तेथे कर माझे जुळती….

कुष्ठरोगी म्हंटलं की आपोआपच बाबा आमटेंचं नांव आठवतं आणि नतमस्तक व्हायला  होतं. माझा जन्मच मुळी वरोऱ्याचा , त्यामुळे आनंदवनाबद्दल एक वेगळी आत्मियता आहे.  अगदी लहान असतांना ( म्हणजे साधारण १०-१२ वर्षा्चा असल्यापासून) बैलगाडीने ( छकड्याने) तिकडे जाणे व्हायचे.तेंव्हा फक्त काही हातमाग आणि शेती वाडीचं काम केलं जायचं – पण गेल्या चाळीस वर्षात बरंच बदललंय आनंदवन.

नुकतीच मुलीची दहावीची परीक्षा झाली म्हणून तिला नागपूरला घेउन गेलो. नागपूरला गेलो की वरोड्याची एक चक्कर असतेच.या वेळेस मुलीला घेऊन आनंदवनात गेलो होतो.   तिला पण आनंदवनाबद्दल फारशी माहिती नव्हतीच. आम्ही जेंव्हा तिथे पोहोचलो तेंव्हा तिथला एक स्वयंसेवक -संजय आमच्या बरोबर आम्हाला आनंदवन दाखवायला आला. आनंदवनाबद्दल आजपर्यंत इतकी माहिती प्रसिद्ध झालेली आहे की मी फक्त माझा अनुभव  अगदी कमीत कमी शब्दात लिहिण्याचं ठरवलंय.

सकाळचे ९ वाजले होते. ११ पर्यंत  व्हिजीटर्सला आनंदवन दाखवलं जातं. इथे जवळपास ३००० कुष्ठ्ररोगी आणि जवळपास लोकं,तसेच  सुरुवातीला बाबांच्या सोबत इथे काम करायला आले होते , आणि आज जे अजिबात काम करू शकत नाही असे  ९०० अती वृध्द लोकं तिथे  रहातात.

आनंदवनात कम्युनिटी  लिव्हिंगचा कन्सेप्ट गेल्या  कित्तेक वर्षापासून पाळला जातो. इथे या ३९०० लोकांची  रहाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या कॉटेजेस मधे केलेली आहे. प्रातर्विधी सा्ठीची व्यवस्था ही कॉमन केलेली असते. तसेच सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था पण ९ कम्युनिटी किचन मधे केली जाते. कुणाच्याच घरी वेगळा स्वयंपाक  बनवला जात नाही. जे काही कम्युनिटी किचन मधे  बनवले जाते ते सगळे जण खातात. कोणाच्याच घरात पर्सनल चुल किंवा गॅस नाही.पुलं, सुनीताबाई, नाना पाटेकर जेंव्हा इथे रहायचे तेंव्हा ते पण इथलं कम्युनिटी किचनमधलंच जेवायचे.

आत शिरल्यावर समोर एक वारली पेंटींग केलेला एक दगड लक्ष वेधुन घेतो.  त्या दगडावरचे ते कलात्मक वारली पेंटींग पाहिले आणि नकळत त्याचा फोटॊ काढला.संजय सांगत होता, इथे रहाणारा प्रत्येक माणूस स्वतः काम करण््याच्या वेळा पण ठरलेल्या आहेत. केवळ कुष्ठ रोगीच नव्हे तर अनेक विकलांग लोकांनाही इथेच आसरा दिला जातो. पुढे जेंव्हा आनंदवन ’पहाणे’ सुरु केले तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवले.

जास्त न लिहिता   जास्तित जास्त फोटॊ टाकायचे ठरवले आहे .मी या फोटो मधे कुष्ठ रोग्य़ांचे तुटलेली बोटं वगैरे दाखवणार नाही तर त्यांचे चांगले रूप दाखवायचा प्रयत्न असेल.. कारण नुसतं लिहायचं म्हंटलं तर किती लिहू अन किती नाही असं होणार आहे आज. आमची पहिली भेट होती ती हातमागावर कापड विणण्याच्या विभागाला. बाहेर अंगणात रंगवलेले सूत ( दोरा)  दोरीवर वाळत टाकले होते.  लाल भडक रंगाचं सूत बाहेर तारेवर वाळत टाकलेलं  खूप सुंदर दिसत होतं.

