मनसे खाद्योत्सव…

उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या  इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी    लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, म्हणजे पुन्हा एक गिनिज बुकाची एंट्री शिवसेनेची होणार हे नक्की!!

This slideshow requires JavaScript.

राज ने प्रायोजित केलेला मराठी खाद्योत्सव काही फारसा तग धरु शकला नाही. याचं कारण म्हणजे चुकीच्या जागेचे सिलेक्शन. चक्क अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधे! तिकडे जायचं म्हणजे कारने जातांना तर वाट लागली काल. सगळीकडे  ट्रॅफिक जाम…सारखं वाट्त होतं की त्यापेक्षा सरळ ट्रेनेने गेलो असतो तर बरं झालं असतं.

माझ्याच ऑफिसातल्या काही  सेंट्रल साईडच्या लोकांना विचारलं, तर सरळ नकार दिला . या व्हेन्यु पेक्षा बांद्रा कुर्ला कॉ्प्लेक्स जास्त योग्य ठरला असता. अगदी तुरळक गर्दी दिसली त्या महोत्सवाला.स्टेशन ते अंधेरी पण मेट्रो चं काम सुरु असल्याने सावळा गोंधळ असतो . ट्रॅफिकची तर पुर्ण पणे वाट लागलेली असते.  ही जागा का सिलेक्ट केली  हेच समजत नाही. जर दुसरी एखादी जागा असती तर हा उत्सव नक्कीच सक्सेसफुल झाला असता यात काहीच शंका नाही.

परवाच हरेक्रिश्नजींची पोस्ट वाचली आणि तेंव्हाच ठरवलं , की यहां तो जानाईच मंगताय!! मग काय, दुपारपासूनच फिल्डींग लावली, दोन मित्रांना पण सांगितलं की आज जायचंय- म्हणजे  ह्या महोत्सावाची खूप तारिफ करून  की त्यांची मानसिक तयारी करून घेतली . संध्याकाळ पर्यंत ते पण माझ्या इतकेच एक्साईट झाले आणि   आम्ही तिघंही तिथे जाउन पोहोचलो.

पोहोचल्यावर सगळीकडे नुसत्या  खाण्याचे स्टॉल्स बघून आता काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं. एक. मित्र जैन होता, म्हणून फक्त  व्हेज खादाडी झाली.  आधी संपुर्ण उत्सवामधे एक राउंड मारुन कुठे काय अव्हेलेबल आहे ते बघून आलो. मराठ मोळ्यावेशातले मुलं आणि मुली लेझिम नृत्य करत होत्या. ते बघितलं  आणि खादाडीचं विसरूनच गेलो. अप्रतिम नृत्य होतं ते. प्रत्येक स्टेप मधे त्यांची मेहेनत जाणवत होती.

या वेळेस तर व्हेज खाणं झालं, पण पुन्हा एकदा जायचं म्हणतोय नॉन व्हेज साठी.  ( जर शनिवार पर्यंत असेल तर) .काय खाल्लं म्हणताय? सगळे फोटो दिलेले आहेत वर.

इथे पहिला स्टॉल दिसला तो खानदेशचा. जळगावी भरीत आणि भाकरी, सोबतच पाटॊडी आणि कांद्याचा झुणका.. स्टॉल बघितला आणि श्रीगणेशा केला खादाडीचा. आता इतके स्टॉल्स बघितल्यावर सगळे प्रकार टेस्ट करणे जमणार तर नव्हतेच, पण शक्य तितके ट्राय करायचे  ठरवले होते.

पहिली डीश म्हणजे दोन भाकरी आणि तीन भाज्या- पाटॊडी, वांग्याचं जळगांवी भरीत, आणि  झुणका घेतली . सोबत साबुदाणा खिचडी होतीच. भरीत एकदम टेस्टी होतं, पण पाटॊडी भाजी मिळमिळीत वाटली. झुणका पण कांदा निट शिजलेला नव्हता. जेंव्हा इतका मोठा उत्सव – आणि  तो पण खाद्योत्सव, तेंव्हा थोडी जास्त काळजी घेऊन व्यवस्थित टेस्टी डिशेस बनवणे अपेक्षित होते. थोडा भ्रमनिरासच झाला.

