अरे ए महेंद्र.. अरे लवकर इकडे बघ.. मी काय म्हणते ते, अरे लवकर ये नां.. अशी हाक ऐकल्यावर काय वाटेल? एखाद्या मित्राला मैत्रिणीने मारलेली हाक असेल ही, किंवा फार तर बहीण भावाला बोलावत असेल. बरोबर ना?
एकदा तरी चूकुन तुमच्या मनात आलं की ही हाक एका बायकोने आपल्या नवऱ्याला मारलेली असेल म्हणून? किंवा बापाला मुलाने मारलेली हाक असेल म्हणून??नाही न? सहा्जीक आहे. पण ती हाक तशी पण असू शकते.
पूर्वीच्या काळी आजोबांचे आजीला बोलावणे म्हणजे धीरगंभीर आवाजात “अहो, इकडे येता का जरा?” आणि मग आजी हळूच बाहेर यायची आणि दाराशी ओठंगुन उभी रहायची. आजोबा काय काम आहे ते सांगायचे.
आजी जेंव्हा आजोबांना बोलवायची तेंव्हा पण हे असंच हाक मारणं असायचं, ” अहो, ऐकलंत का?” एकदा किंवा फार तर दोनदा दारातून विचारणार, आणि आजोबा कामात असतील तर काहीही उत्तर देणार नाहीत, आणि आजी परत आतल्या खोलीत जायची, थोड्यावेळाने पुन्हा आजोबांशी बोलायला
आजोबांनी बोलावले, की हातात असेल ते काम टाकुन ती बाहेर पडायची आजोबांनी का बोलावलं ते पहायला..भरल्या घरात गृहीणीशी सगळ्यांसमोर बोलणं हेच मुळी शक्य होत नव्हतं. कधी तरी काम असेल तेवढंच बोलणं व्हायचं. मग त्या मधेच रोमान्स शोधला जायचा.
आजकाल बरेच ठिकाणी नवऱ्याला एकेरी हाक मारण्याची पद्धत सुरु झालेली आहे.लव्ह मॅरेज असेल, किंवा बायको नवरा लग्नापूर्वी एकाच गृप मधले असतील तर तशीच सवय झालेली असते, आणि लग्नानंतर पण तीच कायम रहाते. माझ्या परिचयात काही ९६के मराठा लोकं आहेत. त्यांच्या घरी पाळण्यातल्या बाळाला पण बहुमानाने हाक मारायची पद्धत दिसली. म्हणाले, की जर आपणच मान दिला नाही, तर पुढे त्यांना पण तशीच सवय लागते.
बरेचदा असंही सांगण्यात येतं की एकेरी हाक मारल्याने जवळीक वाढते, ती कशी हे मला तरी अजुन उमगलेले नाही. उदाहरणार्थ मुलाने वडिलांना एकेरी नावाने बोलावणे – आईला बोलावतो ना? मग बाबाला का नाही? असाही युक्तीवाद केला जातो . पण जर वडिलांना जर मान देउन हाक मारली तर वडिलांसोबत ची जवळीक कमी कशी काय होते? वडीलांना बहूमानाने आम्ही जे हाक मारतो, म्हणून आमची वडीलांशी जवळीक नाही असे नाही. कुठल्यातरी एखाद्या गोष्टीची कारण मिमांसा करतांना ( जस्टीफाय करतांना) अशी कारणे दिली जातात.
वडिलांना बहुमानाने हाक मारणे ,म्हणजे त्यांचा मान ठेवणे- आणि त्यात काही गैर वाटत नाही मला तरी. मुंबईला तर नाही, पण पुण्याला मात्र वडिलांना एकेरी बोलावण्याची पध्दत बरेच घरात दिसते- कदाचित लेटेस्ट ट्रेंड ( फॅशन) असावा. असो.. प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे तो.