आम्ही जेंव्हा आत गेलो तेंव्हा हातमागावर एक पायाची बोटं नसलेला माणूस पण हात तसे बरे असलेला तिथे  हातमागावर कपडे विणत बसला होता. दुसऱ्या खोलित स्त्रिया सुत बॉबिन वर गुंडाळून तयार करुन ठेवत होत्या- या बॉबिन्स  मशिनवर कपडे बनवतांना वापरतात.  हे काम  ज्या लोकांच्यानी हेवी काम होत नाही त्यांना – वि्शेषतः  स्त्रियांना दिले जाते. कपडे विभागात तयार होणारे कपडे म्हणजे  पंचे हे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत. तसेच  सतरंजी पण  भरपूर प्रमाणात विकली जाते.

पुर्वीच्या काळी प्राथमीक शाळांमधे बसायला कपड्याच्या फाऱ्या ( लांबच लांब पट्ट्या) वापरल्या जायच्या.  तसेच पुर्वी लग्नाच्या पंगती मधे पण जेवतांना ह्या साधारण दिड फुट  ्रूंदीच्या पट्ट्या खाली बसायला वापरल्या जायच्य़ा.  अशा प्रकारच्या पट्ट्यांना अजूनही लहान गावात  भरपूर डिमांड आहे.

नागपूरच्या एका पॉवरलुमच्या मालकाने आपली फॅक्टरी बंद केली आणि सगळी मशिनरी आनंदवनाला दान केली. त्यामूळे आता पॉवरलुमचा पण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. सगळ्याच विभागांमधे कुष्टरोगातून बरे झालेले पेशंट्स काम करतात. यांना हे काम करायला पण इथेच शिकवले जाते.

बरीच मंडळी अशीही आहेत की ज्यांना महारोग तर झालेला नाही, पण शारिरिक  दौर्बल्य  ( पॅरेलिसिस झालेले, अंध , वगैरे) इतकं जास्त प्रमाणात आहे की त्यांच्याकडून कुठलीही अंगमेहेनतीची कामं केली जाऊ शकत नाहीत. अशा लोकांच्या साठी तिथे एक संगित विद्यालय उभे केले गेलेले आहे. या विद्यालयात अंध, अपंग वि्द्यार्थ्यांना संगीत शिकवले जाते.  आम्ही तिथे गेलो होतो  तेंव्हा अशा मुलांचा तिथे सराव सुरु होता. आम्ही समोर बसल्याबरोबर, त्यांनी आम्हाला खास गाणं ऐ्कवलं, त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग केलं ते इथे आहे पोस्ट केलेलं. जी मुलगी गाणं म्हणते ती पुर्ण अंध आहे. या मुलांच्या ऑर्केस्ट्रा चे कार्यक्रम हे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत आणि होत असतात.

हे पाहून बाहेर निघालो, तर शेजारच्या एका खोलीमधे एक मुलगी पायाने सुई दोरा वापरून ग्रिटींग्ज वर डीझाइन्स काढत होती.  ते दृष्य़ पाहिलं , आणि  तिच्या जगण्याच्या चिकाटीचं कौतूक करावंसं वाटलं.  तिला हाताचा वापर अजिबात करता येत नाही – म्हणून पायाचा इतका व्यवस्थित वापर पाहिला आणि खूप इम्प्रेस झालो. आजच पेपरला बातमी वाचली की चांगला धडधाकट  भारतीय नेव्हीचा एक जवान ( रीटायर्ड) त्याने आपल्या बायको मुलींचा खून केला – आणि ह्या   पार्श्वभूमीवर तर तिची चिकाटी बघून नतमस्तक झालो. इथे एक लहानसा व्हिडीओ आहे.

