भिकारी

केचिवा मादिवा तुज्या नामात रे गोडवा…. असे स्वर ऐकल्याचे आठवतात??ट्रेन मधले भीक मागत फिरणाऱ्या भिकाऱ्यांमधे हे गाणं फारच पॉप्युलर होतं. ते लोक ज्या टिपिकल आवाजात गाणं म्हणतात  त्याला तर तोड नाही. असा आवाज कोणी काढून दाखवावा एकदा तरी– इतकं सोपं नाही ते.. नंतर कालानुरुप आणि  लोकांच्या आवडीनूसार नविन नविन गाणी हे भिकारी लोकं गायला लागले.  त्यांना पण कळलं , की केचिवा- मादिवा करून जेंव्हा भिक मिळत नाही  तर पर्र्रदेशी पर्रदेशी  जाना नहीं.. किंवा ते सिर्डी वाले साई बाबा, आया …… हे गाणं म्हंटलं की जास्त पैसे मिळतात, तर त्यांनी ताबडतोब आपलं गाणं बदललं आणि चेंजींग सिनरिओशी स्वतः जुळवून घेतलं.

इथे हातामधे दोन फरशीचे तुकडे घेउन, एकमेकांवर आपटुन आवज करीत त्या तालावर  गाणं म्हणत भिक मागणारे ते भिकारी आज आठवले .पन्नास पैशाचं  नाणे दिले तर ” रहेने दो साब, फिर कबी तुमकू काम आएंगा” म्हणुन नाकारणारे भिकारी आहेत आज कालचे. म्हणजे भिक तर मागायची , आणि कमी दिली तर  देणाऱ्याचा अपमान करायचा,ही न्वीन स्ट्रॅटेजी आहे  त्यांची आणि त्यांना    हे अपमान करणे  फार चांगले जमले आहे. अपमान केला की जास्त पैसे मिळतात, लोकं पण देतांनाच विचार करुन थोडे जास्तच पैसे देतात मग.

हॉटेल मधे गेल्यावर वेटरला टिप किती द्यावी – हा प्रश्न तर मला नेहेमीच छळत असतो. कमी टीप दिली की रागाने समोरून बडीशेप असलेली बशी उचलून नेणार, किंवा तुमच्या मागे दाराशी येऊन, ” साब, आपका पैसा रह गया था ” म्हणून पैसे परत करणार !! किंवा तुमच्या अंगावर ग्लास वगैरे उचलतांना मुद्दाम पाणी वगैरे सांडवणार.

तुम्ही टीप दिली, आणि -जर  तुम्ही उभे झाल्याबरोबर, त्याने अदबीने खुर्ची मागे करुन उभा राहिला, तुम्ही दाराशी पोहोचायच्या आत त्याने समोर जाऊन ,  खूप अदबीने दार उघडलं तुमच्या साठी-   की आपण टिप फार जास्त तर दिलेली नाही ना? असा संशय येतो मला. हे झाले माझ्या दृष्टीने भिकारी जमात नंबर दोन. हॉटेलमधे रुम घेतल्यावर तुमची बॅग  एक पॅंट एक शर्ट असलेली एक किलो वजनाची बॅग लिफ्ट ्मधून तुमच्या रुमवर नेऊन टाकल्यावर   समोर आशाळभूत पणे उभे रहाणारे बेल बॉइज – आणि साब  और क्या? असं विचारले  की संताप होतो माझा.

भिकारी बऱ्याच  प्रकारात मोडतात.
१)- खानदानी   भिकारी:- अख्खी  खानदान भीक मागत फिरत असते गांवभर. दोन वेळ खायला मिळालं की झालं. यांना अजून जास्त काही नको असते, आपलं पोट भरलं की झालं!! अशी मनोवृत्ती असते यांची.

२)- भिकारी बाय प्रोफेशन :- हे लोकं आपला धंदा म्हणून भीक मागत असतात.कोणावरच विश्वास न ठेवता स्वतः पैसे मागून जमा करायचे ही मनोवृत्ती असते यांची. मिळालेली भिक स्वतः साठवून ठेवायची आणि कुणाबरोबरच  शेअर करायची नाही. भीक मागून मिळालेला मलिदा फक्त एकट्यानेच खायचा .या प्रकारामधे  बरेच लोकं  गृप मधे भिक मागणे पण पसंत करतात.