पुर्वी इंग्लंडला वडिलांना मुलं सर म्हणायचे . कदाचित बाहेर मान नाही, पण घरात तरी ब्रेड विनर म्हणून मान ठेवला जावा त्त्या मुळे अशी प्रथा पडली असावी.बाहेर जरी अगदी एखाद्या कंपनीत शिपाई जरी असला तरी घरी तोच माणुस बायको, मुलं आणि इतर अवलंबून असणाऱ्यांची पोटं भरणारा असतो, त्यामुळे त्याला पण दिवस भर घराबाहेर किंवा कामावर असतांना लोकांनी हिडीस-फिडीस केल्यावर घरी तरी मानाने बोलावले जावे असे जर त्याला वाटत असेल म्हणून अशी पद्धत अस्तित्वात आली असं वाचण्यात आलंय कुठेतरी.
मी स्वतः कुणाच्याही घरी सबॉर्डीनेटच्या – (बहुतेक करत नाहीच, पण जर सेल फोन लागला नाही, आणि अर्जन्सी असेल तरच )फोन करतो तेंव्हा त्याचे नाव घेउन साहेब घरी आहेत का म्हणून त्याच्या घरच्या लोकांना विचारतो. कुठल्याही परिस्थितीत त्याला त्याच्या घरच्या मंडळीं समोर अगदी फोनवर पण झापत नाही. हा नियम काटेकोर पणे पाळत आलोय गेली कित्येक वर्ष – कारण एकदा माझा एक बॉस माझ्या घरी फोन करुन बायकोवर डाफरला होता, त्यानंतर त्याला सरळ सांगितलं की नोकरी मी करतो, माझी बायको नाही, तिला फोन करुन सॉरी म्हण, आणि माझ्या समोर त्याला फोन करुन सॉरी म्हणायला लावला होता. इतकंच म्हणालो, की मी पण तुझ्या घरी तुझ्या बायकोवर चिडू शकतो, पण मी तसे करणार नाही, कारण माझ्यावर तसे संस्कार नाहीत!! माफ करा विषयांतर झाले.
तसा,मी ज्या गावात राहिलो ते गांव म्हणजे अगदीच बाळबोध वळणाचे. आईला पण वडील बोलवायचे ते अगं, ऐकलंस का?? म्हणूनच. कधीच नाव वगैरे घेउन बोलावतांना ऐकलेले नाही. फक्त आईच्या तोंडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळेस नाव घेणे हा कार्यक्रम व्हायचे, तेंव्हाच ऐकले होते. त्या मधे किती रोमॅंटिक पणा होता? आधी आढेवेढे घेणं, मग नंतर इतर काकू लोकांनी आग्रह करणे, आणि मग नंतर लाजत, आढेवेढे घेत नांव घेण व्हायचं. नांव घ्यायचं ते पद्यात… उखाण्यात!! नुसतं नांव घेतलेलं चालायचं नाही. काही काकू प्रत्येक वेळेस नवीन उखाणे वेळेवर तयार करायच्या तर काही काकूंचे उखाणे वर्षनु वर्ष ( मी ऐकले तितके दिवस तरी) तेच असायचे.
अजुनही काही उखाणे आठवताहेत लहानपणी ऐकलेले, नाव घेणे हा प्रकार आणि लग्नामधे घास खाऊ घालणे हा पण प्रकार खूप चालायचा. सगळ्या लोकांच्या समोर भर पंगती मधे नवरी मुलगी नवऱ्या मुलाला जिलबीचा घास खाऊ घालते आणि सोबतच नांव पण घेते- उखाण्यात. नवरा मुलगा पण मुलीला घास खाउ घालतो. आता यातला रोमान्स आजच्या काळात लक्षात येणार नाही किंवा जाणवणार नाही. पण पूर्वीच्या काळी जेंव्हा नवरा नवरी लहान असायचे वयाने, किंवा अरेंज्ड मॅरेज मधे जर लग्नापूर्वी फार गाठी भेटी पडल्या नसतील तर मात्र…………. असो..
