अजय अतुल शो


परवा पुण्याला जातांना चुनाभट्टी च्या जवळ एक बोर्ड दिसला अजय – अतूल गोगावले ह्या दोन मराठी  कलाकारांचा लाइव्ह शो  १५ तारखेला -असा बोर्ड दिसला. खूप कौतूक वाटलं , की मराठी कलाकारांच्या शोचे पण  बोर्ड  पण लावले जातात म्हणुन.

पण तेवढयात खालच्या ओळी कडे लक्ष गेलं. पहिली गोष्ट लक्षात आली ती ही  की हा शो अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधे होणार आहे. डोळ्यापुढे एकदम ट्राफिक जॅम चं चित्र उभं राहिलं- नुकताच मनसेच्या खाद्य मेळाव्यासाठी तिकडे जाणं झालं होतं, त्यामुळे तिथल्या ट्रॅफिकची स्थिती कशी आहे याची पुर्ण कल्पना होती. इतका चुकीचा व्हेन्यु का ठेवतात हे लोकं?

सहज त्या जाहिरातीच्या  बोर्ड वरच्या दर पत्रकाकडे लक्ष गेलं आणि करकचून ब्रेक मारला आणि कार थांबवून पुन्हा एकदा कन्फर्म केलं. एखाद्या करमणुकीच्या साधारण दोन ते तीन तासाच्या करमणुकीच्या कार्यक्रमासाठी तिकिट दर किती असावेत?

उत्तर देण्या पुर्वी  एक गोष्ट लक्षात घ्या की हा कार्यक्रम मराठी गाण्यांचा आणि कलाकारांचा आहे मी मुद्दामच मराठी माणसांसाठी असे म्हणत नाही. या शो मधे शंकर महादेवन, सोनाली कुळकर्णी ( बहुतेक नाच असेल) कुणाला गांजावाला, वैशाली सामंत ही सगळी मंडळी भाग घेणार आहेत. तिकिट दर आहेत ५०००, ३०००, १५००, ५०० रुपये फक्त!!!

ह्या तिकिट दरा वरून मी हिशेब लावला, की जरी ते पंधराशेचे जरी तिकिट घेतलं तरीही दोन तासाच्या करमणुकीचा माझा कुटुंबियांसमवेत करमणुकीचा खर्च होईल ६०००/- आणि तोच खर्च जर पहिल्या रांगेतले तिकिट म्हणजे ५००० रुपये वालं काढलं तर होईल २०००० रुपये.

कुठला महामूर्ख मराठी मध्यमवर्गीय माणुस अशा कार्यक्रमासाठी इतके पैसे खर्च करेल?  बरं हा अजय अतुल वगैरेंच्या गायनाच्या दर्जा बद्दल काय बोलायचं? सर्वसाधारण प्रतीचे आवाज आहेत त्यांचे. प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या लायकीचे तर नक्कीच नाहीत.

जसा माझ्या मनात वर दिलेला प्रश्न आला, तसाच तुमच्याही मनात आला असेलच. इतके पैसे खर्च करणारा वर्ग आहे का मुंबईत?  अशा सर्वसाधारण कार्यक्रमासाठी इतकं तिकिट?  कदाचित मी या दोन गायकांना सर्वसाधारण म्हंटलं म्हणुन कदाचित काही लोकं दुखावले जातील, पण..

कुठे सलिल कुलकर्णी , आणि कौशल सारखे डाउन द अर्थ सुसंस्कृत लोकं  आणि कुठे हे असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ! यांची अशी वागणूक पाहिली   हे असे उद्दाम लोकं  नुसते डोक्यात जातात. माझा एक मित्र अशा लोकांना  ’हे नुकतीच पिपाणी फुंकायला शिकलेले’ असा उल्लेख करतो नेहेमी.

एकच सांगावसं वाटतं, ’अरे तुम्हाला मोठं केलंय ते सर्वसामान्य मराठी माणसाने. पाच  हजाराचे तिकिट काढून कार्यक्रम बघायला येणारे , किंवा फ्री पासेस वर येणाऱ्या साहेब लोकांनी नाही. तेंव्हा जर कार्यक्रम करायचाच होता, तर दर हे सर्वसामान्यांना परवडणारे ठेवायला हवे होते.’

याच विषयावर एका बातमी मधे  इ सेन्स एडव्हर्टायझिंगवाले म्हणतात , २५ हजार  क्रिम डे ला क्रिम मराठी लोकं हा कार्यक्रम पहायला येतील. हा कार्यक्रम ’नव प्रतिष्ठित’ अशा लोकांनी ’नवश्रीमंतांसाठीच’ आयोजित केलेला आहे.

खरं सांगायचं, तर मुंबईला फ्री पासेस वरच लोकं हा कार्यक्रम बघायला जातील असे मला तरी वाटते. आणि   त्याउप्परही जर कोणी गेलंच, तर त्यांची दुसरी कमाई आहे हे नक्की समजून घ्या!! निढळाच्या घामाचा पैसा असा नाचणाऱ्या, गाणाऱ्या वर उडवण्याचा   मूर्खपणा  करणार नाही हे नक्की!!

काही लोकं म्हणतील की क्रिकेटची पण अशीच तिकिटं होती… तर त्या बाबतही माझं मत असंच आहे.

च्यायला, यांची वाह वाह करीत आपण ह्यांना  डोक्यावर घ्यायचं,   आणि वेळ पडली की ह्या लोकांनीच आपल्या छाताडावर नाचायचं… !!! जाने दो हे दोन्ही गायक आजपासून माझ्या ब्लॅक लिस्ट मधे टाकले मी.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , , . Bookmark the permalink.

92 Responses to अजय अतुल शो

 1. सागर says:

  काका
  अजय अतुल यांचा आवाज जरी तुम्हाला सामान्य वाटल तरी ते चांगल संगीत देतात अस माझ मत आहे…काही तरी नवीन व वेगळ करतात…सलील व कोशल यांच्या सोबत तुलना करणे मला योग्य वाटत नाही कारण सलील व अजय अतुल हे संपूर्ण वेगळ संगीत देतात..मला ही अजय अतुल काही विशेष वाटत नव्हते पण त्यांची काही गाणी खरच चांगली आहेत…राहिली गोष्ट तिकीटाची तर ते मान्य …पण विनाकारण अजय अतुल यांची सलील व इनामदार यांच्या सोबत तुलना करून उपयोग नाही…अन अजय व अतुल यांचा उद्दामपना अजून मलातरी कुठे दिसला नाही… 🙂 उलट मला आनंद वाटतो कि कधी नव्हे ते मराठी संगीतकारचे एवढे मोठे शो होत आहेत…सलील कुलकर्णी यांची फिल्मी गीते आपण आईकली आहेत का?

  • सागर

   मी सिनेमात गाणी म्हंटली म्हणून त्यांना मोठं म्हणणार नाही. मोठं होण्याचा मानदंड हा सामाजिक बांधिलकीची जाणीव, आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो ही जाणीव, माय मराठीशी जुळलेली नाळ, हीच मानतो मी.

   संगीतकार किंवा गायक मोठा होतो , तो नेहेमी मायबाप प्रेक्षकांमुळे. ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं त्या समाजाला विसरून जाण्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे माझा.

   पुर्वी पण एकदा लिहिलं होतं की एनजीओ चा घोळ या विषयावर. या दोघांच्या शो मधे मिळणारे पैसे एनजीओ(कुठल्या बरं??) देण्यात येणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

   • सागर says:

    आप खाली जसा म्हंटला आहे कि तिकीट दरांबाबत निर्माते दोषी असतील…
    मला तरी त्यांची (काही)गाणी खूप खूप आवडली…तिकीट जास्त आहे म्हणून त्यांच्या गाण्याची तुलना करणे मला तरी पटत नाही…मी कधी गेलो नाही पण मोठ्या मोठ्या क्लासिकल गायक किंवा वादक यांच्या शो ची तिकिटे तरी कुठे स्वस्त असतात?म्हणून मी नांदेड ला होणारा शंकर दरबार या फुकट होणाऱ्या कार्यक्रमाला जायचो…पण तिकीट जास्त असते म्हणून आपण कलाकाराला दोषी कसे ठरवू शकतो?

