६५ वी कला…

पुराणामधे  चौसष्ट कलांचा उल्लेख आहे, पण त्या मधे एक कला दिलेली नाही- आणि  ती पण अशी कला आहे की, जी येणं अत्यावश्यक आहे आणि ती आल्याशिवाय  जिवनात नेहेमी कुठेतरी काहीतरी अडणार हे नक्कीच. लहानपणापासून काही बाबतीत मी खरंच अनलकी आहे. दुर्दैवी म्हणायला कसं तरी वाटलं, म्हणून हा अनलकी शब्द वापरलाय. ह्या कलेमधे  पारंगत कधीच होऊ शकलो नाही मी. या कलेशी  संबंध जरी  अगदी शैशवात असल्यापासून आला  तरी प्राविण्य  मात्र अजूनही मीळवता आलेलं नाही.

मिल्क मेड स्वयंपाक घरातून प्रेमाने हाक ऐक आली – ’अहो ’ की त्या हाकेमधले मार्दवाची  लेव्हल  ऐकुन आपल्याला कुठल्या कामासाठी बोलावलंय ते लक्षात येतंय हल्ली. अहो लग्नाला २२ वर्ष झाल्यावर इतकं जर समजलं नाही, तर मग काय अर्थ आहे या २०+ अनुभवाचा?  अगदी सहज हाक मारलेली, थोडी कोरडी- की समजावं माळ्यावरचा डबा, किंवा माळ्यावर कधी तरी लागेल म्हणून ठेवलेलं एखादं भांड वगैरे हवं आहे. थोडं जास्त प्रेमाने बोलावते आहे असं वाटलं , की समजावं, काहीतरी मदत हवी आहे- जसे कांदे चिरून, किंवा कोशिंबिरीसाठी काकडी- टोमॅटो चिरून, किंवा लसूण सोलून हवाय, पण जर अगदी मधात घोळलेल्या आवाजात जर हाक ऐकू आली तर समजायचं की किंवा चटणी साठी  नारळ खवुन हवंय किंवा एखाद्या पायनॅपल स्लाइसचा ,किंवा कौतूकाने आणलेला बेक्ड बिन्स चा डबा किंवा मिल्क मेड च्या डबा उघडून हवाय.

बेक्ड बिन्स कॅनया डबा

डबा उघडण्यात विशेष काय ?  इतकं सोपं नाही राव ते. बाहेरच्या देशात बरं असतात , असे डबे डूबे उघडायला ओपनर असतं, त्या ओपनरने डब्याला लावले आणि करा करा फिरवले की  दहा सेकंदात तो डबा उघडला जातो,  पण आपल्या कडे मात्र अजूनही  आपल्या पारंपारीक हत्यारांचाच उपयोग केला जातो.

आपल्या कडे पण तसे ओपनर  मिळत असावे, पण आपण  कधी शोध पण घेत नाही- टीपिकल आपली मध्यमवर्गीय मेंटॅलिटी- विनाकारण फालतू खर्च कशाला??   म्हणूनच कुठल्याही स्पेशल टूल शिवाय- हा डबा उघडणे म्हणजे पासष्टावी कला आहे असे म्हंटले तरीही हरकत नाही.

असा डबा उघडायची वेळ आली की मी आधी फर्स्ट एड चं सामान कुठे आहे ते शोधणे सुरु करतो. नेहेमीच्या कपाटात तो फर्स्ट एडचा डबा दिसला की जीव भांड्यात पडतो अगदी 🙂 पुर्वीच्या काळी   मिल्क मेडचा डबा उघडायचा, किंवा बेक्ड बिन्स चा डबा उघडायचा म्हणजे आमची जय्यत तयारी सुरु व्हायची. एक लोखंडी उलथनं, किंवा तत्सम टोकदार वस्तू, जुनी सुरी, बत्ता, अशा अनेक गोष्टी गोळा केल्याशिवाय हे काम सुरुच करता  यायचं नाही .

