बाजाराला वर ढकलायला लावलात तरं बरं होईल.मार्च 3
Marathi Scrap – scrapmarathi@gmail.com mala pan pathavमार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – कांचन हे पहा
Blogs ,b2evolution,Nucleus ,WordPress,Classifieds,Noahs Classifieds ,Content Management ,Drupal,Geeklog,Joomla 1.5,Joomla ,Mambo ,PHP-Nuke,phpWCMS,phpWebSite,Siteframe,TYPO3
कांचन कराई – अरे, हे समजलं पण हे सर्व एकाच साईटमधे टाकता येतं का? गुगलसारखं. आय मीन समजा मी हे सर्व केलं तर माझ्या साईटवरून लोक ब्लॉग बनवू शकतील का?मार्च 3
माझी दुनिया – .tk चे डोमेन काही उपयोगाचे नाही. ३ ते ६ महिन्यात ते लोक विकत घ्यायला लावतात. मी सुरूवातीला तेच केलं होतंमार्च 3
कांचन कराई – तांत्रिक अज्ञान! :-(मार्च 3
प्रमोद देव – अरे वा! आता सामना मस्त रंगलाय….एक जागा..तीन ग्राहक
अजूनही काही लोकं येतील बहुदा भाग घ्यायला आणि हा सामना भलताच रंगणार!मार्च 3
आनंद काळे – हे सगळे होस्टिंगचे वेगवेगळे प्रकार/सोफ्टवेअर प्रणालि आहेत…मार्च 3
माझी दुनिया – @काका, तुम लढो, हम तिकिट बेचता है !मार्च 3
प्रमोद देव – 🙂
हम तो टाळ्यांका कडकडाट करेंगे……तुम सब खेळो.मार्च 3
प्रमोद देव – हवं तर धावतं वर्णन करेंगे. 😉 म्हणजे मी धावत राहीन..इथून तिकडे.मार्च 3
Marathi Scrap – विकास तू वेब disigner आहे का ?मार्च 3
माझी दुनिया – @काका, तो मोडका पाय सांभाळा म्हणजे झालं ;-)मार्च 3
कांचन कराई – स्वत:ची वेबसाईट बनवायची होती पण ते जमेना म्हणून तर ब्लॉगला .com बनवून घेतलं.मार्च 3
माझी दुनिया – हो गं, ती तर भानगड आहेचमार्च 3
प्रमोद देव – चाकाच्या खुर्चीवर बसून…कंसात लिहायला विसरलो. :Dमार्च 3
कांचन कराई – मग हे Drupal Joomla कसं समजणार?मार्च 3
Marathi Scrap – कांचन तुम्ही तुमचा ब्लॉग जसाचा तसा डोमिन वर शिफ्ट करू शकता
मी पण तसेच केले आहे आधी मज़ा ब्लॉग होता आता मी .नेट छे डोमिन घेतले आणि शिफ्ट केला आहेमार्च 3
माझी दुनिया – ड्रुपल, जुमला हे CMS आहेतमार्च 3
प्रमोद देव – मादु आणि कांचन तुम्ही दोघींनी ठरवलंत तुम्ही हे सहज शिकू शकाल…तुमच्याकडे डोकं आहे त्यासाठीचे.मार्च 3
आनंद काळे – तेच बेस्ट आणि फ़्री आहे…(ब्लोग)
फक्त काहि अप्लोड करायच असेल तर ओनलाइन जागा हवी…
झूम्ला फ़्री आहे.. पण त्यासाठी थोडे webdesigning चे द्न्यान हवे…मार्च 3
कांचन कराई – म्हणजे आता यासाठी मुशाफिरी करावी लागेल, आंतरजालावर. हरकत नाही पण वेळ पुरेसा हवा त्यासाठीमार्च 3
