टॉरंट- शाप की वरदान?

आजचा लेख म्हणजे चोरी कशी करावी? या अर्थाने घेऊ नका.

तुम्हाला  समजा एखाद्या जुन्या सिरीअल चे भाग पहायचे असतील, किंवा एखाद्या नेहेमी पहाता त्या सिरीअलचा सुटलेला भाग पहायचा असेल, तर काय कराल? किंवा समजा १९३० सालचा ऑस्कर विनर चित्रपट ’इट हॅपन्ड वन नाईट’ किंवा ती फुलराणी ज्या चित्रपटावरून बेतले आहे तो चित्रपट  १९६४ सालचा माय फेअर लेडी पहायचा आहे तर काय कराल?

बाजारात जाउन सिडी आणाल बरोबर?  पण या इतक्या जुन्या सिनेमांच्या सिडी उपलब्ध नाहीत- मी स्वतः चेक केलं होतं! पण जर उपलब्ध असतील तर आजही तोच पहिला चॉइस असेल.

आजकाल तर सिडी फारच स्वस्त झाल्या आहेत.ओरिजिनल सिडींच्या किमती कमी झाल्यामुळे मोझर बेअरच्या चांगल्या सिडीज आजकाल ३४ ते १०० रुपयात मिळतात, त्यामुळे पहिला चॉइस तोच असतो. चांगल्या क्लासीकल सिडीज फक्त १५० रु. मिळतात . नुकत्याच मी दोन सिडींचा सेट आणला विकत वसंतराव देशपांडे यांच्या क्लासीकल /नाट्य़ संगिताचा- फक्त ३०० रुपयांना. किम्मत  पण कमी झाल्याने हल्ली ओरिजिनल सिडी घेणे सहज शक्य झालेले आहे…..

परंतु जर सिडी मार्केट मधे मिळाली नाही,  आणि जर तो सिनेमा पहायचा असेल तर काय करता येइल?

ब्रॉडबॅंड साठी हजार रुपये महिना एकदा दिला की अमर्याद डाउनलोड करता येते. इंटरनेट वर  कांही साईटस वर बरेच जुने अगदी कालबाह्य चित्रपट सुध्दा स्टोअर करुन ठेवलेले आहेत. ७०० एम बी ते दिड जिबी च्या आकाराचे हे चित्रपट, जुने टिव्ही प्रोग्राम्स डाउनलोड करता येतात.इतकी मोठी फाइल डाउनलोड करतांना  लिंक ब्रेक झाली तर इतकं सगळं डाउनलोड केलेलं वाया जाईल, म्हणून एक नवीन पद्धत शोधून काढली गेली आहे.

आता ही जी नविन सिस्टीम ( माझ्या मते नवीन पण तशी आहे जुनीच, कारण मला आत्ताच समजलं आहे या साईट बद्दल ) आहे ती  आहे यु टोरंट. या साईटवरुन युटॉरंट हे सॉफ्ट वेअर डाउनलोड करुन तुमच्या कॉम्प्युटर वर इन्स्टॉल केले की झाले. एक   पॅच फाइल प्रमाणे लहानसं सॉफ्ट वेअर आहे हे आणि केवळ दोन मिनिटात डाउनलोड होतं.

एकदा इन्स्टॉल केलं की  नंतर पायरट बे या साईटला जा, आणि जे काही हवे असेल ते शोधून डाउनलोड करा. पायरेट बे च्या व्यतिरिक्त पण अशा अनेक साईट्स आहेत. टॉरंट व्हिडीओ डाउनलोड असे गुगल करा बस्स… तुमच्या पुढे खूप मोठा खजिना उघडेल. अती जुने चित्रपट, टिव्ही वरचे  जुने प्रोग्राम्स, बंदी असलेली पुस्तकं, अशा अनेक गोष्टी डाउनलोड करण्यासाठी अव्हेलेबल आहेत. भारतामधे बंदी असलेलं पुस्तक, पॉलिस्टर प्रिन्स ऑफ इंडीया पासुन तर तस्लिमा ची किंवा इतरही बॅन झालेली पुस्तकं पण इथे तुम्हाला मिळू शकतात.