छान डिजाइन सारखं दिसतंय - तेच ते कॅन ओपनर

आजकालच्या डब्यांचं बरं असतं, वर एक लहानशी रिंग दिलेली असते, ती ओढली की वरचं झाकण निघुन येणार!पण पुर्वी तसं नव्हतं, नेस्लेचा मिल्कमेडचा डबा उघडणं म्हणजे एक कसरत असायची. एक    स्क्रू ड्रायव्हर, आणि हातोडी( किंवा बत्ता) निघायची बाहेर टुल किट मधून. स्क्रु ड्रायव्हर ठेऊन त्याला हातोडिने फटका मारला की डब्याला छिद्र पडण्याऐवजी स्क्रु ड्रायव्हरचं वरचं प्लास्टीकचं हॅंडल तुटायचं  -असे  बरेच स्क्रुड्रायव्हर्स तोडलेत मी आजपर्यंत 🙂  .. नंतर नंबर यायचा तो टोकदार लोखंडी उलथणं  (ज्याचा उपयोग फक्त नारळ सोलायलाच केला जातो ) ते ठेउन बत्त्याने मारुन  डब्याला फोडण्याचा प्रयत्न केला जायचा, पण डब्याला छिद्र न पडता, ते लोखंडी उलथणं व्हायचं वाकडं, आणि मग सौ.च्या लक्षात यायच्या आधी त्याला  बत्त्याने ठोकुन ठोकुन सरळ करून ठेवायचं.

त्यानेही जमलं नाही, की  एकदम आठवायचं, अरे ते ने्लकटर आहे नां, त्यामधे आहे की कॅन ओपनर तो वापरुन बघू, आणि मग त्या कॅन ओपनर(????) म्हणुन नेलकटरमधे दिलेल्या त्या टुलने  नंतर ठोकुन ठोकुन बारीक बारीक छिद्र पाडून त्या डब्याचे झाकण तोडून काढायचा प्रयत्न केला जायचा. थोडं लहान छिद्र पडलं, की मग स्कृड्रायव्हर वापरला की तो मोठं करणं सोपं व्हायचं.

उघडायला सोपा कॅन..

मिल्क मेड पण इतकं घट़्ट असायचं की झाकण पुर्ण तोडल्याशिवाय ते बाहेर निघायचं नांव घेत नसे. सांडशी  घेउन त्या अर्धवट तुटलेल्या झाकणाला , दोन्ही पायात डबा पकडून ओढुन काढायचा प्रयत्न व्हायचा, ( कधीच तुटून बाहेर आले नाही अशा ऒढण्याने, पण अगदी ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदा तरी हा प्रयत्न केला जायचाच).  शेवटी हाताने थोडं बाजुला होतं कां ? म्हणुन प्रयत्न करतांना हाताला कुठेतरी लहानशी जखम होऊन रक्त निघणे सुरु होणे, हे पण नेहेमीचेच. शेवटी बराच वेळ कुस्ती खेळल्यावर तो डबा उघडला जायचा. हुश्श!!!! पण हल्ली नेस्लेने त्या डब्याच्या झाकणाला पण  पुल आउट रिंग टाइप केल्यामुळे फार सोपं झालंय ते उघडणं.  मिलियन थॅंक्स टु नेस्ले.. तो डबा आता उघडणे सोपे केल्याबद्दल!!

आम्ही कधी कधी ते बेक्ड बिन्स पण आणतो विकत (शॉपिंग मॉल मधे  बायकोच्या नकळत सामानात एखादा डबा टाकतो आपल्या सामानाच्या ट्रॉली मधे 🙂 ) तो डबा उघडायला कधी कधी खूप सोपा असतो, ( म्हणजे त्याला वरच्या झाकणावर एक रिंग असते ती ओढायची, की मग ते पुर्ण झाकण निघुन येते.) पण बरेचदा तशी पुल आउट रिंग  नसली की मग पुन्हा वर दिलेल्या नेस्लेच्या डबा उघडतांना जी कसरत करावी लागतेच तिच इथे तिचेच पुनरावर्तन होते.

