एक कथा- ५ ( शेवटचा भाग)

माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो नां? जी गोष्ट सहज मिळत असते, ती नको असते, आणि एखादी गोष्ट थोडी हाताबाहेर जाते म्हंटल्यावर मात्र ती हवी हवीशी वाटते! रीनाला काल पर्यंत रोहनन जेंव्हा इथुन जाईल तेंव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दलची वाईट इमेज नसावी, केवळ इतकीच इच्छा होती. पण आज मात्र जेंव्हा शितलची इंटीमसी थॊडी जास्त वाटली, तेंव्हा मात्र उगिच काहीतरी मिस होतंय तसं वाटणं सुरु झालं होतं.

प्रत्येक गोष्टीचं SWOT ऍनॅलिसिस करून निर्णय घेण्याची पध्दत पर्सनल आयुष्यात पण वापरा असं सर एमबीए च्या क्लासमधे नेहेमी म्हणायचे. पण खरंच ते शक्य आहे कां?? रोहन चा साधा सरळ स्वभाव तिला कालपासून जास्त अपिल होत होता. उगिच मनातल्या मनात कम्पॅरिझन केली जात होती, रोहन आणि गौरवची.. कधी गौरवचं पारडं जड, तर कधी रोहनचं !

रीनाला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, की आपण हा असा विचार का करतोय? शितलच्या घरी जेंव्हा ती दुपारी गेली होती, तेंव्हा शितलची रोहन बरोबरची जवळीक बघुन तिला तिथुन रोहनने निघुन यावं असं वाटत होतं. आपल्याला असं कां होतंय?  रोहनसोबत ती काल दिवसभर ( जवळपास) होती, पण एकदाही रोहनचा ऍप्रोच तसा नव्हता. सहेतुक स्पर्श एकदा पण झाला नव्हता रोहनचा. त्याच्या सज्जनपणाची ही पावतीच समजायची कां??

अचानक रोहन बद्दल वेगळं फिलिंग डेव्हलप होणं सुरु झालं होतं तिच्या मनात . आपण प्रेमात तर नाही ना पडलो रोहनच्या?? तिच्या मनात एक विचार आला, आणि तितक्याच त्वेशाने तो तिने झटकून टाकला. कसं शक्य आहे?? मी एक बिई + एमबीए होतकरू विद्यार्थिनी, आणि तो केवळ एम ए !! कसं शक्य आहे आपण त्याच्या प्रेमात पडणं?? प्रेमात पडतांना अशा गोष्टींचा विचार केला जात नाही, हे तिला आज जाणवलं.

बरेचदा काही गोष्टी आपोआप होत असतात. प्रेम पण त्यातलंच. पण त्याने असं काय केलं की आपल्याला त्याच्याबद्द्ल जवळीक वाटते आहे? काही समजत नव्हतं तिला. असूया ही फक्त प्रेमात पडल्यावरच वाटते. कदाचित म्हणुनच शितल जेंव्हा त्याच्याशी मोकळेपणाने वागत होती, तेंव्हा चिडचीड होत होती आपली.

रोहन-शितल ला बघून किंवा शितल चा रोहनमधला इंटरेस्ट बघुन तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो की काय असं वाटत होतं.

*********************

जेवणाची वेळ झाली होती. शितलची  सुरुवातीला   रोहनशी बोलण्याची  इच्छा नव्हतीच.. जे काही  बोलणं सुरु होतं,  ते केवळ लेलेंच्या सांगण्यावरूनच. पण जेंव्हा रोहन गप्पा टप्पा सुरु झाल्या, तेंव्हा मात्र तिला त्याची बौद्धीक चुणूक चांगलीच जाणवली होती. तिला आठवलं की, रोहन दहावीला असतांना बोर्डात राज्यातुन पाचवा आला होता! कसं विसरलो होतो आपण हे??  नंतरचे शिक्षण पण त्याने गावातच आर्ट्स कॉलेज मधेच घेतले होते, कदाचित त्यामुळे थोडा बुजरा झाला असेल तो. पण मराठी मधे एम ए करून त्याची पुढची झेप मात्र वाखाणण्यासारखी होती. त्याचं अफाट जनरल नॉलेज पाहून तर ती आवाकच झाली होती. एक मन तर म्हणत होतं की ठिक आहे, करू या लग्नं.. काय हरकत आहे, तर दुसरं मन अजूनही एम एस मधेच गुंतलेलं होतं.

