लाल बत्ती

लाल बत्ती  आज सकाळी ऑफिसला येतांना एका दिल्लीच्या मित्राला फोन केला. थोडं बोलणं झालं, तेवढ्यात तो म्हणाला, की थोडा रुक जा.. लाल बत्ती पे खडा हूं.. लाल बत्ती!!!मुंबईला सिंगल म्हणतात सिग्नलला तसेच दिल्लीला  लाल बत्ती म्हणतात.मुंबईला एखाद्या पोलीस मामाला पत्ता विचारला, तर शिधा जावो, सामने एक सिंगल गिरेंगा, वहांसे राईट मारनेका!! असा काहीसा पत्ता सांगेल तुम्हाला तो. जाउ द्या पण हे पोस्ट सिग्नल बद्दल नाही.

लाल बत्ती!!! हा एकच शब्द  पण किती तरी  गोष्टींसाठी वापरला जातो नाही?? लाल बत्ती म्हंटलं की कोणाला तरी मंत्र्याची कार , बोडख्यावर लाल दिवा लावलेली आठवेल, आणि कपाळावर चार आठ्या पडतील.  कारण??? सांगतो..

मुंबईला बरेचदा एअरपोर्ट जवळ कोणी एखादा व्हिआयपी ( मला अंडरवेअर आठवते व्हिआयपी म्हंटलं की ) येणार असला, तर रस्त्यावरचा ट्राफिक बंद करतात काही वेळा करता. मी स्वतः एकदा कुठल्या तरी मंत्र्या साठी रस्त्यावर २० मिनिटे थांबवून ठेवल्यामुळे उभा होतो. या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून ट्राफिक थांबवला जातो असे म्हणतात!   ह्या अशा नेत्यांमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास हा व्हायलाच हवा, नाहीतर त्या लोकांचं मोठे पण जनतेला कसं कळणार?? निवडून आलो, की जन्मसिद्ध अधिकारच आहे आपला लोकांना छळण्याचा..

मला एक प्रश्न नेहेमी पडतो, की निवडून येई पर्यंत समान्य जनतेमधे मतांची भीक मागत फिरतात तेंव्हा यांना सिक्युरीटी वगैरेची काही गरज पडत नाही, पण एकदा का निवडून आले की मग मात्र लगेच यांच्या जिवाला धोका निर्माण होतो आणि  झेड सिक्युरिटी लागते-

केवळ निवडून आल्याने इतका फरक  का पडतो ?  आणि जर निवडून आल्याने इतका जिवाला धोका असेल तर कशाला उगीच निवडणूका लढवतात हे लोकं आणि स्वतःचा जीव धो्क्यात घालतात ? इतके उपकार नका हो करू आम्हा पामरांवर!

बरेचदा असंही वाटतं की उगीच स्वतःचं (नसलेलं) महत्व दाखवायला  म्हणून हे लोकं असा जिवाला धोका आहे म्हणून बोंबाबोंब करतात आणि सरकारकडून फुकटची सिक्युरिटी  मिळवून ते सिक्युरिटी गार्ड सोबत घेउन फिरतात . जितके जास्त गार्ड्स तितकेच जास्त स्टेटस!! मशिन गन वाले कमांडॊ असतील तर खूप जास्त स्टेटस समजलं जातं.

अमिताभ बच्चन , सलमान ,  शाहरुख सारखे  करोड पती लोकं पण   सरकारी सिक्युरीटी मागतात- मनसे च्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे म्हणून (???). त्यांची चांगली ऐपत असतांना त्यांना अशी सिक्युरीटी कशाला द्यायची? जर खरोखरीच धोका असेल तर स्वतःच्या पैशाने सिक्युरिटी ठेवायला काहीच हरकत नाही.

सरकारचे करोडॊ रुपये असे थर्डक्लास लोकांच्या सिक्युरीटी साठी खर्च केले जातात. सगळे सिनेमाचे हिरो लोकं , हिरोइन्स, सिनेमाचे प्रोड्युसर्स या लोकांना त्यांनी एकदा दुबईसे कॉल आया था धमकीका म्हंट्लं की त्यांना पण सिक्युरीटी दिली जाते – ती पण  टॅक्स पेअर्सच्या पैशातून.

