चविने खाणार गोव्याला..

गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या   पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या  राहिल्या होत्या ,  म्हणून हे पोस्ट लिहायला घेत आहे.

मराठी मंडळीवर पूर्व प्रसिध्द पोस्ट जसंच्या तसं टाकतो, आणि मग पुढे उत्तम गोवनिज जेवण मिळण्याच्या काही जागांची माहिती पण देतो. ह्या सगळ्या जागा मी स्वतः जाउन बघितलेल्या आहेत, त्यामुळे अगदी निःसंकोच पणे या हॉटेल्स मधे तुम्ही जाऊ शकता. पहिली गोष्ट म्हणजे त्या हॉटेलमधलं जेवण ऑथेंटीक गोवनिज असते, आणि दुसरे म्हणजे जेवणाची चव , आणि क्वॉलिटी चांगली असते, तसेच जेवणाचे दर पण खूप जास्त नसतात केवळ अशाच जागांची   यादी देतोय.

सगळ्या मस्त्याहारी लोकांना गोवा म्हणजे जीव की प्राण असतं   कदाचित म्हणुनच माझं पण  फेवरेट शहर आहे गोवा. गेल्या कित्येक वर्षात दर महिन्याला कामानिमित्य एक तरी व्हिजीट असतेच गोव्याला. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे २०-२५ वर्षापुर्वी मी वास्कोला महाराजा हॉटेल मधे किंवा अन्नपुर्णा मधे उतरायचो. अन्नपुर्णा मधे रुम फक्त ४० रुपयांना मिळायची. तेंव्हा दररोजचा डीए पण फक्त १२५ रुपये होता. वास्को मधे उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे एमपीटी ( मार्गोवा पोर्ट ट्रस्ट ) मधे काम असायचं, जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन ज्या भागात काम असायचं तिथेच रहाणं व्हायचं..

नंतर एक कर्मा म्हणुन हॉटेल निघालं, तिथे पण बरेचदा उतरलो आहे. काही जवळचे मित्र पण वास्को, बागोमोलो ला रहातात – हे पण एक कारण असेल.

नंतर मात्र काही मडगांवच्या वुडलॅंड्स मधे रहाणं सुरु केलं. वुडलॅंड्स हॉटेल जरी बरं असलं, तरी रुम सर्व्हिस च्या नावाने अगदी बोंब असायची, तरी पण काही दिवस इथेच उतरायचो. माझा एक फारच जवळचा मित्र, त्याने घर बांधलं चिनचिनिम ला, आणि मडगांव तिथुन जवळ, म्हणुन इथे मुक्काम सुरु केला. मडगांवला एक नानुटेल म्हणुन हॉटेल आहे. अतिशय सुंदर आणि निटनेटकं हॉटेल. स्विमिंग पुल वगैरे असल्याने , गोवा टुर म्हंटलं की स्विमिंग ट्रंक सुटकेस मधे टाकायची हे नक्कीच..

स्विमिंग ट्रंक वरुन आठवलं, एकदा बागोमोलो बिच वरच्या पार्क प्लाझा मधे उतरलो होतो. नाही- गैरसमज नको, फाइव्ह स्टार मधे मी कधीच उतरत नाही, कारण डिए तितका नसतो आमचा, तेंव्हा फक्त एक कॉन्फरन्स ऑर्गनाइझ केलेली होती म्हणुन तिथे उतरलो होतो. हॉटेलचा प्रायव्हेट म्हणता येइल असा बिच आहे. बिच वर समुद्रात पोहायला गेलो. समुद्र अतिशय रफ आहे इथला . तसेच इथली रेती पण खुपच रफ आहे. समुद्रातुन डुंबुन बाहेर आलो  आणि काठावर बसलो थोडावेळ. तर ही रेती स्विमिंग ट्रंक मधे दोन मांड्य़ांच्या मधे जाउन बसली. तेंव्हा लक्षात आलं नाही, पण जेंव्हा उठुन चालणं सुरु केलं तेंव्हा मात्र घर्षणाने मांड्यांची वाट लागली. कधी एकदा रुमवर जाउन शॉवर घेतो असं झालं होतं. असो.. नंतरचे दोन दिवस कॅंडीड क्रिम लाउन जखमा कुरवाळण्यातच गेले.