बरं,   केवळ वडिलांचे म्हणणे टाळायचे नाही म्हणून त्याच्याशी बोलणं सुरु केलं होतं, पण त्याचं बोलण्याच्या ओघात जेंव्हा त्याचा आयक्यु समजला, तेंव्हा मात्र ती खूप इम्प्रेस झाली – आणि नकळतच त्याच्या प्रेमात पडली- की ही एक कॅल्क्युलेटीव्ह स्टेप घेतली आपण? शितल स्वतःशीच विचार करु लागली.

प्रत्येक गोष्टीमधे कॅलक्युलेशन्स करुन निर्णय घ्यायची तिची नेहेमीची पध्दत इथे मात्र नापास झाल्यासारखे जाणवत होते तिलाच. इतक्या लवकर लग्न वगैरे करुन घर सांभाळण्यापेक्षा अमेरिकेत जाऊन एमएस करावे, आणि लग्नाचे काय ते नंतर बघावे असे तिला वाटत होते. पण दुसरं मन वडिलांच्या इच्छेविरुध्द काही करण्यास तयार नव्हतं.. काय करावं??

******************************************

रोहन दोघींच्या समोर बसला होता. रीना कडे पहाण्याचा दृष्टीकोन आता मात्र थोडा वेगळा झाला होता. ती आवडायला लागली होती. तिच्या बद्दल साशा जेंव्हा बोलली, तेंव्हाच तिच्या बद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट निर्माण झाला होता त्याच्या मनात. सौंदर्याच्या बाबतीत तर काहीच प्रश्न नव्हता. ती होतीच सुंदर !!

शितल चे त्याच्याशी वागणे थोडे खटकत होते रीनाला. आता इतक्या वर्षांच्यानंतर भॆटतोय आपण, पण बाल मित्र म्हंटलं तरीही तिची वागणूक अतिशय फ्री वाटत होती रोहनला. सारखं जाणवत होतं, की तिला काहीतरी नक्कीच माहिती आहे, जे इतर कोणालाही माहिती नाही- आणि म्हणूनच तर ती इतकी मोकळी वागत नाही नां आपल्याशी?? कालच लेले पण गावाहून परत आलेत!!! दॅट क्लिअर्स द मॅटर!!! रोहनच्या एकदम सगळं काही लक्षात आलं. 🙂 रोहन स्वतःशीच हसला.
*******************************************
लेले वाट बघत होते की रोहन आणि शितल एकमेकांना पसंत करतात का ह्याची. जर त्या दोघांचं लग्न झालं तर सगळी काळजी मिटणार होती त्यांची नाहीतर………………………??

रोहन उद्या रात्री परत जाणार होता. मेडीकल टेस्ट झाल्यावर. तो पर्यंत त्याच्या मनाचा अंदाज घेता आला तर बरं होईल, असंही त्यांना वाटत होतं.  शितलला नाही  म्हणण्यासारखं काहीच नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं.. आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला.
*******************************************
सुमाताई संध्याकाळपासून थोड्या चिंतेतच होत्या. परवाच्या रीनाच्या उशिरा येण्यामुळे झालेला त्यांच्या मनावरचं मळभ  काही पुर्ण पणे उतरलं नव्हतं . रोहिणी मधे जाउन नांव नोंदवायचं… हे त्यांनी दोन दिवसात दहा पेक्षा जास्त वेळा चितळ्य़ांना सांगितलं, पण चितळ्य़ांनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं. ते म्हणत होते, आधी एमबिए होऊन जाउ दे, नंतर मग काय ते बघु!!

काल रात्री जेंव्हा रीना – रोहन परत  घरी आले, तेंव्हापासून  रीनाच्या वागण्या,बोलण्यातून ती रोहनकडे आकृष्ट झाल्याचे सुमाताईंना जाणवत होते. त्यामूळे रोहन लवकर गेला तर बरं!! अशी इच्छा होत होती. आता हीच गोष्ट जर चितळ्यांना सांगितली, तर ते उडवुन लावतील, आणि वेड्यात काढतील, म्हणतिल, ’काविळ झालं की सगळंच पिवळं दिसतं’..सुस्कार सोडला, आणि सरळ आपलया खोलित जाउन त्या पलंगावर आडव्या पडल्या. उद्या रोहनसमोरच या गोष्टीचा निकाल लावू असे त्यांनी मनात ठरवले.

****************************************************

रीना ठरल्याप्रमाणे रोहनला घेउन सिनेमाला गेली शितलला पण चल म्हंटलं, पण तिचा अभ्यास होता. येतांना मल्टिप्लेक्स मधेच स्नॅक्स हादडून आल्याने घरी आल्यावर जेवायचं वगैरे काहीच नव्हतं. रीना कार चालवत होती. एकदम तिने कार थांबवली आणि  रीनाने निर्णय घेतला, आधिच उशीर झाला आहे आणि आता आणखी होण्या आधि आपल्या मनात काय आहे ते रोहनला सांगून टाकावं.  पण पुन्हा ऍक्सिलरेट करुन त्याला जे सांगायचं  ते सांगण्याचा  विचार बदलला.