३)- भिकारी बाय कम्पलशन:- प्रोफेशनल भिकारी मोठा माणुस झाला की मग स्वतः भीक न मागता इतरांना भीक मागायला लावतो आणि स्वतः मधले पैसे खातो- या प्रकारामधे लहान हुद्द्यावरचे लोकं बरेच असतात, की ज्यांना केवळ वरिष्ठांसाठी भिकारी बनावं लागतं. एखाद्या नाक्यावर ड्युटी मिळाली, की मग पैसे कमवायचे आणि त्यातला हिस्सा वर पोहोचवायचा- अशी मोडस ऑपरंडी असते त्यांची.बऱ्याच सरकारी ऑफिसात हे तुम्हाला दिसतील.

४)- भिकारी मानसिकता असलेले :- या प्रकारच्या भिकाऱ्यांकडे भरपूर पैसा असतो, पण त्यांना भिकारी पणाची इतकी सवय झालेली असते, की आवश्यकता असो किंवा नसो, ते भीक मागतच असतात.

५) – ??

हे सगळं आठवायचं कारण की एका खूप मोठ्या भिकाऱ्याच्या  बद्दलची माहिती वाचली पेपर मधे . म्हणे दिड कोटीची भीक मागितली होती तिने.  इकडे च्यायला आपण रुपया टाकायचा भिकाऱ्याच्या झोळीमधे तर दहादा विचार करतो, आणि इथे यांनी तर चक्क दिड कोटी भीक मागितली होती.  कोण म्हणतो की बेगर्स हॅव नो चॉइस? भरपूर चॉइस आहे बेगर्सला पण!!  त्या दिड कोटी  मधला म्हणे पहिला हप्ता २० लाखाचा मिळाला होता. उरलेले एक कोटी तीस लाख रुपये देण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता एका बिल्डरच्या मागे. बिल्डर पण लै शाना!! त्याने आपली दंडाची रक्कम कमी करून तर घेतली, पण नंतर ठरल्याप्रमाणे दिड कोटी देण्याऐवजी , त्याने सरळ ऍंटी करपश्न ब्युरो ला कळवले, आणि  मग पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहेच.

मला  ही बातमी वाचल्यावर त्या भिकाऱ्यांच्या मधे आणि दिड कोटी मागणाऱ्या त्या बाई  मधे काहीच फरक वाटत नाही. दोघेही वृत्तीने भिकारीच. फरक काही असेल तर तो फक्त  इतक्या वरच्या हुद्यावरची बाई ही वर दिलेल्या प्रकारांपैकी कुठल्या प्रकारच्या भिकाऱ्यात मोडते ते तुम्हीच ठरवा.

पहिल्या पॅरिग्राफ मधे त्या भिकाऱ्याने शहाणपणाने गाणं बदललं, आणि भीक मिळवणं सुरु ठेवलं, तर या दुसऱ्या भिकारणीने   दिड कोटी मागताना तिच जुनी पुराणी  खूपदा वापरलेली  ट्युन  ( तुझ्या नावे १० कोटी टॅक्स आहे, मला दिड कोटी दिलेस तर तो दिड कोटी पर्यंत कमी करून देईन अशी मांडवली…)पुन्हा पुन्हा वापरली, आणि  फेल्युअर गेली. असं वाचलं की ह्याच पद्धतीने तिने बऱ्याच लोकांकडून पैसे मागितले होते पुर्वी पण!  तिने बहुतेक हु मुव्हड माय चीझ वाचलं नसावं..म्हणतात ना, फॉर सक्सेस, चेंज इज इनएव्हीटेबल.. तर ते इथे पण लागू होते.

पन्नास पैसे भिक दिलेला भिकारी, ते पन्नास पैसे परत तरी करतो, पण इथे ही भिकारीण त्या बिल्डरला सोडायलाच तयार नव्हती. त्याच्याकडे पैशासाठी सारखा पाठपुरावा करत होती. शेवटी तो पण वैतागला  .. लावली वाट त्याने तिची!! जर तिने ते वीस लाख पण परत केले असते, तर कदाचित त्याला लाज वाटून त्याने पुर्ण पैसे आणून दिले असते. बघा, एका भिकाऱ्याला कसे वागायचे ते समजते, पण एका आयए एस अधिकाऱ्याला कळत नाही! विनोदाचा भाग सोडून द्या, पण सत्य स्थिती अशी आहेच!!

