चंगळवाद?

दोन पांढरे शर्ट्स, दोन खाकी हाफ पॅंट्स आणि एक  किंवा फार तर दोन एक्स्ट्रॉ वेगळ्या रंगाचे हाफ पॅंट शर्ट्स.. एक स्लिपरचा जोड, इतकं असलं की आमचं वर्ष निघून जायचं. बेसिक रिक्वायरमेंट्स कमहोत्या- इतकं असलं की बास…. लै झालं!! असं वाटायचं.इतर सगळ्य़ा मुलांकडे पण एवढंच असायचं.. त्यामुळे कॉम्प्लेक्स वगैरे कधीच आला नाही.

आहे तेवढ्या गोष्टीत आनंदी रहावं ही शिकवण!! सकाळी एकदा अंघोळ करु खाकी चड्डी ( हाफ पॅंट म्हणायला कसं तरी वाटतंय) आणि पांढरा शर्ट ( त्याला पांढरा म्हणायचं का? कारण त्याचा रंग शेवटी पिंगट व्हायचा) अंगावर चढवला, की तो एकदम दुसऱ्या दिवशी आंघॊळीच्या वेळेसच अंगावरून उतरवला जायचा. घरी आल्यावर कपडे बदलणं वगैरे लक्झुरी नव्हती . घरीलो की सरळ दप्तर ( स्कु बॅग नाही) कोपऱ्यात फेकलं की आम्ही खेळायला जायला मोकळॆ!!!

तसंही त्या काळचे दिवसच थोडे वेगळे होते. पैसा हा नेहेमी साठवून ठेवायचा म्हणजे अडीअडचणीला उपयोगी पडतो असं नेहेमी कुन तसंच रहायची सवय लागलेली होती. शाळा सुरु झाली की पास झालेली मुलं आपली पुस्तकं शाळेत दुसऱ्या मुलांना अर्ध्या- किंवा पाव किमतीत ( त्याची – म्हणजे पुस्तकाची परिस्थिती बघून)विकायची. मला आठवतं दर वर्षी पुस्तकं अशीच घेतली जायची.  माझी पुस्तकं नेहेमीच अगदी कमी किमतीत विकली जायची, कारण म्हणजे त्यातल्या सगळ्या महापुरुषांना काढलेल्या कुंकवाच्या टिकल्या, आणि स्त्री पात्रांना काढलेल्या दाढी मिशा.. 🙂

मोठ्या भावाचे कपडे लहान झाले की ते लहान  भावाला मिळायचे. कधी कधी तर लहान भाऊ जाम वैतागायचे , की मला नेहेमीजुने कपडे का म्हणून वापरायचे? एका घरात दोन तिन मुलं असली तर सरळ एकाच थानातून कापड आणलं जायचं. एका घरची मुलं सहज ओळखता यायची कपड्यांवरुन. एखाद्या रंगाचा शर्ट वगैरे आवडीने घ्यावा, तर नेमका त्याचा रंग धुण्यामधेच जाणार!! रंगाची क्वॉलिटी खूप खराब होती.  नवीन कपडे फक्त दिवाळीच्या वेळेस मिळायचे, किंवा कोणाचं लग्नं वगैरे असेल तरच! अंडरवेअर्स वगैरे मुलांना तर अगदी सहावी पर्यंत माहितीच नसायचे. सातवीमधे पटट्या पट़्ट्याच्या कपड्यांच्या अंडरवेअर्स शिवून घातलेल्या मला जुनही आठवतात. आजकाल तर अगदी केजी वन पासून अंडरगार्मेंट्स वापरायची पद्धत आहे.

नुकताच नायलॉन ( म्हणजपॉलिस्टरचा शोध) लागला होता. टेरेलिनचा शर्ट, त्याला इस्त्री लागत नाही म्हणून खुप पॉप्युलर झाला होता. तसेच टेरेलिनची पॅंट पण असायची. विदर्भातल्या गर्मीतही लोकं ते टेरेलिनचे कपडे घालायचे. टेरेलिनचा एक फायदा मात्र होताच, की कपड्यांचे रंग जात नसत, आणि कित्येक दिवस ते कपडे फाटत किंवा विरत पण नसत , त्यामुळे हे लवकरच मध्यमवर्गीयांमध्ये पॉप्युलर झाले.