हे असं सिल , आणि त्याखाली रबरी बुच.. डोळ्यांच्या औषधाला

औषधाच्या बाबतित बोलायचं तर , युजवली डोळ्यात टाकायचं आजीचं औषध आणलं की मग त्या  बाटलीचे झाकण काढायचे आणि त्याला ते ड्रॉपर वाले बुच लावायचे हे एक मोठे काम असायचे.  ओरिजिनली त्या बाटलीला एक रबरी बुच असायचं, आणि ते बुच निट जागेवर रहायला त्याला ऍल्युमिनियमच्या सिल ने कव्हर केलेले असायचे. आधी ते ऍल्युमिनियमचे झाकण तोडायचे,   मगच त्या रबरी बुचापर्यंत पोहोचता यायचं. ऍल्युमिनियमचे ते झाकण   तोडुन काढायल काही स्पेशल टुल नसायचे. मग धार नसलेली सुरी  वापरुन ते झाकण उघडायचा प्रयत्न करायचॊ आणि  अर्धवट तुटलेले ते ऍल्युमिनियमचे सिल शेवटी हातानेच तोडून काढावे लागायचे. आणि  ते काढतांना    जखम होऊन रक्त येणे हे नेहेमीचेच !!

कफ सिरपची बाटली

झाकण उघडणे- खोकल्याच्या औषधाच्या बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न केला की सिल न तुटता ते पुर्ण पणे फिरते आणि उघडत नाही-  किंवा, नुसता हात सटकून त्याला झाकणामुळे रक्त येणे – हा अनुभव तर अगदी पाचविलाच पुजलेला आहे. मग ज्या ठिकाणी खालची रिंग आणि झाकण जोडल्या गेलंय त्या ठिकाणी  सुरीने कापुन काढायचा प्रयत्न करायचा.

अगदी हाच अनुभव व्हिस्कीची बाटली उघडतांना पण येतो बरेचदा. पार्टी सुरु करायची, कोणीतरी झाकण उघडायचा प्रयत्न करतो, आणि ते फिरलं की मग झालं!!! म्हणुनच   पट़्टीच्या पिणाऱ्यांची एक पध्दत असते. बाटली  जोरात हलवून नंतर तिच्या बुडावर उलटी करून एक जोरदार थप्पड मारायची, आणि मगच झाकण उघडायचा प्रयत्न करायचा. ९० टक्के तरी उघडतं म्हणतात.. 🙂

जामच्या बाटलीचं झाकण इतकं घट्ट का लागलेलं असतं की उघडतांना पार वाट लागते. यावर पण एक उपाय काढलाय शोधून. त्याला एक लहानसं छिद्र पाडायचं, की मग ते पटकन उघडतं. अशी अनेक  झाकण्ं आहेत की ज्यांनी मला आजपर्यंत खूप छळलंय. लोणच्याच्या बरणीचे झाकण ( फिरकीचे- जे हमखास तिरकं बसलेलं असायचं, आणि मग  उघडतांना वाट लागायची) , किंवा पार्ले  बिक्सिटस चे चौकोनी  लोखंडी डबे , घट्ट बसलेली पितळेच्या जुन्या डब्याची झाकणं काढतांना नखाची वाट लागते! या विषयावर तर इतके अनूभव आहेत की लिहावे तितके थोडेच- म्हणुन थांबतो आता इथेच  !

या ६५ व्या कलेमधे या जन्मी तरी नक्कीच पारंगत व्हायचं अशी अपेक्षा आणि प्रयत्न सुरु असतात माझे !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , . Bookmark the permalink.

38 Responses to ६५ वी कला…

 1. ngadre says:

  apratim..
  Tumche vishay atyant vegale asataat..

  Khoopach sudar post..

  Wine chi corked bottle pan traas dete, jar ka cork opener nasel tar..

  Poorvi Cassette che tight plastic packing yayche te hi pahila tear kadhayala khoop avaghad jayache..

