गिल्टी कॉन्शस वाढवणारा अनुभव..

शनिवारची  ( १३ मार्च)संध्याकाळची गोष्ट आहे.  आमच्या शेजारच्या मित्राच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. त्याने एक कार्यक्रम ठेवला होता एका हॉल मधे. आता कार्यक्रम सुरु होणार होता संध्याकाळी सहा च्या पुढे. कार्यक्रमाला जायचं तर एखादं   लहानसं गिफ्ट घ्यावं म्हणून आम्ही बिग बझारच्या ग्रोवेल कांदीवली ला गेलो होतो.

गर्दी नेहेमी पेक्षा बरीच कमी होती. साधारण ७-२० झाले होते संध्याकाळचे.जवळपास बिग बझार पुर्ण रिकामंच होतं. सौ. आणि मुलगी सोबत होती. दारातून आत जायचं तर नेहेमीप्रमाणे एक फॉर्मलिटी म्हणून सिक्युरिटी गार्डने अंगाभोवती ते मेटल डिटेक्टर फिरवलं. त्यातुन होणारा बिप बिप आवाज, त्याकडे दुर्लक्ष करुन आम्हाला आता सोडलं. ही फॉर्मलिटी कशासाठी बरं असते?  अशा ऍक्शन्स नी काय होणार आहे? ही अशी सिक्युरिटी  सगळ्याच मॉल मधे असते, जिचा काहीही उपयोग नसतो- नुसता टाइमपास. असो.

आत शिरल्या बरोबर एक मोठा बोर्ड “जुने द्या नवीन घ्या” लक्ष वेधून घेत होता. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही गोष्ट आठवली- जुने दिवे द्या नवीन दिवे घ्या वाली! तिकडे दुर्लक्ष करुन आत शिरलो. लवकर लवकर एखादं खेळणं घेउन बाहेर निघू असा विचार पक्का होता. तसाही कार्यक्रमाला जायला वेळ होतच होता म्हणून आम्ही सरळ खेळण्यांच्या दुकानाकडे निघालो.

तेवढ्यात मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का बसला. एका मध्यमवयीन माणसाला त्या बिग बाझार मधे काम करणारे काही मुलं एकत्र होऊन मारहाण करत होती. त्या इसमाची बायको मधे पडून नवऱ्याला मारु नका म्हणून विनवणी करत होती. मला काय करावं ते सुचत नव्हतं. सोबत सौ. आणि मुलगी पण होती. फोन काढला आणि पोलिसांना डायल करणार तेवढ्यात सौ ने हातातला फोन काढून घेतला. सोबत मुलगी आहे, तुम्ही हे काय करताय? चला लवकर इथून.. तिच्या चेहऱ्यावरची भिती दिसत होती. मुलगी पण घाबरलेली होती.

आपल्या डोळ्यादेखत एका मध्यमवयीन इसमाला मारहाण होते, आणि आपण नुसते पहात उभे रहातो ही गोष्ट मनाला खूप लागली. स्वतःच्याच कोषात बंदिस्त करुन घेतलेल्या अळी प्रमाणे आपली स्थिती झालेली आहे याची जाणीव झाली. संताप, चिडचिड, वैफल्य, सगळ्या भावना एकदम दाटून आल्या. खाली मान घालुन मी कारकडे निघालो. मनात सल होताच, आपण काही करु शकलो नाही या गोष्टीचा.एखाद्या गिर्हाइकाला दुकानात मारहाण केली जाते, आणि ती पण एका प्रोफेशनली मॅनेज्ड दुकानात ही गोष्टच मला पटली नाही. इतर जे लोकं पहात होते, त्या पैकी एकही माणूस त्या भांडणात पडला नाही.

जरी हे मान्य केलं की समजा त्या गिर्हाइकाची चुक आहे, तरीही  त्याला तीन चार काम करणाऱ्या मुलांनी एकत्र येउन मारहाण करणे हे कितपत योग्य आहे?  त्या बिग बझारचा कोणी मॅनेजर वगैरे नाही का? आणि जर असेल तर तो कुठे   होता हे  सगळं होत होतं तेंव्हा? नंतर येउन त्या कस्टमरची माफी का मागितली नाही?

या दुकानात सीसीटीव्ही चं कव्हरेज आहे. म्हणजे जे काही झालं त्याचं रेकॉर्डींग नक्की अव्हेलेबल असेलच.  जर मनात आणलं तर मॅनेजमेंट नक्कीच काहीतरी ऍक्शन घेऊ शकेल….. पण आपल्या डोळ्यादेखत एका माणसाला मारहाण होत असतांना  आपण काहीच केले नाही, हा गिल्टी कॉन्शस हा आयुष्यभर मनात बोचत राहिलंच.. आपण का गप्प बसलो म्हणून ?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , . Bookmark the permalink.

25 Responses to गिल्टी कॉन्शस वाढवणारा अनुभव..

 1. ग्रोवेल्सला असा प्रकार..असा कस करू शकतात हे लोक. स्वताच्या ग्राहकाला अशी मारहाण. काय केला होत त्याने?