राजकिया नेत्यांप्रमाणेच, या शासकिय कर्मचाऱ्यांची संपत्ती पाहिली की आश्चर्यच वाटते. इतका पैसा असूनही अशी पैशाकरता मर मर करण्याची प्रवृत्ती पाहिली की तुमच्या- आमच्या सारखा माणूस विचारात पडतो – हे असे नालायक लोकं देश कसा काय चालवतात??

कांही लोकं गरीब असतात पण भिकारी नसतात, आणि काही लोक श्रीमंत असूनही भिकारी असतात, काही लोकं गरीब असूनही मनाने खू श्रीमंत असतात.एखादा आय ए एस च्या रॅंकचा भिकारी दिसला की थोडं कन्फ्युज व्हायला होतं- की का याने असे केले असावे??.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

41 Responses to भिकारी

 1. ajit gadre says:

  too good ,majaa aali

 2. पाचवा प्रकार ‘राज्य चालवणारे भिकारी’.. आणि दुर्दैवाने या पाचव्या प्रकारच्या भिकार्‍यांची संख्या खूप जास्त असल्याने खर्‍याखुर्‍या गरिबांची संख्या कधीच कमी होणार नाही 😦

  • राज्य चालवणारे भिकारी फारच डेंजरस असतात. कुठल्याही विभागात लाल फित वापरुन कोलदांडा घालायचा, आणि मग तोच कोलदांडा काढायला, भिक मागायची अशी मोडस ऑपरेंडी असते या लोकांची.

 3. भिकारयांचे प्रकार मस्त मांडले आहेत.
  “कांही लोकं गरीब असतात पण भिकारी नसतात, आणि काही लोक श्रीमंत असूनही भिकारी असतात, काही लोकं गरीब असूनही मनाने खूप श्रीमंत असतात. ..”
  पटल बुवा आपल्याला हे…

  • देवेंद्र
   काही गोष्टी खूप खटकतात मनाला. इतका पगार, मानमरातब असतांना त्यांना अशी पैसे मागण्याची इच्छा का बरं व्हावी?

 4. एकदम फर्मास झालं आहे! शेवटचं वाक्यं तर मस्तच. निवडणुक लढवणारे भिकारी हा अजुन एक प्रकार……कारण ते फक्त मतांची भीक मागतात आणि निवडुन आल्यावर वेगळीच…….

 5. ngadre says:

  solid..ekdam solid..sixer..

  Vishay ekdam mast mandala ahet..

 6. हा, हा, हा! एकदम मार्मिक लिहिलंत. या सगळ्या भिका-यांच्यात मानसिकतेने भिकारी असलेले जास्त डेंजरस आहेत.

 7. Sarika says:

  Income Tax madhye hi kahi pahili case navhe… 2/4 mahinyani sagle visrun jatil ani hya bhikaryanch dukan punha chalu hoil…

  • सारिका
   सगळे विसरतील, आणि मग दुसरा एखादा एक्स्पोझ होईल. जसे जोशी नावाचे एक वाशीचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर एक्स्पोज झाले होते पंधरवाड्यापुर्वी .ही सायकल न संपणारी आहे हे नक्की!

 8. sagar says:

  काका,
  तुम्ही भिकाऱ्यान बद्दल जे काही लिहील ते सर्व ठीक आहे पण हॉटेल मधल्या वेटर ला तुम्ही “भिकारी जमात नंबर दोन” हा उल्लेख मला काही आवडला नाही…

  • सागर
   मी जे लिहिलं आहे ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मत झालंय तयार. सगळेच लोकं असे नसतात, पण बरेचसे अगदी पैसे देई पर्य्ंत समोरून जायलाच तयार नसतात. स्पेशली हॉटेलमधे रुम घेतल्यावर सामान घेऊन जो बेल बॉय येतो, तो तर अतिशय …… असो..