सगळ्यात महत्वाची गोष्ट  मला समजत नाही, की सिक्युरीटी मुळे या लोकांना काय मिळतं? सुरक्षा? कोणा पासून?? उत्तर आहे, तुमच्या आमच्या पासून- हो… त्यांना सुरक्षा केवळ तुमच्या आणि आमच्या सारख्या लोकांपासून मिळते अशा सिक्युरीटीने. ह्या लोकांना असं वाटतं की समोर आणि मागे स्टेनगन घेतलेले ते ब्लॅक कॅट कमांडॊ असले की आपण सेफ आहोत म्हणून. पण खरंच असं असतं कां? अर्थात उत्तर आहे नाही!! इतिहास साक्षी आहे, श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी, जॉन एफ केनडी , ह्या सारखे दिग्गज नेते सगळी सिक्युरीटी असतांना पण मारल्या गेले – तेंव्हा या अशा लोकांपैकी –

जर एखाद्याला मारायचं असेलच तर ’जॅकल’ कांहीही करू शकतो मारण्यासाठी. ही अशी कचकड्याची  सिक्युरीटी काय कामाची? स्त्रिया जशा दागीने घालून फिरतात, तसेच हे नेते , अभिनेते ह्या सिक्युरिटीला दागिना समजतात.

तुला एक्स सिक्युरीटी आहे कां- मला तर झेड सिक्युरीटी – काही नेत्यांच्या मधे   लहान मुलांसारखी अशी भांडणं पण दिसली मध्यंतरी च्या काळात- (मुद्दाम नांवं लिहित नाही 🙂 ).     साधी गोष्ट आहे, कुलुपं लावतो आपण घराला, ते कोणासाठी? तर सभ्य माणसांसाठी! चोराला कुलुप उघडणे एकदम सोपे असते. सिक्युरिटीचं पण मला तसंच वाटतं !!सिक्युरिटी असते ती सामान्यांपासून संरक्षणासाठी.

ही कारच्या डोक्यावरची ऑपेरा हाउसला दोनशे रुपयांना मिळणारी लाल बत्ती एखाद्या जुन्या पांढऱ्या ऍम्बेसेडरवर लागली, की त्या ऍम्बेसेडरचं महत्व एखाद्या मर्सिडिझ पेक्षा पण वाढतं. आधीच ऍम्बेसेडर ही कार म्हणजे ’पॉवर’ शी जोडल्या गेलेली आहे. त्यात ती लाल बत्ती!!! म्हणजे विचारायलाच नको.  ’ रस्त्यावरून जातांना पोलीस एखाद्या मर्सिडीझ ला  थांबवतात, पण अशा कारला कधीच नाही.

लाल बत्ती’ म्हंटलं तर काही लोकांना ’प्ले हाउस’ ते ’ग्रांट रोड’ मधल्या रस्त्यावर घरा घरावर ( पिंजऱ्यांवर??)  लागलेली लाल बत्ती आठवेल. एकाच शब्दाचा सिग्निफिकन्स किती वेगवेगळा असतो नाही कां? जी लाल बत्ती एकीकडे पॉवर शी कोरिलेट होते, तीच इकडे …………!!!

रेल्वे च्या ऑफिस मधे गेल्यास काही ’साहेब’ लोकांच्या केबिन समोर एक लाल, एक हिरवा दिवा लावलेला असतो. साहेब फ्री झाले की हिरवा दिवा सुरु करतात, नाहीतर लाल. पहिल्यांदा जेंव्हा हे पाहिलं , तेंव्हा तर अगदी पोट धरून हसलो होतो मी. असा मुर्खासारखा सिग्निफिकन्स एक आय आर एस झालेला माणूस कसा करू शकतो?? असो..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , , . Bookmark the permalink.

26 Responses to लाल बत्ती

 1. मला तर वाटतं की राजकारणी लोकांच्या गाडिवरील लाल बत्तीचा अर्थ, राजकारणी लोक महत्त्वाचे आहेत असा नसून, सामान्य लोकांना राजकारणी धोकेबाज ओळखण्यासाठी ती खूण असावी असाच वाटतो. नाहीतरी ते जे काही करतायंत त्याने आपल्याला धोका असतोच.

  बाकी दुस-या ठिकाणी याच नावाचा अर्थ निराळा असला तरी ती सुद्धा पॉवरच की हो! त्या पॉवरचा उपयोगही राजकारणी करून घेतात. तो ’उद्योग’ अनैतिकरित्या – चोरीछुपे चालवून, त्यातूनही त्यांना मनीपॉवर मिळतच असतेच.

