तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय?

कधी तरी तुमच्या एखाद्या मित्राचा मेल येतो, की तुझा लेख कुठल्यातरी दुसऱ्या एका ब्लॉग वर लिहिलेला आढळला. आता तुम्ही काय कराल? ज्याने तो लेख चोरी केलाय त्याला आधी एक कॉमेंट टाकायचा प्रयत्न कराल- पण !!!!!!!! एखाद्या ब्लॉग वर कॉमेंट डिसेबल केलेली असेल तुमच्या चोरलेल्या लेखासाठी  तर??

गुगल लोकांना ब्लॉगर्स चा अकाउंट फ्री अकाउंट म्हणुन देते. त्या अकाउंटला लोकांनी व्यवस्थित वापरावे अशी अपेक्षा असते. म्हणजे ब्लॉगर वापरुन केलेल्या ब्लॉग वर पोर्नोर्ग्राफिक मटेरिअल, चोरीचे मटेरिअल, किंवा तत्सम कारणासाठी वापरु नये म्हणुन  ऍग्रीमेंट मधे लिहिलेले असते.    कुठल्याही ब्लॉगरच्या पेज वर हेडरच्या वर एक आडवा बार असतो. त्यामधे ब्लॉगरला फ्लॅग करण्याची  सोय केलेली आहे. त्यावर क्लिक करा, तिथे तुम्हाला वेगवेगले ८ ऑप्शन्स दिसतील , त्या पैकी दुसऱ्या ऑप्शनला – कॉपी राईट्स/ पायरसी इशु वर  क्लिक करा आणि गुगलला सबमीट करा. गुगल तुमचा क्लेम तपासून त्या ब्लॉगला सरळ डीलिट करते.

पण हे करतांना थोडं सांभाळून. कारण ज्या ब्लॉग वर तुम्ही फ्लॅग करताय, त्या ब्लॉगरने तुमचा लेख घेतला असेलच, पण त्याच ब्लॉग वर त्या ब्लॉगरची कित्येक वर्षाची मेहेनत पण असू शकते. क्षणीक रागाच्या भरात ब्लॉग फ्लॅग करु नका. आधी मेल पाठवा, त्या ब्लॉगरला, आणि विनंती करा.. नंतर हे सगळं पुढचं..

बरेचदा काही लोकं  ब्लॉगर मधे  वरचा बार काढून टाकतात , त्यामूळे त्यांच्याबद्दल इतक्या सहजपणे गुगलला कळवता येत नाही. त्या साठी पण एक उपाय आहेच. गुगल ने एक कम्प्लेंट सेल बनवलेला आहे त्यांचा इ मेल ऍड्रेस इथे दिलेला आहे userhelpindia@google.com   ह्या  पत्यावर त्यांना तुमच्या ब्लॉगची लिंक , आणि नंतर दुसऱ्याने कॉपी केल्यावर त्याच्या ब्लॉग ची लिंक दोन्ही पण पोस्ट करा. जर तो गुगल ब्लॉगर असेल तर त्याचा अकाउंट गुगल बंद करू शकते.  वर्डप्रेसवर पण अशीच ’रिपोर्ट फॉर स्पॅम ’ सोय केलेली  आहे.

त्या साईटला स्पॅमींग साठी मार्क करा. इथे एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वर जाऊन  डुप्लिकेट साईट ऑर पेजेस वर क्लिक करून रिपोर्ट सबमिट करा. ऍडिशनल डिटेल्स मधे पण एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम ( म्हणजे तुमच्या ब्लॉग वरचा कुठला लेख चोरीला गेला आहे ती लिंक  आणि ज्याने तो कॉपी केलाय त्यची लिंक ) आहे ते लिहा- अर्थात लिंक्स सहीत.

