महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन

दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या  ( कदाचित या पेक्षाही जास्त असतील)  वर निरनिराळी  मराठी साहित्य सम्मेलनं होतात  .मराठी  मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन  हौशे गवशे साहित्यीक तयार होत असतात. सगळी साहित्य सम्मेलनं ही प्रतिथयश लेखकच हायजॅक करतात . म्हणजे असे की काव्य वाचनामधे, किंवा कथा कथना मधे किंवा इतर इव्हेंट्स मधे त्यांच्या ज्येष्ठते मुळे  केवळ त्यांनाच प्राधान्य दिलं जातं आणि नविन साहित्यिक हे दुर्लक्षितच रहातात. त्यामधे अशा  सम्मेलनात नविन – नविन साहित्यिकांना अजिबात काही  बोलण्याचा वगैरे चान्स मिळत नाही- अर्थात ते सहाजिकच आहे.

अ्शा लोकांनी मग काय करावं बर?? मग  बरेच साहित्यिक  आपल्याला मिरवायचा चान्स मिळाला नाही म्हणुन  आपापल्या भागात निरनिराळ्या विभागाची, ज्ञातींची साहित्य सम्मेलनं भरवतात. मग कोंकण मराठी, विदर्भ साहित्य, किंवा दलित साहित्य असो, असे अनेक सम्मेलनं भरवणे सुरु केले आहे . प्रत्येक साहित्य सम्मेलन म्हंटलं की एका साहित्यिकाला अध्यक्ष होता येतं.

या पैकी फक्त गेल्या वर्षीपासून सुरु झलेले परदेशात होणारे साहित्य सम्मेलन, आणि अखिल भारतिय   मराठी साहित्य सम्मेलनाला , आणि दलित साहित्य सम्मेलनाला मराठी मिडीया मधे थोडी फार प्रसिध्दी मिळते.    पण इतर सम्मेलनं मात्र संपुर्णपणे  दुर्लक्षित रहातात.आता हेच पहा नां, ’महिला साहित्य सम्मेलन’ दर वर्षी न चुकता होतं, पण त्याबद्दल एक अक्षरही कुठल्याही वृत्तपत्रामधे छापुन येत नाही. महिला साहित्यिकांनी  निर्मिलेल्या साहित्यावर  चर्चा करण्यासाठी भरणारे महिला साहित्य सम्मेलन पण महत्वाचे असूनही असे का मुद्दाम दुर्लक्षीले जाते तेच समजत नाही.  या सम्मे्लनाची स्वतःची वेब साईट किंवा ब्लॉग पण नाही. जर तुम्ही मिडीया सॅव्ही नसाल, तर तुमची इव्हेंट केवळ तुमच्यापुरतीच मर्यादीत रहाते , हे या गोष्टीचे ज्वलंत उदाहरण.

या वर्षीचे सा्हित्य सम्मेलन पण गा्जवले ते अशोक रावांनी आणि  अमिताभ बच्चन यांनी. कारण काहीही असो, पण सम्मेलन गाजलं हे नक्कीच. मिडीया तर अगदी तुटून पडला होता अमिताभ बच्चन सम्मेलनात येणार म्हणून!   सम्मेलनाध्यक्षांच्या भाषणाकडे आणि इतर लोकांनी  काय म्हंटले या कडे संपुर्ण दुर्लक्षच झाले.  खरं म्हंटलं तर अशा साहित्य सम्मेलनांमधून काहीच साध्य होत नाही. मग ही सम्मेलनं करायची तरी कशाला? शासनाची ग्रांट मिळते म्हणुन केवळ करायचे असे असेल तर त्यात काहीच अर्थ नाही.असं म्हणतात की पुर्वी  कुसुमाग्रज  म्हणाले होते की ही साहित्य सम्मेलनं इस. २००० नंतर बंदच करावीत- पण ती तर अजूनच फोफावताहेत.

या वर्षीचे महिला साहित्य सम्मेलन १०, आणि ११ एप्रिल रोजी विष्णू भावे सभागृह , वाशी येथे अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे सम्मेलन पार पडले.   इंटरनेट वर या संबंधी काय माहिती मिळते ते बघावे म्हणून सर्च केले तर या इव्हेंटबद्दल काहीही माहिती नाही. केवळ  यावर्षीच्याच नाही, तर  या पुर्वीच्या कुठल्याही वर्षी महिला साहित्य सम्मेलन कुठे झाले, कसे झाले , कोण अध्यक्ष होते याची काहीच माहिती मिळाली नाही.  तसेच कुठल्याही वृत्तपत्राने पण या सम्मेलनाची दखल घेतलेली दिसली नाही. आजच्या पेपरला पण एकही बातमी  या विषयावर नाही.जर अशा साहित्य सम्मेलनाला कुठे प्रसिध्दी मिळत नसेल , किंवा जर यापासून मराठी साहित्याचा जर  काही फायदा पण होत नसेल तर हे असे साहित्य सम्मेलनं भरवणे सुरु ठेवण्यात फारसे काही हशिल नाही असे वाटते .

