पॅराग्लायडींग…

गोव्याला आलो की मी नेहेमी कोलवा बिच जवळच्या हॉटेलमधे गेली कित्तेक वर्ष उतरतोय . कोलवा बिच मला खूप आवडतो, कारण एक तर गर्दी नसते, आणि जवळपासच्या जे्वणाच्या चांगल्या जागा माहिती आहेत मला म्हणून.

आजचे हे पोस्ट अगदी गडबडीत टाकलेले आहे. तर काय झालं, नेहेमीच ( म्हणजे फक्त फेब्रु ते जुलै महिन्यात) कोलवा बिच वर वॉटर स्पोर्ट्स सुरु असतात. त्यातल कधीही बिच वर गेलं की पॅरा ग्लायडींग सुरु असलेले दिसते.  मला पॅराग्लायडींग मनापासून आवडते. कितिही गडबडित असलो, तरीही तो अर्धा तास मी नेहेमीच स्वतःकरता ठेवतो.  प्रत्येक वेळेस तर शक्य होत नाही, पण जेंव्हा कधी शक्य होईल तेंव्हा पॅराग्लायडींग माझ्या विश लिस्ट मधे असते.

एखाद्या दिवशी साईटवरून लवकर परत आलो, लवकर म्हणजे अंधार पडण्यापुर्वी. सध्या गोव्याला संध्याकाळी ७ – ७.१५ वाजता अंधार पडत . परवाचा दिवस तसा बरा होता. लवकर रुमवर परत आलो आणि सरळ बिच ची वाट धरली. बिच वर पोहोचलो, तर एक मुलगा — साब अच्छा……….. जाउ द्या. त्याला टाळून सरळ पॅराग्लायडींग वाल्यासमोर उभा राहिलो. त्याने समोर केलेल ते ग्लायडींग गिअर  अडकवले आणि  आकाशात उडायला तयार झालो.

ग्लायडरला स्टिअर करण्यासाठी एक माणूस सोबत फ्लाय करतो. तो मागे उभा होता. त्याने हसून म्हंटलॆ, साब , बहुत दिनोके बाद दिखा?? म्हंटलं, अरे मै तो आया था,लेकिन तेरे पास आनेकू टैम नई मिला!! काम भी तो पैला करना मंग ताय नां!!! त्याने पण मला तत्वज्ञान शिकवले, म्हणाला बरोबर है साब!पैला काम करनेका, बादमे मस्ती!! 🙂  मी हसलो  आणी स्वतःला त्या ग्लायडरच्या रोपला हुकने  अडकवून घेतले.

मला स्पेशली तो  जमिनिपासून डीटॅच होऊन उंच ऊडण्याचा क्षण खूप आवडतो. शब्दातित भावना असतात तेंव्हा.एकदा उंच ऊडाल्यावर ती खालची बोट तुफान स्पिडने पळते, आणि तुम्ही सागरावर तरंगत असता. खालची किड्यामुंगी सारखी माणसं बघितली की आपण उगिच खूप मोठं झालंय असं वाटतं.

नेहेमीचाच अनुभव होता, त्यामुळे नाविण्य जरी नव्हतं तरी पण एक वेगळाच आनंद मात्र नक्की होता. पाण्यावर हात पाय न हलवता फ्लोटींग करण्याचा अनुभव आहे? एक्झॅक्टली मला तेच फिलिंग येतं. आपण या संसारापासून पुर्ण वेगळे आहोत हे जे जग खाली बघतोय ते अगदी निराळं आपल्याशी संबंध नसलेले आहे ही फिलिंग येते मला. ते पंधरा मिनिटं अगदी मनापासून स्वतः बरोबर असतो मी .

खाली अथांग महासागर, सोसाट्याचा वारा, आणि त्या बोटीच्या इंजीनचा आवाज आणि या सगळ्यांशी जुळवुन घेणारे तुम्ही. मला पहिल्या वेळेस तर ही फ्लाईट संपूच नय असे वाटले होते.  या वेळेस त्या माणसाला कॅमेरा -सेल फोन हाती दिला आणि क्लिक कर दोन तिन स्नॅप्स म्हणून सांगितलए.

बस्स्स . इतकंच आहे हे पोस्ट. फक्त काही फोटॊ पोस्ट करतोय इथे.