युनायटेड स्टेट डिजिटल मिलेनियम कॉपीराईट ऍक्ट च्या अंतर्गत तुम्ही  त्या ब्लॉगरला नोटिस पाठवू शकता. डिजिटल मिलेनियम कॉपीराईट ऍक्ट बद्दल माहिती इथे दिलेली आहे.   या पेज वर गुगल ला   कम्प्लेंट कशी द्यायची याची माहिती दिलेली आहे. गुगलचा पत्ता आणि फॅक्स नंबर पण आहे.  कम्प्लेंट करायचीच तर सरळ फॅक्स करा. ते सोपं आणि स्वस्त पडतं.जर तुम्ही चुकीची कम्प्लेंट केली तर तुम्हालाच परत फाइन होऊ शकतो. तुमच्या मा्हीती साठी इथे पत्ता आणि  फॅक्स नंबर खाली दिलेला आहे.

Google, Inc.
Attn: Google Legal Support, Blogger DMCA Complaints
1600 Amphitheatre Parkway
Mountain View, CA 94043

OR fax to:

(650) 618-2680, Attn: Blogger Legal Support, DMCA Complaints

ह्या सगळ्यानोटीसेसची एक स्क्रिन प्रिंट घेउन ठेवा. पुढे पोलिस कम्प्लेंट करायचे ठरवले तर त्या स्क्रिन प्रिंट आउट्सची गरज पडेल.  तसेच कॉपी राइटची कम्प्लेंट करतांना पण तो स्क्रिन शॉट उपयोगी पडतो. काउंटर नोटीफिकेशन मधे  स्क्रिन शॉट अटॅच करा अशी नोट इथे सापडली , अतिशय महत्वाची माहिती आहे जरूर वाचा. जेंव्हा तुम्हाला तुमचे लेख /कविता कु्ठल्यातरी ब्लॉग वर दिसतात, तेंव्हा तुम्ही सगळ्यात  म्हणजे त्या ब्लॉग रायटरने पेज डिलिट करण्या पुर्वी त्या पेजचा स्क्रिन शॉट घेउन ठेवा.

त्त्याच सोबत ऑन लाइन कॉपी राईट ( जो तुम्ही विनामुल्य घेऊ शकता) तो पण घेउन ठेवा. माझ्या ब्लॉग वर उजव्या बाजूला एक काळं बॅनर आहे त्यावर लिहिलंय कॉपीस्केप. त्या साईटला जाउन तुम्ही आपला ब्लॉग रजिस्टर केला, की तुम्ही कुठलंही नविन पोस्ट टाकलं की तुम्हाला एक डिजिटल प्रिंट तुमच्या इमेल मधे मिळते. त्या प्रिंटला

सेव्ह करुन ठेवा. कधी पुढे केस वगैरे करायचं काम पडलं , तर ती डिजिटल प्रिंट कोर्टात ग्राह्य धरली जाते. माझ्या पायाखालची वाळू  या लेखाची मला आलेली डीजिटल प्रिंट  खाली कॉपी पेस्ट करतोय.

DO NOT DELETE THIS EMAIL.  THIS EMAIL IS IMPORTANT IN THE COPYRIGHT PROTECTION PROCESS. **
Mahendra Kulkarni’s Copyright:
****************
Copyright :: All Rights Reserved
Registered :: Sun Apr 25 05:50:08 UTC 2010
Title :: पायाखालची वाळू…
Category :: Blog
Fingerprint :: 1efe11a0febe94f3d3cfc453c713a8

3e2e63ffd58f1b28d3880f2062ca36a48e
MCN :: EKMH5-R1SU9-139F5
****************

माझ्या प्रत्येक लेखाची डीजिटल प्रिंट मी सांभाळून ठेवलेली आहे. जर तुम्ही कॉपीस्केप वर रजिस्टर नसाल, तर जरूर रजिस्टर करा.

ऑन लाइन पायरसी हा इतक्या सहजपणे घेण्याचा विषय नाही. जर एखाद्याने तुमचा पाठपुरावा केला तर चक्क पोलिसांच्या कस्टडी मधे पण तुम्हाला रात्र काढावी लागू शकते. माझ्या एका वकिल मित्राबरोबर बोललो तेंव्हा त्याने भारतिय पिनलकोडच्या अंतर्गत  सरळ चोरीची कम्प्लेंट पोलिस स्टेशनला केली जाउ शकते असे  सांगितले, तसेच  ऑन लाइन चोरी ही पण साध्या चोरी प्रमाणे ट्रीट केली जाउन अटक केली जाउ शकते असंही तो म्हणाला .