  • कांचन
   धोक्याची सुचना!! सही एकदम . मी विसरलो होतो , इतक्या वेळा सिनेमामधे पाहुन सुध्दा आयसीयु च्या समोर लाल दिवा लावलेला असतो. हिरोचं ऑपरेशन सुरु असतं, थोड्या वेळाने लाल दिवा बंद होतो, आणि हात पुसत डॉक्टर बाहेर येतो.. किती कॉमन सिन आहे नां? पण विसरलो होतो.

   ला दिवा म्हणजे धोका. यांच्यापासून दूर रहा असा सरळ संदेश देतो.

 2. Pushpraj says:

  मस्त लेख लिहिलाय….मागे प्रमोद नवलकरांनि असाच परखड लेख लालबत्ती विषयावर लिहिला होता…. अगदी त्याच ठसक्यात लेख जमून आलाय…..

  • धन्यवाद पुष्कर.
   नवलकरांचे लेख वाचण्यात आले नाहीत. कारण ते जेंव्हा लिहायचे ,तेंव्हा मी मुंबईला नव्हतो. मला वाटतं की एका पेपरमधे ते भटक्या म्हणून एक सदर चालवायचे. मार्मिकचे सहसंपादक होते ते ( बहुतेक) आणि , इतकंच माहिती आहे त्यांच्याबद्दल! पण माणूस एकदम ग्रेट !
   नवलकर म्हंटलं की विधानसभेत पिस्तुल घेउन गेलेल नवलकर आठवतात.

   • आणि मला “फ़ोकमत”ची बातमी, “नवलकरांनी नवल केले, विधानसभेत पिस्तुल नेले”. 😀

    • खरंच नेलं होतं पिस्तुल. पण नवलकरांसारखा भटक्या पुन्हा होणार नाही. फार तर काही नाही, पण वेश्यावरचा त्यांचा एक भटकंती लेख मी वाचला होता. समृध्द लेखणी होती त्यांची.

 3. Manmaujee says:

  मला अंडरवेअर आठवते व्हिआयपी म्हंटलं की. . . :)….उलट VIP पेक्षा सामान्य माणूस सर्वात असुरक्षित आहे तो ही ह्या खादीत लपलेल्या लोकांपासुन..अन् ह्याना मारायच असेल तर हे कुठेही अन् कसही मारू शकतात…आपल्या टॅक्सच्या पैश्यावर ऐश करतात…#%@@&!%

  • योगेश
   खरंच!!! सामान्य माणसं ९-११ किंवा २६-९ ला सामोरे जातात, हे लोकं नाहीत. यांना खरंच या सिक्युरिटीची गरज आहे कां?

 4. मी एकदा दहिवडीला वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेले, दहिवडी पोलिस स्पॉन्सरर होते. आमंत्रण पत्रिकेत त्यांनी लिहिले होते स्पर्धकांना गोंदवल्याला दर्शनाला नेण्यात येइल. मी पोचले तेव्हा आधी जमलेल्यांना त्यांनी नेउन आणले होते, मी म्हटले मला जायचेच आहे गोंदवल्याला. मग खास एक पोलिस जीप दोन महिला पोलिस (बहुतेक त्यांना दर्शनाला यायचे असावे) ड्रायव्हर असा आमचा ताफा जाउन गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेवुन आला. तिथे मी पुढे आणि त्या महिला पोलिस माझ्या मागे असे पाहुन लोकांना मी एखादी VIP आहे असे वाटत होते. मी पण ते खुप एन्जॉय केले.
  मला दोन पोलिसांच्या असण्याने एवढी मजा वाटली तर झेड सिक्युरीटी वाले नक्कीच एन्जॉय करत असतील(आपल्या पैशांवर), नाही का?

  • स्वतः इम्पॉर्टंट आहोत हे फिलिंगच खुप नशा आणणारं असतं. नक्कीच ते लोकं हे फिलिंग एंजॉय करीत असतिल. समोर पायलट कार, मागे कार.. मज्जा आहे 🙂

 5. मस्त लेख आहे, वाचनीय आहे,लालबतिचे आपण निरनिराळे संदर्भ सागितले त्यबद्दल धन्यावाढ

  • महेश
   फोरास रोडची लालबत्ती त्यावर तर पुर्ण लेख लिहिता आला असता, पण थोडक्यात संपवलं ते. अजूनही काही नक्कीच संदर्भ असतिल, पण लक्षात आले नाहीत..

