एक कथा- ४

रोहन आपण समुद्रावर जाउ या का?
व्हाय नॉट? शुअर.. चालेल मला. दोघंही बँडस्टँडला पोहोचले. दाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथे फिरत होता. आजुबाजुला कुठेही नजर गेली, तरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलं दिसत होतंएक वेळ तुम्हाला जर पहायची लाज वाटत असेल, तर तुम्ही डॊळॆ बंद करा, अशी प्रवृत्ती दिसुन येत होती बसलेल्यांची.ह्या भैय्या लोकांना बरोबर समजतं की कोणासमोर जाऊन उभं रहावं ते, अगदी रंगात आलेल्या जोडप्यासमोर उभं राहून तेसिंग चाहिए क्या?’म्हणुन विचारतात.. आणि मग नंतर ते कपल, लवकर जा रे बाबा, म्हणुन नको असतांना पण दाणे विकत घेते.

गेले दोन दिवस रोहन घरात होता, तरीही रीना त्याच्याशी काहीच बोलली नव्हतीम्हणजे तसा वेळच मिळाला नव्हता. प्रत्येक वेळेस रोहन कडे दुर्लक्ष करुनच रीना निघून गेली होती. एका खडकावर जाउन बसण्यापेक्षा त्यांनी किनाऱ्यापासून थोडं जवळंच बसणं पसंत केलं. तेवढ्यात रीना ची मैत्रीण साशा तिच्या बॉय फ्रेंड बरोबर आली. रीना ला तिथे बसलेली बसून ती एकदम चमकलीच. पण सोबत रोहन ला बघून मात्र एकदम म्हणाली

’काय गं रीनानेहेमी म्हणतेस ना की माझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे नाही म्हणून’, मग आता हा तो कोण ?’ हॅंड्सम आहे बरं कां , एकदम मॅनली, आवडला बरं का मला पण. रीना कांही बोलण्याच्या आताच ती आपल्या बॉय फ्रेंडला म्हणाली.. ही रीना आहे नां, एक नंबरची काकू बाई आहे. नेहेमी सांगते की ती कधीच अफेअर वगैरे करणार नाही. किंवा कोणी बॉय फ्रेंड वगैरे पण नाही तिचा. तिचे मित्र मैत्रिणी आहेत बरेच. अरे गृपमधे पण असून नसल्यासारखीच असते बरं कां. ’ ओके रिना, एंजॉय युवरसेल्फ ,मी निघते गं.

रोहनला कल्चरल डिफरन्स चा शॉक तर कालच मिळाला होता. तिच्या रात्री उशिरा येण्याच्या धक्क्या पेक्षा तिच्या बद्दल साशा ने जे बोलली त्याचा धक्का खूप जास्त बसला होता रोहनला. त्याला वाटत होतं की रीना ही अतीशय फॉर्वर्ड हाय फाय टाइपची मुलगी आहे. पण साशाच्या कॉमेंटमुळे हे लक्षात आलं की रीना अगदी डाउन टु अर्थ मुलगी आहे. केवळ फॅशनेबल कपडे घालते किंवा मोठया शहरात रहाते म्हणुन रीना वाईट ठरु शकत नाही.—-आणि त्याला उगिच बरं वाटलं..

रोहन म्हणाला, अगं ती वाईट काय बोलली तुला? ती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल?? पण रीनाचं रडणं काही थांबत नव्हतं. रीना चे डोळे पुसायला आपला हातरुमाल पुढे केला रोहनने. बराच वेळ गुडघ्यात मान घालून बसली होती ती.

रोहनने विषय बदलायचा म्हणून तिच्याशी गप्पा मारणं सुरु केलं. काल रात्री उशिरा घरी आल्यामुळे आई जे रागावली, आणि काल पासून मनाला बोचत असलेला तो गौरव एपीसोड बद्दल जो पर्यंत रोहनला आपण खरं काय ते सांगत नाही तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती.

