पायाखालची वाळू…

तुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर  एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं म्हणजे त्यांचा अपमान करणं!! बिइंग अ जंटलमन , तुम्ही त्यांचा अपमान करायला नको- किमान या  ( २५-३० ) वयात तरी!!

चेहेरा पुर्णपणे ओढणीने झाकलेला, अंगावर तो टिपिकल पांढरा पुर्ण बाह्यांचा ड्रायव्हिंग गीअर – ग्लोव्हज सुध्दा- अशा वेशात बाजूला येऊन उभी रहाते. तुम्ही आपली बाईक आयडल करीत इकडे तिकडे पहात टवाळक्या करताय, तेवढ्यात सिग्नल पिवळा होतो, आणि ती मुलगी सुसाट वेगाने टेक ऑफ घेउना तुमच्या पुढे भुर्रकन निघून जाते. तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा गिअर करीत हळू हळू पुढे जाता – त्या मुलीला गाठून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत, पण तेवढ्यात दुसराच एक मुलगा एकदम सुसाट वेगाने तिला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो- आणि तुम्ही .बसता आपले हात चोळत………..!

असं झाले की विचार काय येतो मनात? च्यायला, वय झालं आपलं, अरे काय पळवते ती मुलगी गाडी.आपल्याला पण पुढे जाऊ देत नाही. थकलो आपण आता!!

असंही वाटतं की  चार पाच  वर्षापुर्वी हे शक्य नव्हतं कोणालाच. सिग्नलला  बाईक सगळ्यात पहिले पुढे जाणार ती आपली. झालं.. च्यामारी , वय झालं आपलं, म्हातारा व्हायला लागलो आपण. होतं की नाही असं??  ्तीशीमधे असतांना माझं तर व्हायचं बॉ असं !!

हल्ली तसं काही होत नाही – कारण खरंच मध्यम वयात पोहोचलोय.सिग्नलला कार उभी असली, आणि शेजारून कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी अशी फास्ट निघून पुढे गेली तर काळजी वाटते- अरे पडली तर?  वयाचा परिणाम  असेल कदाचित!

असो, तर काय सांगत होतो, की वय झालंय, किंवा आपण म्हातारं झालोय/होतोय ही भावना येणं जरी साहजिक असलं तरी वाढणारं वय काही थांबवता येत नाही. पहिला पांढरा केस दिसला होता तो दिवस अजूनही आठवतो..सकाळी ऑफिसला  जाण्याची तयारी करत होतो . भांग काढतांना एकदम   पांढरा केस दिसला – अरे?? हे काय झालं? असं होणं शक्यच नाही.. कदाचित प्रकाश असेल परावर्तीत झालेला- असं म्हणून तो केस निरखून पाहिला आणि लक्षात आलं की  तो खरंच पांढरा आहे.. मग कात्री उचलून कापायचा की मुळापासून उपटायचा ? हा गहन प्रश्न समोर आल्याने मी बराच वेळ तो केस हातात धरून विचार करीत राहिलो. थोड्या वेळाने सरळ त्याला उपटायचा प्रयत्न  केला, तर तो खूप  लहान असल्यामूळे  हातातून निसटून जायचा.तेवढ्यात लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो एकटाच नव्हता, बरेच त्याचे साथीदार पण होते आजूबाजूला.

तेंव्हा वय होतं २६ !हे काय वय आहे का केस पांढरे व्हायचं.  च्यायला लग्न पण व्हायचंय आणि पांढरे केस?कुठली मुलगी लग्न करणार  आपल्याशी? माझ्या मेंदू मधे टिव्ही वरच्या सगळ्या जाहिरातीतल्या मुली  फेर धरून भोवती नाचू लागल्या- आमचा हेअर डाय लाव म्हणुन- सगळ्या जाहिराती आठवल्या . दोन ऑ्प्शन्स होते, एक काळी मेहंदी ( म्हणजे पण डाय असतो हे नंतर समजले) आणि खरोखरचा डाय..  शेवटी गोदरेज काली मेहेंदी ( तेंव्हा लिक्विड हेअर डाय नव्हतं)  आणली केस काळे करायला. अगदी जय्यत तयारी केली होती. जुना टुथ ब्रश, जुनी बशी वगैरे..  एकदाचं केस काळे केले टुथ ब्रश ने.

