एक कथा- 3

सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. लेले ह्यांचा स्टॉक ब्रोकींगचा बिझीनेस आहे. पैसा अगदी खोऱ्याने ओढतात ते.

गावाकडच्या घराला पण एकदम सुंदर मेंटेन करुन ठेवलं होतं. म्हातारपणी शेवटचे दिवस आपल्याच मातीत घालवायचे ही मनापासूनची इच्छा. इतक्या प्रेमाने बांधलेले ते लहानसे बंगला वजा घर, खूपच सुंदर बांधलेले होते. आता घर बांधलंय, म्हणून सुटीत जाउन रहाणं आलंच. त्यांची मुलगी शितल. इंजिनिअरींग पास केलं होतं आणि आता एमएस ची तयारी करीत होती- लेलेंच्या इच्छे विरुध्द! एकुलती एक मुलगी कायम डोळ्यासमोर रहावी असं आईवडिलांना वाटणं सहाजीकच आहे नाही का?

सध्या मार्केट क्रॅश झालेलं होतं. त्यामुळे फारसं काम नसायचं. या पेक्षा जास्त आयडीयल वेळ सुटी घेण्यासाठी असूच शकत नाही, म्हणून लेले गांवाकडे गेले होते. शितलने गावाला यायला सरळ नकार दिला होता की मला घरीच राहून तयारी करायची आहे म्हणून. बंगल्यात केअरटेकर होताच, त्यामुळे खाण्यापीण्याची सोय तर अगदी चोख होती.

गावी गेल्यावर पण इतर लोकांशी तसा फारसा संपर्क नसायचाच. फक्त भैय्यासाहेब जोशींकडे बाल मित्र म्हणून एखादी चक्कर तरी आवर्जून मारायचे. या वेळेस भैय्यासाहेबांकडे गेल्यावर त्यांनी रोहन बद्दल विचारलं तर भैय्यासाहेबांनी जेंव्हा रोहन बद्दल – नौकरी, इंटरव्ह्यु बद्दल सांगितलं तेंव्हा तर लेलेंना आश्चर्याचा धक्काच बसला!हा मुलगा चक्क मुंबईला आणि चितळ्यांकडे उतरलाय? अरे माझ्या घरी का नाही पाठवलंस त्याला? म्हणुन तक्रारवजा सुरात कैफियत मांडली.

रोहन बद्दल ऐकल्यावर एक विचार आला, की शितलला जर भारताबाहेर जाण्यापासून थांबवायचे असेल तर ह्या रोहनलाच जावई करुन घ्यावा..!! बस्स!! नेकी और पुंछ पुंछ. शितलला तर भैय्यासाहेबांनी लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे दाखवणे वगैरे फॉर्मलिटीजची काही फारशी गरजच नव्हती.

इतका चांगला सोन्यासारखा मुलगा अगदी कुठेच सापडणार नाही ही गोष्ट अगदी सोळा आणे सत्य आहे हे मनाला पुन्हा पुन्हा बजाउन सांगत होते लेले. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला म्हणून निघाल्यावर, भैय्यासाहेबांच्या घरी पोहोचले. भैय्यासाहेब समोरच्या पडवित बसले होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर सहज म्हणून लेलेंनी शितल आणि रोहनच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला!! भैय्या साहेबांचा चेहेरा पण एकदम खुलला. आपल्याला एव्हढी शिकलेली , आणि लहानपणापासून पहाण्यात असलेली मुलगी, सून मिळणार ह्या कल्पनेनेच त्यांना खूप आनंद झाला.

त्यांनी रोहनच्या आईला आवाज दिला, अहो… ऐकलंत कां? हे लेले काय म्हणताहेत ते??

काय? पदराला हात पुसत  त्या बाहेरच्या खोलीत आल्या. भैय्या साहेबांनी लेलेंचं काय म्हणणं आहे ते सांगितलं . शितलला तर त्यांनी पण पाहिलं होतंच. त्यांचा चेहेरा पण एकदम आनंदाने खुलला.  अरे हो… आता रोहन मोठा झालाय की, आणि नौकरी पण लागेलच.