कॉपी राईटच्या केसेस चे डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्यातल्या काही केस स्टडीज वाचल्या तर या गोष्टीची तिव्रता  लक्षात येईल. एक ऑनलाईन पॉलीसी ग्रुप  आहे, त्यांचे पेज इथे आहे. भरपुर माहिती दिलेली आहे त्या पेज वर. सगळे ब्लॉगर्स हे  कुठे ना कुठे तरी कामं करतात . ब्लॉगिंग हा काही कॊणाचाच व्यवसाय नसतो. तेंव्हा शक्यतो अशा कॉंट्रोव्हर्सी मधे पडायचे टाळा.. कुठल्याही ब्लॉग वरचे साहित्य तुम्हाला वापरायचे असेल तर त्या ब्लॉगरला  परवानगी मागितली तर ती आनंदाने कोणीही देईल. पण त्या ब्लॉगरचे नांव काढून आपल्या नावाने ते साहित्य स्वतःच्या ब्लॉग वर प्रसिध्द करू नका. जर  एखादा लेख खूप आवडला असेल, तर त्या लेखाच्यावर ठळक अक्षरात तो लेख कुठल्या ब्लॉग वरचा आहे, याची नोंद दिल्यास दुसरा बलॉगर पण काही ऑ्बजेक्शन घेणार नाही.

माझे काही लेख दुसऱ्या एका ब्लॉग वर दिसले , असा इ मेल माझ्या एका मित्राचा आला.  या पुर्वी पण अशाच काही घटना घडल्या  होत्या. तेंव्हा आता एकदा नेहेमीसाठीच या गोष्टींना फुल्स्टॉप द्यायचा, म्हणुन सगळी माहीती शोधून काढली. पण नंतर दुस़या दिवशी सगळे लेख ’त्या’ ब्लॉग वरुन काढून टाकलेले दिसले. म्हणुन जास्त शोधकार्य बंद केले , नाहीतर या विषयावर Phd   झाली असती नक्कीच..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , , , . Bookmark the permalink.

38 Responses to तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय?

 1. Manmaujee says:

  महेन्द्र काका….धन्यवाद खुपच उपयुक्त अन् सध्या आवश्यक अशी माहिती…..किमान आता तरी ब्लॉग वरील चोरीला पायबंद बसेल अशी अपेक्षा करू या!!!

  • प्रत्येकाला माहिती असावं म्हणुन पोस्ट टाकलंय. इथे कांचनची पण बरीच मदत झाली हे पोस्ट लिहायला.

 2. Sanjiv Siddul says:

  “…म्हणुन जास्त शोधकार्य बंद केले, नाहीतर या विषयावर Phd झाली असती नक्कीच…”
  हा हा हा… 😀
  काका खरच चांगलं संशोधन केलात! भरपूर माहिती मिळाली. पुढे मलाही ही माहिती उपयोगी पडेल…
  तुमच्या पूर्व परवानगी शिवाय ह्या blog चा link माझ्या Buzz वर टाकतोय. माझ्या काही blogger मित्रांना उपयोगी पडेल ही माहिती.

 3. दादा,
  ही खूप उपयोगी आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक ब्लॉगरने ही माहिती काळजीपूर्वक वाचावी व हे गंभिरपणे घ्यावं. या व्यतिरिक्त आपल्या लेखाची चोरी झाली असेल, तर चोराला सावध करण्याआधी काय उपायोजना करायच्या यावरही मी एक लेख लिहून तयार ठेवला आहे. तो ९ मे २०१० रोजी प्रसिद्ध करतेय. सुरूवातीला जाऊ दे, सोडून देऊ या असं करून आपण दुर्लक्ष केल्यानेच हे प्रकार वाढिस लागलेत. मी पुन्हा एकदा हेच सांगेन की आपल्या परिचयातील ब्लॉगरचा लेख चोरीला गेला तर सर्व ब्लॉगर्सनी एकी दाखवायला हवी. होस्टींग कंपनीला व त्या चोराला सर्वांनी एक एक ईमेल जरी पाठवलं तरी प्रकरणातील गंभीरपणा या दोघांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही.