    • क्लासिकल गाण्याचे कार्यक्रम मी बरेचदा अटेंड केलेले आहेत. ५००० रुपये वगैरे दर नसतात. मी नागपूरला असतांना ५०,१००, ३०० पर्यंत तिकीट दर असायचे.

     कलाकाराने अशा कार्यक्रमाचा हिस्सा होऊच नये, जिथे असे अवाजवी दर आहेत तिथे.

 2. शत प्रतिशत सहमत.
  ही जाहिरात गेले कैक दिवस वृत्तपत्रात येतेय…मलाही हाच प्रश्न पडलाय की इतकी महागडी तिकिटं कोण घेणार…आणि शेवटी ऐकायची तीच गाणी..जी ऐकून ऐकून कान किटलेत आता.

  असो. तरीही कुणी तरी मायेचे पूत असतील तर जातील ह्या कार्यक्रमाला….आपली मराठी माणसं आहेत म्हणून सोडून देऊ या. 😉

  • फ्री पास वाले लोकं असतात. बरेचदा काळा पैसा पांढरा करायला पण असे कार्यक्रम केले जातात . आपण सरळ दुर्लक्ष करुन सोडून द्यायचं झालं.

 3. मला जे म्हणायचे ते सागरने आधीच सांगितले आहेत.. ही संगीतकार जोडी उद्दामपणासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती, आणि निर्माते हे दर ठरवित असावेत.. त्याबद्द्ल ह्यांना दोषी ठरविणे चुकीचे वाटते मला

  • आनंद

   ह्या जोडीचे नांव मी नुकतेच महाराष्ट्र सरकारने पारितोषिक दिले तेंव्हाच ऐकले होते. तो पर्यंत काही फारसं नव्हतं नांव ! निर्माते एकटेच दर ठरवीत नसतात. त्या शो मधे हे जेंव्हा गाणं म्हणायला जात आहेत तेंव्हा त्यांना पण दर माहिती असावेत ह्या कार्यक्रमाचे.त्यावर आक्षेप घेउन ते दर कमी केले तर गाणं म्हणतो असं का नाही म्हणू शकले ते??
   ज्या मराठी माणसाने तुम्हाला मोठं केलं त्यांना गाणं म्हणुन दाखवायचं? की पैशासाठी ….. जाउ दे.. भाषा वाईट होते आहे उगीच..

   • काका एरवी काही वाटलं नसत पण

    जाने दो हे दोन्ही गायक आजपासून माझ्या ब्लॅक लिस्ट मधे टाकले मी.

    हे वाक्य वाचलं आणि लिहिलं, केवळ जास्त दरांमुळे डायरेक्ट ब्लॅक लिस्ट?

    • आनंद
     ज्या गायकांना सामान्य लोकं नको आहेत- फक्त ५००० रुपये तिकिट घेणारे रसिक हवे आहेत त्यांना तेच लखलाभ होवो.. मी नाही पाच हजार खर्च करु शकणारा.. जर त्या गायकांना सामान्य माणसं नको , तर त्ते गायक मला पण नको …. साधा सरळ हिशोब आहे हा.

 4. महेन्द्रकाका, सहमत तुमच्या मताशी..गेले कित्येक दिवस मी ही जाहिरात बघतोय..माझे बाबा बोलले होते बघ कुठे आहे कार्यक्रम, टिकीत मिळेल का?…पण जेव्हा त्याना मी तिकिटाचे दर सांगितले म्हणाले मरो तो शो, किराणा भरू पुढल्या महिन्यात त्याच पैशाने…महिना अखेरीस पोटाला चिमटा काढत जगणारी सामान्य माणस आपण…५००० रुपडे खर्च करण्यापेक्षा घरी सीडीवर गाणी ऐकून दाद देईन मी हवी तेवढी, कशाला घालवू ५००० रुपये?

 5. आल्हाद alias Alhad says:

  हा त्यांच्या पोटापाण्याचा धंदा आहे आणि तो ते करतात.
  कुणी कसे पैसे कमवावे हे आपण कोण सांगणार!?
  तिकीट दर जास्त वाटले तर न जाणे हाच उपाय… पुढच्या झी मराठी अवॉर्ड फंक्शनला गातीलच की!!!

  • पोटापाण्याचा धंदा नाही हा. प्रायोजक म्हणताहेत की सगळे पैसे एका एनजीओ ला देणार आहेत . एनजीओ कोणाची आहे माहिती आहे कां?? जाउ द्या.

 6. विनय says:

  काका,
  कुठल्या ही कार्यक्रमासाठी हे दर अवाजवी आहेत. मराठी सोडा, पण हिंदी सिनेमातील कलाकारांना सुद्धा देशाच्या सामान्य माणसांनीच एवढं मोठं केलं आहे. देशातील श्रीमंत आणि अति श्रीमंतांची तेवढी संख्याच नाहीये, की ते ह्यांना आणि ह्यांच्या सिनेमांना लाखोंची आणि कोट्यावध्यांची उलाढाल करून द्यायला.

  हल्ली सिनेमाच्या तिकीटाचे सुद्धा तसेच आहे. वीक-एन्डला २५० च्या खाली कुठला ही चित्रपट नाही. चार जणांच्या परिवाराने सिनेमा बघायचा म्हंटलं, तर १००० रु. च्या खाली खर्च नाही. ह्यातूनच पायरसीचे प्रकार वाढतात. आणि हे लोकं म्हणतात की आम्ही केवळ कार्यक्रम नाही पण एक अनुभव देतो. You do not watch the programme, you experience it!!

  • विनय,
   मला पण नेमकं हेच म्हणायचंय. या कलाकारांना सामान्य प्रेक्षक मोठं करतात,म्हणुनच सामान्य प्रेक्षकांना एक त्यांनी दिलेल्या प्रेमाची पावती म्हणुन कार्यक्रमाचे दर कमी ठेवले असते तर योग्य ठरलं असतं.

   सिनेमाचे दर पण खूप वाढलेले आहेत. मल्टिप्लेक्स ऐवजी सिंगल थिएटरला गेलो तर ७० रुपये पडतात तिकिटाचे. कुठलेच तिकिट दर जस्टिफाय होऊ शकत नाही. नाशिक, औरंगाबाद, नागपूर , इंदौर वगैरे शहरात मल्टिप्लेक्स मधे पण तिकिट दर कमीच आहेत. पण मोठ्या शहरात मात्र खूप असतात.

   मुंबईला मल्टिप्लेक्स मधे हजार रुपये सिनेमाचे तिकिट, ४०-५० रुपये पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स ४० रु.. प्रत्येकी खर्च.

   हे पोस्ट लिहितांना माझा उद्देश हाच होता की लोकांच्या मनात अशा खूप जास्त अवास्तव दराबद्दल थोडा अवेअरनेस निर्माण व्हावा. जर तुम्हाला हे योग्य वाटायला लागलं, तर पुढल्या वेळेस तिकिट दर दहा हजार पण असू शकेल .

 7. काका, तिकिटाचे दर एवढाल्ले असता काम नयेतच. अगदी अगदी सहमत. पण त्यामुळे त्यांना ब्लॅक लिस्ट करणं जरा खटकलं. आयपीएल ची तिकिटं एवढी महाग आहेत म्हणून सचिनला ब्लॅक लिस्ट करू का आपण? आयपीएलवर बहिष्कार टाकणं (आणि ललित मोदीला ठोकणं) हा उपाय योग्य आहे. त्याप्रमाणे अजय अतुल ऐवजी कदाचित या कार्यक्रमावर आणि निर्मात्यांवर बहिष्कार घालणं जास्त संयुक्तिक वाटतं मला. इथे मी अजय अतुल ची तुलना सचिनशी मुळीच करत नाहीये. सहज एक नाव सांगितलं. आणि अजय अतुलने अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आहे काका.. उदा.
  अग बाई अरेच्चा
  सावरखेड एक गाव
  चेकमेट
  नटरंग

  • हेरंब,
   कदाचित योग्य असेल तू म्हणतोस ते..पण…

   पण एक बाकी खूप खटकतं, की त्यांनी प्रायोजकांना सरळ नकार द्यायचा इतकी तिकिटं आहेत आणि माझे फॅन इतके पैसे खर्च करु शकत नाहीत, म्हणून.. ’ कारण शो हा फॅन्स करताच होता नां?
   ..

