निर्लज्जपणा..

मुंबईला सध्या पाण्याची कमतरता आहे. दररोज कुठे ना कुठे तरी पाइप लाइन डॅमेज झाल्यामुळे कित्येक लाख लिटर पाणी वाया जाते.  असंही म्हंटलं जातं की ह्या  पाइप लाइन डॅमेज करण्याचे काम टॅंकर लॉबीचे लोक करतात. परवाच कुठे तरी एक बातमी वाचली होती , की   पाण्याच्या   ज्या  पाइप लाइन्स डॅमेज केलेल्या आहेत तिथेच एक व्हॉव्ह बसवून टॅंकर्स मधे पाणी भरून विकले जाते.  पोलिसांनी छापा मारून टॅंकर्स जप्त केल्याचे वाचण्यात आले होते.

कालच कुर्ला स्थानकावर  दादरहून पोहोचलो आणि स्नॅक्सच्या स्टॉल वरच्या  एका पाटीने लक्ष वेधून घेतले. लिहिलं होतं की बी एम सी ने पाणी न दिल्या मुळे  पाणी दिले जाणार नाही !  क्षमा असावी!  या स्टॉल धारकांनी लोकांना पाणी विनामुल्य द्यावे अशी बेसिक अट कॉंट्रॅक्ट मधे असतांना सुध्दा हे लोकं बेशरमपणे अशा पाटा लावतात हे बघून आश्चर्याचा धक्काच बसला.  म्हणजे स्टेशनवर ए्खादा माणुस चक्कर येऊन पडला तर त्याला ग्लास भर पाणी पण हा भैय्या पैसे घेतल्या शिवाय देणार नाही. ह्या भैय्या कडे कप धुवायला, भांडी धुवायला पाणी आहे, पण लोकांना प्यायला देण्यासाठी  पाणी नाही. निर्लज्ज पणाची कमाल आहे.

रेल्वे चे अधिकारी पण या लोकांबरोबर मिळालेले असावेत अशी  शंका आहे, त्याशिवाय इतकी मुजोरी हे कॅंटीनचे ठेकेदार लोकं करण्याची हिम्मत करणार नाहीत . बरं, अशी पाटी फक्त कुर्ला स्टेशनवरच आहे- इतर कुठल्याही स्टेशन वर नाही. मी तिथे जाउन पाहिलं, तर जे लोकं काही खात होते, त्यांना पाणी दिलं जात होतं, पण नुसतं पाणी मागितलं तर ते देण्यास सरळ नकार देत होते.

पाणी हवंय?? कोल्ड ड्रिंक्स प्या!!! कोक -पेप्सी चा प्लान तर नाही हा? 🙂

असो.. आपण काय करू शकतो? रेल्वे मधे कुठे कम्प्लेंट करायची हे कुणाला माहिती आहे का?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

29 Responses to निर्लज्जपणा..

 1. हा प्रकार तर खुपच निंदणीय आहे… अरे एक वेळ टपरी बंद पडली तरी चालेल, पण कोणाला पाण्यापासून वंचित ठेवणे (तेसुद्धा कायद्याचे उल्लंघन करून! ) म्हणजे माणुसकीला कलंक लावणारी ही गोष्ट आहे… काका, अशा लोकांवर नक्कीच कारवाई व्हायला हवी!

 2. Pingback: Tweets that mention निर्लज्ज पणा.. | काय वाटेल ते…….. -- Topsy.com

 3. Ashish says:

  Ha stall fodun takala pahije.

  • नाही हो.. ते आपलं काम नाही. असे करण्यापेक्षा त्या लोकांनाच असा धडा शिकवायचा की त्यांची पुन्हा अशी हिम्मत करायला नकॊ. सरळ कम्प्लेंट करायची बस्स..

 4. thanthanpal says:

  उभ्या महाराष्ट्रात आज वीज नाही पिण्यास पाणी नाही.आणि मुंबईत तुम्ही दीवस रात लाईट च्या प्रकाशात भ्रष्ट क्रिकेटचे सामने जल्लोषात भरवतात. हाच सामना दिवसा उजेडात ठेवून कांही खेड्यांच्या घरातील एक मिणमिणता दिवा उजळावा असे वाटले नाही. सर्व राज्याची वीज चोरून मुंबईत रोज दिवाळी साजरी करतात. हा अन्याय काय म्हणून आम्ही सहन करावा? आता शेतीला पाणी कापून तुम्हाला रेन डान्स करण्याकरता पाणी पुरवठा केला जातो thanthanpal.blogspot.com

  • रेन डान्स साठी पाणि, सामने – जेंव्हा त्यांना सगळेच बेनिफिट्स दिले जातात, आवश्यकता नसतांना टॅक्स बेनिफिट्स… वगैरे..

   जनरेटर्स वापरणे कम्प्लसरी करायला हवे अशा सामन्यांसाठी. पण केवळ जनरेटरने तयार केलेल्या विजेचे भाव जास्त होतात, म्हणुन ते लोकं एमएसईबीची विज वापरतात. जरी फक्त विज देणे बंद केले, तरीही खेड्यांमधले भार नियमन कमी होऊ शकते.

