मोदी-थरूर…. थरार

शरद पवार एकदम ’दिल से’ मोदीच्या मागे उभे होते. जेंव्हा सगळं जग ललीत मोदींच्या बद्दल विरुध्द बोलत होतं तेंव्हा, शरदराव त्याला सपोर्ट करित होते.  ती माकडीणीची गोष्ट आठवते कां? माकडीण नाका तोंडात पाणी जाईपर्यंत माकडीण त्या पिल्लाला डोक्यावर घेते, पण जेंव्हा तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागतं तेंव्हा मात्र ती स्वतः त्याच्या डोक्यावर उभी रहाते. शरदराव किती वेळ ललीत मोदींना डॊक्यावर घेऊन नाचतात ते बघायला मजा येईल.

शशी थरूर
(जुना लेख ) यांचे नांव आय पी एल मधे जोडल्या गेल्या बरोबर त्यांच्याकडून प्रॉम्प्टली राजीनामा मागीतला गेला. मला शशी थरूर एक सुशिक्षित  आणि उच्च वैचारीक बैठक पक्की असलेला एक नेता म्हणून आवडतो. अर्थात त्याच्या कडुन संसदेमधे आपली बाजू मांडू न देता त्याच्या सारख्या कडून घाई गर्दी मधे राजिनामा घेणे म्हणजे त्याचा एक प्रकारे अपमानच आहे. मला असं म्हणायचं नाही, की त्याची चूक काहीच नाही, पण त्याला इतकं अनसिरॅमोनसली जायला सांगणं  म्हणजे………!!

बरं राजीनामा पण  घेण्याचे एकच कारण होते, ते म्हणजे भाजपाचा आवाज बंद करणे.    राजकीय प्रगल्भता असली तरीही राजकीय हेवी वेट पाठीशी  नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे असे मला वाटते.

सदानंद सुळॆ! शरद पवारांचे जावई- यांच्या कडे  मल्टीस्क्रिन मिडीय़ा  या कंपनी मधे   १० टक्के होल्डींग असल्याचे त्यांची बायको  सुप्रीया सूळे म्हणाली आणि  काल पर्यंत आपले किंवा आपल्या कुठल्याही नातेवाईकाचे हितसंबंध गुंतलेले नाही असे छातीठोक पणे सांगणाऱ्या शरद पवारांची आठवण झाली.

सुप्रीयाला हे सगळं सांगायची उपरती एकदम का व्हावी?? सुप्रीया असंही म्हणाली, की तिच्या नवऱ्याकडे गेली पंधरा वर्षापासून ही मालकी आहे.गेली पंधरा वर्ष मालकी आहे म्हणुन  जरी त्या मुळे जर त्या कंपनीचे काही लागेबांधे  या घोटाळ्याशी असतील ्तरीही त्याची तिव्रता कमी होत नाही.  ही  कंपनी    कोण म्हणता??  ह्या कंपनीकडे ( मल्टि मिडीया मार्केटींग -सोनी टीव्ही) कडे आयपीएल चे प्रसारण एकाधिकार आहेत. या मॅचेसचे प्रसारण सुरु झाल्या पासून, दोन ओव्हरच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीमधून मिळणारे सगळे  उत्पन्न या कंपनीला जाते. ( जे कॊट्यावधी  नाही तर अरबो रुपयांमधे आहे).

याच सोबत प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्वाचे नांव पण या घोटाळ्यात आलंय. प्रफुल्ल पटेल यांनी एकदा ललीत मोदीला फोन करून शशीला काही माहिती देण्यासाठी आपण सांगितलं होतं अशी कबुली एका इंटरव्ह्यु मधे दिली होती.