ही टॉरंट साईट जी आहे ती पायरसी ला उत्तेजन देते  म्हणून या साईट वर बंदी आणण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. जगात बऱ्याच देशात यावर बंदी आणावी का असा विचार सुरु आहे. या साईटचे फायदे वर दिले आहेत पण त्याच सोबत याचे तोटे पण तेवढेच आहेत.

करोडॊ रुपये खर्च करुन सिनेमा बनवला जातो. थिएटरमधे लागला की अगदी दोनच दिवसात पायरेट बे वर डाउनलोड  साठी ऍव्हेलेबल होतो. जर इतका खर्च करुन बनवलेला सिनेमा जर लोकांनी थिएटर मधे जाउन पाहिला नाही तर मग लावलेले पैसे वसूल तरी कसे होतील? कदाचित सिनेमात काम करण्यासाठी दिल्या जाणारं मानधन करोडॊ रुपयात असल्याने सिनेमा तयार करण्याचा खर्च वाढतो असे जरी  काही लोकांचे मत  असले तरीही – खर्च होतो हे नाकारता येत नाही.

अगदी हीच गोष्ट संगीताच्या बाबतीत पण होते. नवीन गाणी मार्केटला आली की ताबडतोब  चोरी करुन नेट वर उपलब्ध करुन दिली जातात. मला एकच सांगायचंय की कमीत कमी मराठी गाण्यांची सिडी जरुर ओरिजिनल विकत घ्या, तरच मराठी जिवंत राहील. लग्ना मधे , मौंजी मधे किंवा कुठल्याही चांगल्या प्रसंगाला मराठी सिडी गि्फ्ट देणे हा पण एक चांगला पर्याय ठरू शकतो .अशा प्रकारे गिफ्ट देण्याने तुम्ही   एक प्रकारे  मराठी म्युझिक इंडस्ट्री ला  सपोर्ट करता-  विचार करा….!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , . Bookmark the permalink.

38 Responses to टॉरंट- शाप की वरदान?

 1. काही गोष्टींचे फायदेही असतात आणि तोटेही! पण सांस्कृतिक संचित जपून ठेवण्यासाठी पायरट बे या संकेतस्थळाचा उपयोग होतोय, आणि त्यामुळे जे तुम्हांला बाजारात मिळू शकत नाही ते इथे मिळतेय हेही खरं आहे. शेवटी या संकेतस्थळाचा उपयोग ज्याने त्याने तारतम्याने केला पाहिजे.

  • शेवटलं वाक्य अगदी खरं. सद सद विवेक बुध्दीला स्मरुन कामं केलीत की मग चुकीचं काम कधीच केलं जात नाही.
   प्रतिक्रियेकरता आभार..

 2. या प्रकाराला बिटटोरंट म्हणतात. हा network protocol आहे, जो मोठ्या फाईल एका जागेवरून दुसरीकडे पाठवण्यासाठी वापरला जातो. ब्राम कोहेनने हा प्रोटोकॉल एप्रिल २००१ मध्ये बनवला. अधिक तांत्रिक माहिती हवी असेल तर मी कधीतरी माझ्या ब्लॉगवर लिहीन.

  • विक्रम
   बिटटोरंट.. मला हे नांव माहिती नव्हतं. जुने सिनेमे खुप आहेत नेट वर. मला फ्रेंझी बघायचा होता हिचकॉकचा.. इथे सापडला!!तसेच इट हॅपन्ड वन नाईट हा १९३० सालचा चित्रपट सुद्धा इथेच सापडला.

 3. ह्म्म्म..शाप की नाही माहीत नाही पण निदान जुने क्लासिक चित्रपट डाउनलोड करायला वापरतो मी आणि कधी कधी सॉफ्टवेअर साठी 🙂

  • सॉफ्ट वेअर डाउनलोड करण्यात खुप धोका आहे असे मला सांगितले एका मित्राने. एखादा वर्म येउन सगळं कॉंप्युटर खराब करु शकतो असं म्हणतात.
   दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लॅप टॉप वर सगळे सॉफ्ट वेअर ओरिजिनलच आहे.. विंडॊज, व्हिस्टा, पिडीएफ मेकर वगैरे..