   दिवसा सामना खेळवणे – हा उपाय पण आहे. कालची बातमी मुंबईला दारु पण विकण्यात आली फायनल मॅच ला. असो, विषयांतर होतंय..

  • ठणठणपाल जी, दिवसा ५ क्रिकेटचे सामने खेळवल्याने १०० खेड्यांमध्ये दिवस-रात्र मिळून ५-६ महिने तरी प्रत्येक घरात एक सीएफएल बल्ब आरामात चालू शकतो! खरं तर या भ्रष्ट नेत्यांनाच पहिले धडा शिकवणे गरजेचे आहे, त्यांच्याच जोरावर (आळशीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे) असे फडतूस आणि भामटे भैय्ये-भगूर माजतात… असो! पण महाराष्ट्रातील ७० ते ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. हे भ्रष्ट नेते निवडणुका जवळ आल्या की गोर-गरीब शेतकर्‍याच्या जखमांवर थोडीफार (तात्पुरती) मलम-पट्टी करतात आणि या गरीब लोकांचा असा कपटी काव्याने विश्वास हस्तगत केला की पुन्हा निवडून येतात याच गरीब लोकांच्या जीवावर… आणि मग आपले खिसे भरण्याचे काम चालू करून देतात. मग त्यांना ज्यांच्या जीवावर ते खाताहेत, त्यांच्या गरजांकडे आणि मुलभूत गरजा, अडचणींकडे सुद्धा या नेत्यांचे लक्ष जात नाहीत! प्रत्येक सरकारी कार्यालयातील कर्मचारीही असेच म्हसाडीवानी बसलेले भ्रष्ट सडलेल्या कांद्याप्रमाणे असतात.

   महेंद्र काका, तुम्ही जे हे उदाहरण दिले आहे, हे याच प्रकारचे आहे! संयुक्त महाराष्ट्राला जन्माला येऊन उद्या ५० वर्षे पुर्ण होतील, पण महाराष्ट्रातील गरीबी हटविण्यात आणि मुलभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यात आतापर्यंतची सर्व सरकारे विश्वासघातकी ठरलेली आहेत. माझं तर म्हणणं आहे की, उद्या कोणत्याच भ्रष्ट नेत्याच्या पापी हातांनी संयुक्त महाराष्ट्राच्या अखंड चळीवळीमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना वाहू देण्यास आपण लोकांनी पुढे होऊन सक्त मज्जाव करावा! जर आपण लोकांनी एकत्र येऊन विशिष्ट अभ्यासपूर्ण कार्यप्रयोजनाद्वारे जर हळूहळू भ्रष्टाचाराविरूद्ध पावले उचललीत, तर थोडा तरी फरक नक्कीच पडेल! यामुळे जर त्या भ्रष्ट आणि विश्वासघातकी लोकांची उघड नाचक्की झाली, तर यापेक्षा मोठे यश काय?

   महाराष्ट्राच्या ५०व्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनामित्त (?) सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

   • आजचं पोस्ट पहा. कसले हुतात्मे?? माझ्या मते त्यांचा तर चक्क खून केला गेला.. मुरारजी देसाईंच्या सरकारने.

 5. लाईटच्या प्रकाशात रात्रीचा दिवस करून भ्रष्ट क्रिकेटचे सामने जल्लोषात नुसते भरवले जात नाहीत तर वरती दक्षिणा म्हणून कर पण माफ केला जातो. आणि आपले मुख्यमंत्री सांगतात आता त्याबद्दल काही करू शकत नाही, पुढील वर्षी बघू.

  • मुद्दाम काही ऍक्शन घेतली नाही सामने पुर्ण होई पर्यंत सरकारने. आता म्हणताहेत काही करता येत नाही.. जाणून बुजून केलेली ही खेळी आहे , हे कोणाच्याही लक्षात येईल.

 6. सचिन says:

  काका, मला वाटत सगळ्यांनी अशी तक्रार करायला हवी.
  एकाच ते ऐकणार नाहीत.पोस्ट च्या खाली तक्रार कुठे करायची ते द्या(तुम्हाला पत्ता मिळाल्यावर).म्हणजे आम्हीं पण करतो तक्रार.

 7. विनय says:

  ह्याची तक्रार तुम्ही स्टेशन मास्तर कडे करू शकता. त्यांनी दखल न घेतल्यास मध्य रेल्वेची हेल्पलाईन आहे. तिकडे संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार नोंदवता येईल.

  • तक्रार केली..
   Shri Rakesh Vatash
   SDGM and Chief Vigilance Officer,
   Central Railway, Mumbai CST,
   Tel. No: 022-22707102, Railway: 54003
   Mob: 9987640002
   Mail Id :sdgm@cr.railnet.gov.in
   Fax No : 022-22621913

 8. bhaanasa says:

  खरोखरच निर्लज्ज. उत्तर आले का इ मेलचे?