वि. स. खांडॆकरांनी म्हंटलं आहेच , की थोडं अविचारी व्हा, म्हणजेच काहीतरी निर्णय घ्याल, अन्यथा, नु्सता विचारच करीत रहाल. रात्री जेवण झाल्यावर ती रोहनच्या खोलीत गेली. रोहन नेहेमीसारखा पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. रीनाने रागाने ते पुस्तक काढून घेतले आणि म्हणाली, ’एक सुंदर मुलगी समोर उभी असताना तुला हे रटाळ पुस्तक वाचावसच कसे वाटते?”

रोहन गालातल्या गालात हसत म्हणाला, ’सुंदर मुलगी – कुठे आहे गं ती? मला  नाही दिसली ती’-

रीना वैतागली आणि त्याला मारायला घावली त्याच्या अंगावर…. अगं… अगं.. थांब जरा… !!! रीनाच्या नजरेतले भाव बघुन त्याला समजलं की तिला काय म्हणायचंय ते.  रोहन म्हणाला,’ ठिक आहे, मान्य की एक सुंदर मुलगी समोर आहे,   मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?-  त्याच्या या बोलण्यावर रीनाची नजर जमी्निकडे वळली. अन ती नासी फडकेच्या नायिके प्रमाणे अंगठ्याने जमिनीचे नसलेले पोपडे काढण्याचा प्रयत्न करणे सुरु केले .

रीना त्याच्या समोर  जावून बसली, डोळ्यानी जमिनीकडेच पहात म्हणाली, “रोहन?”

रीना कडे पहात  रोहन म्हणाला, – खरंच??

रीना म्हणाली.. होSSSSSSS!

रोहन म्हणाला “जी गोष्ट तुला इतके वर्षात सांगू शकलो नाही ती किती पटकन सांगितलीस तू?? ”

रोहन खूप आनंदात होता आज, त्याला त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती,   ती आज मिळाली होती.   रात्रभर त्याला झोप लागली नाही, कधि एकदा आईला ही गोष्ट सांगतो असे त्याला झाले होते.

*****************************************

सकाळी नेहेमीसारखे सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर नाष्टा करत होते. सुमाताई मनातल्या गोष्टी कशा बोलायच्या याची जुळवा जुळव करत होत्या.

काहि तरी बोलायचे म्हणून चितळ्यांनी रोहनला विचारले, अरे रोहन तुझ्या इंटरव्ह्युचं पुढे काय झालं? तू परत कधी जाणार गावी? जर तिकडे सिलेक्शन झाले नसेल तर मला सांग, मी बघतो  ,मला काही करता येइल काय ते. अगदी कुठेच शक्य झाले नाही तर मात्र मी काहीतरी सोय करतो आमच्या कंपनीत.

रोहन काही बोलला नाही. फक्त म्हणाला की बहुतेक काही गरज पडणार नाही.

सुमाताईंनी आपल्या मनातले विचार मनातच ठेवले, उलट खुश झाल्या मनोमन की आता रोहन परत जाणार म्हणून.. रीनाला  खूप उदास वाटत होतं, आपलं त्याच्यावर प्रेम आहे, कालच लक्षात आलं , ते उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.

ब्रेकफास्ट टेबलवरची प्रत्येक व्यक्तीच्या मनात निरनिराळे विचार सुरु होते. .

*****************************************

रोहनने नंतर गावी फोन करून, रीनाबद्दल त्याला काय वाटते ते भैयासाहेबांना सांगितले. ते सुद्धा आश्चर्यचकित झाले, हा गेलाय ईंटरव्ह्यु   द्यायला आणि बातमी काय सांगतोय. एक मन आनंदात होत आणि दुसर मन खात होतं मित्राला दिलेला शब्द मोडावा लागणार म्हणून. आता लेलेला काय सांगावं बरं??

**********************************************

रोहनची मेडीकल टेस्ट झाली आणि रीझल्ट यायला अवकाश असल्याने तो गावाला निघुन गेला.रोहन घरी गेल्याला, आता दोन दिवस होऊन गेले होते. लेले कधी नव्हे ते चितळ्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले,

चितळे, तुमच्या मुलीने आमचा आय एस जावई पळवला हो….
चितळे म्हणाले? आय ए एस जावई?आणि माझ्या मुलीने पळवला?