 4. काका, ह्या टोरेण्ट्स च्या साईट्स मुख्यत्वे एका हेतू आधारे बनविण्याची काळाची गरज आहे.

  माहितीजालावर कोणत्याही संस्थळाला मर्यादित अशी बॅडविड्थ मिळते, तेवढ्याच बॅंड्विड्थमध्ये त्या संस्थळाला त्यावरील सर्व सामग्री व्यवस्थित बसवावी लागते. पण जर मित्रांना किंवा सर्फिंग करणार्‍या लोकांना जर भल्यामोठ्या फाईल्स पाठवायच्या असतील तर त्या अपलोड करण्यासाठी संस्थळावर जागेची मर्यादा आणि कॉपीराईट संबंधित कायद्यांचे उल्लंघन होऊ नये (संस्थळाच्या दृष्टीने!) यासाठी इस्निप्स सारखी संस्थळे अशा मोठाल्या किंवा एक्जिक्युटेबल फाईल्स शेअर किंवा अपलोड करण्यास मज्जाव करतात किंवा फाईल अपलोड करण्यास फाईलच्या साईजवर काही तरी बंधने आणतात. हे तरी कोणाला न आवडणारे आहे. शिवाय यामुळे काही सोशल किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांनाही बंधने येतात. बायोटेक्नॉलॉजी ही नविन संकल्पना आल्यापासून अनेक विना-नफा संस्थांनी “डीएनए बॅंक” नावाचा प्रकल्प चालू केला आहे. यामध्ये जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीन्सची सर्व माहिती साठवण्यासाठी ऑनलाईन डेटाबेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यासाठीच्या टेस्टींग साठी इंटरनेटचा हमखास वापर होणार! त्यासाठी FTP (File Transfer Protocol) हा प्रोटोकॉल वापरण्यात येईल, ज्यायोगे असंख्य टेराबाईट्सचा डेटा संग्रहित करण्यासाठी आणि ऍक्सेस करण्यासाठी मोठी बॅंडविड्थ ही प्रोव्हाईड केली जाईल.

  तर ह्या टोरेण्ट्स च्या साईटसुद्धा याच प्रोटोकॉलचा वापर करतात. प्रोटोकॉलमधील नियमांचे उल्लंघन होऊ नयेत यासाठी नविन तरतुदी करण्यात येत आहेत. P2P (Peer to Peer) ह्या संकल्पनेवर आधारीत या टोरेण्ट्स साईट्स लोकांना फाईल्स (डेटा) शेअर करण्यासाठी इंटरनेटवरील खुप मोठी बॅंडविड्थ उपलब्ध करून देतात. त्यामध्ये फाईलच्या प्रकाराविषयी कसलीही बंधने येत नाहीत, शिवाय FTP चा वापर होत असल्याने अपलोडिंग आणि डाऊनलोडिंग साठी लागणारा वेळ इतर साईट्सच्या मानाने खुप कमी असतो. ह्म्म, पण इथे वापरकर्त्याचा आयपी ऍड्रेस ट्रॅप होत असल्या कारणाने पकडल्या जाण्याची भीती नेहमीच असते. मात्र जर तुमच्याकडील भला मोठ्ठा डेटा लांब असलेल्या मित्राला पाठवायचा असेल, तर टोरेण्ट्सला पर्याय नाही.

  काही महत्वाच्या टोरेण्ट्स साईट्सः

  http://torentreactor.net/

  http://torentz.com/

  या टोरेण्ट्सच्या साईट्सवरून डाऊनलोड होणार्‍या फाईल्सचा .torrent (काही केबींमध्ये आकार असतो) या एक्स्टेन्शनमध्ये मुळ डाऊनलोडिंग फाईल्सचा मॅग्नेटिक युआरएल ऍड्रेस असतो, ज्याद्वारे त्या फाईल्स डाऊनलोड केल्या जाऊ शकतात. या टोरेण्ट्स फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी त्या मॅग्नेटिक युआरएल ऍड्रेसचा अर्थ डिकोड करून FTP band चा वापर करून ऍक्सिलरेट करून मुळ फाईल्स (ज्या त्या टोरेण्ट फाईलमध्ये असतात) डाऊनलोड करण्यासाठी काही खास सॉफ्टवेअर्स लागतात.