मिडीया एखाद्या इव्हेंटला मोठं करू शकतो,किंवा त्याच्या कडे पुर्ण दुर्लक्ष करून त्याची वाट लाऊ शकतो – हेच ह्या  महिला साहित्य सम्मेलनाच्या घटनेवरून लक्षात येते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , , . Bookmark the permalink.

17 Responses to महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन

 1. सचिन says:

  “महिला साहित्य सम्मेलन” होत हे मला आत्ता तुमची पोस्ट वाचुन समजल. खरच या आधी कधीच काहि ऐकल नाही या सम्मेलना बद्दल.

  आणि काका मिडीया वाल्याच गुलाल तिकड खोबर अस काम आहे.

  खरतर या महिला सम्मेलन वाल्यानी आता मिडीया वाल्याची वाट न पाहता नेटवर ब्लाग/साईट वैगेरे चालु करुन जाहिरात करायला हवी. निदान काहि लोकापर्यत तरी पोहचेल.

  • सचिन
   खरं तर महिलांच्या दृष्टीने मात्र हे सम्मेलन खरं तर खूपच महत्वाचे होते. पण मला तरी वाटत नाही, की मुंबईतल्या लेखिका, साहित्यिका पण या सम्मेलनाला गेल्या असतिल म्हणुन.
   आज पर्यंत इतकी सम्मेलनं झाली, तरीही या बद्दल काहीच माहीती नाही, या पुढे तरी या लोकांनी बोध घेऊन नेट वर प्रसिध्दी करणे सुरु करावे.

 2. या दुर्लक्षित असण्याला आपल्या समाजाची महिलां विषयीची मानसिकता जबाबदार आहे. महिला खूप चांगलं काम जरी करत असतील तरी त्यांना मुद्दाम दुर्लक्षित करून डावललं जातं. अजुनही आपला समाज महिला म्हणजे डोकं नसलेली एक भोगवस्तु, शिकलेली असलीच तर फार काही दिवे लावायची गरजच नाही. जर एखादी बंडखोर निघालीच तर काय अगाउ आणि हाताबाहेर गेलेली आहे…………अश्याच भावना महिलां विषयी असतात. महिला साहित्यीक तरी यातून कशा सुटतील. आणि प्रसार माध्यमांना सानिया-शोएब चं लग्न, कटरिनाचं लग्न, शशी थरूर चं कितवं लग्न या अतिमहत्वाच्या बातम्यां मधुन वेळ तर मिळायला हवा असल्या फल्तू बातम्यांसाठी. आणि महिला साहित्य संमेलन घेउन काय करणार. खोण महिला येतील ह्यांच्या आरत्या ऐकायला? मग आप्ण तरी कशाला आपल्या वर्तमान पत्राची थोडी जागा कशाला वाया घालवा? त्यांना काही अनुदान नाही त्यामुळे आपल्याला पैसे पण मिळणार नाहीत. शेवटी प्रसारमाध्यमे ही समाजाचंच प्रतिनिधित्व करतात. समाजात काय चाललेलं आहे याचं प्रतिबिंब म्हणजे वृत्त्पत्रे.

  • अपर्णा
   एक महत्वाची गोष्ट म्हणजे , बऱ्याच स्त्री साहित्यिकांना पण या सम्मेलना बद्दल फारशी माहिती नव्हती. दूर कशाला, सौ. एका वृत्तपत्राच्या संपादकाशी बोलत होती, तर त्यालाही या बद्दल काही माहिती नव्हते.

   हे सम्मेलन तसे अतिशय महत्वाचे ठरु शकते. कारण भारतामधे स्त्री साहित्यिका जा आहेत, त्यापैकी बऱ्याच कमी स्त्रियांना मराठी साहित्य सम्मेलनात आपलं साहित्य, किंवा त्यावर बोलण्याची संधी मिळते. हे असे केवळ स्त्रियांचे साहित्य सम्मेलन हा एक मह्त्वाचा माइल स्टोन होऊ शकला असता, पण केवळ खानापुर्ती साठी हे सम्मेलन केले जाते असे वाटते.

   आजचे प्रमुख कार्यक्रम म्हणून एक कॉलम असतो, त्यामधे पण याचा उल्लेख नव्हता. बरेचदा माहेश्वरी महिला मेळावा असला तर त्याचीही माहिती असते.. पण … ह्या बद्दल कुठेही काहीही छापुन आलेलं नाही.

   आपला मिडीया इतका एकांगी कसा काय असू शकतो?? हे बघून खरंच वाईट वाटलं.

   इंटरनेट्वर प्रसिध्दी नसणे, तसेच कुठल्याही वृत्तपत्रात प्रसिद्धी न मिळाल्याने या इव्हेंटबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हती. प्रसिध्दीमाध्यमांचा योग्य वापर न करणे हेच या सम्मेलनाच्या अपयशाचे कारण आहे असे वाटते.

 3. sahajach says:

  महेंद्रजी असे काही साहित्य संमेलन असते हेच माहित नव्हते!!!

