-च्या आयचा घो….

आजच्या टाइम्स मधे गौतम अधिकारींचा लेख वाचला. आजकाल तर हिंदूंना येता जाता टपल्या मारायची पद्धतच सुरु झालेली आहे, आणि दुर्दैवाने हे काम करणारे पण हिंदूच असतात. आपण कसे सेक्युलर आहोत हे अहमहमिकेने पटवून देण्यातच या लोकांची दमछाक होत असते.

आपण सेक्युलर आहोत हे दाखवून देण्याचा एकच साधा सोपा मार्ग आहे, आपल्याच  म्हणजे हिंदू धर्माला नांवं ठेवा, आपला धर्माभिमान अगदी चॊळामोळा करुन त्याच्या होळीमधे इतर धर्मियांची वाह वाह करा, जर एखादा माणूस तुमच्या आराध्य देवतांची विटंबना करित असेल तर त्याच्या हां मधे हां मिसळून तुम्ही पण त्याच्या बाजू घेऊन देवी देवतांना शिव्या घाला .

जर एखादा इतर धर्मीय   ( असे प्रसंग कमीच येतात)  तुमच्या धर्माच्या बाजूने बोलत असेल तर त्याची छीथू करा,आणि तो कसा चूक आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. बस्स! एवढं केलं की तुम्ही झालात सेक्युलर!!

मकबुल फिदा हुसेन! ह्या माणसाबद्दल मला व्यक्तीशः काहीच आकस नाही.   कला क्षेत्रात एखाद्या पेंटींग बद्दल पण  मला  अजिबात समजत नाही. पण एक मात्र समजत की जी स्केचेस हा हुसेन बनवतो तशी अगदी एखादा तिसरी चौथीतला  मुलगा पण बनवू शकेल, इतकी बाळबोध चित्र आहेत ती. इतकं थर्डक्लास स्केच करोडॊ रुपयात विकले जाते हेच मला मान्य नाही.  आणि या रेट मधे विकत  घेणारा माणूस नक्कीच मेंटल केस असेल असे मला वाटते.

एखाद्या पेंटींगला/स्केचला करोडॊ रुपये किम्मत दिली जाते आणि विकत घेतली जातात ती का?   हे पण मला अजिबात समजत नाही. काही दिवसापुर्वी एक लेख वाचला होता, त्यात लिहिलं होतं की टेररिस्ट फंडींग साठी पैसा मुव्हमेंट करायला अशा प्रकारे  एखादे पेंटींग विकत घेतले असे दाखवून  फंड्स ची ऑफिशिअल देवाण घेवाण केली जाऊ शकते.

पाश्चात्य देशात पण करोडो डॉलर्स मधे पेंटींग विकली जातात. पण  ती कुठे ? तर ऑक्शन मधे… त्यासाठी पेंटींग   ऑक्शन केलं जातं . एखाद्या दिवशी पेपरमधे बातमी येते की अमुक अमुक पेंटींग एक करोड रुपयांना विकलं गेलं,इथे भारतामधे ऑक्शन न करताच करोड रुपये देउन पेंटींग विकत घेतलं जातं. असं  कसे काय शक्य आहे ???  मागणी जास्त असेल तरच किम्मत वाढते. पण जर मागणी नाही तरी पण किम्मत एक करोड वगैरे कशी होऊ शकते?    घेणारा व्यक्ती एकच असेल तर मग इतकी किंमत कशी आणि का बरं  वाढते पेंटींगची??

जो लेख मी वाचला होता त्यामधे असे दिले होते की टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स पैशाची मुव्हमेंट अशा कलाकृतींच्या विक्रीतून करते.   टेररिस्ट फंडींग    कशी  करता येते   ते थोडक्यात इथे लिहीतो. एखाद्या     पेंटींगला   एक करोड दिले आणि ज्याला ( पेंटरला) पैसा मिळाला, त्याने तो   पैसा ऑफिशिअली एखाद्या एनजीओ ला दान केला.  अशा दान केलेल्या पैशावर  टॅक्स पण लागत नाही. ( आता एनजीओ म्हणजे काय आणि किती पाण्यात आहे ते आधी एकदा लिहिलेले आहेच, म्हणून पुन्हा लिहित नाही)   एनजीओ  तो पैसा सरळ फुटीरतावादी किंवा   टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सला   पुरवते . काही एनजीओ केवळ अशाच कामासाठी तयार केलेल्या असतात. अशी काहीशी मोडस ऑपरंडी वाचली होती.

नक्षलवादी चळ्वळीला पैसे देण्यासाठी आणि इतर फुटीर वादी लोकांना पैसे देण्यासाठी एनजीओ चा भरपूर उपयोग करुन घेण्यात आलेला आहे, आणि हे जेंव्हा सरकारच्या लक्षात आलं  तेंव्हा   बऱ्याच एनजीओ वर बंदी घालण्यात आली   . असो, मुळ मुद्दा हा नाही या लेखाचा. हे सगळं फक्त ओघाओघाने आलं म्हणून लिहिलंय.

हुसेन यांच्या कला कृतीबद्दल न बोललेलेच बरे. गौतम अधिकारींना का बरं वाईट वाटलं असावं?? एका ख्रिश्चन स्त्री श्रीमती हिल्डा राजा यांनी लिहिलेल्या एका ओपन पत्रामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. अहो वाईट वाटणारच, एक ख्रिश्चन स्त्री हुसेन यांच्या जाण्याबद्दल आनंद व्यक्त करते, आणि हे पाहिल्यावर ह्या सेक्युलर लोकांना दुःख होईलच. सेक्युलिरॅझम चा मुळ पाया हा हिंदु द्वेश आहे नां!

गौतमच्या लेखातला पहिलेच वाक्य बोचले.. तो म्हणतो, नेट वर जे पत्र फॉर्वर्ड होतंय ते एखाद्या ’हिंदू फॅनॅटीक’ने लिहिलेले नाही. नुसतं हिंदू लिहिलं असतं तर त्याच्या पेनाची निब कदाचित मोडली असती. हे लोकं हिंदूंना नुसतं हिंदू कधीच म्हणू शकत नाहीत- जर  एखाद्याने हिंदूंची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर तो सरळ सरळ फॅनॅटीक होतो. असं कां? ते मला तर अजीबात समजलेले नाही.

ह्या लेखात पुढे लिहिण्यापूर्वी आपण काही मुद्दे जे श्रीमती हिल्डा राजा यांच्या लेखात आहेत त्यांची उजळणी करू. पहिला मुद्दा असा आहे की हुसेनने जी चित्र काढली त्यामधे हिंदू देवीदेवतांची चित्र नग्न काढलेली आहेत. भारतमातेचे काढलेले नग्न चित्र पण वादग्रस्त आहेच. पण  त्याने काढलेली स्वतःची आई,बहीण किंवा इतर चित्र जी आहेत त्यामधे व्यवस्थित कपडे घातलेले दाखवले आहे. हे असे कां? हा पर्व्हर्ट माणूस केवळ हिंदू देवतांनाच नग्न का दाखवतो? रावणाच्या मांडीवर बसलेली नग्न सिता, आणि जटायू युध्द हे चित्र आणि अशी अनेक चित्रं आहेत.  यातलं कुठलंही चित्र पाहिलं तरीही  संताप हा येणारच . हा हुसेन मानसिक रोगी आहे असे माझे तरी मत झालेले आहे.