हे सगळं पाहून झाल्यावर आम्ही अभयारण्यात गेलो. तिथे बरेच प्राणी वगैरे पाळलेले आहेत . इंमू फार्मिंग, ससे पालन, मगर सुध्दा पाळलेली दिसली. फुल बागा, फणसाच्या बागा, तसेच ऑर्किड्स पण आहेत. ह्या सगळ्यांसाठी म्हणजे शेती साठी सुध्दा लागणारी मशिनरी मेंटेनन्स वगैरे ची कामं पण इथले लोकंच करतात. लोखंडी कपाटांची पण  इथे एक कार्यशाळा आहे. वेल्डींग पासून तर उच्च  दर्जाच्या पेंटींग पर्यंत सगळं काही इथे इन हाऊस केलं जातं.

सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काम करणाऱ्यांना कोणीही काहीच शिकवलेले नाही. जुने काम करणारे लोकं नवीन लोकांना काम करायला शिकवतात. एक पायाने अधू असलेला एक एक्सपर्ट माणुस  इतर स्त्रियांना आणि पुरुषांना  रेग्झिन्स च्या बॅग कशा बनवायच्या ते शिकवत  होता. एकमेकांना नवीन गोष्टी शिकवून  मॅनेजमेंटच्या भाषेत ” युटीलायझिंग अव्हेलेबर रिसोअर्सेस अँड मोबिलायझिंग देम टु  परफॉर्म बेटर” असं म्हणता येईल .

सामाजिक सहजीवन म्हणजे काय ते इथे समजलं मला.  इतर लोकं नुसतं बोलतात, इथे ते सगळं करून दाखवतात.

पायाची बोटं तुटलेली तर बऱ्याच लोकांची दिसतात. काही लोकांची तर पावलं पण पुर्णपणे तुटलेली दिसली. म्हणजे फक्त पायाचा  गुडघ्या खालचा भाग नाही.. असेही लोकं दिसले.   त्या लोकांना पाहिलं आणि मला डॉम्निक लॅपायरचं एक वाचलेलं पुस्तकं ’सिटी ऑफ जॉय ’ मधला एक प्रसंग आठवला. त्यामधे एक डॉक्टर भारतामधे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी येतो. बरेच रोगी असतात. कुष्ठ रोग्यांना दुःख वगैरे होत नाही, म्हणून सेडेटिव्ह न देता कत्तलखान्यातल्या कसाया प्रमाणे शरीराचे खराब झालेले अवयव कापून काढल्याचा एक चॅप्टर आहे. अंगावर वाचतांना काटा येतो. असो.. तर अशा लोकांना  नीटसं उभं पण रहाता येत नाही. म्हणूनच असेल की बऱ्याच ठिकाणी तिन चाकी सायकली ( हाताने चा्लवायच्या) पार्क करुन ठेवलेल्या दिसतात.

कचऱ्या मधून कला या विभागात तर अगदी सलाइनच्या बाटल्यांपासून केलेल एक शो पीस , एक्सरे फिल्म वापरुन केलेल वह्या पुस्तकांची कव्हर्स. फाइल कव्हर्स, अशा अनंत गोष्टींच्या शिवाय तिथे केळीच्या साला पासून, आणि मक्याच्या कणसाच्या साला पासून    बनवलेले अनेक  कलाकृती पहायला मिळाल्या – तसेच ह्या कलाकृती  टाकाऊ वस्तू पासून बनवल्या आहेत यावर विश्वास  बसत नाही. आणि हे सगळं  करणारे कुष्ठ रोगी आहेत… एक लहानसा व्हिडीओ बघा या कामाचा..

फार पुर्वी एकदा  इथे बाबा आमटे असतांना  चंद्रपूरहून नागपूरला जातांना, पुलं आणि सुनिताबाईंना इथेच भेटलो होतो.   नाना पाटेकर स्वतःच्या प्रॉब्लेम्स मुळे इथे येउन एक वर्ष राहिला होता. पैसा, प्रसिद्धी सगळं काही असलेली इतकी मोठी माणसं  – पण त्यांना इथे येऊन रहावंसं का वाटलं असावं बरं?