  तुमचे मनापासून आभार ..तुम्ही ही माहिती आमच्यासमोर आणलीत….

  • हे केवळ महिला साहित्यिकांना बोलण्यासाठी, व्यासपीठ मिळावं म्हणून सुरु झालेले साहित्य सम्मेलन असते. अगदी ग्रंथ दिंडी पासून सगळं काही होतं या सम्मेलनात.

   सुपर्णाची इच्छा होती यावर लेख लिहिण्याची,आणि त्यासाठी ती जाणार पण होती कव्हरेज करायला ( म्हणूनच तर मला पण समजलं की हे असं साहित्य सम्मेलन आहे म्हणून), पण थोडी तब्येत खराब असल्याने जाउ शकली नाही.

 4. अगदी बारीक सारीक बातम्या सुद्धा पेपरमध्ये छापुन येतात. अरुणा ढेरेंसारख्या अध्यक्षा असुनसुद्धा या महिला संमेलनाची कुणाला काही खबर नाही म्हणजे कमाल झाली.

 5. vidyadhar says:

  काका,
  ह्या विषयावर देविदास देशपांडे ह्यांच्या ब्लॉगवर छान लेख आहेत. कदाचित तुम्ही वाचले असतील..
  http://akbrahms.blogspot.com/

 6. आज काल सगळ्यात महत्वाची ती मार्केटींग, यातच कमी पडले हे…

  • इथे मार्केटींगची गरज पडायलाच नको. मला वाटतं की ह्या महिलांच्या सम्मेलनामधे ऐश्वर्या बच्चनला बोलावलं असतं तर बरेच कव्हरेज मिळाले असते. 🙂 मुर्खांचा बाजार आहे नुसता झालं.

 7. arundhati says:

  महिला साहित्य संमेलन विषयक बातमी मला फक्त सकाळ मध्ये दिसली!! असेच एक महिला साहित्य संमेलन कोल्हापूर ला होणार म्हणून गेल्या वर्षी सकाळ मध्ये बातमीही छापून आली होती, व त्यानिमित्त आयोजित निबंध सपर्धा ”निवेदन”मध्ये! त्यामुळे तर मला कळले की असेही साहित्य संमेलन असते म्हणून! मात्र ह्या अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाला मीडियाकडून काहीच प्रसिद्धी नाही हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती ह्याच क्षेत्रातील महिला पत्रकारांनी पुढाकार घेऊन बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत व सर्व जबाबदार, सुजाण नेटर्स, ब्लॉगर्सनी ही अशा बातम्यांना नेटाने पुढे आणणे महत्त्वाचे ठरेल!
  http://72.78.249.125/esakal/20100228/5031147373615514052.htm

  सस्नेह
  अरुंधती


  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  • अरुंधती,
   साहित्य सम्मेलनं बरीच होतात, पण हे विशेष महत्वाचे होते असे वाटते. ब्लॉगर्स आणि नेट युझर्स नी या गोष्टीला पुरेशी प्रसिध्दी द्यायला हवी हे अगदी योग्य, पण स्वतः कोंकण मराठी साहित्य परिषदेने तरी स्वतःची साईट, पत्रकार परिषदा, किंवा गेला बाजार कमीत कमी स्वतःचा ब्लऑग जरी सुरु केला तरीही पुरेशी प्रसिध्दी मिळू शकते. मला असे वाटते की या इव्हेंटच्या संयोजकांनी यापुढे तरी काळजी घ्यायला हवी असे वाटते.
   मिडीयाला बाईट्स देण्याचे काम खरं तर संयोजकाचे असते. जर इव्हेंटचा संयोजक जो कोणी होता तो जर ऍक्टिव्ह किंवा प्रो मीडिया नसेल तर कुठेही काहीच छापुन येणे शक्य नाही. कुठलीही इव्हेंट प्लॅन केल्यावर वेळोवेळी त्यावर काही तरी छापुन येणं महत्वाचं असतं- इव्हेंट लाइव्ह रहाण्याच्या दृष्टीने. इथे नेमकं तेच चुकलं आयोजकांचे..

   लिंक करता आभार.

 8. खरंच काहीच माहित नव्हतं या संमेलनाबद्दल. किंबहुना असं संमेलन दरवर्षी होतं ही तर बातमीच आहे माझ्यासाठी. पुढच्या संमेलनाला आपण ब्लॉगर्स लोकांनीच त्याचा प्रसार, प्रचार केला पाहिजे. प्रसार माध्यमं गेली खड्ड्यात !!

  • सहमत आहे. पण एकच वाटते संयोजकांनी पण काहीतरी करणे आवश्यक आहे, मला पण दोन दिवस आधीच समजले. बायको जाणार होती कव्हर करायला, पण तब्येत बरी नव्हती म्हणून गेली नाही- मला पण जे समजले, ते तिच्यामूळेच… असो.. आपण पुढल्या वेळेस करू या काहीतरी.

 9. Smit Gade says:

  ह्या एप्रिल मध्ये ‘ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन’ होणार आहे ..
  ऐकावे ते नवलच..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s