हिल्डाचं म्हणणं असंही आहे, की भारतातले सेक्युलर लोकं जेंव्हा सलमान रशदीच्या सॅटॅनिक व्हर्सेस वर बंदी आणली जाते, किंवा तस्लिमा नसरीन ला धमकी दिली जाते तेंव्हा का गप्प बसतात?? जशी हुसेनला फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन आहे म्हणून तुम्ही बोंबाबोंब करता तशी त्यांना ( सलमान रश्दी, किंवा तस्लिमाला) फ्रिडम नाही का? हुसेन जेंव्हा हिंदू देवतांची चित्र काढतो तेंव्हाच त्याला सेक्स्युअल ऍक्ट मधे इन्व्हऑल्व असलेली दुर्गा, किंवा गणपतीच्या डोक्यावर बसलेली नग्न पार्वती का काढावीशी वाटते?

हुसेनने फातिमाचे चित्र काढलेले आहे, ते अगदी संपुर्ण कपड्यात आहे , तिथे तिला नग्न काढायची हिम्मत का झाली नाही??  हुसेनने आपल्या आईचं चित्र काढलंय, हुसेनची बहीण पण आहे, मदर टेरेसा आहे…. या सगळ्या चित्रात कपडे घातलेले आहेत . याच वेळी नेमकी  त्याच वेळेस त्याची क्रिएटिव्हीटी  काय संपली होती का? केवळ हिंदु देवतांच्या वेळेसच चित्र काढतांना ही क्रिएटीव्हीटी जागी होते का? ही सगळी चित्र खाली दिलेली आहेत..

हिप्पोक्रॅटीक हुसेन. हिंदु देवतांना काढतांना नग्न काढतो, इतर सगळे कपडे घातलेले, माझी तर नेहेमी इच्छा होत असते की या चित्रांची नांवं बदलुन पुन्हा हुसेनलाच इ मेल करावं म्हणून.पण............!!

श्री सुरेश चिपळूणकर यांनी एके ठिकाणी लिहिलं आहे की एका इंटर्व्ह्यु मधे हा हुसेन असं म्हणतो की मी हिटलरचा द्वेश करतो, म्हणुन त्याला नग्न काढलेला आहे. म्हणजे ज्या कोणाचा हा म्हातारा द्वेश करतो त्याची नग्न चित्र काढणार.. हिंदु देवतांचा हा तिरस्कार करतो हा याचा सरळ सरळ अर्थ आहे. ही अशी  सो कॉल्ड कलेची अभिव्यक्ती दाखवणारा आणि हीन अभिरुची असलेला माणूस कतारवासी झाला यातच आम्हाला खूप समाधान आहे.

सुरेशजींच्या ब्लॉग वर त्यांनी   “रेप ऑफ इंडीया” हे चित्र आणि त्या हुसेन बद्दल  लिहिलेलं आहे ते सरळ तुम्ही त्यांच्याच ब्लॉग वर जाउन वाचू शकता. मध्यंतरी मुंबईवर कसाब आणि कंपनीने केलेल्या हल्ल्यानंतर रेप ऑफ इंडीया हे चित्र काढले हुसेनने- या चित्रामधे एका हिंदू स्त्रीला (कपाळाला कुंकू लावलेल्या) वाईट अवस्थेत  आणि गाईंना गोळ्या. मारलेल्या दाखवलेल्या आहेत. गाय हे हिंदू धर्मात पवित्र मानली जात म्हणून सिंबॉलीक हुसेनने गाय घेतली आहे- इथे पण हिंदू द्वेश दाखवलाच त्याने..

मला वाटतं की  हुसेनने काढलेल्या चित्रांचे फक्त पुन्हा नामकरण करुन ती चित्र प्रसिद्ध केली तर जास्त योग्य ठरेल, आणि त्यामधे हुसेनला पण काहीच वाटणार नाही. सीतेचं चित्र जे आहे त्याला ’हुसेनकी अम्मा’ , गंगेचं, दुर्गेचं,  जे चित्र आहे त्याला ’हुसेनकी बिबी’ आणि तत्सम नावं देऊन पुन्हा  इंटर्नेट मधे मेल फॉर्वर्ड म्हणून रिसर्क्युलेट केली तर  हुसेनने त्याला आक्षेप घेऊ नये ?? त्याने काढलेल्या चित्रांना मला हवी ती नावं देणं हे मी पण ते माझं फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन आहे असं म्हणू शकतो.

भारतातले आणि परदेशातले प्रतिष्ठित  ( सो कॉल्ड) आर्टिस्ट हुसेनला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत म्हणून त्याला पर्व्हर्ट ड्रॉइंग म्हणता येणार नाही असंही गौतम लिहितोय. (????)  आता या प्रतिष्ठित आर्टीस्टच्या व्यतिरिक्त जे आर्ट्स्ट हुसेनच्या पेंटींगला नावं ठेवतात,  प्रतिष्ठित  नाहीत, आणि त्यांची मतं काय आहेत हे गौतमने लिहिले नाही.

सरस्वती आणि दुर्गा नग्न दाखवणे हे एक आर्टिस्टीक उदाहरण आहे असं म्हणतात हे प्रतिष्ठित ( ??)  आर्टिस्ट  .  असे मानसिक रोगी समाजात मोठे सेक्युलर , आर्टीस्ट म्हणवले जातात , हे या देशाचे दुर्दैव आहे. पैगंबराची काढलेली चित्र भारतामधे प्रसिद्ध करण्यास सरकारने का बंदी घातली होती? गौ्तमचा आवाज तेंव्हा अभिव्यक्तीची गळचेपी होते म्हणून का ऐकू आला नाही?

थोडं विषयांतर. इथे मी दोन्ही चित्र हुसेनने पेंट केलेली आणि राजा रवीवर्माने पेंट केलेली पोस्ट करतोय. हुसेनने काढलेली चित्र ही अगदी दुसर्या वर्गातल्या मुलाने काढलेल्या रेखाचित्रासारखी दिसतात.  त्याचं क्रिएटिव्ह मुल्य ह्या मानसिकदृष्ट्या नपुंसक झालेल्या क्रिटीक्सला का वाटतं हे मला समजत नाही. तुम्हीच बघा, कुठली चित्र योग्य वाटतात ते.

एम एफ हुसेन आणि श्री राजा रवीवर्मा यांनी काढलेली चित्र.

