घरटी लावा- पक्षी वाचवा…

सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते.

पुर्वी आई  लहान बाळाला मांडीवर घेउन कविता म्हणायची, चिऊ ये, काऊ ये, दाणा खा……… त्यातली खरी खरी चिऊ दाखवायला तरी शिल्लक राहिली तर बरं, कारण

चिमणी

आजकाल हा पक्षी फारच  दिसणे तर फारच दुर्मिळ झालय . स्पेशली मुंबईला तर फक्त कावळे आणि कबुतरंच दिसतात ,  चिमणी  कधीतरी चुकुन एखाद्या वेळेस  दिसली तर नशिब म्हणायची वेळ आलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शहरं म्हणजे   नुसतं कॉंक्रीटचं जंगल झालंय. चिमण्यांना   आपलं घरटं बांधायला झाडंच शिल्लक ठेवलेली नाहीत आपण . हीच परिस्थिती लहान शहरातुन पण दिसून येते. घरामधे पण कचरा ्होतो म्हणुन लोकं  पक्षांना घरटी बांधू देत नाहीत.

कालच्या पेपरला एक बातमी वाचली की चंद्रपुरला तापमान ४४ डिग्री झालं आणि बरेच पक्षी मरून पडले. उन्हाळ्याच्या दिवसामधे  विदर्भामधे  बरेच लोकं घराबाहेर पाण्याने भरलेले भांडे आणि थोडे धान्य पक्षांसाठी ठेवतात. ती पक्षी मेल्याची  बातमी  वाचल्याबरोबर शाम  जोशी आठवला. शाम्याच्या खोड्यांबद्दल लिहायचं तर एक मोठा प्रबंधच लिहावा लागेल, म्हणुन आजचं पोस्ट फक्त सर्पमित्र शाम जोशी बद्दलचं!! (सर्पोद्यान तयार करून स्वतःच्या पदरच्या पैशांनी त्यांची देखभाल करणारा हा शाम सारखाच असू शकतो.) भरपूर मेहेनत, व्यायाम आणि उरलेल्या वेळात  हे असे उद्योग म्हणजे शाम जोशी. प्रत्त्येकवेळेस काहीतरी जगावेगळं करायची हौस मग ते घरामधे कोब्रा पाळणं असो, की पक्षी संवर्धन असो.

कोब्रा फ्रेंड्स .. साप निघाला की यांना फोन करायचा, हे लोकं येउन सापाला जिवंत पकडुन रानात सोडुन देतात

मध्यंतरी नागपूरला चक्कर झाली , तेंव्हा यवतमाळला पण जाऊन आलो. अर्थातच जुन्या मित्रांना भेटायला जाउन आलोच.. त्यात पहिला नंबर होता शाम जोशी चा! त्याच्यावर अगदी नविन नविन ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा एक पोस्ट लिहिलं होतं. शाम कडे गेलो तर तो समोरच एक मोठा  डिस्प्ले बोर्ड दिसत होता -कोब्रा मित्र ऍडव्हेंचर क्लबचा – अगदी जुनाट बोर्ड होता तो खराब झालेला – कदाचित कुठल्यातरी प्रदर्शनासाठी  बनवला असावा, पण आता घरी आणुन ्ठेवला होता.     समोरच्या  जिन्याखालच्या लोखंडी तारांच्या जाळीने तयार केलेल्या  खोलीमधे काही मडकी होती ती पहात शाम उभा होता.

मी समोर गेलो तर तो बाहेर आला. घराच्या समोरच्या भागात  छताला त्या जाळीत असलेल्या मडक्यांप्रमाणेच काही मडकी बांधलेली दिसत होती. त्या मडक्यांना दोन छिद्र होती.  विचारलं, की हे काय आहे??  म्हणाला, ” चिमण्यांना ्घरट्यांसाठी जागा मिळत नाही, म्हणून ही अशी मडकी उंचावर थोड्या सावलीत बांधून ठेवायची, म्हणजे त्या मधे चिमण्या घरटी बांधतात .  असं मडकं अडकवून ठेवल्यावर ताबडतोब चिमण्या येत नाहीत. कधी कधी तर सहा महिने ते दिड वर्ष त्या नुसतं निरिक्षण करतात, पण एकदा सुरु झालं , आणि विणीच्या   पिरिय़ड मधे अंडी देणय़ाची वेळ आली की मग दर वर्षी नेमाने त्या ते घरटं वापरतात. मला खूप आश्चर्य वाटलं. समोरच्या घरट्यामधे चिमणीची पिल्लं दिसत होती. शाम्या म्हणाला, की एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे त्या मडक्यांना सारखं हाताळायचं नाही,किंवा सारखं त्यामधे बघायचं पण नाही की चिमण्या आल्या की नाही ते.

