बलात्काराष्ट्र??

(महा ) बलात्काराष्ट्र

गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी  यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता  आता  एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे काढायला वापरली जातांना पाहून वाईट वाटतं.

महाराष्ट्राचा आम्हाला कधी काळी खूप अभिमान वाटायचा. नेहेमी बिहाराशी तुलना केली की आपण शतपटीने चांगले असे वाटायचे.रात्री अकरा वाजता  पण ’आमच्या मुंबईत’  मुलींना एकट्याने प्रवास करता येतो अशी बढाई मारणारे आम्ही,   पण लवकरच खैर लांजी सारख्या  घटना, दारू पिउन झोपलेल्या नवऱ्या शेजारी भावजयीवर चा्कूच्या जोरावर बलात्कार करणारे – आणि दररोजच पेपरमधे येणाऱ्या बलात्काराच्या घटना वाचल्या की  आमची अभिमानाची वस्त्र गळून पडतात  आणि कोणीतरी आपल्या मराठी अभिमानाचे  कपडे उतरवुन आपल्याला विवस्त्र केले आहे आहेत  असे वाटते.

माझ्या घराशेजारी एक बॅंकेचे रिजनल मॅनेजर ( मूळचे बिहारी) रहायचे. त्यांची वृध्द आई बिहारातून वर्षातले काही दिवस येऊन रहायची.    सौ. बरोबर त्या नेहेमीच गप्पा मारायला यायच्या आणि तासन तास हमरा बिहरवा कैसन अच्छा ह ह्याची महती गात रहायची. थेट बिहारी ( मैथिली) बोली. एकदा त्यांना सौ. म्हणाली, की बिहारमे रातको लडकी अकेली बाहर नही जा सकती, रातमे आदमी को भी लूट लेते है… यावर त्यांनी  काय उत्तर द्याव?? ” त्या म्हणाल्या, अगर लडकी रातमे बाहर घुमने जायेंगी तो कोई भी उठाके ले जायेंगाही ना?? क्यों जानेका रातको बाहर??” आणि रात्री बेरात्री बाहेर पडल्यावर लुटल्या जाणे यावर त्यांचं म्हणणं ’हाथियार लेकर बाहर निकलनेका नां.. क्यॊं बाहर जानेका रातके अकेले बंदूक लिये बगैर?? म्हणजे बाहेर रात्री गेली की तिला उचलून नेणे हे सहाजिक आहे, तुम्ही बंदूक न घेता बाहेर फिरलात तर लुटले जाईलच-  अशी मनोवृत्ती झालेली होती त्यांची. उचलून नेणाऱ्याचा काही दोष नाही.

हाराष्ट्रीयन लोकांच्या मनाची पण अशीच जडण घडण  हळू हळू होत चालली आहे कां असा संशय येतोय. नुकतंच कुठेतरी स्टॅटस्टीक वाचलं की  महाराष्ट्रात बलात्काराच्या केसेस मधे बिहारच्या पेक्षा पण जास्त आहेत- तेंव्हाच जाणवलं की  हे असंच वाढत राहिलं तर..महाराष्ट्राचं नाव बलात्काराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही.

कित्तेक वर्ष महाराष्ट्र या अशा प्रवृत्ती पासून दूर राहिला होता म्हणून मराठी असल्याचा अभिमान वाटायचा . मराठ्याचे ( हा जातिवाचक शब्द म्हणून वापरलेला नाही- एक मराठी माणूस तो मराठा ) हे  आजचे असे रूप पाहिले की संताप येतो. कुठे गेला तो मराठा?? जो मरकर भी नहीं हटता वो मराठा, अशी व्याख्या असलेला तो शूर वीर कुठे गेलाय?  आज बलात्काराच्या इतक्या बातम्या ऐकतो आणि मग मन कसं विषण्ण होऊन जातं. आम्ही जो इतिहास शिकलो आहे तो कसा स्फुर्तीदायी होता, शिवाजी महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून अशा गोष्टी कशा मनावर बिंबवल्या गेल्या होत्या इतिहास शिकतांना, पण पुढली पिढी इतिहासामधे काय शिकणार आहे- आज जे काही  घडतंय तो उद्याच्या साठी इतिहास आहे हे विसरून चालणार नाही.

बलात्काराचे प्रमाण इतके जास्त वाढले आहे की त्याकडे कानाडॊळा  करुन चालणारच नाही. आपल्या कडे  शंभर बलाक्तार झाले की एक केस नोंदवली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे आपले कायदे -कानून के हाथ बहूत लंबे होते है, हे नेहेमी ऐकतो सिनेमात, पण त्या हाताची बोटं कुष्ठ रोगाने झडली आहेत ह्या कडे कुणाचेच लक्ष नाही.