  http://download.cnet.com/ येथे जाऊन uTorrent, BitTorrent, LimeWire यांपैकी एखादे P2P File Sharing सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे (५ एमबीच्या आत आकाराचे डाऊनलोड्स आहेत) आणि इन्स्टॉल करावेत. ही सॉफ्टवेअर्स तुमच्या ब्राउजरसह आणि उपलब्ध असलेल्या नेटवर्क प्रॉक्सी सेटिंग्जसह आपोआप कन्फिगर होतात. यापुढे कधीही तुम्ही .torrent फाईल डाऊनलोड केली की ती आपोआप यांपैकी कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये उघडून तुमच्या इच्छित फाईल्स डाऊनलोड्स करून देतील.

  आणि हो टोरेण्ट्स डाऊनलोड करत असताना तेथील सीड्स आणि लीचेस यांचाही विचार करावा.

  कळकळीची विनंतीः आपण लोकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा, पण महेंद्र काकांनी सांगितल्याप्रमाणे मराठी साहित्याची तरी येथे फुकटात देवाण-घेवाण करू नयेत, आपले कर्तव्य आहे मराठीशी एकनिष्ठ राहणे, ना की आपल्याच भाषेला फुकटात मिरवणे!

  धन्यवाद!

  • माफ करा काका, पण एकदा लिहायला सुरूवात केली की, मला जागेचे भानच राहत नाही! जेवण झाल्यानंतर इतरांचा विचार करण्याची माझी नॉटी सवय आहे!!! 😛

  • तुझी कॉमेंट अतिशय उत्कृष्ट आणि माहिती पुर्ण आहे. माझ्यासारख्या नॉन आयटी माणसाला पण तुला काय म्हणायचं आहे ते समजलं.
   एफटीपी म्हणजे काय ते सांग जरा !!
   दुसरे म्हणजे तु हे जे वाक्य लिहिलं आहे “आणि हो टोरेण्ट्स डाऊनलोड करत असताना तेथील सीड्स आणि लीचेस यांचाही विचार करावा. ” म्हणजे काय??

   • काका,

    FTP: एफ.टी.पी. हा एक प्रोटोकॉल आहे, ज्यामध्ये त्याच्या वापरासंबंधीचे सर्व नियम, कडक कायदे आहेत. त्याचा वापर करून त्याजोगे कसलाही गैर-व्यवहार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक नविन संकल्पना आणतांना प्रोटोकॉल अतिशय महत्वाची बाब असते. असो. माहितीसाठी फक्त एवढे ध्यानात ठेवा की, जेव्हा-जेव्हा तुम्ही एफ.टी.पी. नेटवर्कचा वापर कराल, तेव्हा तुम्ही त्यामध्ये नमूद असलेल्या सर्व अटी मान्य करूनच त्याचा वापर करीत आहात, असा त्याचा अर्थ होतो, जर तुम्ही त्यातील कायद्यांचे उल्लंघन करतांना आढळलात, तर तुमच्यावर संबंधित सायवर गुन्हा नोंदवल्या जाऊ शकतो.
    एफ.टी.पी. नेटवर्क प्रणाली तुम्ही तुमच्या TCP/IP नेटवर्क द्वारे म्हणजेच तुमच्या इंटरनेट कनेक्शनद्वारे वापरू शकता, त्यासाठी शिल्लकच्या इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला कराव्या लागत नाहीत, उदा. त्यासाठीचे वेगळे मासिक भाडे इत्यादी. यासंबंधित इंग्रजी विकिपेडियावर दिलेली माहिती वाचून तुम्हाला थोडा तरी अंदाज येईल.