रोहनला पण कालपासून हाच प्रश्न सतावत होता की ती का रडत होती?? शेवटी मनाचा हिय्या करून त्याने विचारलेच, ’ काल रात्री काय झाले होतेका रडत होतीस तू?” एवढं विचारायचीच देर, की रीना जी रडायची थांबली होती ती पुन्हा एकदा रडू लागली. रोहनला काय करावं ते कळंत नव्हतं. शेवटी त्याने हिम्मत करून तिच्या खांद्यावर हात ठेउन तिचे सांत्वन केले. तरीपण तिचे रडणे काही कमी होत नव्हते.

शेवटी बऱ्याच वेळा नंतर रीना शांत झाली आणि तिने गौरव बद्दल तिला वाटणारं अट्रॅक्शन , त्त्यानंतर च्या कालच्या बिहेविअर बद्दल सांगितलं, आणि उशिर का झाला हे पण सांगितलं. रोहन म्हणाला, ’इतकी काळजी करण्यासारखं नाही ते. असं होतंच असतं या वयात.’ एखाद्या मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटणं सहाजीक आहे.त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.

रोहन म्हणाला, तुला आठवतं कां? लहान असतांना पण खेळतांना भांडणं झाली की तू अशीच रडायचीस माझ्या जवळ येऊन.. रीना ने वर पाहिलं.. डोळ्यातुन निघालेल्या अश्रूंमुळे चेहेरा खूप उतरल्या सारखा दिसत होता, पण लहानपणीच्या आठवणीने हसूं आलं चेहेऱ्यावर.

भैय्यासाहेब जोशी आणि राजशेखर चितळे बाल मित्र असल्यामुळे मुलांची म्हणजे रीना आणि रोहन वगैरे ची भेट लहानपणी नेहेमीच होत होती. राजशेखर यांचे आई वडील जिवंत असतांना अगदी नित्य नेमाने ते कोंकणात जायचे. रोहन, रीना, शितल हे सगळे  अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेले. एकमेकांशी असलेली ओळख आणि त्यामुळे असलेला संबंधातला सहजपणा होता. रीना आणि शितल शहरात रहाणाऱ्या, म्हणून त्यांच्या वागण्याबोलण्यात थोडा जास्त स्मार्टनेस होता. रोहन नेहेमीच रिसिव्हींग एंडलाच असायचा.जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवुन हसु फुटलं ्दोघांनाही..

रीना चमकली, आणि तिने रोहनच्या डोळ्यात बघीतलं. नजरेला नजर मिळाली.. आणि तिला त्याच्या नजरेतला सच्चे पणा लक्षात आला. रोहनच्या पण बोलताच लक्षात आलं की तिला काय म्हणायचंय ते –की त्याचा गैरसमज झालाय? रीनाला अजूनही नक्की समजलं नव्हतं की काय होतंय ते.

थोड्यावेळाने तिथुन उठुन दोघेही परत निघाले घरी जायला. जाता जाता रोहनला घेऊन ती मित्रांकडे गेली होती. मित्रांच्या गृपमधे थोडावेळ थांबून परत ती दोघंही घरी पोहोचली.गृपच्या मुलांना तिने रोहन हा बालमित्र म्हणून ओळख करुन दिली , जेंव्हा सगळ्यामित्रांना तो कोंकणातून एका लहानशा गावातून आलाय हे लक्षात आल्यावर मात्र त्याच्याकडे दुर्लक्षंच करणे पसंत केले. जेंव्हा रोहनला अव्हाइड केलं जात आहे हे लक्षात आले, तेंव्हा तिने पण लवकरच काढता पाय घेतला आणि दोघंही घरी आले.

रोहनचा मुक्काम दोन दिवस वाढला होता. आता उद्याच्या दिवस घरी काढला की मग परवा मेडीकल टेस्ट.. आणि मग झालं!!!
*******************************
लेले परत मुंबईला पोहोचले होते. रात्रीचे दहा वाजले होते. रोहन शेजारी चितळेंच्या घरी आहे , हे त्यांना माहिती होतेच, त्याला उद्या घरी बोलावायचे जेवायला.. हे त्यांनी पक्के केले होते. चितळेंच्या घरी फोन केला ( शेजारी घर असून सुध्दा) आणि रोहनला दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे निमंत्रण दिले. रोहन ने नाही म्हणण्याचा बराच प्रयत्न केला, पण लेलेंनी फारच आग्रह केला म्हणून हो म्हंटले.

दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवणाचे नक्की झाले. वेळ होती एक वाजताचीशितल ला पण आधिच सांगितले रोहन बद्दल- आणि त्याच्या वडिलांशी झालेल्या बोलण्याबद्दल. हे पण सांगितलं की रोहनला हे ठाउक नाही.  शितल आणि रोहनची भेट घालून द्यावी आणि मग बघावं काय होतं ते.. असा विचार केला होता लेलेंनी.

घरी शितलला आधीपासुन सांगितलं  रोहन बद्दल  त्यांनी त्यांचं झालेलं बोलणं  .तू रोहनला बघ, आणि मग नंतरच काय तो निर्णय घे. अगं रोहनसारखा मुलगा तुला शोधुन पण सापडणार नाही. तुझं एम एस वगैरे बाजुला ठेव आणि थंड डॊक्याने विचार कर की तुला काय हवंय ते!! शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा!! तरीपण रोहन जेंव्हा उद्या दुपारी घरी येईल तेंव्हा घरी रहायचं कबूल केलं तिने,. त्याला भेटु आणि नंतर मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.

**********************************

सकाळी ्रोहन  उठून  तयार झाला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर जाउन बसला . रीना पण आधीपासूनच येउन बसली होती. रोहन कडे तिने पाहिले, आणि  लक्षात आलं की रोहन  आज टेन्शनफ्री बर्ड सारखा प्रफुल्लीत दिसत होता. हलकेच हसली ती त्याच्याकडे बघुन.चितळेंनी विचारले की इंटरव्ह्यु कसा झाला?

रोहन म्हणाला, की इंटरव्ह्यु छान  झालाय, आणि परवा मेडीकल आहे . त्या मुळे इथला मुक्का एक दिवस वाढ्वावा लागतोय. हे पण सांगितलं की लेलेंचा फोन आला होता , आणि त्यांनी पण आज जेवायला  बोलावलंय दुपारी.   चितळेंना आश्चर्य वाटले, पण त्यांनी ते दिसू दिले नाही चेहेऱ्यावर. पण तू रहाणार घरीच बरं कां.. आणि ही ऑर्डर समज हवं तर.. !

***********************************

रोहन दुपारी लेलेंच्या घरी गेला. शितल पण त्याला बघुन खुप खूष झाली. बा्लपणीचा मित्र भेटल्यावर आनंद होणारच.. रोहनला पण शितलचा मोकळा स्वभाव खूप आवडला. शितल चा सेन्स ऑफ ह्युमर खुपच स्ट्रॉंग होता. अगदी लहान गोष्टींवार पण ती   जोक्स क्रॅक करीत होती. रोहन मनातल्या   ,मनात रीना आणि शितलची कम्पॅरिझन करू लागला.

शितल चा मनमोकळा स्वभाव पण त्याला आवडून गेला होता, पण रीनाचा डाउनटुअर्थ टाईपचे कॅरेक्टर पण  मनाला भिडले, रीना दिसते टफ, पण आहे अगदी  मऊ.. मुलायम स्वभावाची. उगिच स्वतःला टफ दाखवायचा प्रयत्न करते , हे त्याच्या लक्षात आलं होतं. काल तर पुन्हा हा पण संशय येत होता की तिला पण आपण  आवडतो की काय? तीची कालची बॅंडस्टॅंड वरुन उठल्यानंतरची देह बोली एकदम वेगळी झालेली होती.

रोहन बरोबर  दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं होतं रीना ने. ती शितल कडे गेली , रोहनला बोलवायला. शितल आणि रोहन सोफ्यावर बसून गपा मारीत होते. रीना पण समोर बसली .शितलचे मनमोकळे वागणे तिला आज आवडत नव्हते. रोहनशी बोलतांना टाळी दे म्हणून तिने साधा हात जरी रोहन समोर केला , तरीही ती अस्वस्थ होत होती. ….