पॅराग्लायडींग करता तैयार.. आता फक्त उडायचं आकाशात..

हवेत उंच उडतांना. या फोटो मधे मी हाललोय की कॅमेरा तेच कळत नाही. बिघडलेला फोटो अप्ण एक आठवण म्हणून पोस्ट करतोय.

समुद्र किनाऱ्यावर मेक शिफ्ट शॅक्स बनवल्या जातात फेब्रुवारी ते जुन पर्यंत यातली ही समोर दिसते ती माझी फेवरेट जागा. इथल्या खुर्च्या मला खूप आवडतात. इथे बसुन बिअर पिणे एक मस्ट वेळ काढू काम आहे.

आकाशात नाही तर आपण अवकाशात असल्याचं फिलिंग येतं . म्हणूनच असेल, मला पॅरा ग्लायडिंग खूप आवडतं.

या फ्लाइट नंतर रिलॅक्स व्हायला जागा म्हणजे ही शॅक. समोर समुद्र, मागे कोणीच नाही- एक्सलंट फिलिंग. कधी स्वतः बरोबर रहायला आवडत असेल तर मस्त आहे ही जागा. मी इथे बसलो की कमित कमी दोन तास ऊठत नाही.

नुकताच वेटर येउन गेला, खानेमे क्या लाउं? म्हणून. इथे फिश फ्राय पॉंप्लेट ४५० रुपये म्हणाला. फार तर ९ इंच असेल . भाव विचारूनच ऑर्डर प्लेस करा या शॅक्स मधे. मेनू कार्ड मधे भावाची जागा रिकामी असते फिश च्या बाबतीत.- म्हणून ही काळजी घेणं आवश्यक आहे.

एवढं सगळं झाल्यावर भूक तर लागणारच . फक्त एक पिस फिश विथ चिप्स, आणि फिश करी + राइस.

तर  आजचं हे पोस्ट अगदी शॉर्ट आहे. एक लहानसा अनुभव शेअर करावा म्हणून दिलेले. इथे दोन माणसांसाठी ग्लायडींगचे ५०० रुपये मागतात. भाव केल्यावर, आणि गर्दी नसेल तर ४०० पर्यंत पण तयार होता. एकट्याचे कमित कमी २५० ते ३०० रुपये घेतात .

पण एक सांगतो, अनूभव एकदम पैसा वसूल!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , , . Bookmark the permalink.

42 Responses to पॅराग्लायडींग…

 1. वा. माझ्या गोव्याच्या पॅराग्लायडींगच्या आठवणी जाग्या केल्यात अगदी. कलंगुट माझा फेव्ह. तिथे जेव्हा पॅराग्लायडींग केलं होतं तेव्हा त्या लोकांचा संपूर्ण सेटप नवीन होतं. त्याच्यावरून उडणारे पहिले आम्हीच होतो. आमच्या हस्ते उद्घाटन म्हणा. त्यामुळे जरा धाकधूकही होती गिनिपिग असल्याची 🙂

  • अरे वा.. मस्त !! म्हणजे मराठी मधे बोहनी तुमच्या हातून झाली म्हणायची.
   आता मात्र ते लोकं एक्सपर्ट झाले आहेत. एकदा काईट फ्लाइंग करायचंय.. :०

 2. अनिकेत वैद्य says:

  पॅराग्लायडींग चा अनुभव एकदम भन्नाट असतो. एकदाच केलय. आवडल खूपच.

 3. Manmaujee says:

  गोव्यातील प्रत्येक अनुभव स्मरणीय असतो. मला पण कलंगुट बीच खूप आवडतो. आम्ही एक आठवडा गोव्यात होतो. फूल २ धमाल आली होती तेव्हा. पॅरा ग्लायडींग काही केल नव्हत.. .कॉलेजला होतो ना त्यामुळे ट्रिप बजेट मध्येच होती.

 4. सॉलीड मजा

 5. vikram says:

  आपण अजून पॅराग्लायडींग चा अनुभव घेतला नाही परंतु खूप इच्छा आहे 🙂

 6. Sangamnath says:

  mee hi ekdaach kelaay…khup majja aali hoti…

 7. मला पण करायची इच्छा झालीय पॅराग्लायडींग 🙂

 8. रोहन says:

  अरे सही… मस्तच.. आपल्याकडे अर्नाळा बिचला आणि विरारला जीवदानीला पॅराग्लायडींग होते. शिवाय कामशेतला सुद्धा होते.