पुढल्या एका स्टॉल वर जाउन नाग्पूर पाटॊडी , आणि चंद्रपुरी वडे घेतले.  नागपुरी पाटॊडी  म्हणजे कोथिंबिरीची वडी अप्रतिम होती. पण चंद्रपूरी वडे  खुप (सॉगी)  नरम पडलेले होते. त्यामुळे जरी चव बरी असली तरीही तितकेसे अपील होत नव्हते. चंद्रपूरी वडा थोडा क्रिस्पी असेल तर बरा वाटतो. याच स्टॉल वर समोरच एका माठाखाली लाकडं पेटवून त्यावर मांडे तयार करणे सुरु होते. आम्ही मांडे आणि डाळ कांदा ( हरभऱ्याच्या  डाळीचे डायरेक्ट ( कुकर मधे नाही)  शिजवलेले  आणि त्याला  कांद्यसोबत फ्राय करुन तयार केलेली डाळ कांदा डीश आणि पातळ भाजी घेतली . दोन्ही पण भाज्या खूप टेस्टी वाटल्या. मांडे तर अप्रतिम….मांडे वगैरे तर आजकाल बघायला पण मिळत नाहीत. राज ठाकरेंचे आभारच मानायला हवेत या महोत्सवासाठी.

इतकं झाल्यावर पोट तर भरलं होतंच, पण तरीही रहावलं नाही म्हणून मालवणी स्टॉल ला पोहोचलो आणि तिथे जाउन काजूची उसळ आणि वडे घेतले. दोन्ही गोष्टी खूप टेस्टी होत्या.  ओल्या काजूची उसळ  काल पहिल्यांदाच खाल्ली. सुकलेले काजू भिजवून केलेल्या पंजाबी काजू करी पेक्षा शंभर पट टेस्टी होती. कांदा, लसुन काही न घालता  बनवलेला पदार्थ पण तितकाच चवदार बनू शकतो ह्याची खात्री पटली. 🙂  हल्ली  या कुकरी शो मुळे, प्रत्येक भाजीमधे टोमॅटॊ, कांदा, आलं, लसूण वाटण घालण्याची पद्धत आहे, पण जुन्या पद्धतीची भाजी  हे सगळं न घालता पण खूप छान होते – हे समजायला तरी सगळ्यांनी एकदा तरी इथे आवर्जून भेट द्यावी.

न खाल्लेल्या गोष्टींमधे एक म्हणजे पाणी पुरीच्या पुरी मधे खिमा अन तांबडा रस्सा  घातलेली स्पेशल वारणा पुरी, आणि फिश चे प्रकार चाखायचे राहिले. सावजी चिकन पण खायचंय. तेंव्हा पुन्हा एकदा जावं लागेलच.  थोडक्यात काय तर,  हा एक राज ठाकरेंचा एक चांगला प्रयत्न  पण प्रॉपरली  जागा सिलेक्ट न केल्या गेल्या मुळे फसलेला म्हणून लक्षात राहील. संकल्पना उत्कृष्ट आहे यात काही संशय नाही. पण प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी असे वाटते..

सगळी खादाडी झाल्यावर समोरच एक पानाचा पण अतिशय सुंदर स्टॉल होता. तिथे पुणेरी पगडी घालुन मराठी पानवाले उभे होते. एक मस्त पैकी कलकत्ता साधा पान बनवून घेतलं आणि  परतीची वाट धरली.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खाद्ययात्रा and tagged , , , , , , , , , . Bookmark the permalink.

52 Responses to मनसे खाद्योत्सव…

 1. ngadre says:

  jaaylaach pahije..

  Faarach pani sutale..

  Aho tambda rassa kasa sodlaat..?

  Aso..

  By the way. Title madhe khadyostav zaley..te khadyotsav have..small typo..

  Lekh ekdam chatakdaar..

  • सोबत एक जैन मित्र होता. म्हणुन सोडावा लागला. पण आज मात्र प्रयत्न करतो पुन्हा जाण्याचा. लवकर घरी गेलो तर नक्कीच जाइन.
   या लोकांनी शनिवार – रविवार सोडुन कसा काय कार्यक्रम केला तेच कळत नाही. शनिवार पर्यंत ठेवला असता तर बरं झालं असतं.
   दुरुस्त केलंय टायटल. 🙂

 2. सचिन says:

  काका, फोटो एकदम मस्त बर का.

  आता तुमची पोस्ट वाचून आज पुन्हा भेट देऊन येतो तिकडे.

