वेडा झालाय का हा?

४ वेळेस विधानसभेवर निवडुन आलेला , एक वेळेस लोकासभेत निवडून गेला होता हा गृहस्थ..  विधानसभेतली याची कारकिर्द लक्षात राहण्यासारखी झाली ती केवळ एकाच गोष्टी साठी ती म्हणजे सभागृहात   पेपरवेट फेकून मारला होता आणि त्या नंतर विधानसभेत ले सगळे पेपरवेट काढून टाकण्यात आले होते- त्यासाठी! या शिवाय याने काही जास्त कन्स्ट्रक्टीव्ह  काम केल्याचे आठवत नाही.

हे पोस्ट वेगळ्या विदर्भाला सपोर्ट किंवा विरोध   करण्यासाठी लिहित नाही. तर एका मॅच्युअर्ड (?) नेत्याच्या इ्मॅचुअर्ड स्टेटमेंटचा उहापोह करण्यासाठी लिहितो आहे.

नागपूर लोकसभा मतदार संघातून हा माणुस १९७१ आणि १९८० साली निवडून गेला. पूर्वीच्या काळी एक फॉर्वर्ड ब्लॉक नावाची पार्टी होती त्या पार्टीच्या बॅनर खाली निवडणूका लढवल्या या गृहस्थाने,नंतर मग बऱ्याच वेळा पार्टी बदलली. सध्या कुठल्या पार्टीत आहे हे त्यालाच माहिती. रामराव आदिकांचा जावई. स्वतःला विदर्भवीर म्हणवून घेणे ह्याला खूप आवडतं.  कोणाबद्दल बो्लतोय ते समजलं असेलच.. विदर्भवीर(??) जांबूवंत धोटे.

ह्याची कालची मुक्ताफळं ऐकली- म्हणतोय की मी स्वतः आत्मघाती दस्ते तयार करीन ,  जागोजागी  ब्लास्ट करीन- वेगळ्या विदर्भासाठी. असे समाज विघातक स्टेटमेंट एका एक्स एमएलए , एम पी ने पब्लिकली द्यावे या पेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती काय असेल? जसे काश्मिर मधे लोकं वेगळ्या देशासाठी लढतात, त्याच धरतीवर हा माणुस वेगळ्या विदर्भासाठी लढा द्यायचा म्हणतोय. मुर्ख माणूस!!

टेररिस्ट कारवाया करणाऱ्या पेक्षा पण एखाद्याला टेररिस्ट कारवाया करण्यासाठी उद्युक्त करणे ही अतिशय  वाईट गोष्ट आहे , आणि असे स्टेटमेंट जेंव्हा ए्क्स एमपी देतो, तेंव्हा तर त्याची दाहकता जास्तच वाढते आणि ही एक काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे असे वाटते. वेगळा विदर्भ हवा म्हणुन आंदोलन करणे , मोर्चा वगैरे एक वेळ समजू शकतो पण त्या आत्मघाती पथक ?

त्या पथकामधे अर्थात जांबुवंत धोटे नसेल तर इतर लोकंच असतिल.

स्वतःला विदर्भवीर म्हणवून घेणारा हा ’वीर’ (???) सध्या थोडा जास्तच चेकाळला आहे. या माणसाला  ५ वेळा   विदर्भातल्या जनतेने कसे काय  निवडुन   दिले ह्याचं मला नेहेमीच  आश्चर्य वाटत आलंय.

याचं  म्हणणं असंही आहे की मी वेळ पडल्याव वेगळ्या विदर्भासाठी नक्षलवाद्यांची मदत घेईन!  निर्लज्जपणा म्हणतात तो ह्यालाच!

टेररिस्ट  ऍक्टीव्हिटीज ना सपोर्ट करणारं असं   विधान त्याने पब्लिकली  दिल्यावर इतर विदर्भवादी नेते, अर्थातच  अशा  प्रकारच्या वक्तव्याला सपोर्ट करणार नाहीत –  आणि  त्याचा जाहीर धि्क्कार करतील अशी पण  अपेक्षा आहेच  . तरी पण दत्ता मेघे, वसंत साठे , विलास मुत्तेमवार सारखे नेते या स्टेटमेंटचा निषेध करतात की कोपऱ्यात दडी मारून बसतात हे पहायला आवडेल !हे झालं नेत्यांचं.. पण  त्याच बरोबर विदर्भातील  सामान्य जनता ही आपल्याला सपोर्ट करेल असे जर जांबुवंताला    वाटत असेल तर ते पुर्ण पणे चुकीचे आहे!