पण लेले …. ती तयार होईल कारे रोहन सोबत लग्न करण्यासाठी? भैय्यासाहेब पुटपुटले..
हो..होईल नां . नाहीतर मी आहे नां!! अरे कसंही करुन तिचं हे अमेरिका खूळ डोक्यातून काढुन टाकायचंय . लग्न झालं की मग ती विसरेल अमेरिका वगैरे, फार तर काय हनिमूनला जा म्हणाव महिना पंधरादिवस!!

नौकरी वगैरे करायची ती भारतामधेच राहून कर म्हणाव!! दोघांच्यापण म्युच्युअल कन्सेंट्स मुळे दोघंही मनापासून खुष झाले होते. बालमित्र आता व्याही होणार म्हणून!! लेले.. जावई मिळणार म्हणून आणि भैय्यासाहेब सुन घरात येणार म्हणून! लेले चहा घेउन घरी परत निघाले- एकच भुंगा मनामधे पोखरत होता- शितल हो म्हणेल की नाही? आणि जर शितल ने हो म्हंटलं, आणि रोहन नाही म्हणाला तर???

भैय्यासाहेब म्हणाले, की रोहनची आणि तिची म्हणजे शितलची  भेट करवून दे मुंबईला. म्हणजे त्या दोघांच्याही ्मनाचा अंदाज घेता येइल.आता ठरलं.. मुंबईला पोहोचलो, की रोहनला सरळ आपल्या घरी न्यायचं, म्हणजे त्याची शितलशी पण चांगली ओळख होईल, आणि दोघं एकमेकांना चांगले ओळखतील आणि पुढचं सगळं सोप्पं होऊन जाईल. मनातल्या मनात कल्पनेचे मांडे खात लेले परत मुंबईला यायला निघाले.
*************************

साडेतिन झाले होते. रोहनचा इंटरव्ह्यु केंव्हाच संपला होता. आत्तापर्यंत तर हे सगळे इंटरव्ह्युज नेहेमी दिल्लीलाच व्हायचे. यंदा पहिली वेळ होती की इंटरव्ह्युज हे मुंबईला अरेंज केले जात होते. आपला दिल्लीला जायचा त्रास वाचला याचाच खूप आनंद झाला होता रोहनला.

इंटरव्ह्यु झाल्यावर रीना ने फोन कर म्हणून सांगितले होते. त्याने सेल फोन काढून रीनाला फोन केला. तिचं काम पुर्ण व्हायचं होतं, पण ती म्हणाली की साधारणपणे एक तासात पोहोचेल. रोहन रिसेप्शन एरीयामधेच बसुन वेळ घालवू लागला- तिच्या कॉलची वाट पहात.

इंटरव्ह्यु झाला होता आणि आता सिलेक्शन झाल्यामुळे परिक्षेचा शेवटचा पेपर झाल्यावर जसा थकवा येतो तसा मानसिक थकवा आला होता. मस्त पैकी उंडारायला जावं, किंवा सिनेमा पहावा – किंवा सगळं काही विसरून मस्त पैकी झोपावं असं तरी वाटतंच… किंवा कोणा बरोबर तरी जे काही मनात आहे ते शेअर करावं असं वाटतं.. पण इथे मात्र रोहन एकटाच बसला होता. बातमी शेअर करायची म्हणून त्याने भैय्यासाहेबांना फोन केला.
सिलेक्शन झालंय बाबा.
भैय्यासाहेबांना उर आनंदाने भरून आला. अहो… ऐकलंत काय?? सिलेक्शन झालं बरं कां.. रोहनचं!!! रोहनची आई बाहेर आली. फोन हातात घेउन डोळ्यातले पाणी घळघळा वहात असतांनाच रोहनला म्हणाल्या..
आशिर्वाद रे.. बाळा!! कधी येतो आहेस घरी परत? लवकर ये रे खूप आठवण येते बघ तुझी!
अग, इथे अजून दोन दिवस तरी थांबावं लागेल. परवा माझी मेडीकल आहे, ती झाली की मला परत येता येईल. अगं आई, पण मला नंतर जॉइन झाल्यावर तर बाहेर जावंच लागेल नां?? मग? इतकी काय काळजी करतेस?
तुला नाही कळायचं रे आईचं मन.. पुटपुटल्या त्या.. आणि फोन ठेवला. पदर डोळ्याला लावला, आणि पाणी टीपलं डोळ्यातलं.