    • एफ.टी.पी. बद्दल एक सांगायचेच राहून गेले, ते म्हणजे या प्रोटोकॉलचा वापर करूनच, माहितीजालावर तुम्ही फाईल्स (डेटा) एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवू शकता, अपलोड/डाऊनलोड करू शकता! हुश्शऽऽ! 😉

   • टोरेण्ट साईट्सवर तुम्ही जर काही फाईल्स डाऊनलोड करीत असाल.. तर ती फाईल तुमच्याकडे १gbps चे ब्रॉडबँड कनेक्शन असूनसुद्धा १०kbps च्या स्पीडने डाऊनलोड होतांना दिसते. टोरेन्ट्स असतात, ते म्हणजे अतिगतिशील डाऊनलोड्स ऍज वेल ऍज अपलोडिंग साठी.. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर ध्यान ठेवावे लागते:

    तुम्ही टोरेन्ट साईटवर एखाद्या इच्छित फाईलसाठी सर्च करता, त्यावेळी मिळालेल्या रीजल्ट्स मध्ये प्रत्येक फाईलच्या बाजुला त्या फाईलशी संबंधित “सीड्स” आणि “लीचेस” यांचे गुणोत्तर दिलेले असते.

    सीड्स“: सीड्स हे तुमचे मित्र असतात. ते चांगले असतात. तुम्ही डाऊनलोड करत असणारी फाईल ते तुम्हाला त्यांच्याकडे असणारी फाईल इंटरनेटवर शेअर करून तुम्हाला सप्लाय करतात. यांची संख्या जास्त असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही डाऊनलोड करत असणारी टोरेन्ट फाईल ही अति-वेगवान गतीने तुम्हाला डाऊनलोड करता येईल, (निश्चितच तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या स्पीड लिमिट मध्ये राहून, नाहीतर म्हणाल की डायल-अप द्वारे कशी काय ०.३kbps च्या स्पीड ने फाईल डाऊनलोड होतीय ते..! :P)

    लीचेस किंवा लीचर्स किंवा पीअर्स“: हे दुष्ट समजले जातात (म्हणूनच त्यांना लीचेस म्हटले जाते). हे तुमचे मित्र कदापि होऊ शकत नाहीत. हे ते लोक असतात जे की सध्या ती फाईल डाऊनलोड करीत आहेत व ते डाऊनलोड करत असलेली टोरेन्ट फाईल अजुन पुर्णपणे डाऊनलोड झालेली नाही. त्यांचे डाऊनलोड जेव्हा पुर्ण होते, तेव्हा ते पण “सीड्स” बनतात.
    यांची संख्या नेहमी कमी असेल तरच डाऊनलोड चालू करावे.

    त्यामुळे सीड्स आणि लीचेस मध्ये ज्या फाईलला सीड्स जास्त असतील व लीचेस कमी असतील तरच ती फाईल डाऊनलोड करावी, अन्यथा सीड्स १०० अन लीचेस ५०० असे काही असेल तर मात्र ती फाईल नंतर डाऊनलोड करावी, जेव्हा लीचेस सीड्सच्या तुलनेने कमी असतील, जसे की सीड्स ७ व लीचेस २.. अशावेळीच ती टोरेण्ट फाईल डाऊनलोड करायला घ्यावी!

    अजुन काही प्रश्न, अडचणी?

 5. अजून एक पर्याय म्हणजे bitlord.com ला जाऊन bitlord क्लायंट download करून पीसी वर install करायचा आणि bitlord मध्ये जाऊन हवं ते सर्च करायचं. मग तो चित्रपट, पुस्तक वगैरे आपल्यापुढे हात जोडून उभा असतो.अर्थात जिथे आणि जेव्हा शक्य आहे तिथे आणि तेव्हा ओरिजिनल सीडीच विकत घ्यायला हवी किंवा निदान library मधून तरी आणावी.

  • बिट्लॉर्ड हे वेगळं आहे का अजुन?? कुठलं फास्ट असतं? हे बिटलॉर्ड की टोरंट?

   • Pratham says:

    kaka:
    “bit lord” hey “u torrent” sarkhch ek software ahe (pc var install karnya sathi).
    download speed ha ‘Vishal’ ne sangitlya pramane Seeds / Leeches, hya ver depend asto. 🙂

    • प्रथम,
     होय, आता मी एक्सपर्ट झालोय या विषयात.. जवळपास ८०० जिबी टीव्ही सिरीज- सिनेमे असतील माझ्याकडे.