  • ’ब्लॉगरला मेल पाठवणे” हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. यामधे थोडं फार कव्हर केलंय पण त्यावर एक वेगळं पोस्ट नक्कीच हवे.

   सर्व ब्लॉगर्सनी एकी दाखवायलाच हवी. आज माझ्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर पण येऊ शकते.. हा मुद्दा नेहेमीच लक्षात ठेवायला हवा.

 4. Pingback: काय वाटेल ते वर ..तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय? « स्वगत

 5. अप्रतिम माहिती दिलीत काका…सिंप्ली ग्रेट तुम्ही या विषयावर डबल Phd केली आहे 🙂

 6. शाब्बास तुमची.

 7. sahajach says:

  महेंद्रजी महत्त्वाची माहिती दिलीत…. आभार 🙂

  • तन्वी
   प्रतिक्रिये करता आभार. तुम्हाला या पोस्टची कधीच गरज पडु नये ही सदिच्छा.

 8. दिपक says:

  महेंद्र, अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. मला वाटते सध्यातरी ब्लॉगवरील लेखनचौर्याला आळा घालण्यासाठी काही चांगल्या सुवीधा नाहीत. हल्लीच छोटा डॉन ह्यांच्या ’पुणेरी पाट्या’ हा लेख अगणीत लोकांनी आपआपल्या नावावर खपवला होता.

  काही नविन माहिती मिळाली तर जरुर ऍड करेन.

  • मला पण आला होता तो लेख….
   होतं काय, की आपल्याला भांडत बसायला वेळ नसतो. जर एखाद्याने मनावर घेतले, तर नक्कीच ब्लॉग बंद होऊ शकतो.

 9. ग्रेट माहिती काका… कांचन ताईशी सहमत.. प्रत्येकाने ही माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे! जर कोणी ब्लॉगर, अनेक हालापेष्टा सहन करून त्याचे कन्टेन्ट ब्लॉगवर टाकतो, आणि कोणी त्याच्या या कन्टेन्टची नुसत्या “कॉपी-पेस्ट”ने चोरी करीत असेल, तर यावर नक्कीच लक्ष देणे गरजेचे होते.

  पण हे करतांना थोडं सांभाळून. कारण ज्या ब्लॉग वर तुम्ही फ्लॅग करताय, त्या ब्लॉगरने तुमचा लेख घेतला असेलच, पण त्याच ब्लॉग वर त्या ब्लॉगरची कित्येक वर्षाची मेहेनत पण असू शकते. क्षणीक रागाच्या भरात ब्लॉग फ्लॅग करु नका. आधी मेल पाठवा, त्या ब्लॉगरला, आणि विनंती करा.. नंतर हे सगळं पुढचं..

  याअगोदरही तुमचे, पंकज दादाचे पोस्ट्स चोरले गेले आहेत, त्यावेळी आपण सर्वांनी त्या चोरावर एकदमच कितीमोठ्या कॉमेन्ट्स टाकून त्याला माफी मागायला लावली होती. पण वरील उपायांचा अवलंब केल्याने एखाद्या चोराला (ज्याने जाणुन-बुजुन चोरले नसेल किंवा त्याला कॉपी-राइट्सच्या भानगडीबद्दल जास्त माहिती नसेल तेव्हा) मानसिक धक्के पोहोचण्याचे चान्सेसच जास्त आहेत. हे पर्याय अवलंबन्याअगोदर त्याला पूर्वसुचना देणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्याला माफी मागायला थोडाफार वेळ मिळू शकेल!