केस काळे करतांना सवय नसल्याने इकडे तिकडे बराच रंग लागला होता. जेंव्हा केस धुतले तेंव्हा   केसांचा रंग इतका काळाकुळकुळीत होता की तो मिशा आणि भुवयांच्या ब्राउन रंगाशी एकदम विसंगत दिसत होता. बरं कानाला लागलेला डाय पण थोडा काळे डाग मागे ठेवून गेला होता. गालावर पण थोडा काळसर डाग दिसतच होता. आता काय करायचं?  बराच प्रयत्न केला काढायचा,  पण काही निघाला नाही.शेवटी तसाच गेलो ऑफिसमधे.

ऑफिस मधे गेल्यावर सगळे जण  ते काळे डाग पाहून अरे डाय केलास? म्हणून विचारत होते. या पेक्षा ते पांढरे केस परवडले असते, असं झालं होतं मला. एका मित्राने   – ज्याला डाय करण्याचा पुर्ण अनुभव होता सांगितले की डेटॉल घेउन ये , आणि त्यानी पूस, म्हणजे ते काळे डाग जातील. ताबडतोब डेटॉल आ्णून ते काळे  डाग पुसले वॉश रुम मधे जाऊन. पुढल्या वेळेस कसं करायचं ह्याचा विचार करत बसलो जागेवर जाऊन.  छेः , काहीही आठवतंय आज, इतक्या जुन्या गोष्टी , पण अगदी कालच झाल्यासारख्या झाल्या असं वाटताहेत..

पांढरे केस हा एक मोठा सेन्सिटीव्ह इशु आहे. पांढरे केस म्हणजे एजिंगचं लक्षणं. आपण म्हातारे झालो याची जाणिव. आधी सुरुवातीला कानाखाली एखादा पांढरा दिसणारा केस जेंव्हा नंतर   बऱ्याच  पांढऱ्या केसांसोबत    दिसतो तेंव्हा आता काहीतरी केलं पाहिजे, आणि हे लपवले पाहिजे असे वाटायला लागते.काही लोकं इतके सेन्सिटीव्ह असतात की अगदी सत्तर वय झालं तरी पण केस आणि मिशा डाय करतात. केस आणि मिशा वगैरे डाय करणे ठिक आहे, चांगलं   दिसतं, पण जेंव्हा केस वाढतात तेंव्हा मुळाकडचे  नवीन वाढणारे पांढरे केस दिसले की तो एक   केविलवाणा वय लपवायचा प्रयत्न वाटतो मला  . हे जर टाळायचं असेल तर  पिरिऑडीकली केस टच अप करावे लागतात.  मला स्वतःला ग्रेसफुली एजिंग झालेलं आवडतं- वय वाढतंय,   केस पांढरे होताहेत.. तर ठीक आहे. काय हरकत आहे? एक नॅचरल प्रोसेस आहे ती. आणि हो.. ते  केस काळे करून कोणा पासुन वय लपवायचं??

