मनात आलं ते….

सकाळी फिरायला जातो रोज, तेंव्हा हातामधे बिसलेरीच्या बाटल्या घेउन जाणारे बरेच लोक दिसतात. मुंबईच्या टॉयलेटीकेट्स बद्दल तर न बोललेलेच बरे. मालाडहून लोकलने निघालो की स्पेशली बांद्रा भागात रेल्वे ट्रॅकच्या कडेने बसलेले बरेच माणसं दिसतात. बांद्रा आलं की खिडकीच्या बाहेर पहायचं नाही आणि केवळ श्वास रोखून धरता येत  नाही म्हणून  श्वास घ्यायचा.

आज सकाळी फिरतांना दोन बायका पण हातामधे बिसलेरीची बाटली आणि छत्री घेउन जातांना पाहिल्या. इतके दिवस झालेत रोज फिरायला जातो, पण आजपर्यंत कधीही कुठलीही स्त्री अशी बाहेर हातात बिसलेरीची बाटली घेउन जातांना दिसली नव्हती. ही आजची पहिलीच वेळ. आज त्या बायकांना पाहिलं आणि चंद्रकांत खोत आठवले.

मी साधारण १५-१६ वर्ष वयाचा असतांना एक पुस्तक आलं होतं चंद्रकांत खोत यांचं- उभयान्वयी अव्यय नावाचं. त्यामधे एक प्रसंग आहे स्त्रीयांनी रेल्वे ट्रॅक वर प्रातर्विधी साठी  जातांना छत्री आणि पाण्याचा डबा घेउन जायचा–त्याची आठवण झाली. खूप वर्षापूर्वी वाचलेलं हे पुस्तक. मुंबईच्या झोपडपट्टी वर लिहिलेलं हे पुस्तक, त्या काळी खूप गाजावाजा झालेलं पुस्तक होतं. कोणी वाचु नका रे हे पुस्तक, असं म्हंटलं की हमखास वाचायची इच्छा होणार. त्या पुस्तकातली ती पात्र, भागी, भागीला…….. जाउ द्या. कदाचित खूप कोवळ्या वयात वाचल्यामुळे असेल, पण पुस्तक अगदी मनावर कोरल्या गेलंय ते. माशी गुळावर बसते, आणि …गुवा वर पण बसते, अशी सुरुवात आहे त्या पुस्तकाची. सेक्स , व्हायोलन्स आणि भाषा याचा पुरेपूर वापर असलेले हे पुस्तक आहे.हे र्पुस्तक आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र बसून सामूहिकरीत्या वाचलं होतं. त्यातले ते भागी बरोबर चे संबंधांचे वर्णन त्या काळाच्या मानाने खुपच जास्त होते. अजूनही ते पुस्तक ऐकतांनाचे मित्रांचे चकाकणारे डोळे आठवतात. 🙂

साधारण त्याच काळात अरुण साधु यांचं मुंबई दिनांक पण वाचलं होतं. जेंव्हा ’चक्र’ पाहिला, आणि त्यामागची स्मिता पाटील ने झोपडपट्टीतल्या आयुष्याचा जिवंतपणा सादर करता यावा म्हणून तिथे राहिली होती हे जेंव्हा ऐकलं , तेंव्हा तिच्या कमिटमेंट्बद्दल आदर वाटला होता. अभिनयात जिवंतपणा येण्यासाठी अमिरखान नंतर तीच एक अभिनेत्री होती असे वाटते.

माननीय नगर सेवक श्री—- यांच्या कर्तृत्वाने हे स्वच्छता गृह बांधण्यात आलेले आहे अशी पाटी दिसते लागलेली .एक गोष्ट मान्य करावीच लागेल की अशा सार्वजनीक स्वच्छतागृहां मुळेही स्त्रियांची खूपच सोय झालेली आहे. अर्थात इतक्या जास्त लोकसंख्येसाठी इतकी कमी स्वच्छता गृहे पुरेशी आहेत का हा एक प्रश्न आहेच!