लहान असतांना ,मला स्वतःला विहिणींच्या पंगतीतले उखाणे ऐकायला खूप आवडायचं. पूर्वीच्या काळी अरेंज्ड मॅरेज मधे ही गोष्ट पण खूप रोमॅंटीक वाटायची. बऱ्याच लग्नात लवंग तोडणे हा प्रकार पण व्हायचा. मुलीच्या दातात धरलेली लवंग नवऱ्या मुलाने आपल्या दातानेच तोडून खायची. पण हा प्रकार बरीच वर्ष आधी बंद झाला- मी खूप लहान असतांना एकदोन वेळेस पाहिला होता बस तेवढाच. एका परातीमधे दुध टाकुन त्यात अंगठी शोधणे हा खेळ पण होता. अशा बऱ्याच गोष्टी आता इतिहास जमा झाल्या आहेत.
अर्थात त्या काळी ज्या गोष्टी इतरांना रोमॅंटीक वाटायच्या कदाचित त्यातला रोमान्स आता संपला असेल, पण…. थोडा तरी शिल्लक असेलच नां?? मग काय हरकत आहे शोधून बघायला??
पुर्वी ऐकलेले काही उखाणे जे आजही स्मरणात आहेत ते इथे देतोय.
१) गणपतीला वाहिली दुर्वा, विठोबाला तुळस,
——- रावांचा नांव घ्यायल मला नाही बाई आळस.
२) दुधापेक्षा जास्त जपावं लागतं सायीला,
———रावांच्या साठी दूर केलं आईला.
३) जाईजुईचा वेल वृक्षावर विसावला,
——–रावांच्या सोबत जीव माझा सुखावला,
३) हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी
———-चं नांव घेते —- दिवशी.
रिकाम्या जागेत फक्त त्या दिवसाचं नांव टाकलं की झालं.
हा लेख कोणाला नांवं ठेवायला लिहिलेला नाही. फक्त आपल्या व्हॅल्युज कशा बदलताहेत हे लक्षात आलं म्हणून लिहिलं इथे.. बस.
बॉसला सॉरी म्हणायला लावलं? क्या बात है!
नाव घेणे आणि घास खाउ घालणे हे आजही होते, आणि त्यातला रोमॅण्टीकपणा आहे, मुंबई, पुण्याकडे नाही कदाचित पण मराठवाड्यातल्या छोट्या शहरात मात्र आजही आहे…
अनावश्यक पण – उखाण्याचे नॉनवेज वर्शन्स पण खुप ऐकलेत 🙂
आनंद ,
जुनं ते सोनं म्हणतो नां आपण त्यातही एक गम्मत असतेच!! ती अनुभवायची की सोडून द्यायची हे आपलं आपण ठरवायचं असतं.
chhan, waaa
मराठी मंडळांमध्ये हमखास उखाण्यांचा आग्रह अजुनही होतो आणि मग तेच अगं नाही नको म्हणताना खूप छान उखाणे ऐकलेत…पण पुर्वी दोघंही एकमेकांची नावं शक्यतो घेत नसत मग उखाणे पण दोघांनीही घ्यायला हवेत असं मलातरी वाटतं किंवा घेतही असत म्हणा…
पुर्वी नवरा बायको घरातल्या इतर लोकांसमोर बोलत देखील नसत. मग जेंव्हा काहीतरी बोलायला मिळेल तेंव्हा त्याचा पुर्ण फायदा घेतला जायचा.
उखाणे पुर्वी लग्नामधे दोघंही घ्यायची. मी पण घेतले होते नां…. अजून आठवतात. 🙂
अप्रतिम !!!
सणासुदीला एकत्र जमण, हळदी-कुंकूवाचे कार्यक्रम, फुगड्या, उखाणे घेण, जात्यावरच्या ओव्या सगळ सगळ लुप्त होत चाललय.
