ब्लॉगर्स मेळावा

घरचं लग्नं आटोपलं की कसं वाटतं?? अर्थात मुली कडून तुम्ही असल्यावर म्हणतोय मी… तस्सच वाटतंय हा ब्लॉगर्स मेळावा झाल्यावर. खरं सांगतो. पण इथे आता लग्न झालं म्हणून विश्रांती घेण्यासाठी पण वेळ नाही. एक महत्वाच काम आलंय, ज्या साठी सोमवारपासून तयारी करतोय. १४ तारखेला थोडा या कामाच्या व्यापातून श्वास घेण्या इतपत मोकळा होईन.

म्हणूनच घाई घाईत ही एक पोस्ट .. छे.. पोस्ट म्हणण्यापेक्षा फोटो अपलोड करतोय(कांचन फोटो करता थॅंक्स )बऱ्याच लोकांनी पोस्ट टाकली आहेतच , त्यामुळे आता नवीन काही फारसं लिहिण्यासारखं राहिलेलं नाही. फक्त एकच गोष्ट सांगाविशी वाटते- तुम्हा सगळ्यांचे या ब्लॉगर्स मेळाव्याला येउन मेळावा यशस्वी केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

आणि , शंतनू ओक.. धन्यवाद. मराठी डिक्शनरी छान आहे. एकही चूक नाही या पोस्ट मधे. फायरफॉक्सचं पुढलं व्हर्जन डाउनलोड केलं आणि बस्स प्लग इन काम करणे सुरु झाले… डिक्शनरी ऍक्टिव्हेट झाली..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक. Bookmark the permalink.

73 Responses to ब्लॉगर्स मेळावा

 1. अगदी बरोबर बोललात दादा. घरचं कार्य असल्यासारखंच वाटतंय. मी एकदा बझ्झवर हे बोललेही होते की मला स्वत:च्या मुलीचं लग्न करून देतेय, असंच फिलिंग येतंय. शंतनू ओक यांची डिक्शनरी माझ्याकडे आहे पण ऑनलाईन असेल, तर लिंकचा पत्ता देता का?

 2. खुप आभार हा मेळावा आयोजीत केल्याबद्दल….

 3. म्हणूनच मी म्हटलं ना की ” कांचन कराई (मोगरा फुलला), महेंद्र कुलकर्णी (काय वाट्टेल ते), रोहन चौधरी (माझी सह्यभमंती) हे जणू आपल्या घरचंच कार्य असल्यासारखे सर्वांचं स्वागत करत होते.”

  • नरेंद्रजी
   तुम्हाला भेटायची अन तुमच्या फोटोग्राफीबद्दल गप्पा मारायची इच्छा होती, पण जमलं नाही..आता ओळख झाली आहेच, तेंव्हा लवकरच भेटू या..

 4. सीताराम वाळके says:

  मेळावा उत्तमरित्या आयोजित करुन यशस्वी केल्याबदद्ल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!!

 5. mazejag says:

  Thank you in tonn….I can see some of my favorites over here….

  • धन्यवाद.. तुम्ही पण ब्लॉग सुरु केलेला दिसतोय.. ब्लॉग पाहिला आणि आवडला..रेग्युलरली अपडेट करीत रहा.. शुभेच्छा.

 6. काका, खरंय. तुम्ही, कांचन आणि रोहनने केवढी प्रचंड मेहनत घेतलीत ते लोकांच्या ब्लॉगपोस्ट्स, प्रतिक्रिया, बझ वरून कळतंच आहे. खूप खूप अभिनंदन !!! आणि १४ तारखेच्या मीटिंगनंतर मस्त सुट्टी टाका 🙂

  • हेरंब
   तुझी फोनवरुन उपस्थिती खूप भावली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला तुझ्याशी बोलून. तू परत भारतामधे येशील तेंव्हा नक्की भेटू..

 7. सर्वांना प्रत्यक्ष भेटून खुपंच मजा आली…

 8. आन काय ओ काय वाट्टेल ते! (महेंद्र सायेब वो आप्ले), आमाला काय निमंत्रण नाय काय नाय, कसं वो यायचं आमी लग्नाला वो? सांगा तुमी.

  डायबेटीस विरुद्ध लढा

  माझी जालवही

  • आवो, निमंत्रन देल्लं व्हतं नां.. तुमीच आला न्हाय!!
   पण खरंच, तुम्ही पण आले असता तर मजा आली असती. पुण्याची बरीच मंडळी आली होती.
   पुढल्यावेळेस नक्की या.. लवकरच करु या..