माझी दुनिया – खरं तर मला जागेची तशी गरज नाही. कारण wordpress.com एका ब्लॉगमागे ३ जीबी फुकट देतंच…मी वेगवेगळ्या कारणाकरता….१० ब्लॉग्ज उघडून ३० जीबी वर हक्क सांगितलाय ;-). तिथे अपलोडींग करून , युआरएल मिळवून ते इतरत्र चिकटवता येईलच.मार्च 3
Marathi Scrap – विकास ची कही इच्छा दिसत नाहि आहे जगा देण्याची :(मार्च 3
माझी दुनिया – ६०० जीबी चा भाव म्हणजे ६०० स्के.फू. चा भाव की काय ?मार्च 3
Marathi Scrap – मालक भाव ठर्वेल योग्य वाटल्यास लगेच ऑनलाइन बैंकिंग ने पैसे पाठवले जातीलमार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – अहो, मी ओफ़ीस मध्ये आहे, त्यामुळे पटापट उत्तरे नाही देउ शकत.मार्च 3
कांचन कराई – इंटरनेट हे बाकी आवडतं मला. कामं कशी झटपट होतात.मार्च 3
Marathi Scrap – ठीक आहे विकास ऑफिस काम आधी नंतर बोली करू आपणमार्च 3
प्रमोद देव – बोली लावा ..खरंच .मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – ज्याला हवी तेवढी स्पेस घ्या, दर जीबी प्रमाणे,मार्च 3
Marathi Scrap – माला ५ जीबी पाहिजे आहे किती लागतीलमार्च 3
माझी दुनिया – हो प्रति जीबी भाव सांगा, शिवाय किती दिवसांकरता ?मार्च 3
प्रमोद देव – १०००रुपयेमार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>Marathi Scrap –
तुम्हला इ-पत्र पाठवले आहे,
तुम्ही बाजारभावाचा विचार करुन मला तुमची ऒफ़र सांगा. vikas.pisal@gmail.comमार्च 3
Marathi Scrap – माला बाजार भाव नाहि माहिती तुम्ही सांगा बाव मी माज्या मित्राला विचारतो आणि तुम्हाला लगेच सांगतोमार्च 3
Sher Hindusthani – जर स्पेस विकायचा असेल तर आम्हालाही लक्ष्यात ठेवा.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>Sher Hindusthani
तुमचा इ-मेल आय डी पाठवता का? येथे vikas.pisal@gmail.comमार्च 3
Tushar Joshi – अरे वा, वेब साईट स्पेस आणि डोमेन नेम मी सुद्धा देतो हो. तो माझा स्वतंत्र व्यवसाय आहे :). कुणाला हवे असल्यास मी माझे रेट कार्ड पण मेल करेन. बाकी सगळे विकास जींनि सांगितले तसेच मिळते, भाव मात्र वेगळे असू शकतात. मला मेल करा tusharvjoshi@gmail.com वर.मार्च 3
Mahendra Kulkarni – मस्त सुरु आहे. चालु द्या..संपादित करामार्च 3
Mahendra Kulkarni – मी यावर एक ब्लॉग लिहू कां? हे सगळं पोस्ट करतो ब्लॉग वर, मस्त करमणुक प्रधान पोस्ट होईल. :)संपादित करामार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – हा हा हामार्च 3
प्रमोद देव – करा करा कोण आधी करे तो!
पळा पळाच्या चालीवर