आयपीएल मधे किती घोटाळा आहे, त्यावर आजपर्यंत एक लहानसं हिमनगाचं टोक बाहेर आलेलं आहे. जर ( मुद्दाम जर हा शब्द लिहितोय)  जर या   हिमनगाचा उरलेल्या भागापैकी फक्त दहा टक्के   पण वाहेर  आला तर कित्येक लोकांचे वस्त्रहरण होईल हे सांगायला कोणी जोतिष्याची गरज नाही. आयपीएल मधे राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्यामुळेच या आयपीएल ला करमणूक करातून सूट देण्यात आली असावी हे पण सांगायला कोणी फिलॉसॉफर नको. प्रत्येकच  नागरीकांना ते पुर्ण पणे माहिती आहे, पण दुर्दैवाने,  नेत्यांना वाटतं की  लोकं मुर्ख आहेत म्हणून.

सुनंदा प्रकरण , शशीचे स्वतःचे पर्सनल लाइफ मधले आहे त्या बद्दल मला काही घेणे देणे नाही. ललीत मोदीने ट्विटरवर दिलेला पहिला ट्विट हा सुनंदा बद्दलचा होता, ज्यावरून इतकं वादळ उठलं होतं. मला वाटतं की ललीत मोदीच्या फडताळात खूप स्केलेटन्स असावीत, की ज्यांची भिती दाखवून आपण या घोटाळ्यातून बाहेर पडू याची त्याला खात्री असावी, म्हणूनच शशी बरोबर त्याने सुमो लढाई लढण्याचे धाडस केले.

सरकारने पण आता सगळा काळाचिठ्ठा बाहेर काढून लोकांना कोणाकोणाचे त्या आयपीएल मधे भागीदारी आहेत हे सांगावे म्हणजे सामान्य जनतेला पण ते माहिती होईल आणि चघळायला क्रिकेट सोबत एक विषय पण मिळेल. एक गोष्ट समजत नाही, आयपीएल मधे भागीदारी असणं या मधे लोकांना आता कमीपणा का वाटतोय? तो पण एक बिझिनेसच आहे, त्यामधे भागीदारी असेल तर ठीक आहे ना? त्यात एवढं विशेष काय? आयपीएल मदे भागधारकांची माहिती गुप्त ठेवण्याचे प्रावधान आहे ( ते कां? असावे?) त्या मधे समजा एखाद्या टिम चे तुम्ही दहा टक्के भागधारक असाल, तर त्याच टिम मधे एखाद्या दुबईकर भाईचा पण ४० टक्के हिस्सा असू शकतो.आणि हेच कारण असावं, की ज्या मुळे लोकं स्वतःला दूर ठेऊ पहाताहेत.

ललीत भाउ- अरे तेलगीला विसरलास का रे? त्याला पण बरंच काही माहिती होतं, पण काय झालं? किती रा्जकीय नेते त्याच्याबरोबर आत गेलेत? एकही नाही…. ’तेरी तो लग गई अब  ’ ….  ललित भौ, मुंबईच्या गरमी मधे जोकर प्रमाणे क्रिकेट स्टेडीयम वर सुट घालून फिरणारा तू एकटाच दिसलास रे. ते पाहूनच वाटलं होतं …. जाउ दे..

आता ज्या घाईने थरूरला बाहेर हाकलले, त्याच तत्परतेने प्रफुल्ल आणि शरद पवारला मनमोहन सिंग राजीनामा द्यायला  लावतात का? ह्य़ाच प्रश्नावर हा लेख संपवतो.

आयपीएल वरची जुनी पोस्ट

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ, राजकिय.. and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

34 Responses to मोदी-थरूर…. थरार

 1. bhaanasa says:

  खेळाचा अक्षरश: चुथडा करून टाकलाय. किती प्रकारानी व अगदी अहमिका लावून आयपीएल मध्ये आपली तुंबडी भरत होते-आहेत….. तेलगी आणि त्याच्यासारख्याबरोबर आत जायला लागले नं तर बाहेर कोणीच उरणार नाही इतके सगळेच बरबटलेत. आता पुन्हा राजिनाम्यांचे फार्स होतात की तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत हा सगळा धुरळा खाली बसतोय ते कळेलच.