म्हणजे तुम्हाला माहिती नव्हते ?? अहो रोहन इथे आय ए एस च्या इंटरव्ह्यु साठी आला होता. रिटन एक्झाम पास झाला होताच तो, फक्त इंटरव्ह्यु बाकी होता, तो द्यायला इथे आला होता तो. आता लवकरच कुठेतरी कलेक्टर म्हणून जॉइन करेल तो.मी गावी गेलो होतो, तेंव्हा  भैय्यासाहेबांशी बोललो होतो. ते पण तयार होते शितलला सून करुन घ्यायला. शितलला पण तो आवडला होताच, पण रोहनने भैय्यासाहेबांना घरी सांगितलं की त्याला रीनाशी लग्नं करायचंय म्हणून.. आणि रीनाची पण हरकत नाही म्हणाला तो..

चितळ्यांना हा शॉक ऑफ द लाइफ होता. आनंदाने  त्यांनी लेलेंना मिठीच मारली.सुमाताइंना म्हणाले , की रीनाचे लग्न ठरवले हो, तिने…. सुमा ताई बोलणं ऐकतच होत्या, त्यांनाही खूप आ्नंद झालेला होता. पोरीनं नशिब् काढलंय होSSSS!  म्हणत त्या देवापुढे साखर ठेवायला गेल्या.

रीना हे सगळं बोलणं उभं राहून ऐकत होती.. आणि  खुश झालेल्या रीनाला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या. ती आत पळाली रोहनला फोन करन खुश खबर द्यायला.
***************************

कथा लिहिणे माझा प्रांत नाही, तरी  पण केलेला हा एक प्रयत्न आहे. कदाचित शेवटचा!!!

(ही एक कथा आहे, या कडे कृपया कथा म्हणूनच बघावे.. बऱ्याच घटना अशक्य वाटतील, पण ती एक कथा आहे हे कृपया लक्षात घेउन शक्या-शक्यते कडे दुर्लक्ष करावे ही विनंती..)

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य.... Bookmark the permalink.

99 Responses to एक कथा- ५ ( शेवटचा भाग)

 1. Disclaimer: कथेतील नायिकेच्या आडणावातील आणि माझ्या माहेरच्या आडणावातील साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा. खरचं.

  Moral of the story: कोकणातील मुलांना मोठ्या शहरातील मुलिंनी कमी समजू नये ते म्हणजे,”झाकली मुठ सव्वा लाखाची” पण असु शकतात 🙂

  कथेचा शेवट वाचून हुश्श बर का!

 2. सचिन says:

  काका, एकदम feel good शेवट केलात.

 3. Manmaujee says:

  गोड कथेचा गोड शेवट…मस्त झाली आहे!!!

 4. vidyadhar says:

  चला सुटलो…
  सकाळपासून तीनदा बघून गेलो पुढचा भाग आलाय का पाहण्यासाठी….
  काका खरच छान साधी सोपी गोष्ट झालीय…
  कॉम्पलीकेशन्स वाढवलीत तर कादंबरी होईल मस्त….
  करा प्रयत्न तोही….

 5. Girish says:

  mast!! shall wait for many more short stories in future from u..hardik shubeccha!!

 6. sahajach says:

  गेले चार दिवस वाचायचे टाळले होते क्रमश:मुळे…. आज वाचून काढली संपुर्ण कथा.
  मस्त झाली आहे…..एका बैठकीत संपुर्ण भाग वाचून काढले….
  साधी सोपीच पण रंजक कथा!!! तुम्ही लिहीत रहा आणि काय लिहू!!!

  • तन्वी
   खरं सांगायचं तर कथा लिहिणं सोपं नाही, मला वाटतं ते काम कांचन आणि अनिकेत (भुंगावर) सोडाव आपण.
   खूप कीस पडतो मेंदूचा लिहितांना.

 7. मनोज says:

  मस्त, एकदम छान…
  >> हा एक प्रयत्न आहे. कदाचित शेवटचा!!!
  शेवटचा नको, अजुन खूप अपेक्षा आहेत आमच्या, आता तर वाढल्यात..

 8. bhaanasa says:

  आज सकाळीच कथेचा शेवट वाचायला मिळणार म्हणून लगेच नेटवर आले….. आणि….:) गोड शेवटाची सहज अंगाने फुलणारी छान कथा. मस्तच रे.

  • मला एकदा ही काल्पनिक कथा लिहिल्यावर मात्र तुम्हा कथा लिहिणाऱ्यांचं कौतूक वाटतं.
   खरंच अवघड प्रकार असतो हा. या पेक्षा आपलं नेहेमीचं ललीत बरं.!