शहरातील मुलांना तर ह्या गोष्टी हल्ली DOWN MARKET वाटतात !!!!????
पण त्यात असणारा गोडवा मध्ये Block राहणाय़ांना कधीही नाही कळणार …..
विक्रमादित्य
आजकाल बऱ्याच जुन्या गोष्टी टाकुन देण्याची पध्दत आहे. काय म्हणणार त्यावर? प्रत्येकाचा चॉइस आहे तो. चैत्र गौरीच्या हळदीकुंकाची आम्ही जास्त वाट पहायचो ,कैरीची डाळ अन पन्हं मिळतं म्हणून.
महेंद्रकाका .. अगदी अगदी मनातलं लिहीलत .. मी जेव्हा जेव्हा वडलांना एकेरी हाक मारणारा मुलगा पाहतो तेव्हा फक्त चीडचीड होते. मी बाबाना अहो बाबा म्हणतो .. म्हणून ते मला जवळ नाहीत का .. अस काहीच नसत ..
तस आजकाल आपल्या वडीलधाऱ्यांचा कितीमान बाहेर ठेवला जातो? सरांना आपण ए सर् म्हणतो .. त्याच वयाच्या माणसाला आपण तू काय मला शिकवतो? थांब बघतो तुझ्या कडे .. चाल निघ ..अस ही रागात बोलून जातो .. तेव्हा घरातल्या कर्त्या पुरुषाचा मान घरातल्या लोकांनी ठेवावा नाही तर कुणी ?
एक वेळ नवऱ्याला बायकोने एकेरीबोलावणे कदाचित मान्य होऊ शकेल पण मुलांनी वडिलांचा मान ठेवायलाच हवा.
खरच..काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्यातून मैलाचा आनंद देऊन जातात…आमचे आजोबा माझ्या आजीला आम्ही समोर असताना मुद्दाम मुख्यमंत्री म्हणून हाक मारत असत, आणि आजी थोडीशी अवघडून किचन मधून बाहेर डोकावून डोळे मोठे करायची, अहो काय हो असा उत्तर द्यायची.त्यांच्या त्या वागण्याचा अर्थ तेव्हा बाल मनाला कळला नाही पण खरच किती छान वाटत ते दृष्य आठवला की..
उखाणे जबरी
सुहास
गेले ते दिवस.. आठवणी शिल्लक आहेत फक्त. कदाचित पुढल्या पिढीला अशा ब्लॉग मधेच हे सगळं वाचायला मिळेल!
लग्नात जाम भारी उखाणे घेतले होते मी 😛 .. ते आठवलं.
हेरंब
मजा असते रे त्यात पण. थोडी लाज वाटत असते, मित्र मंडळी ऐकताहेत म्हणुन, आणि सगळी मोठी माणसं पहाताहेत म्हणून. थोडा संकोच, थोडी लाज यामधे सार्वजनीक रित्या बायकोचे घेतलेले नांव !! 🙂
महेंद्र, आजोबांची फार आठवण आली सुरवात वाचून….. कोणाच्याही घरी फोन करून त्याच्या घरच्यांना झापणे म्हणजे अतिरेकच आहे…. बरे केलेस तू त्याला सुपर्णाची माफी मागायला लावलीस ते. ’ उखाणे ’बापरे! आमच्या लग्नात फारच धमाल आली होती. अक्षरश: अहमिकेने पंगतीत सगळे उखाणे घेत होते. ते ऐकून ऐकून ऐनवेळी मोठ्या मेहनतीने घोकलेले उखाणे मी विसरूनच गेले… 🙂 लग्नातल्या अनेक प्रथा आता बंद पडत चालल्यात ख~या पण मजा होती त्यात.
