’त्याने’ पुन्हा बाजी मारली…

दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे???  अरे जागा हो लवकर !!

त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तू काहीच केलं नाहीस. काय करायचं ते ठरवता ठरवताच दोन महिने निघून गेले आणि काहीएक निर्णय घेतला नाहीस तू काय करायचं ते. सगळे आपले सैनिक बिचारे तुझ्या आदेशाची वाट पहात  होते….. अजूनही वाटच पहाताहेत.

एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का?  तुला असं वाटू देू नकोस की लोकं फक्त आपल्यालाच इ मेल्स पाठवून त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात. त्याच मेल च्या कॉपीज ’त्याला’ पण देतात.  अरे लोकांचं काय दोघांनाही इ मेल्स पाठवायचे, कोणी ना कोणीतरी काम करेलच ना..  जो  आधी काम करेल किंवा ऍक्शन घेईल  आणि त्यांचे  काम करेल  त्याचे नांव होईल, आणि तो लाइम लाईट मधे राहील. पुढल्या इलेक्शन ला पुन्हा त्यांना एक  चांगला मुद्दा मिळेल, की मराठी साठी आम्ही काय केलं ते दाखवायला!! अरे तुला जे इतके मेल्स येतात ना- त्या प्रत्येक मेल वर लवकर निर्णय घेत जा रे काही तरी, नाहीतर संपेल सगळं काही!!.

त्या “रेडीओ” साठी एक मेला आला होता  ना गेल्या आठवड्य़ात त्या कांही ब्लॉगर्सचा, की रेडीओ वर मराठी गाणी लावत नाहीत, आणि ते भैय्ये रेडीओ जॉकी पण मराठी लोकांची  टर उडवतात, पण तू त्याच्या कडे पुर्ण दुर्लक्ष केलंस, आणि ’त्याने’ बघ एकाच आठवड्यात त्या रेडीओ स्टेशन्स ला ’आवाज’ पण दिला की लवकर मराठी गाणी सुरु करा नाहीतर ………….!!!!! पेपरवाल्यांनी पण बघ लगेच बातमी बनवून छापली सुद्धा.

इथेच नेमकं तुझं चुकतंय. प्रत्येक बाबतीत तू अगदी गोगलगाईच्या चालीने निर्णय घेतोस, म्हणून सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तू जर तो मेल वाचल्याबरोबर रेडीओ स्टेशन्स ला धमकी दिली असतीस की मराठी गाणी वाजवा – म्हणून तर आज तुझं नांव पेपरला आलं असतं, पार्टीचं नांव पण मोठं झालं असतं.

तू नेमके ते फालतू इशूज (रोमपौत्र किंवा माजोर्डा खान सारखे ) काढून प्रसिध्दी मिळवायचा प्रयत्न करतोस. आणि हे असे सोपे सॉफ्ट टार्गेट्स ’त्याच्या’ साठी सोडून देतोस. ’तो’ पण शहाणा आहे, बरोबर या अशा सॉफ्ट टार्गेट्सला धमकावून स्वतःचा आणि पार्टीचा फायदा करून घेतो. या टार्गेट्सला थोडा दम भरला की लगेच वाकतात ते तुमच्यापुढे गुडघे टेकवून.. ’

आजच त्या मटा मधे बातमी आलेली आहे की ’तो’ आता सगळ्यां चॅनल्स ला पत्र पाठवणार आहे की मराठी गाणी वाजवणं सुरु करा म्हणून. जर त्याचे पत्र तुझ्या आधी गेले तर पुन्हा ही बाजी पण तो मारेल. तुझं नशीब चांगलं म्हणून पेपरवाल्यांनी पत्र देण्या पूर्वीच छापून टाकलंय पेपर मधे..आता तरी जागा हो.. रात्र वैऱ्याची आहे रे बाबा!!!!लोकांच्या इमेल्स वर काही ऍक्शन घेतली नाही, तर लोकांना संशय येतो की आपण इलेक्शन फंडाला त्या लोकांकडून पैसे घेतले असावेत म्हणून आपण त्यांच्या विरोधात काही निर्णय घेत नाही.

अजूनही वेळ गेलेली नाही, आता एक काम कर लवकर एक पत्र पाठव सगळ्या रेडीओ चॅनल्सला की ताबडतोब मराठी गाणी लावणे सुरु करा, आणि सोबतच मराठी रेडीओ जॉकीला पण ठेवा. दोन गाण्यांच्या मधे जी काही बडबड करायची आहे ती मराठीत करा म्हणाव, नाही तर …………………!!!
जय महाराष्ट्र!!  जय हिंद!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , , . Bookmark the permalink.