श्री राजा रवीवर्मा यांनी काढलेली चित्रं अतिशय सुंदर आणि नजरेला सुख देणारी आहेत. पण हुसेनने काढलेली चित्र पहा , प्रत्येक चित्र बिभत्स स्वरुपात दाखवलंय .. त्यात खरंच काही आर्ट दिसते का  तुम्हाला? स्पेशली जी हिंदू देवतांची चित्र आहेत त्यामधे?  आणि असं अ्सतांना पण गौतम सारखे लोक त्याची भलावण करतात हे पाहिलं की वाईट वाटतं! हा हुसेन कतार वासी झालाय, स्वर्ग वासी ( त्याला तिथे जागा मिळेल असे वाटत नाही) अशी बातमी ऐकायला आवडेल…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , , . Bookmark the permalink.

107 Responses to -च्या आयचा घो….

 1. whip that fucking hussains ass. and also of those who support him. btw, its worth knowing that having a non muslim/chistian name isent a criteria of terming that person as hindu…!

  being secular is being non hindu. secularity is killing hinduism.

  • हर्षद
   ते पत्र मला पण इ मेल मधे आलं होतं. वाचल्यावर खूप बरं वाटलं आणि तेंव्हाच वाटलं की यावर लिहावं एकदा .. प्रतिक्रियेकरता आभार.

 2. १०१% टक्के सहमत महेंद्रजी…

  • आनंद
   धन्यवाद. काहीतरी करुन थांबवायला पाहिजे या चुकीच्या गोष्टींची भलावण करणाऱ्या लोकांना..

 3. vikram says:

  काका आजकाल हिंदुना शिव्या घातल्याशिवाय आपण सो कौल्ड सेक्युलर आहोत हे सिद्ध नाही होत ओ
  बाकी हुसेन बद्दल जे काही लिहिले आहे ते योग्य आहे
  या विषयावर मी ब्लॉगवर लिहनारच होतो परंतु जमले नव्हते आपण लिहिलेत तेही योग्य शब्दात आभारी आहे

  बाकी तो मेल फोरवर्ड करण्याची कल्पना आवडली
  जीवनमूल्य

  • विक्रम
   हा माणूस नेहेमीच मला विकृत मनोवृत्तीचा वाटत आलाय. एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हे याचं ब्रिद वाक्य आहे. त्या चित्रांवर त्याने जी देवांची नांव कोरली आहेत ती काढणं कठीण आहे -मला तर!.

 4. Manmaujee says:

  तो हुसेन पक्का YZ आहे. . .च्यायला त्याच्यापेक्षा २-३ मधील मूल चांगली पेंटींग करतात. . .ही असली घाण भारतात नकोच. . . ह्यांच्या ***वर लाथा घालून हुसकवल पाहिजे.

  सितेचं चित्र जे आहे त्याला ’हुसेनकी अम्मा’ , गंगेचं, दुर्गेचं, जे चित्र आहे त्याला ’हुसेनकी बिबी’ आणि तत्सम नावं देउन पुन्हा इंटर्नेट मधे मेल फॉर्वर्ड म्हणून रिसर्क्युलेट केली तर हुसेनने त्याला आक्षेप घेउ नये ?? हे करायालाच पाहिजे!!

  • फोटोशॉप मला येत नाही, नाहीतर ते पण काम मीच केलं असतं. फोटोवर लिहिलेली नांव मोडायला फोटो शॉप यायलाच हवं,नेमकं तिथेच कमी पडतो. 🙂

 5. sagar7488 says:

  Kaka
  Ya My Foot Husenchy an Tyla Support karnaryachya Aaicha Gho………………..

  • बस्स!! मला पण असंच झालं ही चित्र पाहिल्यावर, म्हणून इथे जे काही वाटलं ते लिहिलंय.

 6. Kaka, I’m really shocked after reading this post..! How dirty-minded this hussain is..?? really shame on him, ‘coz he born in our Hindusthan…! I’ll hate him afterwards… very informative post!

  • विशाल,
   बऱ्याच लोकांना (नेटीझन्सला ) पण हे माहिती नव्हतं म्हणून तर हा लेख लिहिला.

 7. ONE MORE THING: husain was born on September 17, 1915 in Pandharpur, Maharashtra, India. (via wiki)

  Hate him…!

 8. Sarika says:

  Mahendrakaka,

  Tumchya matanshi purn sahmat aahe.

  Maharashtra Times chya ravivarchya puravnit manyavaranchi tyanchya vachnabaddal chhoti mulakhat chhapun yete. Tyamadhye ‘akaran gajlela pustak?’ asa prashna asto…. tasach ‘akaran gajlelya vyakti?’ hya prashnala ‘M F Hussain’ he pahil nav aahe..

  • सारिका
   खरं आहे अगदी असे हजारो सिनेमाचे बोर्ड पेंट करणारे पेंटर्स होऊन गेलेत, त्यामधे या एकाला आपलं मार्केटींग बरोबर करता आलं , म्हणुन हा लाइमलाईट मधे आला. सुरुवात झाली ती पायत चप्पल न घालता ताज मधे गेला, आणि तिथे त्याला प्रवेश नाकारला तेंव्हा पासुन.. तो पर्यंत हा फारसा फेमस नव्हताच!

 9. मेला हा माणूस, खूप छान!

  हे वाचून किळस वाटते त्या मनुष्य प्राण्याची. Hate him a lot.

  • तिसस्कार योग्य माणूस आहे हा.. कतारवासी झाला म्हणजे मेला नाही,( दुर्दैवाने) ह्याने फक्त नागरिकत्व घेतलंय कतारचं.

 10. सचिन says:

  हे बऱ आहे.

  जोपर्यंत भारतातील कायद्याचा आधार घेवून “अभिव्यक्तीस्वात्यंत्र” जपता येईल तोपर्यंत भारतात रहायचं. पण जेंव्हा दुसरे भारतीय नागरिक कायदेशीर खटला चालवू पाहतात तेंव्हा बिनदिक्कत परदेशी पळून जायचं.
  हा यांचा कायद्याविषयीचा आदर.

  • सचिन
   आणि गेला पण कुठे ?? तर कतारला!! तिथे कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्या माणसाला? असा माणूस गेला हेच बरं झालं! फक्त काही लोकांनाच याच्या जाण्याचं दुःख झालंय!!

 11. Sagar says:

  महेन्द्रजी, हुसैन सारखी माणसे म्हणजे भारतातील किड आहे. शिवाजी महाराज असते तर असल्या लोकाना उलटे tangun मारले असते. भिकारचोट आहे तो साला आणि त्याहून ही 3rd क्लास त्याची पेंटिंग. आर्ट म्हणजे काय हे त्याला माहित नाही पण असे वागतो जसे की हा एकटाच आर्टिस्ट आहे संपूर्ण जगात. राजा रवि वर्मा च्या पायाची तर धुल पण नाही तो.

  • रविवर्मा चं कार्य कधिही खूप मोठं आहे. त्या काळी अशी देवतांची चित्र काढुन प्रिंट करुन लोकांना उपलब्ध करुन दिली आहेत त्यांनी.अतिशय उत्कृषट पेंटींग!!