रीबी मुळे नाही, तर केवळ पैसा उगीच खर्च करु नये ही शिकवण असायची म्हणून घरचं काम घरीच करायची पद्धत होती.  लोणची, पापड, मसाले, सांडगे वगैरे घरीच केले जायचे उन्हाळ्यामधे. शेवया सुध्दारीच व्हायच्या. एक दिवस आई शेजारच्या काकूंकडे पाठवायची.. की त्यांना विचारुन ये , तुम्ही भिजवताय का पापडाचं, की मी भिजवू म्हणुन.  एकदा सगळ्या शेजाऱ्यांचा होकार आला की मग आई पापड किंवा शेवया वगैरे चं भिजवायला घ्यायची. शेवयाचे गहू कॉटनच्या साडीच्या पदराला चिकटले तर शेवया येणार.. हा ठोक ताळा जूनही आठवतो. शेवयाच्या रव्याचा गोळा अगदी खलबत्यामधे कुटू कुटु नरम करायची आई..

दुपारी आपापल्या घरचं सगळं आटोपून शेजारच्या  चारपाच  काकु एकत्र व्हायच्या आणि दुपारभर मग पापड, किंवा शेवया बनवणे हा कार्यक्रम चालायचा. पापड लाटतांना त्याच्या लाट्या कच्च्या खाणे , किंवा शेवया ओल्या असतांना तशाच तळून , त्यावर पिठीसाखर घालुन खाणे  मला खूप आवडायचं. लहानपणच्या काही गोष्टी अजूनही खूप मिस करतो… त्यातली ही एक!!तरी बरं, नागपुरला गेलो की आई जुनही बरंच काही काही बनवत असते. घरच्या शेवयांची मजाच काही और असते. विकतची लोणची बेडेकर/ केप्र नकोसे वाटतात हल्ली. कितीही म्हंट्लं की बेडेकरांचं, किंवा मलाडच्या थोटॆंचं लोचं घरच्या सारखं असतं, तरीही ते घरचं नाही याची जाणीव ते खातांना होतेच. लसुन चटणीचं पाकीट उघडुन त्यातली चटणी खायला घेतली की आईच्या हातची लोखंडी खलबत्त्यामधे कुटू केलेली चटणी आठवतेच!!! :)हॉटेलचं खाण, विकतचे पदार्थ घरी आणणं हे सगळं कमपणाचं वाटायचं गृहीणील.फराळाचे पदार्थ आजकाल जे बाराही महिने डब्यात असतात, ते फक्त सणावारालाच केले जायचे. शेव ,चिवडा , चकली वगैरे, कदाचित म्हणूनच त्याचं अप्रूप असायचं .

शाळेत जायला बस वगैरे काही प्रकार नव्हता. लहान गावात असल्यामुळे सायकल हेच एक महत्वाचे साधन असायचे. रिस्ट वॉच पण बहुतेक एचएमटी सोना, अविनाश वगैरे असायचं. जवळपास सगळ्याच मुलांची रहाणी सारखीच असायची , त्यामुळे कोणाला कपड्यांबद्दल कमपणा वगैरे कधीच वाटला नाही.सायकलने गावाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जायला फार तर २० मिनिटे लागायची.

शेअर मार्केट म्हणजसट़्टा बाजार.. आणि तो वाईट. पैसे फक्त बॅंकेत आणि प्लॉट्स मधे गुंतवायचे. फार तर पीएफ मधे!सोनं घेणं हा पण एक सेफ इन्व्हेस्टमेंट हा कन्सेप्ट होता. बॅंकेत फिक्स डीपॉझीट एकदम सेफ समजायचे.

श्रीमंतीची व्याख्या म्हणजे घरामधे फ्रिझ, स्कुटर असणे. बाइक पेक्षा बजाज स्कुटरला जास्त किम्मत असायची . कार म्हणजलक्झुरी !! फारच कमलोकांच्या कडे कार असायची! सेकंडहॅंड कार रीअसलीरी तो खूप खूप श्रीमंत समजला जायचा. माझ्या एका मित्राचे वडील होते फॉरेस्ट रेंजर. तो सातवीत असतांना पासून येझ्दी चालवायचा. बाइक सुरु करायला मोठा खिळा वापरायचा चावीच्या जागी.  त्याची बाईक पहिल्यांदा चालवली, तेंव्हा तर पाय पण खाली टेकत नव्हते. बाइक वगैरे म्हणज श्रीमंत!! नंतरच्या काळात जेंव्हा टीव्ही सुरु झाला, तेंव्हा घरात डायोनारा टिव्ही असला तरी पण श्रीमंतीचं लक्षण समजलं जाय.

आता ह्याच्याच कम्पॅरिझन मधे आजचे दिवस पाहिले तर किती बदल झालेला आहे हे पाहुन आश्चर्य वाटते. घरटी दोन तरी स्कूटर्स बाइक्स, मिड साइझ कार,मायक्रोवेव्ह,  घरामधे एलसीडी किंवा प्रोजेक्टर.. अशा वस्तु आजकाल नेसेसिटी मधे मोडतात. अगदी लहानशा झोपडी मधे पण कलर टीव्ही आणि झोपडीवर डीश टीव्हीचा ऍंटीना हा दिसतो. एक तासभर जरी टीव्ही बंद झाला तरीही वेड लागायची वेळ येते.