 3. Pingback: Tweets that mention मनसे खाद्योस्तव… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 4. श्रीमंत, तुम्ही मंडळी एका वेळेला इतकं सगळं कसं काय खाऊ शकता… मी तर त्या पहिल्या दोन भाकर्‍यातच आडवा झालो असतो. तसा एकेकाळी….बहुदा इसवी सनापूर्वी 😉 मीही होतो खाबू…पण आता पोट खूप लवकर भरतं…त्यामुळे अशा ठिकाणी जाता येत नाही…उगाच जीवाला कशाला त्रास करून घ्या…इतके सारे प्रकार समोर असतांना नेमकं काय खायचं हे ठरवणं….म्हणजे चक्रव्युहात शिरण्यासारखंच अवघड आहे.

  असो. आपला वृत्तांत आवडला.

  • खाण्यासाठीच जन्म आपुला म्हणतो ना रोचौ? तसंच आहे आमचं पण.. युध्दाला उभं राहिल्याबरोबर समोरचा शत्रुपक्ष संपेपर्यंत काही शस्त्र खाली ठेवत नाही मी. अन तेच रहस्य आहे माझ्या ’तब्येतीचे’. आता तर आठवड्यापासून डायटवर होतो, करुन टाकलं ’पारणं’ डायटींगचं. आता पुन्हा एक आठवडा माठ, पालक, दुधी खायचं झालं.. 🙂

   • रोहन says:

    वा.. श्रीमंत वा… खाण्यासाठीच जन्म आपुला. 😉 अगदी बरोबर. युध्दाला उभं राहिल्याबरोबर समोरचा शत्रुपक्ष संपेपर्यंत काही शस्त्र खाली ठेवत नाही आपण… 😀

 5. Sarika says:

  काका, ऑफिस अगदी ५ मिनिटावर आहे, ऑफ वीरा देसाई रोडवर.. पण जायला जमलं नाहि अजुन… तुम्ही खरे खाण्याचे शॊकिन… इतक्या ट्राफिक मधुन आलात….

  • सारिका
   वाट लागली काल ट्रॅफिक मधे. नंतर मालाडला लिंक रोडनी गेलो. तिकडे पण जाम… शेवटी तासाभरानंतर घरी पोहोचलो. ट्रेन ने आलो असतं तर त्रास कमी झाला असता.असो.. शक्य असेल तर आज अवश्य जाउन ये !! ओव्हरऑल एक चांगला अनुभव आहे.
   आणि खाण्यावर तर अगदी मनापासून प्रेम करतो मी…:)

 6. Pingback: मनसे खाद्योत्सव… « स्वगत

 7. thanthanpal says:

  फक्त उत्सव साजरे करा बाकी कांही केले नाही तरी चालते असा आमच्या मराठी नेत्यांचा समज झालेला आहे.उभा महाराष्ट्र पाणी आणि वीजे अभावी जळत आहे पण या नेत्यांना याची फिकीर नाही. यांना फक्त मिडिया समोर चमकायचे आहे. लोकांना एक वेळचे जेवण मिळत नसताना हे पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धा आयोजित करत आहेत. जनाची नाही तरी मन से ची लाज वाटायला पाहिजे. गेल्या ४० वर्षात मराठी च्या भल्यासाठी यांनी फक्त घोषणाबाजी केली भार्ष्टचार कमी पडला आता जनतेचे रक्त जमवून गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी तर पुरण पोळीचा विक्रम थेरे करत आहेत.
  thanthanpal.blogspot.com

  • मी हे पोस्ट केवळ खादाडी पोस्ट म्हणून लिहिलंय, लिहितांना राजकीय विचार अजिबात डोक्यात नव्हते. तुमचा तो इ मेल मी बऱ्याच लोकांना फॉर्वर्ड केला- १०६ हुतात्मे अन हजार च्या वर आत्महत्या केलेल शेतकरी .

   परवाच सहज एक बातमी वाचनात आली , की येडुरप्पा यांनी बेळगांवला दुसरी राजधानी करायचं ठरवलंय. हे बरं म्हणायचं की वाईट? मला वाटतं बेळगांवच्या दृष्टीने बरं, आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने वाईट. बेळगांव महाराष्ट्रात घेउन काय साधलं जाणार आहे हे मला अजूनही समजलेलं नाही. चांदा ते बांदा महाराष्ट्र झाला. आता फक्त नविन मुलांना हे चांदा आणि बांदा कुठे ते विचारा?? उत्तर मिळणार नाही, याची ९० टक्के खात्री आहे. असो.. विषयांतर होतंय.