   एकदा हॉटेलमधे जेवल्यावर ३४३रुपये बिल झालं होतं, ३५० रु. ठेवले आणि उरलेले ७ रुपये सोडले होते टिप म्हणुन, तर त्या माणासाने मी उठल्यावर मला दाराजवळ परत आणून दिले – साहब आपका पैसा छुट गया म्हणून. ( कदाचित त्याच्या अपेक्षेपेक्षा कंमी असावेत ते ).

   बरेच बरे वाईट अनूभव आहेत .. कदाचीत म्हणून मत तयार झालं असावं.

   • sagar says:

    तुम्हाला आलेल्या अनुभवा वरून तुम्ही हे मत मांडलं
    पण तरीही काका अगदी भिकारी उल्लेख करणं काहीसं चुकीचंच वाटत मला.
    असो लेख अतिशय उत्तम झाला …

  • सागर,
   मी स्वत: फ़ाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसला नोकरी केली आहे, हे बेल बॉईज इंडियन गेस्ट असेल तर चेक आउट साठी जायला तयार नसतात, फॉरिनर असेल तर एका पायावर तयार. डोअरमन पासून कार पार्किंगमधुन आणून देणार्‍या वॅले पर्यंत सगळे आशाळभूत असतात. जिथे खरतर त्यांना बर्‍यापैकी पगार असतो. जर एखाद्याने कमी टिप दिली तर मागून त्याची खुप टिंगल देखिल करतात. हॉटेलमधे येणारे लोक जणु काही यांचे देणं लागतात असेच वागणे असते यांचे. रेस्टॉरंटमधे पण नेहेमीच्या जास्त टिप देणार्‍या गेस्टला चांगली सर्व्हिस दिली जाते.

   • sagar says:

    सोनाली ताई तुम्ही म्हटल्या प्रमाणे ती लोकं असतीलही त्या लायकीची असो अनुभव आल्यावर कळेल मलाही.
    प्रतिक्रिये बद्दल आभार…

 9. अफलातून…..कांही लोकं गरीब असतात पण भिकारी नसतात, आणि काही लोक श्रीमंत असूनही भिकारी असतात, काही लोकं गरीब असूनही मनाने खूप श्रीमंत असतात.

 10. vidyadhar says:

  पुलं म्हणतात तश्यागत , “शेंड्या आणि जानवी जाऊनही अजून हिंदू धर्म कसा टिकलाय ते मला कळत नाही, तसंच कुणीही काहीही न करता आपला देश कसा चालतोय तेच मला कळत नाही!”

 11. Manmaujee says:

  जबरदस्त झाली आहे पोस्ट….शेवटच वाक्य खूप मार्मिक आहे!!! हे शिकले सवरलेले भिकारी अस का करतात हे खर तर फार मोठ गूढ आहे.

  • एक लहानशी गोष्ट सांगतो. एका सावकाराच्या घरा शेजारी एक गरीब माणूस रहायचा,. तो खूप सुखी आणि आनंदी असायचा.

   एक दिवस शंकराला पार्वती म्हणाली, तो इतका सुखी आणि समाधानी कसा काय?

   शंकर एक ९९ रुपये भरलेली पिशवी त्याच्या दारात ठेवतो . त्या गरीब माणसाला ती पिशवी सापडते, ते ९९ रुपये मिळाल्यावर ते शंभर कसे होतील?? म्हणून तो खुप टेन्शन घेतो, खूप काम करतो , आणि जमवलेले पैसे दिवसा अखेर त्यात मिसळतो, तर ते १०९ रुपय होतात.

   इथे त्याला समाधान मिळत नाही, आता १०९ चे २०० कसे होतील हा विचार करू लागतो, आणि समाधान हरवून बसतो.

   शंकर पार्वतीला म्हणतो, बघ, लक्ष्मी हीच सगळ्या सुखाची वाताहात करणारी असते.
   या वरुन लक्षात येईल..

 12. मस्त लिहिलय तुम्ही.
  श्रीमंत भिकारी ही सगळ्यात डेंजरस जमात आहे.

  • कमीत कमी श्रीमंत झाल्यावर तरी भिकारडे पणा सोडायला हवा, पण नेमका तो वाढतच जातो, कारण श्रीमंती बरोबर लोभ (ग्रीड) पण वाढत जाते.