काय झालं, मी घरी पोहोचलो नव्हतो, आणि तिने मी घरी नाही असं सांगितल्यावर तो एकदम चिडला म्हणाला देड घंटा हो गया ऑफिससे निकलके घरपे कैसे नही आया?? हे सगळं वाक्य तो चिडून बोलला म्हणून जास्त बोचलं.
माझ्या लग्नात उखाणे तर वेळेवर जसे सुचले तसे घेतले होते मी. :)मजा यायची पण.
आमच्या कडे लग्नाच्या वेळेस मुलगी जेंव्हा ग्रहमूख पुजन करते, तेंव्हा तिला मुलगा बोलवायला जातो की आता तु लग्नाला चल. तेंव्हा ज्या खोलीत ती पुजा करित असते तिथे मुलाला थांबवून मुलीच्या बहिणी पैसे वसुल करतात, आणि मगच आत जाउ देतात.
पायघड्यांची पध्दत तर अजूनही आहे विदर्भात. नुकतंच एक लग्न अटेंड केलं त्यात बघितलं.
मा़झी आजी जर आजोबा खूप लांब असतील तर हाक मारताना नेहेमी माझ्या आईच्या नावाने ‘ए रंजु’ अशी हाक मारत असे आणि आजोबा बरोब्बर येत असत. त्यांचा code word होता. आता आठवलं की गंमत वाटते.
जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा गावाला गेलो तेव्हा मी अजयला सांगून ठेवले होते जर मी ‘अहो’ अशी हाक मारली तर लक्ष दे. कारण माझ्या काकांना अरे तुरे केलेले अजिबात आवडत नाही. खेड्यात, लहान गावात अजुनही एकेरी संबोधत नाहीत.
बाबांना मात्र ‘अहो बाबा’ म्हणलेल चागलं वाटत. उखाणे एकदम मस्त.
सॉरी म्हणायला लावलत, एकदम सही.
अहो अमक्याची आई म्हणूनही हाक मारायचे पुर्वी काही लोकं. तुला एक गम्मत सांगतो, माझा एक मित्र अच्युत बायकोला नेहेमी बायको म्हणुनच हाक मारायचा. त्याचा तिन वर्षाचा मुलगा , तो आणि बायको सगळे दुकानात गेले होते. बायकोचं शॉपिंग सुरु होतं, हा मुलाला कडेवर घेउन सृषटी सौंदर्य न्याहाळत होता. बायको काउंटरवर पैसे द्यायला उभी होती, हा मुलाला घेउन बाहेर निघाला, की कार जवळ जाउन थांबु म्हणुन, तर कार्टं जोरात किंचाळलं.. अहो बाबा, आपली बायको राहिली नं…. थांबा जरा…
आणि हे इतक्या जोरात ओरडला, की सगळं स्टोअर त्याच्याकडे पाहुन हसूं लागलं. तेंव्हा पासून मात्र त्याने सरळ नावाने हाक मारणे सुरु केले बायकोला.
ही ही ही, मस्त किस्सा आहे. मुलं आई बाबांची जाम पंचाईत करतात कधि कधि.
‘KAY WATTEL TE’ MADHYE AAJ UKHANYANCHI FODANI,
LEKHAK LAY BHARI – AAPLE MAHENDRA KULKARNI.
CHHAN LEKH. MAJJA AALI.
शरद,
धन्यवाद. 🙂
काका ते लवंग प्रकरण सही आहे कधी ऐकलं नव्हतं. नवीन फॅशन म्हणून सुरू केलं पाहिजे. आणि हो सगळे स्त्रियांनी घ्यायचे उखाणे झाले मुलांचे काय?
फार जुनं प्रकरण आहे ते. अरे कोंकणातंच हा प्रकार व्हायचा, असं म्हणतात, पुर्वी मुलगा आणि मुलगी लग्नाच्या वेळेस फार लहान असायचे, तेंव्हाच हा प्रकार सुरु झाला.
थोडे आमच्यासाठीपण उखाणे द्या की!!!