 9. सारे भाग एकदाच वाचले त्यामुळे उत्कंठा जास्त ताणली गेली नाही. मस्त झाली आहे कथा. कोकणातल्या मुलांचा अभिमान वाटला 🙂

 10. Vinay Garge says:

  काका, एकदम छान कथा झाली आहे. तुम्ही लिहित जावा.ही शेवटची नको. येऊ द्या अजून.

 11. sonal says:

  Great… saglaya goshtincha palikade jaun nishpap premch jinkal….chhan ahe..faisla dilse ghetlalt he bar zalat… ajun wat pahtey ashach kathanchi..
  sonal..

 12. मस्त आहे कथा…मजा आली.

  • आनंद
   प्रतिक्रियेकरता आभार. खरं सांगायच तर इतका पसारा वाढला होता कथेचा की गूंडाळतांना नाकी नौ आलेत.

 13. आल्हाद alias Alhad says:

  Disclaimer: कथेतील नायिकेच्या आडणावातील आणि माझ्या माहेरच्या आडणावातील साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा. खरचं.

  सासरच्यांनी वाचलेला दिसतोय… ब्लॉग! 🙂

  बाकी कथा छान… गोड गोड वगैरे…
  शेवटचा आय. ए. एस चा प्रकार सरप्राईज म्हणून का???

  कलेक्टर वगैरे सरकारी नोकरांच्या मुलाखती सरकार ताजमधे घेतं???

  • आल्हाद
   सरकारी नौकऱ्यांच्या मुलाखती, हा प्रशन अपेक्षीत होताच, म्हणून तर कथे मधे लिहिलंय की दर वर्षी मुलाखत ही दिल्लीला होते ती या वर्षी मुंबईला ठेवली.
   आणि त्याशिवाय तर कथा झालीच नसती…. म्हणून.. काय सांगावं कदाचित घेतील पण मुलाखती ताज मधे..

 14. अहा.. मस्त हलकीफुलकी कथा आणि छान शेवट. आयएएस चा ट्विस्ट मस्त 🙂

  आणि

  >>कदाचित शेवटचा!!!

  हे काय? शेवटचा बिवटचा नाही चालणार हं .. अजून खूप कथा येउदेत. 🙂

  • हेरंब
   प्रयत्न करतो पुन्हा कधी तरी. एखादा किडा मेंदूमधे घुसायला हवा कथेसाठी तरच जमते ती.

 15. तुम्हाला काल भेटल्यावर तुम्ही दिलेल्या हिंट वरुन जाणवला होत असच होईल. असो, मस्त झालीय कथा, शेवट म्हणून नका..जेव्हा वाट्टेल तेव्हा लिहा की 🙂

  • सुहास
   या पुढे एक ठरवलंय, जो पर्यंत पुर्ण कथा लिहून होत नाही, तो पर्यंत ती पोस्ट करायची नाही.
   बरेचदा शेवट ठरला असतो, पण सुरुवात वगैरे काही नसते, खूप गोंधळ होतो लिहितांना.

 16. Sagar says:

  काका
  शेवट छान झाला..कथा हि जमून आली…एक प्रश्न शेवट आम्ही करणार होतो न?

 17. Bharati says:

  महेन्द्रजी,
  अतिशय सुंदर कथा लिहिली आहे.तुमचा प्रांत नाही म्हणालात पण हाडाचा लेखक काही लिहु शकतो हे दाखवून दिलेत.तुम्ही मराठी एम. ए.चा मान वाढवला आहे.हे शिक्षण कमी दर्जाचे समजू नये या साठी चांगला संदेश दिलात.
  कुटुंबात एखादा उंट येतो तिर्प्याचालिने म्हणून का मनाचे वाळवंट करायचे असते? शेवट वैगरे काही नाही.आता दुसरी कथा येऊ द्या.आणि शेवट तुमच्या कथेसारखा आम्हाला जमला नसता.आम्हाला प्रतिक्रिया आवडते कारण त्यातून तुम्हाला नवीन छटा
  दिसतील नवे मार्ग विचार करायला मिळतील.तुमची कमतरता दाखवणे हा माzआ हेतू कधीच नव्हता.सुंदर लिखाण आहे! मला आवडते.

  • भाग्यश्री
   प्रतिक्रिये करता मनःपुर्वक आभार..अगदी खरी खरी कॉमेंट वाचायला बरं वाटतं

 18. मी says:

  लय भारी‌ .. “मी एक बिई + एमबीए होतकरू विद्यार्थिनी, आणि तो केवळ एम ए !”,
  कथा आवडलीच पण यातलं हे वाक्य एकदम झंगाट लिहिलं आहे.