घराला पडदे वगैरे कधीच नसायचे. काय मुसलमानासारखे पडदे लाउन ठेवायचे घरात? असे डायलॉग तर नेहेमीकू यायचे. घराच्या दारावर स्वतः घरच्या स्त्रीने बनवलेले मण्यांच्या चिमण्य़ा, कींवा पाखरं, किंवा सरळ काचेच्या नळ्य़ा आणि मणी मिळुन केलेला पडदा तर बरेच ठिकाणी घरच्या गृहलक्ष्मी ची कलाकुसर दाखवत मोठ्या दिमाखात दारावर लटकायचा.  जर कोणी गोवा किंवा कुठे तरी समुद्रकिनारी जाउन आलेला असेल, तर त्याच्या घराला शंख शिंपल्यांचे पडदे लावलेले दिसायचे..आता ते सगळं गेलं.

पैसा फारसा नव्हताच, पण जेवढा पैसा आहे तेवढ्यातच घर चाललंच पाहिजे हा अट़्टाहास असायचा. किराणा, कपडा,  इत्यादी दुकानदार ठरलेले. याच काळात दुबईचं मार्केट खूप वाढलं होतं. भारतीय इंजिनिअर्सला आणि ब्लु कॉलर लोकांना पण (मेकॅनिक्स वगैरे)दुबई, आखाती देशात खुप मागणी वाढली. पैसा पण भरपूर मिळू लागला. भारतामधे परत आलेले हे दुबई रिटर्न लोकं मला जूनही आठवतात. विमानतळावर मुंबईच्या गर्मी मधे थ्री पिस सुट घालून असलेला एखादा माणुस ट्रॉलीवर टु इन वन चा बॉक्स , किंवा टेप वगैरे ठेउन दिसला, हातावर रॅडोचं सोनेरी घड्याळ दिसलं, की समजावं , हा दुबई रिटर्न!! हा दुबईचा पैसा पण फार दिवस टिकला नाही. भारतातलेच बंगाली एच आर चे लोकं घेतले त्यांनी कमी पगारावर लोकं नेमणं सुरु केलं. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते हे असं..

मला वाटतं चंगळवाद सुरु झाला तो प्लास्टीक मनी आल्यापासुन. पैसा लागला की सरळ कार्ड वापरायचं. पुर्वी कर्ज काढण्यासाठी जे काही करावं लागायचं , म्हणजे अर्ज, कारण वगैरे सगळंयातुन सुटका झाली, सरळ कार्ड स्वाइप केलं की झालं! कर्ज काढणं पुर्वी वाईट समजलं जायचं, आजकाल तर जास्तीत जास्त कर्ज काढणं ही एक फॅशन झालेली आहे. दुकानात गेल्यावर बेदकारपणे ( स्टाइलमधे ) गर्वाने कार्ड पुढे करणारे लोकं दिसले की मला तर हसु येतं.. तुम्ही कर्ज घेताय, मग त्यामधे कसला गर्व?( मी जूनही डेबीट कार्ड वापरतो. )

कपड्यांचे सेल लागतात. ब्रॅंडेड शर्ट दोन ते अडीच हजाराचा अर्ध्या किमतीत विकला जातो ठरावीक काळात . तिथे पण अगदी रांगा लाउन कपडे घेणारे लोकं दिसतात. यामधे कपड्यांची गरज आहे म्हणून घेतोय, असं नाही, तर स्वस्त आहे सेल आहे म्हणून कपडे विकत घ्यायचे असा ट्रेंड वाढला. गरज असेल तर खर्च.. हा कन्सेप्ट संपला!!

कार वगैरे घ्यायची तर नवीनच. जुनी कार घेणं हे डाउन मार्केट समजलं जाउ लागलं. नवीन कार घेण्यासाठी कर्ज द्यायला बॅंका तयार होत्याच. हॉटेल मधे जाणं, एकरकमी हजार दोन हजाराचं हॉटेलचं बि भरणं, पैसे नसतीलरीही कार्ड असतंच नां… ह्यात काही फार मोठी गोष्ट आहे असं नाही, असंही वाटू लागलं..एकदा कर्ज काढून रहायची सवय लागली कीलोकांना कितीही पैसा मिळाला तरीही कमीच पडतो.