पोस्ट मस्त झाली आहे!!
पाण्यात पडलं की पोहोता येतं आपोआप.. काळजी करु नका. अगदी काहीच आलं नाही तर..
भाजीत भाजी मेथीची
— माझ्या प्रीतीची..
हा उखाणा ऑल टाइम ग्रेट आहेच.. 🙂
Mast Aahe
ukhane mhatale ki mala ‘Asa me Asami’ madhle awesome Ukhane athavtat….
personal Fav
“Samorchya konadyat ubhi hindamata,
Bemteravanche naav ghete, maza number pahila!”
विद्याधर
अरे हो. विसरलोच होतो.बरी आठवण करुन दिली. 🙂
उखाणे… मला आमचे लग्न आठवले… 🙂 मला आणि शमिका दोघांना उखाणे घ्यायला भारी उत्साह होता… 😀 आता त्या खादाडीवर एक फोटो सकट छोटीशी पोस्ट टाकतो … 😀
आणि हो भावाचे लग्न आहे पुढच्या महिन्यात. तेंव्हा अजून काही असतील तर दे पाठवून … 😉
अजुन आठवत नाहीत आता. पुस्तकं आणि नेट वर शोधावं लागेल ..
ajun hi aamcha ukkhane ghenyachi pddt aahe. evdhi varshe zali tari mazya aai ne ajun babac nav nahi ghetl. jun te son japnari manse he mahzya gharart pahayla miltil.
सोनाली
ब्लॉग वर स्वागत!
संस्कृती टिकुन आहे ती केवळ ह्या जुन्या लोकांच्या मुळेच. आपल्या पुढल्या पिढीला यातलं किती समजणार कोण जाणे.
mazya maitriniche vadil tichya aaila mazya maitrinichya navani hak marayche.. aani maitrinila ‘bandya’ mhanayche.. tyani hak marali ‘priyanka’ ki maitrin dhimma basleli..mhanla ka ga..uttar de ki.. tar mhane ‘mala nahi aaila bolavtaet..mala bandya mhantat..’!!!
tumhi tumchya lagnat ghtelela ukhana saga na.
अरे बापरे.. आता त्याला झाले आहेत २३ वर्ष. आधी नुसतं नांवच घेतलं होतं. पण सगळे लोक मागे लागले की उखाणा घे म्हणून. मला येत नव्हता , आणि मग कोणीतरी प्रॉम्प्ट केला – तोच घेतला होता 🙂
khup chan mala munj (Thread ceremony) ca ukhana sanga na
अनघा
ब्लॉग वर स्वागत.मौंजीचे उखाणे म्हणजे मौंजी च्या वेळेस घेण्याचे म्हणायचंय का? शोधतो मी नेट वर आणि कळवतो तुम्हाला सापडले की. मला स्वतःला तर माहीत नाहीत.
पु.ल फ़ेम उखाणा
चांदीच्या ताटात सोन्याची वाटी
चंद्रभागा झुरते गणपतरावांसाठी……….
😀
🙂 बेंबट्याचा उखाणा विसरलास वाटतं.. 🙂
मला personally नाव घेण हा प्रकार फार आवडतो…
“लवंग तोडणे हि “प्रथा मी नाही पहिली, पण अशी प्रथा असेल तर खरच त्याकाळातील मानसही romantic होती ह्यात काहीच संशय नसावा.. 🙂
छान आहे.. आपल्या संस्कृतीतल्या बराचश्या लग्नाच्या प्रथा नि पद्धत्ती interesting आहेत… 🙂
अजून एक अप्रतिम लेख वाचण्यास मिळाला.. त्याबद्दल धन्यवाद…!!! 🙂
chhan watale, junya athawanit man ramale, mi pan ase ukhane (amchyakade nav ghene )ghetlet.pratit anghati ajahi khedegawakade shodtat.
kiti bore karto,kahi kam nahi ka?