  • नचिकेत
   वाइनच्या कॉर्क बद्दल तर अनिकेतने एक वेगळं पुर्ण पोस्ट लिहिलं होतं, म्हणुन त्यावर जास्त लिहिलं नाही.:)

 2. vidyadhar says:

  माणूस हा अभिमन्यूच नाही का? आधी सील डिझाईन होतं आणि मग अडचण आली की सील ओपनर…!

  • विद्याधर
   चकव्युहात शिरल्यावर बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागतो. प्रत्येक अभिमन्यु चक्रव्युहात शिरुन धराशायी झालेला कसा चालेल?

 3. अप्रतिम..तुम्ही दिलेल्या टिप्स झाकण उघडायच्या नक्की वापरु 🙂

 4. आमच्याकडे पण ही सगळी झाकणं उघडायचे काम बाबा करायचे, अजुनही करतात. ते असे एखादे मुश्किल काम करत असले की आम्ही त्याच्याभोवती गोल करुन बघायचो ते काय काय करतात, तुम्ही वर दिलेल्या सगळ्या युक्त्या ते वापरायचे. तसाच सुगड सोलून त्यातुन नारळ बाहेर काढायचे काम पण बाबा खुप पटकन करतात.
  हल्ली त्या रिंग ओपनर मुळे ते मिल्कमेडचे टिन उघडणे खूप सोपे झाले आहे आणि बाकिच्या तुम्ही सुरुवातीला दिलेल्या मदतींसाठी आता नवरा आहेच 🙂

  • घरमधे असली कामं करायचं काम केवळ पुरुषांकडेच मक्तेदारीने आलेले आहेत.्नारळ सोलतांना खूप त्रास व्हायचा. हल्ली पुर्ण सोललेला आणि फोडलेला नारळ मिळतो. आमच्या घरी स्त्रियांनी नारळ फोडू नये असे म्हणायचे, म्हणुन ते काम पण माझेच होते. 🙂
   वर दिलेल्या इतर कामांसाठी नवरा आहेच 🙂 छान!!

 5. sahajach says:

  महेंद्रजी या विषयावर पोस्ट होऊ शकतं हा विचारच कल्पक आहे….सलाम तुम्हाला!!!!

  पोस्ट तर कसलं भन्नाट झालयं!!! सध्या (आम्ही देश सोडल्यामुळे असेल कदाचित 🙂 ) पण ते जरा महागडं (म्हणजे त्या व्हरायटीतलं त्यातल्या त्यात स्वस्त…कारण तेच कशाला हव्यात या गोष्टी 😉 ) ओपनर आणलय!!! आता जेव्हा कधी ते वापरेन तुमचं हे पोस्ट आठवेल नक्कीच 🙂

  औषधाच्या बाटल्यांचही तेच …त्यात आणि एक प्रकार आहे काही औषधांची झाकणे तळव्याने दाबून फिरवायची मग उघडतात….दिसायला सोपा वाटणारा हा ’व्हॅक्युम टाइट’ प्रकार दरवेळेस ’उघडतच नाहीत मेले वेळेवर ’म्हटल्याशिवाय उघडत नाही 🙂

  लहानपणी मी या औषधाच्या झाकणांसाठी अडकित्ता वापरायचे, आता सुरीवर मांडवली 🙂

  • औषधाच्या बाटलीची ती युक्ती माहिती नव्हती. आता नक्की ट्राय करीन. अडकित्ता मी पण वापरायचो, पण त्याने हाताला हमखास लागायचं, म्हणुन आरी सारखी सुरी वापरणं सुरु केलं.
   आता मी पण ओपनर आणावं कां? हा विचार करतोय, कारण फारसं काम पडत नाही… अगदी केंव्हा तरी…. एखादेवेळेस काम पडतं..

 6. SHARAD says:

  chhan post. amhi hostel la asatana beerchya batalya open karayala darwajachi ubhi kadi waparayacho. tyachya adhi ek dat tutalay thodasa hech udyog kartana.