 9. महेन्द्रजी आता अपेक्षा अजुन वाढल्या आहेत पुढील मीटिंगसाठी..खूप खूप आभार..

 10. bhaanasa says:

  महेंद्र, तू, कांचन व रोहन यांनी खरोखरच घरचे कार्य असल्यासारखेच काम केलेत. इतके जण आले तेही मेगाब्लॉक असतानाही, मेळावा यशस्वी झाला. सगळ्यांचे व खास तुम्हा तिघांचे, अभिनंदन! लगेच सगळ्यांनी पोस्ट व फोटो टाकून आम्हां न येऊ शकलेल्या लोकांची तहान भागवलीत त्याबद्दल आभार. मला मात्र फार रुखरुख लागून राहिली.

  • श्री
   तुझी खूप आठवण काढली सगळ्यांनीच.. खुपच बरं वाटलं, नेहेमी ब्लॉग वर भेटणारे प्रत्यक्षात भेटल्याने मजा आली.

 11. सचिन says:

  काका,आपल्या सर्वांचे खुप खूप आभार हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल…

 12. sahajach says:

  महेंद्रजी फोटोंबद्दल तुमचे आणि कांचनचे आभार… पुढची पोस्ट मात्र सविस्तर वृत्त देणारी टाका… भलती उत्सुकता आहे आम्हा सगळ्यांना…

  तुमच्या, रोहनच्या आणि कांचनच्या कष्टाला फळं आले हा मेळावा यशस्वी झाल्याने!!! 🙂 …..

  आता भारतात आल्यावर मात्र नक्की भेटायचेय मला सगळ्यांनाच!!!

 13. Pingback: मराठी ब्लॉगर मेळावा: सर्व वृत्तांत एके ठिकाणी « रमलखुणा

 14. सागर says:

  धन्यवाद काका मेळावा आयोजीत केल्याबद्दल….

 15. Sarika says:

  काका,

  यशस्वी मेळावा!!!! हार्दिक अभिनंदन!!!!

 16. महेंद्र आणि कांचन,

  दोघांचंही हार्दिक अभिनंदन! चार अनोळखी लोक जमवून समारंभ करणे हे सोपे नाही. ८० च्या वर लोक आले हे खरच कौतुकास्पद आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी ह्यावेळी मनात असूनही येऊ शकलो नाही. पुढच्यावेळी मात्र हजार राहायची खूप ईच्छा आहे.

  • निरंजन
   पुढल्यावेळी नक्की प्रयत्न करा. आता बहुतेक दिवाळीच्या वेळी पाहू जमतं का..

 17. महेंद्रकाका,
  खरच आर्यनसकट सगळ्यांनी खूप मजा केली या मेळाव्यात. अजय, ज्याला ब्लॉगिंगचा ओ का ठो माहित नाही आणि कुणाशीही वाचक म्हणूनसुद्धा ओळख नाही, असे असुनसुद्धा त्याला कार्यक्रम आणि सगळे जण खूप आवडले.

 18. आयोजकांचे आणि मेळाव्यास उपस्थित सर्व जणांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी किती मेहनत घेतलीत ते मेळाव्याच्या पोस्ट वाचून आणि तुम्ही अपलोड केलेले फोटो पाहून कळले. प्रत्येक फोटो अगदी तपशिलासहित दिला आहे. आत्ता कामं आटोपली की तुम्ही आयोजकांनी मिळून मस्त खादडीचा श्रमपरिहार करा.

  • सिध्दार्थ
   १४ पर्यंत खूप बिझी आहे. नंतर पाहू या एकदा. तसा रात्री मी आणि रोहन व अपर्णा गेलो होतो गोमंतकला. 🙂 मासे खायला.

 19. Maithili says:

  Kaka, kharech khoop majja aali melawyala. Thanks for creating such a wonderfull and memorable day in my life..( jara jastach formal hotay , I knw pan kharech thanks..)
  Aapalya gappa matr rahilya…pudhachya veli nakki….!!!

  • मैथिली
   वेळ कमी असल्याने सगळ्यांशीच गप्पा मारता आल्या नाहीत. पण पुढल्या वेळेस नक्की!! 🙂

 20. vidyadhar says:

  काका,
  मेळावा जोरदारच झाला. सगळे वृत्तांत वाचून दुधाची तहान ताकावर भागवतोय…पण जसजसे वृत्तांत वाचतोय..किती मिस केलंय ह्याची जाणीव गडद होत जातेय…

  • विद्याधर
   मुंबईला परत आलास की भेटू या एकदा. खादाडी मिटींग तरी नक्कीच करता येईल . पुन्हा करायची आहेच एकदा..