   गडचिरोली , बाबत न बोललेले बरे. कारण त्या बाबत काहीच बोलण्यासारखे नाही. इतक्या वर्षानंतरही गडचिरोली अजूनही तसाच आहे. ्कदाचित आजही ते लोकं आपण महाराष्ट्रात का आहोत याचा विचार करीत असतील.

   रक्त गोळा करणे हा एक चांगला पायंड आहे. उद्देश काही जरी असला, तरी ध्येय चांगले असल्याने मला तरी तो एक चांगला उपक्रम वाटला.
   तसेच मनसेचा तो खाद्योत्सव हा अतिशय आवश्यक होता असे मला वाटते. अजूनही

   कित्येक लोकांना मांडे म्हणजे काय , शेवभाजी, दाण्याची सोलापुरी चटणी, नागपुरची पाटॊडी, चंद्रपुरचा वडाभात वगैरे किंवा महाराष्ट्रातल्या विविध पध्दतींच्या ट्रॅडीशनल खाद्यपदार्थांबद्दल बद्दल माहिती नाही. पंजाबी जेवणाचे आक्रमण आणि त्यामूळे बदललेली स्वयंपाकाची चव ( प्रत्येक पदार्थात कांदा, लसुण , आलं, टोमॅटो ) .. या उत्सवातून मूळ ट्रॅडिशनल स्वयंपाकाच्या पध्दतींना जर पुन्हा धुमारे फुटत असतील तर तो या उत्सवाचा एक फायदा म्हणावे लागेल.

 8. अप्रतिम..मिस होणार ह्या वेळी. चला तुमच्या निमित्ताने भेट झाली वर्चुयल 🙂

 9. Manmaujee says:

  आम्हाला येणं काही शक्य नाही….चला फक्त फोटू पाहून मम म्हणतो….बाकी जबरदस्त खादाडी केली आहे…असाच खाण्यावर लोभ असु द्या…अन् अजुन श्रीमंती वाढवा…:)

  • श्रीमंती कमी करायची वेळ आलेली आहे.प्रयत्न सुरु आहे.. 🙂
   तरी पण नॉन व्हेज खायचं राहूनच गेलं..

 10. सोनाली केळकर says:

  खरच यातल्या अनेक पदार्थांची नावच फक्त ऐकलेली आहेत, खाल्लेले काय पाहिलेले सुद्धा नाहीत. पण त्यासाठी स्पोर्ट कॉप्लेक्सला जाणं कठीणच आहे.त्यामुळे माझे आपले ’मनात मांडे’
  तुम्ही ओल्या काजुची उसळ अजुनपर्यंत खल्ली नव्हती?? इतके वेळा गोव्याला जावुनसुद्धा.

  • सोनाली
   गोव्याला गेल्यावर मासे खायचे असतात – काजू फक्त फ्राय खायचे बिअर सोबत.. 🙂 काजू उसळ अशक्य .. गोव्याला गेल्यावर.

 11. सोनाली केळकर says:

  फोटोमधले ’हॉटेल अभिषेक’ चिपळुणचे असावे असे मला वाटते. तिथली सोलकढी आणि सामिष भोजन खूप प्रसिद्ध आहे.

 12. सोनाली केळकर says:

  फोटोमधले हॉटेल अभिषेक चिपळूणचे वाटते जर असेल तर तिथली सोलकढी आणि सामिष भोजन खूप प्रसिद्ध आहे. ऐकीव माहिती 🙂
  छान सोनाली पान 🙂

 13. “काजूची उसळ काल पहिल्यांदाच खाल्ली” ह्या कायच नाय, मालवणी सागोती खावन बगा, खापरोळी, शिरवाळे हात चाटत रवश्यात म्हाराजा..!!!

  • सागुती खाल्ली आहे बरेचदा. गोडाउन आहे आमचं लोअर परेल ला. तिकडे एक हॉटेल आहे मालवणी , तिथे ट्राय केली आहे.
   शिरवाळे अजून तरी नाही खाल्ले, पण पुढल्या वेळेस नक्की..