  • abhijit says:

   हेरंब, सचिन शी सहमत आहे. तुम्हाला जर ती गाणी मनापासून आवडली असती तर तुम्ही असं कधीच म्हणाला नसता. ते उत्तम संगीतकार आहेत.
   >>कुठे सलिल कुलकर्णी , आणि कौशल सारखे डाउन द अर्थ सुसंस्कृत लोकं आणि कुठे हे असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले !
   सलील वर माझा विशेष लोभ नाही. कौशल बद्दल काही म्हणणे नाही. पण “वाह कौशल मान गये” अशी दाद माझ्याकडून तरी गेली नाही.
   उलट अजय अतुलला अशी दाद मी ब-याच वेळा दिली आहे.(जोगवा, नटरंग, अगं बाई अरेच्चा )राहिला प्रश्न दरांचा दर नक्कीच जास्त आहेत. सजगता वाढली पाहिजे. ब्लॅक लिस्ट वगैरे टोकाची भूमिका वाटली.
   नुकतीच पिपाणी वाजवणारे अशी अवहेलना केवळ संगीताचं शिक्षण घेतलं नाही म्हणून करणं योग्य नव्हे.

   • अभिजीत
    अभिमान गीत ऐकतांना अंगावर आलेले शहारे जे अनुभवले ते, किंवा सलिलच्या … असो कम्पॅरिझन करीत नाही. लिहिण्याच्या ओघात त्या दोघांची नांवं लिहिली गेली- माझा उद्देश तसा नव्हता.

    मराठी अभिमान गीताच्या वेळेस कार्यक्रम विनामुल्य करणे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम खूपच बटबटीत दिसत होता.

    मला अजूनही सुसंस्कृत आणि ज्या समाजाने आपल्याला इतकं दिलं त्या समाजाची बूज राखणारे लोकं जास्त आवडतात.

    कदाचित ब्लॅकलिस्ट वगैरे एकदम टोकाची भूमिका असेल असं मलाही वाटु लागलंय. पण ……….

 8. mandar17390 says:

  Nakki kalat nahi ki barobar kai!
  Jar ka apan ashi apexsha karto ter mag javabdar pane pirated CD ghenyache talto ka???
  Kahihi aso jar ka sawai gandharva cha ticket 500 madhe (4 divasnche season ticket bharatiya baithak) shakya ahe ter ithe ka nahi ?

  • मला पण तेच म्हणायचंय.
   एखाद्या तमासगीर बाईने पैसे वाल्या शेठ समोर नाचणं वाटतंय मला हे. जर पैसा असेल, तर माझा नाच बघ, नाहीतर चालता हो…..

 9. काका, असलेच शोज बरेच पुढारी केवळ कमाईसाठी ठेवतात अन वर मारे सामाजिक बांधीलकी म्हणतात. खरंच असे करणे डोक्यात जायला लागलेले आहे. अन लोकही त्याला मान्यता देतात. बाकी संगीतात कोण मोठ कोण छोटं हा वाद मी तरी करत नाही. कानाला चांगले वाटते ते चांगले संगीत हा आपला खाक्या आहे.

  • सहमत आहे.
   माझी अपेक्षा होती की मायकेल जॅक्सनच्या शो बद्दल पण कोणीतरी लिहिल म्हणून. 🙂

 10. madhuri says:

  Ya doghani khup changli gani dili ahet. AAjkal he fyad nighale ahe Marathi Bana cha punyatla prayg nehemich asa mahag asto..karan to nehemich fund raiser asto….tyana black list karnyapeksha NGO na paise kase kharch karnar ha prashna karawa…tithe transparency pahije……ani kahi lokankade khup paise astat……

  Americat pun Sonu nigam / Ar Rehman yanchi tkt khup astat shw housefull ani classical la mjun 60 doki……..dar hi kami

  aso . paisa kuthe jato he baghitle pahije

  MAdhuri

  • माधुरी

   मी जेंव्हा ही जाहिरात पाहिली, तेंव्हा पहिला विचार आला की ज्या सामान्यांनी या दोघांना मोठं केलं, डोक्यावर घेतलं, त्यांना हा शो पहाता येणार नाही- कारण इतके पैसेच ते सामान्य माणसं देउ शकत नाही.

   मला स्वतःला पहाण्याची इच्छा होती असे पण नाही. मला पहायचा नव्हताच, कारण मला फारशी गाणी माहिती नाहीत या दोघांची.

   प्रतिक्रियेसाठी आभार.

 11. महेंद्र
  तुमची अजय अतुल वरची टीका थोडी बोचली. अर्थात ते तुमच स्वतःच मत आहे. मलातरी अजय अतुल चं संगीत फारच प्रिय आहे. तसंच सलीलच ही. पण दोघांच्या संगीताचा बाजच वेगळा. आता तिकिटाच्या किंमतीबाबत म्हणायचं तर मी म्हणीन की मराठी माणूस ५००० रुपये लावून शो करायची हिम्मत दाखवतो हे कौतुकास्पदच. सचिन जेव्हा जाहिराती साठी कोट्यावधी रुपये मागतो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही तसच. आता त्याच्या जाहिरातीसाठी प्रत्यक्ष आपल्या खिशातून पैसे जात नसले तरी जाहिरातदार शेवटी आपलाच खिसा कापतात ना? अजय अतुल च्या शोचे पैसे डायरेक्ट आपल्या खिश्यातून जाणार आहेत इतकेच. आणि जेव्हा एवढा दर लावतायत ह्याचा अर्थ एवढे पैसे देणारे आहेत असा त्यांचा कयास आहे. आपल्याला वाटत की मराठी माणूस कशाला एवढा पैसा देईल. तुम्ही आम्ही कदाचित नाही देणार. पण देणारे असतात म्हणून असे शो लागतात. फारतर काय नाही ऐकला प्रत्यक्ष कार्यक्रम, टीव्ही वर नाहीतरी येईलच.

  • निरंजन

   टीका कदाचित त्या तिकीट दरा मुळे झाली असावी. मी स्वतः पण त्यांचं फारसं संगीत ऐकलेलं नाही – नटरंगची गाणी मुलीने आणली होती त्यातली एक दोन ऐकली. तितकीशी भावली नाही. हे पण कारण असू शकते.

   जाहिरातीची आणि अशा कार्यक्रमांची तुलना होऊच शकत नाही. कारण त्या मधे खर्च हा विभागला जातो प्रॉडक्ट वर.

   असे शो बरेचदा काळा पैसा गोरा करायला वापरले जातात. कसे त्यावर एक वेगळे पोस्ट होऊ शकेल.

   • Amolkumar says:

    काका,
    “असे शो बरेचदा काळा पैसा गोरा करायला वापरले जातात” यात तिळमात्र शंका नाही,

    • अमोल
     आज उत्तर लिहितोय, शो फ्लॉप गेला. कुठेही या शोचा नामोल्लेख पण आला नाही.
     मग प्रश्न हा पडतो, इतका फियास्को होणार हे माहिती नव्हतं कां? इतकी मोठी नांवं असूनही शो ला कव्हरेज न मिळणं, या मधेच या शो चे फेल्युअर आहे.

 12. Vidyadhar says:

  काका,
  मलासुद्धा हेरंबसारखंच वाटतं. आणि काका बरेचदा, आर्टिस्ट आधी बुक होतात. तिकिटांच्या दरांची अनाऊन्समेंट वगैरे नंतर होते. एकदा अजय-अतुल ना त्यांचं मानधन ठरलं, की त्यांचा तिकिटविक्री वगैरेशी काहीच संबंध नसतो. ते सगळं नंतर होतं आणि तिकिटांचे दर बघून नंतर माघार घेणं अनप्रोफेशनल ठरेल. हां, साईन करायच्या आधीच ह्या गोष्टी क्लियर करता येतात. पण कदाचित अजय-अतुल अजून एव्हढे मोठे झालेले नाहीत, की त्यांना अश्या डिमांड्स करता याव्यात आणि कदाचित त्यांना रसही नसावा, ते आपल्या मानधनात खूश असतील. सामान्य आहे ही गोष्ट. त्या बाबतीत तुमचा आक्षेप मानण्या जोगा आहे, पण तुम्हीच विचार करा, त्यांनी मानी राहून आज पैसे नाकारले, तर उद्या त्यांचा घरखर्च चालवायला रसिक जाणार नाहीत. कित्येक कलाकार हलाखीत गेल्याच्या बातम्या आपण रोज वाचतो. अर्थात अजय-अतुलला ही गोष्ट लागू होते की नाही ही गोष्ट अलाहिदा.
  बाकी, ते टॅलेन्टेड आहेत हे खरंच आहे. त्यामुळे मी ब्लॅकलिस्ट तरी नाही करणार. पण एकंदरच हे जे अव्वाच्या सव्वा दरांचं पेव सिनेमागृहांपासून, मॅचेसपासून सगळ्या कार्यक्रमांपर्यंत फुटलंय ते मला बिलकुलच आवडत नाही.