 12. vidyadhar says:

  मी तर कंटाळून गेलोय त्याची भलामण ऐकून. आता त्याला अनुल्लेखाने मारणं सुद्धा चुकीचंच आहे, निषेध हा केलाच पाहिजे.
  मी सुद्धा काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं ह्याच्यावर, लिहिणार नव्हतो पण कपाळ करंट्या महाराष्ट्र टाईम्स ने “हुसैन ह्यांनी भारताचा पासपोर्ट परत केला” असला मथळा लिहिल्यावर राहवलं नव्हतं.
  असो, घाण गेली ह्यातच सगळं आलं.

  • त्याच्या बद्दल कोणालाच काही माहिती नाही. ही चित्र आजपर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिली पण नव्हती. फक्त ते भारतमातेचं चित्र लोकांना माहिती आहे.
   इथे भारतात राहुन हिंदुंच्या देवाची विटंबना करण्यापेक्षा तिकडे गेला ते बरं झाल!!

 13. सडक्या मेंदूचा आहे तो आणि त्याला अंधपणे पाठिंबा देणारे तर पूर्णच वाया गेलेले. बरं झालं की घाण कतारमध्ये गेली ते. त्याने कतारचं नागरिकत्व घेतल्याची बातमी वाचल्यावर मला खरं तर लिहायचं होतं त्याच्यावर (म्हणजे काढायची होती त्याची) पण जमलं नाही. बरं झालं तुम्ही लिहिलंत ते. आणि पेंटींग्स रिनेम करून फॉरवर्ड करण्याची कल्पना बेष्टेष्ट !!

  • मला खूप आनंद झाला त्याला कतारचं नागरिकत्व मिळालं म्हणून! 🙂 असे अनेक लोकं आहेत माझ्या यादीमधे त्यांची नांवं कतार सरकारला कळवणार आहे आता लवकरच!! की यांना पण घेउन जा म्हणून!

   • शिरीष says:

    साधारण १९९८ च्या सुमारास हुसेनचे वादग्रस्त चित्र मुंबईच्या NAG (नॅशनल आर्ट गॅलरी) मध्ये पाहिले तेव्हा वाटले की चित्रात कदाचित काय चूक नाय फक्त तो त्या चित्राला भारतमाता म्हणतो ते चुकीचे हाय!

    च्यायला ज्याला सोताहाच्या जन्माचे गूढंच कळला नाय त्याचा काय दोष तो? आणि ते त्याला कळंत असतं तर त्याने ते केलं असतं का?

    आणि आपण मोठ्याने चिडून असा काय उपयोग? त्यासाठी शिवसेना आणि मनसे आहेत की काम करायला… 🙂

 14. Maithili says:

  Poornpane sahamat………
  Hya aadhi phakt bharatmaatechach chitr paahile hote hi sagli chitre pahun tar ajunach satakali…..
  Agdi barobare tumache Maanasik rogi aahe ha manus aani tyahunahi ghrunaspad tyala pathimba denari aapalich(???) maanase……

  • विद्याधरच्या ब्लॉग वरचा लेख. कसा सुटला तेच कळत नाही.. इथेच पेस्ट करतोय. अतिशय सुंदर लिहिलाय.. जरुर वाचा.
   (http://dhost.info/vnb/blog/?p=155)
   काहीकाही घटना आणि त्यानंतर प्रतिक्रिया, मतमतांतरे आणि उत्तरक्रिया(!) ह्यामुळे उठणारी राळ मला आपल्या सहिष्णुतेचा असहिष्णुपणाने विचार करायला भाग पाडतात. मतलबी हुसैन आणि त्याच्याशी संबंधित सर्व बातम्या उपरोक्त सदरात मोडतात.

   नग्नचित्रे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे जरी मान्य केले, तरी तो आविष्कार फक्त परधर्मीयांच्या देवीदेवता आणि भारतमाता(जिला नमन करणे त्यांच्या धर्मात बसत नाही) ह्यांच्याच बाबतीत प्रकटतो ही बाब पचनी पडण्यासाठी हाडाचे कलावादी हवेत. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे ”तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे। येरागाबाळाचे नाही काम॥”. कारण ह्या परमोच्च सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कलाकाराच्या दैवी कुंचल्यातून जेव्हा इस्लामिक प्रतिमा बाहेर पडतात त्या ऊंची ‘वस्तरे’(नटरंग हॅंगओव्हर) लेवूनच. आता सौंदर्यदृष्टीचा हा कोन माझ्या चौकोनी बुद्धीच्या परिघाबाहेरचा आहे. ह्या पुण्यात्म्याचा नुकताच प्रकट झालेला कलाविष्कार ‘रेप ऑफ इंडिया‘ त्याच्या अफाट प्रतिभेची ओरडून ओरडून ग्वाही देतो. त्याचा कलाविष्काराचे स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांची कदर ह्यामध्ये समतोल साधण्यात कोणी हात धरू शकत नाही. आठवा, ‘मीनाक्षी’ चित्रपटातील ‘नूर-उन-अल्लाह‘ गाण्यावर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या आक्षेपानंतर बिनशर्त गाणे काढून टाकण्याची त्याची सामाजिक भान ठेवून केलेली कृती.

   असो. तर सध्या तमाम बुद्धिवादी, कलावादी, सौंदर्यवादी, बुटाची वादी, लेंग्याची वादी दुःखी आहेत कारण हा महान, भूलोकीचा संत (बलात्कारित)भारतमातेतील तिच्या काही अजाण लेकरांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांमुळे, तिच्या मूठभर वाद्यांच्या असतील, नसतील तेवढ्या वाद्या सोडून, कलेची कदर असणार्‍या ‘शरिया’ कायद्याने चालणार्‍या सौंदर्यवादी राज्यात चाललाय. मराठी माणसं मात्र त्याची कदर करतात. माधुरी दिक्षीत, श्रेयस तळपदे ह्यांच्यासारखे कलावंत तर त्या पुण्यात्म्याच्या गळ्यातले ताईत. त्याच्या जाण्याने ह्या सगळ्या उपरोक्त वाद्या अगदी ‘सुटल्यात’. पण दुर्दैवाने मी बटण किंवा बक्कल वापरत असल्याने माझ्या संवेदना बोथट झाल्या आहेत. जर तसं नसतं तर जेव्हा एक उपरोक्त वादी एका अग्रलेखात ‘ तस्लिमा नसरीनचा कळवळा असलेल्या हिंदुत्ववादी संघटना हुसैनसाहेबांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात.’ असं म्हणते, तेव्हा सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार आणि नग्नचित्रे ह्यामध्ये साम्य काय, असला बेअकली प्रश्न मला पडलाच नसता. आणि ‘सावरकरांच्या मार्सेलिस (खरा उच्चार मार्से) इथल्या पुतळ्याबाबत केन्द्र सरकार उदासीन’ असल्या फालतू मथळ्याने दुःखी होणार्‍या मला ‘ हुसैन यांनी भारताचा पासपोर्ट परत केला’ ह्या मथळ्याचं काहीच वाटू नये. छे, छे! माझं काही खरं नाही. आमच्यासारख्या अ-कलावाद्यांमुळे(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने आम्ही कसलीतरी वादी झालो एकदाचे) बलात्कारित भारतमाता तिचे कपडे काढणार्‍या एका सुपुत्राला मुकली. आमच्या नशीबी ‘नूर-उन-अल्लाह’ नाहीच, आम्ही ‘जहन्नुम’ च्याच लायक आहोत.