त्या स्त्रिला पण कोर्टामधे बलात्कार कसा झाला , आणि ती पोलिसांकडे गेली की आधी तिची हॉस्पिटल पर्यंत धिंड काढणारे  पोलिसच असतात. पोलिस स्टेशनसमोर कॅमेरे घेउन ( बोलावून ठेवलेले- कारण पोलिसांना टिव्ही वर दिसायचं असतं नां) चॅनलचे प्रतिनिधी तर त्या स्त्री चा चेहेरा टीव्ही वर दाखवण्यासाठी जिवाचे रान करतात.  हे  जे मेडीकल चेकिंग आहे ते त्या स्त्रीच्या घरी जाउन केल्यास काय हरकत आहे? तिची धिंड काढणे आवश्यक आहे कां?

कोर्टामधे  बलात्काराच्या क्रियांच्या बद्दल  जे प्रश्न विचारले जातात   त्या प्रशनांची उत्तरं एखादी वेश्या पण द्यायला धजावणार नाही – असे प्रश्न विचारून बलात्कारीत स्त्री ला एका  वेश्येच्या पण पातळी खाली नेउन ठेवतात .  त्या क्रियेचे  तपशिलवार वर्णन विचारून तिला  पुन्हा चारित्र्यहिन म्हणून सिध्ध करण्याचा प्रयत्न पण आरोपीच्या कडून केला जातो. जास्त  दोषी कोण- तो बलात्कार करणारा ? की सगळ्या कोर्टासमोर चित्रविचित्र प्रश्न विचारून    शाब्दिक बलात्कार करणारा?तिच्यावर बलात्कार झाला हा तिचाच गुन्हा आहे का? असे फिलिंग तिला येत असते .

गुन्हा नोंदवल्यावर कोर्टामधे असा गुन्हा सिध्द करणे पण अतिशय कठीण झालेले आहे.  गुन्ह्याचा तपास हाच मुळात लवकर केला जात नाही – त्यामूळे बलात्कारितेला न्याय मिळेल याची खात्री कमी असते. काही वर्ष निघून गेल्यावर आजची घटना जशीच्या तशी लक्षात राहू शकत नाही, आणि आरोपी सुटण्याचे चान्सेस जास्त वाढतात. बलात्कारीत स्त्रीआज झालेल्या बलात्काराची केसच मुळात कोर्टात उभी रहाते तिन चार वर्षा नंतर, तेंव्हा त्या स्त्रिला चार पाच कधी कधी तर जास्तच वर्षापुर्वीच्या घटनेचे तपशिलवार वर्णन करणे कसे शक्य आहे? चार वर्षापुर्वी दिलेली जबानी आणि कोर्टात केस उभी झाल्यावर दिलेली उत्तर यामधे थोडी जरी तफावत आढळली की  वकिल तिला ग्रिल करायला तयार असतातच.  पुढे तारखा, मग समजा आरोपी खालच्या कोर्टात हारला, तर केस हाय कोर्ट, सुप्रिम कोर्ट या मधे पोहोचते .  पैसे वाला किंवा राजकिय पुल असलेला माणूस असेल तर मग तर मुद्दामच   वेळ काढू पणा केला जातो.आणि मग न्याय मिळतो????. आपल्यापैकी   शानभाग हे नांव किती लोकांना आठवतं??

आपल्या कायद्यामधेच इतक्या पळवाटा आहेत की त्यातून सुटणे किंवा जामिनावर बाहेर निघणे सहज शक्य होते- पंधरा दिवसात बलात्कार करणारा पुरुष जेलच्या बाहेर जामिनावर निघतो.खरं तर अशा  केस मधे अतिशय सोपी केस होऊ शकते ही. जर त्या स्त्रीची मेडीकल केली आणि डीएनए चेक केले तर बलात्कार सिध्द होऊ शकतो. त्यासाठी इतर काही चौकशीचा फार्स करण्याची गरजच नाही.

कुठलाही बलात्कारी  आज अगदी दोनच दिवसात, अगदी फारच हाय प्रोफाइल केस असेल ( शायनी आहूजा) तर महिना भरात बाहेर निघतो. त्याची बायको पण निर्लज्जा सारखी त्याची तरफदारी करते. ती म्हणाली होती की एक स्त्री पण बलात्कार करू शकते पुरुषावर -इतक्या लो लेव्हलला गेलेली ती बाई बघून संताप आला होता. शायनी ने बलात्कार केला होताच, पण तरीही त्याची  केवळ  ’बायको’ म्हणून त्याला वाचवायला एका निर्बल अबलेच्या चारित्र्यावर ज्या त्वेशाने शायनीची बायको  शिंतोडे उडवित होती, आणि त्या बलात्कारितेलाच   बलात्कार करणारी ठरवत होती, ते बघुन खूप चिड आली होती. शायनीच्या बायकोला   ’स्री बलात्कार   करू शकते’ याच्या बद्दल इतकी माहिती कशी  हा प्रश्न माझ्या डोक्यात आला??? इतकं ठामपणे कोणी   अनूभव घेतल्या शिवाय बोलूच शकणार नाही असे वाटते.