लिहा. बिनधास्त लिहामार्च 3

कांचन कराई – मस्तच! लिहून टाका. मागे तर काका आणि ताईने क्रिकेटच्या स्कोअरचा एक बझ्झ बनवला होता.मार्च 3
Mahendra Kulkarni – मला तरी ह्या सगळ्या कॉमेंट्स वाचायला खुप मजा वाटली.संपादित करामार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – काय राव, गरीबांची थट्टा करता !!!मार्च 3
माझी दुनिया – @विकास गरीब ? काय मस्करी करता काय हो ६०० जीबी चे मालक ;-)मार्च 3
प्रमोद देव – कुलकर्णीसाहेब लिहा हो बिनधास्तमार्च 3
Mahendra Kulkarni – @विकास.. कोण म्हणतो मराठी माणसाला धंदा करता येत नाही म्हणुन??संपादित करामार्च 3
कांचन कराई – ६०० जी.बी. च्या जागेची मालकी असलेला गरीब!मार्च 3
माझी दुनिया – :-)))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))मार्च 3
Tushar Joshi – श्रीमंत सहाशेजीबीपती विकासराव पिसाळ यांचा विजय असो. मी पण :)मार्च 3
प्रमोद देव – संजय गांधीची झोपडी होती स्वित्झर्लंडमध्ये…..१०-११ खोल्यांची. ;)मार्च 3
प्रमोद देव – श्रीमंत दगडूशेठनंतर…आता श्रीमंत विकासशेठ…पूण्यभूषण!मार्च 3
कांचन कराई – स्वित्झर्लंडमध्ये ११ खोल्यांची… मग झोपडीच!मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – चालु द्यामार्च 3
प्रमोद देव – म्हणजे तिथे ४खोल्यांचे बंगले असतात तर! :Dमार्च 3
Tushar Joshi – या सगळ्यावरून मला ईतके कळतेय की हे ड्रुपल जुमला वगैरे याबाबत मराठीत लिहून समस्त मराठी जनतेला शहाणे करून सोडावेमार्च 3
आनंद काळे – हा हा…विकासचा बकरा बनला या बझ्झ वर.. आणि तो मला छळतोय माझ्या बझ्झ वर… छान…मार्च 3
प्रमोद देव – अरे वा!
तुषार तुलाही खाद्य मिळाले तर ह्या गप्पांतून.मार्च 3
माझी दुनिया – प्रासाद ( ४ खोल्यांचे )तिथे बहु परि मज आईची झोपडी ( ११ खोल्यांची) प्यारी ;-)मार्च 3
माझी दुनिया – @तुषार, स्वागत आहे. लिहाचं जरा त्या ड्रुपल, जुमला बद्दल, त्या कांचन बाईंना जरा शहाणं करून सोडा.मार्च 3
Mahendra Kulkarni – मेनका म्हणत असेल हे गाणं.. ’त्या तिथे’ तिकडे, पलिकडे… माझीया संजयचे झोपडे…संपादित करामार्च 3
प्रमोद देव – जमलं तर लिही
जुमलावर
नाही जमलं तरी
लिही कवितेवरमार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – कुलकणी साहेब, तो माझा धंदा नाही. मी ६०० जी बी घेतली होती माझ्यासाठी, पण मी वापरु शकत नाही.मार्च 3