  • भाग्यश्री
   भारतामधे क्रिकेट हा धर्म आहे- खेळ नाही. नुकताच बंगलोरला झालेल्या बॉम्ब ब्लास्ट मधे काही लोकं मारले गेले, तरी पण खेळ कॅन्सल केला नाही. लोकांनी तितक्याच उत्साहाने खेळ बघितला . पोलिस मारल्या गेले, आणि अवध्या अर्ध्या तासातच तिकडे दुर्लक्ष करून लोकं खेळ एंजॉय करु शकतात??
   या एकाच घटने वरून सगळं लक्षात येतं..

 2. suruchinaik says:

  खेळ कसला रे..खेळ खंडोबा केलाय नुसता…सगळेच सारखेच….

  • या लोकांच्या दृष्टीने सगळा खेळच आहे . जर या मधे समाजकंटकांचा पैसा असेल तर देशाच्या दृष्टीने खरंच धोकादायक आहे ते . म्हणजे जर तसे असेल तर , त्याचा अर्थ सगळे भारतिय नागरीक ( आयपीएल पहाणारे ) इनडायरेक्टली टेररिस्ट फंडींग करताहेत असा अर्थ होतो.

 3. Pingback: थरार… « स्वगत

 4. Manmaujee says:

  गोल माल है…सब गोल माल है!!! काका…तुम्हाला सांगतो यात सगळे बरबटलेले आहेत पण आपल्या पर्यंत सत्य येणारच नाही…अन् येऊन फायदा काय???? आयोग, कोर्ट, समित्या, अहवाल …..तो पर्यंत मोदी वर जाउन तिथे आय.पी.एल भरवेल!!!

  • योगेश
   या मधे कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत ते बाहेर आलेच पाहिजे. वरच्या कॉमेंटचे उत्तर पहा , कारण हे प्रकरण किती सिरियस आहे याची कल्पना येईत त्यावरून.

 5. सगळा साला मूर्खांचा बाजार आहे. क्रिकेटचा डाय हार्ड पंखा असूनही हे आय पी एल प्रकरण मला विशेष पटलं नव्हतं. तरी लोक काय म्हणतील, सगळे बोलतील तेव्हा क्रिकेटचा पंखा असूनही आपल्याला काही बोलता आलं नाही तर काय होईल या भीतीतून I आणि II बघितले.. पण समहाऊ III च्या वेळी ठरवलं काही झालं. कोणी काही बोललं तरी चालेल पण मी आय पी एल बघणार नाही.. आणि आता खूप बरं वाटतंय त्या निर्णयाचं.
  अक्षरशः सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. त्या तेलगीच्या वेळी जशी सगळ्यांची हवा तंग झाली होती तशी आताही झाली आहे..

  • हेरंब
   आयपीएल ऍज अ कन्सेप्ट ठिक आहे. केवळ श्रीमंतांसाठी खेळल्यागेलेला हा खेळ आहे. तिकिटाचे भाव ५०० रुपयांपासून सुरु होतात. जास्तित जास्त तिकित दिड लाखात विकल्याची वंदता आहे.
   आयपीएल म्हणजे पैशाचा खेळ. कुठल्याही मार्गाने आलेला पैसा म्हणजे आयपीएल. आता अजून किती लोकं अडकलेले सापडतात ते कोण जाणे. मला तर अशोक चव्हाणचा पण संशय येतोय. आयपीएल ला टॅक्स सवलत त्यांनीच दिली.. बघू या कोण येतं समोर ते.

 6. खूप मोठे मोठे मासे आहेत ह्या प्रकारात..काही नाही दाबतील प्रकरण परत पैसे देऊन 😦
  सवय आहे अश्या मोठ्या गोष्टीची हवा होता होता फुस्स्स..करून त्यातील हवा निघताना…

  • अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. मन्नू शर्मा शेवटी गेला ना जेल मधे??? कदाचित बरेच लोकं बाहेर जातील.

 7. खेळ या शब्दाची परिभाषा बदलून टाकली आहे, या लोकांनी. इतक्या उशीरा का होईना पण यात काळा पैसा आहे आणि तो कुठून येतोय, हे शोधून काढलं पाहिजे याची आपल्या मायबाप सरकारला जाणिव झालीय, हेही नसे थोडके.