उरली सुरली कसर जी होती ती एकॉनॉमी बुम ने पुर्ण केली. पगार खूप वाढले, नवरा, बायको दोघंही नौकरी करणारे..डबल इनकम, मग खर्च पण तसाच डबल हवा. जुना दोन बिएचके चा फ्लॅट विकू थ्री , फोर बिएचके चे फ्लॅट्स घ्यायचे, आणि त्यासाठी लोकाढुन हप्ता भरायचा.. हा कन्सेप्ट खूप पॉपुलर झाला. म्हणजे काय दोघांनी ही नोकरी करायची पैसे कमवायचे, अन लोनचे हप्ते फेडायचे!!! असा जीवनक्रम सुरु झाला.

कुठल्याच गोष्टी मधे संतुष्ट होणे लोकं विसरले, पैसा वाढला, पण सोबतच मनस्ताप घेउन आला. घरातली शांतता गेली. नवरा बायको दोघंही नोकरी करतात, साधारण सारखंच कमावतात, पण घरी आल्यावर कामं बायकोनेच करायची, नवरा फक्त फार तर जेवणाची ताटं टेबलवर मांडून घेईल, बस , त्यापेक्षा जास्त नाही. आयुष्य हे असं पैशाभोवती फिरणं सुरु झालं..

किती बदल झालाय ना?? हे जे काही आजकाल सगळं पहातोय याचा अर्थ श्रीमंती वाढली असा आहे? की मध्यमवर्गीयांची कर्जबाजारू वृत्ती वाढली? की खर्च करण्याची ऐपत वाढली आहे? या प्रश्नावरच हा लेख संपवतो.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

48 Responses to चंगळवाद?

 1. मस्त! मला पण माझ बालपण आठवलं, थोड्याफार फरकाने सगळं असच होतं.
  आई कच्च्या पापडाच्या लाट्या जास्त खाऊन द्यायची नाही त्यामुळे मग आम्ही वाळत घालताना लाटलेले पापडच मोडून खायचो.
  पूर्वी कर्ज घेणे खरच कमीपणा वाटत असे.
  पैसे कितीही मिळाले तरी कमीच, ज्याला कुठे थांबायच हे कळलं तो जिंकला.

  • सोनाली
   रम्य ते बालपण म्हणूनच म्हणतात. लहान पण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा.. ही म्हण आणि तिचा अर्थ हा आज समजतो.

 2. mipunekar says:

  खरे आहे. पूर्वी नवीन कपडे फक्त वर्षातून २ वेळा मिळायचे, वाढ दिवसाला आणि दिवाळीला. आणि आजकाल असाच बाहेर गेलो होतो शर्ट आवडले म्हणून घेतले असे पण होते.
  वस्तूच्या गरजेपेक्षा आपण त्या वस्तूची गरज निर्माण करतो. हे जास्तीचा पैसा हातात खेळल्याची लक्षणे आहेत.

  • दोन वेळा जरी मिळाले तरी पण जेंव्हा नविन कपडे मिळायचे त्याचा आनंद खुप असायचा.
   आपण गरज नसतांना आपली गरज वाढवुन ठेवतो हे अगदी खरं. याची जाणिव जरी आपल्याला झाली तरी पण आपोआप कंट्रोल येइल खर्चावर…

 3. Kedar says:

  Agadi kharay. Masta lihila aahe tumhi. Tase tumhi chhanach lihita, pan ha post khup javalcha vatala. Majha hi balpan, jari tumchya nantarche asle tari kami jasta pharakane asach hoto. Mothya bhavchi pustaka mala vagaire. Garva ya goshtincha vatato, karja kadhlyacha vagaire nahi. Lokanchya jagnyache praman badalle aahe ho. Mi ani majha motha bhau, aai vadlanchya sanskaran mule asel bahuda, amchya vayachya lokanna pharach old fashioned vatato. Pan mala tyacha garva aahe. Mala cake kapun, partya karun vadh-divas sajra karyala avadat nahi he aikun, bayko ne ani tichya maherchya mandalinni bota tondat ghatli hoti. Ha sudha ya changal vadacha parinam aahe bahuda.

  Kiti lihu asa jhalay. Pan to man tumchay. Ha blog tumcha aahe. Tyamule tumhi lihaycha, amhi apla tumchya lekhanat swatahala baghat basto. Masta lihila aahe. Punha sangto ani ithe thambto.

  • केदार
   अगदी मनमोकळेपणाने लिहिलेली कॉमेंट खुप आवडली. तुम्ही अगदी मोकळे पणाने कितीही मोठी कॉमेंट लिहिली तरीही काही हरकत नाही. लहान लहान गोष्टींमधे आनंद शोधायचा प्रयत्न केला की जीवन सुसह्य आणि आनंदी होतं.
   प्रतिक्रियेकरता आभार!!

