काय वाटेल ते डॉट कॉम

गेले एक वर्ष तीन महिने इथे या ब्लॉग वर नियमित  पणे अनियमित    लिहितोय.सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की आपण काही लिहू शकू म्हणून. पण लवकरच तुमच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे इतके दिवस टिकाव धरलाय .

सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा नाव काय द्यायचं?? हा एक मोठा प्रश्न होता. आपण या ब्लॉग वर काय लिहीणार?  खूप विचार केला- काही सुचत नव्हतं. बरेच ब्लॉग पाहिले होते, त्यामूळे आपण कितपत टिकाव धरू शकू याचाही प्रश्न होताच.

काय लिहायचं आपण? कविता, लेख, की राजकिय??  विचार केला, की काय वाटेल ते लिहू या !!  आणि मग म्हणुन तेच नांव ठेवले ब्लॉगचे. एक वर्ष तीन महिन्यांच्या कालावधीमधे बरंच काही पोस्ट केलं या ब्लॉग वर . एकदा विचार केला की आपला ब्लॉग आपण वर्डप्रेसवरून ब्लॉगर वर हलवू, पण ब्लॉग ची साइझ होती १७ एम बी.. इतका मोठा डॆटा हलवता येत नाही असं समजलं, म्हणून मग तो विचार मनातून काढून टाकला.

वर्ड प्रेस मला मनापासून आवडतं, टेकनिकली वर्ड प्रेस अतिशय सुपिरिअर आहे ब्लॉगर पेक्षा, पण इथे जे लिमिटेशन्स आहेत थिम्स चे ते मात्र खूप त्रास दायक आहेत. इथे तुम्ही बाहेरुन डाउनलोड केलेल्या थिम्स वापरू शकत नाही. कदाचित म्हणूनच असेल की, सगळे वर्डप्रेसचे ब्लॉग्ज एक दुसऱ्याचे क्लोन्स वाटतात 😦

असो.. तर  ह्या सगळ्या कारणां मूळे हे  ठरलं की आता आपल्याला वर्डप्रेस शिवाय पर्यायच नाही, म्हणून शेवटी आज इथेच म्हणजे वर्डप्रेसवरच डोमेन रजिस्टर केले. आज पासुन काय वाटेल ते वर यायला तुम्हाला फक्त  http://kayvatelte.com  टाइप केले तरीही पुरेसे आहे.

हे सगळं करण्याचं कारण?? एकच ’काय वाटेल ते’ वर आपला हक्क रहावा म्हणून..:)

लोभ आहेच, वृद्धींगत व्हावा ही  अपेक्षा..

सस्नेह..

महेंद्र कुलकर्णी

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

39 Responses to काय वाटेल ते डॉट कॉम

 1. अभिनंदन काका… 🙂

 2. Sarika says:

  अभिनंदन काका,

  रोज पीसी ऑन केल्यावर मी सर्वप्रथम ’काय वाट्टेल ते’ वर फेरी मारते. वाचनीय असा ब्लॉग….

 3. लगे रहो महेंद्रजी…. 🙂

 4. ‘काय वाटेल ते.कॉम’ बद्दल अभिनंदन महेंद्रजी…

 5. vikram says:

  mastach ki kaka

  congratess

 6. sahajach says:

  महेंद्रजी अभिनंदन…. 🙂

  असेच उत्तमोत्तम लेख लिहीत रहा ही शुभेच्छा!!!!

 7. Pingback: Tweets that mention काय वाटेल ते डॉट कॉम « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 8. bhaanasa says:

  महेंद्र, अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा! तू असेच भरभरून लिहीत रहा आम्ही आहोतच… 🙂

 9. अभिनंदन… काय वाटेल ते वर तुमचाच हक्क आहे… 😉

 10. सागर says:

  अभिनंदन काका….

 11. सचिन says:

  काका, ‘काय वाटेल ते.कॉम’ बद्दल अभिनंदन

  काय वाट्टेल ते असेच दिवसे दिवस वाढत जावो.

 12. काका, अभिनंदन 🙂

 13. अभिनंदन काका !