 21. काका,
  खरंच खूप मजा आली. आपण ज्यांचे ब्लॉग वाचतो, त्यांना प्रत्यक्षात भेटण्यात एक वेगळाच आनंद आहे.

  आणि सभागृहात झालेल्या चर्चे दरम्यान अनेक समस्या आणि त्यावरचे उपाय माहित पडले. आपल्याला ज्या समस्या आहेत, किंवा आपण काही गोष्टींची कल्पना केलेली नसते, त्यांचं समाधान आणि निराकरण करून मिळालं की अत्यंत बरं वाटतं.

  पुढच्या मेळाव्याची/सम्मेलनाची आता पासूनच उत्सुकता लागली आहे.

  • विनय
   पुढला पण नक्कीच करु .. पण इतक्यात नाही. आणि त्या साठी एक फॉर्म टाकलाय कांचनच्या ब्लॉग वर तो सगळ्या लोकांनी भरल्यास बरं पुढलं ठरवता येईल- खर्चाबद्दल !:)

 22. सुरेश पेठे says:

  महेंद्रजी, आपल्या गेल्याच भेटीच्या वेळी मुंबई मेळाव्या बद्दल सुतोवाचं केलं गेलं आणि मेळावा दिमाखात संपन्न झाला सुध्दा ! मनात तर खूप होते मेळाव्याला हजर रहायचे पण नाही जमले. रूख रूख राहून गेली. तरीही तुम्ही. कांचन व राहूल नी मनापासून मेहनत घेऊन हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक करायला हवेच. पुढील मेळाव्याला नक्की हजर रहाण्याचा प्रयत्न करीन
  आता सगळ्यांच्या पोस्ट वाचून त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करून बघतो !

  • तुमच्याच पुढाकाराने सुरुवात केली होती, पण नेमकं तुम्हालाच जमलं नाही यायला. पुढच्यावेळी नक्की जमवा.

 23. Rohan says:

  सर्व उत्तमरित्या पार पडणार होतेच… शंकाच नव्हती… 🙂 पण मला एक प्रश्न आहे… तो इकडे नाही विचारत… फोन करून विचारीन 🙂

 24. krishnakath says:

  महाजालावर मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याबद्दल भरभरून लिहिलेले वाचले. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!

  तुमच्या या पोस्ट्मूळे मला मराठी स्पेलचेकची महत्वपूर्ण माहिती मिळाली……अत्ताच ऍड-ऑन जोडतो आणि लगोलग शंतनु ओक व त्यांच्या सहकार्यांना अभिप्राय कळवतो…

  • शंतनू ओक यांचं स्पेल चेक मस्त आहे. मी आधी पण एकदा डाउनलोड केलं होतं, पण बहुतेक फाफॉच्या जुन्या व्हर्जन मुळे ते चालत नव्हतं.
   अतिशय उत्कृष्ट झाला मेळावा…

 25. ब्लॉगर्सचा मेळावा बघून कल्पना आली किती मजा आली असेल ते. नाही जमले या वेळी पण !
  😦 आपण घेतलेल्या परिश्रमाचे कौतूक करावे तितके कमीच आहे.
  जयंत कुलकर्णी

  • जयंत
   पुण्याच्या मेळाव्याला जाता आलं नाही मला, तेंव्हा पण खूप वाईट वाटलं होतं. आणि तेव्हापासूनच मनात होतं मुंबईला मेळावा करायचं.

 26. महेंद्र्जी, माझी पुन्हा एक संधी हुकली. स्टार माझा ब्लॉग पारितोषिक वितरणासाठी ऑफिस कामामुळे येऊ शकलो नाही, मग मेळाव्याला यायचे असे ठरविले अन नेमका त्याचवेळी आजारी पडलो. असो. पण आपल्या सगळ्यांकडून मेळाव्याचा वृत्तांत समजला. अगदी आम्ही बातम्या देतो त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने! मी एक विचार करतो आहे की या सगळ्या ब्लॉगर मंडळीना एक दिवस मुंबईच्या बाहेर एकत्र करता येईल का? नगर हे ठिकाण कसे राहील? या नव्या माध्यमाची माहिती ग्रामीण भागातही करून देता येईल का? आपल्या सारख्या मंडळीनी पुढाकार घेतल्यास हे काम होऊ शकेल असे वाटते.