सुतारकाम विभागात,  इथली जमीन साफ करतांना जी मुळं वगैरे सापडली, त्यांच्यापासून बनवलेली  बनवलेल्या कलाकृती मांडून ठेवलेल्या आहेत. तसेच बरेच नवीन फर्निचर पण बनवत होते. मागे मोठी लाकडांची वखार होती. हातापायाची बोटं झडलेल्या त्या लोकांना कामं करतांना बघून वेगळीच प्रेरणा मिळत होती.सगळं पाहून झालं होतं. फक्त बाबा आमटेंची समाधी पहायची होती. रम्य वातावरणात उघड्यावर एका शेतामधे एक लहानसा चौथरा केलेला होता. त्यामधे बाबा आमटॆंच्या अस्थी ठेवलेल्या होत्या.  शेजारी सुंदर फुलझाडं होती लावलेली. त्या समाधीला हात जोडले आणि परतीच्या वाटेला लागलो.

वारलीपेंटींग केलेला दगड..

हातमागावर कापड विणतांना ( चादर)

बॉबिन्स बनवतांना स्त्रिया.

स

रंगवलेले सुत उन्हात वाळवतांना. ह्या पासूनच पुढे कपडा बनवला जातो.

सतरंजी विणतांना .. अतिशय कष्टाचं काम आहे हे.

प्राथमीक शाळांत मुलांना बसायच्या पट्ट्या.. अजूनही खेडेगावात वापरल्या जातात ह्या.

बाबा आमटेंची समाधी

संगीत विद्यालय . आनंदवन अतिशय सुंदर ऑर्केस्ट्रा आहे यांचा. शारिरीक विकलंगांना इथे गाणं शिकवलं जातं.

कचऱ्यातून कला, अतिशय सुंदर कलाकृती आहेत इथे तयार केलेल्या . सलाईनच्या बाटल्यांपासून तयार केलेले झाड समोर दिसते आहे

गौशाळा.

केळिच्या सालापासून आणि मक्याच्या सालापासून तयार केलेली कलाकृती हे जे रंग दिसताहेत ते नॅचरल कलर्स आहेत त्या सालांचे. ्नानापाटेकरचा फेवरेट विभाग. तो स्वतः इथे राहिला होता एक वर्ष.

लाकुडकाम विभाग. या विभागात अगदी पहिल्या स्टेजवर दुरुस्त झालेले रोगी , जे शारिरिक दष्ट्या धडधाकट आहेत तेच काम करतात. बरंच अंगमेहेनतीचं काम आहे इथलं.

ग्रिन हाऊस, इथेच सगळे शेतीविषयक प्रयोग, किंवा रोपं तयार करणं केलं जातं. सगळ्यात नविन टेक्नॉलॉजी वापरली जाते इथे.

या वृध्दाश्रमात ९०० वृध्द कुष्ठ रोगी आहेत. हे जे लोकं बाबा आमटेंनी जेंव्हा आश्रम सुरु केला तेंव्हापासून इथे आलेले आहेत. पुर्ण दुरुस्त या लोकांनी इथेच राहून कुष्ठ रोग्यांची आयुष्यभर सेवा केली.सुरुवातीला इथेच काम करून रहायचे, पण आता मात्र वयोमानामुळे कामं होत्ं नाहीत यांच्या हाताने.

अशा सायकल्स खूप दिसतात तिथे.

अजून बरेच फोटो  काढलेले आहेत ते नंतर लोड करीन. कुठल्याही कुष्ठरोग्याचे फोटो  पोस्ट करणे टाळले आहे. . हे पोस्ट पण लिहून ठेवलं होतं , फक्त व्हिडीओ अपलोड केलेले नव्हते म्ह्णणून राहून गेलं ते आज पोस्ट करतोय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

33 Responses to तेथे कर माझे जुळती….

 1. Bharati says:

  स्वच्छता व टापटीप ही जातीपेक्षा व्यक्तीवर अवलंबुन असते.फोटोतून तेच सिधह ज़ाले आहे .लेखाला शिर्षक अगदी समर्पक आहे!

 2. Sagar says:

  काका
  धन्यवाद..आनंदवनाची सफर करवून आणल्याबद्दल..हि माणसे खरच खूप ग्रेट असतात न..

  • सागर
   अगदी खरं .. जेंव्हा ते नविन नविन काम करीत होते तेंव्हा सगळे गावातले लोकं त्यांचा दुःस्वास करायचे.. पण त्यांनी आपले काम सुरु ठेवले – कोणाकडेच लक्ष न देता!