  • बिअरची बाटली उघडायला, एखाद्या टेबलच्या कडेवर ठेउन त्यावर फटका मारला की उघड्ते बाटली हा शोध पण लागला होता आम्हाला.

 7. झाकणा झाकणा वर लिहिलंय उघडणाऱ्या च नाव

  विनोद

 8. Manmaujee says:

  पोस्ट जबरी झाली आहे…..खोकल्याच्या औषधाच्या बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न केला की सिल न तुटता ते पुर्ण पणे फिरते आणि उघडत नाही- किंवा, नुसता हात सटकून त्याला झाकणामुळे रक्त येणे – हा अनुभव तर खूप वेळा घेतलाय.

  • माझं पण नेहेमीच तसं होतं. म्हणून पुढल्यावेळेस तन्विने दिलेली आयडीय़ा तळव्याने दाबुन फिरवायची ट्राय करणार आहे मी.

 9. ह्यावर पोस्ट तुम्हीच लिहु शकता, पण अनुभव सेम-टु-सेम…

  .. नंतर नंबर यायचा तो टोकदार लोखंडी उलथणं (ज्याचा उपयोग फक्त नारळ सोलायलाच केला जातो )

  एकदम खरं

  • आमच्या घरच्या लोखंडी उलथण्याचा उपयोग केवळ नारळ सोलायलाच केला जातो 🙂 नाही तर कधीच वापरलं जात नाही ते.. ( मला वाटतं प्रत्येकाच्याच घरी असा उपयोग होत असावा लोखंडी उलथण्याचा)

 10. काका सही विषय. एकदम मस्त पोस्ट. मी हल्ली कशावर लिहायचं हा विचार करत वेळ घालवत असतो.

 11. अपर्णा लालिंगकर says:

  {{स्वयंपाक घरातून प्रेमाने हाक ऐक आली – ’अहो ’ की त्या हाकेमधले मार्दवाची लेव्हल ऐकुन आपल्याला कुठल्या कामासाठी बोलावलंय ते लक्षात येतंय हल्ली. अहो लग्नाला २२ वर्ष झाल्यावर इतकं जर समजलं नाही, तर मग काय अर्थ आहे या २०+ अनुभवाचा? }}

  अहो तुम्हाला २० वर्ष लागली ते लक्षात यायला, माझ्या नवर्‍याला तर ३ वर्षांतच समजायला लागलं आहे. मी काय विचरलं की त्य मागची काय भूमिका असेल ते सुध्दा तो प्रेडिक्ट करतो. तुम्ही म्हणाल काय केमेस्ट्री आहे? :):)

 12. हा हा .. तन्वीने लिहिलेलं ते जरा महागडं (कंसासकट) ओपनर आम्हीही आणलं नुकतंच. त्यामुळे आता शिव्या/शाप आणि रक्तबंबाळ हात कमी झालेत 😛

  • तुमचं वाचून मी पण घ्यावं का विचार करतोय- पण काही मुद्दे आहेतच:-

   १) ओपनर जेंव्हा पाहिजे तेंव्हा सापडले पाहिजे
   २)बऱ्याच प्रकारचे असतात, त्यातला कुठला घ्यायचा?
   ३) स्त्रियांना वापरता येणारे मिळते का मार्केटला?
   ४) अजूनही बरेच प्रशन आहेत.. पण थांबतो 🙂

 13. MK या पासष्टाव्या कलेत मी लहानपणापासुनच पारंगत आहे. औषधांच्या बाटलीचे झाकण, गॅस सिलेंडरचे सिल, आणि सॉसच्या बॉटलचे झाकण (बिल्ला ) उघडणे हे माझे आवडते प्रकार. आणि हत्यार म्हणाल तर चमचा, सुरी, लाटणा अशी परफेक्ट हत्यारे 🙂

  अगर घी सिधी उंगली से नही निकलता तो घी का डब्बा उलटा करना चाहिये 🙂 हा वाक्प्रचार देखिल मीच रुजु केला. (मीपुराण संपले !)