आता रोहनचं लग्नं पण होणार. लेले येउन गेले नां. सून येणार म्हणून एक वेगळीच हुर हुर लागुन राहिली होती त्यांना. कसं होईल? तीचं आपल्याशी जमेल की नाही?

तसंही आपल्याला मुलांकडे जाउन रहायचं नाहीच. कधीतरी थोड्या दिवसांसाठी गेलो, तर तिने व्यवस्थित करावे एवढीच इच्छा.. बस्स! भैय्यासाहेब नेहेमीच त्यांना म्हणायचे , की मुलांकडे जावं, रहावं, पण तिथुन निघतांना मुलांच्या डॊळ्यात आलेलं पाणी पाहिलं की पावलं!!! असं म्हणून परत निघावं!! जास्त राहिलं, तर आपल्या डोळ्यात पाणी येऊन तिथुन निघण्याची वेळ येउ शकते .. ती न येवो म्हणजे झालं. थोडं मन उदास झालं.. कसं होणार ??

उगिच कुठल्यातरी कामात मन रमवायचं म्हणून त्या वाळवणं बघायला परसदारी गेल्या.स्वतःशीच पुटपुटत  त्या तिथे  ठेवलेली काठी उचलुन  त्या तिकडे स्वतःशीच पुटपुटत निघाल्या- मेले कावळे,  येउन सारखे चोचा मारतात, आणि पापड, सांडगी पळवून नेतात.. मागच्या वर्षी तर आंबा  पोळी पण खराब केली सगळी त्यांनी

***************************

रीनाने रोहनचा फोन पाहिला. दोन मैत्रीणी मिळून ते प्रोजेक्ट पुर्ण करायचं होतं म्हणुन ती मैत्रिणीकडे आली होती.  आता काम पुर्ण होत आलं होतं, रोहनचा फोन आला आणि तीने आवरतं घेतलं आणि तिथुन निघाली. दुपारची वेळ, म्हणजे अशा वेळी थोडा ट्राफिक कमीच असतो. ती एकदम लवकर पोहोचली ताजच्या समोर. तिथे पोहोचल्यावर तिने रोहनला फोन करून सांगितले की ती बाहेर  उभी आहे म्हणून.

रोहन बाहेर आला. चेहेरा थोडा थकलेला होता. इंटरव्ह्यु चांगला दोन तास चालला. जेवण वगैरे काहीच झालेलं नव्हतं. तो बाहेर आला आणि कार कडे चालू लागला. समोरच्या सिट वर जाउन बसला रीनाच्या शेजारी.थोडा थकवा जरी असला तरी पण प्रसन्न चेहेरा पाहिल्यावर रीनाच्या लक्षात आलं की ह्याचा इंटरव्ह्यु चांगला झालाय म्हणून.

कार सुरु झाली. रोहन म्हणाला, कुठे जवळपास एखादं हॉटेल आहे कां? लंच करायचा राहून गेलाय. रीनाने आश्चर्याने पाहिले- काय?? जेवला नाहीस तू??  ठिक आहे, आणि कार पुल ओव्हर केली मरीना हॉटेल समोर. व्हॅले पार्किंग वाला माणुस समोर आला आणि कार घेउन गेला पार्किंगला. दोघंही हॉटेल मधे शिरले. वरच्या मजलयावर गेल्यावर समुद्रासमोरची खिडकी समोर असलेला टेबल घेतला. समोर अरबी समुद्र पसरलेला होता. रीनाच्या फेवरेट जागांपैकी ही एक जागा होती. तिचे पपा तर इथे आले की तासनतास समुद्राकडे पहात बसु शकतो मी.. असे म्हणायचे.
काय घेणार आहेस तू?
हं.. मी .. चिझ सॅंडविच आणि कॉफी.. बस्स!
अरे पण तू जेवला नाहीस नां? मग ? कसं होईल एवढ्याने तुझे?  आणि तिने कॉफी ऐवजी मॅंगो शेक मागवला. वेटरने डिश समोर आणून ठेवली. रोहनने खाणं सुरु केलं. रीना ने स्वतःसाठी कॉफी मागवली होती. तिला अजूनही रोहनशी कसं बोलावं हे समजत नव्हतं. समोरचा कॉफीचा कप थंड होत होता..