 15. विभत्स प्राणी आहे हा…साला सारी शरम कोळून प्यायलाय…
  ईमेलची कल्पना लवकरात लवकर अमलात आणली जाईल..

 16. Sudhan Kulkarni says:

  Thanks for posting this.

  To tell you Franky, i dint know about his other paintings. itka VIRODHABHAS mahitach navhata mala.
  But these facts should reach to grassroot level – People dont know about this.
  And THE Biased Media here will do every effort to not to present the real picture.
  Thanks once again.

  Cheers

  • ह्या माणसाच्या मनात इतका द्वेश आहे हिंदूंच्या बद्दल आणि तो प्रत्येक कृती मधे, पेंटींग मधे दिसून येतो.

   मिडीया खरंच खूप बायस आहे, आणि या गोष्टी ज्या ठिकाणी लिहिल्या आहेत तिकडे ( त्या साईटला) आपण भेट देत नाही.

 17. sagar says:

  महेंद्र राव मला photoshop येत हव तर मी तुम्हाला मदत करतो नाव बदलण्या साठी …………….

 18. Namaskar kaka,

  Tumchya blog mi niyamit waachat aaloi, aaj prathamach comment deto aahe.

  Hussain baddal tumhi je lihilai te ekdam kharach aahe. Ha ek haramkhor maanus aahe bara zala gela to ithun, GHAN GELI aani jyana tyachya jaanyane dukhahota tyani shudha nighun jawa aamaala aanandach waatel.

  Kaka mala he photos froward kara mi edit karun deto tumhala hawe tase.

  Santosh

 19. rohan says:

  परवाच मेल आली होती फोटोंसकट… पोस्ट मस्त परखड लिहिले आहेस नेहमीप्रमाणे. आणि हो तो कतारवासी नाही तर नरकवासी व्हायला हवा. अगदी लवकरच…

  आपल्याकडे जरा कड़क शिक्षा हव्या होत्या… 🙂 काय करणार ‘महात्मा गांधी की जय’ … !!!

  • रोहन
   अगदी खरं. इथे जर कसाब पण मस्त आराम करत बसलाय. अतिरेक्यांना बिर्याणीची पार्सल पुरवली जाताहेत.. त्या सरकारकडून अजुन काय अपेक्षा ठेवणार?

 20. sagar says:

  महेंद्र राव mail पाठवली आहे तुम्हाला नवीन नावां सकट …
  आणखीन काही काम असेल तर जरूर कळवा शुभ कार्याला वेळ नको …

 21. sahajach says:

  रोहनशी १००% सहमत… आपल्याकडे कडक शिक्षा हव्या होत्या…… एखादी व्यक्ती असे काहि वागण्याची हिम्मत करू शकते हेच मुळात बंद झाले पाहिजे…..

  • सेक्युलरीझम ची व्याख्या बदलायला हवी.हिंदू द्वेष्टा म्हणजे सेक्युलर हे चुकिचे आहे. तेच नेमकं बदललं पाहिजे..

 22. sharad says:

  ya fida husain la far warshanpurvich hakalayala hawe hote. bara zale gela to. swat hindu dharmat rahun tya dharmawarach tika karane baryach jannana awadate. hindunwar hawi tashi tika keli ki he nidharmi thartat. kalcha loksatta chya pahilya panawar chi batmi paha. BJP war kashi tika kele ahe ketkaranni. ajun hi BJP la tya babari prakarana warun shiwya ghalat asatat. pan hya fida husain war ek vakya chhapale nahi tyanni. ewadhe hounhi tyabaddal ek awaksharhi kadhle nahi kumar ketkaranni. kayam nehru gharanyachi bhopugiri karnyat dhanyata manali ahe tyanni. tumhi he sagle lihun saglyanchya manatalya santapala wat mokli karun dili. dhanyawad. apratim lekh.

  • शरद
   केवळ फिदा हुसेनच नाही तर आपले मराठी नेते ( नांव देत नाही इथे) ते पण घाबरतात. फक्त पैगंबरच्या कार्टुनचा निषेध करतात, हुसेन बद्दल असं म्हणतात की मुसलमानांनी याचा निषेध करावा म्हणून. ( पण स्वतः मात्र निषेध केला नाही) असो.. असे सेक्युलर लोकं आहेत म्हणुनच आपली वाट लागलेली आहे. बाकी काही नाही.

 23. Prasad says:

  महेंद्रजी लेख छान झाला आहे. राजा रविवर्मा व हुसैन ची एकाच विषयावरची पेंटिंग दिलीत ते खुपच छान केलेत. त्यामुले हुसैनची कला किती दर्जाची (लायकीची) आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे. ही परिस्थिती “आपल्याला काय करायाचे आहे ” ह्या वृत्तीमुले आली आहे. स्वात्र्यंत म्हणजे स्वैराचार असे ह्या so called ‘secular’ लोकांना वाटते. आपण संघटित विरोध करत नाही म्हणून ह्यांचे स्तोम माजले आहे….
  इतका सुंदर आणि माहिपूर्ण लेख लिहाल्या बद्दल धन्यवाद …..

  • राजा रविवर्माच्या पायाच्या नखाचीही सर नाही त्या हुसेनला. बरेच दिवस मनात घोळत होतं- काल योग आला लिहिण्याचा. थॅंक्स टु गौतम अधिकारी… 🙂

 24. अतुल says:

  हुसैंन साहेबांनी आपली परंपरा कायम ठेवून कतर मधील जे कुठले आराध्य दैवत असेल त्याचे नग्न चित्र काढावे. नाहितर त्यांना दांभिक म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही.

  • अतुल
   आता हे सगळं विसरावं लागेल त्याला. माधुरी दिक्षीतचं पण उघड्या पाठीचं चित्र काढायला आवडतं त्या माणसाला. हा एक नंबरचा दांभिक आहेच, इतका ढळढळीत पुरावा आहे ना आता..

 25. अशा नीच व्यक्तीची टीका करण्यास सुद्धा आठवण येऊ नये असे कधी कधी वाटते. दुर्दैव हे की अशा लोकांचे समर्थन करणारे, स्वधर्म आणि स्वसंस्कृतीचा अभिमान नसणारे हे तथाकथित “पुरोगामी” कपाळकरंटे आपल्यातच निपजतात. धि:क्कार असो अशा भोंदू लोकांचा!

  • निरंजन
   जितक्या वेळेस ही चित्र पहातो तितक्या वेळेस मला त्याच्याबद्दलचा संताप अजून वाढत जातो.
   स्वधर्म आणि संस्कृतीचा अभिमान नसलेले स्पाइनलेस किडे आहेत ते सगळे.
   हा लेख लिहुन झाल्यावर डिलिट करावा कां? असंही वाटलं होतं.. खरंच सांगतो.. 🙂 पण केली हिम्मत आणि केलं पोस्ट!!!