  • विद्याधर
   यावर बरंच लिहिलंय- आता नविन काही शिल्लक नाही लिहायला.
   पण तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांमुळे मात्र पुन्हा एकदा विचार करायला हवा, हे जाणवलं.. 🙂

   गोष्टी माणसांच्या हे सुधा मुर्तींचं पुस्तक वाचलं होतं. त्यामधे एका प्रसंगात जे आर डी सुधाताईंना सांगतात ” नेहेमी जे काही करायचं ते आत्मविश्वासाने, आणि एकदा यश मिळालं की मात्र समाजाचं जे देणं असतं ते परत करायचं. समाजाचं आपल्यावर केवढं ऋण असतं. त्याची परत फेड केलीच पाहिजे”

 13. meharsha says:

  sir,
  Ajay Atul yanche sangit apratim aahe . Te uttam sangitkar aasale tari shevati manasech aahet. Ajakalchya jagat paisa konala nakoy? prashna aahe ticket cha tar te denari lok aahet yachi aayojakana khatri aahe .aamachya sarkhe t.v.var show kadhi dakhvatil tyachi vaat baghu.

  • अगदी खरं आहे… देणारे लोकं आहेत – आपण कोण आक्षेप घेणार?

   एक लक्षात आलं का, आज १६ तारीख, हा कार्यक्रम अगदी दुर्लक्षित झाला. कुठेही ( एकाही पेपरला ) याचा साधा उल्लेखही झालेला नाही – आणि या अपयशाचे कारण केवळ ते तिकिट दर असावेत.

 14. ngadre says:

  as misucians they are great.
  Of course tumche bakiche mudde patale.

  Musician mhanoon te kuthe kami nahit..rates matr kami have hote.

  Faar tar NGO sathi special donation passes 10,000 la thevayache ani standing kinva baithak takoon 150 200 la common man la hee choice thevayacha ase karayala have hote.

  • नचिकेत
   धन्यवाद. एनजीओ साठी जास्त किमतीचे तिकिट तयार करुन विकणे हा पण एक चांगला उपाय झाला असता.
   हे लोकं कुठल्या एन जी ओ ला पैसे देणार त्याचं नांव, आणि त्या एनजीओ चा चेअरपर्सन कोण आहे हे आधी डिक्लीयर केले तर लोकांना नक्की खरं काय ते कळेल. नाहीतर हे लोकं जे सांगतील त्यावर विश्वास ठेवायचा.

 15. laxmi says:

  लता मंगेशकर,आशा भोसले हयांच्या नंतर एखाद्या मराठी कलाकराने ईतक्या भव्य स्वरूपात concert
  करने नक्कीच कौतुकास्पद आहे आणि तेही फक्त मराठी गाण्यासाठी, त्यांनी संगीतबध्ह केलेली कितीतरी मराठी गाणी हिन्दी कार्यक्रमात लावली गेलेली आहेत.हिन्दी शो मधे मराठी गाणी ऐकली की नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो (मोरया मोरया,गोंधल…..)

  सोनू निगम,ए आर रहमान यांनी केलेल्या concert ची टिकिट तरी कुठे कमी असतात,मग फक्त टिकिट जास्त आहेत म्हणून यात त्यानचाच दोष आहे हे चुकीचे ठरेल.उलट जर त्यांची अशीच प्रगति होत राहिली तर काही वर्षानी परदेशत सुदधा त्यांच्या concert झाल्या तर नवल वाटायला नको.

  • लक्ष्मी
   मोठ्या रकमांची तिकिटं म्हणजे भव्य स्वरुपात असे होत नाही. कौतुकास्पद तर आहेच . सुरुवातीलाच मी ते म्हटलंय पोस्ट मधे.

   परदेशातही कॉन्सर्ट व्हाव्यात, आणि त्या साठी शुभेच्छा. पण जमिनीशी नाळ तुटू न देता. त्यांना दोष देण्याचे एकच कारण, की त्यांना ज्या लोकांनी मोठं केलं त्यांच्याशी नातं जुळवून ठेवण्याची इच्छा नाही.

   मराठी अभिमान गीताच्या सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर ( तिकिट न लावता केलेला सोहोळा- आणि हा पाच हजार रुपये तिकिटाचा)अगदी बिभत्स सोहोळा वाटतो हा.

   ह्या सगळ्या उच्च किमतीच्या तिकिटात नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे असं वाटतंय मला.

 16. vijayshendge says:

  महेंद्र,
  खरंतर कोणत्याही कलावंताना आपली दैवी देणगी अशी चढ्या भवना विकू नये असा माझा प्रामाणिक मत आहे. तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्ही पैसा जरूर मिळवा. तो जगण्यासाठी आवश्यक त्यापेक्षा हि थोडा अधिक मिळवा. पण कलावंतानी आपली कला हा एखाद्या उद्योगपतीचा कारखाना किवा टांकसाळ आहे अशा अविर्भावात वावरू नये. ते दैवी दान आहे. ते सन्मानानच वापरायला हवं. पण याचा भान असलेला एकही कलावंत सापडणार नाही.

  • विजय
   प्रतिक्रियेकरता आभार आणि ब्लॉग वर स्वागत.

   मला दोन गोष्टी खटकल्या:-
   १) अवास्तव तिकिट दर
   २) ज्या लोकांनी मोठं केलं त्या सर्व सामान्य लोकांसाठी कार्यक्रम ठेवले असते तर ते जास्त योग्य झाले असते .
   ३) ज्या लोकांनी हे कार्यक्रम केले त्यांनी एका बातमीत म्हंटलं की आम्हाला फक्त २५ हजार क्रिम डे ला क्रिम लोकंच यायला हवे आहेत या कार्यक्रमाला.हे पण वाक्य खूप खटकलं..

   शेवटी कार्यक्रम काल झाला, आणि अपेक्षेप्रमाणे आपटलाच!!

 17. Bharati says:

  महेंद्र्जी,
  तुमचा राग योग्य आहे.मी लहानपणी ओर्केस्त्रा पाहायला जायचे बाबंबरोबर तेव्हा पीठ (भारतीय बैठक )होते,गरीब सामान्य तेथेच बसायचे.पण कलाकाराला खरी दाद तेच देत असत.50रु.100रु.तिकीतवाले टाळ्या पण वाजवायचे नाहीत, पण पिठातले चक्क नाचायचे काय,शिट्ट्या मारायचे.आवडले की तेच गाणे 5 ते 6 वेळा म्हणायला लावल्याखेरीज ते पुढचे काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्स्तितीत नसायचे.गाणे आवडले नाही तर नो मोअर किव्हा बास करा म्हणून पळवून लावायचे.
  आता जे कार्यक्रम होतात ते आवडो न आवडो बोलायची सोय नाही.टाळ्या वाजवायचे आव्हाहन ईत्के अती होते की…एकही टाळी
  वाजत नाही.तिकिटाचे भाव पाहून मोठे गायक सहज खरेदी करता येतात हे जसे कळले.तसेच त्यांचे महत्व्ह कमी zआले.खर्या गायकला किव्हा कलाकाराला शोची गरज वाटत नाही.. ते लोकरंजनासाठी कार्यक्रम करतात त्याना मानधन मिळते.त्यात समाधान
  मानतात.पण आता अशाणा कोण विचारणार ? पैशाची किमया न्यारी…त्यानाच लोक विचारी !म्हणून खरे प्रसिधी देणारे अश्या कार्यक्रमापासून वंचित रहातात.कोण,कुठला..ते विचारावे..सांगावे लागते…त्याने कोणत्या सिनेमात गाणे म्हटले काय,किव्हा संगीत दिले काय सामान्याना काही फरक पडत नाही.
  चार दिवसाने नवे गाणे हिट,लगेच नवा गायक फिट! त्यात मराठीने अजुन हवी तितकी मजल मारलेली नाही.