 14. अभिनंदन काका…

 15. Sush says:

  नमस्कार महेंद्र,

  या महिन्यातच तुमचा ब्लॉग वाचायला सुरुवात केली… अक्षरशः हावराटासारखी सगळे ब्लॉग्स वाचत गेले आणि इतरांना वाचण्यासाठी सुचवला देखील… फार छान लिहिता तुम्ही.. अगदी साध्या विषयावरही… 🙂

  थोडक्यात सांगायचे तर, आता सवय झाली आहे रोज ब्लॉग वाचायची… तेव्हा ब्लॉग कुठेही हलवलात तरी हरकत नाही… मात्र लिहा…. 🙂

  – सुश

 16. तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक आभार….ही नविन साईट अजून तरी मराठी ब्लॉग विश्व वर जोडल्या गेलेली नाही, पण लवकरच जोडल्या जाइल, तो पर्यंत इथे प्रसिध्द झालेले लेख तिथे दिसणार नाहीत.

 17. महेंद्र……….मनापासून अभिनंदन हं 🙂
  तू असाच भरपूर लिहित रहा…..आम्ही वाचतो आहोत. फार सुरेख लिहितोस तू……….थांबू नकोस 🙂

  • जयश्री
   धन्यवाद. एक वर्ष झालं आणि आता कॉन्फिडन्स आलाय की आपण लिहू शकतो म्हणुनच डॉट कॉम केली साईट.

 18. Manmaujee says:

  काका मनापासून अभिनंदन. . .तुमच्या लिखानातून असाच आनंद वाटत रहा!!! 🙂

 19. vidyadhar says:

  सही आहे काका.

 20. Nilesh says:

  Abhinandan. Apan lekh faar chaan lihita. Keep it UP.

  Cheers
  Nilesh Joglekar

 21. निलेश, विद्याधर, योगेश
  शुभेच्छांकरता आभार..

 22. काय वाटेल ते.कॉम’ बद्दल अभिनंदन महेश कुलकर्णी

 23. krishnakath says:

  अभिनंदन!

  तुम्ही मला आणि कदाचीत मझ्यासारख्या अनेकांना स्फुर्ती देता!

  मी ब्लॉग सुरु करून जेवळपास तीन वर्षे झाली…पण ब्लॉग सुरु केल्यावर एका वर्षातचं उत्साह मावळला, विषय सुचेनासे झाले आणि “वेळ” मिळेनासा झाला.

  तुमचा ब्लॉग बघितल्यावर वाटलं की अनेक विषय आहेत लिहिण्यासारखे! त्यात तुम्ही काम सांभाळून (फिरतीचेही काम सांभाळून) नियमीत नवनववीन विषयांवर लिहिता. तुम्ही येवढे व्यस्त असूनही वेळ काढू शकता….यातुनचं स्फूर्ती मिळते!!

  शुभेच्छा!

  • क्रिश्नकांत
   मी नेहेमी अमिताभ बच्चनचा आदर्श ठेवतो डोळ्यापूढे, जर त्याला वेळ मिळू शकतो तर मला का नाही? एक पानच फक्त टाइप करायचं असतं. तेवढं करायला एक तास पुरतो साधारणपेणे. मी सरळ लॅप्टॉप वर टाइप करतो पोस्ट. आधी पेनने लिहित वगैरे नाही , कदाचित त्यामुळे पण वेळ वाचत असावा..

 24. अभिनन्दन महेंद्रजी

  • हेमंत
   मनःपुर्वक आभार. तुमच्या कौतुकाच्या कॉमेंटसनेच तर लिहिण्याचा उत्साह टिकुन आहे अजून पर्यंत.. ( किती दिवस टिकेल ते सांगता येत नाही म्हणा.. )

 25. Girish says:

  काहीतरी सर्च करता करता काय वाट्टेल ते डॉट कॉम शी भेट झाली
  स्वताचे मन मोकळे करण्यासाठी मस्त व्यासपीठ आहे
  चीड द्वेष राग प्रेम लोभ व्यक्त करण्यास योग्य जागा मिळाली आहे असे वाटते

  एक दोन ब्लॉग वाचले छान आणि जबरदस्त वाटले

  खरे तर हे ब्लॉग वैगेरे काय असते मला नीट माहिती नाही पण जे काही आहे ते वाचायला छान वाटते.
  आपली सुद्धा काहीतरी सामाजिक जवाबदारी आहे अशी जाणीव झाली.

  प्लीज कीप इट अप !!!!!!!!!!!