आपल्या समाजात बलात्कारिते कडे पहाण्याचा दृष्टीकोन. जिच्यावर बलात्कार झालाय ती एक प्रेक्षणीय वस्तू होते, आणि समाज तिला ताठमानेने जगू देत नाही.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला वाटते की ती आता सार्वजनीक वस्तू झालेली आहे. एकदा बलात्कार तर झाला आहेच, आता माझ्या बरोबर आली तर काय हरकत आहे? किंवा ती एक इझीली असेसेबल वस्तू आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. हे असे    डायलॉग्ज सिनेमात नेहेमीच ऐकालयला मिळतात- ते आपल्या समाजाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे असे समजावे कां?

राजकिय नेते केवळ पेट्रोलचे भाव वाढले म्हणून आंदोलनं करतात, कांदे बटाट्याचे भाव वाढले तरी पण आंदोलनं होतात पण स्त्रियांवरील अत्याचार या विषयावर एकही राजकिय नेता रस्त्यावर उतरलेला पाहिलेला नाही-किंवा एकही राजकिय नेत्याने निषेध केल्याचे पण दिसले नाही.. हल्ली मुंबई किंवा कुठल्याही शहरात बिभित्स कॉमेंट्स ऐकल्या शिवाय कुठल्याही स्त्रीला रस्त्यावरुन चालणे शक्य होत नाही – हे सगळं होतं ते पब्लिक प्लेस मधे . चार दोन गावगुंड टाइप चे लोकं अशा कॉमेंट्स करतात, आणि इतर लोकं अपनेकू क्या करनेका   है म्हणुन दुर्लक्ष करून पुढे जातात.

या बद्दल समाजामधेच जागरूकता निर्माण झाली पाहिजे, आणि मला काय करायचंय ही  प्रवृत्ती दूर करायला हवी नाहीतर हे लोकं तुमच्या घरातही घुसायला कमी करणार नाहीत.आपली निती  मुल्ये आणि त्यांची लक्तरे अशी वेशीवर टांगली जात आहेत , तरीही आपल्या नेत्यांना त्याची लाज वाटत नाही- दुर्दैव आहे.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

46 Responses to बलात्काराष्ट्र??

 1. सचिन says:

  कायदया तील त्रुटी आणि बर्याच अंशी राजकीय़ हस्तक्षेपा मुळे या लोकांच फावत. बर्याच ठिकाणी लोक स्त्रीलाच दोषी ठरवुन मोकळे होतात.मग केस साठी लागणार्या पैसाच्या अभावामुळे आणि अजुन जास्त लोकांत बोलबाला होऊ नये म्हणुन असे लोक गप्प बसणे पसंत करतात.

  मागे घडलेल्या दिल्ली घटने बाबत शिला दिक्षीत असच म्हणाल्या होत्या, मुलीनी रात्री का फिराव म्हणुन?

  • सचिन
   कायदे फार लवचिक असले की मग असं होतं. शिला दिक्षीत असं म्हणतात , मग त्यावर आपण काय बोलणार?

 2. अशा लोकांना शिक्षा एकच. चौरंग करून मग ‘पुरुष’ नाटकातली शिक्षा देणे.

  • रोहन says:

   होय होय .. चौरंग… हातपाय ‘कलम’ झालेच पाहिजेत…

   • असे आपल्याकडे कितीही वाटत असले तरीही शक्य नाही.
    फक्त कायद्यातल्या तरतुदी बदलून एक महिन्यात निकाल दिला तरी पुरेसं आहे. दहा दहा वर्ष खटले चालतात आपल्याकडे ..

 3. रोहन says:

  पुण्याची बातमी कळली तेंव्हा नुसता संताप होत होता माझा.. अरे काय चाललय काय??? महाराष्ट्राचा बिहार झाला आहे खरच… बिहार बरा असे बोलायची वेळ येइल आता!!!

  आणि दादा इतिहासाबद्दल तर काय बोलावे… कल्याणच्या सुभेदाराची सून – ह्या कथेला पुरावा नाही आहे म्हणा.. पण बाबाजी गुजर या पाटलाचे असोत नाहीतर सखोजी गायकवाड ह्या आपल्या सेनापतीचे असोत… हात पाय कलम करणारा आपला जाणता राजा… खरोखरच शिवकल्याण राजा!!

  देवा किमान त्याच्या तेजाचा एक अंश आजच्या राजकारणी आणि सर्वच लोकांना मिळू दे रे!!!