  • “चार दिवसाने नवे गाणे हिट,लगेच नवा गायक फिट! त्यात मराठीने अजुन हवी तितकी मजल मारलेली नाही.”

   बरोबर लिहिलंय भारती. काही सिनेमाचे हिरो ” वन मुव्ही हिट” असतात- जसे कुमार गौरव…. !! 🙂

 18. नचिकेत हयांच मत १००% टक्के पटल…

 19. Prasad Tharwal says:

  Kaka,
  Agadi Barobar boltay tumhi…!!! he doghehi Punyachya eka madhyam wargiya kutumbat wadhalele aahet..! Atta prasiddhi milali mhanun asa Huralun jaaun… aapan konasathi ha karyakram kartoy…. hech wisarun gelet..!! Hath dhagala jari lagle tari paay jaminiwar thevato toch khara kalakar…!! Hyana aajun mahit nahi watat, ki amhala jar dokyawar chadhawata yeta tar dokyawarun utravata hi yeta…!!

 20. Pushpraj says:

  अगदी मनातल बोललात बघा काका…मी सुद्धा गेल्या काही दिवसात पार्ल्यात अजय अतुलच्या शोचा बोर्ड रोज बघतोय.. टेन्षन एवढच यायच की मुंबईतलाच काय पण महाराष्ट्रातल्या कुठल्याच शहरातला मराठी माणूस पैसे खर्च करण्याबदद्ल १००दा विचार करेल…१५०० रु टिकेट म्हणणजे झाले काय…आजकाल कुठे ८० रु तिकीटात मराठी माणूस मल्टिपलेक्स मधे जाऊन सिनेमा बघू लागलाय आणि अशा स्थितीत १५०० रु चा कार्यक्रम बघ्याला आणखी २० वर्ष नक्कीच लागतील…ते सुद्धा मुंबई मधे..ग्रामीण भागाबदद्ल बोलायलाच नको…त्यामुळे अजय अतुल माझ्या सुद्धा डोक्यात शिरले होते…….
  किमती ठरवताना थोडाफार विचार नक्कीच करायला हवा…ह्या किमती पाहिल्यावर मला पहिली आठवण आली ती कौशल इनामदारांची…ठाण्यातला कार्यक्रम हा खरोखर मराठी माणसांसाठीच होता…त्यामुळे कौशलच्या कार्यक्रमात ३०० रुपयांची सीडी घेण्यासाठी जी झुंबड पडली होती ती मराठी माणसांचीच होती ह्यात शंकाच नाही…त्यामुळे मराठी माणसे खर्च करत नाहीत अस म्हणं चुकीच आहे ….. पण खिष्याला परवडतील असे तिकीट दर असायला हवेत…

  • पुष्पराज
   प्रदीर्घ प्रतिक्रियेसाठी आभार.
   कार्यक्रम कशासाठी केलाय ते वर दिलंय. आधी पण एक पोस्ट लिहिलं होतं, एनजीओचा खेळ म्हणुन.

 21. चांगली आहेत त्यांची गाणी. त्यांचे कमवायचे दिवस आहेत सध्या. जे तिकीट विकत घेवु शकत नाहीत त्यांनी कार्यक्रम टिव्हीवर पहायचा. किती रागवता एखाद्यावर?

  • राग आल्यावर तो व्यक्त केला नाही तर मनात साचून रहातो, आणि उगीच चिडचिड होते. एकदा पोस्ट लिहिलं की मग झालं!! एकदम मन हलक होतं.

 22. महेश says:

  तिकिटाचे दर परवडणारे नसतात, लोकांनी कार्यक्रमावर म्हणजे ज्यांनी कार्यक्रम ठेवला आहे त्या आयोजकांनाच जाब विचारला पाहिजे सर्व सामान्य माणसाला हे दर कधीच परद्वणार नाही, महागाई तर नाहीच नाही,आयोजक सर्व सामान्य लोकाचा विचार करीत नाही केवळ स्वताला प्रसिद्धी मिळते म्हणून मधून मधून असे ते (आयोजक)प्रयोग करीत असतात महेश

  • महेश
   लोकं कार्यक्रम पाहतील तर प्रसिद्धी मिळेल .. जर कोणी पहायला गेलंच नाही तर?? तिकिटं विकली गेली असं दाखवायचं, आणि आपलाच काळा पैसा पांढरा करायचा; एनजीओ पण आपलीच, तोच पैसा दान दिला की त्यावर टॅक्स बेनिफिट मिळतोच.. मज्जा आहे की नाही??

 23. mazasansar says:

  चांगली आहेत त्यांची गाणी.

 24. bhaanasa says:

  आजकाल कुठलाही सिनेमा किंवा लाईव्ह कॉन्सर्ट पाहावयाचा विचार केला की लगेच १,००० ते ५,००० पर्यंत रक्कम खर्च होणारच हे लक्षात आले की नकोच वाटते. शिवाय गर्दी, वाहतुकीचा खोळंबा, येण्याजाण्यातला त्रास आणि १००० -१५०० रुपये मोजूनही मागेच कुठेसे बसायचे त्यापेक्षा घरीच बसून ऐकावे ते बरे… मराठी असो की हिंदी, शेवटी मायबाप प्रेक्षकांनी कौतुक करावे-प्रेम करावे-नावाजावे हीच कलाकाराची अपेक्षा असते नं…. मग किमान त्यांच्या खिशाला परवडतील असे दर सर्वसाधारणपणे असायला हवेत. बाकी कधीमधी काही खास लोकांसाठी अगदी १०,००० तिकीट दर लावून खेळ करा नं…. ते आज पैसे देतील आणि उद्या विचारतील….. ” कोण आहेत हे अजय-अतुल? ” विचारेनात का….. की फरक पैंदा…. पैसे मिळाल्याशी मतलब होता, तो साधला नं……
  अजय-अतुलची अग बाई अरेच्च्या, जोगवा व नटरंगची काही गाणी मला अतिशय भावलीत. 🙂

  • काही नाही..जुन्या काळी कशा नाचणाऱ्या तवायफ असायच्या की ज्या केवळ पैशाकरता नाचायच्या.. त्यांच्यात आणि ह्यामधे काय फरक आहे ?? काहीच दिसत नाही मला तरी. पैसेवाल्याची दासी/ बटीक झाली आहे कला आजकाल…. 😦

 25. n.0rmal@yahoo.com says:

  salil kulkarni suddha ardhya halkundane piwla zalelyanpaikich aahe. susanskrutpanaacha aani down to earth aslyacha burkha pangharto evdhech. sangeet digdarshan tase so so ch aste tyache. nashib changle ya ashya lokaanche. media cha support milto aajkaal kunalahi.

  shriniwas khale, hridaynath, sudhir phadke yanchya kalat media strong nasunahi he kalakar ajunahi lokanchya manat pahilya sthanawar aahet. salil aani mandalini jara tv shows aani itar goshtinwar laksh kami karun kamacha darja warcha rahil he pahave adhi

  • प्रतिक्रियेकरता आभार.
   तुमचे म्हणणे की पुर्वी मिडीया इतका समर्थ नव्हता कुणाला मोठं आणि कुणाला छोटं करायला. आजकाल मिडीया हाईप खूप वाढलेली आहे.

 26. mahesh mohan shinde says:

  you are wrong ………………………. kadachit barobarahi asel pan te mandayachi paddhat chukichi hoti………………

 27. ajay says:

  काय रे बाबा ? एवढा काय राग आमच्यावर. शेवटि मराठी माणसं ना आपण, जरा कोणी वर चढतांना दिसला कि बाकीचे पाय ओढायला तयार .. ओढा लेकाहो तुम्ही तरी काय करणार.