या विदर्भवादी नेत्यांचे असे डोके फिरल्यासारखे स्टेटमेंट्स ऐकले की अशा नेत्यांना समाज विघातक कारवाया करणे,   लोकांना उत्तेजित करणे,  वा विभाजन वादी फुटीर प्रवृत्तीला उत्तेजन देणे या साठी कुठल्या कलमा खाली कारवाई केली जाउ शकते हे बघून, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला हवी. नाही तर ही विषवल्ली फोफावण्यास वेळ लागणार नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

27 Responses to वेडा झालाय का हा?

 1. vidyadhar says:

  काका,
  हे धोटेसाहेब नेहेमीच असं बरळतात. आणि ज्या देशात कसाब मराठी बोलतो, हिंदी गाणी गुणगुणतो हि न्यूज होऊ शकते आणि चवीने वाचली पाहिली ऐकली जाऊ शकते, त्या देशात धोट्यानी असलं विधान करूनही ते निवडून येतात ह्यात मला आश्चर्य वाटत नाही.

  ता.क. – कशी कुणास ठाऊक आज माझ्या ऑफिसातून तुमच्या ब्लॉग वरची बंदी उठली. 🙂

  • जांबुवंत कसा काय निवडून येतो ते त्यालाच ठाउक. गेली कित्येक वर्ष त्याचं नांव ऐकू येत नव्हतं. आज एकदम आकस्मितरित्या तोंड उघड्लं त्यांनी>

   एक म्हण आहे, ” जो पर्यंत तोंड बंद आहे, तो पर्यंत मी जंटलमन आहे- तोंड उघडलं की……..?” 🙂

 2. ketan says:

  I hope our contry’s constitution has law, so that police can file a case against such people and keep them behind the bars…!

 3. “व्वा रे शेर!! आ गया शेर!!!” असं जांबूवंतराव धोटे बद्दल विदर्भात म्हणायचे… आणि ते एकेकाळी खरच होतं.. पण आता जांबूवंतराव धोटें सारख्या टॉपच्या नेत्याची अवस्था बघवत नाही.
  मस्त लेख महेंद्रजी, एखादी वेगळ्या विदर्भाबद्दलची तुमची पोस्ट येउ द्यात.

  • गजानन
   ह्या माणसाला लाइम लाईट मधे कसं रहावं हे बरोबर समजायचं. हल्ली थोडा नजरेआड झाला होता हा माणूस. याच्या ह्या स्टेटमेंट मुळॆ याला लिहितांना पण बहुमानाने लिहायला हात कचरतात.
   वेगळ्या विदर्भावरची पोस्ट? जेंव्हा वाटेल तेंव्हा लिहिन. सध्या तरी इच्छा होत नाही काही लिहायची त्या विषयावर. अगदी मनातून आल्याशिवाय कसं जमणार लिहिण?

  • गजानन
   वाघ ( शेर) हा फॉर्वर्ड ब्लॉक चा झेंडा होता. म्हणुन वा रे शेर आया शेर ही घोषणा दिली जायची. पण नंतर लोकांनी , पत्रकारांनी जांबुवंतलाच शेर म्हणणे सुरु केले.पक्षाचा चांगला झेंडा असल्याचे परिणाम …!! 🙂

 4. अगदी बरोबर लिहिलंत काका.. जांबूवंत धोटे मला पेपरवेट प्रकरणामुळेच माहित होता. आणि आता हे नवीन ऐकून तर अजूनच डोक्यात गेला आहे. देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे याच्यावर..!!

  @ विद्याधर, काकांचा ब्लॉग आता डॉट कॉम झाल्याने बंदी उठली असेल 🙂

 5. तो वेडाच आहे. त्याने विधानसभेत अध्यक्षांवर पेपरवेट फेकून मारला होता तेव्हा पासून मी याला ओळखायला लागलो. मुर्ख लेकाचा.

 6. thanthanpal says:

  जांबूवंत धोटे. हा एक वेळ खरच वाघ होता. पण रामराव आदिकांचा जावई झाला आणि तो शेळी झाला. कॉंग्रेस ने असे अनेक वाघ आपल्या कळपात ओढून त्यांचे खच्चीकरण केले. पवार ज्याच्या गळ्यात हात घालतात त्याचे राजकीय अस्तित्व संपलेच समजा असे म्हणतात. राज्य करण्यासाठी समाजात फोडा आणि झोडा ही नीती गेल्या 60 साठ वर्षात वापरली त्या पापाचे आणि असमतोल प्रादेशिक विकास याचे हे फळ आहे महा. नव्हे तर आंध्र मध्ये सुद्धा अशीच आग कॉंग्रेसने लावून ठेवली जी आता बुजवता येत नाही. पंजाब मध्ये इंदिरा गांधी यांनी लावलेली आग तर त्यांचा बळी घेवून गेली . तरी पण क्षणिक स्वार्था साठी खालच्या पातळीवरचे राजकारण सर्वच राजकारणी पक्ष बिनधास्त करतात. जनतेचे यांना कांही देणे घेणे नाही. भारतात लोकशाही म्हणजे स्वार्थी नेत्यांची स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी फक्त जनते मार्फत निवडलेली शासन अशी झाली आहे.thanthanpal.blogspot.com

  • धोटे का निवडुन येतात? सोपं उत्तर आहे- आपल्या देशात माणसाला नाही , तर पक्षाला मतंदान करण्याची परंपरा आहे. एकदा एखाद्या पक्षाचं कुंकु लागलं की त्या पक्षाचे सगळे पाठीराखे आपली मतं तुमच्या झोळीत आपोआप टाकणार. हेच कारण आहे त्यांचं निवडून यायचं.
   तेलंगणाचा प्रश्न अजूनही काही शतकं सुटणार नाही.. असमतोल विकास हे तुम्ही अगदी योग्य लिहिलंय. एखाद्या भागाचा विकास खूप होतो, आणि इतर भागाकडे दुर्लक्ष होतं तेंव्हा कधी ना कधी तरी उठाव होणारंच.