जेंव्हा गोव्याच्या हॉटेल्स बद्दल बोलतो आहोच, तर गोवा टुरिझमच्या चिप रेट हॉटेल्स चा उल्लेख करायलाच हवा. अगदी मोक्याच्या जागेवर आणि सुंदर प्रॉपर्टी म्हणजे गोवा टुरिझम ची हॉटेल्स, सुरुवातीच्या काळात टुरिझम ला बढावा देण्यासाठी ही हॉटेल्स इथे सुरु करण्यात आली होती. मी स्वतः इथे थांबणं कधीच प्रिफर करत नाही- पण जर कोणी इथे येणार असेल तर मी ही हॉटेल्सच नेहेमी रेकमंड करतो. समुद्र किनाऱ्यावरची यांची प्रॉपरटी व्हॅल्यु फॉर मनी चा अनुभव देते.    ग्रॅसिऍनो कॉटेजेस हे कोलवा बिचवरचं हॉटेल माझं फेवरेट झालंय किंवा सिल्व्हर सॅंड !! .

चविने खाणार गोव्याला हे हेडींग देउन हॉटेलची माहिती काय लिहित बसलोय मी?? गोव्याला आल्यावर रुम टेरिफ मधे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो. तोच नेहेमीचा कट फ्रुट्स, कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, ऑम्लेट, साउथ इंडीयन डिश एखादी, पोहे उपमा वगैरे काही तरी असा बफे नेहेमीच असतो. ह्याची कॉस्ट जरी रुम मधे इन्क्लुडेड असली तरी मी मात्र नेहेमी ऑथेंटीक गोव्याचा ब्रेक फास्ट घेण्यासाठी नेहेमी बाहेर एखाद्या लहानशा टपरी मधे जातो.

गोव्याचा ब्रेकफास्ट म्हणजे भाजी पाव किंवा भाजी पुरी.. इथे हा शब्द याच क्रमाने म्हणजे भाजी आधी, आणि नंतर पुरी किंवा पाव असे म्हंटले जाते. एखादी उसळ, त्यात बटाट्याची सुकी भाजी चिरलेला बारिक कांदा आणि पाव किंवा पुरी असा हा नाश्ता असतो. या नाश्त्या सोबत जर इच्छा असेल तर एखादी मिर्ची  ( म्हणजे बेसन लाउन तळलेली मिरचीची भजी) पण घेउ शकता. या भाजीमधे गोव्याचे लोकल हर्बस घातल्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. बरेचदा भाजी सदृष्य़ गोवनिज कुर्मा पण असतो.

गोवन भाजी पाव बटाटा सुकी भाजी+ पातळभाजी विथ पाव. उडीपी हॉटेलमधे खायला जाउ नका. खास गोवनिज हॉटेल्स मधेच चांगली क्वॉलिटी मिळते

साधारण मिरी असतात ना त्याच्या आकाराची बारिक फळं असलेला मसाल्याचा पदार्थ आता नाव आठवत नाही त्याचं. अगदी मिऱ्याप्रमाणेच गुच्छा असतो त्यांचा पण. एकदा मी घरी आणला होता हा मसाल्याचा पदार्थ. ह्याचा उपयोग जेंव्हा एखादी थोडा जास्त वास असणारी फिश करी करायची असते तेंव्हा  केला जातो. आता नांव आठवत नाही त्या पदार्थाचं, पण त्याचा फ्लेवर अप्रतिम असतो. याच्या वापरामुळे भाजी पावाची चव एकदम वेगळीच होऊन जाते.