  • म्हणुनच एकच जाणता राजा झाला, दुसरा कोणीच हॊऊ शकला नाही. ्त्यांच्या तेजाचा एक अंश तरी मिळू दे.. आणि तेवढं जरी झालं तरीही बरंच काही दुरुस्त होईल.

 4. Sarika says:

  बलात्कारापेक्षाहि बलात्कार झालाय हे सिद्ध करणं स्त्रियांसाठी अधिक कठिण आणि लज्जास्प्द आहे.कायदा आणि न्यायव्यवस्था अधिक कठोर होणे आवश्यक आहे. अशा केसेस मध्ये केवळ महिन्याभरात आरोपीला शिक्षा व्हायला हवी.

  • सहमत आहे. एका महिन्यात शिक्षा झाली की सगळ्यांना वचक बसेल. खाली विजयसिंहजी होलम यांची कॉमेंट वाच 🙂 अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्राचा क्राइम रेट बिहारच्या खाली आलेला कधी आणि कसा पहायला मिळणार?

   • Sarika says:

    Gunhegarich praman he vadhatch challay. Train madhye pakit marna sodun dilay pan aata bhar rastyat lutatat. parva marol area madhye SBI samor bhar rastyat divsaujedi bikevarun donghani eka baichya galyatla mangalsutra khechun nela… ata bola… chorun ghadnarya chorya/gunhe aata dolyasamor ghadu lagle aahet. UP Bihar madhye mhanal tar svatachya kutumbatch purush etar striyanvar naat n lakshat gheta balatkaar kartat. kutumbabaher tar vicharaylach nako.

    • सारिका
     मान्य.. की रस्त्यावर प्रमाण वाढलंय. एकदा एखाद्याला पकडून जसे रेल्वे मधे पाकिटमाराला धुतात, तसे धुतले पाहिजे, मगच त्यांना वचक बसेल.

 5. Manmaujee says:

  हेरंब ला अनुमोदन, अश्या लोकांना जोपर्यंत कायद्याची भीती बसत नाही तो पर्यंत हे असच होत राहील!!!भर चौकात या लोकांचे हात पाय तोडले पाहिजे!!

  • अशी कामं कायदेशिरपणे होत नाहित. पुर्वी एखादा खिसे कापू लोकलमधे सापडला की मग त्याची येथेच्छ धुलाई व्हायची,.इतकी की लोकलमधे खिसे कापणं बंद करून टाकलंय त्या चोरांनी. अशी धास्ती बसायला हवी, तरच काहीतरी आळा बसेल या घटनांना.

 6. vikram says:

  स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याची सवय वाढली आहे
  जाहिरात असो वा चिअर्स लीडर उत्तेजना वाढवण्यासाठीच स्त्रीचा वापर झालेला दिसतो 😦

  • बिक्रम
   या गोष्टी आयात केलेल्या आहेत आपण. गुण नाहीत पण केवळ दोषांसहित..
   जाहिरातीवर खालची कांचनची कॉमेंट अतिशय उत्कृष्ट आहे.

 7. vidyadhar says:

  ह्या सगळ्याची कारणं फार गुंतागुंतीची आणि संमिश्र आहेत…पण गुन्हा निन्दनीय आणि घृणास्पद आहे..आणि शिक्षा त्यामानाने फारच सौम्य आहे….

  • विद्याधर
   कारण मिमांसा करित नाही मी, पण शिक्षा सौ़म्य आहे हे खरं. डिलेड डीसिजन इज डिनाइड डिसिजन हे इथे अगदी खरं ठरतं

 8. कडक कायदे आणि झटपट निकाल अश्या केससचा हाच उत्तम पर्याय. लाज तर सोडाच लोकांच्या मनात भीतीच नाही कायद्याची..अश्या लोकाना असा कडक शासन हवा जसा काही मुस्लिम राष्ट्रात आहेत.

  • कायद्याला घाबरतात, तुमच्या आमच्या सारखे.. ’त्यांना’ काहीच भिती नसते. कारण माहिती असते की काहीच होणार नाही म्हणून.

 9. अतिशय वैचारिक विवेचन. नेहमीप्रमाणेच.

 10. शेव्हींग क्रिमच्या जाहिरातीत स्त्रीचं काय काम असतं? आमचा परफ्युम लावला की पोरी पटतात अशी आपल्या उत्पादनाची जाहिरात करणं आवश्यक आहे का? पुरूषप्रधान संस्कृती आता मागे पडली असं आपण म्हणतो पण ही सर्व त्याचीच उदाहरणं आहेत.