एकदा मी मुंबईहुन गोव्याला जात होतो. माझ्या शेजारी एक फिरंगी बसला होता. माझ्याकडे बघून हसला, आणि स्वतःची ओळख करुन देउन म्हणाला की तो रशियन आहे पण – इंग्रजी चांगलं बोलत होता,आणि  मायग्रेट झालाय म्हणाला ऑस्ट्रेलियालत दर वर्षी भारतात येतो म्हणाला सुटी मधे. असे बरेचसे विनाकारण गप्पा मारणारे लोकं भेटत प्रवासात. मला फारसा इंटरेस्ट नसतो त्यांच्याशी बोलण्यात. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं मला नीट समजत नाही, आणि माझं त्यांना. ऍसेंटेड इंग्रजी ( ब्रिट’स तर अजुन अवघड) समजायला खूप त्रास होतो ( खरं तर बरेचदा समजत पण नाही 🙂 )

त्याला गप्पा मारायची खूपच खुमखुमी आलेली होती. भारतामधे केरळ ला फीरुन आलो, पण गोवा जास्त आवडतं वगैरे वगैरे. अर्धं बोलणं समजत होतं, अर्धं डॊक्यावरून जात होतं.एक वाक्य म्हणाला ते मात्र एकदम हर्ट  करणारं होतं.. म्हणाला इंडीया इज अ ओपन शिट हाउस.. क्षणभर तर काय बोललाय हे मेंदु पर्यंत पोहोचायलाच वेळ लागला. एखादी अनपेक्षित गोष्ट ऐकली की कसं होतं?? तस झालं होतं.

कदाचित त्याला वाटलं की मला नीटसं समजलेलं नाही, म्हणून म्हणाला, की पिपल आर शिटींग एव्हरी व्हेअर.. पहिल्यांदा तर दुर्लक्ष केलं होतं, पण जेंव्हा तो तीच गोष्ट रिपिट करु लागला तेंव्हा आता मात्र शांत रहाणं अशक्य होत होतं.

त्याला म्हणालो, ’ऍग्रीड!! बट युवर कंट्री हॅज बिकम अ ओपन ब्रॉथेल. एव्हरी वुमन किप्स रिलेशन विथ ऍटलिस्ट ११ मेन इन हर लाइफ. ईट्स द स्टॅटास्टिकल डाटा ऑफ यु एस.. बट आय ऍम शुअर इट होल्ड्स गुड फॉर युवर कंट्री रशिया ऍज वेल- यु कॅन इव्हन गेट रशियन फ्रिलान्सर ऍट गोवा इफ यु सो डिझायर.. दे हॅव स्पॉइल्ट गोवा आल्सो…”. आणि मग तो मात्र अगदी गोवा येई पर्यंत डोळे बंद करुन बसुन राहिला, एकही शब्द न बोलता.

आजचं हे पोस्ट अगदी घाई घाईत लिहिलंय. अगदी काहीही विचार न करता जे काही मनात आलं ते टाइप करत सुटलोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , . Bookmark the permalink.

41 Responses to मनात आलं ते….

 1. छान जिरवलीत त्याची….
  हे बहुतेक लोक नेहमी पुअर,डर्टी इंडी्या बघायच्या दॄष्टीनेच येतात इथे.
  ते पुस्तक वाचतांना तुमचे डोळे चकाकले न्वहते का… 🙂

  • देवेंद्र सगळं अगदी न ठरवता इन्स्टंटेनिअसली झालं. डोळे चकाकले की नाही ते खाली राजिव च्या उत्तरात लिहितो.

  • देवेंद्र सगळं अगदी न ठरवता इन्स्टंटेनिअसली झालं. डोळे चकाकले की नाही ते खाली राजिव च्या उत्तरात लिहितो.:)

 2. Manmaujee says:

  त्या फिरंगीला चांगलाच वाजवला आहे की. ….त्याला तुमच उत्तर कदाचित अपेक्षित पण नसेल.