 19. रोहन says:

  कथा आवडली रे दादा!!! पण थोड़ी घाई झाली असे वाटते… 🙂 अजून ज़रा खेचून उत्कंठा वाढवता आली असती… 🙂

  • रोहन
   मलाच खरं तर लिहायचा कंटाळा आला होता. खूप पेशन्स हवे कथा वगैरे लिहायला. माझ्या कडे तो नाही.

 20. Sarika says:

  Kaka,

  Katha aavdli, aata dusari yeude laukar

 21. sharad says:

  Jitaki apeksha hoti titki katha rangli nahi. tumhi eka pratikriyet mhatalyapramane shewat wegla apekshit hota. tumche itar lekh wachun tumchyakadun apeksha baryach wadhlya ahet he nakki. pan tarihi wachayala maja aali.simple n sweet. pudhil kathesathi all the best.

  • शरद
   प्रतिक्रियेकरता आभार. अजूनही रंगवता आली असती, पण खूप मोठी होत होती असे वाटले म्हणुन संपवली. खरं तर ही एका दिर्घकथेची थिम आहे असे वाटते, तिची शॉर्ट कथा लिहायला घेतल्याने असे झाले असावे.

 22. sayali says:

  kathaa ekdum chhan ch jhaleeye. shewat hee aawaDlaa. paN shewatee mee jasa nako mhaNale tasaach kelay, thodasa badalun 🙂
  mala matr tumhee tyaa reena la ugaach waait dakhawale naheet, yacha aanand jhala..karan shaharatlyaa, uchch shikshit aaNi shreemant mulee mhanaje nehamee waait ch, hyacha mala faar raag yeto 🙂
  kadachit tumchya hee mulee aslyane tumhala kaLel mee kay mhantey te 🙂
  jevha suchel tevha ajun lihaa..shubhechchaa!!

  • सायली
   प्रतिक्रियेकरता आभार.

   खालची कॉमेंट माझ्या भावाची आहे बरं कां..

   • sayali says:

    bhaau-bahiNee aaplyaala “jaminiwar” rahaylaa madat kartaat 🙂 tyamule tumhee nirash houu naka, lihit rahaa, kadheetaree nakkich tyaanchyaa apekshaa purn karnaare lihaal 🙂

 23. Rajeev says:

  ह र ह र … शी व शी व……
  अरे ह्या पेक्शा ” मा हेर, मालीनी, सासर ” वा च ले असते बरे !!!!!!!

  राहूल गांधी ग्राम पंचायतच्या एलेक्शनला उभा राहीला तर कसे वाटले …
  असते तसे वाटले….
  सासर्याने जावयाला वात्रट वीनोद सांगावा असे वाटले…..

  अरे तूझी प्रद्न्या अशी खर्ची पाडू नकोस….
  ( पण तूला मराठी मालीकांमधे नक्की चांन्स आहे”””)

  • सही…
   अरे ते सिरियस टॉपिक्स लिहून इतका कंटाळा आला होता की काहीतरी चेंज हवा होता, म्हणुन ही कथा लिहिली.

   राजा, अरे पण माहेर पेक्षा बरी आहे रे… इतकी पण इज्जत नको काढू.

   औरंगाबादला आलो की भेटीनच तूला.. 🙂
   पुन्हा अशी कॉमेंट दिलिस , तर पुढली कथा ’तुझी’ 🙂

   शेवटी काय , लिखाण आहे म्हणून काय झालं, चेंज हा हवाच असतो .. नाही?

 24. Rajeev says:

  आज तू मला भेटला असता तर ही तूझी शेवटची कथा असती….
  स्वा मी……..
  तुझ्या xxx yy zz !!!! <>

 25. महेंद्र,

  ह्या आठवड्यात नेटवर जास्त नव्ह्तो, पण मोबाइलवर तुमची कथा वाचत होतो! उत्कंठा वाढवून गोड शेवट केलात! भट्टी छानच जमली आहे! अभिनंदन!!

  • निरंजन
   धन्यवाद. खरं तर शेवटी स्टॅमिना संपला होता लिहायचा. डोक्यात तर खूप होतं, पण ते लिहिणे सुरु केले असते तर चक्क कादंबरीझाली असती.:)

 26. Abhijeet Mohite says:

  काका हे अगदी माझ्या मनासारख झाल..
  आपल्याला नाही आवडत रडारडी, वाईट शेवट वगैरे. आणि एक प्रेरणा पण मिळाली, कधीतरी अविचारी व्हाव पण निर्णय घ्यावा. थोड अविचारी व्हाव म्हणतोय उद्याच.