जाम भरलेले बन आणि सोबत चहा. हे आपल्या समोरच तळून देतात. कॅलरीची काळजी करू नका खातांना. उगिच पश्चाताप होतो . मी गोव्याहून येतांना हे बन्स नेहेमी विकत आणतो.

गोव्याला असलो की एखाद्या शॅक मधे जाउन असा नाश्ता करुन दिवसाची सुरुवात करणे मला जास्त आवडते. भाजी पाव खाउन झाल्यावर   होम मेड बन नावाचा एक अतिशय टेस्टी प्रकार इथे मिळतो. (पण त्यासाठी शुध्द गोवनिज हॉटेलमधेच जावं लागेल तुम्हाला) या बन च्या सेंटर मधे कधी तरी थोडं जाम वगैरे पण असु शकतं भरलेलं . हा होम मेड गोवनिज बन आणि चहा घेउन ब्रेकफास्ट संपवायचा. दुपारी एक वाजेपर्यंत भुक म्हणजे काय याची जाणीव पण होणार नाही.

सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर वाटेल की खुप झालं ,आज जेवण टाळू, पण दुपारी एक दिड वाजला की पोटात उंदीर कबड्डी खेळणं सुरु करतात – आणि आपोआपच पाय एखाद्या हॉटेल कडे वळतात.. गोव्याची हवाच तशी आहे !! दुपारच्या वेळेस जेवणासाठी एखाद्या एसी हॉटेलात जायचं म्हणताय?? छे छे.. नाही. गोव्याला गेल्यावर गोव्याचं ऑथेंटीक जेवण घेण्यातच मजा आहे – मग ते एसी असो वा नसो. बरेचसे लहान लहान रेस्टॉरंट्स आहेत गोव्यात .पण नेहेमी जाउन काही जागा आता पक्क्या झालेल्या आहेत.  पणजी जवळचं नदिकिनारच्या स्टार मधे गेलात  तर शेल फिश क्रिस्पी फ्राय मस्त असतो. कोलोस्ट्रॉल ची काळजी कींवा ऍलर्जीची काळजी न करता खायचा पदार्थ आहे हा. अतिशय मसल्सने भरलेला मांसल पदार्थ – अप्रतिम असतो. इतर ठिकाणी मिळेल तर विचारू शकता.

एअरपोर्टवरुन मडगांवकडे निघाले असाल तर हॉटेल मार्डोल नावाचं एक चांगलं हॉटेल आहे – याच हॉटेल मधे अभिषेक बच्चनचा फोटो पण लावलाय – तो जेंव्हा इथे आला होता तेंव्हाचा. या ठिकाणी स्पेशल फिश थाली मागवली की त्यामधे – शार्कचं  मटण, फिश फ्राय – या मधे चणक असेल तर तोच घ्या. नाहीतर नॉर्मल किंग फिशचा पिस मिळतो, सोबतच चिंबोऱ्या, क्रॅब्स्चा एक तुकडा -टांग, आणि  करी असते. करी मधे प्रॉन्सचे पिसेस अगदी मुबलक प्रमाणात असतात. जर इतकं नको असेल तर नुसती साधी फिश थाली पण मागवता येते. त्यामधे फिश चा पिस, करी आणि राइस असत. सोबत सोलकढी हवी असेल तर एक्स्ट्रॉ मिळते.

अनंताश्रम, वास्को

पण माझी स्वतःची फेवरेट ठिकाणं म्हणाल, तर वास्कोचं अनंताश्रम  . या ठिकाणी जाउन फक्त फिश करी राइस ऑर्डर करायची.   अनंताश्रमचं ऍम्न्बिअन्स मला आवडतो.  टिपिकल फिशफ्रायचा वास नाकात शिरतो , हॉटेल मधे पोह्चल्या बरोबर  आणि पोटातले उंदीर पुन्हा कबड्डी खेळु लागतात. भिंतीवर मारिओ मिरांडाच्या शैली मधे काढलेली पेंटींग आहेत. त्यातलं फिशर वुमन चं पेंटींग मला खुप आवडतं. अनंताश्रम मधे जेवणाची ऑर्डर द्या आणि येइ पर्यंत थंड बिअरचा आस्वाद घेत बसा. गोव्याला जाउन बिअर न पिणॆ म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन न घेणे होय.इथली फिश करी पण मला आवडते. लंच टाइम मधे म्हणजे एक ते दोन या वेळात ह्या हॉटेलमधे जाणं टाळा,. खुप गर्दी असते.