माझी दुनिया – दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. आमच्याकडे वेब स्पेस वापरून ब्लॉग काढायची अक्कल नाही.मार्च 3
प्रमोद देव – ६००जी बी घेतली…बी म्हणजे काय? बीयाणं(बेणं)मार्च 3
Tushar Joshi – विकासभाई त्या जागेचे गाळे पाडा आणि किरायाने द्या किंवा विका कसे?मार्च 3
कांचन कराई – हो, मला या ज्ञानामृताची गरज आहे.मार्च 3
माझी दुनिया – विकासभाई त्या फेसबुकात फार्मविलावाल्यांना द्या…तुम्हाला दुवा देतील.मार्च 3
Mahendra Kulkarni – @ विकास.. चेष्टा केली.. इतकं सिरियसली घ्यायला नको काही.. इतकी धमाल सुरु होती, म्हंटलं आपणही थोडी बॅटींग करावी..संपादित करामार्च 3
Tushar Joshi – ते फेसबुक राहीलेय कुठे आता ते तर फेसविले झालेय, तिथे सगळे झाडे उगवत बसतात आजकालमार्च 3
Tushar Joshi – आज सगळ्यांनी कांचनच्या बझ चा कॅफे केलेला दिसतोयमार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>विकासभाई त्या जागेचे गाळे पाडा आणि किरायाने द्या किंवा विका कसे?
हो, तेच करायचे म्हणतो आहे.मार्च 3
कांचन कराई – म्हणूनच फेसबुकवर जात नाही. तिकडे गेमच्या रिक्वेस्ट पाहून तोंडाला फेस येतो.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>तिकडे गेमच्या रिक्वेस्ट पाहून तोंडाला फेस येतो.
म्हणुन फ़ेसबुक म्हणतात ना.मार्च 3
प्रमोद देव – अरे बाबांनो,अधून मधून आपला हास्यगाऽरवा हा अंकही वाचा आणि त्यावर प्रतिक्रियाही द्या बरं का….आणि आपापल्या दोस्तांनाही सांगा.मार्च 3
आनंद काळे – मला तर ओर्कुटच बर वाटतं..पण तेही कधी कधी घरी असलं जी जमत ओपेन करायला…
एकदा तर त्या फार्मविलात माझी सगळी शेती वाया गेली… कारण फेसबुकात आठवड्यानंतर डोकावलो होतो… तेव्हापासुन ते बंद…..मार्च 3
कांचन कराई – तिकडे गाई-गुरं दत्तक सुद्धा घेता येतात म्हणे. इकडे घरात बायका सिरियल्सवर वेळ वाया घालवतात म्हणून बोंबलायचं आणि आपण तिकडे फेसबुकात गेम्स खेळायचे.मार्च 3
Tushar Joshi – कुणीतरी सांगून गेलेय ना की “या बायकांना काही कळत नाही” ते आठवलं मलामार्च 3
माझी दुनिया – @कांचन्बाय, सही बोलताय, सही बोलताय :-)मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – >>तिकडे गाई-गुरं दत्तक सुद्धा घेता येतात म्हणे.
माझ्या घरी या, सगळी शेती बघायला मिळेल.मार्च 3
प्रमोद देव – अरे बाबांनो,अधून मधून आपला हास्यगाऽरवा हा अंकही वाचा आणि त्यावर प्रतिक्रियाही द्या बरं का….आणि आपापल्या दोस्तांनाही सांगा ;)मार्च 3
Tushar Joshi – .