शाम जोशी त्याने बनवलेल्या पक्षांच्या घरट्या बरोबर..

दुसरा फोटो शाम जोशीचाच.. बर्ड नेस्ट्स सोबत..

वेगवेगळ्या आकाराची घरटी खास बनवुन घेतलेली. शाम्या वाटतो बरं कां ही घरटी..

चिमण्या आल्या बरं कां या घरट्यामधे. चांगले सहा महिने वाट पाहिली त्यानी, आणि मगच आल्यात त्या.

ही घरटी चिमण्या आणि मैना वापरतात. एकदा तिथे एक पिढी गेली, की दुसऱ्या वेळी, दुसरी चिमणी घरटं टेकओव्हर करते. कन्सेप्ट मला खूपच आवडला. शाम्या म्हणाला, की त्याने स्वतः अशी मडकी बनवून घेतलेली आहेत आणि ज्या कोणाला हवी असतील त्यांना तो ती घरासमोर लावायला वाटतो.  पक्षांच्या नामशेष होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना घरट्यासाठी  सुयोग्य जागा न मिळणे  हेच आहे.

या बाबतित पब्लिक अवेअरनेस  तयार करायला शामने काही हॅंडबिल्स छा्पून वितरीत केली आहेत.  पर्यावरण रक्षणात एक खारीचा वाटा… निसर्गावर एकदम दिलसे प्रेम करणारा शाम् बघितला, आणि पुन्हा आपला लहानपणीचा मित्र ( होळीच्या वेळेस झाडं तोडण्यात सगळ्यात पुढे असलेला ) तो हाच कां? याचा विचार करीत बसलो , म्हंटलं हॅट्स ऑफ टू यु शाम्या.. ग्रेट वर्क!!!

हेच ते हॅंडबिल , जे लोकांमधे जागरुकता निर्माण करायला छापलंय शाम जोशीने.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged , . Bookmark the permalink.

61 Responses to घरटी लावा- पक्षी वाचवा…

 1. काका, खुपच अप्रतिम माहिती सांगितलीत.. ही बर्ड नेस्ट्सची आयडिया खूपच सुंदर आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी घराच्या बाहेर पाणी ठेवण्याविषयी ऐकलं होतं. पण ही घरट्यांची कल्पना उत्तमच..

  • हेरंब
   धन्यवाद. अरे मी विसरूनच गेलो होतो कॉमेंट्सला रिप्लाय करायचा आहे ते.. साधी मडकी आहेत ती. त्याला दोन छिद्र आहेत पक्षांना पिलांना भरवता यावी म्हणुन. बस्स!

 2. Aparna says:

  माझा अशा सगळ्या प्रकल्पांना फ़ुल्ल सपोर्ट आहे…इथे आमच्या बागेत आम्ही नेहमी दोन-तीन विकत मिळणारी घरटी ठेवायचो. खूप छान छान घरटी इथे मिळतातही..

  • अपर्णा
   बरेच लोकं बर्ड हाउस लावतात. पण हल्ली फ्लॅट्स मधे कचरा होतो म्हणुन पक्षांची घरटी बांधली जाउ देत नाहीत.

 3. सुंदर माहिती आहे, काही दिवसात मीही नक्की यासाठी मदत करेन… धन्यवाद महेंद्रकाका

  • एखादं साधं मडकं बांधून ठेवलं तरीही हरकत नाही. एखाद्या झाडावर उंच बांढलं तरी चालतं.

 4. सोनाली केळकर says:

  मला सुद्धा आवडेल असे बर्ड नेस्ट आमच्या घराशी लवायला. शोधायला हवे कुठे मिळते ते. रोहनच्या घरी पण लावलेत असे तो म्हणाला होता.

 5. खुपच छान आणि कौतुकास्पद उपक्रम आहे शाम जोशी यांचा….आपला सलाम त्यांना…बाकी लवकरच ह्यांसारख्या उपाययोजना केल्या नाही तर भावी पिढीला चिमण्यांसारखे पक्षी फ़क्त छायाचित्रातच पाहायला मिळतील…

  • देवेंद्र
   खरंय अगदी!! पक्षी वाचवायलाच हवेत.. आपल्याकडुन शक्य होईल तेवढा अवेअरनेस क्रिएट करायला हवा.

 6. खरच, त्या मुकया प्राण्यांची काळजी किती कमी जण करतात. प्रत्येकाने काही प्रमाणात याच पालन केला तर किती निष्पाप जीव वाचतील…
  आमच्या घरी आहे जुन्या स्पीकर वापरुन बनवलेला मस्त घरट. 🙂

 7. Manmaujee says:

  काका खूपच अप्रतिम माहिती आहे. बर्ड नेस्ट कल्पना खुपच सुंदर आहे.