कोळीण -मारीओ मिरांडा स्टाइल पेंटींग

इथे   फिश चा पीस गोवनीज स्टाइलने फ्राय केलेला असतो, करी मधे दुसरे लहान फिश आणि प्रॉन्स वापरतात.   भाताचा डोंगर बघितला की आधी तर भिती वाटते की हा संपेल तरी कसा?? पण एकदा संपुन पुन्हा एकदा एक हेल्पिंग ऑर्डर करायची वेळ यावी इतकी सुंदर टेस्ट असते इथल्या जेवणाची. एक्स्ट्रॉ राइस मागवला तर पुन्हा राइस+ फिश फ्रायचा पिस असतो , सोबत वाटी मधे करी, एका भागात चिंबोरी, आणि थोडी कसली तरी भाजी. आणि खोटी कढी ( गोवनिज मित्रांना समजेल हा काय प्रकार आहे तो.

खोटी कढी आणि बिअर. हे कॉम्बो पण मला आवडतं.

अनंताश्रम थाली. फिश करी , चिंबोरी, आणि एक व्हेज असते या मधे. सोलकढी एक्स्ट्रॉ

सोलकढी मधे नारळाचं दुध घातलेलं असतं, नुसत्या आमसुलाची सोलकढी म्हणजे खोटी  सोलकढी) फिशचा एक पिस आपल्यासारख्यांना कमी पडतो म्हणुन ऑर्डर करतानाच एक्स्ट्रॉ फिश फ्राय मागवावा. शक्यतो चणक मिळेत तर जास्त उत्तम नाहीतर बांगडा वगैरे पण चांगला असतो. माझ्या बरोबर असलेला मित्र किंग फिश चा शौकीन म्हणुन मी तरी पुन्हा किंग फिशच मागवला. गोव्याला आल्यावर पाम्प्लेट वगैरे टाळणे उत्तम. तो ब्राह्मणी मासा मला तरी फारसा आवडत नाही. :)

मडगांवचं अशोका हॉटेल पण खुप मस्त आहे . पहिल्या मजल्यावर चढलॊ की सरळ एसी रुम मधे जाउन बसा. टिपिकल खानावळ सदृष्य़ हॉटेल आहे हे . इथलं पण जेवण अतिशय सुंदर असतं. गोव्याला गेलात तर इथे नक्की या एकदा. गोवनिज फिश फ्राय आणि करी ऑर्डर करा इथे. इथली सोलकढी पण खुपच छान असते.

अशोका हॉटेल थाली.सगळं काही अनंताश्रम प्रमाणेच, फक्त सोलकढी जास्तीचा आयटम असतो

गोव्याला असतांना मोठ्या हॉटेल मधे जेवायला गेलात तर  फिशचा पिस करी मधेच शिजवलेली फिश करी मिळते  पण त्या पेक्षा फिशचा पीस वेगळा रवा फ्राय ( मसाला फाय टाळा गोव्याला आल्यावर) आणि सोडे, प्रॉन्स, लहान फिशचे पिसेस घालुन केलेली वेगळी करी  लहान हॉटेल्स मधे मिळते ती मला जास्त आवडते. म्हणुनच मी शक्यतो लहान शॅक्स मधे जेवायला जातो गोव्याला असलो की.

खुप वर्षापुर्वी गोव्याला बिचोलिम जवळच्या सेसा गोवा माइन्स आणि डेम्पो माइन्सला जावं लागायचं. जेवणं त्यांच्या कॅंटीन मधेच व्हायचं . मोठा डॊंगर भाताचा.. तिखट जाळ करी आणि पाव असा मेनू असायचा. इथेच एकदा चुकुन बिफ खाण्यात आलं होतं.  :(
असो.