बाहेर जाताना विचारते कोणती साडी घालू
उत्तर देताच म्हणते घालू का हिरवाच शालू
आधीच ठरले होते तर विचारायचे कशाला?
कोणतीही घाल म्हणायची सोय नाही बिचाऱ्याला
तसे म्हटले तर नको तेव्हा रूसून बसणार बाई
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

ही गाडी चालवणार तेव्हा मी डोळे मिटतो
हिला इतर गाड्यांचा अफाट अंदाज असतो
कुठेही ब्रेक लावते कुठेही शहनाई हार्नची
डेंटींग पेन्टींगनेच होते सांगता महिन्याची
हवे तसे वळणावर कधीच वळत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

आउच्या काऊचे काहीतरी उगाच सांगत बसते
टिव्ही सिरियलच्या प्रसंगांवर हसते रडते
या कानातून त्या कानात केले तर येतो राग
ऐकण्याचे नाटक केले तर तेही पडते महाग
यांना दया म्हणूनही जरा शांत राहता येत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

तुषार जोशी, नागपूरमार्च 3

विकास पिसाळ (vikas pisal) – >>अरे बाबांनो,अधून मधून आपला हास्यगाऽरवा हा अंकही वाचा
हो, नक्कीच
२ कथा वाचल्या आहेत.मार्च 3
कांचन कराई – चांगली कविता आहे.मार्च 3
माझी दुनिया – सगळ्यांनी कळेल असं वागलं तर तुम्हा पुरूषांचं महत्व काय र्‍हायलं ?मार्च 3
Tushar Joshi – मी अजून वाचले नाही हास्यगारवा, फक्त व्यंगचित्र पाहिले, वाचताच लिहेन ब्लाग वरमार्च 3
Tushar Joshi – अहो कांचन बाई या कवितेला चांगले म्हणून तुम्ही स्त्रीजातिचा रोष ओढवून घ्याल बरकामार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – शिवाजीराजांना काय काय वाचायला मिळाले आज !!!!
असो.मार्च 3
प्रमोद देव – चाल लावायची का तुषार? ;)मार्च 3
आनंद काळे – धमाल आहे कविता….;-)मार्च 3
कांचन कराई – स्त्री जातीला नाही पण स्त्रीमुक्तीवाल्यांना थोडं ऑफेन्सिव्ह वाटण्याची शक्यता आहे. मग ’या पुरूषांना काही म्हणजे काहीच कळत नाही’ अशीही कविता येऊ शकते. मला कविता आवडली.मार्च 3
Tushar Joshi – विचारायचे काय काका? तुम्हाला सुचत असेल तर होऊन जाऊ देमार्च 3
प्रमोद देव – अंकातल्या कथा वाचून त्यावर त्याचवेळी प्रतिक्रियाही द्या रे.मार्च 3
कांचन कराई – काका टपलेलेच असतात. :-)मार्च 3
माझी दुनिया – @काका, आधी ६०० जीबी पैकी १ जीबी तरी आधी कडोसरीला लावा. ईस्निप्स काही तुम्हाला पाय ठेऊ देत नाहिये.मार्च 3
Tushar Joshi – ही कविता मी एका कविता समूहावर पोस्टली तेव्हा मला ५२ महिलांचे कवितात्मक रिप्लाय आलेलेमार्च 3
प्रमोद देव – काहीतरी उद्योग नको का?मार्च 3
कांचन कराई – मंडळी, तुमचं चालू द्या. मी जरा दोन घास पोटात ढकलून येते.मार्च 3
प्रमोद देव – दोन घासांनी भागतं तुझं?मार्च 3
कांचन कराई – @ Tushar, साहजिक आहे. आमच्यासारखं खिलाडू वृत्तीने कोण वाचणार! हे हे.मार्च 3
माझी दुनिया – दोन घास यावेळी ? बाई ही तर माझ्याही वरताण निघालीमार्च 3
कांचन कराई – डाएटींग करते ना!मार्च 3
Tushar Joshi – @कांचन कराई,

या बायकांवर लिहिली मी एक साधी कविता
चवताळून शब्द धेऊन धावल्या सगळ्या
चोराच्या मनात चांदणं असतं म्हणतात ना
तश्याच अगदी तश्याच बघा वागल्या सगळ्या

काहींनी लगेच मोठाली आसवे काढलीत
नेहमीचेच हो ते हमखास अस्त्र त्यांचे
काहींनी हाका दिल्या एक दोघींना
आणि ठरविले खूप स्वतःचे गोडवे गायचे

कोंबडीवर टोपली ठेवूनही सकाळ होतेच
आता त्यांना काही हे कळत नसेल का ?
दाखवून दिले त्यांच्या वागण्याचे विचित्र प्रकार
तर मी म्हणतो कशास यावा राग ईतका?

चुकले बुवा आमचे म्हणायला काय जातं
नाही जमल्या काही गोष्टी तरी चालतात बाई
एकदा त्याच्यासाठी प्रेमाने हसूनही चालतय
या बायकांना काही म्हणजे काही कळत नाही