 8. vikram says:

  Sahebani Modila support kela tenvhach Modi janar he fix jhale hote 😉

  baki ya prakanat Modi barobar saheb n patel hi jau nayet mhanje jhale 🙂

  • साहेबांनी मोदीला ऑल आउट सपोर्ट केला होता – जिथे कॉंट्रोव्हर्सी, तिथे साहेब.. साधा हिशेब आहे. जाणार… नक्की जाणार… यांच्यापैकी कोण तेच पहायचं.

 9. Pushpraj says:

  …..हे जे सध्या चालू आहे तो म्हणंजे मूर्खांचा बाजारच आहे…….मागे एक लेख वाचला होता राजदीप सरदेसाई यांचा…त्यात एक किस्सा सांगितला होता..१९५० च्या सुमारास भारतीय क्रिकेट टीम न्यूज़ीलँड च्या दौर्यावर गेली होती त्या वेळेस भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूला २५० रु चा चेक दिला जात असे…न्यूज़ीलँड विरुद्धची १ मॅच भारताने ४त्या दिवशी जिंकली…BCCई ने २०० रु. चा चेक खेळाडूना दिला….खेळाडूनी त्यावर आक्षेप घेऊन सांगितले की आम्हाला २५० हवेत…बोर्डाचे म्हणणे असे होत की मॅच तुम्हाला ४ दिवसात संपवायला कोणी सांगितली??आम्ही तुम्हाला प्रत्येक दिवसाचे ५० रुपये याप्रमाणे पैसे देतो…मॅच ४ दिवसात संपल्यामुळे ५० प्रमाणे २०० होतात …आम्ही जास्त पैसे देऊ शकत नाही….हा झाला एक किस्सा पण ५० वर्षनतर क्रिककेटचे झालेले बाजारीकरन, घुसलेला पैसा……..फिक्सिंग….. ह्यामुळे क्रिकेट हा नक्कीच खेळ राहिला नाही……

  • पुष्पराज
   हे जे सुरु आहे ते करणारे मुर्ख नाहीत, तर खूप शहाणे आहेत. त्यांना भारतिय़ाची मानसिकता चांगली कळलेली आहे. क्रिकेटसाठी आपले लोकं काहीही करू शकतात हे त्यांना चांगलं समजलेले आहे,

   क्रिकेटचं झालेलं बाजारी करण.. हा अगदी योग्य मुद्दा मांडलाय तुम्ही इथे. “शिता भोवती भुतं” म्हणतात नां, तसं आहेहे, इथे पैसा दिसायला लागल्या बरोबर, बरेच राजकिय लोकं शरद पवार सारखे यात खेचले गेले. मॅग्नेट खेचतो लोखंड.. पैसा खेचतो पवारांना.. 🙂

 10. vidyadhar says:

  काका, काहीही असलं तरी थरूर बद्दल मला कधीच सहानुभूती नव्हती. तो नेता नव्हे..तो दरबारी राजकारणी. ट्विटर आणि ब्लैकबेरी वरून संवाद साधणे म्हणजे लोकांशी संवाद साधणे नव्हे. देशात इंटरनेट न वापरणारी लोकसंख्या फार आहे हे तो विसरला. पुन्हा त्याची लाईफ स्टाईल, छानछोकी अनेकांच्या नजरेत होतीच. आणि शेवट तो गांधी नाही. त्यामुळे त्याचा माईबाप कोणीच नव्हता.

  • विद्याधर
   वरच्या लेखामधे त्याच्यावर लिहिलेल्या जुन्या लेखाची लिंक आहे. ती पहा वाचून .
   आपले राजकारणी जसे मुलायम, लालू यादव टिव्ही वर ज्या प्रकारे दिसतात आणि जसे वागतात, तसे वागणे म्हणजे काही जनतेशी संवाद साधणे नाही.

   परराष्ट्र मंत्री म्हणून लालू यादव ची कल्पना करा, कसा वाटतो तो??शशी खरोखरच हुशार आहे . उच्चशिक्षित आहे- आणि परराष्ट्र मंत्रालयासाठी त्याच्या पेक्षा योग्य माणुस दुसरा कोणी नाही. परराष्ट्र मंत्री म्हणुन देशाची प्रतिमा उजळ करायला असेच लोकं हवेत. असो..