गोव्याला बरेच नॉर्थ इंडीयन्स/ आणि इतर टूरिस्ट  येतात. हॉटेल मधे बघावं तर इथे येउन पण तंदुरी रोटी ऑर्डर करतात- आणि नंतर मग हमारे यहां तो ऐसा नही होता बहुत अच्छा खाना होता है असे म्हणतांना नेहेमी ऐकतो. त्या जागेची जी स्पेशॅलिटी आहे ती ऑर्डर न करता इतर काहीतरी ऑर्डर करुन मग अशा कॉमेंट्स करणे मुर्खपणाचे वाटते मला तरी. ज्या भागात जावे, तिथलाच लोकल पदार्थ ट्राय करावा, असे माझे स्वतःचे मत आहे.

गोव्याला बागोमोलो बिच वर जायला पण मला आवडतं. पार्क प्लाझाचा कॅसिनो नेहेमी खुणावत असतो . तिथे जाउन एक दोन हजार रुपये घालवल्या शिवाय काही चैन पडत नाही मला तरी. अर्थात नेहेमीच घालवतो असेही नाही. पण पोकर खेळायची एक चांगली जागा आहे ती. तर त्या बिचवरच  एक जॉन ची शॅक आहे. तिथे जाउन प्रॉन्स फ्लेवर्ड पापड ( याला ते लोकं वेफर्स म्हणतात ) आणि बिअर अप्रतिम कॉम्बो असतं. सोबतचं एखादी फडफडीत मासळी तळुन मागवा .. बस्स.. खल्ल्लास!!! मेंदु एकदम तृप्त होऊन जाइल.

खादाडी साठी तर गोवा हे माझं फेवरेट ठिकाण आहे. फक्त ख्रिश्चन हॉटेल्स मधे ते जे व्हिनेगर वापरतात, त्याचा वास मला आवडत नाही म्हणुन शक्यतो हिंदु हॉटेल्सच मी प्रिफर करतो. तुम्ही दोन्ही ट्राय करु शकता..

आता हे सगळं लिहिल्यावर खाली काही माझ्या आवडीच्या खास गोवनीज  हॉटेल्सची नांवं देतोय . सगळ्या ठिकाणी मी स्वतः ट्राय केलेले आहे, तेंव्हा अगदी  बिनधास्त जा या हॉटेल्स मधे. खास गोवनिज जेवणासाठी.

१) अशोका हॉटेल.. पहिला मजला , लोटस इन जवळ, किंवा गोल्ड स्टार जवळ, मडगांव

२)अनंताश्रम – वास्को. फेमस आहे हे हॉटेल कोणीही सांगेल कुठे आहे ते.

३) भोसल्यांची खानावळ :- वास्को.. ही पण जागा फेमस आहे. (  या वेळेस गेलो होतो,  थॅंक्स प्रविण  माहिती दिल्या बद्दल)

४)हॉटेल रिट्झ :- ऍरोमा जवळ, हेल्थ सेंटर जवळ,  पणजी

५)शीला हॉटेल :-  कोर्तालिम वास्को रोड वर असलेले ..

६)हॉटेल विस्तार :- कस्टम होम जवळ , पणजी

७)अजंता हॉटेल :- पणजी

८) तातो हॉटॆल :- पणजी, फोंडा, मडगांवला आहे यांच्या शाखा. ( गोवन व्हेज)

९)हॉटेल मार्दोळ:- एअर पोर्ट ते मडगांव रस्त्यावर ,

१०) मार्टीस कॉर्नर:- बेतलबाटीम ला आहे हे. सचिन तेंडूलकरचे हे फेवरेट हॉटेल . मजोर्डा च्या रस्त्यावर आहे. कोलवा पासुन दहा मिनिटार. अ्प्रतिम फिश असते, पण थोडी महाग. एकदा जायलच हवं

११) भाजी पाव साठी कुठलेही गोवनिज मालकाचे लहानसे हॉटेल

१२) कोलवाचे शेरे पंजाब :- तंदूरी फिश साठी

१३) अन्नपुर्णा :- वास्कोचे स्नॅक्स साठी

१४)केंटूकी :- कोलवा बिच ( हे ते फ्राइड चिकन वाले नाही) गोवनिज करी राइस मागवा इथे बरा असतो.