  म.टा. मधील लेख वाचून वैतागून परवाच मुली झाल्यात दीडशहाण्या?! हा लेख लिहिला. कधीही कुठेही होणारी बळजबरी, अगदी ऑफिसमधे सुद्धा सहका-यांकडून मिळणारी ’मादी’ची वागणूक हे प्रकार घृणास्पद आहेत. बलात्कार झालेल्या स्त्रीकडे समाज निर्मळ दृष्टीने पहात नाही कारण आपला समाज योनिशुचितेला अवाजवी महत्त्व देतो. बलात्कार झाला म्हणून जणू काही त्या स्त्रीच्या हातून मोठ्ठं पातक घडलं असा आव त्या स्त्रीच्या आजूबाजूचे लोक आणतात.

  जमदग्नीची पत्नी रेणूका पाण्याला गेली असताना तिने एका राजाची स्त्रियांसोबत चाललेली क्रिडा पाहिली म्हणून परशुरामाला तिचं मुंडकं उडवावं लागलं. जर त्या प्रसंगाला आपण त्या काळची ब्ल्यू फिल्म असं म्हटलं तर आजकाल ब्ल्यू फिल्म म्हणून जे काही चालतं त्यासाठी किती पुरूष आणि स्त्रियांचीही मुंडकी उडवायची?

  ज्या सितेने रावणाकडून सुटका झाल्यावर अग्निपरिक्षा देऊन स्वत:चं पावित्र्य सिद्ध केलं होतं, त्याच सितेला एका धोब्याच्या विधानावरून त्यागणार्‍या रामाची पूजा करतो आपण! रावण जास्त नितिमान नाही का? कारण त्याने सितेवर बलात्कार नाही केला.

  ह्या आपल्या पौराणिक कथा आपल्याला अनैतिक कृत्य करण्यास पाठबळच देतात. अरब देशांमधे म्हणे स्त्री पुरूष अनैतिक वागले की त्यांना जबर शिक्षा होते पण मग याच देशांमधे बाहेरून मुली का पाठवल्या जातात? ग्रासरूट लेव्हलवर जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की बरीचशी कारणं एकमेकांत गुंफली गेली आहेत आणि या साखळीच्या आत आपण सर्वच अडकलेले आहोत. लोकसंख्या वाढली पण नोकर्‍या नाहीत, नोकर्‍या नाहीत म्हणून बेकार वाढले, भूक, उपासमारीतून असहायता वाढली, चिड निर्माण झाली, असंतोष निर्माण झाला, परिणामी गुन्हे वाढले आणि गुन्ह्यांचं जस्टिफिकेशन करता यावं म्हणून कायदा तोडून मोडून वापरला जातो आहे.

  जातीय दंगली असोत की राजकीय खेळ्या, स्त्रीला वापरून घेण्याची वृत्ती समाजात बोकाळतच चालली आहे. बलात्काराच्या केसेसमधे क्वचितच झटपट निर्णय लागतात, तेही फिर्यादी स्त्रीची आर्थिक बाजू भक्कम असेल तर आणि तिला व्यव्यस्थित पाठींबा असेल तरच.

  • जाहिरातींचा झालेला अतिरेक , ब्लेड चि जाहिरात , आणि त्यामधे मुलगी. चॉकलेटचा मुलगा, नाकाचा तुकडा तोडून मुलींकडे भिरकावुन निघुन जाणारा, आणि मुली त्याच्या अंगाचे ( चॉकलेटचे शरीर दाखवलंय़) लचके तोडताना पाहुन तर घृणा यायची.
   अशा अनेक जाहिराती आहेत , की ज्यामधे स्त्रियांसाठी नसलेल्या प्रॉडक्ट्स साठी पण त्यांनाच घेतले जाते.
   मुली झाल्या दिडशहाण्या लेख वाचला, पण अजुन व्हिडिओ पहाता आलेलान नाही. घरी गेल्यावर तो व्हिडीओ पहायचाय .

 11. manjiri says:

  Manmaujee शी सहमत.
  गुन्हेगार आणि त्यांना पाठीशी घालणारया राजकारण्यांचा तीव्र संताप येतो.
  आरोपी ला लवकरात लवकर आणि अशी जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे कि परत असे गुन्हे घडणार नाहीत.
  पण त्याचबरोबर स्त्रियांनी पण सावध आणि जागरूक होणं गरजेच आहे, अनावश्यक risks टाळल्या पाहिजेत.

  • मंजिरी
   स्त्रियांनी सावध रहायलाच हवं. त्या पुण्याच्या केस मधे त्या मुलिला हिंजेवाडीतुन पुण्याला नेलं, तिथून निगडी कडे नेलं, ते तिच्या लक्षात आलं नाही – किती आश्चर्याची गोष्ट आहे? ती जर सावध असती तर थोडा आरडाओरडा करुन लोकांचे लक्ष वेधुन घेता आले असते.
   पहिली गोष्ट अनोळखी गाडीत लिफ्ट घेतली, दुसरी गोष्ट निष्काळजी राहिली. नाहीतर कदाचित हा गुन्हा टळला असता?