     • Pratham says:

      😀 😀 hmmmmm
      post / comment chi date tar lakshatch nahi ali mazhya… 2010 chya post var me 2012 madhe comment takali… 😀

 6. केवळ जुनी गाणी, क्लासिकल गाणी असं म्हणून ते जे संगीत आपण हव्य़ा त्या किंमतीला विकत घेऊ पहात असतो, ते सर्व टॉरंटवर फुकटात उपलब्ध असतं. विशालने म्हटल्याप्रमाणे ब-याच चित्रपटाच्या फाईल्सची साईझ कमी असते पण सगळ्याच फाईल्सची नाही. आता तर तिथे ब्ल्यू रे सीडीज येऊ लागल्या आहेत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर पायरसीच्या नावाने खडे फोडणा-या आपल्या आणि परदेशी चित्रपटसृष्टीमधील लोकांनीही या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा. अगदी दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपट तिथे उपलब्ध असूनही मी स्वत: सीडी विकत आणणे किंवा चित्रपट थिएटरमधे जाऊन पहाणे पसंत करते. अगदीच नाही मिळाला तर सर्वात आधी लायब्ररीचा पर्याय मला जास्त चांगला वाटतो. mininova.org नावाच्या साईटवरून हल्लीच सर्व चित्रपट व संगीताच्या फाईल्स हटविण्यात आल्या आहेत.

  टॉरंटवरून चित्रपट डाऊनलोड करून पहाणारे खालील कारणे देतात:

  १. प्रत्येक चित्रपट थिएटरमधे जाऊन पहाणं शक्य नसतं. प्लाझासारख्या ठिकाणी ५० रुपये तिकीट असलं तरी पडद्यावर काळोखी असते. मल्टिप्लेक्सला जावं तर एका तिकिटाला १२० रूपये खर्च होतात. शिवाय प्रवास, इंटरव्हलमधली खादाडी इ.इ.
  २. खूप जाहिरात झालेला चित्रपट थिएटरमधून जाऊन पहावा आणि तो पडेल चित्रपट असावा (उदा. ब्ल्यू, व्हॉट्स युअर राशी) ज्यामुळे आर्थिक नुकसान व मन:स्ताप होतो.
  ३. थिएटरमधे लोक चित्रपट सुरू होऊन पंधरा मिनिटं झाली तरी येतच असतात. ते लोक अंधारात खुर्ची शोधून बसेपर्यंतचा चित्रपट समजत नाही.
  ३. हे कारण खासकरून इंग्रजी चित्रपटांसाठी – चित्रपटांच्या अनकट व्हर्जन्स पहायला मिळतात. चित्रपटातील काही भाग भारतात दाखवणं अवैध मानलं जातं आणि नेमका तोच भाग चित्रपटातील महत्त्वाच्या प्रसंगाशी निगडीत असतो. अनकट व्हर्जन्स अमेझॉन वरून मागवता येतात पण किंमत जास्त असते. शिवाय डी.व्ही.डी. प्लेअर रिजन फ्री नसेल तर मागवूनही पंचाईतच.
  ४. काही दुर्मिळ चित्रपट (उदा. लाईव्ह वायर, नोव्हेंबर) बाजारात उपलब्ध नाहीत. ते मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टॉरंट.
  ५. सी.डी. विकत घ्यायच्या म्हटल्या, तरी किती विकत घेणार. आवडते चित्रपट/संगीत स्वत:जवळ कायम असावंस असही वाटतं त्यासाठी .avi, .mp3 हे पर्याय सोयिस्कर पडतात. एकदा का हार्ड डिस्क मधे सेव्ह केलं की जागेची कटकट मिटते.

  माझ्या मते चित्रपट/संगीत पायरेटेड मिळण्याची अधिकृत जागा म्हणजे व्हिडिओ लायब्ररी. एकच सी.डी. विकत घेऊन किमान वीस जण तरी पहातातच. तिथेच ती वीस जणांकडून चाळीस जणांना मिळते.