१५) ग्रासियानो कॉटेजेस :- कोलवा, इथे लेमन फिश छान असते.

काही सुटली असतील, तर गोवनीज मित्र , किंवा नुकतेच गोव्याला जाउन आलेले  ऍड करतीलच.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to चविने खाणार गोव्याला..

 1. गोवा म्हणजे कसे एकदम सुशेगाद!!! जायचे आणि पडून रहायचे.

  आणि हे काय? या वेळी पण रेषाद मसाला फिश नाही? काय राव. एकदा चाखा की ती पण चव.

  • रेषाद मसाला फिश नावाने मिळालं नाही फिश. ते आमसूल घातलेलं ब्राउन करी मधलं फिश आणून दिलं त्याने.
   दुसरं काही तरी नावाने मिळत असेल ते.

 2. Vidyadhar says:

  शुद्ध शाकाहारी(‘शॅक’आहारी नव्हे) असूनसुद्धा फोटोमुळे भूक लागली मला….

  • विद्याधर
   कोणे एके काळी मी पण फक्त शाकाहारी होतो.. आता फक्त ’शॅक’ अहारी, किंवा फिश अहारी झालोय. कधी वाटलं पण नव्हतं की मटनाच्या दुकानासमोरुन खाली मान घालून ( मट्नाकडे न पहाता ) जाणारा मी.. कधी असा पण होईल म्हणून… पण काहीही होऊ शकतं या जगात!!

 3. ngadre says:

  first things first..
  Tumhi great ahat.
  Hee post printout kadhoon reference book mhanoon thevali pahije..

  Khoopda goa la gelyaane yaatalya baryach goshti identify jhalya..

  Amot tik..kinva ambat tikhat kahi faar avadala nahi..jaastach ambat hote.

  Madhe Vainguinim resort madhe gelo.

  Tithe grand buffet madhe 40 50 prakaarachya goan delicacies hotya..veda jhalo..tithe casino madhe hee 4 5 hajar ghalavale..shaant vatale..

  Goa chi safar parat ghadavoon analit..thanks..

  Yanda Sankelim beach var Mhakool khalle..chhaan lagale daru sobat..

  Ata ek thodya bhari hotels var pan post liha pls..

  • एक कन्फेशन,
   गोव्याला मी फक्त अशाच हॉटेल्स मधे जेवायला जातो. इतर हॉटेल्स मला फारशी आवडत नाहीत.
   प्रश्न पैशाचा नाही, पण या हॉटेल्स मधली क्वॉलिटी अप्रतिम आहे. 🙂

 4. manohar says:

  रेशाद मसाला हा मसाल्याचा प्रकार आहे. तो माशात भरून मासा तळला ज़ातो. त्याला दुसरे नाव नाही.
  फिश करीमध्ये वापरावयाच्या फळाना तिरफळे म्हणतात.

 5. तुम्ही कसे काय हे फोटो बीटो मारत बसता बुवा? आत्ताच मटन खिमा आणि डोसा खाऊन आलो. अर्ध खाऊन झालं आणि मग म्हटलं अरेरे फोटो काढायला हवा होता.
  आणि आत्ता नॉनव्हेज चेपून आलो तरी तुमची पोस्ट वाचून पोटात पुन्हा आग पडली. तुम्हाला आणि भगवंताच्या त्या मस्त्या वताराला शिरसाष्ट्ांग नमस्कार .