 26. sayali says:

  Uttam post.
  Ya M F Husain chya paintings baddal nuste aiklech hote.Pahile navate. Aaj jeva te baghitle, teva tyala support karnarya lokanna hi fatke ghalaychi iccha jhaali. Plz he post ani photos fwd kara. Aapan sarv milun yanche vaahyat dhande jaga samor aanu. Karan samanya lok nuste paper madhun arguments wachtat, mulat jaun ya manasa vishayi mahiti kadhnyat wel kon ghalwel? tumchi post asha sarwan sathi zanzanit anjan tharel.

  • सायली
   बऱ्याच लोकांनी हेच कळवलं इ मेल वरुन. खरंच हे पोस्ट लिहिल्यामुळे बऱ्याच लोकांना समजलं. या पोस्टचा मेल फॉर्वर्ड करतोय..

 27. हुसैनचा इ-मेल मलाही द्या. एखादी कविता पाठवायची इच्छा आहे.

  • माझ्याकडे पण नाही पत्ता.. तसाही मला संशयच आहे की तो इमेल वगैरे पहातो की नाही याचा.

 28. मागे एकदा सनातन वॄत्तपत्रात ह्याबाबत वाचले होते.अतिशय विक्रुत मनुष्य आहे तो.त्या नालायकाचा उल्लैख आम्ही एम वरुन @#$%^ आणि एफ़ वरुन @!#$%^ हुसैन असाच करतो….मलाही तो मेल fwd करा…खरच त्याच नुसत नाव कुठे बघीतल तरी संताप येतो…

  • देवेंद्र
   सनातन मधे नेहेमीच चांगली आर्टिकल्स असतात, पण आपण वाचत नाही त्या साईटवर जाउन ..त्याच्या नावाचीच ऍलर्जीआहे मला पण.

 29. rajeev says:

  अरे देवा ( माफ़ क रा… या अल्लाह !!!!!)
  ज्या माणसाला ” भारतरत्न मीळणार आहे , नीशाने पाकीस्तान मीळणार आ हे
  माणसा ( ? ) बद्द्ल तूला असे लीहावस तरी कसे वाटले ?
  तुमचा नीषेध…..

  तुम्ही स ग ळे हीन्दू….ए क नं ब र चे गाxxxx

  ( ही प्रतीक्रिया कोणा ची ???? )

  • राजीव
   अरे काय हे.. त्याला आता “कतार रत्न” मिळू शकेल. भारत रत्नाचा चान्स गेला त्याचा.~!!!!
   कोणाची रे प्रतिक्रिया??

   • rajeev says:

    ” सेक्युलर वाद्यांची आ णी त्यांच्या “भाई जान” लोकांची ……
    माझ्या मते … प्रगल्भ लोकशाही च्या खोडावरच ही ” सेक्युलर” बांड “गू”ळे उगवतात आणी पोसलीही ( कींवा त्यांचे संगोपन होते ?)जातात .
    सेक्युलर वादी हे हीजड्यां सारखे असतात.. काय कराय चे हे माहीत असते , पण करता येत नाही.. ह्या भxxx ना मो ठ्या गावातच बोलता
    येते…. लहान गावात बोलण्याचा ह्यांच्या xxडीत दम नसतो…

    one saying about these people…. when a do a secularist lie, when “it” mones his lips…..!!!!

 30. संजिव सिद्धुल says:

  तुम्ही पाठवलेला mail फार उशिरा पाहिला…
  पण लेख मस्त जमलाय…
  सगळे मुद्दे आलेत.
  तुम्ही एका प्रतिक्रियेत म्हंटलय, “मिडीया खरंच खूप बायस आहे, आणि या गोष्टी ज्या ठिकाणी लिहिल्या आहेत तिकडे ( त्या साईटला) आपण भेट देत नाही.” हे अगदी बरोबर आहे.
  आणि ज्या गोष्टी आपण खर्याच वाचायला हव्यात, ज्या साईट्ला विजिट्स द्यायला हव्यात अशा साईट्स बद्दल आपण आगोदरच काही तरी मनात ठेवतो आणि ते वाचत नाहि.
  अशाच एका साईट्चा url देतोय.
  http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/#poll

  इथे ह्या बेशरमाबद्दल लिहिलय. आणि ह्याच्या Rape of India (हे शब्द सुद्धा लिहिताना माझे हाथ थरथरतायत…) हे चित्र दिलय. आणि ह्या बेशरमाचं निशेध का करावं हे ही व्यवस्थित दिलयं.

  काका ते edit केलेले photos मला पण पाठवा.

  • संजीव
   माझ्या ते लक्षात आलं होतं की तू नेट वर नाहीस म्हणून. फक्त काही सुटलं का ते पहाण्यासाठी पोस्ट करण्याअधी फॉर्वर्ड केलं होतं .
   फोटॊ सगळे हिंदू जागृती वरुनच घेतले आहेत. त्यांना पण मेल टाकला होता की फोटो वापरतो आहे म्हणून.

 31. Bharati says:

  आपली ऐक म्हण आहे,काटानेच काटा काढायचा! नग्न चित्रे काढणे हा जर अभिव्यक्तिस्वातंत्राचा अविष्कार आहे हे जर हुसेनच्या बाबतीत मान्य केले जाते.तर आजही आमच्या भारतात चित्रकार कमी नाहीत.एथे जुन्यापेक्शा आजकाल त्या जुन्याचे विडंबन जास्त चालते.मग हुसेनच्या चित्रांची रिमिक्स लौकरच काढायला पाहिजे.फोटोशॉप, cओरेल्वाले कमी नाहीत.फक्त अशी चित्रे काढणारा सामान्य असेल तर त्याला पाठिंबा देणारे हात हवेत.जसे हुसेनला मिळाले.ते कमी नाहीत पण zओप्लेल्यानना अशा ब्लॉग नि जागे करायला हवे.हा ब्लॉग ,चित्रे पाहिली जावी यासाठी प्रयत्न करावेत.
  हुसेनचीच चित्रे रिमिक्स स्वरुपात उलट्याची पालटी करणे कठीण नाही.मग त्याना नावे आपल्याला हवी तशी देऊन ती फॉरवर्ड
  करायची.गटाराचे पाणी आणि भारत ही गंगा म्हणूनच नागरिकत्व मिळाले नाही!

 32. anukshre says:

  असला बेशरम माणूस पंढरपुरात जन्मला आहे. त्याची चित्रे अशीच फालतू असतात. जन्म देवगावात होऊनही हे विषच म्हणून जन्मले. पोस्टला मात्र सगळे टक्के सहमत, प्रतिक्रिया देखील जळजळीत सत्य मांडणाऱ्या आहेत. बरेच दिवस मला हे प्रंचंड चीड आणणारे ठरत आहे.