30 Responses to ’त्याने’ पुन्हा बाजी मारली…

 1. Sagar says:

  “त्याच मेल च्या कॉपीज ’त्याला’ पण देतात”
  “इथेच नेमकं तुझं चुकतंय. प्रत्येक बाबतीत तू अगदी गोगलगाईच्या चालीने निर्णय घेतोस, ”
  झक्कास झालाय लेख….तंबी दुराई ची आठवण येत होती……गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
  चांगली बातमी व पोस्ट वाचली नवीन वर्षाला….आता बाकी वर्ष छान जाणार बहुतेक….. 🙂

 2. Manmaujee says:

  लय भारी. . . .’तो’ पण शहाणा आहे, बरोबर या अशा सॉफ्ट टार्गेट्सला धमकावून स्वतःचा आणि पार्टीचा फायदा करून घेतो. या टार्गेट्सला थोडा दम भरला की लगेच वाकतात ते तुमच्यापुढे गुडघे टेकवून.. ’. . . हे अगदी बरोबर आहे. .

  .आजची पोस्ट पाडवा स्पेशल का????

  गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

  • आता मटा वाचला, आणि सुचलं… एक आहे ,या वरुन एक सिध्द झालं की राज इ मेल्स वाचतो तर!!

   आणि त्यावर बरोबर पाडव्याच्या दिवशी मराठी एफ एम वाहिन्यांना दम देण्याची भाषा म्हणजे, मराठी माणसाला या पुढे सगळ्या एफ एम वाहिन्यां वर मराठी गाणी ऐकता येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही!

 3. bhaanasa says:

  एका दगडाने दोन पक्षी मारायचे आणि दोघांची मजा पाहायची. कोणी न कोणी काहितरी करेलच की. हा हा…. आता अगदी तळागाळातही राजकारण भिनलेय म्हणाव. जनताही थोडाबहुत गेम खेळू…. झकास रे! एकदम छान झालाय लेख.:)

 4. दादुंचा प्रभाव सॉफ्ट टार्गेट्सवर सुध्दा पडेल की नाही, शंकाच आहे…
  लेख नेहमीप्रमाणे मस्तच!

  • आनंद
   पडेल .त्याच्यामधे तेवढा दम आहे अजून . मला वाटत नाही की हे सगळ दादूच्या मागणी कडे दुर्लक्ष करतिल म्हणुन. नुसतं आवाज जरी दिला, तरी काम होऊन जाईल.

 5. Shodha mhanaje sapadel says:

  महेंद्राजी,

  तुमच्याकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती.

  कोणत्याही राजकीय पक्षाने स्वतः एक मराठी रेडीओ सुरु केला तर हे असं भिकार्यांसारख दुसर्याकडे भिक नाही मागावी लागणार.
  वर स्वतःच्या हक्काचं एक माध्यमही मिळेल.
  उत्पन्न मिळेल ते वेगळच.

  • मला वाटतं की तुमच्या लक्षात आलेलं नाही हे पोस्ट. इथे मराठी एफ एम चॅनल सुरु करणे हा मुद्दा नाही, तर असलेल्या एफ एम चॅनल्स वर मराठी गाणी पण लावण्यात यावी अशी अपेक्षा ठेवलेली आहे. याच कामासाठी मी आणि काही इतर ब्लॉगर्स नी दोन्ही सेनांना – दोघांनाही इमेल्स पाठवले होते. पण ऍक्शन घेतली राज ने.. म्हणुन हे पोस्ट लिहिले.
   ’मराठी’ माणसाच्या राज्यात एफ एम वाले मराठी गाणी लावत नाहीत हा सरळ सरळ मराठी चा अपमान वाटला मला. असो.. प्रतिक्रिये करता आभार. आणि हो, पुढल्यावेळेस अगदी खऱ्या नावाने जरी प्रतिक्रिया दिलीत तरी हरकत नाही. मला आवडेल ते..
   धन्यवाद.

   पक्षाचं रेडीओ चॅनल असावं की नसावं या बद्दल मी काहीच लिहिलेलं नाही. रेडीओ मिर्ची म्हणुन एक पोस्ट लिहिलं होतं पुर्वी. कृपया ते वाचा म्हणजे लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते..

 6. vidyadhar says:

  काका,
  मला वाटतं की राजसाहेब हे कॉंग्रेसबरोबर छुप्या युतीत आहेत. त्यामुळे न रोमपुत्राला त्यांनी विरोध केला ना खानाला! पुन्हा तुम्ही बघाल तर शिवसेनेला दडपायला सगळा फौजफाटा उभा करणारं सरकार राजसाहेबांच्या बाबतीत सौम्य असतं. त्यामुळे असे मुद्दे राजसाहेबांनी घेतले की चानेल्स किंवा कंपन्यांना ऐकावं लागतं कारण सरकार राजसाहेबांना छुपी मदत (काहीही कारवाई नं करून) करतंच असतं (आठवा, टक्सी चे लफडे).

  • विद्याधर
   हा विचार आजपर्यंत बरेचदा पढे आलाय . पण त्यावर काही भाष्य करणं थोडं कठीण वाटतं.
   जर हे खरं असेल तर, कॉंग्रेसची गत भस्मासूरापासुन पळणाऱ्यांप्रमाणे होऊ नये हीच सदिच्छा. 🙂 त्यांच्याकडे मोहीनी पण तर नाही त्यांना वाचवायला…….