 2. Veerendra says:

  फारच धक्कादायक प्रकार ऐकावलात .. असे कसे करू शकतात ते .. मनात सळ राहणे स्वाभाविक आहे. पण कित्येकदा मनाला लावून न घेणे हेच बरे असते… कारण ज्याची मदत करतो त्याला ही नंतर त्याची कदर राहतेच असे नाही न ..

  • विरेंद्र
   तो माणुस अगदी अगतिक दिसत होता . टिपिकल लोअर मिडल क्लास चा वाटत होता. कपडे आणले होते एक्स्चेंज स्किम मधे द्यायला त्याने. आणि मला वाटतं की त्यावरुनच काहीतरी असावं.

 3. Vidyadhar says:

  kaay bolav te suchat naahi!

 4. महेंद्रजी,
  प्रकरण पुर्ण माहिती नाही, त्यामुळे तुम्ही मदत करणार तरी कशी?
  जर त्या माणसाची गंभीर चुक असेल तर मदत करणाराच अडचणीत येवु शकतो…
  मॉलवाल्यांनी त्याला मारण्यापेक्षा सरळ पोलिसांकडे द्यायला हवे होते (अर्थात त्याची चुक असेल तर)…

  • जास्तित जास्त काय चुक असेल? तो माणूस जुने कपडे विकायला आला होता तिथे. काय होऊ शकतं? चोरी पण नाही करु शकत तिथे जुन्या कपड्यांची?
   आणि जर एखादा सिरियस इशु असेल तर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं त्याला , मारणे योग्य वाटत नाही.

 5. महेंद्र,
  “आपल्या डोळ्यादेखत एका मध्यमवयिन इसमाला मारहाण होते, आणि आपण नुसते पहात उभे रहातो ही गोष्ट मनाला खूप लागली” खरय तुमचं. कधी कधी मनात ईच्छा असून सुद्धा आपल्याला मध्ये पडता येत नाही. करणे अनेक. एक तर मध्यमवर्गीय माणूस हा वाघाला भिणार नाही एवढा पोलिसाला भितो. कारण त्यांचा नको करून सोडणारा ससेमिरा. शिवाय आपण मध्ये पडलो तर इतरांचा पाठींबा मिळणार नाहीच. तेव्हा बाई माणूस बरोबर असताना कशाला फंदात पडा, असा विचार. मागे एकदा मुंबईत रिक्षाने जात असताना, रिक्षाने जागा दिली नाही म्हणून सिग्नलला दोन-तीन लोक त्यांच्या ह्युंदाई मधून खाली उतरून आमच्या रिक्षा वाल्याला मारहाण करू लागले. मी मध्ये पडलो तर मलाच शिव्या देऊ लागले. सोबत बायको होती म्हणून मी गप्प बसलो. सिग्नल मिळाल्यावर रिक्षाने धूम ठोकली. अजूनही ती गोष्ट आठवली तर मन खाते.

  -निरंजन

 6. निरंजन
  खरं तर हल्ली अशा भांडणात पडणॆ टाळतोच. पण तरीही बरेचदा डोंबीवली फास्ट सारखी मनःस्थिती होते .
  लवकरच जबाबदारीचं भान येतं आणि पाय काढता घेतला जातो. नंतर मात्र खूप गिल्टी वाटतं – मला वाटतं हे तरी कमीत कमी मनाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपलं मन अगदीच दगड झालेलं नाही !!! एवढंच समाधान!

 7. खरच ‘नरो वा कुंजरोवा’ अवस्था

 8. बाप रे. खरंच काय बोलावं ते कळत नाहीये. मॉलमध्ये वगैरे मारहाण?? म्हणजे मारहाण कुठेही होऊ नये पण झोपडपट्टीत होते ती आपण गृहीत धरलेली असते.

  अजूनही त्या मॉलवाल्यांच्या विरोधात तक्रार करता येऊ शकेल का?

  • हेरंब
   अरे तक्रार करायची ज्याने मार खाल्ला त्याने. पण तो अगदी लोअर क्लासचा वाटला मला. कदाचित त्याला ठाउक पण नसावं की अशी कम्प्लेंट करता येऊ शकते म्ह्णणुन.

 9. bhaanasa says:

  महेंद्र, खरे तर निदान मोठ्या दुकानात तरी कॅमेरे बसवलेले असतातच. समजा अगदी त्याने चोरी केली असेल तरीही पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करता आले असते. बरेचदा कायदा आपल्याच हाती घेऊन सोडवण्याकडेच कल जास्ती आहे. लोकं पटकन हमरीतुमरीवर येतात. एकटा माणूस चार माणसांच्या हाती सापडला की किती केविलवाणा होऊन जातो. आपण मध्यमवर्गीय पडलो ना….. उघड्या डोळ्य़ांनी पाहू शकत नाही आणि घटनेत उडी घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्नही करू शकत नाही. मग ही अशी बोच लागून राहते.