 33. Mandar says:

  आमच्या माधुरी बाई कश्या भळल्या होत्या ह्या थेरड्यावर देव जाणो, बाकी पैसे मिळतात ह्याच एका कारणसाठी तिचा भळना किवा तो म्हातारा भलला आहे म्हणून नादी लागण , लागू देणा, आपण त्याचा चित्रांची चाहती आहोत हे टीवी वर सांगण काही पटत नाही

  • काही लोकं कॉंट्रोव्हर्सी मधुन आपली इमेज सुधरवण्याचा प्रयत्न करतात . माधूरी पण त्यातलीच एक.

 34. Mandar says:

  ह्या चित्रान्चा ताबा आणि मुळ मालकी कोणाकडे आहे हे बघितला पाहिजे आणि त्यान्ची फ़ोरेन्सिक टेस्ट देखिल झाली पाहिजे, मुळ चित्र आहे त्या स्तिथित आहे कि त्यात किवा सन्गनकिया आव्रुति मधे काहि फ़ेराफ़ार केली आहे ते कि फ़क्त हिर्व्या रन्गाची आलेर्जि आणी फ़ोबिया असलेल्या लोकान्चे मनाचे खेळ आहेत. त्यात एक चित्र मुस्लिम स्त्रि म्हणुन दिला आहे ति मुस्लिम असण शक्यच नाहि कारण मुस्लिम स्त्रिया बुरखा पद्द्त वापरतात आणी केस नेहमी झाकलेले असतात हे एम.एक.हुसेन आणी बाकी लोकाना कळु नये.
  आता बाकी गोष्टी, नवनाथ सार मधे लग्न मन्दपात असलेली पार्वती बघुन ब्रम्ह देवान्च विर्य पतन झाला हे दिला आहे, हे नोन सेकुलर लोक वाचुन लगेच सेकुलर कशी होतात अशी अनेक उदाहरण देता येतील. — Mandar (एक सेक्युलर ब्राम्हण)

  • मंदार
   ह्या चित्रांना जी नांव दिलेली आहेत ती त्यानेच म्हणजे हुसेननेच दिलेली आहेत आम्ही नाहीत.

   हिरव्या रंगाची ऍलर्जी ?? अर्थात मला आहेच आणि ते पण काही मी लपवून ठेवत नाही.

   मुसलमान स्त्री हे त्या चित्राला हुसेननेच दिलेले नांव आहे. सगळ्याच मुसलमान स्त्रिया बुरखा घालत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे हुसेन आहे पंढरपुरचा, तिथे इतके कट्टर लोकं नसावेत.

   भारतमातेचे नग्न चित्र त्या बद्दल न बोललेलेच बरे.

   आपल्या धर्मात काय वाईट आहे हे शोधुन लिहिण्याचा या पोस्टचा उद्देश नाही. मी केवळ हे पोस्ट हुसेनच्या चित्रकलेच्या टेस्ट बद्दल लिहिलं आहे.

   हिंदू ब्राह्मण नग्न दाखवणे यामागची मानसिकता काय असावी बरं??

   तुम्ही स्वतःचे विचार मोकळेपणाने खऱ्या नावाने मांडले आहेत तेंव्हा ते मी नामंजूर का करावे?? तुमच्या मताचा आदरच आहे. हेच तुम्ही जर नांव न लिहिता इथे कॉमेंट टाकली असती तर कदाचित डीलिट करुन टाकली असती/
   प्रतिक्रियेकरता आभार.

 35. Mandar says:

  महेन्द आपण माझ्या पत्रिकिया अपात्र ठरवानार आहात हे आधिच माहित आहे, कारण त्याला हिम्म्त लागते आनि लोकान्ची डोकी भडकवायची असतिल तर अशी गैर सोय करुन चालत नाही , पण निदान आपल्या पर्यन्त तरी पोचाव्यात म्हणुन लिहित आहे,

  • मंदार
   तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया प्रसिध्द केलेल्या आहेत. या ब्लॉग वर फक्त पहिल्यांदा प्रतिक्रिया जेंव्हा तुम्ही देता, केवळ तेंव्हा त्याला ऍप्रुव्हल लागतं. यापुढे तुम्ही कधीही कॉमेंट लिहिलीत तरीही ती आपोआप ऍप्रुव्ह होईल,
   प्रतिक्रियेकरता आभार, पुन्हा एकदा, आणि ब्लॉग वर स्वागत.

 36. Bharati says:

  हुसेन हिंदू द्वेषता देशद्रोही आहे.त्याची संस्कृती मुसलमानांची आहे.ज्यात देव-देवतांचे अपमान,आया-बहिनींची लाज नाही राखत.पण आपल्या हिंदू संस्कृतीत या सार्‍यंचा मान राखला जातो.हुसेनचा राग त्याच्या आई, बहीण,बायकोवर काढणे नामर्द,
  आणि त्याच्याच सारख्या विचाराचे आपण आहोत असे दाखवणे ज़ाले.आपण हुसेनला जिवंतपणी जगणे मुश्कील करून त्याना देशाची माफी मागायला लावले पाहिजे.आपल्या देवतांची चित्रे प्रथम कपड्यानी साजवली पाहिजेत.नाव बदलून चित्राचे स्वरुप बदलत नाही.हुसेनचीच न्ग्न चित्रे काढून वेबवर टांगली पाहिजेत.जे भारताचा द्वेष करतात त्या मुसलमानांचा द्वेष त्या पढतीने करायचा.पण आपल्या हिंदू पदहतीने.शिवाजी महाराजानी शत्रूच्या आईए बहिणीना स्न्मानने त्यांच्या घरी सोडले होते .ही आपली संस्कृती आहे.मी माज़े मत मांडले

  • भारती
   ती चित्रं त्यानेच काढलेली आहेत आपण नाही त्यामुळे आपल्याला गिल्टी वाटण्याचे फारसे कारण नाही. गांधीवादी पध्दतीने कदाचित त्याचा निषेध बरेचदा झालाय, पण काहीच परीणाम होत नाही त्याच्यावर. शेवटी एक पुस्तक वाचलं होतं, ’फिअर इज द की’ नावाचं, त्याची आठवण झाली. त्याला भिती वाटायलाच हवी,तरच तो थांबेल.. नाहीतर असेच करित राहिल तो. भारतमातेचा रेप ही अशी चित्र काढणाऱ्या माणसाला भारतरत्न द्यायचा घाट घातला गेला होता असे ऐकतो.

 37. Mandar says:

  Thanks Mahendra

 38. bharati says:

  काय चाललय काय ? भारतमातेचा अपमान करणार्‍याणा भारतरत्न? आपण हिंदुस्तानात आहोत की…….

  हे भारत माते…त्याना माफ कर….आपण काय करतो तेच त्याना कळत नाही!

 39. Pushpraj says:

  मी ह्या विषयावर जास्त काही लिहीत नाही…कारण मी आहे सुट्टीवर…काका परीक्षेसाठी सट्टी घेतली आहे…म्हटल चला धावती भेट घ्यावी……..काहीही बोला पण दिवसातून एकदा तरी वाटत नेट वर जाऊन एकदा तुमचा ब्लॉग बघावा ….पण घरी नेट नसल्यामुळे ते शक्य होत नाही…असो पण एकदा जॉइन झाल्यावर
  ह्या विषयावर एक लेखच लिहिणार आहे शीर्षक असेल “आणि मी खान होता होता वाचलो…..”