 7. मस्त तंबी दिलीय त्याने दादूला हे हे हे..खरच ही गोगलगाय पुढे करणार काय? 🙂

 8. sharad says:

  LEKH AWADALA. ASHA KARU UDDHAV YAWAR KAHITARI THOS PAUL UCHALEL MHANUN. PAN YA DOGHANCHYA BHANDANAT JASA MARATHI MANSACHA TOTA ZALA TASACH FAYDAHI HOTOY. CREDIT MILWANYACHYA GHAIT ANEK ADAKLELI KAME TARI MARGI LAGAT AHET. GUDHIPADWA AANI MARATHI NAWWARSHACHYA SHUBHECHCHA!!!

  • शरद
   तुमचा विश्वास खरा ठरलाय बराचसा..
   क्रेडीट साठी का होईना, कामं करतिल दोघंही..
   नविन वर्षाच्या शुभेच्छा.

 9. Nilesh says:

  Mahendraji,

  Nava Varshachya shubhechha. Lekh agadi sundar jamoon aala aahe.
  Ajoon hi wel geleli nahi, pan action hoil ka ha prashna aahe.

  Cheers
  Nilesh Joglekar

 10. Pushpraj says:

  काका,
  नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्या …..असेच लेख तुमच्या कडून लिहिले जावेत हीच अपेक्षा…….बाकी लेख उत्तम….

  • पुष्पराज
   नविन वर्षाच्या तुम्हाला पण शुभेच्छा.गणेशाची इच्छा असेल तर नक्कीच लिहिणं सुरु राहिल .. धन्यवाद.

 11. Veerendra says:

  वा काका .. एक दम खुसखुशीत लिहिलं आहे .. काम केल्यानेच आता कोणत्याही पक्षाचे भले होणार आहे. आणि दोघांना ही पत्र पाठवायची आयडिया आवडली ..
  नवीन वर्षाच्या शुभेच्छा .. गुढी छान दिसत आहे !

  • विरेंद्र
   अरे सकाळी ते पेपर मधे वाचलं, डॉक्टरने एक कॉमेंट टाकली, आणि म्हणून सुचल ते लिहिलं लगेच..
   गुढीची आयडीया मस्त आहे . रामनवमी पर्यंत ठेवतोय. 🙂

 12. हेमंत आठल्ये says:

  खुपंच छान. आवडल. मराठी माणसांनी मराठी माणसाची बाजू घेतल्यावर खूप छान वाटत. मला शिवसेना आणि मनसे दोघेही आपले वाटतात. दोघांनी घेतलेल्या बाजू योग्य आहेत. असो, तुमचे लेख मस्त असतात. हा तर एक नंबर झाला आहे. आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • हेमंत
   नविन वर्षाच्या शुभेच्छा.
   जर दोघांच्या भांडणात मराठीचा फायदा होत असेल तर ते पण ठिकच आहे..तरीही दोघांचे भांडण जर थांबले तर मराठीचा जास्त फायदा होईल असे वाटते.

 13. मस्तच. काका, मला वाटतं दादू आणि छोटू मधला एकमेव फरक म्हणजे टायमिंग. छोटूचं टायमिंग सचिनच्या तोडीचं असतं पण दादुचं टाईम यायला ‘टाईम्स’ उलटावी लागतील. 🙂

  • टायमींगचाच सगळा खेळ आहे. बरोबर हिंदू नववर्षाच्या दिवशी बातमी छापुन आणवली आणि मराठी माणसांना एक सुखद अनुभव दिला नविन वर्षाच्या सुरुवातीला. दोघांनाही मेल पाठवले होते, पण दादूने दुर्लक्ष केले. थोडी कार्पोरेट डिसेन्सी शिकायला हवी या लोकांना, कमीत कमी मेल मिळाला म्हणून ऍकनॉलेज तरी करायला शिकले पाहिजे यांनी.. पण ठीक आहे, जर काम होत असेल तर , सब गुनाह माफ!

 14. पोस्ट झक्कास.मध्यंतरी दक्षिण भारतात प्रवास केला. तिथं एफएमपासून टीव्हीपर्यंत आणि ऑटोपासून कारपर्यंत स्थानिक भाषेचा आग्रह होता. इंग्रजी अवतरणं होती; पण गरजेपुरती. आपण मराठीचा आग्रह क्षीण केला, ही इतिहासातील फार मोठी चूक आहे. ती दुरूस्त केली पाहिजे. संस्कृती ही भाषेच्या धाग्यानं बांधलेली असते. हे धागेच आपण उसवत गेलो आहे. पर्यायानं आणखी पन्नास वर्षांनी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल, जर आपण वेळीच पावलं उचलली नाहीत तर…मी काही ‘मनसे’नाही, पण या मुद्दयावर जरूर समर्थन करतो…!!!

  • फक्त त्यांना मेल पाठवत रहा. मागच्या वेळेस आमच्या बऱ्याच मित्रांनी मेल पाठवले होते ’दोघांना’ पण…
   शेवटी काम होणं महत्वाचं..

 15. मस्त शैली आणि झक्कास पोस्ट…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s