 9. बाप रे. तहानलेल्याला पाणी नाकारण्याचा अमानुषपणा किती निर्लज्जपणे चालू आहे इथे !!! शीतपेय कंपन्या आणि रेल्वे अधिकारी यांची मिलीभगत आहे. दुसरं काही नाही !!

  • खरंय. जर पाणी नसेल तर स्टॉल बंद का करीत नाही? भांडी धुवायला पाणी आहे, पण प्यायला नाही. जर सोमवारपर्यंत त्या भैय्याने पाणी देणं सुरु केलं नाही, तर पुढची स्टेप!!!

 10. Amolkumar says:

  Mumbai kay anni Pune Station kay…. sarakha anubhav aahe.

 11. sahajach says:

  कठीण आहे सगळे….. खरचं लाजिरवाणे ….

 12. Sachin says:

  Vishal Saheb aapla abhipray vaachla vaachoon khoop bara vatala. Samajik jaaniv thevnaari manasa ajoon shillak aahet hech mahatvacha. Mi pan jaagrook pane laksha thevat asto pan politicians la dosh thevoon kahihi sadhya honar nahi. Kharatar tyana aapanach nivdoon dilela asta mhanje politician jar chookat astil tar aapanch tyala jawabdar aahot. Barobar na……..?

  Tyla solutions pan aahet te konte asavet te jara sangala ka? Mazya vicharane tar Politicians la doshi mhananya peksha aapan jagrook lokanich poitics madhe yene khoop mahatvache aahe. System madhale manasa badalnya peksha aakhi system aaplya hatat gheoon lokanchya saathi yogya kaam kele tar kharach aapan samaja saathi kahi kele ase mhanata yeil.

  Sachin Shah

  • सचिनजी
   कम्प्लेंट केल्यावर मला दोन वेळा फोन आलेत रेलवे कडून आणि दुसऱ्याच दिवशी ते बोर्ड काढुन टाकले गेले , आणि पाणी देणे सुरु केले त्या दुकानदाराने.
   तुमचे म्हणणे योग्यच आहे. आपण जागरूक असलो, की बरीच कामं होतात नुसत्या कम्प्लेंटवर. फक्त योग्य ठिकाणि कम्प्लेंट करणे आवश्यक असते.

   • Sachin says:

    Sir mi manya karto ki complaint dilyavar board kaadhale gelet pan ajoonahi aapan pahal ki mothya Mall’s madhe MRP rate chya var keemat lavoon vastu viklya jaatat. Tyana kahi hi farak padat nahi. Te sangtat kara courtat case. Aata sanga ki average middle class manoos jo mothya mooshkiline familila gheoon Mall madhe picture la jaato to courtachi payari chadhel ka? Nakkich nahi. fakt Mall chya navane taho fodat picture baghoon to parat yeil. Mala vatata ha sarva-samanya experiance asel.

    Mi aaple mat khodat nahi aahe. Aapla experiance mala nakkich kamala yenar pan average middle class manoos jyala direction chi garaj aahe. Tyla tyacha paathi BACKING lagte. Mala vatata ki aapan jar ekatro aalo aani poodhakar ghetla tar nakkich farak padel.

    Sachin Shah

    • मला वाटतं मोठ्या मॉल्स मधे एम आर पी च्या पेक्षा कमी किमतीमधे विकतात बऱ्याच वस्तू असे मला वाटते. पण एम आर पी पेक्षा जास्त किम्मत फक्त सिनेमा हॉल जवळच घेतात..

 13. Sachin says:

  Dear Mahendra Sir,

  Thanks for your feedback. Mi appriciate karto aaplya jagrookte baddal. Pan maza prashna vegla hota ki MRP chya var price lavoon vastoo vikli jaate for i.e. jikde Bisleri water Rs.13/- indicated value aahe pan ti vikli jaate Rs. 20/- la. Complaint konala karavi staff sangel “Lena he to lo ya phir jao”

  • तो एक वेगळा मुद्दा आहे. त्याबद्दल विचार करावा लागेल.सांगतो समजलं की. शोधा नां नेट वर. वजन माप खात्याकडे तक्रार नोंदवू शकतो आपण… फक्त साईट शोधावी लागेल त्यांची.

 14. Vikram Bapat says:

  And that is why we call it as Incredible India.
  # We live in a nation where Rice is Rs.40/- per kg and Sim Card is free.
  # Pizza reaches home faster than Ambulance and Police.
  # Car loan @ 9% but education loan @ 12%.
  # Complex buildings are getting ready within one year while public transport etc. takes several years to be completed.
  # Students with 45% get in elite institutions thru quota system and those with 90% get out because of merit.
  # 2 IPL teams are auctioned at 3300 crores and we are still a poor country where people starve for 2 sqaure meal per day.

 15. Raj says:

  पाण्याच्या बाटल्या फक्त १ लितेर् च्या अरे १० लितेर् च्या ऑप्षन का नाही आहे.
  ठेवा ना ५ , १० लितेर् च्या पण.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s