केस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल. लग्नापूर्वी बायकोचे केस कंबरेच्या खालपर्यंत लांब होते. काही दिवसांनी रोज केसांचा पुंजका दाखवायची केस विंचरल्यावर- मेले कित्ती केस जातात   म्हणुन .   केस गळायला लागले की मग डॊक्याची प्रयोगशाळा केली जाते. निरनिराळॆ शॅम्पु, तेलं, ( जबाकुसुम ते डाबर वाटीका, खोबरेल तेल शुध्द नारियलका , बदामाचं तेल, वगैरे) आणि व्हिटॅमिन ई च्या गोळ्या वगैरे घेणं सुरु होतं. कधी तरी कोणीतरी सांगतं की शाम्पु मधे खूप के्मिकल्स असतात, मग शिकेकाई, नागरमोथा, रिठा वगैरे आणुन आणि आधी उन्हात वाळवून मग बारीक कुटणे हा प्रकार पण केला जातो. अर्थात त्याने पण काही फायदा होतो असे नाही.  पण एक मानसिक समाधान मात्र मिळते. हे शिकेकाईचे प्रकरण फक्त स्त्रियाच करतात बरं कां.. एक अनूप तेल की कुठलं तरी एक तेल आहे, ते लावलं की म्हणे टकलावर पण केस येतात .( नका हो जाउ विकत घ्यायला, उ्गाच पैसे वाया जातील 🙂 )

स्त्रियांचं तर समजू शकतो, पण पुरुष? ते पण काही कमी सेन्सिटीव्ह नसतात केसांच्या बाबतीत. आमच्या  ऑफिसमधे एक अकाउंटंट होते, त्यांचे टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती.  ते काय करायचे, आपले डावीकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं. मग काय, दिवसभर केसच सांभाळत रहायचे हे. कित्ती मोठं काम ना? डाविकडले केस टकलावरून उजवीकडे नेऊन नीट टक्कल झाकलं राहील याची काळजी घेण? माझं आपलं  साधं सोपं काम आहे, केस गळतात- ठिक आहे, एकदम बारीक कटींग करून येतो. त्या न्हाव्याला लालू कट मार म्हणून सांगतो.

लग्न झाल्यावर मुलं पण होतातच. मुलं झाल्यावर पण  ते कसे पटापट मोठे होता आणि कधी खांद्यापर्यंत पोहोचतात हे लक्षातच येत नाही. पण जेंव्हा मुलीला आईची साडी घालून पाहिलं किंवा  मुलाला आपला रेझर वापरताना पाहिल, जेंव्हा मुलींची उंची  झालेली दिसते तेंव्हा किंवा मुलगा तुमच्या पेक्षा पण उंच दिसतो -की मग थोडी   जाणीव होते  आपण मोठे ( म्हातारे नाही) झाल्याची  .    मुलं मोठी होत आहेत – म्हणजे आपण म्हातारे होतोय  . आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

म्हातारे होणं किंवा एजिंग होणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामधे लाज वाटून घेण्यासारखे काय आहे? हे कळत असतं, पण बरेचदा वळत नाही… समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर कशी पायाखालची वाळू वाहून  जाते, आणि आपण काहीच करू शकत नाही- तसच असतं वयाचं पण..

फार मोठा झालाय लेख… अ्सो…

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , , , . Bookmark the permalink.

55 Responses to पायाखालची वाळू…

 1. Pingback: पायाखालची वाळू… « स्वगत

 2. Mahendraji,
  Pl read my post – http://tinyurl.com/27tqyuy तुम्हाला नक्की आवडेल.

 3. हा…हा…एकदम मस्त निरीक्षण काका.
  आता सद्ध्या केस लवकर पांढरे होणं काही विशेष राहीलं नाही, अगदी नववीच्या मुलांचे केस पांढरे असतात… खुप कॉमन झालंय…

  शेवटची वाक्ये तर अप्रतिम… लेख खुप आवडला…

  • आनंद
   नुसतं निरिक्षण नाही,. मी त्यातून गेलोय कधी तरी. इथे जे काही अनूभवलं ते सगळं लिहिलंय..
   केस पांढरे होणं हा अनूभव बाकी प्रत्येकालाच आयुष्यात कधी न कधी घ्यावा लागतोच. त्याबद्दल किती सेन्सीटीव्ह रहायचं ते आपलं आपण ठरवायचं.

 4. खुप छान, आवडले!

 5. हो ना, आनंद ला अनूमोदान. माझे ही झालेत म्हणा 🙂
  पोस्ट अप्रतिम….