  • अजय
   सर्व प्रथम ब्लॉग वर स्वागत.
   तुमचे पाय ओढण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. माझे विचार त्या कार्यक्रमाबद्दलचे वर दिलेले आहेतच. ज्या सर्व सामान्य मराठी माणसांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना परवडेल इतकं तिकिट असायला हवं होतं एवढीच इच्छा होती. जर प्रोग्राम अरेंज करणाऱ्याने इतकी जास्त तिकिटं ठेवली असतील, तर त्यावर तुम्ही काहीच ऑब्जेक्शन का घेतले नाही?
   बस्स.. एवढंच. आम्हाला कोणी मराठी माणूस वर गेला तर त्याच्या बद्दल कौतुकच आहे. ब्लॉगची सुरुवात वाचलेली दिसत नाही तुम्ही, पुन्हा एकदा वाचा म्हणजे लक्षात येईल.

   तुम्ही मोठे झालात, आम्हाला आनंदच आहे. फक्त तुम्हाला ज्यांनी मोठं केलं त्यांना विसरु नका म्हणजे झालं. आता एक करा, एक प्रोग्राम करा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामधे. ( क्रिम डे ला क्रिम साठी नाही) बस्स.. एवढंच.

   • अजय, मी स्वत: तुमचा डाइ हार्ट फॅन..पण आता मीच तुम्हाला विचारतो तुम्ही सामान्य कुटुंबातुन पुढे आलात..ह्याच मराठी जनतेने तुम्हाला प्रेम दिला, फेम दिला आणि आता त्याच प्रेमाखातर तुम्ही आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून ५००० रुपयाची तिकिटे लावून शो करणार? नको रे नको…मी तुमच संगीत सीडीवरच ऐकेन, परवडत नाय आम्हाला तुझ्या शो ची तिकिटे…खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना…

 28. Umesh says:

  तुम्ही दिलेल्या ” अजय अतूल शो ” या heading मध्ये ” तू ” ऱ्हस्व ( ” तु ” ) हवा.

 29. Aparna says:

  काका, मीही या शोची जाहिरात पाहुन तिकिटदर पाहून खरंच आ वासला होता..अरे डॉलर्समध्ये कन्व्हर्ट केले तरी शंभर डॉलर असे एकदम खर्चता येत नाही आणि दोघं चौघं म्हणजे आणखी वाढीव खर्च….
  फ़क्त तुमची भूमिकाही जास्त टोकाची वाटते..कारण मला स्वतःला तरी शोजचे रेट्स मायदेशातकसे ठरतात हे माहित नाही पण इथे तरी कलावंतांचं मानधन ठरलेलं असतं आणि मग आयोजक हे बाकीचं पाहतात त्यामुळे त्यांना किती तोंड असतं माहित नाही.
  फ़क्त अजय-अतुलचं म्हणाल तर मला आठवतंय मागच्या वेळी मी मुंबईत असताना त्यांनी अगदी अस्साच शो दिवाळीच्या वेळी तमाम लोकांसाठी चकटफ़ु केला होता..त्यावेळीही मला सोबत नसल्याने जाता आलं नव्हतं.पण रंगलाही होता…तर त्यांच्यावर काट मारु नका…शिवाय राग आला म्हणून त्यांच्या कलेवरही आक्षेप घेणं थोडं चुकीचं आहे…
  I am surprised to see why Ajay didnt mention about the free show in his own comment…anyway….cool down kaks…:)

  • अपर्णा
   माझा त्या वेळेसचा मूड तसा होता. अजय ला एक पत्र पाठवल्ंय इथे देतो पहा खाली.अर्थात अजूनतरी उत्तर आलेले नाही.. पण लेटस.. सी… आणि पुर्वी जेंव्हा शो केला होता तेंव्हा कदाचित ते इतके प्रसिद्ध/पॉप्युलॅर नसतील ( कदाचित बरं कां) म्हणुन शो केला असावा . शो फुकट करावा असे मी कधीच म्हणणार नाही, पण तिकिट मात्र सामान्यांना परवडणारीच असावी ह्या मतावर मी ठाम आहे. .. कालचे पत्र पहा खाली देतोय.

   अजय
   काल एक गोष्ट लिहायची राहून गेली, म्हणुन हे पुन्हा लिहायला घेतले. तुम्ही पाहिले असेल की ब्लॉग वर जवळपास सगळ्याच लोकांनी तुमच्या गाण्याची तारिफच केलेली आहे आणि आवडलीत म्हणुन लिहिलंय( मी सोडून- कारण ते पाच हजाराचे तिकिट पाहून माझे डोके फिरले होते, तेंव्हा माझ्याकडुन तारिफ होणे शक्यच नव्हते. त्या क्षणी माझ्या समोर तुम्ही दोघं व्हिलन म्हणुन होतात . स्पष्ट लिहितो, राग नसावा, मी नेहेमीच अगदी मला काय वाटेल ( त्या-त्या क्षणी ) ते लिहितो) .नंतर लोकांनी सांगितल्यावर तुमची गाणी ऐकली, आणि ती आवडली पण .नटरंगची आवडली नाहीत फारशी, पण अगबाई अरेच्या ची खूप आवडली- हे आज ’काय वाटतं ते; आहे.

   सगळ्याच लोकांना अशा पाच हजार दरा बद्दल ऑब्जेक्शन होतं. अशी जास्त दराची तिकिटे केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठी ठेवली जातात हे उघड सत्य आहे. तेंव्हा तुम्ही यात सहभागी होणे नक्कीच तुमच्या फॅन्सला आवडणार नाही.
   एक विचारू? या शो मधे मिळालेले पैसे कुठल्या एनजीओ ला दिले गेले ? जस्ट आउट ऑफ क्युरॉसिटी विचारतोय..
   सामान्यांशी जुळलेली नाळ तशीच कायम ठेवा- तुटू देउ नका . उत्तराची अपेक्षा ठेऊ??

 30. samir deshpande says:

  Mahednrajai,
  Manala tumhala…….
  Khup Khiladu vrutti ahe tumchyat…… Ani Followup karachi paddhat pan mast ahe kuthalyahee goshtichi….

  • समीर
   मी स्वतःशी प्रामाणिक राहुन लिहितो. मला जे वाटेल तेच फक्त इथे लिहिलंय.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

 31. santosh says:

  ५००० रुपये तिकीट म्हणजे मूर्खपणाच आहे, हे मान्य. पण अजय-अतुल ला नवे ठेवताना वापरलेली भाषा म्हणजे…. शेवटी येथे लागतात जातीचेच संगीत ऐकणारे.

  • संतोष
   तुम्हाला आवडणारे संगित मला आवडले पाहिजे असे का वाटते? मला भिमसेन जोशी आवडतात.. तुम्हाला आवडत नसतील तर मी तुमची कीव करावी का? ठिक आहे, प्रत्येकाची आवड असते वेगवेगळी!
   आणि मी वापरलेली भाषा- माझ्या मते योग्यच आहे.
   अजयची वरची कॉमेंट वाचली असेलच, पण मझ्या मेल ला उत्तर दिलेले नाही त्याने.. कदाचित काही उत्तरच नसेल त्यांच्याकडे..

 32. Pingback: २ लक्ष आभार… | काय वाटेल ते……..

 33. shardul says:

  Ajay atul yanche sangit uttma aahe yaat kuthlaach vaad nahi ag bai arechha pasun te jogwa. tynchi maharashtratil lok sangita varchi gaani apratim aahet. maaf kara kaka, pan aasha tika karnyapurvi tumhi moklyamanani gaani tar aaika tyanchi… konalahi ugachch national award milat nahi.
  rahili goshta ticketanchya darachi.. mala saanga lata mangeshkar/ aasha bhosale yanchya karyakramanna kiti dar asto… same is true for classical music concerts….
  asha lokanna pan balcklist madhe taka mag. jyanna parvadat aahet te jatil (mala swatala yevdhi kimmat patat nahi, manoranjana sathi janar aahot aapan sone kharedi sathi nahi).. mala tar abhimaan aahe ki asa bhavya divya karyakram zala mhanun..
  pan yacha artha asa nahi ki mala samanya darat asnare karyakram aavdaat nahit.. shevti darja mahatvacha

  • शार्दुल
   आशा भोसलेंचा कार्यक्रम मी मुंबईलाच ५०० रुपयात पाहिला होता.
   त्याची नटरंग ची गाणी मला फारशी आवडली नाहीत. पण अगबाई अरेच्चा आवडलीत.
   माझा मुख्य मुद्दा हा तिकिट दर हा होता.
   प्रतिक्रियेकरता आभार.