 12. कायद्याची भिती नसने हे प्रमुख कारण!

 13. sahajach says:

  दामिनी सिनेमातला मिनाक्षी शेषाद्रीचा आक्रोश सारखा आठवत होता ही पोस्ट वाचताना… ती देखील हेच म्हणत असते की ज्या स्त्रीवर अन्याय होतो तिला हे भर समाजात विचारले जाणारे प्रश्न अधिक खच्ची करतात!!! तो सिनेमा होता त्यामूळे त्यात ३ तासात न्यायदान आटोपले…प्रत्यक्षात ३० वर्षेही लागतात…..

  मागे केव्हातरी एक कविता वाचली होती, लेखक कोण नाही आठवत पण असाच अन्याय झाल्यानंतर सुरू झालेल्या कोर्टकेसचा निकाल वयाच्या नव्वदाव्या वर्षी हातात मिळालेल्या पिडीत स्त्रीची व्यथा होती त्या कवितेत……

  अस्वस्थ व्हायला होते पण कटु सत्य हेच आहे की या प्रकाराचे प्रमाण वाढतेय!!!

  शिक्षा अतिशय कडक आणि त्वरीत होणे हाच पर्याय आहे!!!!

  • आपल्या कायद्यामधे एक म्हण आहे, म्हणतात हजार दोषी सुटले तरीही चालतील पण एका निर्दोष माणसाला शिक्षा नको.
   याचाच फायदा घेतला जातो सगळी कडे.
   बिहारपेक्षा महाराष्ट्रात जास्त बलात्कार ही बातमी मला डीस्टर्ब करायला पुरेशी ठरली.

   • vidyadhar says:

    काका,
    बिहारपेक्षा महाराष्ट्रात जास्ती हे शब्दशः घेऊ नका….त्याचा खरा अर्थ आहे कि महाराष्ट्रात जास्त नोंदले जातात…!

 14. महेंद्रजी,
  तुम्ही म्हणता ते ठीक आहे. मात्र लेखाचे शीर्षक खटकते. आपणच आपल्या राज्याची बदनामी करण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा उचलण्यास काय हरकत आहे? मुळात केवळ कायदे करून गुन्हेगारी कमी होत नसते. त्यामुळे गुन्हे रोखणे हे फक्त पोलिस आणि सरकारचे काम आहे, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्यासाठी समाजाचा रेटा आवश्‍यक आहे.
  याच विषयाशी संबंधित एक उदाहरण सांगतो.. नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्‍यात अंबिका डुकरे या महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करून खून झाला होता. या घटनेला आता तीन वर्षे झाली आहेत. पूर्वी एका बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगून आलेल्या अनिल जगन्नाथ पवार याने हे कृत्य केल्याचा संशय असल्याने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पवारने यापूर्वी अशाप्रकारचे अनेक गुन्हे केले होते. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली ती भोगत असताना तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. त्या काळात त्याने हा दुसरा गुन्हा केला. तो आज तागायत फरार आहे. गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी जंगजंग पच्छाडले, पण तो सापडला नाही. नेवासा परिसरातच त्याचे वास्तव्य आहे. हा भाग म्हणजे काही मुंबई नाही. तरीही तो सापडत नाही. कारण लोक त्याच्याबद्दल पोलिसांना माहिती देत तर नाहीत, उलट काही लोक त्याला जेवण पुरवितात. त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि पोलिस त्या भागात गेले, की आधीच त्याला ही हालचाल समजते अन्‌ तो फरार होतो. विशेष पोलिस पथक स्थापन केले, पोलिस 24 तास त्या भागात तळ ठोकून होते, तरीही तो सापडला नाही.
  दुसऱ्या बाजूला इतर लोकांनी याचे राजकीय भांडवल केले आहे. याविरोधात अनेक मोर्चे आणि आंदोलने झाली. विधानसभेत प्रश्‍न उपस्थित झाला. सरकारला धारेवर धरण्यात आले. ज्या काळात ही घटना घडली, तेव्हा त्या भागातील पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. सुमारे वर्षदीड वर्ष हा गोंधळ सुरू होता. एकीकडे आंदोलन करणारे लोक अन्‌ दुसरीकडे त्याला आश्रय देणारे लोक. तरीही सर्वांची ओरड पोलिस आणि सरकारच्या विरोधाताच. त्यानंतर मात्र या प्रकरणाचा सर्वांना विसर पडला आहे. आता आंदोलने होत नाहीत, आणि पोलिसह आरोपीला पकडायला जात नाहीत.
  आपल्या समाजात “मला काय त्याचे’ ही जी वृत्ती आहे, ती घातक आहे. गुन्हेगारांना आश्रय देताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना, आपल्या समोर गुन्हा घडला तरी मदतीला न धावणाऱ्या लोकांना काय म्हणावे. समाजाच्या या बेफिर वृत्तीचाच गुन्हेगार फायदा उठवतात. हाच समाज जागृत झाला आणि आसपासच्या घटनाघडमोडींकडे डोळसपणे पाहू लागला तर बराच परिणाम होऊ शकेल.
  ही जागृती करण्याचे त्यासाठी चांगल्या गोष्टी, उदाहरणे, टिप्स जनतेसमोर आणायचे काम करावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत माध्यमांकडून याची फारशी अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे आपण ब्लॉगर्सने यामध्ये पुढाकार घ्यायला काय हरकत आहे?