   छानछौकीची रहाणी तर होतीच.. पण परराष्ट्र मंत्री तसाच रहायला हवा. 🙂

   आणि खरं सांगतो, या आयपिएल च्या मॅच पेक्षा या बातमीला फॉलो करण्यातच जास्त मजा येईल मला …

   • शशी थरूरच्या छानछोकीच्या राहणीबद्दल अनेकांनी आक्षेप घेतले. पण त्याचं ते five-star हॉटेलमधलं प्रकरण झालं तेंव्हाच स्वामीनाथन अय्यरनं टाईम्समध्ये निदर्शनास आणलं होतं की दिल्लीच्या ज्या परिसरात सरकारी निवासस्थानं आहेत तो इतका महागडा परिसर आहे की ती सगळी निवासस्थानं सरकारनं विकली तर येणार्‍या पैशाच्या केवळ व्याजातून सर्व लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी five-star मध्ये राहण्याची सोय पुरवता येईल. थरूर काही दिवस five-star मध्ये राहीले ते डोळ्यास आलं, पण शेकडो लोकप्रतिनिधी करोडो रुपयांची उधळपट्टी करतात त्याचं काय?

    “गांधींची (original म. गांधींची) साधी राहणी अतिशय खर्चीक असते” असंही कुणातरी तत्कालीन नेत्यानं म्हटल्याचं वाचलंय.

    Hypocracy हा आपला राष्ट्रीय गुणधर्म आहे. पूर्वीपासूनच.

    स्वामीनाथन अय्यरनं त्याच लेखात शेवटी म्हटलं होतं की “आम्हाला रिझल्ट्स देणारे नेते हवे आहेत. ते कुठं राहतात याच्याशी कुणाला देणं-घेणं असायचं कारण नाही.”

    – विवेक.

    • vidyadhar says:

     प्रश्न बाकीचे काय करतात हा नाही. प्रश्न थरूर काय करतो हा आहे. थरूर ने केलेल्या कामांपेक्षा त्याचे डेरोगेटरी ट्विट्स गाजले. सौदिसारख्या महामूर्ख देशाला भारत पाकिस्तानचा मध्यस्थ म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. मला नाही वाटत हि प्रशंसनीय कारकीर्द होती. उलट प्रत्येक वेळी त्याचा स्वतःचा शहाणपणाच त्याला नडत होता..पुन्हा मी जे म्हटलं कि त्याची छानछोकी अनेकांच्या नजरेत होती, ते म्हणजे त्याचेच काँग्रेस अंतर्गत शत्रू…हा प्रेझेंटेबल असल्यामुळे बाकीचे जळत होते…आणि जसं मी म्हटलं…काँग्रेस मध्ये एकतर तुमची भक्कम लॉबी हवी, किंवा तुम्ही गांधी हवेत….त्याच्याकडे दोन्ही नाही…त्यामुळे त्याला इतरांसारखा चान्स नाही मिळाला…पण ह्याचा अर्थ हा नाही कि त्याने जाणे अयोग्य होते…त्याचे जाणे मला तरी सर्वार्थाने योग्य वाटते…बाकीचे काय आहेत हे सगळेच जाणतात…पण मला त्यांच्या जाण्यायेण्यावर चर्चा करायची नाही…कारण विषय तो नाही…

     • विद्याधर
      ज्या कारणासाठी त्याला जायला सांगितले ते कारण योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही. तर त्याला स्वतःची सफाई देण्याचा चान्सही न देता घालवले ते योग्य नाही असे लिहिले आहे मी.