   • shardul says:

    mi tumcha blog prathamach vachla.. changla lihita tumhi. ekandaritach marathi blog var changla lihila jatay.

    • शार्दुल
     प्रतिक्रिये साठी आभार. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह टीकून रहातो.

     • janaki says:

      tumhi ecdha bolat ahat pan me tumhala ek sangte ki ha show nakki housefull honar

      • जानकी
       अहो हा शो कधिच होऊन गेलाय. मला हेच समजत नाही की या पोस्टवर इतक्या प्रतिक्रिया एकदम कशा काय सुरु झाल्या आहेत सडनली? असो.. आभार..

 34. Nitin says:

  मराठी संगीताचा चेहरा मोहरा बदलवणाऱ्या संगीत जोडीच्या दर्जाला सामान्य म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे. संजय लीला भन्साळी, शुभा मुदगल, लक्ष्मिकान्त प्यारेलाल , हेमा मालिनी ई. अनेक अमराठी कलाकारांना ज्यांच्या संगीताने भुरळ पाडली त्यांच्यावर केलेली टीका असमर्थनीयच आहे. मी त्यांच्या संगीताविषयी बोलत आहे शो च्या तिकीट दराबाबत नाही, तो एक वेगळा मुद्दा असू शकेल. खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते http://www.ajayatul.com या त्यांच्या वेबसाईट चे उदघाटन झाले होते. (स्वताची वेबसाईट असलेले मराठीतील एकमेव संगीतकार). तुम्हाला या गोष्टी माहित नसतीलच कारण तुम्ही तर त्यांची गाणी पण ऐकलेली नाहीत तर या गोष्टी कश्या माहित असणार .त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खाली देत आहे, कुठल्याही ईतर मराठी संगीतकाराची यादी एवढी मोठी असेल (National Award तर नाहीच आहे ईतर कुणाकडे) असे वाटत नाही.

  Awards
  Year Award Movie / Serial / Drama
  2003 Alpha Gaurav Sahi Re Sahi
  2004 – 2005 Maharashtra Kala Niketan Puraskar Savarkhed-Ek Gaon
  2004 – 2005 Maharashtra Rajya Vyavsayik Natya Spardha Lochya Jhala Re
  2004 – 2005 Mata Sanman Savarkhed-Ek Gaon
  2004 – 2005 Sanskruti Kala Darpan Aga Bai Areccha
  2007 Maharashtra Rajya Vyavsayik Natya Spardha Kalya Ya Laglya Jeeva
  2008 Mata Sanman Jabardast
  Zee Gaurav Band Premache
  2008 Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava
  2008 Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
  (Best Playback Singer) Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava
  2008 Sanskruti Kala Darpan Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava
  2009 Mata Sanman Jogwa
  2009 Mata Sanman Raja Shiv Chatrapati
  2009 V. Shantaram Puraskar Uladhaal
  2009 V. Shantaram Puraskar
  (Best Singer) Moraya
  2009 Special Jury Award Jogwa
  2009 Sanskuti Kala Darpan Jogwa
  2009 Maharashtracha Favroit Gana Moraya Moraya
  2009 Late. Music Director Shrikant Thakrey Sankrutik Mahotsav Puraskar 2009
  2009 National Film Award For Best Music Direction Jogwa
  2010 Ajay bags the
  ‘Best Singer – Male’ for Khel Mandala [Natrang]) at the Zee Gaurav Awards ’10. Natrang
  2010 Ajay – Atul receive the award for ‘Best Music Direction’ for Natrang at the Zee Gaurav Awards ’10. Natrang

  • नितीन
   तो लेख जेंव्हा लिहिला होता, तेंव्हा ती उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती- मला त्या वेळी जसे वाटले तसे लिहिले.. इतर सगळ्या तुमच्या गोष्टी जरी मान्य केल्या तरीही इतकी जास्त तिकिटाचे भाव असणे अजिबात मान्य केले जाऊ शकत नाही. असो.प्रतिक्रियेकरता आभार.

 35. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे प्रत्येकाचे व्ह्युज वेग वेगळे असतात. तुमच्या मताचा पण आदर आहेच..
  माझ्या दृष्टीने हा विषय संपलाय.

  मी लिहितो मला जे काही वाटेल ते.बरेचदा ते कोणाला चुकिचे ही वाटू शकते. पण एक आहे, मी स्वतःशी प्रामाणिक राहूनच प्रत्येक पोस्ट लिहित असतो. जेंव्हा ते पाच हजार तिकिट पाहिले ,तेंव्हाच ल्क्षात आले की काय खेळी आहे ते. मी यावर जास्त काही लिहित नाही.. असो.
  तुम्ही जे एक एक वाक्य पोस्ट मधले घेउन त्यावर कॉमेंट केलेली आहे, तो प्रकार फक्त मायबोली किंवा ऑर्कुट्सारख्या संस्थळावर चालतो.अशा प्रकारच्या चर्चा मी इथे एनकरेज करत नाही.

  त्या पोस्टचा मतितार्थ तुम्ही लक्षात घेतलेला दिसत नाही . असो. . तुम्हाला जर पाच हजार तिकिट योग्य आहे, असे वाटत असेल तर ठिक आहे, तुमचे माझे विचार सारखे असलेच पाहिजे असे नाही.पुढल्या वेळेस दहा हजार काय लाख रुपये तिकिट ठेवले तरीही माझी हरकत नाही.

  असो, प्रतिक्रिये करता आभार.

 36. SANTOSH says:

  SORRY!!! very bad opinion , mi sahamat nahi ajay atul both are good singer & musician
  anu malik sarkhe chorun tari song karat nahi,

 37. Rajesh says:

  पुणे – लाखो रसिकांची गर्दी… भव्य रंगमंचावर आकर्षक विद्युत रोषणाई… पारंपरिक वाद्य व आधुनिक वाद्यांचा सुरेल संगम… प्रत्येक गीताला मनमोहक नृत्याची साथ… फटाक्‍यांची आतषबाजी… अशा वातावरणात अजय-अतुल या संगीतकार जोडीने एकाहून एक सरस गीते सादर करीत तमाम रसिकांची मने जिंकली. या वेळी पुणेकर रसिक रंगले, दंगले अन्‌ नाचलेही. संगीत मैफलीला मिळालेला रसिकांचा भरघोस प्रतिसाद पाहून अजय-अतुल यांचे मन या वेळी गहिवरले होते.

  “”रसिकांमध्ये मराठी गीतांची गोडी कमी झाली आहे किंवा तरुणाईच्या जिभेवर मराठी गाणी रेंगाळत नाहीत”, हा समज बदलविणाऱ्या आणि मराठी चित्रपट सृष्टीला बहारदार गाणी देत आपल्या वेगळेपणाची मोहोर उमटविणाऱ्या अजय-अतुल या जोडीची संगीत मैफल शनिवारी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. यावेळी गर्दीतून जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट, तरुणाईचा उत्साह… असे दृष्य पाहायला मिळाले. “अप्सरा आली…’, “वाजले की बारा…’, “कोंबडी पळाली..’, “मोरया मोरया…’ अशी अनेक गीतांना प्रेक्षकांनी या वेळी “वन्स मोअर’ची दाद दिली. खुर्च्या डोक्‍यावर घेत, दोन्ही हात वर करीत नाचत, अजय-अतुल यांना गाण्याची “साथ’ देत जल्लोषही केला.

  शिवरंजनी निर्मित, प्रबोधन संस्था, फरांदे स्पेसेस प्रस्तुत आणि पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या सहयोगाने आयोजित ही संगीत मैफल भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि लोकशाहीर विठ्ठल उमाप यांना अर्पण करण्यात आली होती. “सकाळ’ व “साम टीव्ही’ या मैफलीचे माध्यम प्रायोजक होते. या वेळी अजय-अतुल यांनी “जयभवानी… जय शिवाजी…’ या गाजलेल्या गीताने गायनाला सुरवात केली. त्यानंतर “मल्हारवारी मोतीयाने…’, “उदे गं अंबे उदे…’, “चांगभलं रे देवा चांगभंल…’, “आई भवानी तुझ्या कृपेने…’, “मी मर्द मराठा…’, “खेळ मांडियेला…’ अशी विविध गीते सादर करीत रसिकांची मने जिंकली.