  • खरंच मी जेंव्हा पाहिलं, तेंव्हा मला या लहानशा कृती मधे त्याची कमिटमेंट दिसली. खरंच इतका विचार कोण करतो हल्ली?

 8. bhaanasa says:

  आमचे बाबा इथे आले असताना त्यांनी सुंदर व पक्षांना अतिशय चटकन आकर्षित करणारी व वावरायला सोपी अशी घरटी बनवली होती. आणि अगदी नेमाने पुढचे पाचही वर्षे पक्ष्यांनी त्यात अंडी-पिल्ले घातली. खरेच आजकाल चिमण्यातर पाहायलाच मिळत नाहीत…शाम जोशींचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे.

  • मस्त वाटतात पिलं. मी बघितली शामच्या घरच्या घरट्यामधे. निर्भेळ आनंद असतो पक्षी पहाणं म्हणजे.

 9. खूपच छान माहीती. आमच्या पुण्याच्या घरी बाहेरच्या व्हरांड्यात असंच एक चिमणीचं घरटं बनवलेलं आहे. त्यात अनेक चीमण्यांनी आपली घरं बनवली. आम्ही त्याला चीमण्यांचं मॅटर्नीटी होम म्हणायचो. चीमणीने अंडी घातल्यापासून आम्ही त्या घरट्याकडे लक्ष ठेवायचो. मग पिल्लांची किणकिण ऐकू यायला लागली की आमची आई सकाळ संध्याकाळ तुप घातलेला मऊ भात तिथे ठेवायची. मग हळूहळू धान्यातल्या आळ्या साठवून त्या ठेवायच्या. मग धान्याचे दाणे. पिल्लं उडून गेली की नवीन पिल्ले. खूप मजा यायची. एकदा एक पिल्लू खाली पडलं तर त्या चीमणीने त्याला तसंच सोडून दिलं. मग आम्ही त्याला कापसाच्या बोळ्याने दूध पाजण्याचा असफल प्रयत्न केला. शेवटी ते मेलंच.

  • अपर्णा
   एकदा त्यामधे चिमण्या किंवा मैना आल्या की दुसर्या वर्षी पासून दर वेळेस नविन पक्षी येत रहातात..
   चिमण्यांचे मॅटरनिटी होम.. मस्त आहे कल्पना..

 10. खर आहे काका. कोकणात अजुन तरी चिमण्या दिसतात पण आत्ता तुमची पोस्ट वाचल्यावर आठवून पाहिलं, बंगलोरला चिमणी पाहिल्याचं आठवत नाही. तुमच्या मित्राला सलाम. साध्या साध्या गोष्टीतून आपण खूप काही करू शकतो.

 11. vidyadhar says:

  हे एकदम सहीच आहे काका. आयडिया जबरदस्त आहे.

 12. सर्वाना उपयोगी पडेल आशी आपण माहिती दिली. मस्त ,खूपच छान आहे,

 13. वा! मातीची घरटी खूपच छान! पुण्यात कुठे मिळतात ते शोधायला हवे. सुदैवाने आमच्याकडे बागेत बरेच वेगवेगळ्या रंगाचे आणि ढंगाचे पक्षी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी ही घरटी उपयोगी पडतील.
  -निरंजन

  • पैसे टाकायचं गुल्लक असतं तशी घरटी आहेत ही. कुंभाराकडून करुन घेतली होती त्याने मुद्दाम.. आता आपल्या कडे कुंभार कुठे शोधायचा??

 14. sahajach says:

  महेंद्रजी छानच माहिती दिलीत…. अगदी खरय़ं हल्ली पक्षी दिसणे दुर्मिळ झालेय अगदी!!

  आणि श्री. शाम जोशी यांचे अभिनंदन आणि आभार…..हा लेख वाचून काही जण जरी असे घरटे लावू लागले तर खरे सार्थक होईल….

 15. अप्रतिम कल्पना आहे हं काका… ध्यानात आलं की आजकालच्या तळपत्या उन्हात बिचार्‍या पाखरांसाठी गच्चीवर वाटीभर पाणी ठेवण्याची सवय मला आहे, पण ही घरट्यांची कल्पना खुपच आवडली.. त्यावरही प्रयत्न करून बघण्यास काय हरकत!

  • एखादं जुनं मडकं वगैरे असेल तर ते पण दोरीने बांधून ठेवायचं, तोंड एका साईडला येईल असे, त्यात पण पक्षी येतात .