 3. Manmaujee says:

  कर्मयोगी बाबा आमटे यांना सलाम!!!!!

 4. खरचं ही माणसच वेगळी. एखाद्या ध्येयाने प्रेरित हॊउन केव्हढे मोठे कार्य उभे रहाते. किती उपेक्षित जीवांना आधार, दिलासा, प्रेम मिळाले.

  • सोनाली
   ध्येयवेडी माणसंच काहीतरी वेगळं करु शकतात.
   पुर्वीच्या काळी या लोकांना देवीचा कोप झाला म्हणून घराबाहेर काढले जायचे.हा रोग संसर्गजन्य आहे असे समजले जायचे.
   लोकं बरे झाल्यावर पण त्यांना घरचे लोकं आपल्या घरात घेत नव्हते . अशा परिस्थितीत त्या लोकांना सहारा देण्याचे मोठे काम, आणि समाज जागृती पण केली बाबा आमटेंनी..
   अजून खूप खूप लिहावंसं वाटतंय.. पण थांबतो..

 5. vidyadhar says:

  माझे नुसते फोटो पाहूनच कर जुळलेत…
  आता खरोखर जाऊन यायला हवं!

  • विद्याधर
   त्यांना आधी फोन केला तर तिथे रहाण्याची व्यवस्था पण होऊ शकते. तिन दिवस वेळ काढून गेलात तर हेमलकसा( प्रकाश आमटेंचं) पण कव्हर केलं जाऊ शकतं

 6. Shekhar says:

  महेंद्रजी, सामाजिक बांधिलकी वगैरे बद्दल बोलणे सोपे पण प्रत्येक्षात करून दाखवणे कठीण..बाबा आमटेंनी मात्र ते करून दाखवले आहे..शीर्षक अगदी समर्पक आणि धन्यवाद ह्या पोस्ट बद्दल.

  • शेखर
   असे काही लोकं आहेत म्हणूनच चाललंय.. प्रकाश आमटॆंच्या हेमलकसा ला पण जायचं होतं, पण वेळ कमी पडल्याने जमले नाही. सध्या हेमलकसाला पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे असं म्हणतात… पण एकदा नक्कीच जायचंय.!

 7. bhaanasa says:

  तेथे कर माझे जुळती!!! महेंद्र, ताजमहाल आणि तश्या अनेक ठिकाणी आपण अगदी आवर्जून जातो…. पण अशी ठिकाणे प्रत्येकवेळी पुढे पुढे ढकलली जातात. खरे तर वेळात वेळ काढून इथे जायला हवे….. यांच्या चिकाटीतून-काम करण्याच्या आवाक्यातून, तेही शरीरी वैगुण्यावर मात करीत… फार फार शिकता येईल. खूप वर्ष झालीत जाऊन… कॉलेजात असताना गेलो होतो… आता हे फोटो-चित्रफिती पाहून पुढच्या भेटीत जायला हवे.कुठलाही गाजावाजा न करता केलेले हे खरे महान कार्य. तुझ्यामुळे सारे पाहायला मिळाले, धन्यवाद रे.

 8. Shantanu Deo says:

  महेंद्र , फारच सुंदर लिहिलंय. नागपूरचा असल्यामुळे , मी सुद्धा आनंदवनात जाऊन आलोय. कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी भेट देण्यापेक्षा येथला तो एक दिवस मनाला जास्त भरून टाकतो.
  जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद. “प्रकाशवाटा” हे पुस्तक कुणी वाचलं नसेल तर नक्की वाचा. अप्रतिम पुस्तक आहे.
  -शंतनू
  http://maplechipaane.blogspot.com/

 9. MAdhuri says:

  Khup chan lihile ahe ani photomule kalpana yete. He thikan saglyani ekda baghitle pahije, Vishesh gajawaja na karta evdhe mothe karya kele ahe. Title agdi samarpak,

  Tumchya mahitiwarun atta bawdi la visit kele udaipur mt abula gele teva. mazya lekhat ullekh kela ahe. tumchya blogwar wachlyane ek changla spot baghitla thnx

  mpmate.blogspot.com

  • माधुरी
   प्रतिक्रिये करता आभार.
   एखाद्या वेळेस जाण झालं तर बघा.. मस्त जागा आहे..तुमचा ब्लॉग पण आत्ताच वाचला, आणि कॉमेंटला पण ..:)