 13. हल्ली भिकार्‍याची बातमी आहेच की पहिल्या पानावर “आप का थरूर” 😉

 14. लेख मस्त, सुंदर, आहे ,,भिकारयांचे प्रकार मस्त मांडले आहेत

 15. bhaanasa says:

  सगळेच सहमत असणारच असा लेख. हे मतांचे भिकारी म्हणजे तर…. अगदी देशालाही विकतील. खराखुरा भिकारी निदान जगण्यासाठी-अन्नासाठी हात पसरतोयं पण हे सत्तांध माजलेले व जनतेच्या जीवावर पोसलेले भिकारी…. शिवाय काय आहे नं यांची संख्या इतकी प्रचंड आहे की उघड्याकडे नागडा गेला आणि … दोघेही तितकेच निर्ल्लज्ज तेव्हां कोणालाच काय उघडे पडलेय याची फिकर नाही… 😦 माझी तुंबडी किती भरू….

  • आजची बातमी वाचलिस?? शरद पवारानी म्हणे ललित मोदीला सपोर्ट दिलाय. आता काय बोलणार यावर?
   सगळेच एका माळेचे मणी!!

 16. महेंद्र,
  सरकारी भिकारी तर एवढे घातक आहेत कि एक दिवस देशालाच भिकारी बनवतील. पण सागर प्रमाणेच मलाही वेटर बद्दल लिहिणं पटल नाही. मेहनतीच्या मनाने त्यांचा पगार खूपच कमी असतो कारण त्यांना मिळणारी टीप ही मालक गृहीतच धरतो. अमेरिकेत तर सरकार सुद्धा वेटरची टीप गृहीत धरून त्यावर आगाऊ टॅक्स कापते. म्हणून त्यांची टीपेची अपेक्षा. त्यांच्यापेक्षा कमी मोबदल्यात जास्त पिळवणूक करणाऱ्या मालकाची वृत्ती भिकारी आहे असे म्हणावेलागेल.

  • निरंजन
   मला नौकरी निमित्य महिन्यातले १५-२० दिवस तरी हॉटेल्स मधे रहावं लागतंच. कदाचीत त्यामूले बरेच वाईट अनुभव गाठीशी असल्याने मला त्या लोकांबद्दल कधीच कणव वगैरे वाटली नाही.

   टीप ही किती असावी , ते देणाऱ्याने ठरवायचे असते. कमी टीप वाटली म्हणून जर हे लोकं ……….. असो..

   सरकारी विभागामधे तर काही बोलायलाच नकी.. सब लोग हमाम मे नंगे म्हणतात तसा प्रकार असतो. काय करणार आपण तरी??

 17. suru says:

  solid.. ekdam chapraak marli ahes

 18. Pushpraj says:

  भीकार्यांचे प्रकार आवडले…माझ्या मते हे सामान्य भीकार्यांचे प्रकार आहेत…असेच राजकीय भीकार्यांचे प्रकार सुद्धा आहेत…जसे कौटुंबिक राजकीय भिकारी…यात एकाच कुटुंबातील अनेक लोक राजकारणात भीक मागताना दिसतात….जसे बाप आमदार…मुलगा खासदार….नातू पंचायात समितीवर……हे लोक भिकच तर मागत असतात…. कधी मतांची…कधी पदाची…कधी पैशाची….कधी तिकीटाची..तर…कधी मंत्रीपदाची……भीक मिळाली नाही तर काहीही करायला तर असतात कारण ते निर्ढावलेले भिकारी असतात……असे भिकारी आपला देश चालवतात हेच आपले दुर्भाग्य….

  • पुष्पराज
   सगळे प्रकार लिहिणं शक्यच नव्हतं, म्हणूनच पाचवा आकडा रिकामा ठेवला होता म्हंट्लं कॉमेंट्स मधे बाकिचे कव्हर होतीलच.
   राजकारणी भिकारी पण खूप डेंजरस . विंदांच्या कवितेला ते पुर्णपणे आचरणात आणतात- ’घेता घेता, देणाऱ्याचे हात घ्यावे” 🙂

 19. रोहन says:

  मस्त रे… लेख मस्त झालाय… भिकारी असणे हे चांगले प्रोफेशन आहे आणि हा खूप चांगला बिसिनेस आहे की… 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s