 27. shailaja says:

  काका, कथा खरच खूप छान होती. आज एकदमच सगळी वाचली. मलाहि शेवट गोड असलेलेच वाचायला, पहायला आवडते. सिनेमाच्या शेवटि ती वाईट माणसे, खलनायक शेवटि मेलेले पाहण्यापेक्षा शहाण्यासारखे वागताना पहायला जास्त आवडतात. त्यासाठि सुरुवात नाहि पाहिली तरिहि सिनेमाचा शेवट मी चुकवत नाहि

  • शैलजा
   प्रतिक्रियेकरता आभार…
   खरं तर ही कथा थोडा चेंज ऑफ मुड असावा म्हणून लिहिली आहे. थोडं टेन्स झालं होतं वातावरण हुसेन मुळे.मला पण शोकांतिका अजीबात आवडत नाहीत.

 28. Renuka says:

  शेवटच्या पार्ट मध्ये कथा आटोपली असा वाटत.. fairy tale सारखा सगळा छान छान झालं!! 🙂
  पुढल्या वेळी अजून एक दोन भाग वाढवून लिहिशील.. विचार करून लिहायला वेळ लागतो खरय.. 🙂 पण सगळी कथा एक सोबत वाचायला मजा येते!!

 29. Harsh says:

  मस्त,मस्त,मस्त … ( खरोखर महेश मांजरेकर सारखी कमेन्ट द्यावीशी वाटली. ) कथा एकदम छान आहे. पण शेवटची नको आणखी कथा वाचायला नक्कीच आवडेल

  • हर्ष
   खरं सांगायचं तर मी कंटाळलो होतो शेवटच्या भागात, म्हणून चक्क गुंडाळली गोष्टं. नंतर कधी तरी लिहीन..प्रतिक्रियेकरता आभार.

 30. Aparna says:

  आता वर तुम्हीच म्हटलंय की गुंडाळलीय म्हणून त्याबद्दल काहीच म्हणत नाहीये..आणि खरं तर मला ब्लॉगवर कथा वाचन फ़ारसं करायची सवय नाहीये..म्हणजे ते एकापाठी एक भाग वाचायचा थोडा कंटाळाच…पण तुमची मागची कथा वाचली होती म्हणून आणि दुसरं महत्वाचं आताच The Kite runner वाचून संपवलं त्याचा मांजा इफ़ेक्ट जावा म्हणून काहीतरी लाइट हवं होतं…तुम्ही म्हटलात ते खरंच आहे मालिकेसारखं लांबवता आलंही असतं..पण मजा आली एक वेगळा (आणि छोटा) त्रिकोण…आणि कथामालक म्हणून पात्रांना वाट्टेल तसं नाचवायचा अधिकार आहे तुमचा…पुढच्या वेळी कादंबरीपर्यंत खेचलंत तरी चालेल….:)

  • मला पण फारसा इंटरेस्ट नाही कथा वाचनात. तो हुसेनचा हॅंगओव्हर उतरवायचा होता म्हणून हे लिहिले. एक लक्षात आलं की हे कथा प्रकरण आपल्याला झेपणारं नाही.

 31. Aakash Gupte says:

  waah! majja aali! wachtan-na sarkha “Pudhe kay hota – pudhe kay hota” watat hota! chala, aaj ratri vachayla barach khadya milala! 🙂

 32. Prasad says:

  kaka… Kathecha shevat agadich gundalalya sarkha watala..o..!!
  ajun ek bhag padla asta tar majja aali asti..! baki tumcha kathalekhan prantatla navakhepana janawala..haan..! Tari pan pahila prayatna changla hota.. Ekhadi storyline decide karun mag katha lihilit tar bara hoil.. Ani romantic subjects far chan hatalta tumhi..bas dokyatlya kidyala jara ankhi chalwa.. maja yeil ankhi ekhadi.. katha wachayla.. Jamel tumhala nakkie. u have that potential in u.. so.. we are eagerly waiting..! Shubheccha…!!

 33. ganesh says:

  really nice story….kupach aavadli katha..

 34. Nikhil Joshi says:

  “कथा लिहिणे माझा प्रांत नाही, तरी पण केलेला हा एक प्रयत्न आहे. कदाचित शेवटचा!!!”

  Are you kidding us; please write one more soon;

  Best part of your stories is its all about people and their relations…

 35. Mrunali says:

  Kharach masta aahe. Abhinandan. Mala avadali hi chotishi katha. Mumbaitil dag-dagichya life madhey ashi choti katha vachun khup relax vatate. Ajunahi ashya chotya-chotya katha liha na kaka. mala aavadtil vachayala.