  तरीसुद्धा मनात एक प्रश्न येतोच की जे मराठी चित्रपट थिएटरमधे येऊन अवघा एक आठवडा न होतो, तोच टॉरंटवर येतो आणि चित्रपट कलाकार व निर्माता, दिग्दर्शक “थिएटरमधेच जाऊन चित्रपट पहा” असं गुळमुळीतपणे काय सांगत बसतात? याचा अर्थ काय समजायचा? शिवाय एक प्रश्न आहेच – गैर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहिरात करतानाच “गैर ने थोपटले पायरसीविरुद्ध दंड” अशी जाहिरात केली आहे. तो चित्रपट अजूनही पायरेटेड झालेला दिसत नाही उलट आता तो ऑस्ट्रेलियाकडे भरारी घेतो आहे. हेच इतर चित्रपटांच्या बाबतीत का झालं नाही?

  • गैर मला पण नाही सापडला. मी पण चेक केलं. जर गैर करु शकतो तर इतर लोकं कां नाही?
   महाराष्ट्रात रस्त्यावर पण पायरेटेड सिडी मिळत नाहीत हल्ली. सगळे रस्त्यावरचे लोकं पण मोझर बिअर विकतांना दिसतात.
   आजकाल तर डिव्हीडी प्लेअर्स ला पण युएसबी असलेले अव्हेलेबल आहेत. चित्रपट डाउनलोड करुन डिव्हीडी ला युएसबी ला लावला तर पहाता येतो.
   सगळ्यांच्याच घरी कमित कमी ४२ इंची टिव्ही कॉमन झालेला आहे. बऱ्याच लोकांनी तर ३० हजाराचा एलसीडी प्रोजेक्टर आणि डिव्ह्डी , होमथिएटर ’वायर’ करुन घरामधेच सिनेमा मोठ्या पडद्यावर पहाण्याची सोय करुन घेतली आहे. एकदा मोठा पडदा घरात लागला की मग सिनेमा पहायला जायची अजिबात गरज उरत नाही.
   मल्टीप्लेक्स मधे तिकिट दर हा हल्ली २०० रुपयांपर्यंत आहे. एक सिनेमा पहाण्याचा चौघांचा खर्च १२०० होतो.
   सिनेमा नट नट्यांचे चार्जेस खुपच् जास्त आहेत, त्यामुळे प्रॉडक्शन ची किंमत वाढते. जर ते थोडे रॅशनलाइझ झाले तरच चित्रपट बनवण्याची किम्मत कमी करता येउ शकते, म्हणजे त्यांचा ब्रेक इव्हन लवकर येईल, आणि सिडी स्वस्त विकता येईल.

   विस्त्रृत कॉमेंट साठी आभार..

 7. महेंद्र,
  Torrent हा प्रकार वरदानच समजला पाहिजे. कारण त्याची उपयुक्तता. अनेक संगणकावरून तुकड्या तुकड्यांनी फाईल उतरवून घेता येते. पण ते ज्या प्रकारे वापरले जाते त्यावर तो वापर चांगला कि वाईट हे आपणच ठरवायचे. खरतर प्रश्न असा की पायरसी हे शाप की वरदान? जुन्या दुर्मिळ गोष्टी जसं कि गाणी, सिनेमे वगैरे ह्या पायरसी मुळे सहज मिळतात. पण नवीन गोष्टींची पायरसी केल्याने कला क्षेत्राचे नुकसान होतेच. मला तरी वाटते की एखादी निर्मिती २-३ वर्षे जुनी झाली कि मग ती open source सारखी फुकट उपलब्ध झाली पाहिजे. अर्थात हे वाक्य मी आत्ता फार विचार न करता लिहितो आहे. ह्याचे पण फायदे तोटे असतीलच.

  • निरंजन
   पुर्वी असं म्हणायचे की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही.
   पण हल्ली तसं नाही. कला क्षेत्रातही चांगला पैसा मिळतो.

   “२-३ वर्ष जुनी झाली की ओपन सोअर्स करावी” हे जरी योग्य वाटलं याला कुठलाही निर्माता मान्य करणार नाही.

   ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे.. अजुनतरी केवळ आयटी मधले लोकांनाच माहिती असावी असे मला वाटते. मला नुकतंच समजलं या बद्दल!!