 14. रोहन says:

  नेमका हुकवला बघ… विदर्भाकडचे अनेक पदार्थ मला चाखून बघायचे होते. राहून गेले.. आता पुन्हा कधी चान्स मिळणार बघुया… पण जागा खरच चुकीची रे. अगदी शिवाजीपार्क सुद्धा चालले असते… 🙂

  • पुढल्या वेळेस चुक लक्षात घेतीलच. पुन्हा भाव पण थोडे जास्तंच वाटले. मनसेचा उत्सव म्हंटल्यावर प्रॉफिटॅबिलिटी कडे न पहाता, केवळ लोकांना आस्वाद घेता यावा म्हणुन केलेला एक प्रयत्न असे व्हायला हवे होते, पण तसे न होता, एक प्रॉफिट मेकिंग सेंटर सारखा कार्यक्रम राबवला गेला. असो. तरी पण एक फायदा आहेच- सुरुवात तरी झाली.. मनसेच्या साईटवर कॉमेट टाकतो.

 15. जाऊदे निषेध नाही करत. काय एकसेएक पदार्थ आणि वर्णन !! तुमच्यामुळे फोटो तरी बघायला मिळाले. 🙂

  आणि सोनालीचा पानाचा स्टॉल होतातिथे हे माहित नव्हतं 😉

  • हेरंब
   सोनालीचा नविन बिझिनेस.. तिला विचारावं लागेल स्टॉल वर काम करायला कोणी हवं का ते!

   • सोनाली केळकर says:

    हो हो हवी आहेत नां, स्वयंसेवक म्हणून 🙂

 16. जाण्याचा विचार होता पण सकाळी वाहतुकीचा आढावा घेतला नि लक्षात आलं की जाण्यायेण्यातच वेळेचे तीनतेरा वाजतील. 😦
  खरंच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स निवडायला हवं होतं त्यांनी.

  • अंधेरीचेच काय ते लोकं गेले असावेत. मालाडहून पण लोकांनी जाणं टाळलं. माझा एक हिंदी भाषीक मित्र मात्र एकदम खूष झाला होता मराठी पदार्थ खाउन. मांडे खाल्ल्यावर तर त्याची बोलतीच बंद झाली होती.
   मराठी मे इतना पदार्थ है, तो फिर मराठी हॉटेल क्युं नही मुंबईमे?? हा प्रश्न जेंव्हा त्याने विचारला तेंव्हा काय उत्तर द्यावं? याचा विचार अजूनही करतोय..

 17. ngadre says:

  lowerparel la saguti kuthe khallit? Yeva gajaleek? Sindhudurg? Majhya adhichya office madhoon roj lunch la malvani hotels madhe jaycho..

  • लोअर परेल ला ते सिंधूदुर्ग मधे जायचो नेहेमी. ना. म. जोशी मार्गावर पोलीस चौकीते लो.प. स्टेशन च्या मधे आहे डाव्या हाताला. अजून दोन हॉटेल्स आहेत, पण नांवं आठवत नाहीत. प्रिपरेशन बरी असते. फक्त वडे देत नाही तो. सागूती आणि रोटी. बरी असते. 🙂

 18. आल्हाद alias Alhad says:

  “पाणी पुरीच्या पुरी मधे खिमा अन तांबडा रस्सा घातलेली स्पेशल वारणा पुरी, ”

  आय हाय… हे तर ट्रायायलाच पाहिजे!

 19. काका, सगळ्यात आधी तुमच्या हाणण्याच्या क्षमतेला सलाम, मस्त हल्ला केलात. आठवडाभर कितीही डाएट केलात तरी बसल्या बैठकीला असं इतक्या पदार्थावर उभं आडवं चढण म्हणजे काबिले तारीफ. बाकी मांसाहार चुकवू नका. फोटोत मालवणी पदार्थ झाकलेले दिसले तरी माझ्या पोटात आगडोंब उसवळून गेले 😉

  • सिध्दार्थ
   अरे फार नाही हाणलं, अगदी थोडंसंच.. 🙂
   पण नॉनव्हेज राहून गेलेत.. असो.. नेस्ट टाइम. मालवणी शिंपीची आमटी म्हणून एक पदार्थ होता, तो खाण्याची इच्छा राहून गेली.. 🙂

   • काका, एक शिंपी (मुळे) हा जबरा प्रकार असतो. शिंपले विळीवर मधोमध चिरून आतला प्राणी एका शिंपीने खरडून उरलेल्या शिंपीमध्ये घेतात आणि पहिली अर्धी शिंपी टाकून देतात. ओळखीचे मासेवाले किंवा कोळी लोकं असतील तर ह्या शिंपीची “काट” म्हणून एक द्रव पदार्थ जो या शिंप्यामधूनच काढलेला असतो तो देतात. तो आमटित टाकला की क्या कहने. एकदम लाजवाब. आणि शिंपी थंड, उन्हाळ्यात खायला चांगली. बघा संधी सोडू नका, नाहीतर या रत्नागिरीला एकदा, मस्त पाहुणचार करतो. एखादा खादडि मेळावा रत्नागिरीला भरवायला हवा.