  या वेळी गायिका वैशाली सांमतने “चम चम करता है…’, “गोजिरी…’, योगिता गोडबोले, अमृता नातू यांनी “गं पोरी नवरी आली…’, अभिजित सावंत याने “गालावर खळी डोळ्यात धुंदी…’, “आयचा घो…’, कुणाल गांजावाला यांनी “वाऱ्यावरती गंध पसरला..’, “आय गो बाय गो…’, “साडे माडे तीन…’ ही गीते तर हरिहरन यांनी “जीव रंगला दंगला…’, श्रेया घोषाल यांनी “मन रानात गेलं पानापानात गेलं..’ ही अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर केली. अभिनेता उपेंद्र लिमये याने “जोगवा’मधील देवीचा गोंधळ, अमृता खानविलकरने “मला जाऊ द्या ना घरी…’ आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने “अप्सरा आली…’ या गीतांवर बहारदार नृत्य सादर करून तरुणाईची मने अक्षरशः: जिंकली.

  “”या मैफलीस झालेली ही गर्दी पाहून मन अक्षरशः: गहिवरले आहे. श्रोत्यांची मनापासून दाद मिळतेय म्हणून आमची गीते घराघरांत पोहोचली, याचा आनंदही आहे”, असे अजय-अतुल यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. “प्रबोधन’चे रघुनाथ नाईक, फरांडे स्पेसेसचे अनिल फरांडे, रमेश फरांडे, फाउंडेशनचे प्रवीण तुपे, अंजिक्‍य कुलकर्णी हे उपस्थित होते.

  परदेशी रसिकांनीही दिली दाद
  अजय-अतुल यांच्या मराठी गीतांनी केवळ महाराष्ट्रातील लोकांवरच मोहिनी घातली नाही तर या गीतांना सातासमुद्रापलीकडील रसिकही मनापासून दाद देतात, हे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या पटांगणावर झालेल्या संगीत रजनीत पाहायला मिळाले. ठिकठिकाणच्या रसिकांबरोबरच परदेशातील श्रोतेही यात सहभागी झाले होते. त्यांनी “जीव रंगला दंगला…’, “अप्सरा आली..’ अशा मराठमोळ्या गीतांना मनापासून दाद दिली. इतकेच नव्हे या गीतांवर काही आपल्या खास शैलीत या वेळी नृत्य करीत आनंदही लुटला.

 38. Nishant.sardesai says:

  मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही …आजची सगळी उत्कृष्ठ गाणी अजय -अतुलनी लिहिली आहेत ….त्यात गणनायकाय -गणदैवताय या संस्कृत गाण्यापासून नटरंग ,जोगवा या चित्रपटाला संगीत तर दिलाच आहे .पण त्यातली गाणी पण त्यांनीच लिहिली आहेत .
  …..उद्या सलमानखान जर कुठे उघडा नाचणार असेल तर लोकं १०००० रु .तिकीट काढून जातात .(त्यात मराठी लोकं सुद्धा असतात ) तर इतका दर्जेदार संगीताच्या कार्यक्रमाला ५००० रु तिकीट असायला काहीच हरकत नाही ……
  तुम्ही कार्यक्रमाचे दर बघून समोरच्या कलाकाराची किंमत ठरवत असल तर तुम्हाला काला -गीत -संगीताची बिलकुल जण नाही अस मला वाटतंय ……..
  तुमच्या मित्रच मत म्हणाल तर ते त्याच मत आहे .नाहीतर तो संपूर्ण अडाणी आहे …त्याच मत जर तुम्ही लोकांना ऐकवलात तर कदाचीत समोरच्या माणसासमोर तुमची किंमत कमी होऊ शकते …
  मराठी माणसान फक्त कमी दारात काम कराव का ??????
  आज असे कार्यक्रम तिकीट काढून पाहण्याची मराठी माणसाची ऐपत आहे …………
  आणि ज्याची नाही आहे त्यांनी आपली ऐपत निर्माण करावी ……..कारण ऐपत निर्माण करायला नशीब नाही कष्ट करावे लागतात ………………..
  कारण मी अजय -अतुल चा कार्यक्रमाला गेलो होतो …..अतिशय सुंदर ..तुलनाच होऊ शकत नाही ……खरच अजय -अतुलला दैवी देणगी लाभली आहे अस मला वाटत ………………

 39. sahil says:

  kaka
  tumhi mothe gitkar,sangitkar ahat ki vishard ahat. keval tikit jast ahe mahnun te urmat ahe, salil sobat tyanchi tulna kart ahat. te marthmoli gani titkych apulkene gatat.rahila prashna sanskrut panacha .kuthe asanskrutsarkhe vagle. ha tumcha khatatop keval te kulkarni nahi kinva deshapnde nasun gogavale ahe ya sathicha ahe. ani mandand kinva samajik bandhilki keval kulkarni salili yancha davnila bandhaleli ahe ka. ani tumhi my marthicha pulka asnare mulanna english shalet pathavtana ka vichar kart nahi marathicha. car madhe firnare kadhi samanya zhale he kahi kal lech nahi.1999 la aurangabadet abhijit bhosle, govinda yancha sho zhala hota tikit dar 500 pasun suruvat hoti. ha dar ani sadhycha dar yt hajaracha farak ahe. tumhi naka jau mahag ahe tikit tumchi prtikriya dya. matra pipnivale mhanun avhelna karu nka. avhelna karnarana mazha mitra paya odhnarya khekdashi karto.. tya tit dara peksh mahagait jalnarya lokanch vichr kara . tenvhan nahi tumhae sarkarla tumchya bick list madhe takla.samanyancha evdha vichr karavasa vatat asel tar agodar tyna pandhar pesha samajapasun vachva,bildar kadun 15 lakhache ghar 8 lakhatach milnya sathi liha. saheb kon kiti motha he sangnare tumhi amhi kon tynchi kala tyanna motha kart aste . ajay atul sanskrut naste tasech mandand palnare va keval pipani funknare aste tar atache sangit asnare sarv hindi chitrapat naste. nuktach singham rilij zhala asun tyani tik karana chokha uttar dile ahe.

 40. Sambhaji says:

  mala ethe jatiyvadacha vaas yeto ahe. non- brahmin lokani kalechi sadhana tyanchya paddhatine keli ki tyachi nehami asyach prakare helsand keli jate. for example. gramin sahityatyatil vinodi lekhan yacha p l deshpande enod mhanun uphasane ullekh karayache. ajay atul ani salil kulkarni hyanchi tulanach hou shakat nahi, pratekkachi paddhat vegali ahe. changalya goshtinna changale mhana , thodafar manacha mothepana dakhava, kotya vicharsarniche !!!!!!!!!!. Ani hiryachi parakh sonarala aste , tumachyasarakhya raddivalyana nahi, swatachya jaticha asel tar tond fateparyant kautuk karata jari darja nasala tarihi……. jar hat deta yet nasel tar kamitkami pay tari odhu naka.

 41. Piyu says:

  काका, तुम्हाला-आम्हाला ५००० तिकीट परवडत नाही म्हणून हा लेख.. उद्या ज्याला ५००-१००० सुद्धा परवडत नाहीत अश्या गरीब पण अभिरुचीसंपन्न माणसाने तुमच्या आवडत्या कलावंतांसाठी अगदी असाच्या असा “अर्धे हळकुंड” वैगेरे असा लेख लिहिला तर चालेल का??
  आपल्याला परवडत नाही तर आपण सीडी घेऊन घरी कार्यक्रम ऐकू… ज्यांना परवडेल त्यांना जाऊ दे ना…
  शेवटी मराठी कलावंत आहेत ते.. आपणच प्रोत्साहन देऊयात… 🙂

 42. chetana says:

  Piyu, me ekdam agree ahe tuzyahi – ani AJAY ATUL tar maze ALL TIME FEVORITE aahet
  so tyanchya baddal mala ABHIMAN aahe ki te marathi aahet ani itke sundar sangeet aaplya sarwansati tyani dile – ek dam manala jaun bhidte

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s