 4. हा ‘झणझणीत अंजन’ वाल्या प्रकारचा लेख आहे. आपणच (गरज नसताना) आपल्या गरजा किती वाढवून ठेवल्या आहेत हे डोळे उघडून बघायची गरज आहे. ‘गरजा कमी करा’ म्हणून सांगणारा महात्मा याच देशातला का असा प्रश्न पडतो कधी कधी.

  • हेरंब
   दोघंही नोकरी करतात, पैसा कमवतात, आणि रॅट रेस मधे सहभागी होतात. आयुष्यामधे आनंद उपभोगायला वेळच नसतो. थोडा पैसा हातात खेळू लागला की इतर नविन खर्च वाढवुन आपण स्वतःची मनःशांतीघालवुन बसतो.

 5. सगळं पटलं.
  ‘Live life king size’ ह्या वाक्यातला ‘King size’ फक्त लक्षात राहिला आहे. ‘Live life’ सगळे विसरून गेले आहेत कदाचित. पैशाची किंमत वाढतेय आणि जगण्याची किंमत कमी होतेय दिवसेंदिवस!

  • माणसापेक्षा पैसा मोठा झालाय . हेच कारण असावं कीआपण फक्त पैसा एके पैसा याचाच विचार करतो.

 6. Aparna says:

  शब्द न शब्द खरा आहे…आणि मुख्य इतका पैसा आला तरी समाधान नाहीच…आई इथे मागे सहा महिने राहिली आणि तरी पुर्वीचे चाळीतलेच दिवस कसे चांगले होते याच्या आठवणी काढून खरंच आता नक्की काय कमावलंय हा प्रश्न मागे ठेऊन गेली…..

  • अपर्णा
   जुने दिवस आठवले की खरच एकदम नॉस्टेल्जिक वाटायला लागतं, आणि मन भरुन येतं.इथे तर खूप खूप लिहायचं होतं, पण थांबवलं पोस्ट, नाहीतर कादंबरीच झाली असती !! खुप व्हास्ट विषय आहे हा.

 7. bhaanasa says:

  महेंद्र, अगदी मनातलेच लिहीलेस सारे आणि सत्य. खरेच किती बदललेय ना सारे. सुखाच्या कल्पनाच मुळी बदलून गेल्यात. अगदी दुधाच्या बाटलीची ती नीळी-हिरवी-लाल चंदेरी पत्र्याची टोपणेही त्यावेळी लोक धुवून जपून ठेवीत व महिन्याच्या शेवटी विकत. जेवढा पैसा मिळत होता त्यातलाही काही न चुकता शिल्ल्क टाकून लोक भागवत होते आनंदातही राहत होते.नवीन वस्तूंचे, कपड्यांचे, अगदी छोट्याछोट्या गोष्टीचेही किती अप्रुप असे.उडप्याच्या हाटेलात जाऊन राईसप्लेट खाणे म्हणजे चंगळ. आता अगदी ताज मध्ये गेले तरी ते समाधान मिळणार नाही…. खरेच आपणही बदललोच आहोत. मनापासून आनंद, हसू येतच नाही.उद्या कोणी पाहिलाय… काय ते आजच उपभोगून घ्या…या भावनेने चंगळवाद व प्लास्टीक मनीच्या वापराला धरबंदच राहीलेला नाही. पैसा नक्कीच जास्त हातात येतोय पण त्यामुळे तितकाच किंबहुना जास्तच खर्च होतोय आणि कोणालाही त्याची खंतही नाही की कसा फेडायचा याची फिकीरही नाही.

  • मला पण हे प्रकर्षाने जाणवले, की आपण आनंद उपभोगुच शकत नाही. तुझं म्हणणं अगदी खरंय, राइसप्लेट खाण्यातला आनंद खरंच खूप असायचा.. आज कितीही महागाच्या हॉटेल मधे गेलो तरी तो आनंद पुन्हा मिळत नाही.

   प्रत्येक गोष्ट अगदी टेकन फॉर ग्रांटेड असते, कदाचीत म्हणून आपण कुठल्याही गोष्टीत आनंद उपभोगु शकत नाही. इतक्यातच आय १० घेतली, कार घरी घेउन निघालो, तर मुलगी म्हणते बाबा पुढली कार आपण होंडा सिटी घेउ या.. !!!आनंद उपभोगायची मानसिकता गमावुन बसलोय का आपण?