  कसले सही फोटो टाकले आहेस…गोव्याला जायला हवे एकदा. किती वर्षे झाली मला जाउन… 😦

  • विरारला पण होतं? एका रविवारी राधिकाल आणि सुपर्णाला नेऊन आणतो.. 🙂
   लवकर जाउन ये.. या ट्रिप मधे दोन दिवस प्लान कर गोव्याचे.

 9. मर्स्तं आहे. मागच्या वर्षी गोव्याला जाऊन गर्दीमुळे पॅरॅग्लायडिंग केलं नाही. पुढच्या खेपेला जरूर करणार.

  बाकी, हातात बीअर आणि समोर अथांग पाणी, ह्या सारखे सुख ते कोणते? त्या समुद्रात भेटलेल्या पोऱ्याला नाही ते कळायचं 😉

  • हो ना. तो पॅरा ग्लायडींग फक्त काही महिने सुरु असते . एकदा पाउस पडला की बंद होतं ते.

 10. सचिन says:

  येतोय आम्हिही गोव्याला.

 11. ngadre says:

  aho te Oceanic mala hi khoop avadate..

  Shivaay kolva beach varach thodese baher entry javal ek full fledge hotel ahe..tithehi jevan faarach sudar..

  Surmai ani beer…kya baat..kya baat..

  • नचिकेत
   गोव्याला गेलो की सुरमाई नाही, तर किंग फिश, किंवा चणक माझी फेवरेट.
   त्या हॉटेलचं नांव आहे केंटूकी ( ते फ्राइड चिकन वालं नाही)
   तसेच जर इंग्लिश ब्रेकफास्ट ( फिश विथ चिप्स, किंवा बेकन विथ चिप्स , हाफ फ्राय वगैरे) ट्राय करायचा असेल तर हॉटेल टॆट म्हणुन आहे तिथे अवश्य जा. मला तरी ती इंग्लिश प्रिपरेशन अजिबात आवडली नाही. पण माझे मित्र एंजॉय करतात( स्पेशली बाहेर बरीच वर्ष राहून आलेले)

   पुढे थोडं गेलं की डाव्या हाताला एक बार आहे तिथे नुडल्स मधे गुंडाळून डीप फ्राय केलेले चिकन मिळते.. एकदम खल्ल्लास!!! मस्त टेस्ट असते त्याची 🙂

   • सुरमाई वेगळी , आणी किंग फिश वेगळी. किंगफिशचा स्लाइस काढून विकला जातो आइस्क्रिम प्रमाणे चांगली आठ नऊ इंच जाड असू शकते ती.
    बऱ्याच हॉटेल्सची नांवं लक्षात नाहीत.. पण लिहितो उद्याच.. यावर काही तरी, आठवेल तितकं…

 12. vidyadhar says:

  मस्तच….एकदा करून पाहायला हवं.

 13. हे गोवा प्रकरण खुपंच सही दिसते आहे, च्यायला जायलाच हवे…

  • आनंद
   अवश्य जाउन या. या शिवाय तिथे मांडवी नदीमधे एक बोट राईड असते. ती पण छान असते. संध्याकाळी बोटीवर डान्स वगैरे कल्चरल कार्यक्रम असतो. एंजॉयेबल राईड 🙂

 14. मी पण कधि केलं नाहीये पॅरॅग्लायडिंग, पण करायला जरा रिस्की आहे, पाण्यात पडले तर? मला समुद्रात पोहता पण येणार नाही.

  • पाण्यात पडली तरी ते लाइफ जॅकेट असते नां, काळजी करायचं कारण नाही. पुढल्या वेळॆस कर नक्की.

 15. महेंद्र जी

  मागच्या डिसेंबर मध्ये गेलो होतो गोव्याला, पॅरॅग्लायडिंग नाही केली …. पुढच्या खेपेस नक्की करेन …. कोलवा बेंच च्या आजू बाजूला कुठली हॉटेल्स चांगली आहेत? सांगावे …..