  • मला वाटतं एखादी जागा जसे लोणावळा वगैरे जास्त संयुक्तिक होईल, कारण मुंबई – नगर म्हणजे कमीत कमी ८ तास प्रवास. आणि पुन्हा परगावाहून इतके लोकं येणार मग रहाण्याची वगैरे व्यवस्था.. थोडं गैर सोईचं होईल असं वाटतं. पण असे मेळावे लोकल लेव्हलला भरले तर नक्कीच जागरुकता निर्माण होईल लहान शहरातच,आणि तरूण फेसबुक , ऑर्कुटच्या विळख्यातून बाहेर पडतील.

 27. हार्दिक अभिनंदन महेंद्र! तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे आणि ब्लॉगर्सच्या सहभागाने मेळावा दणदणीत यशस्वी झालेला दिसतोय. फोटोज शेअर केल्याबद्दल धन्यवाद! ह्यावेळी परत मिस झाला. पुढचा जमेल का बघायचं.

  • संपदा
   नक्कीच!! पहिलाच मेळावा इतका छान झाला, की पुढला मेळावा कधी करायचा म्हणुन लोकांचे प्रश्न होते.
   आता बहुतेक दिवाळीत बघु या जमेल तर.. 🙂 बरं हा आमचा जागतिक मेळावा होता बरं का. हेरंबने फोन वर तर अपर्णा स्वतः अमेरिकेहून हजेरी लावली होती. 🙂

   • पुढच्या जागतिक मेळाव्याला प्रत्यक्ष नाहीतर फोनवर उपस्थित राहीन.

    • फोन वर नाही.. दिवाळीच्या सुमारास करु या सिलेक्टीव्ह मेळावा.. तेंव्हा प्रत्यक्ष हजर राहण्याचं जमव इथे यायचं!!

 28. आल्हाद alias Alhad says:

  “पुढली मिटींग तुम्ही लोकांनीच अरेंज करायची आहे.. चालेल का? म्हणजे, तू सचिन,आल्हाद वगैरे मंडळींनी”

  नक्कीच काका…
  आपलं मार्गदर्शन मात्र सदैव असू द्या.

  धन्यवाद

 29. anukshre says:

  मस्त मस्त स्नेहसमेलन मस्तच!!! सर्वांनी छान छान पोस्ट लिहिल्या आहेत. आपण सर्वांनी आपुलकीने संमेलन यशस्वी केलेत खूप खूप कौतुक. मी भारतात आले कि सर्वाना आवर्जून भेटेनच, पण पोस्ट मुळे आनंद अनुपस्थिती असूनही मिळाला. सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद.

 30. Deep says:

  he kadhee zaaale??? mereko kisine bola hi nshii 😦

  • दीप
   सगळ्याच तर ब्लॉग वर या मेळाव्याचं विझेट लागलं होतं. कमीत कमी ६ -७ पोस्ट लिहिल्या आहेत यावर. दोन माझ्या तीन कांचन आणि दोन रोहनच्या. बहुतेक तुम्ही इतर ब्लॉग वाचले नसावेत म्हणुन सुटलं असेल नजरेतून.

 31. sonalw says:

  Mahendraji, Kanchan, Rohan, Tumha sagalyanch manapasun abhinandan. Mi yewoo shakale nahi pan khup miss karat hote ha melawa.
  Melawyacha itiwrutant kuthalya blogwar waachayala milel?

 32. नमस्कार,

  आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
  थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
  मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
  कृपया सपंर्कात राहावे.

  नागेश देशपांडे
  blogmaajha@gmail.com
  blogmajha.blogspot.com

  • नागेश
   मला आठवतंय. नक्कीच संपर्कात राहू. त्यासाठीच तर तो ब्लॉगर मेळावा केला होता नं?

 33. नमस्कार महेंद्रकाका,

  ब्लॉगर मेळावा आयोजित केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार !!!

  मला वाटत्तं मी आपल्याशी पहिल्याप्रथमच बोलत आहे कदाचित

  पण अनंद वाटला मेळाव्यात, माझाही एक उपक्रम आहे ई दिवाळी अंकाचा बघुया कितपत यशस्वी होतो ते.

  पुन्हा भेटूच

  धन्यवाद !!!

  • प्रथमेश
   धन्यवाद. सगळ्यांना एकदा प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती ती पुर्ण झाली या ब्लॉगर्स मिटच्या निमित्याने. आता पुढल्या वर्षी पुन्हा एकदा करू या . 🙂

 34. santosh Deshmukh says:

  काका ,आठवण करून देतोय ,दिवाळी १५ दिवसावर आली ,आपणपण भेटू

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s