शितलला पण रोहनमधे इंटरेस्ट डेव्हलप होत होता. कॅल्क्युलेटीव्ह रिस्क म्हणजे रोहनशी लग्न हे तिच्या पक्कं लक्षात आलं होतं. हो म्हणायला हरकत ना्ही…….

*************************************

या पुढचा शेवटचा भाग मी दोन दिवसांच्या नंतर लिहिन, ( मी पण अजून तो ठरवलेला नाही- ्सगळे एंड्स लुझ आहेत ) पण तुम्हाला कथेचा शेवट कसा व्हावासा वाटतो?या कथेचा पुढचा भाग तुम्ही कॉमेंट्स मधे लिहा एकाच कथेचे वेगवेगळे शेवट वाचायला मजा येइल. तर करा सुरु लिहिणं शेवटचा भाग!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

31 Responses to एक कथा- ४

 1. रोहन says:

  मला वाटतय की अजून एक भाग मग शेवट व्हावा. कारण शीतल आणि रोहनचे लग्न व्हायचे असेल तर अजून काही ट्विस्ट येणे आवश्यक आहेत. रीना आणि रोहन चे जमणार असेल तर ………. ज़रा अजून विचार करू दे… 🙂

  • रोहन मला वाटलं की या पुढच्या भागात माझा स्टॅंड मला क्लिअर करावा लागेल, कदाचित पुढल्या भागात रोहन कोणाशी लग्न करतो हे माझ्या लिखाणातुन स्पष्ट होईल. पण ठिक आहे. एक भाग अजून टाकतो नंतरच्या भागात शेवट करतो.

 2. हो कथा वाढवा अजुन, पुढच्या भागात शेवट थोडा घाईत होईल…
  आम्हाला पण मज्जा येईल वाचायला आणि तिघानमधली अस्व्यस्थता मला पण अस्वस्थ करतेय…मस्त 🙂

  • सुहास,
   मला असं वाटत होतं की फार रेंगाळते आहे कां कथा . पण अजून दोन भाग सहज लिहिले जाऊ शकतात. पुढला भाग उद्या लिहितो, आणि नंतर शेवटचा भाग …!

 3. कथेने खरच मस्त वळण घेतलय आता, एक भाग वाढवून न्याय द्या तिला.
  आणि हो मला तर बा तुम्ही केलेल्या शेवटाचीच खूप उत्सुकता आहे.

 4. Sagar says:

  रोहन ,सुहास ,सोनाली यांना अनुमोदन….इ तर मागच्या पोस्टला पण हेच म्हटल होत…. 🙂

 5. सचिन says:

  हो काका, एजुन एक भाग टाका. म्हणजे नक्की शितल-रोहन चे काय होतेय ते जरा सांगा म्हणजे जरा शेवट करायला चांगले होइल.

 6. solid lihile ahe,

  Maja yetey wachayala

  pan jast pani ghalun wadhau naka plz je wattay tech ani tevhadhach liha fakt

 7. Bharati says:

  महेंद्र्जी,
  कथेला अजुन भाग हवेत असे मलाही वाटते .रिनाला रोहन प्रथम भेटला आहे.बालपणीची निरागस भेट वेगळी होती पण तारुण्यात्तला पहिला सहवास आणि वाईएत संगतीत राहूनही आपले स्वत्व जपणारी रिना, रोहनच्या मनाला भावली आहे.शीतलला तारुण्यातील रोहनचा सहवास कमीच लाभला आहे.तिच्यात जेलसीवृत्तीने अजुन प्रवेश केला नाही पण रिनामधे तो zआला आहे.प्रेम ज़ाले !पण सहजासहजी मिळते ते प्रेम कुठले? गोष्टीचा भाग वाढला पाहिजे.कथा अजुन उत्कंठावर्धक होऊ द्यावी.भाग स्ंपवायची घाई करू नये.आता कुठे कथेला रंग चढत आहे.कथेत कविता,आणि भावनांचे रंग भरावे असे वाटते.मराठी एम. ए.आहे रोहन त्याची कला दिसली पाहिजे.