  • विजयसिंहजी
   मला पण माझ्या लेखात तेच सांगायचं होतं, की “मला काय त्याचे ही वृत्ती सोडायला” हवी.

   तुम्ही वर दिलेली केस इतकी बोलकी आहे की ती वाचल्यावर अजुन काही लिहायला शिल्लकच रहात नाही. जनतेने जागरूक व्हावे अशी आपण अपेक्षा करतो, पण त्या माणसाचा त्या भागातला दरारा , त्याच्या विरुध्द लोकांना जाउ देण्यापासून दूर ठेवतो. जर त्याच्या विरुध काही केले, तर आपल्या घरातही तो घुसेल, ही भिती असतेच शेवटी.

   विरप्पन पण कर्णाटक सरकारला सापडला नव्हता कित्येक वर्ष! कारण एकच.. “फिअर इज द की”. लोकांच्या मनातली भिती!!

   या विषयीचे कायदेच इतके लवचिक आहेत की दोषी माणसाला शिक्षा होत नाही , आणि झाली, तरी पण अगदी लहानशी शिक्षा होते.

   लेखाचे शिर्षक हे मनातली चीड संताप आणि आपण काही करू शकत नाही म्हणून आलेलें वैफल्य- यातुन लिहिल्या गेले आहे. आज आपल्या महाराष्ट्रात बलात्कारांची संख्या बिहार पेक्षा जास्त आहे, हे वाचलं आणि हे शिर्षक जन्माला आले.

   ब्लॉगर्सचे लेख हे जनतेमधे जागरुकता आणणारे असावेत ह्यात काही शंकाच नाही.. अवश्य काही तरी करू या . मी पण मला काही सुचलं तर तुम्हाला इ मेल पाठवतो.

 15. मी says:

  काका,

  विषय भयानक आहे, यात प्रामुख्याने सामाजिक विषमता – आर्थिक, राहणिमान,संस्कार, चालिरिती यातील विषमता हा प्रामुख्याने भाग येतो.आपल्यापेक्षा विषम परिस्थिती‌ असलेल्या व्यक्तीची सकारात्मक/नकारात्मक पद्धतीने ओढ असतेच .. कदाचित कुतूहल म्हणून किंवा हेवा, मत्सर म्हणून. रेपच्या ज्या केसेसच मोठा आरडा-ओरडा झाला त्यातील साम्य म्हणजे सुशिक्षित स्त्री‌ / कु-शिक्शित पुरुष किंवा उलटे .. असो पण हि एका अतिभयाकतेची‌ सुरूवात असू नये.

  चिंतनाशिवाय टिपण्णी म्हणजे मुर्खपणा, पणा जाता-जाता : प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, पेप्पर-स्प्रे जवळ ठेवावा !

  • “रेपच्या ज्या केसेसच मोठा आरडा-ओरडा झाला त्यातील साम्य म्हणजे सुशिक्षित स्त्री‌ / कु-शिक्शित पुरुष किंवा उलटे .. असो पण हि एका अतिभयाकतेची‌ सुरूवात असू नये.”
   हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता. कदाचित एकदम हाय प्रोफाइल स्त्रिया गुन्हा नोंदवायला पुढे येतात, किंवा एकदम लो लेव्हलच्या, म्हणून असे वाटत असेल. बजाज नावाच्या आय ए एस स्त्री ने गिल वर लावलेला उत्पिडनाचा चार्ज शेवटी सुप्रिम कोर्टात पोहोचलाय.
   अजूनही तिला बिचारीला न्याय मिळालेला नाही.. हे नियम, कायदे .. त्यांचाच प्रॉब्लेम आहे.