      ट्विट्स वर असणं, ब्लॉग लिहिणं वगैरे चेंजींग निड्स ~ऒफ सोसायटी आहेत . ट्विटर वर त्याचे ७ लाख फॉलोअर्स आहेत , 🙂

 11. मोठे राजकीय लोक यामध्ये आहे असे वाटते बघूया कोणाची विकेट जाते, सर्व चोरांचा बाजार आहे,सर्वांच्या अंगाशी आले आहे ,आय पी एल रद्द करावी, कोणाकोणाच्या पायाखालची वाळू सरकते ते पहावयाचे आहे ,,,,,,,, महेश कुलकर्णी

 12. शशी थरूर काय किंवा ललित मोदी काय, हे एकाच माळेचे मणी आहेत. थरूरच्या राजीनाम्यानंतर त्याच्या कौतुकादाखल बोलणारी मंडळी वाहिन्यांवर दाखवीत होते. तेव्हाच लक्षात येत होतं, की जमिनीवर पाय नसलेली माणसे आहेत ही. थरूर आधी एक्स्प्रेसमध्ये स्तंभलेखन करायचे. त्यातही त्यांचे भारतीय व्यवस्थेबद्दल असलेला तुच्छतापूर्व दृष्टीकोन दिसून येत असे. नरसिंहराव यांनी ज्याप्रमाणे अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंहांना राजकारणात आणले, त्याप्रमाणे थरूर यांच्यासारख्या जाणत्या माणसाला राजकारणात आणण्याचे श्रेय कॉंग्रेसला घ्यायचे होते. थरूर यांच्या उपद्व्यापी स्वभावामुळे ते साध्या झाले नाही. परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांचे काम फार काही डोळ्यात भरण्याजोगे झाले नाही. उलट सौदी अरेबियाबाबत केलेल्या त्यांच्या विधानाने सरकारचीच नामुष्की झाली. पंचतारांकित जीवनशैली बाबतही त्यांचा उद्दामपणाच जास्त होता. ज्या माणसाला एक वर्षात स्वतःच्या पक्षात पाठीराखे निर्माण करता आले नाहीत, त्याला जागतिक पातळीवर देशासाठी काय मित्र मिळणार. चार लेखक आणि पेज ३ चे यशस्वी चेहरे म्हणजे राजकारण नाही. पुण्यात सुरेश कलमाडी, महाराष्ट्रात राज ठाकरे, गुजरातेत नरेंद्र मोदी किंवा दक्षिणेत जयललिता यांची जीवनशैली हि काही सामान्य माणसांची नाही. तरीही लोक त्यांच्या मागे धावतात, त्यामागे काही सूत्रे असतीलच ना.
  हाच प्रकार मोदिंचाही आहे. आपल्याला राजकारण्यांचा वरदहस्त आहे आणि त्यांच्या आर्थिक नद्या आपल्या हातात आहे, हे त्यांना पक्के ठाउक होते. त्यातूनच त्यांनी भस्मासुर बनण्याचा प्रयत्न केला. या वादळातूनही तो सुटू शकतो पण त्यासाठी त्याला फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे.

  • देवीदास
   मासेस बरोबर जुळवून घेणं कदाचित जमलं नसेल त्याला. इतका उच्च विद्याविभुषित माणुस लालू प्रमाणे किंवा इतर तथाकथित नेत्यांप्रमाणे वागेल अशी अपेक्शा करूशकत नाहीआपण.
   राजकीय दृष्ट्या जरी कमकूवत असला तरी एक हुशार नेता म्हणुन त्याला मी मनमोहन सिंग, चिदंबरम च्या रांगेत बघतो मी त्याच्याकडे.

   मोदी बद्दल बोलायचं, तर मोदी साहेबांनी स्वतःबद्दल काही खास कल्पना करुन घेतल्या
   होत्या, मोहिनी नाट्यम त्यांना पेललं नाही. तुम्ही अगदी योग्य लिहिलंय, भस्मासूर झाला त्याचा. यातून सुटेल असे मला वाटत नाही.

   दोघांनाही क्षणभर बाजूला ठेवले तरीही येणारा काळा पैसा, त्यातून मिळालेले प्रॉफिट आणी टेररिस्ट फंडींग चा एक मेकांशी संबंध लक्षात घेतल्यास फार काळं प्रकरण आहे हे ..