’तुला अजून काय हवंय?’
’ नाही..बस , इतकंच पुरे मला. ’ रोहन  म्हणाला.

थोडं खाऊन दोघंही तिथुन निघाले . थोडं पोटात पडल्याने आणि  नौकरी पक्की झाल्यामुळे रोहनला आता बरं वाटत होतं.   रीनाने आपल्याच विचारात मग्न होती, कदाचित म्हणूनच असेल की तिने  इंटरव्ह्यु बद्दल काहीच विचारलं नाही.  रोहन शांत बसला होता.

रीनाच्या मनात कालच्या एपिसॊड पासून एक गिल्टी कॉन्शस होता. रोहनने आपल्याला, ’तशी’ मुलगी समजू नये असे सारखे वाटत होते. काल रात्री तो जेंव्हा खोलीत आला, आणि कांही न बोलता, परत निघून गेला, तेंव्हा मात्र त्याच्या डिसेन्सीची खात्री पटली . तिच्या लक्षात आलं होतं की रोहनचा कालचा तिच्या खोलीत शिरण्याच्या उद्देश केवळ तिला रडतांना पाहून सपोर्ट करण्यासाठीच होता. नाही तर, रोहन ती शांत होऊन  बाथरुम मधे गेल्यावर परत येई पर्यंत थांबला असता.
आणि ….. कदाचित………………….!!

!! इतक्या  एकमेकाविरोधी   गोष्टींचा कल्लोळ सुरु होता डोक्यात.
एखाद्या माणसाने आपल्याला मिस़अंडरस्टॅंड करु नये असे का नेहेमी वाटत असते आपल्याला? आता रोहनने आपल्याला मिस़अंडर्स्टॅंड जरी केली तरी काय फरक पडतो आपल्याला? दोन दिवसांनी तो परत जाणारच आहे नां? पण दिमाग मान जाये लेकिन दिल ना माने.. अशी परिस्थिती झाली होती तिची.

एक काम करू या.. रोहनचा इंटरव्ह्यु झालाय. म्हणजे आता  हा उद्या परत जाईल बहुतेक. मग ऍज अ गुड विल जेस्चर, त्याला मुंबई फिरवून मग घरी नेउ या आपण.. ठरलं!! रात्री  ८ वाजता पिझा हट वर भेटायचंय सगळ्या मित्रांना, तेंव्हा रोहनला पण बरोबर ठेउ या. त्याला पण जरा बरं वाटेल.पण आता तर फक्त चार वाजले आहेत, ८ पर्यंत काय करायचं?? बांद्रा बॅंड स्टॅंड…?? येस्स!! चलेगा, तिने स्वतःशीच म्हंटलं! घरी फोन लावला, सुमाताईंना.. की रात्री उशिर होईल, पण काळजी करु नकोस रोहन सोबत आहेच!

वरळी सी लिंक वरुन कार जात होती, रीनाची सवय होती, सी लिंक वरुन जातांना एसी बंद करायचा,  खिडक्यांच्या काचा खाली करायच्या, आणि समुद्राची खारीहवा चेहेऱ्यावर झेलायची.समुद्राच्या वाऱ्याने केस उडत होते. डिओ चा म्ंद सुगंध कारमधे पसरला होता.रोहन पण बाहेर पहात होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, आणि एकदम जोरात ह्सू आलं  दोघांनाही..
काल रात्रीच्या प्रसंगा मुळे  निर्माण झालेली   भिंत एकदम ढासळली दोघांच्या मधली.. !!

( मला ही कथा उद्याच्या पोस्टने संपवायची होती, पण इतक्या कॅरेक्टर्सना न्याय द्यायचा  एका भागात शक्य होणार नाही म्हणून अजून एक  पोस्ट वाढेल.  माझा अंदाज आहे की ५ व्या भागात ही कथा संपेल.    )

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , . Bookmark the permalink.