 8. पैसा आणि गरजा ईक्वली प्रॅपोशनल आहेत हो..पैसा वाढला की गरजा आपोआप वाढतात फक्त त्या अनावश्यक आहेत हे आपल्याला पैशाच्या धुंदीत कळत नाही. मग तुम्ही ५००० कमावा की ५००००…
  आवडली पोस्ट…मस्त

 9. हा ग्लोबलाइझेशनचा परिणाम आहे, अमेरिका याच चंगळवादामुळे आर्थिक संकटात पडली.
  भारत आणि चीन इतके दिवस काटकसरी होते म्हणुन टिकुन राहीले मात्र आता सर्वत्र चंगळवाद् पसरत आहे…

 10. Manmaujee says:

  झणझणीत झालाय लेख. . .पैसा आला पण समाधान हरवलय. . .पैश्याच्या मागे धावताना माणूस जगायच विसरून गेलाय…काही दिवसांपुर्वी कुमार केतकरांचा पण चंगळवादयावर खूप छान लेख आला होता लोकरंग मध्ये!!!!

  • पैसा आयुष्यात उपयोगी आहेच, मला जेंव्हा साउथ इस्ट एशिया चा इंचार्ज म्हणुन शारजाह मधे ट्रान्स्फर करण्याबद्दल विचारलं होतं, तेंव्हा पैशापेक्षा मुलींच शिक्षण जास्त महत्वाचं वाटलं< म्हणून नाही म्हणालो. कदाचित निर्णय चुकीचा असेल .. पण … असो.. !!!

 11. sharad says:

  Khup chhan lekh. Wachtana man bharun ale. balpanicha kal sukhacha yachi dekhil athawan zali ani paisa hatat khelu laglyawar jeewan kase badalale yachihi janiv dilit. ha lekh ataparyantcha sarwat chhan lekh watala. dhanyawad.

  • शरद
   मनःपुर्वक आभार. अहो अगदी मनातलं लिहिलं. एकदा लिहितांना वाटलं की लोकांना खुप डाउन मार्केट वाटेल, तरी पण लिहिलं. जुनी पुस्तकं, मोठ्या भावाचे कपडे, अतिशय वेग्ळे दिवस होते ते..

 12. Pushpraj says:

  अप्रतिम…..खरोखर अस वाटत होत की लेख संपूच नये….खूप छान लिहिता तुम्ही…..

  • पुष्पराज

   तुमच्या अशा प्रतिक्रियेमुळेच पुन्हा नविन लिहीण्याचा उत्साह वाढतो. प्रतिक्रियेकरता आभार.

 13. mahesh says:

  I have read your every post and like all it is also great..I always use to see my inbox for your new post..thanks for such great posts..

 14. महेंद्र,
  नेहमीप्रमाणेच हा लेखही उत्तमच! पूर्वी पैशाला किमत होती तीच कमी झालीय. अगोदरच्या पिढीतील काटकसरी वृत्ती आपल्या पिढीत थोडी कमी झाली, पण कार्डच्या क्रेडिटवर खरेदी वगैरे होत नव्हती. आताची कॉलसेंटर पिढी मात्र सर्रास खर्च करते. आवाक्याच्या बाहेर घरासाठी कर्ज घेते. मंदीच्या पूर्वी बऱ्याच आयटी वाल्यांनी बेसुमार कर्ज काढून घरं घेतली आणि मग मंदीत नोकऱ्या जाऊ लागल्या तेव्हा धाबे दणाणले. सारासार विचार करून खर्च करायचे थोडे कमीच झाले आहे. तरी अजून अमेरिकेपेक्षा परिस्थिती खूपच बरी आहे.

  • निरंजन
   हे पोस्ट तुमच्या एका पोस्ट वर कॉमेंट टाकली , तेंव्हाच सुचलं होतं. एकदा वाटलं की आपण फारच काळाच्या मागे आहोत, क्रेडीट कार्ड वापरत नाही म्हणून. पण डेबिट कार्ड वर काम चालतंय, मग कशाला उगिच क्रेडीट कार्ड घ्यायचं असा विचार करतो.

   घरांच्या किमती अव्वाचा सव्वा वाढुन जाण्याचे कारण पण हेच आहे. अमेरिकेत सरकारचा पाठिंबा आहे, इथे अजिबात नाही.

   मला वाटतं आपणही अमेरिकेच्याच मार्गावर आहोत.. !!