 20. bhaanasa says:

  काल सकाळी सकाळी तुझे हे खादाडीचे फोटू पाहिले आणि दिवसभर काय काय डोळ्यासमोर येत राहिले. 🙂 मांडे खाऊन इतकी वर्षे झालीत….. तुझी मज्जाच झाली की. चला निदान तू फोटो टाकल्यामुळे पाहायला मिळाले. आता शनीवारी पुन्हा दौरा आहे का?

  • अगं हो नां.. मला पण खूप वर्षांच्या नंतर मांडे खायला मिळाले. बरेच पदार्थ माहिती पण नाहीत आपल्या मराठी माणसांना.

 21. harekrishnaji says:

  सोनाली,

  तुमचा तर्क बरोबर आहे. हे हॉटेल अभिषेक चिपळूणचेच आहे, माझ्या इथल्या खाद्योत्सवाची सुरवात मी येथुनच केली, आणि ती सुद्धा काजुच्या उसळीनीच, वड्यासोबत.

  महेंद्र,

  ही जागा साफ चुकली. मला अंधेरी पुर्वेकडुन येथे जायला जवळजवळ दिड तास लागला. दर तसे महागडे होते. पण या मागे या स्टालधारकांची मेहनतपण तशीच आहे हे लक्षात घेता मग त्याचा त्रास झाला नाही. मी विचार करत होतो हे राहिलेल्या अन्नाचे काय काय करत असतील ? रात्री भांडी पुर्णपणे तशीच भरलेली दिसत होती.

  यापेक्षा मी मध्यंतरी वान्द्रे रेक्लेमेशनला झालेल्या खाद्य महोत्सवात अत्यंत तृप्त झालो होतो.

  • बांद्रा रिक्ल्मेशनला भेट देण्याचे राहिले. मला माहितीच नव्हती त्या बद्दल.
   मुख्य म्हणजे जागा चुकल्याने तिथे मनसेच्या कार्यक्रमाला पण फारशी गर्दी झाली नसेल.
   स्टॉल धारकांचे भाव जास्त होते, पण तुम्ही दिलेलं कारण पटलं..

 22. vidyadhar says:

  निषेधासाठी जन्म आपुला….

  असो…इथल्या इथे काय काय बनवून जीव शांत करता येईल पाहतो..

  अहो काका….ओफिसातून तुमची साईट ब्लॉक झालिये..का कळत नाहि, त्यामुळे आठवडाभर यायलाच झालं नाहि…आता भरपाई करतोय…

  • पण आता तर वर्ड प्रेस वगैरे काहीच नाही.. मग बॅन का होते? काही ठिकाणी ब्लॉग्ज ब्लॉक केलले आहेत म्हणतात..
   संपलं आता हे प्रदर्शन.. दुसरी चक्कर चक्क टाळली, प्रवासाचा कंटाळा आला म्हणून.

 23. ,महेश कुलकर्णी says:

  सर्व फोटो सुंदर आहे ,जागा मोठी असल्यामुळे लोकाना दूर वाटत असेल ,पण आपल्यकडे (मुंबईत )जागा नसल्या मुळे त्यांनी ती जागा निवडली निदान मराठी खवयेचा प्रकार सर्वाना समजला हे नक्की आपण दखल घेतली त्या बद्दल आपले आभिनंदन ,,,

  • शिवाजी पार्क, चर्चगेटचं ओव्हल मैदान जिथे सर्कस वगैरे होते तिथे, पण करता आलं असतं. किंवा गोरेगांवचं बॉम्बे एक्झिबिशन केंद्र पण चाललं असतं.

 24. neena says:

  Vajan vadhalele pahile ka 2 rya divashi?

  • वजन वाढलं असेलच. काही गोष्ट टाळता येत नाहीत. पुढला आठवडा पुर्ण दुधी ची भाजी अन मटकी मुग खाउन काढावा लागेल.

 25. छान झाला खाद्योत्सव . .

 26. mahesh mohan shinde says:

  tondala agadi pani sutale…………………… pan aata kay fayada ………………….. i missed it……………………….. aata svatachya jibhela ”better luck next time” ase manave lagel………………………

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s