  • मला पण नेमकं तेच म्हणायचंय. पण तो माणूस जुने कपडे विकायच्या काउटरवर होता. ( जिथे ते जुन्या वस्तु घेउन कुपन देतात त्या काउंटरवर. त्याने जुने कपडे आणले होते विकायला) म्हणजे चोरी वगैरे काही करण्याचा संबंधच नाही..
   त्या काउंटरवरचे सगळे मुलं एकत्र होऊन त्याला मारत होते .. खुप वाईट दृष्य़ होतं ते. अगदी मनावर कोरल्या गेलंय. माणुस मार खातोय, बायको त्याला मारूनका म्हणुन विनंती करते आहे असं..

 10. मध्यंतरी वृत्तपत्रात अशीच एक बातमी वाचली. मुंबई मध्ये अशाच एका मोठ्या स्टोरमध्ये एका NRI ला मारहाण झाली. तो NRI होता म्हणून मी सहानभूती दाखवत नाहीये हे वाचकांनी कृपया समजून घ्यावं. सामान स्कॅन करताना कर्मचारी मुलीने दुसरी कोणती तरी वस्तू स्कॅन केल्याने “नाही नाही” म्हणताना, गिऱ्हाइकाचा त्या मुलीच्या हाताला हात लागला. त्यामुलीने लगेच फोन करून आपल्या भावाला बोलावले. तो भाऊ येताना कोणत्यातरी सेनेच्या अजून काही पोरांना घेऊन आला. आणि त्यांनी त्या गिऱ्हाइकला बदड बदड बदडले. चूक कोणाची का असेना,कायदा हातात घेण्याचा हक्क कोणी दिला ह्या लोकांना. पूर्ण काहीही माहित नसताना फक्त मारामारी आवडते म्हणून आणि काही प्रमाणात जीवनातल्या इतर गोष्टींचा राग काढायला हि लोक कमी करत नाहीत.

  अजून असेच तिडीक येणारे प्रकार म्हणजे, जनतेच्या मालमत्तेची नासधूस करणे. बसगाड्या जाळणे वगैरे.. त्याचे जाळणाऱ्यान्ना काही नाही आणि जनतेलासुद्धा. सरकारला तर त्याहून नाही.

  • ती बातमी मी पण वाचली होती. पण त्यामधे मारामारी करणारे बाहेरचे होते. इथे स्टोअरमधले सेल्स मन्स मारायला उठले होते.किती वाईट नां? तुम्ही दुकानात शिरता, आणि दुकानतले सेल्स मन एकत्र होऊन तुम्हाला मारायला धावताहेत..
   दुकानात कोणालाही मारहाण करण्याचा अधिकार नाही कोणालाच. मी किशोर बियानी ( एमडी- बिग बझार) ला कळवलंय . त्याच्या व्हिपी चं उत्तर पण आलं की जे काही झालं त्याबद्दल क्षमस्व आणि ऍक्शन घेतो म्हणून!

 11. rohan says:

  खरच रे!!! असे काही झाले की मनाला बोचत राहते. माझे सुद्धा झाले आहे १-२ वेळा. १-२ दा मारामारी सुद्धा केलेली आहे… 🙂 पण बरेचदा आपण सुद्धा काही करू शकत नसतो. जे व्हायचे ते होते असे समजुन सोडून दे.

  • मारामारी करणं वगैरे आता नको वाटतं आणि शक्य पण नाही. उगिच चिडचीड होत रहाते. 🙂 शेवटी सोडूनच द्यावं लागतं सगळं!!

 12. आजकाल ग्राहक हेच आमचे दैवत अशी दुकानदारांची ब्रिदवाक्य कुठल्या कुठे विरुन गेली आहेत…मी सुदधा बर्याच वेळा असा गिल्टी फ़िलिंग घेतल आहे…खरच कधीतरी वाटत सगळी बंधन तोडुन…पण…

 13. prasad says:

  kaka, kharach nahi awadala ho behaviour… kahi tari karu shakala astat… Jar aapan ekhadyala help karu shakat nahi… tar aapan asha ekhadya sankatat astana… kashi ekhadya kadun madatichi apeksha karu shakto…
  Wel kunawarach sarkhi naste… Kadhi tari aaplyala hi madatichi garaj lagel.. Tevha…
  Tyaveles, kahi tari hou shakla asta ho… atleast, manager shi jari bolala astat tari zala asta kadachit..!!! Tya mansachi chuk asel / Nasel, Pan “Ka ugach bhandanat pada…??” attitude mule saglya possibilities ach samplya..!!

  • त्याची जरी चुक असेल, समजा, त्याने चोरी केली असेल तर त्याला पोलिसात द्यायला हवे होते. मी त्यांचे एम डी किशोर बियानी यांना मेल पाठवला होता. त्यांच्या असिस्टंटचे उत्तर आले माफीचे.. त्या माणसांना नौकरीवरून काढले असे त्यांनी कळवले आहे, आणि माफी पण मागितली आहे.

 14. Prasad says:

  He changla kelat…!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s