   नागपूरचं अधिवेशन हे हुर्डापार्टी अधिवेशन म्हणुन ओळखलं जातं. सगळे लोकं ते लवकरात लवकर कसे गुंडाळता येईल इकडेच लक्ष ठेउन असतात. मग सभागृहात दंगा करणे वगैरे प्रकार मुद्दाम केले जातात. असो..

 7. काही नाही यड झ* झालाय हा..काय बरळतो स्वताला तरी कळत काय ह्याला?

 8. दादा,
  तुम्ही या एकाच नमुन्याबद्दल लिहिलंत. असे कितीतरी नमुने आपल्या राजकारणात वर्षानुवर्षे काम करतायंत. कधी मजबुरी म्हणून, कधी दुस-या पक्षाला प्रत्युत्तर म्हणून अशा लोकांना जनता म्हणजे आपण सर्व निवडून देत असतो.

  • ह्याने थोडा अतीरेकच केलाय. मला खूप खटकलं, की एक्स एमपी असं बोलू शकतो?? आणि हा माणूस पाच वेळा निवडून आलाय! लोकं पण अती शहाणेच आहेत , जे अशा जनावरांना निवडून देतात.

 9. Manmaujee says:

  निव्वळ प्रसिद्धीचा हव्यास बाकी काही नाही….स्वतंत्र राज्याचे मुख्यमंत्री व्हयायची स्वप्न पाहत असेल हा माणूस.

  • ही अशी माणसं आहेत, म्हणुनच तर वेगळा विदर्भ ही संकल्पना मला पटत नाही. दुसरे गौडा तयार होतील.
   त्या पेक्षा आहे त्याच सरकारने व्यवस्थित लक्ष दिलं तर ही वेगळ्या विदर्भाची गरजच नाही पडणार!

 10. MOHINI says:

  khup chan ,mala sagala picture na pahata dolya samor disat hota ,itka chan lihile ahe tumhi.

 11. bhaanasa says:

  मंत्री आणि गुंडात असाही काही फरक आधीही नव्हताच आता तर जाहिरपणे मुक्ताफळे उधळता आहेत झालं. सगळेच सारखे तर कारवाई करायची कोणी कोणावर……. चार दिवस बोंब ठोकेल आणि गप बसेल… जनता अशीही मूर्खच आहे ( असा समस्त नेत्यांचा समज आहे ) तेव्हां …… ही अशी शकले कशाला करायची आहेत???? हीच शक्ती विधायक कामात लावा की जरा…..

  • गुंड असल्याशिवाय मंत्री होता येत नाही असंही म्हणतात काही लोकं..मला वाटतं की एखाद्याला मंत्रीपद देतांना त्याचा आय क्यु चेक करुन नंतरच मग मंत्री पद द्यावं.
   आजकाल पाचवी पास शिक्षण मंत्री असू शकतो आपला, काय होणार या देशाचं कुणास ठाऊक!

 12. महेश कुलकर्णी says:

  जन्बुतराव घोटे नेते कसे झाले, व लोकांनी त्यांना कसे निवडून दिले, विदर्भ समितीतआपले वेगळे स्थान असावे म्हणून ते वाटेल ते बोलतात ,

  • वेगळे स्थान कसे मिळेल असं काही बोलून?
   असं बोलण्यामुळे आपली बोद्धिक पातळी दाखवुन दिलेली आहे त्याने. याचा आय क्यु किती असेल बरं??

 13. आमच्या नागपूरचा हा माणूस आहे ह्याची लाज वाटते. ही असली विधानं करुच कसं शकतं कोणी….?? आत्मघाती पथकांमधे स्वत: जाणार आहेत का हे धोटे ?? काहीतरी बरळायचं म्हणजे काय ??

  आकाशाच्या मांडवाखाली वगैरे असं केलेलं ह्याचं लग्न फार गाजलं होतं तेव्हा. रवीनगरला आम्ही राहत असताना भली मोठी कुत्री घेऊन रोज फिरायला जायचे हे जांबुवंतराव 🙂

  • जयश्री
   मी लहान असतांना पासून हा निवडणूक लढवतो .
   ते लग्नं मलाही आठवतं. बराच गाजावाजा झाला होता.
   लायकीपेक्षा जास्त मिळालं की असं होतं! 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s