   • महेंद्र,
    “अमेरिकेत सरकारचा पाठिंबा आहे, इथे अजिबात नाही.” अगदी हेच वाक्यं मी एकदा माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना वापरलं होतं. बाकी क्रेडीट कार्ड हे एकतरी असावंच असा माझं मत आहे. डेबिट कार्ड पेक्षा क्रेडीट कार्ड जास्तं सुरक्षित आहे. डेबिट कार्ड चोरीला गेले तर त्यावरून चोरांनी खरेदी केली तर ते पैसे आपल्या खिशातून जातात (liability protection नसेल तर). मात्र क्रेडीट कार्ड चोरीला गेले तर चोराने केलेल्या खरेदीची रक्कम आपल्या खिशातून जात नाही. पहा http://infobytes.in/what-to-do-if-your-credit-card-is-stolen-or-lost/ शिवाय क्रेडीट कार्डावर १५-२० दिवस पैसे बँकेतून जात नाहीत. तेव्हढेच व्याज जास्त 🙂

    फक्त आपल्या मर्यादा वापरून क्रेडीट कार्ड वापरले तर ते खरच उपयोगी आहे. नाहीतर माकडाच्या हाती कोलीत अशी परिस्थिती 🙂

    • क्रेडीट कार्ड चा उपयोग सांभाळून केला तर ठिक.. माझ्या कडे नाही अजुन तरी एकही क्रेडीट्कार्ड.पण तुमच्या त्या दिवशीच्या कॉमेंट नंतर अप्लाय केलाय कार्ड साठी.
     लवकरच मिळेल. त्याने माझ्या सवयी बदलल्या नाही म्हणजे मिळवली!!

 15. Vidyadhar says:

  अहो काका,
  हा बदल माझ्या पिढीने तर स्वतःतच झालेला पाहिलाय. मीच लहानपणापासून अगदी ह्याच क्रमाने चंगळवादी होत गेलोय. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे खरं.

  • विद्याधर
   फक्त एवढी जाणीव जरी झाली की कुठेतरी चुकतंय, की बस.. आपोआप सगळ्या गोष्टींवर ताबा येइल असे वाटते.
   हे सगळं जे काही आहे, ते आपोआप होत गेलंय, खिशातल्या पैशाची उब असं वागायला भाग पाडत असावी असे मला वाटते.

 16. anukshre says:

  लेखात व प्रतिक्रियांमध्ये बरेच मुद्दे स्पष्ट झालेत. चंगळवाद आहे हे आपल्या पिढीचे मत आहे. आपण शाळेत फक्त शारीरिक कवायतीच्या तासांना त्या दिवशी स्पोर्ट्स शूज ते सुद्द्धा बाटा कंपनीचे घालायचो पण मला लेकामुळे रिबॉक चे पण शूज टिकाऊ व दर्जेदार असतात हे कळले. हल्लीच्या गोष्टी आपल्यलाला आपल्या तुलनेत महाग वाटतात पण दर्जा उत्तम मिळतो. आपल्या काळी मिळणारा कपडा हा आईच्या पिढी साठी पण महागच वाटायचा. एकाच ताग्यातून त्यांना कपडे केले जायचे त्यामानाने भावंडांचे का होईना पण वेगळ्या रंगाचे कपडे हेही अप्रूप होतेच… असे आहे कालाय तस्मै नमः

  • गरज नसतांना , किंवा आपल्या गरजा वाढवुन ठेवणे ह्याला मी चंगळवाद म्हणतोय. एखादी चांगल्या दर्जाची वस्तु घेणे याला नाही.

   रिबॉकचा शु फार चांगला जरी असला, तरी मुलं तो आपल्याप्रमाणे वर्षानुवर्ष वापरत नाहीत. कारण तो लहान तरी होतो किंवा खराब तरी, आणि जर चांगला राहिलाच तर फारतर एखाद्या वर्षातच मुलांना त्या डिझाइनचा कंटाळा तरी येतो आणि नविन हवा असतो. असो.. तो अर्थात निराळा प्रश्न आहे. माझा नायके मी चार वर्ष झाले वापरतो आहे.
   चांगला कपडा घेणे अगदी योग्य आहे, फक्त वर लिहिल्या प्रमाणे केवळ सेल लागला आहे म्हणुन शर्टस घेउन ठेवायचे – गरज नसतांना, कार बदलायची- गरज नसतांना, किंवा तत्सम गोष्टी करायच्या ह्याबद्दल वरच्या पोस्ट मधे लिहिलंय..

 17. मान गये उस्ताद !!!
  मनात असणारे शब्द “कट्ट्या”वर मांडले तुम्ही.
  “कमी गरजा, जास्त संतुष्टि” साधा सरळ हिशोब. बहूतेक जणांना ह्या गोष्टी म्हणजे कल्पनाविलास वाटतो.मी स्वत: खेड्यात राहतो आणि असेल त्या गोष्टींमध्ये किती समाधान असते ते पदोपदी अनुभवतो.
  वयाच्या २३ व्या वर्षीच माझ्या सगळ्यागोष्टीं अनभवुन झाल्या, अगदी पुणे ते मलेशिया, दुबई, न्युझिलंड सुध्दा पण गावाकडचा गोडवा काही औरच .
  खरच महात्मा गांधींनी “खेड्याकडे चला” असा संदेश का दिला होता,त्याची पुर्ण प्रचिती येते.