 6. Namaskaar! Tumcha blog vachum mazya kityek athvani tazya zalya. I am Pravin Patade’s wife and was brought up in Goa. With each line of your blog I relived my fabulous years in Goa. My father worked at MPT. In high school/college, we used to have all our birthday “treats” at Annapurna and all family occasions were celebrated ar Maharaja or John’s shack (at Bogmalo). I have always been a big fan of Ananthashram and Bhosle’s khanaval (now you know where Pravin got this priceless knowledge from). The pictures in your blog made my mouth water! I miss it soooo much. The best bhaji paav I had was at the Goa university canteen. I ate is everyday for 2 years and was never tired of it 🙂 Oh well, I better stop now…I could go on forever… 🙂

  Thank you for the wonderful writeup and fabulous picture.

  Dev borey karu,
  Sheetal.

  • शितल
   धन्यवाद. जॉनच्या शॅक मधे मी तर नेहेमीच जायचो. इतक्यातच बंद झालंय. बागोमोलो बिच वरची ती सुजाता हॉटेल शेजारची शॅक , पुढल्या वेळेस नक्की जाणार. त्याच्याकडेच ते प्रॉन्स फ्लेवर्ड चिप्स खाल्या होत्या.

   गोवनिझ जेवण मुंबईला फक्त कोंकण्याच्या खाणावळीतच ( बांद्रा हायवे वरचे गोमंतक )चांगलं मिळते. फक्त रेट्स गोव्याच्या दुप्पट~!! तरीही वर्थ आहे जाणं.

   गोवा व्हर्सिटी मधे कधी जाणं झालं नाही.. पण एखाद्या वेळेस चान्स मिळेल तर नक्कीच जाईन.

   महाराजा पण चांगलं आहे गोव्याचं, पण अनंताश्रमला किंवा भोसल्यांना पर्याय नाही. 🙂

 7. काय बोलू काय नाय..तुम्ही या शाकाहारी माणसाच्या पोटात पहाटे पहाटे आग लावलीत 😀

 8. Aditya says:

  Namaskar

  Aapan jo miri sadrushya prakar mhanat hota tyala “Tirphala” asa mhantat.

  Aapla lekh vachun parat govya madhye javasa vatla.

  Aditya

  • आदित्य
   गोवा माझी फेवरेट जागा आहे. केवळ चांगलं फिश खायला मिळतं म्हणून!!कामानिमित्त मला महिन्याभरातून एकदा तरी जावं लागतंच गोव्याला. 🙂

 9. रोहन says:

  ज़रा थांबता येत नाही तुला… 😀 अजून ४-५ दिवसांनी येतोय मी तिकडे मग टाक की काय हवे ते पोस्ट … 😀 इकडे हालत ख़राब आहे आता… काय खाऊ ???? चायला…

 10. सागर says:

  आधीच माझ गोवा कन्सल झालय .. 😦 पन पोस्ट उपयोगी आहे खुप…

 11. Rajvi says:

  sir, tumhi jo masalyachya padarth aanla hota tyala “TIRFALE” mhantata. bangdyachya currymadhye to agadi must asato. tyamule vegalich taste yete.

  • धन्यवाद. जेंव्हा विकत घेतला तेंव्हा नांव विचारलं होतं, पण नंतर मात्र विसरून गेलो. काही गोष्टी एकदा विसरल्या कि मग पुन्हा काहीही केलं तरीही आठवत नाहीत बरेचदा..

 12. हे नेहमी असंच होतं. गोव्याहून आलेला माणूस तिथे काय काय खाल्लं याची रसाळ यादी द्यायला लागतो आणि मग शुशा असल्याचा पश्चात्ताप व्हायला लागतो कधीकधी. आमच्यासारख्यांसाठी तिकडे खाण्याची बोंबच 😦

 13. Rajendra Mengane, Madgao, Goa says:

  Mahesh, My brother send me your article by mail. Then I went to your blog. I am native of Kolhapur, but staying here in Madgao, Goa for last 19 years. I liked your article. I have also tested food at some of the hotels you have mentioned. I like specially Anantashram at Vasco. I agree with you that real taste of the local food we get in only in local small hotel (not in big costly hotels)
  Anyway, next time in your Goa visit, Just try Hotel Kokani which is opposite Hotel Tato at Margao, and Hotel Kokan Kinara, Near Govt.Press, Panaji.
  Here in local newspaper,one weekly article comes on local hotels who serves good food.I have pursuing them too.
  O.K them by.