तुषार जोशी, नागपूरमार्च 3

प्रमोद देव – काय करायचेय विकतची जागा?मार्च 3
कांचन कराई – अगं, गुढीपाडव्याचं ग्रिटींग बनवलं. म्हणून वेळ लागला.मार्च 3
कांचन कराई – ही कविता सही आहे. चला, मी आता जाऊन येते. मला खूप भूक लागली आहे.मार्च 3
प्रमोद देव – डायेटिंगसाठी दोन घास+रोजचे जेवण? ;)मार्च 3
Tushar Joshi – डाएटा सौख्यभरेमार्च 3
प्रमोद देव – डाएटा पोटभरे.मार्च 3
विकास पिसाळ (vikas pisal) – कांचनताई, भरपुर खाणे आणि पुरेसा व्यायाम करणे असे नाही का चालणार????मार्च 3
कांचन कराई – चालेल ना! पण गेले काही महीने नुसतं भरपूर खाणंच झालं होतं. पुरेसा काय इतकासाही व्यायाम केला नव्हता, त्याचे दुष्परिणाम आहेत. आता हळूहळू गाडी वळणावर येतेय.मार्च 3
आनंद काळे – जरा बझ्बझ कमी केल तर होईल कमी बहुदा ;-)मार्च 3
कांचन कराई – नाही. मी बझ्झ करत नसलेल्या वेळात तेच करत असते. त्यामुळे चिंता नाही.मार्च 3
Seema Joshi – maala ha hasya gaarva cha aank kuthe vachayala milel,
yaachi link maala koni deu shakel ka.मार्च 3
कांचन कराई – अच्छा! आता थोड्या वेळाने भेटू.
हास्यगारवाचा दुवा: http://holivisheshaank.blogspot.com/मार्च 3
Tushar Joshi – सीमा, हास्यगारवा चा हा दुवा पीडीएफ मधे आहे तो पण बघ:

होळी अंक ’हास्यगाऽऽरवा’
http://www.scribd.com/full/27374221?access_key=key-scnwcr9hna42b4ohztmमार्च 3

Seema Joshi – Thanks Kanchan Tai, mi nakkic vachen .
Thanks Tushar, mararthi typing var jar vel dyavalanar aahe .मार्च 3
Marathi Scrap – प्रेमाला उपमा नाहि . कारण
उपम्याला राव नाहि .
रव्याला गहू नाहि.
गव्हाला पाणी नाहि.
पाण्याला पम्प नाहि .
पन्म्पला पैसे नाहि .
पैश्याला नौकरी नाहि .
नौकरिला डिग्री नाहि .
डीग्रीला शिक्षण नाहि .
शिक्षनाला कॉलेज नाहि .
कोलेजाला पोरी नाहि .
पोरींशिवाय प्रेम नाहि ,
म्हणून प्रेमाला उपमा नाहि !!!!!मार्च 3
Ravindra Koshti – बापरे माफ करा कांचन्जी मी १७३ वा ठरलो आहे. फार उशिर झाला प्रोत्साहन द्यायला. हल्ली मी बझ वर येत नाही.मार्च 3
176 अधिक टिप्पण्या
Heramb Oak – कित्ती मोठी बझाबझी ?? ६०० जीबी आपलं सॉरी सेकंद लागले वाचायला !!12-32 am
Sagar 7488 – बर काय कुणी काही घेतलं का नाही शेवटी?का फुकाची बझ बझ…..12-35 am
Ravindra Koshti – उगाच बझ्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज12-44 am

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

32 Responses to बझ…

 1. काका माझी तर अगदी गोची झाली आहे. सगळे मित्र बझ, ट्विटर, फेसबुक वापरतात काही मित्रांनी ह्या सगळ्या सर्विसेस integrate करुन घेतल्या आहेत. त्यामुळे अगदी कचरा झाला आहे. आता हेच कळत नाहीये की कोणाला कोठे follw करु.

  • मी स्वतः सगळं वेगवेगळं करुन टाकलंय. पुर्वी माझं पण सगळं युट्युब पासुन पिकासा, सगळं इथे दिसायचं. ब्लॉग वर पोस्ट लिहायला म्हणुन एखादा व्हिडीओ अपलोड केला की इथे त्याचं अपडेट दिसायचं.
   फेसबुकचं तर फार्म बुक झालंय. सगळे जण शेती करतात, मला जाम कंटाळा आलाय सगळ्यांचा. आजकाल तर लॉग इन पण करत नाही फेस बुकला. एकदा लॉग इन केलं की कमीतकमी १०-१५ गिफ्ट्स ऍक्सेप्ट करा, आणि लोकांना पुन्हा पाठवा. वैताग आहे नुसता. त्या पेक्षा लंच टाइम मधे बझ पहातो. बरंय ते तरी.