 16. रोहन says:

  मी लाकडाची ३ घरटी बांधली आहेत घरी.. बघुया आता पक्षी कधी येतात ते.. मी स्वतः साप हाताळतो रे… विषारी नाही पण बिन विषारी बिनशर्त… 🙂 आता वर्ष झाले कामात असल्याने कुठे जता येत नाही. आमचा ठाण्यात एक ग्रुप आहे.. कुठे साप निघाला की जाउन पोचायचे तिकडे… मग रवीवारी येउरला नेउन सोडायचो त्याला.. 🙂

  • त्याची एक स्टाइल आहे म्हणतात. साप उचलला की त्याला एका विशिष्ठ पध्दतिने झटका दिला की तो काही करु शकत नाही थोडा वेळ असं म्हणतात.. तुला बोलवीन आमच्याघरी साप निघाला की 🙂

 17. mau says:

  khup chhan mahiti dilit…shaam joshi n cha asa aagalawegala karykram baghun chhan watle…

  • तो अगदी लहानपणापासूनच असा मुलुखावेगळा आहे. काही तरी करीतच असतो नेहेमी पदरचा पैसा खर्च करुन.

 18. tumchi madkyanchya ghartyanchi kalpana khup chan aahe.

 19. mangesh kachewar says:

  From today i am also trying to create home for birds in my home.

 20. majhya parsatil jhadachya dholit , fandivar vaalalelya gavataci gharati tyar keli aahet tyatil eka gharatyat ek chimanyache jodape rahat aahe

 21. kiran says:

  excellent idea!!
  it’s good present for new house warmimg occession

  thanks for great information

 22. nilesh says:

  kharch khup chhan sir…..mala pan lahan panachi athavan ali

 23. nilesh gardi says:

  kharch khup chhan sir…

 24. suresh darekar says:

  thanks for very good idea

 25. Anand V Mahajan says:

  Excellent information.I would like to know where I can get these bird nests in Mumbai.Please let me know by email or on my cell 9869021960.

  • आनंद
   मुंबईला कुठे मिळतं ते माहिती नाही, पण माझ्या मित्राने एका सुताराकडून बनवून घेतले होते लाकडी घर. नाही तर साधं मडकं बांधलं तरीही चालू शकतं.

 26. गणेश सपकाळ says:

  घरताचे फोटो आणि घरटे लावयाची पद्धत खूपच छान आहे…माझ्या घरी ग्यालरीत रोज सकाळी ६ वाजल्या पासून चिमण्या येतात आणि माझी आई आणि मी रोज त्यांना बाजरी टाकतो…बर्याचदा या चिमण्यांना माझ्या घराच्या आजू बाजूला मी घरट्यासाठी जागा शोधातानी पाहतो पण मी चाळीत राहत असल्या कारणाने मनात असूनही घरटे लावू शकत नाही याची मला खंत वाटते…..तसेच मला सर्पमित्र बनायला खूप आवडेल.त्यासाठी काही प्रशिक्षण असते का?

  • गणेश
   सर्प मित्र कसे व्हायचे याची मला तरी काही माहिती नाही. काही गृप कार्यरत आहेत. त्यांची माहिती काढावी लागेल.. 🙂 मिळाल्यास नक्की कळवतो.

 27. अरुण मनोरे ,विक्रमगड ठाणे ४०१६०५ says:

  मी डॉ.अरुण मनोरे -पत्रकार ,पुण्य नगरी आमच्या कार्य क्षेत्रातील वन क्षेत्र पाल आर .ए होरकाटे या बाईने कार्यालया ब्बहेरील पक्षाचा विस्तेचा वास येतो ,घाण होते म्हणून वनाचे रक्षण करणाऱ्या बाईने पक्षाचे घरटी बसण्याची ठिकाणे तोडून फांद्या छाटून झाडे तोडली ,येथील पक्षांना देसो धाडीला लावले ,हे कृत्य अमानुष आहे या बीईवर कायदेशीर कारवाई करण्यची मागणी पक्षी मित्रांनी केळी आहे

 28. किशोर... says:

  पक्षी प़ेमीणा माझा सलाम….
  काका, खुपच अप्रतिम माहिती सांगितलीत.. ही बर्ड नेस्ट्सची आयडिया खूपच सुंदर आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी घराच्या बाहेर पाणी ठेवण्याविषयी ऐकलं होतं. पण ही घरट्यांची कल्पना उत्तमच..

 29. vijay says:

  We provide sparrow House. Contact.what’s app 8698786854.

 30. vijay says:

  We provide sparrow House. Contact.what’s app 8698786854. ना नफा नातोटा

 31. vijay says:

  we provide sparrow nest.. 8698786854

 32. विजय says:

  प्राणी शास्र तज्ञाने तयार केलेली (घरटे डिझाईन) चिमणी घरटी आम्ही तयार करून देतो. Available bucks stock……..we provide sparrow Nest…..contact what’s App 8698786854-

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s