  • मृणालिनी
   धन्यवाद.. सगळे प्रकार करून पहायचे म्हणून कथा लेखन करून पाहीले. पुन्हा लिहीन लवकरच…

 36. sandeep says:

  khupach chan. ani shevatchi kay mhanta, ankhi liha, vichar shakti changali ahe. pudchya likhana sathi shubhrchha.

  • संदीप,
   धन्यवाद आणि ब्लॉग वर स्वागत. ही कथा लिहितांना जाम कंटाळलो होतो म्हणून चक्क आवरली ..

 37. Anonymous says:

  Ekdam mast…………….

 38. pratima says:

  अतिशय सुंदर ….साधी सरळ
  मनाला भावली …… एक कथा …

  • प्रतिमा
   मला लिहीण्याचा कंटाळा आला होता, म्हणून संपवली .. असो, आवर्जून आवडल्याचे कळवल्या बद्दल आभार.

 39. Megha says:

  mast story hoti
  mich premat padali ya rohancya
  mastach .

 40. Deepak says:

  Kaka Ekdam मस्त Aaahe katha.,
  Ani Kharya premabaddalchi aaathwan zali.,
  मजा आली.

 41. pranita says:

  kaka khup chan ho…… malahi as vatatay ki mazya aayushyat ashi sundar story asavi……

 42. Shweta Kale says:

  Mahendra, tumche bolgvaril lekhan khoopach chhan aste. Tumche likhan vachatana Dwarakanath Sanzhagirinchi athavan yete karan tesuddha ekhada mitra aplyashi bolto tase informal lihitat. Mala tumhi lihileli ek katha khoopach avadali. Tumhi kharach khoop chhan lihita. Tumhi sangitalyapramane yach kathechi kandambari lihun jar post kelit tar avadel amhala. Jari katha lihine kathin asale tari tumhi nakkich ajunhi chhan chhan katha lihu shakta yabaddal amhala purn vishwas aahe. Aani amhi navin kathechi vat pahat aahot. Tumhala khoop Shubhechha. Asech lihit raha.

  • श्वेता
   ब्लॉग वर स्वागत.. आणि प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. सहज लिहायचा प्रयत्न केला होता, पण नंतर लक्षात आलं की कथेमधे पात्रं जास्त वाढली की लिहायचा कंटाळा येतो.. म्हणून कथा प्रकार एकदम बाद करून टाकलाय. 🙂

 43. ni3more says:

  kay kaka ekdum bhari jamlay its awasome story i like this

 44. priya says:

  khup chhan hoti katha, simple & sweet

 45. Pratik Nagolkar says:

  Khup sundar katha aahe kharach aani shevat tar khup chhan rina is perfect for rohan 🙂

 46. sato says:

  Khup suner katha..keep it up sir…and thanx for such a lively story..

 47. sumit says:

  khoop sundar katha aahe :
  manapasun khoop aavdli .
  asech lihit raha .jamletar ek kadmbari suddha liha , nakkich navin duniyadari hou shakel

 48. nilesh paygude says:

  Mast…..

 49. Kuupach Sundar Ahe. Shevat tar chhanach Ahe. Ajun ek Bhag Vadhavala asta Tari chalale Aste.

 50. सुनिल भांगे says:

  प्रत्येक कथा जीवनावर काल्पनिक आणि सत्य घटनांवर अवलंबून असते.. आणि शेवट हा दोन्ही बाजूंवर. प्रत्येक गोष्ट पुस्तकातुनच समोर येते. मला ऐवढच सांगायच आहे लिहताना प्रत्येकश आपण तेथे हवोत आणि आपणच पात्र हवोत हा दृष्टिकोन समोर ठेवुन प्रत्येक गोष्ट करावी.

 51. vijay devale says:

  KHUP SUNDER

 52. Sachin says:

  Kaka mi kalach android app download kele hote tyamadhe fakt donach bhag vachayla milale utsukta etki hoti ki mi vatach pahu shaklo nahi. bakiche bhag phataphat aaplya blog var vachle. mala fakt evadhech mhanayche aahe…………..APRATIM

 53. harshad dalvi says:

  Khup interesting. Mi part 1-2 marathi kadambari app var vachla. Pudhcha part google karun shodhun kadhla lagech. Sampurna vachli nasti tar zop nasti aali.
  Thanks i love it

 54. अतुल says:

  कथा खुप छान आहे….वाचतान वेळे च भान पण नाही राहीले खुप आवडली कथा

 55. Ramesh Savant says:

  आति उत्तम

 56. अभिजीत says:

  No words …. Just Amazing!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s