   • vidyadhar says:

    काका, उच्चविद्या विभूषित माणसे कशी वागतात हे काही वर्षांपूर्वी बिहार पुरांबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या IAS ओफिसारणे तेव्हा सिद्ध केलं होतं जेव्हा तो नंतर पूरग्रस्तांची मदत हडप केल्याबद्दल पकडला गेला होता…आणि तसा सांगायला गेला तर ललित मोदीही अमेरिकेत शिकलेला आहे….मिडिया कोणालाही हिरो म्हणून सहज प्रोजेक्ट करू शकते…फक्त मिडिया हाताळता आला पाहिजे…थरूर त्यामध्ये मास्टर आहे …मनमोहन सिंग आणि थरूर मधला हाच फरक कि मनमोहन सिंग काम करण्यावर भर देतात तर थरूर शो ऑफ वर…आपल्याला हेच ठरवायचं आहे कि आपल्याला नेता नुसताच प्रेझेंटेबल हवाय कि त्याने कामही करणं आवश्यक आहे…

    • विद्याधर
     पैसे खाणं!! ह्या आरोपातून आपले पंतप्रधान राजीव गांधी पण सुटले नाहीत. पण एक आहे, थरूर कधीच पैशाच्या मागे लागलेला नाही. पैसे खाल्ले असे त्याच्याबद्दल कोणीच बोलणार नाही.
     दुसरं म्हणजे त्याच्या हुशारी बद्दल काहीच संशय घेता येणार नाही..

 13. Pingback: Tweets that mention मोदी-थरूर…. थरार « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 14. २-३ आठवड्यापूर्वी DNA मध्ये आयपीएल बद्दल सुरेख लेख आला होता. लेखकाने त्यात राजकारणी, बॉलीवूड, उद्योगपती आणि गुंड ह्यांची कशी हात मिळवणी होऊ शकते आणि बेटिंग शिवाय ह्या धंद्यात पैसा मिळवणे मुश्कील कसे आहे ह्याचे सुंदर विश्लेषण दिले होते. लेखकाच्या मते, strategic timeout चा उपयोग बेटिंग चा pattern पाहून खेळ फिरवण्यात होऊ शकतो असे ही लिहिले होते. आता ह्या सर्व गोष्टी जगजाहीर झाल्याआहेत.
  बाकी ललित मोदीवर अमेरिकेत robbery चा गुन्हा दाखल झाला होता अशी times मध्ये बातमी वाचली.

  • ललित मोदीवर ड्रग्ज पेडलिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले होते. हे नविनच ऐकतोय. बेटींग तर जगजाहिर आहेच. पैसा आला, की सगळे दुर्गुण पण गुणत कन्व्हर्ट होतात. मोदींचं पण तसंच झालं असावं.

 15. अगदीच राहवले नाही म्हणून विषयांतरित टिप्पणी टाकतोय…

  जगाच्या एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के लोक Internet वापरतात ही खरी धक्कादायक माहिती मिळवली की आपण इंटरनेटच्या वापराने धुंद झालोय हे कळायला फार वेळ लागत नाही.

  मला वाटते की अमेरिकेतील खेड्यापाड्यात सुद्धा फारसे नेट वापरले जात नसावे. पण जे वापरतात ते एका वेगळ्याच “हाय” मध्ये असतात. हे लक्षांतही येत नाही…

  ही कॉमेंट “थ्रूटीका” आहे असे खुशाल मानावे…

 16. sahajach says:

  महेंद्रजी मुळात एकदा मॅच फिक्सिंग झाल्यावरही लोक क्रिकेट पहाताहेत…. बॅड पॅच च्या नावाखाली आपली वारंवार फसवणुक होतीये हे ही आंधळेपणाणे दुर्लक्षित करताहेत…. आपल्याच देशाचे खेळाडु एकमेकांविरोधात उभे रहाताहेत, कोंबड्यांच्या झुंझी सुरू आहेत आणि जनता आपला वेळ घालवून तासन्तास टिव्ही समोर बसतेय… मला हा कायम मुर्खपणा वाटतो!! आम्ही परवाच एका ओळखीच्यांकडे गेलो होतो…सगळे IPL पहात होते ते मला म्हणालेही की अगं तू अजिबातच ईंटरेस्टेड नाहियेस का …म्हटलं माझी एकदा फसवणूक केलेल्यांकडे मी पुन्हा पहात नाही!!!