 6. kaka, ekadam sahi lihilay lekh. Avadya.
  Tumchya bolanyat barechada ‘graceful aging’ ha shabd pan yeto. Mast ahe ha shabd.
  Nahitar kahi lok swatache khare vay lapavanyachi kiti kevilavani dhadapad karatat 🙂

  • सोनाली
   तसंनाही, प्रत्येकाची रहाणी वेगळी असते, काही लोकांना जास्त व्यवस्थित रहायला आवडतं. चेहेरा फ्रेश दिसतो केस काळे असले की असं काही मित्र म्हणतात.

 7. suruchinaik says:

  मामा, अरे झक्कास…पण मला नाही ाआठवत तुझे पांढरे केस? पण मामीचे लांब केस एक्दम आठवतात…उगाच कापले रे….कमरे पर्यंत लांब वेणी होती आणि एकदम मऊ मऊ केस…
  पण तू स्वत:ला वय झालं वगैरे का म्हणतोयस? yaar you are still 25 with 25 yrs of experience dear!!!

  • सुरु
   अगं तेंव्हा कमी होते फार. अगदीच तुरळक, पण तेवढे पण अस्वस्थ करायला पुरेसे होते. आणि वयाचं, चलता है, त्यात काही विशेष नाही.. जे आहे ते आहेच नां!

 8. suruchinaik says:

  @ sonali,
  एकदम खरं बोललीस सोनाली….खरंतर्र मामाला वय लपवणं वगैरे प्रकार आवडत नाही, खोटेपणा तर कधीच नाही…त्याच्या लिखाणात पण ते दिसून येतं…..म्हणूच त्याचं लिखाण भिडतं…त्याने कुठल्याही विषयावर काहिही लिहू देत, ते अगदी आतून आलेलं असतं हे वाचून कळतं बघ!!!
  मामा…अरे एकदम झक्कास….मामूजान यू आर ग्रेट…….

 9. abhijit says:

  समुद्राच्या पात्रात??
  तिथे कसे उभे राहणार आपण. समुद्राच्या किना-यावर.
  बाकी लेख छान. चष्मा लागल्यावर असाच विचार आला होता. आता आपला एक एक अवयव निकामी होत जातोय.

  • अभिजीत
   दुरुस्त करतो. असे चपखल शब्द आठ्वत नाहीत लिहितांना बरेचदा.. काही गोष्टी इने़एव्हिटेबल असतात, त्यांना अगदी सहजपणे घेतलं आपल्यालाच त्रास कमी होतॊ. चष्म्याचं उदाहरण एकदम सही..

 10. अगदी खरं (खोटं) सांगतो की माझा एकही केस अजून पांढरा झालेला नाही 😉

 11. Pingback: Tweets that mention पायाखालची वाळू… « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 12. suruchinaik says:

  मामूजान… हरब-याचं झाड?…काय रे मामा…? मी हरब-याच्या झाडावर चढवलं का तुला?…अरे मीच म्हणायची आधी.. तू एकदम रोकठोक लिहितोस म्हणून…पण आता जे आहे ते आहे….आता लिखाण वगरे तू आधी करायचास तरी कुठे फ़ारसं…आम्हा भाचे मंडळी ला भूताच्या गोष्टी सांगायचास..त्या तू स्वत: लिहिल्या (वेळेवर तयार केल्या) होत्या का? तसं असेल तर तू खूपच सही लेखक आहेस.. कारण तुझ्या त्या गोष्टींमुळे माझी आई अन तुझी ताई जाम परेशान…मी ईतकं घाबरायची ना की एका खोलीतून दुस-या खोलीत जाताना आई लागायची मला….
  सौरभ तर मोठ्या मोठ्याने नानामहाराजांच नाव घेत जायचा इकडून तिकडे….तुला जुनं घर आठवतं नं आमचं….त्या अंगंणात सुद्धा जायचो नाही आम्ही…