 8. Aparna says:

  हम्म्म…कंप्युटरसाठी म्हणाल तर शापच कारण त्यातुन नकोनकोसे नवे नवे जिवाणू येतात..आम्ही आमचं जुनं मशिन या कामासाठीच ठेवलंय..त्याला सारखा फ़ॉर्मॅट केला तरी चालतो..पण देशाबाहेर राहिलं की हे असे डाउनलोड्स होतात..मात्र जेव्हा येतो तेव्हा मराठी सीडी तर आवर्जुन घेतोच…

  • जिवाणूंचा नायनाट शक्य आहे. टॉरंट डाउनलोड करतांना एक ट्रॅकर फाइल पण असते . ती डाउन लोड केली नाही तर जिवाणूंचा त्रास कमी हॊऊ शकतो.

 9. खरंय, मी माझ्या फेवरिट सिनेमाच्या सिडी विकत घेत असतो….

 10. टॉरेंट्स ही निश्चितच एक उपयुच्त संकल्पना आहे. लिनक्सच्या आवृत्त्या किंवा प्रचंड आकाराच्या, पण मोफत संगणकप्रणाल्यादेखील टॉरेंट्सवर उपलब्ध आहेत. पीअर टू पीअर असल्याने किंवा एकापेक्षा जास्त ट्रॅकर्स वरून उपलब्ध असल्याने आपोआप सर्वर लोड कमी होतो, उपलब्धता वाढते.

  कलाकृतीचा प्रसार आणि पर्यायाने फॅनडम वाढवण्यात टॉरेंटचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

 11. काका
  टॉरंट- शाप की वरदान?
  लेख फारच माहितीपुर्ण आहे. विशाल आणि इतरांच्या माहितीपुर्ण कॉमेंटमुळे त्यात मोलाची भर पडली. धन्यवाद

  • राजेंद्र
   मला फारच कमी माहिती होती, पण कॉमेंट्स मुळे बाकी खूप माहिती मिळाली. विशल्याने खूपच छान डिटेल्स दिले आहेत नां?
   प्रतिक्रियेकरता आभार.

 12. Suresh Dorle says:

  Khajana kayvateltechya repat sapdla

 13. Sainath says:

  Torrent mule khup faayda jhala mala aata paryanta. Bhartamadhe torrent var kahi niyam nahi aahet tyaamule kahihi fukat download karta yete. Jar Windows 7 chi aavrutti rs 12000 la milat asel aani tich pan crack torrent varun fukat milat asel tar faaydach aahe. baakichya softwares aani ebooks & other costly materials baddal kahich vicharuch naka tyaanche cost tar sarva saamanyaana aypatichya baaherchech aahet. aani mhanal marathi movies torrentvar ka lavkar yet nahi karan marathi movies la jast demand nahi aahe tyamule tyaachi jast piracy hot nahi. tyaamanane Hindi & Hollywood movies la khup demand aahe mhanun tyaanchi piracy fast hote. Marathi movies sahasa pirated net var yet nahit aalya tar DVD source madhech yetat.
  Tyaamule torrent ek vardaanach aahe.
  -SAINATH.
  (Purvi Torrent var Marathi Movies Upload karaycho pan tyaanchya DVD release jhalyavar.)

  • साईनाथ
   ब्लॉग वर स्वागत..
   तुमचं खरं आहे, मराठी मुव्हीज जरी असल्या तरी बहूतेक सिड्स कमी असतात, त्यामुळे लवकर डाउनलोड होत नाहीत. मराठी पहाण्यापेक्षा इंग्रजी डाउनलोड करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो.
   प्रतिक्रियेसाठी आभार..

 14. वेदांत says:

  खुपच छान माहिती मिळाली. असेच नविन-नविन विषय घेत रहा !

  • वेदांत
   मला इंग्रजी टीव्ही सिरिज पहाण्याची आवड आहे, आणि त्या साठी हे टोरंट खूप उपयोगी पडते. 🙂

 15. अनामिक says:

  आता तर Android किंवा Apple स्मार्टफोन्स साठी देखील टोरंटचे एप्लिकेशन्स आले आहेत त्यामुळे घरी वाय फाय असेल तर रात्रभर डाऊनलोड सुरु ठेऊ शकतो त्यासाठी संगणक चालू ठेवायची गरज नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s