  • राजेंद्र
   ब्लॉग वर स्वागत आणि प्रदिर्घ प्रतिक्रियेकरताआभार.
   पुढल्या वेळेस (बहुतेक पुढल्या आठवड्यातच यावे लागेल) तेंव्हा कोंकणी ला व्हिजीट नक्कीच !!मडगांवचे तातो मला माहिती आहे. आणी कोंकण किनारा पण पाहिलेले आहे, तिथे पण नक्कीच जाईन पणजीला गेलो की. 🙂
   प्रतिक्रियेकरता पुन्हा एकदा आभार 🙂

 14. Aparna says:

  sluuuuuuuuuuuuuuuuuurppppppppppppppppppppppppp

 15. bhaanasa says:

  आयला… ते जाम भरलेले बन पाहूनच तोंडाला पाणी सुटले…. अगदी उचलून लगेच तोंडात टाकावासा वाटतोय… बाकी तुमचे मत्स्यप्रेम नुसते जबरी चाललेय… 🙂 मडगाव म्हटले की मला आठवतात ती २५ पैशाला मिळणारी जांभळांची पाटी. इतकी रसाळ व भरपूर गर असलेली जांभळे मी कधीच खाल्ली नाहीत त्यानंतर. रुपयाला कोळंबीची पाटीही मिळायची पण ती माझ्या कामाची नव्हती नं…. एक अगदी छोटीशी खानावळ होती…. आमचे बाबा नेहमी तिथून सोलकढी, भात व त्यादिवशी असेल ती रस्सा भाजी आणत… एकदम टेस्टी… अजूनही आठवतेयं.

 16. Prasad says:

  गोव्याला जाउन बिअर न पिणॆ म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन न घेणे होय……………. Lay bhari kaka… Bear pratichi tumchi shraddha pahun.. aananda zala… keep going… n Keep Rocking..!! Maja aali…

 17. Prasad says:

  Prasad :गोव्याला जाउन बिअर न पिणॆ म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन न घेणे होय……………. Lay bhari kaka… Bear pratichi tumchi shraddha pahun.. aananda zala… keep going… n Keep Rocking..!! Maja aali…

  ………आणि ‘कुळ’कर्णी BEEF खाल्लत तुम्ही….????

  • सेसागोव्याच्य साईटला चुकुन खाल्लंय.. आवडलं म्हणुन नाही. दुपारी लंच टाइमला वेळ झाला, कॅंटीनमधे जे होतं ते त्याने आणून दिलं , माहिती नव्हतं तेंवहा…

 18. Pingback: गोवा.. | काय वाटेल ते……..

 19. sonu says:

  hi sir,
  mala sudha udya goa la jaychey..aani mala kharch hi information helpful aahe..thanks alot

 20. ketaki says:

  अर्रर.. जरा चुकलंच.. तुमची ही पोस्ट, गोव्याला जाण्यापूर्वी वाचायला हवी होती.. आम्ही राहिलो होतो त्या “Longuinhos Beach Resort ” पासून शेरे पंजाब आणि कोकण किनारा दोन्ही जवळ होती.. पण या वेळी बीच वरचं चिकन शवारमा मात्र आठवणीने खाल्लं.

 21. mrunal says:

  chan lihila ahe lekh…
  tya guchha asalelya falana ‘Tirfal’ mhantat… he ghalun bangdyanchi amti zakas hote…:P

 22. अनिल गिरीगोसावी says:

  सर, तुमची हि खादाडी सफर वाचून पोटात भर दुपारी अक्षरशा कावळे ओरडायला लागले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s