  तू जर त्या कथांचा लेखक असशील तर त्या भूतकथा क्षण क्षण जगलेय मी…तू फ़ार प्रभावी पणे सांगायचास…आता तसच प्रभावी लिहितोस…आगदी साध देखिल एकादम भिडत…ज्या लिखाणाने कुणाच्या भावना उफ़ाळून येतात ते लिखाण प्रभावी..मग भावना कोण्त्याही असो…एम एफ़ हुसैन बद्दल लिहिलस तेव्ह क्रोधाच्या ज्वाळा उफ़ाळून आल्या,
  आनंदवनाबद्दल लिहिलेलं वाचल्यावर आदर आणि प्रेम दाटून आलं, ढेकणा बद्दल लिहिलं तर माहिति पूर्ण आणि गमतीदार वाट्लं आणि पायाखालची वाळू वाचल्यावर मानवी मनच्या विचारप्रक्रीया आणि त्याला धरून वागणूक कशी गमती दार असते ते कळलं…

  मामा, तू काहीही लिही रे… तुझी शैलीच अशी काही ्तयार झाली आहे की चित्र्च उभी राहतात पुढे…..
  to be very frank..i still remember the story of medical collage and 3 dead bodies…….

 13. vidyadhar says:

  जबरदस्त काका!
  स्वानुभवाहून चांगला शिक्षक नाही!

  • हो नां, अनूभव लिहायचे म्हंटल्ं की पोस्ट कशी पटकन लिहून होते. ही पोस्ट फक्त ४० मिनिटात खरडली आहे.

 14. अनिकेत वैद्य says:

  “टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती. ते काय करायचे, आपले डाविकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं.”
  हे म्हणजे स्कर्ट घातलेल्या मु्लीसारख होतं. वारा आला की घाबरतात.

 15. अनिकेत वैद्य says:

  बरेच लोक सुरवातीला केसाला डाय लावतात. पण लौकरच कंटाळतात. मग सोडून देतात. अश्या वेळी केस धड पांढरे राहत नहीत अन धड काळे दिसत नाहीत.
  एखाद्या उत्तम चित्रकारालासुद्धा त्यांच्या केसांचा रंग सांगत येणार नाही.
  ना. सि. फडके यांचा १ लघुनिबंध आहे “काळे केस” नावाचा त्यातल वाक्य आहे हे.

  त्या लघुनिबंधात काळे केस अन पांढरे केस ह्या बद्दल खूप मस्त लिहिलय.

  केस डाय लावून काळे होतात पण दाढी, मिश्या किंवा पापणीच काय?
  पापणीचे केस पिकलेल्या माणसाने डाय लवलेला असला की कसला भयंकर दिसत ते. बापरे.

  दाढी पिकलेली अन केस काळे. हा प्रकार एका मोठ्या संगीतकाराबद्दल कायमचा आहे. (ओळखा पाहू कोण ते ? )

  • काळे केस , पांढरी दाढी अभिनेता माहिती आहे अमिताभ , पण संगितकार?? नाही सांगता येत..

 16. मस्त ,,सुंदर लेख आहे,केसाची काळजी मुलीना (बायकांना)असते oo

 17. ngadre says:

  apratim..apratim..
  Ekapeksha ek sundar lekh yet ahet tumche.

  Ho..ekdum ek divas disate vay zaley mhanoon..ani exactly valoo sarakalyacha feel yeto.time cha speed angavar yeto.

  Ajoon ek gosht..ata tya bhutaachya goshti amhala sanga, kay vatel te var..

  • नचिकेत.
   धन्यवाद.
   त्या गोष्टी म्हणजे वेळेवर जुळवलेल्या गोष्टी असायच्या भाचे कंपनीला सांगायचो.
   .

 18. लेखन नेहमी प्रमाणेच फक्कड! मला वाटलेले काही मुद्दे…..