 3. .<>

  सरकारी कार्यालये ,सार्वजनिक जागा या ठिकाणी असलेली स्वच्छतागृहांची अनास्था देखील चिंतनीय आहे. आम्ही याबाबत आंतरजालावर जागृती करण्याचे प्रयत्न करीत आहोत  माझे पोलीस मुख्यालयातील याबाबतचे अनुभव नोंदले आहेत खालील दुवे पहावेत त्यावर आंतरजालीय जागृतीबाबत माहिती मिळेल.
  १) स्वच्छतागृहाची सफाई२) स्वच्छतेच्या बैलाला३) परत एकदा स्वच्छतेच्या बैलाला
  ४) क्रयशासन

  • प्रकाशजी
   चारही लेख वाचले. सगळी कडे असेच दुर्लक्ष केले जाते . दादर एक स्वच्छता गृह आहे, त्या स्वच्छता गृहा शेजारी एक वडापाववाला आहे . लोकं त्या घाण वासाच्या सान्निद्यात वडा पाव खातांना पाहिलं की मलाच मळमळतं. हे इथे लिहीण्याचा उद्देश केवळ इतकाच, की आपल्या इथल्या लोकांना स्वच्छतेची अजिबात चाड नाही असे माझे स्पष्ट मत आहे. जर लोकांनाच काही घेणं नाही , तर मग सरकार ला तरी कशाला इंटरेस्ट असेल?

 4. सही जवाब!
  या फिरंग्यांना जाम हौस असते. आमचे ऑफ़िस बेहेरमपाड्यासमोर आहे. सिनिअर मॅनेजमेंटने अगदी स्टेशनसाईड आणि बांद्रा फ़्लायओव्हर व्ह्यु च्या केबिन घेतल्या आणि आता सकाळी नको तो नजारा रोज बघवा लागतो. मला एकदा माझ्या अमेरिकन बॉसने विचारले, आय कॅन सी ऑल मेन फ़्रॉम माय ऑफ़िस, व्हेअर डज ऑल विमेन गो? मी म्हणाले, गव्हर्मेंट हॅज बिल्ट टॉयलेटस फ़ॉर ऑल बट आय थिंक मेन प्रिफ़र टु डु इट इन ओपन एअर. आता काय बोलणार.

  • सही जबाब.. खरंच मोठी विचित्र परिस्थिती होते. एकदा मुंबई बाहेर निघालं की सगळे प्रॉब्लेम्स संपतात. इतर शहरात तसे सिन इतर कुठेच दिसत नाहीत!

 5. तो says:

  छानच !!!

 6. Sagar says:

  काका
  गावात काय नेहमीचच आहे….पोरांना टायमिंग पाठ झालेत….. 😀
  (“वऱ्हाड निघालय “आठवतेय न….)
  आबांना मात्र धन्यवाद द्यायला पाहिजेत ग्राम स्वच्ता अभियानासाठी….गाव तशी बरीच म्हणजे खरच खूप सुधारली आहेत…आता मुंबईत पण सुरु करा म्हणव संत गाडगेबाबा महानगर स्वचाता अभियान……बाकी त्या रशियानचे दात बरे झाले त्याचा घशात घातले…..

  • अरे मुंबईला दररोज येणारे लोंढे आणि त्यांच्यासाठी झोपडपट्टी बांधुन देणारे आपले नेते.. किती बांधतील टॉयलेट्स??
   इथे जे कोणी येतात, त्यांना नौकरी , कामधंदा असेल तरच येण्याची परवानगी द्यायला हवी.
   आणि सगळ्यात महत्वाचं झोपडपट्टी रेगुलराइझ करण्याचे जे नेहेमी सरकारी काम सुरु असते त्यावर बंदी आणली गेली पाहिजे, तरच काहीतरी होईल.. नाही तर आहेच!!

 7. rajeev says:

  शारीरीक मल वीसर्जन हे काही गरज आहे, ती क्रिया आ डो श्या ला क रा वी अशी अपेकश्या आहे, नीदान सामाजीक ( श ह री)
  संकेत आहे. पण वैचारीक मल वीसर्जन करणारे आपले नेते,( आणी सरकारी बाबू शाही)शारीरीक मल वीसर्जनाची व्यवस्था (आडोश्याला)
  का करत नसावी ? पूर्वी रोमन लोक ही क्रिया सार्वजनीक रीत्या वाद्यांच्या गजरात करायचे….बाकी आपल्याकडे गोठवून टाकणारी थंडी,
  बर्फ़ असायला हवा होता, नीदान त्यामुळे का होईना ही द्रु ष्ये कमी झाली असती.
  आपल्याकडे शारीरीक मळा पेक्शा वैचारीक मळाने आसमंत वीटाळणारी माणसे आहेत, हा वीटाळ आपण काही स्थानीक , वर्तमान पत्रे,
  भाशणे , भीत्तीपत्रे, पताका पत्रे ह्या रूपाने बघत (भोगत ?) असतो. ह्या त का ही —-वा दी सा ही त्यीक, लेखक ही मोडतात.. असो…
  अश्या परीस्थीतीला नीम्न स्तरीय भाशेत लीहून काढली की होतो ” वास्तववादी “लेख आणी त्यात स्त्रि- पूरूशां चे संमंधी
  ( चूकलो )नर –मादीं च्या प्रणय ( कीबहूना पूनरूत्पादनाच्या ) क्रीडांची फोडणी ओतली की झाले…. बा की ज्यां ना ह्या क्रू ती म धे फ़ा रस आहे ते वाचक आणी श्रोते ह्यांचे डोळे चमकणारच !!!!!!
  बाकी र “शी..”या काय कींवा थाय लंड काय कीं वा पारीस काय….”रसीया” लोकांची काय कमी आहे ?

  एक मराठवाडी म्हण सांगावी वाटते ” xxxxणार्यानी नाही तर नी दान बघणार्यानी तोंड झाकावे….

  ई ती…..

  स्वामी राजरत्नानंद प्रसन्न

  • डोळे चकाकणारच.. रस सगळ्यांनाच् असतो ,त्या वयात थोडा जास्तच!!! तुला तर चांगलं माहिती आहे नां!!
   —-आपल्या कडे बर्फ नाही हे बरं आहे, नाही तर ’तो’ सगळा विसर्जित केलेला ’प्रिझर्व’ झाला असता.

   अरे तुला एक गम्मत सांगतो. माझा एक मित्र आहे . आमच्याच कॉम्प्लेक्स मधे रहातो. एका बॅंकेत मॅनेजतर आहे . गोरेगांव ब्रॅंचचा मॅनेजर होता तो. तिथे तो दोन वर्ष होता, त्या काळात त्याने बरंच काम केलं स्टाफ वेल्फेअर साठी, लेडीज टॉयलेट रिनोव्हेट केली, तिथे जागा फारच कमी होती, म्हणुन पॅसेज पण टॉयलेट मधे इन्क्लुड केला.

   त्याची तिथुन बदली झाली हेड ऑफिसला. त्याला तिथल्या स्टाफने सेंडऑफ दिला. हा माणुस बंगाली. म्हणुन सगळया लोकांनी हिंदी मधेच भाषणं केलीत.

   एक लेडीज प्रति्निधी पण उभी झाली बोलायला. टिपिकल मराठी बाई रे. साधारण ४०-४५ ची असेल. तुला तर माहिती आहेच की मुंबईच्या लोकांचं हिंदी जरा यथा तथाच असतं. ती म्हणाली ये साब बहुत अच्छा था. इसने हमारा पिशाबका जगह बडा कर दिया.. आणि सगळे लोकं अगदी जोर जोरात हसायला लागले..विनोदाचा भाग सोडून दे, पण मुंबई मधे कार्यालयात पण व्यवस्थित व्यवस्था नाही. अरे अडीच बाय तीन च्या वॉश रुम मधे निट उभं पण रहाता येत नाही अशी अवस्था असते.

 8. हे हे..त्या फिरंगीचा काय रिप्लाइ यावर?

 9. मस्त लिहिलय… गप्पा मारल्यासारख वाटल… 🙂

  • धन्यवाद..
   मनात येइल ते लिहित गेलो, काहीही विचार न करता. बोटं आपोआप चालत होती की बोर्ड वर!!

 10. Sarika says:

  Mahendrakaka,

  Solid jawab dilat… parat kadhi India madhye yeun asa konala bolaychi tyachi himmat honar nahi.

  • सारिका
   खरं सांगायचं तर त्याचं बोलणं पण काही चुकीचं नव्हतं, पण आपल्याच घरात येउन आपल्यालाच कोणी शहाणपण शिकवलं तर संताप येइलच नां? तसंच आहे . मला पण त्याच गोष्टीचा राग आला होता.
   त्या वेळी जे मनात आलं ते बोलल्या गेलं- ठरवुन नव्हतं काहीच!!