 8. Mahendraji,

  majhi adhichi comment parat gheto ahe tyaweli mi fakt 4th part wachala hota

  ata sampurna katha wachali

  kamit kami 10-15 bhag zalyashiway hya kathela ani saglya patranna nyay milen asa watat nahiye

  Rohanchi naukari kasali ahe tyababtit kay thartay
  ani tighanche swabhaw wagaire

  baryapaiki masala ahe ajun kathet so carry on

 9. bhaanasa says:

  महेंद्र, आता कसे सगळीकडे कथेचे पारडे फिरवता येईल. 🙂

 10. vidyadhar says:

  काका,
  कादंबरी मटेरियल आहे हे…नंतर तुम्ही एकसपांड करून कादंबरी लिहू शकता…
  पण आता उत्सुकता खूपच वाढलीये…लवकर येऊ द्या…..

  • विद्याधर
   धन्यवाद. आधीवाटलं होतं की लोकं काहीतरी करुन कथा फिरवतील, पण कोणीच काही न लिहिल्याने मी स्वतःचा शेवट करुन टाकला.

 11. पण आजुन एक गोष्ट क्लिअर होत नाही आहे की एम ए मराठी झालेला रोहन ताज मध्ये काय काम करणार? व्यवस्थापक पदासाठी मेडीकल कशाला लागते? जुजबी कोणत्याही डौक्टर कडून आरोग्य तपसणी चलली असती.

  सध्याच्या मुलींची विचारसरणी पाहता शीतल किंवा रीना या दोघींनी रोहनशी लग्न करण्यास तयार होण्यास किंवा तसा विचार करण्या साठी सुध्दा रोहन केवळ कोकणातला बालमित्र आणि दिसायला चांगला असणे या गोष्टी खूपच अपूर्ण आणि वस्तवाला सोडून वाटतात. त्याच बरोबर रोहन चे व्यक्तिचित्र फक्त आद्य्नाधार्क असणे, चांगले दिसणे, आणि स्वयंपाक करता येणे या पलिकडे जात नाही. आणि गंमत म्हणजे एखाद्या शहरी मुलीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं तर लगेच ती त्याच्या प्रेमात पडते आणि तो मात्र नाही. तसेच दुसर्याच दिवशी एका दुसर्याच मुलिला भेतून तो तिच्याशी पण लग्नाचा विचार करेल या गोष्टी खूपच अवास्तवीक वाटतात.
  रोहन्चे स्वत:चे असे व्यक्तिमत्व ठळकपणे कुठेच दिसत नाही की ज्या ज्यामुळे एखादी शहरात राहिलेली अभियांत्रिकी चे शिक्शण तसेच एम एस साठी तयरी करणारी मुलगी त्याच्याशी लग्नाचा विचार करायला सुरूवात करते किंवा व्यवस्थापनाचे शिक्शण घेतलेली अधुनिक मुलगी चटकन एका दिवसात एका प्रसंगामुळे त्याच्या प्रेमात पडेल. हे सगळं सध्याच्या मुलींच्या बाबतीत अवघडच आहे. एखादी शहरात राहिलेली शिकलेली मुलगी एखाद्या कोकणातील एम ए मराठी वाल्या मुलावर कि जो ताज मध्ये नक्की कोणत्या पोस्ट साठी निवडला गेला आहे हे सुध्दा न जाणून घेता भाळेल असे वाटत नाही.

  ते तिघे जर लहन पणा पासूनचे मित्र असतिल तर मि. चितळ्यांनी रोहन येणार हे बायाको आणि मुली पासून लपवून ठेवणे आणि नंतर दोन दिवसांत त्यांचे एक मेकाना स्विकारणे हे सुध्दा वस्तवाला सोडून वाटते.

  या संर्दभांत जर काही बदल करता आले तर म्हणजे रोहनचे असे काहीतरी वैशिष्ट्य की ज्यामुळे या सगळ्या घटनांना वस्तविकता येइल.

  शुभेछा!

  • प्रतिक्रियेकरता आभार
   बऱ्याचशा गोष्टी पुढिल भागात क्लिअर होतील. तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत.