  तरूण वयात डोक्यावर उअगवणारे पांढरे केस म्हणजे आपली मॅच्यरीटी दाखवते असं मला वाटतं. म्हणजे मला तर अश्या पांढर्‍या केसांचं खूपच आकर्षण असायचं. विशेषत: पांढरे केस झालेली व्यक्ती म्हातारी म्हणजे चेहर्‍यावर सुरकुत्या, दात पडलेले, चालताना त्रास होणे इ. नसेल तर मग ती व्यक्ती नक्कीच खूप विचारी आणि विद्वान असं मला वाटायचं.

  मुलं मोठी झाल्यावर म्हातारपणाची चाहूल लागणं हा एक दृष्टीकोन झाला. मला तर वाटतं की मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांनी आपल्या मित्रपरिवारात वाढ झाली असं मानलं तर ते अधिक चांगलं ठरेल सगळ्यांसाठीच एक निकोप नातं आणि कुटुंब तयार होण्यासाठी.

  एजींग सुध्दा एका वेगळ्याच ग्रेस ने घेता आलं पाहीजे…..नाही का? म्हणजे पायाखालची वाळू न सरकु देता. :):)

  • काही लोकं फार जास्त सेन्सिटीव्ह असतात या बाबतित, नुकताच एक भेटला होता, त्याला पाहिलं आणि हे लिहावंसं वाटलं. मला पण या गोष्टीचा कधी फार बाउ करावासा वाटला नाही.
   एजिंग पण वेगळ्याच ग्रेसने घेता आलं पाहिजे, म्हणजे आयुष्य़ खुप सुंदर वाटतं.
   कपड्यांच्या बाबतीत मात्र मी फारच सेन्सेटिव्ह होतो, त्या बद्दल नंतर कधी तरी..

 19. megha says:

  ha ha what a coincidence…kesana mendi laun ha lekh vachat aahe

  • खरंच – किती को इन्सिडन्स आहे नाही? 🙂 . केसांच्या बाबतीत मी म्हणतो नां स्त्रिया थोड्या जास्तच सेन्सिटीव्ह असतात ( घरच्या तिघींना पण बघुन मत तयार झालंय हे )

 20. वाढत्या वयाबरोबर हे सगळॅं होतच पण त्याच वेळी आपण जास्त डोळसपणे आपल्या जीवनाकडे पाहू लागतो. लेख छान.

  • अगदी खरं बोललात.. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो हे नक्की.. खूप फरक पडलाय माझ्या पण जिवनात.

 21. Swati says:

  heheheheh 🙂 kharach kay vattel ye lihilay,,,,:) bapare kiti motha lekh to kesan varacha? 🙂

 22. Manmaujee says:

  केस हा माझ्या साठी खूप हळवा विषय आहे…..आमची पण लवकरच फक्त झालर शिल्लक राहणार आहे….तेल अन् शाम्पूचा खर्च वाचला अस महणून मनाची समजूत काढायची. . . .आज ही लहानपणीचे फोटो पाहिले की हळहळ वाटते…असो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!! बाकी पोस्ट मस्तच झाली आहे…शेवट तर अप्रतिम आहे!!!!

  • बऱ्याच गोष्टींना काही उपाय नसतो. सोडून द्यायचं. माझे पण मध्यभागचे मैदान साफच झालंय. 🙂 चालायचंच म्हणून सोडुन द्यायचं.

 23. “केस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल” माझ्या बाबतीत मात्र हे लागू पडत नाही. डोक्यावरचे केस तिशीतच गेले, पण उगाच उघडे पडलेले टक्कल झाकण्याच्या मागे न लागता, उरले सुरले केस पण पूर्ण काढून (शेट्टी स्टाइल ) एकदम उजळ माथ्याने (शब्दशः) फिरतो आहे 🙂

  • निरंजन
   तुम्ही एक एक्सेप्शन . मला वाटायचं मी एकदाच आहे का असा म्हणून. भरत दाभोळकर पण तशीच स्टाइल मेंटेन करतात.
   आणि तुम्हाला दिसते पण छान ही स्टाइल 🙂

 24. bhaanasa says:

  माझ्यासाठी केस म्हणजे एकदम हळवा विषय. 🙂 आईने खूप मेहनत घेऊन माझे केस छान वाढले आणि आश्चर्य म्हणजे अजूनही टिकलेत ते… 🙂 पांढरे केस तर खरेच आजकाल कुठल्याही वयात होऊ लागलेत. अगदी शाळेतल्या मुलांचेही. बाकी ते शांम्पू काय शिकेकाई आणि इतर वनौषधी काय…. भन्नाट प्रयोग चालूच, त्यात पण मजा येते. सुपर्णा नक्कीच सहमत होईल. ही ही… महेंद्र, एकदम मजा आली रे. अनेक आठवणी तरळून गेल्या. शेवटच्या पॅराशी १००% सहमत.

  • सगळ्यांसाठीच असतो हळवा. केस जाणं सुरु झालं की मानसिक त्रासच जास्त होतो. मी कधीच सेन्सेटिव्ह नव्हतो फारसा. नेहेमीच एकदम बारीक केस कापायला सांगतो.

 25. sonali says:

  khup ch mast lekh…ekdam june divas aathavale…. Majhe kes khup lahanpani pandhare zale. agadi 5th-6th madhe. khup ch vait divas hote…ardhavat vay..kahi kalayache nahi….maitrini hasayachya. mag kay mehandi/kali mehandi…te hi sagle lapun -chapun. Hyat abhas-shala hyachi halat….khup aathavani aahet ..but unfortunately mostly vait ch 😦

  • सोनाली
   मनःपुर्वक आभार आणि ब्लॉग वर स्वागत.
   अहो, मला बरेचदा माझी मुलगी बाबा केस काळे करा म्हणते, पण मला नॅचरल लुक बरा वाटतो. म्हणुनच हा लेख लिहायला घेतला . मुलगी लहान आहे, १४-१५ची, तिला वाटणं पण सहाजिकच आहे म्हणा.. 🙂

 26. mipunekar says:

  पोस्ट एकदम सेन्सिटीव झाली आहे. परफेक्ट निरीक्षण पोस्ट मध्ये उतरले आहे.
  ज्याची जळते त्याला कळते हे मात्र खरं आहे.
  वरच्या एका प्रतिक्रियेनुसार खरच उत्तमोत्तम लेख सध्या लिहित आहात.

 27. रोहन says:

  खूप आधी एक लेख वाचला होता.. आता लक्ष्यात देखील नाही काय होते. पण शीर्षक लक्ष्यात आहे… ‘Grey hairs should be respected… ‘

 28. Samruddhi ne kalvlya pramane tumche sarva blogs vachun kadhle. Intresting aahet!!. aamhi pan aasechhhh….. PACHKAL aahotttttt!!! mhani vachun ek-don namoone aathvale(1)makdachya hatat kolit! (2) aadhich markatt tyatach madya pyala (3)navajla guru chuli pudhe hagge!(4) chakrala pad chakar!(5)bhattala dili osari un bhatt haat-paay pasari!(6)ou vil kay un por piyil kay! (7) solavya varshi gadhvin pan sundar diste! aasech lihitttte vha un aamhala vachayla miloo dyat. AII THE BEST!!———vidya.

  • अभय, विद्या
   धन्यवाद. हा आपला उगाच काहीतरी टाइमपास सुरु असतो माझा- वेळ घालवायला म्हणून.टिव्ही फारसा पहात नाही, त्यामुळे लिखाण आणि वाचन दोन्हीही सुरु असतं नेट वर. लिखाण वगैरे खरं तर सुपर्णाचा प्रांत आहे.
   समृध्दीची भेट झाली हैद्राबादला बरं वाटलं. संपुर्ण संध्याकाळ होतो बरोबर आम्ही अंजू कडे.:) आलो कधी जबलपुरला तर नक्की भेटू.

 29. कैलास पाटसकर says:

  छान लेख आहे थोडे विचार बदलले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s