  • विक्रमादित्य
   गरजा वाढवनुन मग पैसे पुरत नाही असा बाउ करण्यापेक्षा मुळात गरजाच विनाकारण वाढू दिल्या नाहित तर जिवन बरंच सोपं होतं.
   बरेच दिवस झालेत विषय मनात होता , काल लिहिणं जमलं.

 18. Pravin says:

  अगदी खरं.. आपणच गरजा वाढवून ठेवल्या आहेत. वाढवून ठेवल्या म्हणण्यापेक्षा गरज नसताना style statement च्या नावाखाली अव्वाच्या सव्वा उधळपट्टी चालू आहे. मी लहान असताना माझ्या चुलत भावाबरोबर कुठेतरी खरेदीला गेलो होतो. माझ्यापेक्षा २०-२५ वर्षांने मोठा आहे तो. पाच रुपयासाठी दुकानदार आणि भावाची घासाघीस चालू होती. शेवटी दुकानदाराने कंटाळून विचारले कि पाच रुपयात काय येतं आजकाल जे तुम्ही इतकी घासाघीस करताय. ‘व्ही.टी चं सिंगल तिकीट येतं पाच रुपयात’, भावाने शांतपणे उत्तर दिलं होतं 🙂

  • प्रविण
   अगदी खरंय.. इतकं समर्पक उत्तर फारच कमी लोकांना देता आलं असतं. अशा वेळी राग न येउ देता, किंवा लाज न वाटु देता प्रतिक्रिया देता येणं महत्वाचं असतं. तेवढं जमलं की मग काहीच प्रॉब्लेम नाही.

 19. sonalw says:

  baryach divasanni blogla bhet detey aani mahendraji tyach form madhe lihitayat…chaan watal wachun. Wichar karayla laawnaar, mage walun pahayala lawnaar as kahitari punha ekda waachayala milal. dhanyawad.
  Changalwad ha ek asa rakshas aahe ki jyala aapanach motha kelay aani aata to aaplyalach khau paahtoy.
  Riches of life Or a truelt Rich life? konala kaay haw te jyane tyane tharwaayach.

  • सध्या फार बिझी आहे कां? बरेच दिवसानंतर दिसलात ब्लॉग वर. मी शक्यतो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. कधी शक्य होतं, तर कधी शक्य होत नाही. जरी शक्य झालं नाही, तरी एक जाणिव मात्र असते, आपण चुकलो ह्याची..

 20. sonal says:

  BTW, he konata template aahe. Chaan aahe.

 21. rohan says:

  मला सुद्धा लहान असतानाचे दिवस आठवले. रे!!! अगदी हल्ली हल्लीच.. तेंव्हा सुद्धा असा चंगळवाद नव्हता. चालत शाळेत जायचो. नंतर सायकलने जायला लागलो. मध्ये बसने जायला लागलो. पण लवकरच बस सोडून चालत जायचो आणि तिकिटाचे पैसे वाचवून कधी वडापाव तर कधी नुसताच भजी-चुरा पाव खायचो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कशी मज्जा असायची.

  मी अजून सुद्धा क्रेडिटकार्ड वापरत नाही. म्हणजे नाहीच आहे माझ्याकडे ते!!!

  मध्यमवर्गीयांची कर्जबाजारू वृत्ती वाढली असे म्हणण्यापेक्षा … त्यांची कर्जबाजारू होण्याची ‘मर्यादा’ वाढली असे म्हणूया… 🙂

  सध्या मी सुद्धा त्यातलाच एक.!!!

  • मर्यादा आपली आपणच ठरवायची असते. अरे क्रेडीटकार्डाची लिमिट दोन लाख झाली म्हणुन लोकं खूश होतात.. काय बोलणार सांग?

 22. Neeraj says:

  Changalwadala karnibhoot tich lok aahet jyanni halakhit divas kadhale.Mi je haal bhogle te mazya mulanna bhogave lagu nayet ya tyanchya vruttimule yaat vadh zali. Tyat Bharis Bhar mhanun aajchya Malika kinwa picture.Malikat kinwa picture pahun porala hi tyatlya Hero pramane natave wate ani porila hi. Mag kadhi Wanted Sarkha dress tar kadhi Karina sarkha.

  • नीरज
   टिव्ही चा सहभाग पण नाकारता येत नाहीच. दिवसभर घरात पण्लग्नाला जायला तयार झाल्यासारख्या स्त्रिया वगैरे दाखवल्या की मग दुसरं काय होणार? आपल्याला मिळालं नाही, म्हणून आपण मुलांना देतो ही गोष्ट पण थोड्याफार प्रमाणात आहेच कारणीभूत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s