22 Responses to एक कथा- 3

 1. Sagar says:

  चालेल उद्या काय अजून दोन भाग वाढवले तरी चालेल मला…वाचताना कंटाळा येत नाही न मग कितीही मोठी कथा असू देत इट्स ओके .. 🙂

 2. Manmaujee says:

  पुढचा भाग लवकर येऊ द्या. . . कथा काय वळण घेईल काही अंदाज येत नाही….बघू पुढे काय होतय ते!!!!

  • कथेवा शेवट तुम्हालाच करायचाय उद्याच्या माझ्या पोस्ट नंतर. तुम्हीच निर्णय घ्या काय शेवट असावा याचा.

 3. sagar says:

  काका एकदम झक्कास जमलंय बघा…उत्सुकता खूपच वाढली आहे
  लवकर पुढची पोस्ट टाका ……………….

 4. sachin says:

  काका, मस्तच जमलाय नवीन त्रिकोण. वाचतोय आम्ही.

 5. Sarika says:

  Kaka,

  Waiting for ‘Bhag 4’

 6. महेश नाईक says:

  उत्कन्ठावर्धक……………….
  मस्तच जमली आहे आतापर्यन्त.

 7. रोहन says:

  अरे वा!!! मस्त जाते आहे कथा… आता तू कितीही भाग लिही बास लिहित जा … 🙂 बढ़ते रहो!!!

 8. मस्त..उत्तम जमलीय.
  तोच विचार करतोय आता तुम्ही सगळ्या कॅरेक्टर्सना कसा न्याय द्याल ते.

 9. Bharati says:

  vaa kathela chhaan valan aale aahe!!Premacha maan,ki apekshaanche ooze?kuthe zuknaar rohanche parde?

 10. samir says:

  Mahendraji,

  Eakdam mast jamate aahe Goshta….

 11. छान आहे, वाचायला मजा येतेय, आवरतं घेण्यासाठी कुठल्या कॅरेक्टर वर अन्याय व्हायला नको, त्यामुळे टेक युवर टाईम… आम्ही वाट पहातोय… 🙂

  • सागर, सुहास, भारती, सचीन,समीर, रोहन, सारीका, महेश
   प्रतिक्रियेकरता आभार. 🙂
   उद्याच्या पोस्ट नंतर शेवट काय असावा ते तुम्ही कॉमेंट्स मधे लिहु शकता. माझ्या मनात असलेला शेवट मी परवा लिहिन..

 12. vidyadhar says:

  छ्या काका,
  मी आज शेवटून दुसरा म्हणून वाचायला घेतला तर हा गेम. असो, पण अजून कथा पकडीतच आहे. उलट उत्कंठा मस्त वाढलीये…येऊ द्या….

 13. bhaanasa says:

  महेंद्र, कथा सहीच सरकते आहे रे. 🙂

 14. sonal says:

  Hi,
  Gelya 4 diwasapasun tumcaha blog wachate ahe… uttam ahe katha .. mala watat rina ani rohan ek vaavet.. karn tyanch prem unconditional ahe.. n afterall pahil prem he pahilach asat…

  thnaks…asech liha..

  Sonal

  • सोनल
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.
   खरं सांगतो, अजून मी स्वतःच पुर्ण गोष्ट लिहिलेली नाही. पुढे काय होणार हे मला पण माहिती नाही. फक्त एक मध्यवर्ती कल्पना आली होती डोक्यात, त्यावरुन कथा लिहिणं सुरु केलंय. शेवट कसा आणि काय होईल ते उद्या ठरेल बहुतेक!!
   बरेचदा निर्णय हे ’दिल से न घेता दिमागसे’ घेतले जातात. इथे कोण जिंकतं दिल की दिमाग ते ठरवायचंय अजून.

 15. mahesh mohan shinde says:

  mala mahit aahe agdi ushira comment kartoy pan
  hi gost sampuch naye ase vatata aahe………
  agdi kitihi mothi asli tari chalel kaka………..

 16. pramod sane says:

  tumach likhan khup excitment vadavnare aahe………..thnx. for the amezing story

 17. अमित says:

  चांगलं लिहिता तुम्ही

Leave a Reply to महेंद्र Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s