  आज सकाळी बातम्या पहायचा उपद्वाप केला तिथे तर कहर सुरू आहे…. सगळ्या बातम्या निव्वळ IPL च्या जसे जगात, देशात ईतर काहिही घडत नाहीये…. आणि पुर्णवेळ सचिनच्या वाढदिवसाबद्दल त्याला येणारे मेसेजेस….. कंटाळून बंद केला टिव्ही!!

  काय बोलणार किती बोलणार… काळा कोळसा आहे हा!! आपण इथे ठणाण बोंब मारली तरी अनेक जण अजुनही टिव्हीला चिकटलेले असणार तेव्हा गप्प बसावे हेच योग्य !!!

 17. Vivek says:

  चांगली चर्चा चालू आहे म्हणून संदर्भासाठी तीन उतारे आणि टाईम्समधल्या प्रीतिश नंदीच्या लेखांच्या लिंक्स खाली देतोय. उतार्‍यांमुळं कॉमेंट थोडी लांबलचक झालीये, त्याबद्दल दिलगीर.

  उतारा क्र. १:
  “The only advice I ever followed as a journalist is what Deep Throat told the two intrepid Washington Post reporters trying to track down Watergate. It was simple but has never failed me: Follow the money.

  In the Shashi Tharoor, Lalit Modi imbroglio, the media unfortunately ignored this sage advice. What began as a cheeky tweet ended up as a bloody political battle with the media turning from war correspondent to head hunter. Some hated Tharoor because they believed he did no work, was constantly on twitter. Others hated him because he had ignored political etiquette and flaunted his girlfriend openly. In any case, Tharoor’s not a typical Indian politician. He’s well educated, has spent many years abroad, is clever, articulate, well spoken and ambitious, having built a successful career in the UN which he gave up to pitch for the top job and lost. This means he’s a gambler too. He is young, by our political standards, which explains why despite his first rate credentials, he got a third rate junior minister’s job. The man who Manmohan Singh backed for the top UN job only got a rather lowly, sinecure position in his cabinet when he returned to India and joined politics. It’s a bit like Indira Nooyi being hired as Deputy General Manager in BSNL.”

  उतारा क्र. २:
  “This is where I return to Deep Throat’s advice: Follow the money. Indiscretions, tweets, girlfriends getting sweat equity may be improper. But they are not criminal. Now that Tharoor’s out, maybe we should stop equating Modi’s wrongdoings with his foolishness and instead track down the real crimes. That can be only done when we follow the money, not the fool. There’s no cash trail that leads to Pushkar or Tharoor. Those were only promises of gain. The actual cash trail leads to others. Let’s find out who they are.”

  उतारा क्र. ३:
  “Last week public opinion and a section of the media had already judged Shashi Tharoor guilty. But indiscretion is not a crime. It’s not a crime to tweet in the midst of your ministerial duties. It’s not a crime to have an attractive girlfriend if your marriage is not working.

  It’s not a crime to lobby for a cricket team for your home state and no, it’s certainly not a crime if your girlfriend gets some sweat equity from the team owners in return for services to be rendered. Sweat equity is not money. It’s a promise of money to be paid against a promise of service.

  Sunanda Pushkar did not make Rs 70 crore. Nor did Tharoor. But both were hounded to death. Sunanda fled to Dubai. Tharoor lost his ministry.

  There’s a simple rule in any investigation: Follow the money. That’s what Deep Throat advised the two young Watergate reporters. But to follow the money one must also know the crucial difference between impropriety and crime. That’s not easy when there’s huge public pressure on investigating agencies to nail those the media has already stamped as guilty. This is what happened to Tharoor.”

  मूळ लेख इथं वाचायला मिळतील:

  १. http://blogs.timesofindia.indiatimes.com/extraordinaryissue/entry/follow-the-money

  आणि
  २. http://blogs.timesofindia.indiatimes.com/extraordinaryissue/entry/ipl-and-the-lynch-mob

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s