 6. vidyadhar says:

  लाल बत्तीचे इतके अर्थ आहेत हे माहित होतं..पण कधी ह्या दृष्टीने विचारच नाही केला…

  • विद्याधर,
   रोजच्या जिवनातली नेहेमीची गोष्ट आहे, म्हणुन लक्षात येत नाही बरेचदा.. 🙂

 7. Maithili says:

  Sahiii….!!!
  Lekh mastach zalay…..!!!

 8. विनय says:

  काका,

  केवळ निवडून आलेल्या नेत्यांनाच सरकार स्वत:च्या (म्हणजेच करदात्यांच्या) पैश्यातून सुरक्षा व्यवस्था देते. आणि दुसरे म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे, त्यांना. इतर लोकांना, म्हणजेच अगदी अमिताभ, सलमान, इ. ना सरकारने ठरवलेल्या दरानुसार पोलीस संरक्षण दिलं जातं. त्याचा तपशील मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र गृह खात्याच्या संकेत स्थळावर मिळेल.

  अर्थात तो दर अतिशय अल्प आहे, असं माझं मत आहे.

  • त्या सुरक्षेमुळे कोणाचा जीव वाचू शकतो का? हा पण एक प्रश्नच आहे. सगळे सुरक्षा गार्डस काढून घेतले, ्त्याच गार्ड्स ना शहराच्या सुरक्षेसाठी वापरता येईल. इतक्यातच झालेला ७/११ किंवा२६/११ सारखे प्रसंग टाळता येतील.

   दुसरे म्हणजे, पैसे घेउन संरक्षण देणे हे सरकारचे काम नाही. सरकारचे काम आहे देशाचे रक्षण करणे, पण इथे तर सगळे गार्ड्स अशा नेत्यांच्या/अभिनेत्यांच्याच कामासाठी वापरले जातात. जर या नेत्यांना संरक्षण हवं असेलच तर त्यांनी स्वतः बाहेरुन गार्ड्स घ्यावेत , सरकारी पोलिस कशाला??

   दिवसभर जरी तो अभिनेता घरात बसून असला, तरिही वॉचमन प्रमाणे कमांडो घराबाहेर बंदूक घेउन उभे असतात. काय बोलावं हेच समजत नाही मला तरी..

 9. काका,

  लेख खूप छान झालाय…

 10. Pingback: Tweets that mention लाल बत्ती « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 11. bhaanasa says:

  महेंद्र, लाल बत्ती आणि कॉमन मॅन च्या जीवनातील वेगवेगळे अर्थ… मस्तच रे. १००% सहमत आहे… टॅक्स पेअर्सचा पैसा असा नको तिथे फुकट जात असतो. फालतू नाटके सगळी. शिवाय चोर हे स्वत:च त्यामुळे यांना इतर चोरांची पावले लगेच ओळखू येतात नं….. म्हणून मग सिक्युरिटीची गरज भासतेय.

  • भाग्यश्री
   मला नेहेमीच प्रश्न पडतो, की ह्या लोकांना निवडुन आल्याबरोबर जिवाला धोका कसा निर्माण होतो??
   जर इतका धोकादायक असेल पोलिटिक्ल लिडर होणं तर मग हे सगळे मर मर कशाला करतात लिडर व्हायला?
   केनेडी पण सुटले नाहीत, जर यांना मारायचं असेल कोणाला, तर सहज मारले जाऊ शकतात, ही सगळी नाटकं बंद करायला हवीत.. एकदा चौकशी करायला हवी राईट टू इनफर्मेशन च्या अंतर्गत की, अशा सिक्युरिटी वर किती पैसा खर्च केला जातो ते..

 12. तुमचा हा लेख वाचनातून कसा सुटला कुणास ठावूक. आत्ता वाचायला मिळाला. सरकारी लाल बत्ती आणि ग्रांट रोड ची लाल बत्ती ह्यात एक साम्य आहे. सरकारी लाल बत्ती हे देशाची लज्जा विकणाऱ्या लोकांची आठवण करून देतात तर ग्रांट रोड ची लालबत्ती ही स्त्रीची लज्जा विकणाऱ्या लोकांची.

 13. रोहन says:

  मला वाटते की Red Light Area बद्दल पोस्ट लिहिला आहेस की काय… ह्या नेता लोकांबद्दल तर बोलावे तितके कमीच. जाऊ दे…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s