 12. Pravin says:

  महेन्द्र जी,
  कथा वाचताना मजा येतेय, पण तरीही थोड्या त्रुटी जाणवताहेत. त्रुटी काढायच्या म्हणून काढत नाहीय हे लक्षात घ्या 🙂

  १. शितल आणि लेले ह्यांचे रोल बहुतेक तुम्ही अगोदर प्लॅन केले नव्ह्ते असे वाटताहेत. नक्की कारण सांगता येत नाहीय पण बहुतेक शितल आणि रिना यांचा त्रिकोण दाखवणे हे कारण असू शकेल.
  २. ते तिघे बालपणी कोकणात एकत्र खेळल्याचा तुम्ही उल्लेख केला आहे, त्यामुळे पहिल्या भागात चितळेच्या पत्नीने वा रिना ने त्याला न ओळखणं थोडं खटकलं. बऱ्याच वर्षांनी पाहिल्यामुळे ओळखलं नाही हे गृहित धरलं तरी ओळख करून दिल्यावर रिना ने अगदी गप्प राहणं पटत नाही, खास करून जर का ते बालपणी एकमेकांशी जवळ असतील तर.

  बाकी कथा मस्त चाललीय. माझ्या मते रोहनला या दोघींपैकी कुणाशीही लग्न करु देऊ नका 😉

  • प्रविण
   खरं सांगतो, मेंदूचा जाम भुगा होतो कथा लिहितांना मग अशाच त्रुटी राहून जातात.
   खरंच फार अवघड असतो हा प्रकार ..

 13. Sarika says:

  Kaka,

  Katha mast chalali aahe…

 14. sonal says:

  काका खूप छान लिहिले आे . लवकर पुढचा लेख लिहा.

  मी खूप आतुर जाले आे Next post vachaila.

 15. Unknown says:

  kay calulated shevat ahet…ashi kadhi katha aste kay??
  band kara…

 16. Girish says:

  MBK, aho kay jhale ase tumche? MWM ani ruston chi bhandi ghasta ghasta tumhi hi skill kadhi develop kelit? pan gosht chan ahay!! awaiting further episodes..

  • गिरिश
   भांडीघासणे, या शब्दावर नचिकेत मालशेचा एकाधिकार असल्यामुळे तुला तो शब्द वापरता येणार नाही. कॉपी राईटचा भंग होतो .हे हे हे…
   अरे उगिच काहीतरी लिहायला घेतलं. वरची कॉमेंट वाच नां, ऍनोनिमस आहे, अगदी बरोबर म्हणतोय तो, कि लिहिणे बंद करा..
   पण काहिही लिहून छळण्यासाठी जन्म आमुचा… 🙂 विक्रमादित्याने जसा हट्ट सोडला नाही, तसाच मी लिहिण्याचा हट्ट सोडणार नाही…

 17. Bharati says:

  महेन्द्रजी,
  अतिशय सुंदर कथा लिहिली आहे.तुमचा प्रांत नाही म्हणालात पण हाडाचा लेखक काही लिहु शकतो हे दाखवून दिलेत.तुम्ही मराठी एम. ए.चा मान वाढवला आहे.हे शिक्षण कमी दर्जाचे समजू नये या साठी चांगला संदेश दिलात.
  कुटुंबात एखादा उंट येतो तिर्प्याचालिने म्हणून का मनाचे वाळवंट करायचे असते? शेवट वैगरे काही नाही.आता दुसरी कथा येऊ द्या.आणि शेवट तुमच्या कथेसारखा आम्हाला जमला नसता.आम्हाला प्रतिक्रिया आवडते कारण त्यातून तुम्हाला नवीन छटा
  दिसतील नवे मार्ग विचार करायला मिळतील.तुमची कमतरता दाखवणे हा माzआ हेतू कधीच नव्हता.सुंदर लिखाण आहे! मला आवडते.

 18. kaka,
  khup chan katha lihili ahe pan mala vatye ki jya commets kelya ahet tyancha thoda vichar karun kathecha shevt karava.
  katha lihil titki thodich hoil ase mala vate.
  best of luck……..

  • इंद्रजीत
   आभार. खरंच कंटाळा आला होता लिहायचा. म्हणून एकदाची संपवली कथा.. तसाही कथा वगैरे फार कमी लिहितो मी. ब्लॉग वर स्वागत 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s