  ह्म्म, जर त्याने कॉमेण्ट डिसॅबल केल्या असतील, तर मात्र दुसरे पर्याय शिल्लक राहत नाही. दुसर्‍याचे पोस्ट्स नेहमी चोरून ते एका स्वतंत्र ब्लॉगवर विनापरवानगी पब्लिश करणे आणि कॉमेण्ट डिसॅबल करणे, हा प्रकार खुपच निंदणीय आणि बालिश वाटतो… अशा लोकांना तर कधीच माफी करता कामा नये!

  • या लेखाचा उद्देश हा एवढाच की सगळ्यांना अशा चोरीसाठी काय शिक्षा होऊ शकते ते समजावे..
   अजूनही बऱ्याच लोकांना याचे कॉन्सिक्वेन्सेस माहिती नाही म्हणुन सगळी गम्मत वाटते. जर तुम्हाला माहिती नसेल कोणाचे पोस्ट आहे ते, तर तुम्ही कमीत कमी मेल आल्यावर तरी क्रेडेन्शिअल्स द्यायला हवेत.

 10. Pingback: काय वाटेल ते वर ..तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय? « स्वगत

 11. bhaanasa says:

  महेंद्र, एकदम चोख काम करून ठेवलेस. आशा आहे आता तरी हे प्रकार कमी/बंद होतील.

 12. Narayani says:

  तुम्ही खूपच महत्वाची माहिती दिली आहे. माझ्या ब्लोग बाबत पण मला असे आढळून आले. तेव्हा मी बऱ्यापैकी चिडले होते. आणि सगळी माहिती शोधून काढायला सुरवात केली होती. पण तुम्ही इथे दिलेली माहिती इतकी संपूर्ण आहे. कि तुमची हि एन्ट्री रेफरंस म्हणून खूपच उपयोगी आहे

  • मला पण बरेचदा चिडचीड व्हायची. पहिल्या दोन तिन वेळेस सोडुन दिलं होतं, पण नंतर विचार केला या गोष्टीचा एकदाच सोक्ष मोक्ष लाऊन टाकायचा.. म्हणुन थोडा रिसर्च केला कांचन सोबत आणि मग हे पोस्ट लिहिलं.
   मला वाटतं या पुढे नुसत्या इ मेल ने काम होईल. इतकं करायची गरज पडणार नाही. 🙂

 13. खरंच सुरेख माहिती दिलीत आणि अगदी सविस्तर. प्रत्येक ब्लॉगरसाठी अत्यावश्यक !!

 14. Pingback: Tweets that mention तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय? « काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 15. महेश कुलकर्णी says:

  सर्वाना उपोयागी पडेल आशी आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यंवाद

  • मला स्वतःला पण बराच रिसर्च करावा लागला या साठी .. पण नंतर सगळ्यांना उपयोगी पडेल म्हणुन पोस्ट केली इथे.

 16. Vivek says:

  महेन्द्र

  थीम नुकतीच बदललीत काय? नवं डिझाईन ठसठशीत आणि वाचायला सोपं झालंय. एकदम मस्त.

  विवेक.

  • कालच लॉंच केली वर्डप्रेसने. सकाळीच बदलली. मला पण आवडली. वर्डप्रेस टेक्निकली जास्त चांगलं आहे ब्लॉगर पेक्षा , फक्त बाहेरच्या थिम्स अलाउ करत नाहीत ते..

 17. sir, khup changali mahiti dilit aamchyasarkhya bloglekhakana fayada hoil

 18. Pingback: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा

 19. Pingback: ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने « रमलखुणा

 20. Vaiibhav says:

  खूपच महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही..धन्यवाद

 21. Shree says:

  काका, खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही..!
  धन्यवाद..!

 22. savadhan says:

  Chan mahiti dili aahe.
  Dhanyawad !
  http://savadhan.wordpress.com
  NY-USA
  28-7-2010
  vel Dupari 2-23

 23. काका, खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही..!
  धन्यवाद..!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s