  लेख एकदम मस्त झालाय. विषय तर अफलातून. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळाच दिसायचा तसाच बहुदा तुम्हालाही कोठेही पाहिले तरी फक्त लेखाचा विषयच दिसतो असं वाटतंय. लगे रहो, MK !

  • सॉस ची बाटली उघडतांना ( टेबरलच्या कडेवर लावून फटका मारून उघडायचॊ आम्ही, हल्ली नेलकटर मधला ओप्नर वापरतो) बरेचदा त्याची काचेची कडा पण तुटायची.. मग काही होत नाही, काच आत नाही पडलेली वगैरे असा समज करून घ्यायचा…..
   या विषयातलं ज्ञान बाकी अत्यावश्यक गोष्टीमधे मोडते आणि शाळॆत हा विषय ठेवावा का? याचा पण विचार झाला पाहिजे.

 14. महेंद्रजी सलाम….
  वरचा डब्बा काढणे,डब्ब्यांची झाकण उघडणे हे उद्योग आम्हालाही कराव लागतात पण ह्यावर सुदधा इतकी सुंदर पोस्ट टाकता येइल अस कधी वाटल नाही…शिर्षक पाहुन आधी जाहिरातीवर पोस्ट आहे अस वाटल होत कारण जाहिरातीला ६५ वी कला मानले जाते..असो काही बिस्कीट्स किंवा वेफ़र्सच्या पॅकेट न उघडता येणारे लोकही आहेत माझ्या ओळखीतले..

  • हो.. ते वेफर्सचे पाकिट उघडतांना बऱ्याच लोकांची दमछाक होतांना पाहिलंय.ते उघडायची पण ट्रिक आहे एक.. :)एकदम पटकन उघडतं.

 15. Parag says:

  Mahendraji Apratim. Baryach divasani tumachya blog var aalo. Agadi khumasdar lekh … aavadala.

 16. bhaanasa says:

  आम्ही बाबा गेले काही वर्षे या हाणामारीतून… कसरतीतून सुटलो आहोत. आमचे बाबा या कलेत पारंगत पण त्यांचे हमखास हातखंडे नाहीत. प्रत्येक वेळी नवीन युक्ती शोधायची खोड…. मग काय लागणे, अर्धवट पत्रे कापले जाणे आणि शेवटी आईचे वैतागणे… असा सगळा कोटा भरला की मग एक अफलातून ट्रीक जमवून बाबा एकदाचा तो डबा उघडत…. :). तू पण नं महेंद्र, एकदम अफलातून विषय शोधून काढतोस… सहीच रे.

 17. Anula says:

  Mr.Mahendra !

  Really tumche blog vachtna vatle bas aamcha gharatlech sarv sangtay…. ani milkmaidchay daba badle tar agadi tasech…… tase milkmaidch ani majhe far jevalche samandha ….manjhe mala cooking aavadte….ani sweets jara jastch… …navin navin milkmaid jevah market mande aale tevah majhi ani papachi asech kahi tari aavasta asaychi …… karch mala tumch blog farch aavadle…….

  • अनुला
   मनःपुर्वक आभार.. अहो, दररोजच्या जिवनातलाच एखादा प्रसंग घेउन काहीतरी लिहितो- जसं घडलं तसं.. बस.
   आमच्या घरी अंडं पण चालत नाही. सौ. जेंव्हा केक ( बिना अंड्याची- मिल्कमेडची )करायची तेंव्हा माझ्या अंगावर काटा यायचा – की आता तो डबा उघडावा लागणार म्हणुन. 🙂

 18. Pingback: डबा.. | काय वाटेल ते……..

 19. Himasnhu says:

  tumhi ek atyant vital tool visarlat….

  ADKITTA……..

  • अडकित्ता ! हो, अडकित्ता पण बरेचदा वापरलाय. एकदा अडकित्त्यावर बत्त्याने मारले होते ( पितळीअडकित्ता होता ) तेंव्हा तो तुटला तेंव्हापासून बंद झाला अडकित्ता 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s