   दुसरं म्हणजे सोशल साईट्स वर जाउन वेळ घालवण्यापेक्षा मला आपल्याला जे काही लिहायचं आहे, ते ब्लॉग वर लिहुन सरळ पोस्ट करणे जास्त सोयीचे वाटते.

 2. vikram says:

  हा हा काका
  कुठून कुठे गेला विषय लक्षात तरी आल का
  मी वाचता वाचता त्यात सामील झाल्यासारखे वाटत होते
  बाकी त्यात भाग घेणारी पात्र हि भन्नाट आहेत
  बझ एवढ काही वाईट नाही अस वाटायला लागलाय हि पोस्ट वाचून काही उपयोग नाही झालातरी अल ब्लॉग पोस्ट तरी होऊ शकतेच कि 😉
  जीवनमूल्य

  • मी दुपारी सहज चेक केला , आणि मस्त करमणूक झाली.
   बझ तसं बरंय.. ट्विटर पेक्षा तरी..

 3. मी says:

  मी यातून डिक्लटर केलं , दोन दिवस बझ्झ .. नंतर बस्स !

  • Mahendra says:

   ऍडक्टिव्ह आहे हा प्रकार.. मी अजुनही लंच टाइम मधे चेक करतोका य नविन आहे ते. जरी स्वतः पोस्ट केल्म नाही तरीही इतरांचे बझ वाचुन करमणुक छान होते.

 4. ईमेल उघडल्या उघडल्या तुमची पोस्ट मिळाली. आमचेच बझ्झ पुन्हा वाचून करमणूक झाली. धन्यवाद. मी सुध्दा ब्लॉग, ट्विटर वेगवेगळं करून घेतलं. सगळंच इकडे पोस्टलं जातं. पण अशी हलकीफुलकी गंमत करण्यासाठी बझ्झ चांगलंच आहे. माझ्यासारख्या गृहीणी महिन्यातून एखादं व्यावसायिक काम मिळालं तर बाहेर पडणार. रोजची बाजारहाट नी घरातील कामं यात मित्रमैत्रीणींशी फक्त फोनवरच बोलावं लागतं. तेही त्यांच्या आणि आपल्या सोयिस्कर वेळा पाहून. म्हणून बझ्झ आवडतं. शिवाय ब्लॉगिंगमुळे मला कितीतरी मित्रमैत्रीणी मिळालेत. बझ्झला बस्स म्हणणं माझ्यासाठी तरी इतकं सोपं नाही.

 5. पोस्टमधला बझ् संवाद सही आहे, फुल टाईमपास.
  मी पण माझे Public profile बनवले पण तेव्हापासुन रोज भलतेच friendship msg आणि followers येताहेत, त्यामुळे बरीचशी माहिती आणि फोटो हटवले 🙂
  फायदा आहे तसा तोटाही आहे.

  • कोण फॉलो करतंय ते बघुन नको असलेले लोकं बंद करु शकतेस तु. फॉलोअर्स ठेवायचे की नाही ते तर तुझ्याच हातामधे आहे नां.

 6. हेरंबशी सहमत 🙂

  >> कित्ती मोठी बझाबझी ?? ६०० जीबी आपलं सॉरी सेकंद लागले वाचायला !!

 7. Manmaujee says:

  फूल २ धमाल. . .बझ बझ पुरी चांगली करमणूक आहे!!!!

 8. बझ बझ पुरी झालीय..त्यादिवशी मी नव्हतो ऑनलाइन नाही तर अजुन १०-१२ माझे पण बझ असते. मस्त वाटत हे अप्लिकेशन फेसबुक आणि ओरकुत पेक्षा.

  • मी फक्त वाचत असतो बझ. फार कमी बझ मधे सहभागी होतो. वेळेचा प्रॉब्लेम असतो म्हणुन खरा इशु आहे.