 11. savadhan says:

  “मनात आलं ते”छान लिहिलय.आपण त्याला उत्तर चांगलं दिलं पण त्यानं प्रश्न सुट्लाय का? तो कसा सोडवायचा हा खरा प्रश्न आहे.आपल्या घरात येऊन बोलणारे असे खूप असतात.मुख्य मुद्दा काय आहे ते पाहणे जास्त महत्वाचं नाही का? माझ काही चुकलं असेल तर क्षमस्व !
  savadhan.wordpress.com

  • अगदी बरोबर आहे तुमचं.

   मझ्या मते ,आपल्याकडे येणारे लोंढे जो पर्यंत थोपवले जात नाहीत , तो पर्यत सरकार पण काहिच करु शकणार नाही. दर दोन वर्षांनी झोपड्टी रेगुलराइझ केली जाते, त्यामुळे नविन लोकं अजुन येतात रहायला . . नुकताच अंधेरीच्या हायवे वर फ्लायओव्हर खाली नविन झोपडी दिसली काल.. किरती ठिकाणी फुकट इन्फ्रास्ट््क्चर करावं सरकारने याला पण लिमिट आहे.

   • अगदी बरोबर आहे तुमचं. आपल्याकडे येणारे लोंढे जो पर्यंत थोपवले जात नाहीत , तो पर्यत सरकार पण काहिच करु शकणार नाही. दर दोन वर्षांनी झोपड्टी रेगुलराइझ केली जाते, त्यामुळे नविन लोकं अजुन येतात रहायला . . नुकताच अंधेरीच्या हायवे वर फ्लायओव्हर खाली नविन झोपडी दिसली काल..

 12. गेल्या ६० वर्षातली ही आपल्या गांधीवादी सरकारची कमाई. आपण BASIC INFRASTRUCTURE उभे करु शकलो नाही हिच आपली सरकार बनवण्यात सगळ्यात मोठी ताकद बनली आहे.
  SHAME ON US !!!!!

  • बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चा हा प्रॉब्लेम मोठ्या शहरात म्हणजे मुंबई सारख्या मेट्रो मधे खुप जास्त आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं जाउ शकतं, इथे येणारे आणि फुटपाथवर रहाणारे लोंढे थांबवले तर. आजकाल काय दिसतं? कार्पोरेशनच्या नगर सेवकाचा पैसा सगळाझोपडपट्टी च्या सुविधा पुर्ण करण्यातच जातो.

   मुंबईला लोकलच्या फक्त एका प्लॅटफॉर्म वर टॉयलेट असते – कां????? कोणीच यावर का म्हणुन आवाज उठवत नाही?? इतर ३-४ प्लॅटफॉर्म वर वॉश रुम्स नसतात……!!!!

 13. तुम्ही त्या फिरंग्याला सुनावलंत हे बरंच केलंत पण मला अजूनही एक गोष्ट कळलेली नाही. सार्वजनिक शौचालय समोर असून सुद्धा काही पुरूष सार्वजनिक ठिकाणी कोनाड्याचा, भिंतीचा आधार घेणं का पसंत करतात?

  काही ऑफिसेस मधे खरोखरच धड उभं रहाता येऊ नये अशी परिस्थीती असते. कधी कधी स्वच्छतागृह इतकी अस्वच्छ असतात की असल्या ठिकाणी जावं लागू नये म्हणून मुली दिवसभरात जास्त पाणी पित नाहीत.

  • कालपासुन विचार करतोय. आज सकाळी स्टेशनला पब्लिक वॉश रुम मधे गेलो होतो. अमोनियाचा इतका जास्त वास होता की थोडा वेळ तिथे थांबावं लागलं असतं तर चक्कर येउन पडलो असतो.
   आपल्याकडे वॉश रुम्स जरी तयार केल्या तरी तिथे पाण्याची सोय नसते, आणि त्यामुळे कदाचित खुप अस्वच्छता पण असते. समोरच्या युरीन पॉट मधे माणीकचंद. पाकिटं, त्यामुळे बुजलेली छिद्र…. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे लोकं अशा ठिकाणी जाणे टाळतात. अगदीच अशक्य असेल तरच अशा ठिकाणी जातो मी .