 10. रोहन says:

  दरवर्षी मे महिन्यात इकडे एक कैंप असतो. स्वयंसेवक म्हणुन जायचे असेल तर…मला स्वतःला जायची इच्छा असली तरी काम सांभाळून नाही जाता येत… काहीतरी करायची इच्छा तर आहे मात्र. मस्त आहे पोस्ट एकदम. नेहमी प्रमाणे.. 🙂

  • रोहन
   तुला जर वेळ मिळाला तर हेमलकसा ला पण जाउन ये. प्रकाश आमटे तिथे असतात. तुला आवडेल ती जागा.
   थोडा नक्सलवादी भाग आहे पण तसा सेफ आहे नॉर्मल लोकांसाठी.

 11. साधनाताईंचं ‘समिधा’ आधी नुसतंच वाचलं होतं. आज ते “बघितलं”. त्याबद्दल खूप आभार.. प्रत्यक्ष बघायचा योग कधी येतो ते बघायचं. खूप छान लिहिलंयत काका. !!

  • हेरंब
   तिथे जेंव्हा त्या वृध्द लोकांना पाहिलं तेंव्हा मात्र भरून आलं. काही लोकं तर ९० च्या घरातले पण आहेत तिथे.

 12. खूपच भवलं. साधनाताई आमटे यांच्या “समीधा” या पुस्तकाची आठवण झाली.

 13. खूप छान, आनंदवनाची सफर घडवून आणल्याबद्दल.
  मी स्व:त नागपूरचा असून तिथे गेलो नाही ह्याची खंत वाटतेय…आत गेलो कधी तर आनंदवन नक्की.

  • सुहास
   खरंच नाही बघितलं? अरे मस्त जागा आहे . सकाळी निघालो नागपूरहून की रात्री पर्यंत परत येता येतं.
   मी चिखलदरा अजून पाहिलेलं नाही.. 😦

 14. savadhan says:

  आनंदवन बद्दल पुष्कळ वाचलं होतं.पण आपल्या लेखानं खूप माहिती मिळाली. वाचताना बाबा आमटे यांच्याबद्दल मनात असलेला आदर शतपटीने वाढता झाला.मी ”आरोग्य” या नावाचा लेख कुष्ठरोग या विषयावरच आहे. आपण वाचला असावा.

  • प्रतिक्रियेबद्दल आभार. कुष्ठरोगाचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे. पण अजूनही पुर्णपणे आटोक्यात आलेला नाही. एकच झालंय की औषधं लवकर दिल्याने जास्त शरिराचा नाश होत नाही.

 15. Aparna says:

  माझ्या एका मैत्रीणीची आई आनंदवनाबद्दल प्रत्येक वेळी बोलायची…मागच्या वर्षी त्या गेल्या तेव्हापासून जायचं आहे मला त्यांची आठवण म्हणून तिथे आता प्रत्यक्षात केव्हा जमतं माहित नाही…
  पोस्टचं शीर्षक खरंच समर्पक आहे..’तेथे कर माझे जुळती’

  • जमेल .. पण या वेळेस तिथे उन्हाळा खूप जास्त असतो. हिवाळ्यात ठिक होईल तिथे जाणं .

 16. खरच कर आपोआप जुळण्यासारखच आहे हे सगळ… बाबा आमटेंना सलाम….तुमचे पण आभार इतकया सुंदर पदधतीने आनंदवनाच दर्शन घडवलत….फ़ोटो आणि विडियो खुपच बोलके आहेत…

 17. jyoti says:

  तेथे कर माझे जुळती….agadi samarpak shirshak……..aanadvanabadal khup ekal hot…..pan tarihi itaki mahiti navhati……..thanks kaka………rastyavar bhik magnarya dhad dhakat manasana bagun khup chid yete……..swatachya apangtvavar ani aajaravar maat karun……jagnyachi ummid denarya ya sarvana kharach salam…..thanks kaka….share kelyabadal

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s