 16. prakash says:

  Dil Se

 17. joshu says:

  mahilana ajun sudha upabhogachi wastu manal jat purush he nehmich tychyakade upbhog mhanun ach bagt aale ahet aata sudharnyachi wel aahe purshano sudhraa aate

  • युगाने युगे चालत आलेली समाज व्यवस्था आहे ही. मी पूर्वी कुठेतरी वाचलंय की पुर्वी म्हणे इंग्लंड मधे बायकोला मारतांना फक्त अंगठ्या इतकी जाड लाठी वापरता यायची, आणि यावरूनच ’थंब रुल’ हा शब्द निघालाय. पण आता मात्र स्त्रियांनीच स्वतः समोर येऊन या दुष्टचक्रातून बाहेर निघायला हवं.

 18. Nilesh says:

  Kaka hi karac moti sokantika aahe aani yala jababdar hi media aani he pudhari lok aahet. aani aaple niskirya sarkar stevat kutlahi paksh aala tari tyanchi tendanci kahi badalnar nahi.
  tyashati aaple शिवाजी महाराजांचा kayda pahije direct hatpay kalam kiva kadelot

 19. Pingback: अब्रू ची किंमत किती आहे हो?? | काय वाटेल ते……..

 20. zmanoj says:

  “आपल्या कायद्यामधेच इतक्या पळवाटा आहेत की त्यातून सुटणे किंवा जामिनावर बाहेर निघणे सहज शक्य होते- पंधरा दिवसात बलात्कार करणारा पुरुष जेलच्या बाहेर जामिनावर निघतो.खरं तर अशा केस मधे अतिशय सोपी केस होऊ शकते ही. जर त्या स्त्रीची मेडीकल केली आणि डीएनए चेक केले तर बलात्कार सिध्द होऊ शकतो. त्यासाठी इतर काही चौकशीचा फार्स करण्याची गरजच नाही.”
  बऱ्याच केसेस ह्या ब्लॅकमेलिंगच्या असतात. फक्त डी.एन.ए. चाचणी करून बलात्कार झाल्याचे स्पष्ट होत नाही. शारीरिक संबंध सिद्ध होतो.

 21. suresh kulkarni says:

  आपले दोन्ही लेख वाचले .परवाच रामदेव बाबांचे चुंबन घेतल्याची बातमी लोकमत मध्ये वाचली .आणि ह्रितिक रोशनने एका महिला पत्रकाराकडे चुंबनाची अभिलाषा केली .यावर एक खमंग पोस्ट महेंद्र कुलकर्णी लिहितील काय?

 22. Mahadev says:

  विषय भयानक आहे, यात प्रामुख्याने सामाजिक विषमता – आर्थिक, राहणिमान,संस्कार, चालिरिती यातील विषमता हा प्रामुख्याने भाग येतो.आपल्यापेक्षा विषम परिस्थिती‌ असलेल्या व्यक्तीची सकारात्मक/नकारात्मक पद्धतीने ओढ असतेच .. कदाचित कुतूहल म्हणून किंवा हेवा, मत्सर म्हणून. रेपच्या ज्या केसेसच मोठा आरडा-ओरडा झाला त्यातील साम्य म्हणजे सुशिक्षित स्त्री‌ / कु-शिक्शित पुरुष किंवा उलटे .. असो पण हि एका अतिभयाकतेची‌ सुरूवात असू नये.

  चिंतनाशिवाय टिपण्णी म्हणजे मुर्खपणा, पणा जाता-जाता : प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, पेप्पर-स्प्रे जवळ ठेवावा !

  • धन्यवाद. आणि ब्लॉग वर स्वागत.. 🙂 जेंव्हा सारख्या बलात्काराच्या बातम्या येतात तेंव्हा खरंच संताप येतो.

 23. विनायक बेलापुरे says:

  अलीकडे माजलेल्या अराजकाने सुन्न व्हायला होते.
  कुणीही उठावे ४-५ जणांचा जमाव बनवावा किंवा दबावगट बनवावा आणि स्त्री पासून लोकशाहीपर्यंत कशावरही बलात्कार करावा इतके साधे आणि सोपे समीकरण झालेले आहे.

  निवडून येण्याची क्षमता हा राजकीय पक्षांचा निकष झाल्यावर आपले काम करणारा तो कार्यकर्ता , मग तो काहीही करेल तर त्याच्यासाठी कुणालाही फोन लावून दबाव आणून सोडवून घेणे सुद्धा साहजिक होणारच. आणि आपण काहीही केले तरी खपते आणि आपण सुटतो, न्याय पालिकेच्या क्लिष्ट प्रोसिजर्स मध्ये किमान १०-२० वर्षे आपण हवे ते निवांतपणे करू शकतो हे लक्षात आल्यावर असेच होत राहणार यात शंका नाही.

  ज्यांच्या हातात सुरक्षा दिली ते डोळ्यावर कातडे ओढून बसलेले धृतराष्ट्र असताना ‘महाभारत ‘ होणे अपरिहार्य होऊन की काय असे वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s