 9. Vidyadhar says:

  kaka,
  ha samwad tumchya blogchya naavala saajesa aahe…”Kaay Vattel te!”

  • हो नां.. सुरुवात झाली शिवाजी महाराजांच्या वाढदिवसापासुन, नंतर पुढे पोहोचलो ते ६०० जिबी विकणे आहे पर्यंत. मस्त आहे की नाही?

 10. चांगलीच करमणूक झाली! आमच्या कंपनीत वापरायला बंदी आहे, आणि घरी जेमतेम एक तास मिळतो संगणकावर बसायला तेव्हा ओर्कुट, फेसबुक , बझ वगैरेशी एव्हढा सलोखा नाही 😦

 11. bhaanasa says:

  जबरीच आहे की हे आणि तुम्हा सगळ्यांचे संवाद कुठे सुरू झाले व कुठे पोचलेत हे वाचून मस्त करमणूक झाली. आधीच अनेक झेंगट त्यात आणखी हे एक नवीन घोडं…. हा..हा.. सही आहे पण. अनेक जण एकाच वेळी बोलू शकतात त्यामुळे टीपी छान होईल. शिवाजीमहाराज सारखे फोटोतून ओरडत असतील….. अरे माझ्याकडे पाहा जरा… या लोकांना काहितरी सारखे विकणे आणि विकत घेणे याशिवाय काही सुचत नाही. … मजा आली. महेंद्र, वेळ नाही म्हणून ओरडत असतोस ना…. आणि आता हे अजून एक…… 🙂

  • हो नं, मी पण जेंव्हा हे पोस्ट वाचलं तेंव्हा अगदी पोट धरुन हासलो होतो.. छान करमणूक झाली.

 12. तो खेळ न खेळताच आपल्या पोस्टवरून काय वाटले ते प्रामाणिकपणे लिहितोय… कळावे लोभ असावा राग नसावा.. 🙂

  एखादा परदेशी प्रवासी आपल्या गांवच्या जत्रेत आला आणि एकदा का भिकाऱ्यांना त्याकडून भिक मिळेल असे वाटले की सर्व भिकारी त्यांच्याच मागे धावतात तस काहीसा प्रकार बझ वाटतो..

  हे म्हणजे अमेरिका चंद्रावर यान का पाठवते याबाबत दापोडीच्या एका टपरीत बसलेल्या सामान्य जनाने केलेल्या विपरित भाष्यासारखेच वाटेल कोणालाही…लाही… लाही…

 13. rajeev says:

  क स ली ही फ़ाल्तू ब झ ..ब झ…..
  आ ई बा पा शी बो ला य ला वे ळ ना ही आ णी घ री पी.सी.
  ब ड व त ब सा य चे……..

  • राजिव
   एकदम चुकिच आहे तुझं. मी तर रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी , आणि रात्री पण आई बाबांशी ( बायकोच्या ) बोलत असतो..
   म्हणुनच कधी तरी वाटतं, “की” बोर्ड बडवणे हे एक राग व्यक्त करण्याचे प्रतिक आहे का रे??

 14. MK, kanchan ani pramod dev kaka

  Buzz-bhashan vaachun gammat vaatli

 15. चांगलीच करमणूक झाली . . !

 16. ravindra says:

  महेन्द्रजी,
  त्या फ़ुल २ धमालचा शेवट शेवटी मी केला. नाही तर आणखि ६०० Gb खरची पडले असते. हा हा हा

 17. rohan says:

  मी खरच पूर्ण वाचले नाही रे… 😉 कित्ती लांब लचक. आणि ३ मार्च बद्दल बोलायचे असेल तर मला शिवजयंती पेक्षा शिवचरित्र साजरे करण्यात जास्त इंटेरेस्ट आहे… 🙂 तेंव्हा …….

  हां आणि मी अजून बझ्झ वापरत नाही आहे… बघुया..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s