 40. Koushal says:

  Namaskaar Mahendraji,

  Apalya lekhashi sahamat… mala watat ki apan jyanna ya sagalya goshtincha, so called secularism cha raag ahe tyanni ekatra yeun kahi tari kela pahije. Nahi tar ek divas aapan hindu ahot he mhanayachi hi chori hoil.

  Pan ek watat ki ya Hussain ni kadhaleli chitra apanach kashala pradarshit karayachi? Tumhi tumachya post madhe tya baddal lihilat, pan ti chitre takali nasati tari challa asata.

  • कौशलजी
   तुम्हाला कदाचित खोटं वाटेल की बऱ्याच म्हणजे बहुसंख्य लोकांनी ती चित्रे पाहिलेली नव्हती, त्यामुळे हुसेनचा राग तरी का करायचा हेच त्यांना समजत नव्हतं. केवळ हुसेनची हिप्पोक्रसी लोकाना कळावी म्हणून हे इथे प्रसिध्द केले आहेत.
   प्रतिक्रिये करता मनःपुर्वक आभार.

 41. shraddha says:

  ekdam perfect naav aahe post la …. kasali creativity mhanaychi hi shyaaaa

  • ह्या गौतम अधिकारींचा लेख वाचल्यावर इतका संताप आला होता की त्यावर लिहिलया शिवाय रहावलंच नाही.

 42. Bharati says:

  Mahendraji,
  have you seen The Hindu newspaper…Friday,March 26 2010
  The news on 22nd page about Husain…A 1955 untitled painting by eminent artist M.F.Husain was sold for $1,058,500,the highest price of the day!
  What a Shame!!
  I Heat!!

 43. ते गेल्यावर, “चला एक हिंदूद्वेष्टा जगातून कमी झाला ” अशी प्रतिक्रिया होती माझ्याकडे सगळ्यांची.

 44. मी दुसर्‍या कामात व्यग्र होते त्यामुळे टी.व्ही. वर नक्की काय ऐकलं हे माहित नाही पण शबाना आझमी असं बोलत असावी की खजुराहोला जी शिल्पं आहेत, त्यातसुद्धा नग्नता आहेच. शबानाचं पूर्ण विधान मी ऐकू शकले नाही त्यामुळे तिच्या बोलण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. पण इतकं नक्कीच म्हणू शकते की नग्नतेमधली सौंदर्यदृष्टी हुसेनकडे नव्हतीच. असती तर स्वत:च्या आई-बहिणीला नग्न दाखवायला त्याला हरकत होती? ही सगळी तथाकथीत सौंदर्यदृष्टी हिंदू देवतांच्या बाबतीतच जागृत होते. त्याची चित्रं लोकांनी फुकटसुद्धा विकत घेऊ नयेत या लायकीची आहेत. एकाही चित्रात धड चेहेरा नाही. म्हणून तर याला नावं लिहावी लागली. तो मेला हे बरंच झालं. याच्या चित्रांवर बंदी आणायला हवी. काय करता येईल, याचा विचार करते आहे.

  • अगदी हेच विचार माझ्याही मनात आले होते. म्हणूनच एक लेख लिहायला घेतलाय पुन्हा.

 45. Pingback: हुसेन चा मृत्यु.. | काय वाटेल ते……..

 46. santosh Kashid says:

  kaka,

  Ekdam yogya lekh aahe haa… Aksharsha shivya yetat hya mansala pahila ki… Ani apala durdaiv he ki ha Maharashtrat ani tyat hi Pandharpurat janmla… Harmakhor hota hay Ma&@#$#$#@$^# sala….

  ani kaka pls mala pan to mail fwd kara na… (Sagarne Photoshop madhe edit kelela!) Pls

  Santosh Kashid

 47. एकदम टू द पॉइन्ट पोस्ट!!!
  पण ह्याला जिवंतपणी कधी थांबवता नाही आलं आपल्या लोकांना, ह्याचं शल्य बोचतं कुठे ना कुठे ….मेल्यावर काय? आता त्याला काहीही म्हणून काहीच अर्थ नाही ….
  असो … बरं झालं जे झालं ते …

  • मला सुरुवातीपासूनच हा माणूस कधी आवडलाच नाही. ह्याला आपण जिवंतपणी थांबवू शकलो नाही हे शल्य तर नेहेमीच बोचत असतं. मग वेळोवेळी ते पोस्ट वर टाकलं जातं.

 48. tigertitan says:

  pictures speak more than thousand words.
  its depend upon viewers ,who watch world with saffron,green glasses.

  • प्रत्येकाचाच कुठला ना कुठला तरी चष्मा असतोच. कोणी डोळ्यावर झापडं पण बांधतात, आणि गप्प बसून रहातात.

 49. Prashant says:

  ज्या गोष्टी कळत नाहीत त्याबद्दल बोलू नये महेंद्रजी , hope u understand it.

 50. Mayur says:

  धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तडधत्तड .
  कोण एम.एफ. हुसेन? अमेरिकेने मारलेला अतिरेकी तर नाही ना हा?
  उलथलं एकदाचं ते विकृत म्हातारं. बरं झालं…गेलं एकदाचं ते थेरडं.
  हुसेन हा मुस्लिम होता. हा धर्म पराकोटीचा असहिष्णू आहे. त्या धर्माचे प्रेषित, अन्य आदरस्थाने यांच्याविरुद्ध चुकूनही वावगे बोलले तर जीव जाऊ शकतो.
  व्यक्तीस्वातंत्र्याचा उदो उदो करणार्‍या उच्चभ्रु वर्गातल्या काहीना खुप वाईट वाटेल.
  व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गळा काढण्याआधी हा विचार केला पाहिजे की जो धर्म स्वतःवरील टीकेबाबत अत्यंत असहिष्णू आहे त्या धर्मात जन्मलेल्या माणसाने दुसर्‍या धर्माच्या लोकांना खटकेल असे चित्र काढणे कितपत योग्य आहे?
  (अश्या वार्तांकनाबद्दल डुक्कर जमातीने निषेध व्यक्त केला आहे अशी बातमी नुकतीच हाती आली आहे)

 51. Manish says:

  Helo, the first main thing is that in our Hindu culture we dont talk rubbish about the dead. so stop firing hussain, because he is dead. The main point is why these type of people do like this. because they know that these Hindus are frogs in a well. They are happy in pulling each others legs & because of the xxxxxxx government no one can harm us. I cant explain my feelings in this way. but YATHA RAJA TATHA PRAJA! Isn’t it Mr. Mahendraji.

  • मनिष
   ते आर्टीकल हुसेनच्या मृत्युपुर्वी लिहिले होते.
   तरी पण, जरी तो आता मेला असला, तरीही त्याने जे काही करून ठेवले आहे त्याबद्दल त्याची नालस्ती झालीच पाहिजे असे वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s