  • तुमच्या प्रतिक्रियेकरता आभार. काल दिवसभर मी नेट वर नसल्यामुळे उत्तर देण्यास वेळ होतो आहे. स्वतःला एक्स्प्रेस करायला ब्लॉगिंग सारखी दुसरी गोष्ट नाही- असं माझं मत झालंय. कुठल्याही विषयावर आपली मतं असतात, (की जी कोणी ऐकत नाहीत- अगदी बायको पण नाही ) ती आपण ब्लॉग वर लिहू शकतो . 🙂 विनोदाचा भाग सोडून द्या, पण एक सशक्त माध्यम आहे हे. मी गेले सव्वाएक वर्ष ब्लॉग लिहितोय. आणि खरंच सांगतो, ऑर्कुट, फेस बुक, मिपा पेक्षा जास्त एंजॉय करतोय इथे लिखाण.
   मुंबईला आम्ही ९ तारखेला मराठी ब्लॉगर्स मिट अरेंज केलेली आहे. दादर सार्वजनीक वाचनालयात , संध्याकाळी ५ ते ८ या दरम्यान मुंबईचे ( १०० च्यावर रजिस्ट्रेशन झालंय ) आणि होतकरू ब्लॉगर्स ( म्हणजे ज्यांची ब्लॉग सुरु करण्याची इच्छा आहे ते) भेटणार आहेत. मुख्य उद्देश एकमेकांशी ओळख व्हावी आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर ते ऍमिकेबली सोडवले जावे एवढीच माफक अपेक्षा आहे. शक्य होत असेल तर अवश्य या.

 26. दादा, हार्दिक अभिनंदन! खरं सांगायचं तर तुमच्या ब्लॉगचं नाव टाईप करताना ब-याचदा मी wordpress हा शब्द विसरूनच जायचे. मग साईट उघडली नाही की वाटायचं, हे आता या ब्लॉगचं डॉट कॉम करतील तर बरं कारण प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि आत्ता तर पोस्टच चोरी होतायंत, उद्या नावाची पॉप्युलॅरिटी लक्षात आली तर दुसरंच कुणी हे नाव घेऊन मोकळं व्हायचं. तर, अखेर तुम्हीही डॉट कॉम झालात, हे पाहून मनापासून आनंद झाला. पोस्टवर रिप्लाय उशिरा देतेय कारण गेल्या दोन-तीन दिवसात ब्लॉगवाचन झालेलंच नाही.

  • कांचन
   धन्यवाद. रविवारी आपण भेटलो, आणि बोलता बोलता तुम्ही जे म्हंट्लं की मोगरा फुलला ची मालकी रहायला हवी म्हणुन तुम्ही डॉट कॉम केलं.. ते पटलं, म्हणून ताबडतोब ऍक्शन घेतली. आता मब्लॉवी वर कधी अटॅच होतं ते बघायचं 🙂

 27. बरीच उशीरा प्रतिक्रिया देतोय, स्वतःचे हक्काचे डोमेन केलेत हे फार छान झाले! अभिनंदन! तुम्ही माझे स्फूर्तीस्थान आहात. तुमचा ब्लोग पाहण्यात आला नसता तर कदाचित हे लिहायचे खूळ डोक्यात आले नसते 🙂

  • निरंजन
   प्रतिक्रियेकरता आभार. अहो जेंव्हा लिहिणं सुरु केलं तेंव्हा तर कळतंही नव्हतं की आपला हा प्रयोग सक्सेसफुल होइल की नाही ते. पण एकदा सुरु केल्यावर मात्र एकदम सोप्पं वाटायला लागलं. बरेचदा तर इतर ब्लॉग वाचले की आपलं मराठी दिव्य आहे याची प्रचिती येते आणि लिखाण बंद करावं असं वाटतं.. पण केवळ काही कॉमेंट्स दिसल्या पोस्ट वर की पुन्हा हुरुप येतो आणि काहीतरी लिहिलं जातं.

 28. Congrats…
  Abhinandan.

  • आशिष
   धन्यवाद.. तुम्हा सगळ्यांच्या उत्साहवर्धक कॉमेंट्स मुळेच इथपर्यंत पोहोचलो.

 29. VIKRAM PRAKASH SHINGE says:

  NAD KULA RE TUZA BHAVA!!!!!!
  NAV BHAGUN ZAKAS VATAL
  ,,,,,,,,,,,,,,,,,TAKE RISK AND CATCH THE SUCSESS

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s