  विनोद

  • कोलव्याला एक शेरेपंजाब आहे, स्पेशली तंदूरी फिश आवडत असेल तर. आधी तो फिश आणून दाखवतो मग नंतर बनवून देतो. जवळच बेतालबाटीम मधे एक सचिन तेंडूलकरचं फेवरेट हॉटेल आहे, त्याचं नांव आहे मार्टीन्स कॉर्नर. इथे थोडी जास्त गर्दी असते, म्हणून वेळ काढुन जा. समुद्र किनाऱ्यावरच्या शॅक्स मधे क्वॉलिटी चांगली असते, पण भाव जास्त असतात. म्हणुन शक्यतो बाहेरची हॉटेल्स बघा.
   दुपारच्या वेळेस ज्योती प्लाझा जवळच्या ( मडगांव ) अशोका हॉटेल मधे ऑथेंटीक थाली मिळते. एकदा अवश्य त्या ठिकाणी.

   कोलवा बिच पासुन बाहेर निघाल्यावर मेन रोडला लागेपर्यंत सरळ चालत जायचं, शेरे पंजाबच्या नंतर पण पुढे… तिथे डाव्या हाताला एक लहानसं हॉटेल आहे, त्याचं नांव विसरलो, पण तिथे गोवनिज भाजी पाव, आणि मटन पाव मस्त असतो ब्रेकफास्टला .
   एक काम करतो, एक पोस्टंच लिहितो, गोव्याच्या हॉटेल्सवर 🙂

 16. ngadre says:

  Great idea..Goa hotelsvar post..

  Maja yeil..lavkar liha..

  King fish mhanjech Surmai na ho?

  • सुरमाई वेगळी , आणी किंग फिश वेगळी. किंगफिशचा स्लाइस काढून विकला जातो आइस्क्रिम प्रमाणे चांगली आठ नऊ इंच जाड असू शकते ती.
   बऱ्याच हॉटेल्सची नांवं लक्षात नाहीत.. पण लिहितो उद्याच.. यावर काही तरी, आठवेल तितकं…

 17. namaskar,

  post zakas.

  ek gadbad aahe. tumhi je enjoy karata te parasailing ahe paragliding navhe.

  parasailing – http://en.wikipedia.org/wiki/Parasailing

  paragliding – http://en.wikipedia.org/wiki/Paragliding

  mala jya sopya bhashet shikavale hote te ase aahe –

  parasail is the one that ascends, parachute descends & paraglide glides.

  Rajan Mahajan

 18. छान पोस्ट..तुमच्या बरोबर अगदि गोव्यालाच असल्या्सारख वाटल…अजुन तरी पॅराग्लायडींगचा अनुभव नाही घेतला कधी आणि अजुन गोव्यालाही गेलो नाही…तस जायच अगदि केव्हापासुन वाटते आहे पण मुहुर्त भेटत नाहिये..बाकी तुमच्या गोव्यातील पोस्ट वचुन गोव्याबाबत वा्टत असलेल आकर्षण दुपटीने वाढल आहे हे मात्र नक्की…बघुया कधी मुहुर्त निघतो ते बाकी …बाकी जाइन तेव्हा तुमच्या पोस्ट्मधील माहितीचा उपयोग जरुर होइल असे वाटते…

 19. Aparna says:

  फ़ोटोवरुन असं वाटतंय की यालाच अमेरिकेत पॅरासेलिंग म्हणतात…फ़्लोरिडाला केलं होतं मस्त मजा येते आणि नेमकं वरुन निळ्याशार पाण्यात एक टर्टल दिसलं होतं..आमचा नावाडी मजेशीर होता त्याने आम्हाला दोनदा बुचकाळलं पण होतं…

 20. bhaanasa says:

  माझीही अवस्था सोनाली सारखीच…. पाण्यात पडलो तर ही भीती काही पाठ सोडत नाही… पण फिर भी एक बार करनेका हैंच हमको…. शोमू व नचिकेतने मस्त उडून घेतले…. फोटू मस्तच आलेत… 🙂

 21. dtawde says:

  सर मी पण सप्टेंबर च्या शेवटी जाणार आहे, काही मार्गदर्शन मिळू शकेल का? राहणे आणि खाणे दोन्ही बाबत? धन्यवाद, ४ दिवस राहणार आहे फमिली बरोबर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s