   स्वच्छता ही महत्वाची, आणि तीच नाही म्हंटलं की नकोसं होतं तिथे जाणं.
   स्त्रियांची पाणी न पिण्याची सवय, आणि त्यामुळे होणारा किडनी स्टोन चा त्रास हा भारतात सगळ्यात जास्त आहे.

 14. Vidyadhar says:

  Zakaas uttar dilat kaka….tyacha mudda kaahi agadich chukicha navta…pan jevha he superioritychya style ne bolala jaata tevha raag yeto.
  By the way kaka, tumhi shejaari disata majhe. Mage eka lekhat tumhi Rani Sati marg mhanalat tevha doubt aala hota…aaj tumhi Malad lihilat. Me Malad West la rahato. Tumhi East wale disata.
  Aso. Nehemipramanech zakka lekh.

 15. अतिशय उत्तम लेख, निरजा पटवर्धनांचा याच विषयावरील लेख स्त्रीयांच्या याच समस्येवर आहे.
  http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2008/11/blog-post_11.html

 16. त्या अंग्रेजाला इतकं मस्त वाजवलात की मला आत्ता पण वाचताना आवाज ऐकू आला.

 17. milind kurbetkar says:

  baryach divasani tumachi post milali vachun chan vatle

 18. bhaanasa says:

  महेंद्र, अगदी सही वाजवलेस त्याला. परंतु तो जे बोलला तेही सत्यच आहे ना? कुर्ला-सायनमध्ये लोकल असली की मग सकाळ-दुपार-रात्र कुठलीही वेळ असो दृष्य तेच. पुन्हा छत्रीचे आडोसेही नाहीत. रोजचेच झाले की नजर मरतेच पण त्रास होतोच. वाढती झोपडपट्टी आणि जवळपास नसलेल्या बेसिक गरजांची साधने. कोणी कोणाला दोष द्यायचा आणि तो देऊनही मूळ प्रश्न तसाच राहतोय. हेच कशाला, अगदी चांगल्या चांगल्या ऑफिसेसमध्येही… सरकारी कार्यालयात अनेकदा पाणीच नसते. आता आठ-नऊ तास नोकरी करायची तर बाथरूमला जावेच लागणार ना… पण जायचे कसे? आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे काही अपवाद वगळता किती भयंकर असतात ते…… हे युरिन इन्फेक्शन तिथूनच सुरू होतेय ना… पाणी कमीत कमी प्यायचे का तर बाथरूमला जावे लागेल…. सगळाच वैताग.

 19. rohan says:

  आपल्या कडे बर्फ नाही हे बरं आहे, नाही तर ’तो’ सगळा विसर्जित केलेला ’प्रिझर्व’ झाला असता –

  हे वाचता वाचता एक सोलिड किस्सा आठवला… 🙂 इतके नाही लिहिता यायचा… हेहेहे… 🙂 मुंबईचे काही खरे नाही हेच खरे!!!

 20. Bharati says:

  सहजच मनातले लिहिले जाते ते नैसर्गिक छान वाटते.आपले सरकार आपणच निवडले आहे.आता संधी देताना विचार करायला हवा ज्याना आपल्या कामाची जाण नि कर्टव्याचे भान नाही.त्याना जनतेच्या समस्या काय समजणार? त्यात स्त्रियांच्या समस्या
  उमजण्या बाबत आजचा पुरुषवर्ग पण सोळाव्या शटकातच आहे!
  मुंबईत लोंढे किती पण येऔ देत पण राहण्यासाठी जागा देण्यावर कड्क कायदे हवेत.मूळ मुंबईकर हेच कोणाला ठेवून घेतील तेच राहतील बाकीचे काढता पाय घेतील.
  शिस्त कुणालाच नाही.ती लावण्यासाठी पोलिसी खाक्याच पाहिजे! सगळे सुतासारखे सरळ होतील.

  • भारती
   कालच एक सुंदर पुस्तक वाचायला घेतलंय. सर्वोदयी चळ्वळीचे नेते श्री विनोबा भावे यांचे वुमेन्स पॉवर.. खूप सुंदर आहेत त्यांचे विचार. त्यावर पण लिहिन कधीतरी नंतर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s