चित्रकला स्पर्धा

मित्रांनो.
ह्या चित्रकला ( चित्राचे सौंदर्यीकरण ) स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! मला काल बऱ्याच ग्राफिक डिझायनर्स चे इमेल्स आलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही चित्रं व्यवस्थित करण्याच्या पलीकडचं आहेत.  या चित्रांना रंगवणे किंवा सुशोभित करणे हे शक्य नाही हे पण त्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे.
वरील कारणामुळे ही स्पर्धा सध्या  मागे घेण्याचे ठरवले आहे.

या स्पर्धेच्या संदर्भात लिहिलेले पोस्ट पण डीलिट करीत आहे.  या इव्हेंटसाठी तुम्ही सगळ्यांनी जो उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला होता, विजेट लावणे, आणि प्रसिद्धी साठी, त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
तसदी बद्दल क्षमस्व.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

20 Responses to चित्रकला स्पर्धा

 1. ओह नो…. का ???? 😦

  • हेरंब
   एका एक्स्पर्ट ग्राफिक डिझायनरचं म्हणणं असंही पडलं की या परिस्थितीत तीचित्र दुरुस्त केली जाउच शकत नाहीत. आणि जर करण्याचा प्रयत्न केला तर अजून जास्त विटंबना होऊ शकते.
   माझ्या कडून विटंबनेला हातभार लागू नये अशी मनापासून इच्छा आहे, म्हणून स्पर्धा मागे घेतली

 2. रोहन says:

  आत्ता तिकडे कमेंट टाकणार तर पोस्ट गायब 😦

  अरे स्पर्धा मागे घेतली तर आता हुसेनचे कपडे काढा स्पर्धा होउन जावू दे… 🙂 किंवा आपण हुसेनची चित्रे काढुया की… 🙂

 3. सुरेश पेठे says:

  महेंद्र जी,
  काल आपण फोन वर बोललो, व माझ्या मनात एक विचार चक्र सुरू झाले आहे हे खरे ! स्पर्धा जरी मागे घेतली असली तरी बघुया काय करता येईल ते .

  बाकी दुसऱ्याचे कपडे उतरावयाची ” स्पर्धा ” ही आपल्या संस्कृतीत बसणारी नाही ! आणि ज्याने नागवे व्हायचे ठरवले असेल त्याला आपण अजून काय नागवे करणार ?

  आंतरराष्ट्रीय कायद्यात अशी काही तरतूद आहे का ह्याचा कायदेतज्ञांनी अभ्यास करून ह्या नागव्यावर कतार मध्ये काही खटला लावता येतो का हे पाहिले पाह्यजे !

  • शिरीष says:

   साधारण १.५ वर्षापूर्वीच भारत सं. नि. लि. ने “कृपया प्रतिक्षा किजिये। आप कतार में है।” असे सांगणे बंद करून टाकलेय.. तेव्हा आता कशाला पुन्हा तोच घोळ…

 4. Aparna says:

  you should have still kept the post and mentioned below it about the cancellation (and still have this post)….aare ikade amhi changale promote karat hoto tya lokana nidan ti link kai hoti he tari kalala asta….anyway…………….

 5. salilchaudhary says:

  MK , spardha mage ghenyachi kharach garaj navti.

  aapalyakade itke creative lok ahet ki tyaani kay kay shakla ladhavun ti chitre rangavli asati yachi apan kalpna pan nahi karu shakat.

  atleast ek attempt tar nakkich karta ala asata
  😦

  • मला एक मेल आला होता रघु ( साउथ इंडीयन आहे हा) . त्याचे म्हणणे असे होते, आणि ते मला पटले सुध्दा म्हणुन ती कॉंपीटिशन विथड्रॉ केली .

   १) लक्श्मी चे चित्र जे आहे त्यामधे गणपती च्या डोक्यावर तीला बसवलेले आहे. जर तीला कपडे घालण्याचा प्रयत्न केला तर गणपतीची प्रतिमा कव्हर करावी लागेल, किंवा मिटवावी लागेल जे योग्य नाही. त्यामधे तीचा पाय गणपतीच्या पाठीवर आहे तो काढला जाउ शकत नाही.
   २) दुर्गादेवीचे चित्र पाठमोरे आहे. चेहेरा अजिबात दिसत नाही. त्यामुळे तिचे चित्र व्यवस्थित केले जाउ शकत नाही.
   ३) भारतमातेचे चित्र व्यवस्थित केले जाउ शकते.
   ४) पार्वतीचे चित्र थोडे दुरुस्त केले जाउ शकेल.
   ५)द्रौपदीचे आणि सितेचे चित्र दुरुस्त केले जाउच शकत नाही. द्रौपदीचे चित्र आउट ऑफ प्रपोर्शन आहे.

   या सगळ्या चित्रांना दुरुस्त करतांना ते जास्त विद्रूप होण्याची शक्यता आहे म्हणून हे योग्य नाही असे मला वाटले.

   नंतर पुढे दुसरं काहीतरी करु या.

 6. Manmaujee says:

  अरेरे… सलील म्हणतोय त्याप्रमाणे आपण एक प्रयत्न करायला हवा होता…. जर ती व्यवस्थित रंगवलेली नसतील तर ती आपण पब्लिश केली नसती. ठीक आहे!!!.

  • तो रघुचा मेल वर लिहिलाय. मला पटला तो.. आपणही उगिच त्या चित्रांची जास्त विटंबना होऊ नये असे माझे वडील ( वय ८४) म्हणाले, त्यांचा पण मान राखणे आवश्यक वाटले मला.

 7. फटकारण्याचे अनेक प्रकार असतात. काही वेळा एखाद्याला अनुल्लेखानेच मारायचे असते… हे न विसरावे.

  कोणत्या हुसेनबद्दला बोलताय ते काही ह्या पोस्टवरून लक्षात येत नाही.

  जमल्यास त्या हुसेनचे एखादे चांगले (होय चांगलेच) छायाचित्र पोस्ट करा म्हणजे नक्की व्यक्ती कळू शकेल…

  • आजच आनंदवनात जाउन आलोय. मस्त मुड आहे. त्यामुळे त्याची फारशी आठवण झालीच नाही आज. 🙂 एक मस्त पैकी पोस्ट लिहिणार आहे आनंदवनावर रविवारी.भरपूर चित्रं, व्हिडीओज बरंच काही आहे.

 8. काय हे काका.. आम्ही लोक जाहिरात करत होतो त्या स्पर्धेची (ब्लॉग-पोस्टची), तुम्ही तीच उडवलीत.. असो, त्यामागची अडचण कळाली. ह्म्म, पण ती “हुसेनचे कपडे काढा” स्पर्धा झाली तर चांगलंच होईल.. हाय ना! 😉

 9. vidyadhar says:

  अरेरे,
  मी कालच माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा जाहिरातबाजी सुरु केली होती. असो. कल्पना भारीच होती….

 10. दोन दिवस नेट वर आलो नाही, तुमची पोस्ट त्याच दिवशी फॉर्वर्ड केली होती माझ्या दोन आर्टिस्ट लोकाना..त्यांचा पण हाच रिप्लाइ आलाय..असो. बघूया अजुन काय करता येईल ते..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s